21-10-2026      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो, महावीर बना, मायेच्या वादळांसोबत लढण्या ऐवजी अचल-अडोल बना”

प्रश्न:-
ब्रह्मा बाबा इतक्या अनेक संघर्षांना सामोरे जात असताना देखील ते कधीही रंज (विचलित) झाले नाहीत, ते का?

उत्तर:-
कारण बाबांना नशा होता की, आपल्याला बाबांकडून वारसा घ्यायचा आहे. हे सर्व कल्पापूर्वी प्रमाणे होत आहे, नथिंग न्यू. शिव्या तर सर्वांत जास्त बाबांना मिळाल्या. आणि मग श्रीकृष्णाला देखील शिव्या देतात; मग मला देखील शिव्या खाव्या लागल्या तर त्यात नवल ते काय! दुनिया आपल्या गोष्टींना जाणतच नाही तर जरूर शिव्या देणारच; त्यामुळे ते कोणत्याही गोष्टीमुळे कधी विचलित झाले नाहीत. अशाच प्रकारे फॉलो फादर करा.

गीत:-
भोलेनाथ से निराला...

ओम शांती।
बाब
हे भक्तिमार्गातील लोकांचे गाणे आहे. ज्ञान मार्गामध्ये गाणे इत्यादी गायले जात नाही, ना बनवले जाते, ना त्याची गरज आहे; कारण गायले आहे - ‘बाबांकडून सेकंदामध्ये जीवनमुक्तीचा वारसा मिळतो’. त्यामध्ये गाणी इत्यादींचा काही प्रश्नच नाही. तुम्ही जाणता की आपल्याला बेहदच्या बाबांकडून बेहदचा वारसा मिळतो. भक्तिमार्गातील जे रीति-रिवाज आहेत, ते यामध्ये येऊ शकत नाहीत. मुले कविता इत्यादी बनवतात त्या देखील इतरांना ऐकवण्याकरिता. ते देखील तुम्ही जोपर्यंत समजावून सांगत नाही तोपर्यंत कोणालाही समजू शकणार नाही. आता तुम्हा मुलांना बाबा मिळाले आहेत तर आनंदाचा पारा चढला पाहिजे. बाबांनी ८४ जन्मांच्या चक्राचे नॉलेज देखील ऐकवले आहे. तर आनंद झाला पाहिजे की आता आपण स्वदर्शन चक्रधारी बनलो आहोत. बाबांकडून विष्णुपुरीचे मालक बनत आहोत. निश्चयबुद्धीच विजयन्ती बनतात. ज्यांना निश्चय आहे ते नक्कीच सतयुगामध्ये जातील. म्हणून मुलांना नेहमी आनंद झाला पाहिजे, फॉलो फादर. मुले जाणतात की, जेव्हा पासून निराकार बाबांचा या तनामध्ये प्रवेश झाला आहे, तेव्हा पासून यांना देखील खूप मोठ्या संघर्षाला सामोरे जावे लागले. भावांमध्ये भांडणे, शहरामध्ये भांडणे, संपूर्ण सिंधमध्ये संघर्ष झाले. मुले मोठी झाली की म्हणतील, लवकर लग्न करा. लग्ना शिवाय कसे चालेल? गीता वाचणे कधी चुकवत नव्हते; जेव्हा हे समजले की गीतेचे भगवान शिव आहेत तेव्हा ती गीता वाचणे सुटले. आणि मग नशा चढला की, मी तर विश्वाचा मालक बनतो आहे. हे तर शिव भगवानुवाच आहे, तर मग ती गीता (भक्तिमार्गाची गीता) वाचणे सोडून दिले; आणि मग पवित्रतेवरून खूप मोठा संघर्ष झाला. भाऊ, पुतणे, चुलते इत्यादी कितीतरी जण होते. यामध्ये बहाद्दुरी पाहिजे ना. तुम्ही आहातच महावीर-महावीरणी. एक बाबांशिवाय इतर कोणाचीही पर्वा नसते. पुरुष आहे रचयिता. रचयिता स्वतः पावन बनतो तर रचनेला देखील पावन बनवायचे आहे. पवित्र हंस आणि अपवित्र बगळा, एकत्र कसे राहू शकतील? क्रिएटर तर लगेच आदेश देईल - माझ्या मतावर चालायचे असेल तर चाला, नाहीतर निघून जा. तुम्हाला माहीत आहे, लौकिक मुलीचे (ब्रह्मा बाबांच्या लौकिक मुलीचे) लग्न झालेले होते. तिला जेव्हा ज्ञान मिळाले, तर म्हणाली - ‘वाह! बाबा म्हणत आहेत - ‘पवित्र बना’, तर आपण का बनू नये’. तिने पतीला उत्तर दिले की, ‘मी विष देणार नाही’. बस्स, याच गोष्टीवरून अनेकांचे वितंडवाद चालले. मोठ-मोठ्या घरांमधून मुली बाहेर पडल्या, कशाचीही पर्वा केली नाही. ज्यांच्या भाग्यामध्ये नाही, ते या गोष्टी समजू सुद्धा शकणार नाहीत. पवित्र राहायचे असेल तर राहा, अन्यथा, जा आणि स्वतःची सोय स्वतः करा. तेवढी हिंमत देखील पाहिजे ना. बाबांच्या समोरच कितीतरी गदारोळ माजला. बाबांना कधी विचलित झालेले पाहिले आहे! अमेरिके पर्यंत वर्तमानपत्रांमध्ये बातमी आली. नथिंग न्यू. हे तर कल्पापूर्वी प्रमाणेच होत आहे, यामध्ये घाबरण्यासारखे काय आहे? आपल्याला तर आपल्या बाबांकडून वारसा घ्यायचा आहे. आपल्या रचनेला (मुलांना) वाचवायचे आहे. बाबा जाणतात की, संपूर्ण क्रिएशन (रचना) यावेळी पतित आहे. मलाच सर्वांना पावन बनवायचे आहे. बाबांनाच सर्व जण म्हणतात - ‘हे पतित-पावन, लिबरेटर या’. तर त्यांनाच दया येते. ते दयाळू आहेत ना. म्हणून बाबा समजावून सांगतात की मुलांनो, कोणत्याही गोष्टीमध्ये घाबरू नका. घाबरल्याने इतके उच्च पद प्राप्त करू शकणार नाही. अत्याचार मातांवरच होतात. ही देखील त्याची एक निशाणी आहे. द्रौपदीला विवस्त्र करतात. बाबा २१ जन्मांकरिता विवस्त्र होण्यापासून वाचवतात. दुनिया या गोष्टींना जाणत नाही. सद्गती दाता तर मी आहे ना. जोपर्यंत मनुष्य दुर्गतीला पोहोचत नाहीत तोपर्यंत मी येऊन सद्गती कशी काय देणार. सृष्टी देखील पतित तमोप्रधान बनणार आहे. प्रत्येक गोष्ट नव्या पासून जुनी जरूर होते. जुने घर सोडावेच लागते. नवीन दुनिया गोल्डन एज्ड, जुनी दुनिया आयर्न एज्ड. कायमची नवीन तर राहू शकत नाही. तुम्ही मुले जाणता की हे सृष्टीचे चक्र आहे. देवी-देवतांचे राज्य पुन्हा स्थापन होत आहे. बाबा म्हणतात - पुन्हा तुम्हाला गीतेचे ज्ञान ऐकवतो. इथे रावण राज्यामध्ये दुःख आहे. रामराज्य कशाला म्हटले जाते, हे देखील कोणाला ठाऊक नाहीये आणि समजत सुद्धा नाहीत. बाबा म्हणतात मी स्वर्ग किंवा राम राज्याची स्थापना करण्यासाठी आलो आहे. तुम्ही मुलांनी अनेकदा राज्य घेतले आहे आणि मग गमावले आहे. हे सर्वांच्या बुद्धीमध्ये आहे. सतयुगामध्ये २१ जन्म असतात, त्याला म्हटले जाते - २१ पिढ्या अर्थात जेव्हा वृद्ध होतात तेव्हा शरीर सोडतात. कधीही अकाली मृत्यू होत नाही. आता तुम्ही जणू त्रिकालदर्शी बनला आहात. आता तुम्ही जाणता की आपण जन्म-जन्मांतर भक्ती करत आलो आहोत. रावण राज्यामध्ये देखील भपका किती आहे पहा. हा शेवटचा भपका आहे. राम राज्य सतयुगामध्ये असेल - तिथे ही विमाने इत्यादी सर्व अस्तित्वात होती; परंतु नंतर ती सर्व नाहीशी झाली. आता पुन्हा यावेळी त्या सर्व गोष्टी समोर आल्या आहेत. आता हे सर्व शिकत आहेत. जे या गोष्टी शिकत आहेत ते हे संस्कार आपल्यासोबत घेऊन जातील. मग तिथे येऊन विमाने बनवतील. या गोष्टी तुम्हाला भविष्यामध्ये सुख देणाऱ्या आहेत. ही विमाने इत्यादी भारतवासी देखील बनवू शकतात. काही नवीन गोष्ट नाहीये. बुद्धिमान तर आहेत ना. हे विज्ञान तुम्हाला पुन्हा कामी येईल. आता हे विज्ञान दुःखासाठी आहे; तिथे मग सुखासाठी असेल. तिथे तर प्रत्येक गोष्ट नवीन असेल. आता तर नवीन दुनियेची स्थापना होत आहे. बाबा स्वतः नवीन दुनियेची राजधानी स्थापन करत आहेत. म्हणून मुलांनी महावीर बनायचे आहे. दुनियेमध्ये हे कोणी थोडेच जाणतात की, भगवान आलेले आहेत.

बाबा म्हणतात - गृहस्थ व्यवहारामध्ये राहत असताना कमलपुष्प समान पवित्र राहा. यामध्ये घाबरण्यासारखे काहीच नाही, फारफार तर शिव्या देतील. यांना देखील खूप शिव्या दिल्या आहेत. श्रीकृष्णाने शिव्या खाल्ल्या, असे दाखवतात. आता श्रीकृष्ण तर शिव्या खाऊ शकत नाही. शिव्या तर कलियुगामध्ये खातात. तुमचे जे रूप आता आहे ते पुन्हा कल्पानंतर याच समयी असेल. मध्येच होऊ शकत नाही. जन्मागणिक फीचर्स बदलत जातात. एका आत्म्याला ८४ जन्मांमध्ये एक सारखी फीचर्स मिळू शकत नाहीत. सतो, रजो, तमोमध्ये येत जातात, फीचर्स बदलत जातात. हा पूर्व-नियोजित ड्रामा आहे. ८४ जन्मांमध्ये ज्या फीचर्ससह जन्म घेतले आहेत, तेच पुन्हा घेतील. आता तुम्ही जाणता की यांचे फीचर्स बदलून दुसऱ्या जन्मामध्ये हे लक्ष्मी-नारायण बनतील. तुमच्या बुद्धीचे कुलूप आता उघडले आहे. आता ही नवीन गोष्ट आहे. बाबा देखील नवीन, गोष्टी देखील नवीन. या गोष्टी कोणाच्या लगेच लक्षात येणार नाहीत. भाग्यामध्ये असेल तेव्हा काही समजेल. महावीर कोणत्याही वादळाला घाबरणार नाहीत. ती अवस्था शेवटी होणार आहे; म्हणून गायले गेले आहे - ‘अतींद्रिय सुख विचारायचे असेल तर गोप-गोपींना विचारा. बाबा आलेच आहेत तुम्हा मुलांना स्वर्गाच्या लायक बनविण्यासाठी. कल्पापूर्वी प्रमाणे नरकाचा विनाश तर होणारच आहे. सतयुगामध्ये तर एकच धर्म असेल. इच्छा देखील आहे की वननेस (एकता) असावी. एक धर्म असला पाहिजे. हे देखील कोणाला माहीत नाही की, राम राज्य आणि रावण राज्य वेगवेगळे आहे. इथे विकारा शिवाय जन्म होऊ शकत नाही. मूत-पलीती (अपवित्र) आहेत ना. आता बाबांवर निश्चय आहे तर श्रीमतावर पूर्ण रीतीने चालावे लागेल ना. प्रत्येकाची नाडी देखील पाहिली जाते. त्यानुसार सल्ला देखील दिला जातो. बाबांनी (ब्रह्मा बाबांनी) देखील आपल्या मुलांना सांगितले की, जर लग्न करायचे असेल तर तुमचे तुम्ही जाऊन करा. खूप मित्र-नातेवाईक इत्यादी बसले आहेत, ते लग्न करून देतील. म्हणून प्रत्येकाची नाडी पाहिली जाते. विचारतात - ‘बाबा, मी अशा परिस्थितीमध्ये आहे, मला पवित्र राहायचे आहे, माझे नातेवाईक मला घरातून बाहेर पडायला सांगत आहेत. तर आता मी काय करू?’ बाबा म्हणतात - ‘तुम्ही पवित्र राहण्याबद्दल विचारत आहात; परंतु जर तुम्हाला पवित्र राहणे शक्य नसेल तर मग जाऊन लग्न करा’. अच्छा, समजा कोणाचा साखरपुडा झालेला आहे. त्यांना राजी करायचे आहे, काही हरकत नाही. लग्न-गाठ जेव्हा बांधतात तेव्हा देखील म्हणतात - हा तुझा पती गुरू आहे. अच्छा, त्या वेळी तुम्ही तिच्याकडून लिहून घेत जा. ‘तू हे मान्य करत आहेस की, मी तुझा गुरू ईश्वर आहे, लिही. अच्छा, आता मी तुला आदेश देतो की, पवित्र राहायचे आहे’. परंतु यासाठी हिंमत पाहिजे ना. लक्ष्य खूप उच्च आहे. दोघे एकत्र कसे राहतात, हे सर्वांना दाखवायचे आहे. प्राप्ती खूप जबरदस्त आहे. आग तेव्हा लागते जेव्हा प्राप्ती विषयी माहिती नसते. बाबा म्हणतात - इतकी मोठी प्राप्ती होत आहे तर एक जन्म पवित्र राहिलात, तर काही मोठी गोष्ट आहे काय. मी तुझा पती ईश्वर आहे. माझ्या आज्ञेनुसार पवित्र राहावे लागेल. बाबा युक्त्या सांगतात. भारतामध्ये हा कायदा आहे, स्त्रीला सांगतात - तुमचा पती तुमचा ईश्वर आहे, त्याच्या आज्ञेनुसार चालायचे आहे. पतीचे पाय दाबायचे आहेत. कारण समजतात की लक्ष्मीने नारायणाचे पाय दाबले होते. ही सवय कुठून निघाली? या खोट्या चित्रांमधून. सतयुगामध्ये तर अशा गोष्टी असत नाहीत. नारायण कधी थकतो काय, ज्यामुळे लक्ष्मी बसून पाय दाबेल? थकव्याची गोष्ट असू शकत नाही. ही तर दुःखाची गोष्ट झाली. तिथे दुःख कुठून आले. तर किती खोट्या गोष्टी लिहिल्या आहेत. बाबांची लहानपणापासूनच वैराग्यवृत्ती होती, म्हणून भक्तीमार्गाचा अवलंब केला होता.

बाबा मुलांना खूप चांगली युक्ती सांगतात. एखाद्या मुलाला नातेवाईक त्रास देतात; ठीक आहे, लग्न कर. पत्नी तुझी झाली. मग कोणी काहीही करू शकणार नाही. आपसामध्ये मिळून पवित्र राहा, कंपेनियन (सहकारी) झालात. परदेशामध्ये वृद्ध झाल्यावर काळजी घेण्यासाठी कंपेनियन (सहकारी) ठेवतात. सिव्हिल मॅरेज (गंधर्व विवाह) करतात. विकारामध्ये जाणार नाहीत. आता तुम्ही जाणता की आपण एका पित्याची मुले आहोत, आपसामध्ये भाऊ-बहीण झालो. आजोबांकडून वारसा घेत आहोत. बाबांना बोलावतात देखील पतित दुनियेमध्ये - ‘हे पतित-पावन, सर्व सीतांचे राम’. मनुष्य जेव्हा ‘राम-राम’ असा जप करतात तेव्हा सीतेची थोडीच आठवण करतात. तिच्या पेक्षा मोठी तर लक्ष्मी आहे. परंतु आठवण तर एका बाबांचीच करतात. लक्ष्मी-नारायणाला जाणतात तरी, ‘शिव’ला तर कोणीही जाणत नाही. आत्मा बिंदू आहे तर आत्म्यांचे पिता देखील बिंदू असतील ना. सारे ज्ञान आत्म्यामध्ये आहे. त्यांना म्हटले जाते ज्ञानाचा सागर. तुम्ही आत्मे देखील ज्ञान सागर बनता. ज्ञान सागर बसून तुम्हा आत्म्यांना समजावून सांगतात. आत्मा चैतन्य आहे. तुमची आत्मा ज्ञानाचा सागर बनत आहे. संपूर्ण सृष्टीच्या आदि-मध्य-अंताचे ज्ञान तुम्हाला आहे. गोड मुलांनी हिंमत ठेवली पाहिजे. आपल्याला बाबांच्या श्रीमतावर चालले पाहिजे ना. बेहदचे बाबा बेहदच्या मुलांना स्वर्गाचा मालक बनवत आहेत तर बाबा म्हणतात तुम्ही देखील आपल्या रचनेला आपल्या ताब्यात ठेवा. जर तुमचे मूल तुमची आज्ञा मानत नसेल तर ते मूल, मूल नाही. ते तर कपूत झाले. आज्ञाधारक, फरमानबरदार (नियमांचे पालन करणारा) मुलगा असेल तर वारशाचा अधिकारी बनू शकतो. बेहदचे बाबा देखील सांगतात - ‘माझ्या श्रीमतावर चालाल तर तुम्ही असे श्रेष्ठ बनाल. नाहीतर प्रजेमध्ये जाल’. बाबा तुम्हाला नरापासून नारायण बनविण्यासाठी आले आहेत. ही आहे खरी सत्यनारायणाची कथा. तुम्ही राजाई प्राप्त करण्यासाठी आला आहात. आता मम्मा-बाबा राजा-राणी बनत आहेत तर तुम्ही देखील हिंमत करा. बाबा तर जरूर आप समान बनवतील. प्रजा बनण्यामध्येच संतुष्ट होता कामा नये. पुरुषार्थ करायचा आहे - आम्ही बाबांकडून पूर्ण वारसा घेऊ, वारी जाऊ. तुम्ही त्यांना आपला वारसदार बनवाल तर ते तुम्हाला २१ जन्मांकरिता वारसा देतील. बाबा मुलांवर वारी जातात. मुले म्हणतात - ‘बाबा, हे तन-मन-धन सर्व तुमचे आहे. तुम्ही आमचे पिता देखील आहात तर आमची संतान देखील आहात’. त्वमेव माताच् पिता त्वमेव. एका बाबांची महिमा किती मोठी आहे. दुनियेमध्ये या गोष्टींना कोणीही जाणत नाहीत. ही सारी भारताचीच गोष्ट आहे. तुम्ही मुले जाणता की हे तेच ५ हजार वर्षांपूर्वीचे युद्ध आहे. आता स्वर्गाची स्थापना होत आहे. म्हणून मुलांनी नेहमी अतिशय आनंदामध्ये राहिले पाहिजे. स्वयं भगवंताने तुम्हाला ॲडॉप्ट केले आहे, तर तुम्हाला आनंद झाला पाहिजे. आता तुम्हा मुलांचा बाबा शृंगार करत आहेत आणि शिकवतात देखील; बेहदचे बाबा, ज्ञानाचा सागर आहेत. आम्हाला संपूर्ण सृष्टीच्या आदि-मध्य-अंताचे रहस्य समजावून सांगत आहेत. जे बाबांनाच जाणत नाहीत, ते नास्तिक आहेत. तुम्ही बाबांना आणि रचनेला जाणता, तुम्ही आस्तिक आहात. लक्ष्मी-नारायण आस्तिक आहेत की नास्तिक? तुम्ही काय म्हणाल? तुम्ही स्वतः म्हणता की, सतयुगामध्ये परमात्म्याची कोणीही आठवण करत नाहीत. तिथे आहेच मुळी सुख, तर सुखामध्ये परमात्म्याचे स्मरण करत नाहीत; कारण परमात्म्याला जाणत नाहीत. या वेळी तुम्ही आस्तिक बनून वारसा घेत आहात. मग तिथे आठवणच करत नाही. इथे दुनियावाले आठवण करतात परंतु त्यांना जाणत नाहीत म्हणून नास्तिक म्हटले जाते. तिथे जाणतही नाहीत आणि आठवण देखील करत नाहीत. त्यांना हे माहित सुद्धा नसेल की हा वारसा आपल्याला शिवबाबांकडून मिळाला आहे. परंतु त्यांना नास्तिक म्हणणार नाही कारण ते पावन आहेत. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) श्रीमतावर चालण्यासाठी पूर्णपणे हिंमत ठेवायची आहे. कोणत्याही गोष्टीमध्ये घाबरायचे अथवा रंज (विचलित) व्हायचे नाही.

२) आपली रचना आपल्या हातात ठेवायची आहे. त्यांना विकारांपासून वाचवायचे आहे. पावन बनण्याचा सल्ला द्यायचा आहे.

वरदान:-
सदैव बाबांच्या सन्मुख राहून आनंदाचा अनुभव करणारे अथक आणि आळसापासून मुक्त भव

कोणत्याही प्रकारचे संस्कार अथवा स्वभावाला परिवर्तन करण्यामध्ये दिलशिकस्त होणे (हताश होणे) अथवा निष्काळजी बनणे हे देखील थकणे आहे, यासाठी अथक बना. ‘अथक’ याचा अर्थ आहे ज्यामध्ये आळस नसेल. जी मुले अशी आळसापासून मुक्त आहेत ती सदैव बाबांच्या सन्मुख राहतात आणि आनंदाचा अनुभव करतात. त्यांच्या मनामध्ये कधीही दुःखाची लाट येऊ शकत नाही; म्हणून सदैव सन्मुख राहा आणि आनंदाचा अनुभव करा.

बोधवाक्य:-
सिद्धि स्वरूप बनण्याकरिता प्रत्येक संकल्पामधून पुण्य आणि बोलामधून आशीर्वाद जमा करत चला.

हे अव्यक्त इशारे - परोपकाराच्या भावनेने संपन्न बनून अपकारीवर देखील उपकार करा.

ज्यांचा तुमच्याप्रति शुभ भाव असतो त्यांच्याप्रति तुम्ही देखील शुभ भाव ठेवता, उपकारीवर उपकार करता, ही काही मोठी गोष्ट नाहीये. परंतु कोणी तुम्हाला वारंवार खाली पाडण्याचा प्रयत्न करत असेल, तुमच्या मनाला डगमग करत असेल, तरी देखील तुमचा त्याच्याप्रति सदैव शुभचिंतकाचा, अचल-अटल भाव असावा; गोष्टीमुळे भाव बदलू नये. कोणी अपकार केला, तरी तुम्ही एका सेकंदामध्ये अपकाराला उपकारामध्ये परिवर्तित करा, तेव्हा म्हणणार - चमत्कार.