22-09-2026
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
“गोड मुलांनो, तुम्ही
समजूतदार बनला आहात तर कमाईची खूप-खूप आवड निर्माण झाली पाहिजे. धंदा इत्यादीमधून
देखील वेळ काढून बाबांची आठवण करा तर कमाई होत राहील”
प्रश्न:-
तुम्हा मुलांना
आता कोणते श्रीमत मिळत आहे, जे कधीही मिळाले नाही?
उत्तर:-
१) बाबा
तुम्हाला या वेळी श्रीमत देत आहेत - गोड मुलांनो, पहाटे लवकर उठून बाबांच्या
आठवणीमध्ये बसा तर पूर्ण वारसा मिळेल. २) गृहस्थव्यवहारामध्ये राहत असताना कमलपुष्प
समान राहा, असे श्रीमत इतर सत्संगांमध्ये कधीही मिळू शकत नाही. त्या सत्संगांमध्ये
पिता आणि वारसा यांचा उल्लेख सुद्धा नसतो.
गीत:-
तुम्हीं हो
माता पिता…
ओम शांती।
या भारतामध्ये
खास आणि पूर्ण दुनियेमध्ये आम (सर्वसामान्य) अनेक प्रकारचे सत्संग असतात. असे
कोणतेही सत्संग अथवा चर्च किंवा मंदिरे नसतील जिथे मनुष्यांच्या बुद्धीमध्ये असेल
की आपण हा वारसा घेत आहोत. इथे तर तुम्ही मुले बसला आहात, सर्व सेंटर्समध्ये आपल्या
बेहदच्या बाबांच्या आठवणीमध्ये बसले आहेत - या विचारामध्ये की आम्ही आमच्या
बाबांकडून सुखधामचा वारसा प्राप्त करीत आहोत. इतर कोणत्याही सत्संगामध्ये अथवा चर्च
इत्यादीमध्ये असे समजणार नाहीत. तुम्हा मुलांच्याच बुद्धीमध्ये हे आहे. तुम्ही मुले
जाणता की, आपण बेहदच्या बाबांच्या आठवणीमध्ये बसलो आहोत. नवीन दुनिया स्वर्गाचा
वारसा घेत आहोत. सर्व मुले एका बाबांकडून वारसा घेत आहेत. असंख्य मुलांची वृद्धी
होत राहते. सर्वांना श्रीमत मिळते की, पहाटे उठून बाबांची आठवण करा. आम्ही
बाबांकडून हा वारसा घेणारे आहोत. आम्ही त्या बाबांचे बनलो आहोत. आत्म्याला
बाबांद्वारे आता ओळख मिळाली आहे. बाबा डायरेक्शन देतात - माझी आठवण करा आणि
गृहस्थव्यवहारामध्ये राहून कमलपुष्प समान पवित्र रहा. सर्वांनी इथे येऊन बसायचे तर
नाहीये. शाळेत शिकून मग आपापल्या घरी निघून जातात. प्रत्येक मुलगी-मुलगा आपल्या
टीचरकडून वारसा मिळवू शकतो. हे देखील असेच आहे. रोज शिकून मग घरी जाऊन भले धंदा
इत्यादी करा. तुम्ही गृहस्थ व्यवहारामध्ये देखील आहात आणि मग स्टुडंट देखील आहात.
गृहस्थ व्यवहारामध्ये राहत असताना कमलपुष्प समान राहायचे आहे. कोणी संन्यासी इत्यादी
कधी असे म्हणत नाहीत. इथे तुम्ही प्रत्यक्ष बसलेले आहात. गृहस्थ व्यवहारामध्ये
राहून पवित्र बनता. बाकीचे कोणीही असे पवित्र बनून परमपिता परमात्म्याची आठवण करत
नाहीत. भले गीता ऐकतात, वाचतात परंतु आठवण तर करत नाहीत ना. बोलणे आणि करणे यामध्ये
फरक आहे. तुम्ही जाणता आमचे बाबा नॉलेजफुल आहेत, त्यांच्यामध्ये ड्रामाच्या चक्राचे
नॉलेज आहे. आता आम्हाला देखील हे नॉलेज मिळत आहे. हे चक्र खूप चांगले आहे. हे
पुरुषोत्तम युग असल्यामुळे तुमचा हा जन्म देखील पुरुषोत्तम आहे. जसा ‘अधिक मास’ असतो
ना.
तुम्ही मुले जाणता
की, खरोखर आम्ही बाबांद्वारे पुरुषोत्तम बनत आहोत. आम्ही पुन्हा मर्यादा पुरुषोत्तम
बनत आहोत. मग ८४ चे चक्र फिरलो, हे ज्ञान बुद्धीमध्ये आहे. इतर कोणत्या सत्संगामध्ये
असे सांगत नाहीत. तुम्ही समजता, आपल्याला असे बनायचे आहे. बनविणारे एक बाबाच आहेत.
या लक्ष्मी-नारायणाच्या चित्रावर तुम्ही चांगल्या प्रकारे समजावून सांगू शकता.
खरोखर ब्रह्मा द्वारे योगबलाने यांनी हे पद प्राप्त केले आहे. असे बुद्धीमध्ये
इमर्ज केले पाहिजे. चित्रामध्ये ब्रह्मा-सरस्वती, लक्ष्मी-नारायणाची दोन रूपे देखील
दाखविली आहेत. ब्रह्मा-सरस्वती आणि प्रजा देखील दाखवावी लागेल. प्रत्येक गोष्टीवर
चांगल्या प्रकारे विचार केला पाहिजे. बाबा म्हणतात - ‘माझी आठवण करा’. ब्रह्माला
देखील सांगतात - ‘माझी आठवण करा तर हे बनाल’. म्हणजे जणू ब्रह्मामुखवंशावली सर्वांना
सांगितले की, माझी आठवण करा. कशी आठवण करायची हे देखील बुद्धीमध्ये आहे. चित्रे
देखील समोर ठेवली आहेत. या चित्रांवरून समजावून सांगणे खूप सोपे आहे. बाबांचा परिचय
द्यायचा आहे. प्रदर्शनीमध्ये देखील यावर समजावून सांगा. हा विश्वास दृढ होतो की,
खरोखर हे सर्वांचे बेहदचे बाबा आहेत. या हिशोबाने आम्हाला बेहदचा वारसा मिळाला
पाहिजे. आम्ही निराकारी आत्मे तर भाऊ-भाऊ आहोत. जेव्हा साकारमध्ये याल तेव्हा तुम्ही
भाऊ-बहीण बनाल, तेव्हाच तर शिकू शकाल. ब्रह्माची मुलेच तर भाऊ-बहिणी बनतील. वारसा
बाबांकडून मिळतो. हे बुद्धीमध्ये पक्के करायचे आहे. कोणालाही समजावून सांगाल तर
पहिले बाबांचा परिचय द्या. आम्ही ब्रदरहुड आहोत, सर्वव्यापी म्हटल्याने फादरहूड होतो.
फादरहुडला वारसा कुठून मिळणार? ‘फादर-फादर’ म्हणत घसरतच आले आहेत. वारसा काहीच नाही.
आता ब्रदरहुड समजल्यामुळेच वारसा मिळेल. तर याच्यावर चांगल्या रीतीने समजावून
सांगितल्यामुळे बुद्धीमध्ये अष्ट-देवता इत्यादी ज्या गोष्टी पक्क्या झाल्या आहेत,
त्या सर्व निघून जातील. सांगा, दोन पिता आहेत. रूहानी बाबा ज्यांच्याद्वारे सर्वांची
सद्गती होणार आहे, तेच सुख-शांतीचा वारसा देतात. सर्व सुखी होतात. त्यांना म्हटले
जाते - हेवनली गॉडफादर, स्वर्ग रचणारे. सर्वप्रथम बाबांविषयीचा प्रभाव बुद्धीमध्ये
ठसवला पाहिजे. हे आहेत आत्म्यांचे बेहदचे पिता. त्यांनाच पतित-पावन म्हणतात. तुम्ही
आत्मे परमपिता परमात्म्याची संतान आहात. हा निश्चय पक्का करा. अगोदर ही मुख्य गोष्ट
त्यांच्या बुद्धीमध्ये पक्की करायची आहे. हे समजतील तर आनंदाचा पारा चढेल आणि
म्हणतील की आम्ही जरूर बाबांची आठवण करणार. आम्हाला हा विश्वास वाटतो आहे की, आम्ही
बेहदच्या बाबांची आठवण करून विश्वाचे मालक बनू. याचा खूप आनंद होईल. जो हुशार असेल
आणि बुद्धीमध्ये पूर्ण निश्चय असेल तर म्हणेल - असे बेहदचे बाबा जे दादांमध्ये
येतात अगोदर त्यांना भेटायचे आहे. शिवबाबा ब्रह्माद्वारेच आमच्याशी बोलू शकतात.
तुम्ही आत्मे तर त्यांना भेटलेले नाही आहात तर त्यांची आठवण कशी करणार. मुले दत्तक
घेतली तर आठवण येईल. दत्तकच गेले नाहीत तर आठवण कशी येईल. अगोदर त्यांचे बना. अशा
बाबांना तर पटकन भेटले पाहिजे. बाबा देखील हेच विचारतील तुम्ही स्वतःला आत्मा समजता?
मी तुम्हा आत्म्यांचा पिता आहे. शिवबाबा तुमच्याशी बोलत आहेत. माझ्या आत्म्याचे (ब्रह्मा
बाबांच्या आत्म्याचे) जे पिता आहेत तेच तुमचे देखील पिता आहेत. ते विचारत आहेत की,
सर्व आत्म्यांचा पिता बरोबर एकच आहे हा तुम्हाला निश्चय आहे का? तेच वारसा देतील.
पवित्र देखील बनायचे आहे. त्यांच्या व्यतिरिक्त बाकीचे सर्वकाही विसरून जायचे आहे.
तुम्ही आत्मा घरून (परमधाममधून)
अशरीरी आला होता ना. कोणताही देह, संबंध नव्हता. आत्मा जेव्हा शरीरामध्ये प्रवेश
करेल, शरीर मोठे होईल तेव्हा त्यांना सांगितले जाते की, हे तुझे बाबा आहेत, हे अमुक
आहेत. आत्मा तर सर्व नात्यांपासून न्यारी आहे. आत्मा निघून जाते तेव्हा म्हटले जाते
- ‘आप मुये मर गई दुनिया…’ जोपर्यंत दुसरे शरीर मिळत नाही तोपर्यंत बंधन रहित होते.
मातेच्या गर्भामध्ये जाऊन बाहेर येते, मोठी होते तेव्हा मग नात्यांची गोष्ट आहे. तर
इथे देखील तुम्हा मुलांनी हे समजावून सांगायचे आहे. जिवंतपणी सर्व काही विसरून जायचे
आहे. एका बाबांची आठवण करणे - ही आहे अव्यभिचारी आठवण. यालाच योग म्हटले जाते. इथे
तर लोकांना अनेकांची आठवण येत असते. तुमची आहे अव्यभिचारी आठवण. आत्मा जाणते की ही
सर्व शरीराची नाती नष्ट होणार आहेत. आमचे नाते एका बाबांसोबत आहे. बाबांची जितकी
आठवण कराल तितकी विकर्म विनाश होतील. असे देखील नाही की मित्र-नातेवाईकांची आठवण
केल्याने कोणती विकर्म बनतील. नाही, विकर्म तेव्हा बनतील जेव्हा असे एखादे चुकीचे
कर्म कराल. बाकी इतर कोणाची आठवण केल्याने विकर्म बनणार नाहीत. हां, वेळ वाया नक्की
जाईल. एका बाबांची आठवण केल्याने विकर्म विनाश होतात. पापे नष्ट करण्याची ही युक्ती
आहे. बाकी नातलग इत्यादी तर आठवत राहतात. शरीरनिर्वाहासाठी धंदा इत्यादी सर्व करा,
परंतु जितका वेळ मिळेल तितकी बाबांची आठवण करत रहा, तर भेसळ (अशुद्धता) निघून जाईल.
मुख्य गोष्ट हीच आहे. मनामध्ये स्वतःशीच विचार करा की पतितापासून पावन कसे बनावे.
बाबांची आठवण करावी लागेल. गृहस्थ व्यवहारामध्ये राहायचे आहे. संन्यासी लोक देखील
शरीर सोडून मग गृहस्थींच्या घरात जन्म घेतात. असे तर नाही की जन्म-जन्मांतरासाठी
पावन बनतात. आता काही पवित्र निर्विकारी दुनिया तर नाहीये. हे आहे विशश वर्ल्ड (विकारी
दुनिया). याच्यातून कोणीही बाहेर पडू शकत नाही. विकारी दुनियेमध्ये राहिल्यामुळे
कोणती ना कोणती कमतरता (दोष) जरूर आहे. बाकी दुनिया तर दोनच आहेत. विकारी दुनिया आणि
निर्विकारी दुनिया, पावन दुनियेमध्ये देवता राहत होते, तर हे समजावून सांगण्यासाठी
खूप सोपे होईल. या पतित दुनियेचा आता विनाश होणार आहे. विनाश होण्यापूर्वी बेहदच्या
बाबांकडून वारसा घ्यायचा आहे. बाबा म्हणतात - देहाच्या नात्यांना सोडून स्वतःला
आत्मा निश्चय करा आणि बाबांची आठवण करा तेव्हा तुम्ही पावन बनाल. बाबा म्हणतात -
तुम्ही मला पतित-पावन म्हणता ना. गंगेमध्ये डुबकी मारणारे तर खूप आहेत. असे थोडेच
आहे की त्याने पावन बनतील. प्रदर्शनीमध्ये देखील खूप चांगल्या प्रकारे समजावून
सांगावे लागते. प्रजापिता तर इथेच पाहिजे. खाली हे ब्रह्मा आणि ब्रह्माकुमार-कुमारी
तपस्या करत आहेत. तर ही गोष्ट चांगल्या प्रकारे समजावून सांगितली पाहिजे. कोणालाही
एकदम मनापासून समजावून सांगायचे आहे. त-त-प-प करत बोललात (अडखळत बोललात) नाव बदनाम
कराल. जर असे वाटले की आपण कुठे गोंधळलो आहोत तर सांगा -
‘अच्छा, थोडे थांबा,
आम्ही दुसऱ्या बहिणीला पाठवतो’. एका पेक्षा एक हुशार असतात ना.
प्रदर्शन-मेळाव्यांमध्ये तपासायला पाहिजे की व्यवस्थित समजावून सांगत आहेत ना. काही
वादावादी तर करत नाहीत. गेटवर देखील ओळखीचा पाहिजे. अनेक प्रकारचे येतात ना. मोठ्या
लोकांना नक्की मान देतील. फरक तर नक्की राहील. या बाबतीत असे वाटू नये की यांच्यावर
प्रेम आहे, यांच्यावर नाही. द्वैत दृष्टी आहे, असे नको. याला द्वैत म्हटले जात नाही.
समजतात इथे मोठ्या लोकांचे आदरातिथ्य केले जाते. सेवाभावी असणाऱ्यांचे आदरातिथ्य
करतील ना. कोणी घर बांधून दिले असेल तर त्याचे आदरातिथ्य तर नक्की करू ना.
तुमच्यासाठीच तर इमारती बांधल्या आहेत ना. जे मेहनत करून राजा बनतात तर ऑटोमेटिकली
प्रजा त्यांचे आदरातिथ्य करेल ना. कमी दर्जा असणाऱ्या व्यक्ती पेक्षा श्रेष्ठ दर्जा
असणाऱ्या व्यक्तीचे आदरातिथ्य तर होईल ना. साऱ्या दुनियेतील आत्मे बेहदच्या बाबांची
संतान आहेत. परंतु जन्म भारतामध्येच घेतला आहे. भारतवासी जे पूर्वी श्रेष्ठ होते,
आता नीच बनले आहेत. तर बाबा म्हणतात मी शिकविण्यासाठी आलो आहे. मी भारतात येतो
त्यामुळे सर्वांचे कल्याण होते. विशेष आणि साधारण तर असते ना. आता भारतच नरक आहे,
मग स्वर्ग बनणार आहे. तर भारतामध्येच जातील ना, बाकीच्या ठिकाणी जाऊन काय करतील.
भारतातच भक्तिमार्गामध्ये सर्वप्रथम सोमनाथाचे खूप आलिशान मंदिर बनवले होते. जसे
मोठ्यात मोठे चर्च परदेशामध्ये बनवतील. कारण पोपकडून घेतलेली बादशाही आहे. सर्व
चर्च एक सारखी नसतात. नंबरवार तर असतीलच ना. सोमनाथाचे मंदिर हिरे-माणकांनी किती
संपन्न होते. मुसलमान इत्यादी लुटून घेऊन गेले. पुष्कळ श्रीमंत होते. चर्चमधून काय
लुटू शकणार? मनुष्य संपत्तीच्या मागे लागतात ना. मोहम्मद गजनवी किती धन घेऊन गेला.
नंतर मग इंग्रज आले, ते देखील इथून संपत्ती पाठवत गेले. खूप संपत्ती घेऊन गेले. आता
ते तुम्हाला परत मिळत आहे, करोडो रुपये देत आहेत. हे सर्व अडचणीची वेळ आल्यावर मिळत
आहे. अडचणीच्या वेळी जर देणे मिळाले नाही, तर कसे चालेल.
हा ड्रामा कसा बनलेला
आहे, हा देवाण-घेवाणीचा हिशोब कसा आहे ते बाबा समजावून सांगत आहेत. तरी देखील तुम्हां
मुलांना आता स्वर्गाचा मालक बनायचे आहे. हा जगाचा इतिहास-भूगोल कशा प्रकारे एका
चक्राप्रमाणे फिरतो, ते देखील मुलांना सांगितले गेले आहे. असे असूनही बाबा म्हणतात
- मुलांनो, मनमनाभव. हे सर्व पुन्हा रिपीट होईल. प्रत्येक गोष्ट सतोपासून तमोप्रधान
बनेल. दिवसा नोकरी-धंदा इत्यादी करता, ती वेळ सोडा. बाकी जितका वेळ मिळेल तितकी माझी
आठवण करा. धंदा इत्यादी मधून देखील कधी-कधी वेळ मिळतो. कित्येक जणांची अशी नोकरी
असते की, फक्त सही केली, काम संपले. अनेकजण तसेही बऱ्याच प्रमाणात खूप फ्री असतात.
तरीही रात्र तर आपली आहे. दिवसा शरीर निर्वाहासाठी कमाई करता, रात्री मग ही कमाई करा.
ही कमाई भविष्य २१ जन्मांसाठी आहे. म्हटले जाते - ‘एक क्षण, अर्धा क्षण’; जितका
शक्य असेल, तितके बाबांच्या आठवणीमध्ये राहा तर तुमची खूप कमाई होईल. जो हुशार असेल
तो समजेल की, खरंच खूप कमाई करू शकतो. काहीजण चार्ट सुद्धा लिहितात. आम्ही इतका वेळ
आठवण केली. अज्ञान काळात काही लोक आपली दिनचर्या लिहितात. तुम्ही देखील चार्ट लिहिला
तर लक्ष राहील. कोणता वेळ वाया तर जात नाही! कोणते विकर्म तर केले नाही ना! अच्छा!
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१) कोणत्याही
देहधारीची आठवण करून आपला वेळ वाया घालवायचा नाही. असे कोणतेही चुकीचे कर्म व्हायला
नको जे विकर्म बनेल.
२) जिवंतपणी सर्व काही
विसरून एका बाबांची आठवण करायची आहे. शरीर निर्वाहासाठी कर्म देखील करायचे आहे.
त्याचबरोबर हुशार बनून रात्री देखील जागून ही अविनाशी कमाई करायची आहे. आठवणीचा
चार्ट ठेवायचा आहे.
वरदान:-
संपूर्ण स्टेज
आणि स्टेटसच्या स्मृतीद्वारे सदैव श्रेष्ठ कर्तव्य करणारे बाप समान भव
सदैव हे लक्षात राहावे
की, मी प्रत्येक वेळी, प्रत्येक सेकंद, प्रत्येक कर्म करताना स्टेजवर आहे; तर
प्रत्येक कर्मावर लक्ष राहिल्यामुळे संपूर्ण स्टेजच्या समीप याल. त्याचबरोबर
वर्तमान आणि भविष्य स्टेटसची स्मृती राहिल्यामुळे प्रत्येक कर्म श्रेष्ठ होईल. या
दोन स्मृती पित्यासमान बनवतील. समानतेमध्ये आल्यामुळे एकमेकांच्या मनातील संकल्पांना
सहजच कॅच करू शकाल. याच्यासाठी फक्त संकल्पांवर कंट्रोलिंग पॉवर हवी. आपल्या
संकल्पांमध्ये सरमिसळ नसावी.
बोधवाक्य:-
इर्षा आणि
अप्राप्तीचे कारण इच्छा आहेत, जिथे सर्व प्राप्ती आहेत तिथे प्रसन्नता आहे.
अव्यक्त इशारे - आता
आपल्या ‘दाता’ स्वरूपाला प्रत्यक्ष करा.
प्रत्येक सेकंद,
प्रत्येक संकल्प चेक करा की, काहीतरी दिले? घेतले तर नाही ना? देत जा. घ्यायचे तर
बाबांकडून आहे, ते तर घेतलेच आहे, आता द्यायचे आहे. देण्यामध्ये जितके तुम्ही बिझी
रहाल, तितके कोणत्याही गोष्टी पार करणे अवघड वाटणार नाही. सर्व गोष्टी खूप सोप्या
होतील, कारण महादानी बनल्यामुळे महान शक्तीची प्राप्ती आपोआपच होते.