23-01-2026
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
“गोड
मुलांनो - तुमच्या मुखावाटे सदैव ज्ञान रत्ने निघाली पाहिजेत, तुमचा चेहरा सदैव
हर्षित राहिला पाहिजे”
प्रश्न:-
ज्या मुलांनी
ब्राह्मण जीवनामध्ये ज्ञानाची धारणा केली आहे त्यांची लक्षणे काय असतील?
उत्तर:-
१) त्यांचे वर्तन देवतांप्रमाणे असेल, त्यांच्यामध्ये दैवी गुणांची धारणा असेल. २)
त्यांना ज्ञानाचे विचार सागर मंथन करण्याचा अभ्यास असेल. ते कधीही आसुरी गोष्टींचे
अर्थात कचऱ्याचे मंथन करणार नाहीत. ३) त्यांच्या जीवनातून शिव्या देणे, निंदा करणे
बंद होते. ४) त्यांचा चेहरा सदैव हर्षित राहतो.
ओम शांती।
ज्ञान आणि भक्तीबद्दल बाबा बसून समजावून सांगत आहेत. हे तर मुलांना समजले आहे की,
भक्तीद्वारे सद्गती होत नाही आणि सतयुगामध्ये भक्ती असतही नाही. ज्ञान देखील
सतयुगामध्ये मिळत नाही. श्रीकृष्ण ना भक्ती करतात, ना ज्ञानाची मुरली वाजवतात. मुरली
अर्थातच ज्ञान देणे. गायन देखील आहे ना - ‘मुरलीमध्ये जादू…’ तर जरूर कोणती तरी जादू
असेल ना! केवळ मुरली वाजवणे, ते तर सामान्य फकीर लोक देखील वाजवत असतात. या
मुरलीमध्ये ज्ञानाची जादू आहे. अज्ञानाला काही जादू म्हणणार नाही. मुरलीला जादू
म्हणतात. मनुष्यापासून देवता बनतात ज्ञानाद्वारे. जेव्हा सतयुगामध्ये आहेत तर या
ज्ञानाचा वारसा आहे. तिथे भक्ती असत नाही. भक्ती सुरू होते द्वापर पासून, जेव्हा
देवतापासून मनुष्य बनतात. मनुष्यांना विकारी, देवतांना निर्विकारी म्हटले जाते.
देवतांच्या सृष्टीला पवित्र दुनिया म्हटले जाते. आता तुम्ही देवता बनत आहात. ज्ञान
कशाला म्हटले जाते? एक तर स्वतःची आणि पित्याची ओळख आणि मग सृष्टीच्या
आदि-मध्य-अंताच्या नॉलेजला ज्ञान म्हटले जाते. ज्ञानाद्वारेच सद्गती होते. मग भक्ती
सुरू होते तेव्हा उतरती कला म्हटले जाते, कारण भक्तीला रात्र, ज्ञानाला दिवस म्हटले
जाते. हे तर कोणाच्याही बुद्धीमध्ये येऊ शकते परंतु दैवी गुण धारण करत नाहीत. दैवी
गुण असतील तेव्हा समजले जाईल ज्ञानाची धारणा आहे. ज्ञानाची धारणा असणाऱ्यांचे वर्तन
देवतांप्रमाणे असते. कमी धारणा असणाऱ्यांचे वर्तन मिक्स असते. धारणा नसेल तर ती जणू
मुलेच नाहीत. मनुष्य बाबांची किती निंदा करतात. ब्राह्मण कुळामध्ये येतात तेव्हा मग
शिव्या देणे, निंदा करणे बंद होते. तुम्हाला ज्ञान मिळते, त्यावर आपले विचार सागर
मंथन केल्याने अमृत मिळेल. विचार सागर मंथनच करत नसाल तर बाकी कशाचे मंथन होईल?
आसुरी विचारांचे. त्यातून तर कचराच निघेल. आता तुम्ही ईश्वरीय स्टुडंट आहात. तुम्ही
जाणता आपण मनुष्यापासून देवता बनण्याचे शिक्षण शिकत आहोत. देवता हे शिक्षण शिकवणार
नाहीत. देवतांना कधी ज्ञानाचे सागर म्हटले जात नाही. ज्ञानाचा सागर तर एकालाच म्हटले
जाते. दैवी गुण देखील ज्ञाना द्वारेच धारण होतात. हे ज्ञान जे तुम्हा मुलांना आता
मिळत आहे, हे सतयुगामध्ये अस्तित्वातच नसते. या देवतांमध्ये दैवी गुण आहेत. तुम्ही
महिमा देखील करता - ‘सर्व गुण संपन्न…’ तर आता तुम्हाला असे बनायचे आहे. स्वतःला
विचारले पाहिजे माझ्यामध्ये सर्व दैवी गुण आहेत की काही आसुरी गुण देखील आहेत? जर
आसुरी अवगुण असतील तर त्याला काढून टाकले पाहिजे तेव्हाच देवता म्हणता येईल. नाही
तर खालचा दर्जा मिळेल.
आता तुम्ही मुले दैवी
गुण धारण करत आहात. खूप चांगल्या-चांगल्या गोष्टी ऐकवता. यालाच म्हटले जाते
पुरुषोत्तम संगमयुग जेव्हा की तुम्ही पुरुषोत्तम बनत आहात, तर वातावरण देखील खूप
चांगले असले पाहिजे. मुखावाटे कोणतीही छी-छी (अश्लील) गोष्ट निघू नये, नाहीतर म्हटले
जाईल - ‘हा नीच दर्जाचा आहे’. तुमचे बोलणे-चालणे आणि वातावरणावरून लगेच समजून येते.
तुमचा चेहरा सदैव हर्षित असला पाहिजे. नाहीतर मग त्यांच्यामध्ये ज्ञान नाही आहे असे
म्हटले जाईल. मुखावाटे नेहमी रत्न निघावीत. हे लक्ष्मी-नारायण बघा किती हर्षितमुख
आहेत. यांच्या आत्म्याने ज्ञान रत्ने धारण केलेली होती. मुखावाटे सदैव ज्ञान रत्ने
निघतात. रत्नेच ऐकून आणि ऐकवून किती आनंद होतो. ज्ञान रत्ने जी आता तुम्ही घेत आहात,
नंतर मग ही सर्व हिरे-माणके बनतात. ९ रत्नांची माळा काही हिरे-माणकांची नाहीये. ही
ज्ञान रत्नांची माळा आहे. ते लोक मग स्थूल रत्न समजून अंगठ्या इत्यादी करून घालतात.
या ज्ञान रत्नांची माळा पुरुषोत्तम संगमयुगावरच बनते. ही रत्नेच तुम्हाला २१
जन्मांकरिता मालामाल बनवतात. यांना कोणी चोरू शकणार नाही. इथे जर तुम्ही हे
हिरे-माणके घालाल तर लगेचच कोणीतरी लुटून नेतील. तर स्वतःला खूप-खूप बुद्धिमान
बनवायचे आहे. आसुरी अवगुणांना काढून टाकायचे आहे. आसुरी अवगुणांनी चेहराच असा होतो.
क्रोधामध्ये लाल-लाल तांब्या सारखा चेहरा होतो. काम-विकार असणारे तर काळेच बनतात.
तर मुलांनी प्रत्येक गोष्टीवर विचार सागर मंथन केले पाहिजे. हे शिक्षण आहेच खूप धन
प्राप्त करण्याचे. ते शिक्षण काही रत्ने थोडीच आहेत. होय, नॉलेज शिकून मोठे पद
प्राप्त करतात. तर शिक्षण उपयोगाला आले, ना की पैसा. शिक्षणच धन आहे. ते आहे हदचे
धन, आणि मग हे आहे बेहदचे धन. आहेत तर दोन्हीही शिक्षणच. आता तुम्ही समजता बाबा
आपल्याला शिकवून विश्वाचा मालक बनवत आहेत. ते अल्पकालीन क्षणभंगुर शिक्षण आहे एका
जन्माकरिता. मग दुसऱ्या जन्मामध्ये पुन्हा नव्याने शिकावे लागेल. तिथे धनासाठी
शिक्षणाची गरज नाही. तिथे तर आताच्या पुरुषार्थाद्वारेच अथाह धन मिळते. धन अविनाशी
बनते. देवतांकडे पुष्कळ धन होते आणि जेव्हा मग भक्तीमार्ग अर्थात रावण राज्यामध्ये
आले तर किती होते, कित्येक मंदिरे बनवलेली आहेत. मग मुसलमान इत्यादींनी येऊन धन
लुटले. किती धनवान होते! आजच्या शिक्षणाद्वारे कोणी इतके धनवान बनू शकणार नाहीत.
तुम्ही आता जाणता आपण इतके उच्च शिक्षण शिकत आहोत ज्याद्वारे असे देवी-देवता बनतो.
तर शिक्षणाने बघा मनुष्य काय बनतात! गरीबापासून श्रीमंत. आता भारत देखील किती गरीब
आहे. श्रीमंताला तर वेळच नाहीये. आपला अहंकार असतो - मी अमका आहे. यामध्ये अहंकार
इत्यादी निघून गेला पाहिजे. आपण आत्मा आहोत, आत्म्याजवळ तर धन-दौलत, हिरे-माणके
इत्यादी काहीच नाही. बाबा देखील सांगतात - देहा सहित सर्व संबंध सोडा. आत्मा शरीर
सोडते तर श्रीमंती इत्यादी सर्व नष्ट होते. जेव्हा नव्याने शिकून मग धन कमावतील
किंवा चांगले दान-पुण्य केले असेल तर श्रीमंताच्या घरी जन्म घेतील. म्हणतात ना -
मागील जन्मातील कर्मांचे फळ आहे. ज्ञानाचे दान केले असेल किंवा कॉलेज, धर्मशाळा
इत्यादी बनवल्या असतील तर त्याचे फळ मिळते परंतु अल्पकाळासाठी. हे दान-पुण्य देखील
इथे केले जाते. सतयुगामध्ये केले जात नाही. सतयुगामध्ये चांगलीच कर्म होतात कारण
आताचा वारसा मिळालेला आहे. तिथे कोणाकडूनही विकर्म (पाप) होत नाहीत कारण रावणच नाही
आहे. गरिबांकडून देखील विकर्म होणार नाहीत. इथे तर श्रीमंतांकडूनही विकर्म होतात तर
मग आजार इत्यादी दु:ख होते. तिथे विकारामध्ये जातच नाहीत तर विकर्म कशी बनतील? सर्व
काही कर्मांवर अवलंबून आहे. हे माया रावणाचे राज्य आहे, ज्यामुळे मनुष्य विकारी
बनतात. बाबा येऊन शिकवतात निर्विकारी बनविण्याकरिता. बाबा निर्विकारी बनवतात, माया
मग विकारी बनवते. राम-वंशी आणि रावण-वंशीचे युद्ध चालते. तुम्ही बाबांची मुले आहात,
ती रावणाची मुले आहेत. किती चांगली-चांगली मुले मायेकडून हार खातात. माया खूप प्रबळ
आहे. तरी देखील आशा ठेवतात. अधम ते अधम (सर्वात पापी) असणाऱ्यांचा देखील उद्धार
करायचा आहे ना. बाबांना तर साऱ्या विश्वाचा उद्धार करायचा आहे. पुष्कळजण कोसळतात (अधोगती
होते). एकदम चट खात्यामध्ये अधम ते अधम बनतात. अशांचा देखील बाबा उद्धार करतात.
रावण राज्यामध्ये तर सर्वच अधम आहेत, परंतु बाबा वाचवतात. तरी देखील कोसळत राहतात,
तर खूपच अधम बनतात. त्यांना मग इतके चढता येत नाही. तो अधमपणा आतून खात राहतो. जसे
तुम्ही म्हणता - ‘अन्तकाल जो…’ त्यांच्या बुद्धीमध्ये तो अधमपणाच येत राहील. तर बाबा
बसून मुलांना समजावून सांगत आहेत, कल्प-कल्प तुम्हीच देवता बनता. पशू बनतील काय?
मनुष्यच बनतात आणि समजतात. या लक्ष्मी-नारायणाला देखील नाक, कान इत्यादी आहे, हे
मनुष्य आहेत ना! परंतु दैवी गुणवाले आहेत म्हणून यांना देवता म्हटले जाते. हे असे
सुंदर देवता कसे बनतात, आणि नंतर मग कसे घसरतात (अधोगती होते), या चक्रा विषयी
तुम्हालाच ठाऊक झाले आहे. जे विचार सागर मंथन करत असतील त्यांना धारणा देखील चांगली
होईल. विचार सागर मंथनच करत नाहीत तर बुद्धू बनतात, मुरली चालवणाऱ्याचे विचार सागर
मंथन चालत राहील. या टॉपिक वर हे-हे सांगायचे आहे. ऑटोमॅटिकली विचार सागर मंथन चालते.
अमके येणार आहेत त्यांना देखील उत्साहाने समजावून सांगतील. होऊ शकते काहीतरी समजेल,
नशीबावर अवलंबून आहे. कोणाचा लगेच निश्चय होईल, कोणाचा नाही होणार. आशा ठेवली जाते.
आता नाही तर पुढे चालून जरूर समजतील. आशा ठेवली पाहिजे ना! आशा ठेवणे अर्थात सेवेची
आवड आहे. थकायचे नाही. भले कोणी शिकून मग अधम बनला आहे, आणि येत असेल तर जरूर त्याला
व्हीजिटिंग रूममध्ये बसवणार. की असे म्हणणार - निघून जा? जरूर विचारले जाईल - इतके
दिवस का आला नाहीस? म्हणेल - मायेकडून हार खाल्ली. असे पुष्कळ येतात. समजतात ज्ञान
खूप चांगले होते परंतु मायेने हरवले. आठवण तर राहते ना. भक्तीमध्ये तर हरण्याचा आणि
जिंकण्याचा प्रश्नच येत नाही. हे नॉलेज धारण करायचे आहे. आता तुम्ही बाबांकडून खरी
गीता ऐकत आहात ज्याद्वारे देवता बनता. ब्राह्मण बनल्या शिवाय देवता बनू शकत नाही.
ख्रिश्चन, पारशी, मुसलमानांमध्ये ब्राह्मण असतच नाहीत. या सर्व गोष्टी आता तुम्ही
समजता.
तुम्ही जाणता अल्फची
(बाबांची) आठवण करायची आहे. अल्फची आठवण केल्यानेच बादशाही मिळते. जेव्हा पण
तुम्हाला कोणी भेटेल बोला, अल्फ अल्लाहची आठवण करा. अल्फलाच उच्च म्हटले जाते.
बोटाने अल्फकडे इशारा करतात ना! अल्फला, ‘एक’ असे देखील म्हटले जाते. भगवान एकच आहे.
बाकी तर सर्व त्यांची संतान आहेत. बाबा तर सदैव ‘अल्फ’च असतात, बादशाही करत नाहीत.
ज्ञान देखील देतात, आपला मुलगा देखील बनवतात तर मुलांनी किती आनंदात राहिले पाहिजे.
बाबा आमची किती सेवा करतात. आम्हाला विश्वाचा मालक बनवतात. आणि स्वतः मात्र त्या
नवीन पवित्र दुनियेमध्ये येत सुद्धा नाहीत. पावन दुनियेमध्ये त्यांना कोणी बोलवतही
नाहीत. पतितच बोलावतात. पावन दुनियेमध्ये येऊन काय करतील. त्यांचे नावच आहे
पतित-पावन, तर जुन्या दुनियेला नवीन बनविण्याची त्यांची ड्युटी आहे. बाबांचे नाव आहे
- ‘शिव’, आणि मुलांना - ‘शाळीग्राम’ म्हटले जाते. त्यांची पूजा होते . ‘शिवबाबा’ असे
म्हणून सर्वजण आठवण करतात. दुसरे म्हणजे ब्रह्माला देखील बाबा म्हणतात. ‘प्रजापिता
ब्रह्मा’ म्हणतात तर खूप परंतु त्यांना यथार्थ रीतीने ओळखत नाहीत. ब्रह्मा कोणाचा
मुलगा आहे? तुम्ही म्हणाल परमपिता परमात्मा शिवबाबांनी त्यांना ॲडॉप्ट केले आहे. हे
तर शरीरधारी आहेत ना! सर्व आत्मे ईश्वराची संतान आहेत. सर्व आत्म्यांना आपापले शरीर
आहे. आपापला पार्ट मिळालेला आहे, जो बजावायचाच आहे. हे परंपरेने चालत येते. अनादि
अर्थात त्याचा आदि-मध्य-अंत नाही. मनुष्य ऐकतात, एण्ड होत आहे, तर मग गोंधळून जातात.
तर मग पुन्हा बनणार कसा? बाबा म्हणतात - हा ड्रामा अनादि आहे. केव्हा बनणार, हे
विचारण्याचा प्रश्नच राहत नाही. प्रलय होतच नाही. ही देखील थाप मारलेली आहे. थोडे
मनुष्य राहतात म्हणून म्हटले जाते जसा काही प्रलय झाला. बाबांमध्ये जे ज्ञान आहे ते
आताच इमर्ज होते. यासाठीच म्हटले जाते - ‘साऱ्या समुद्राला शाई बनवा…’ तरी देखील
लिहून पूर्ण होणार नाही. अच्छा!
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१) आपल्या
हर्षितमुख चेहऱ्याद्वारे बाबांचे नाव प्रसिद्ध करायचे आहे. ज्ञान रत्नेच ऐकायची
आहेत आणि ऐकवायची आहेत. गळ्यामध्ये ज्ञान-रत्नांची माळा घातलेली असावी. आसुरी
अवगुणांना काढून टाकायचे आहे.
२) सेवेमध्ये कधी
थकायचे नाही. आशा ठेवून आवडीने सेवा करायची आहे. विचार सागर मंथन करून उत्साहामध्ये
राहायचे आहे.
वरदान:-
कन्फ्युज
होण्याऐवजी लूज कनेक्शनला ठीक करणारे समस्या मुक्त भव
सर्व समस्यांचे मूळ
कारण कनेक्शन लूज होणे हेच आहे. तुम्ही फक्त कनेक्शनला ठीक करा म्हणजे मग सर्व शक्ती
तुमच्या मागे-पुढे फिरत राहतील. आणि कनेक्शन जोडण्यासाठी एक-दोन मिनिटे जरी लागली
तरी हिंमत हरुन कन्फ्युज होऊ नका. निश्चयाच्या फाऊंडेशनला डळमळीत होऊ देऊ नका. ‘मी
बाबांचा आहे, बाबा माझे आहेत’ - या आधारे फाऊंडेशनला पक्के करा म्हणजे मग समस्या
मुक्त बनाल.
बोधवाक्य:-
बीज रूप
अवस्थेमध्ये स्थित राहणे - हिच जुन्या संस्कारांना परिवर्तन करण्याची विधी आहे.
अव्यक्त इशारे:- या
अव्यक्ती महिन्यामध्ये बंधनमुक्त राहून जीवनमुक्त स्थितीचा अनुभव करा.
जेव्हा सेवेमध्ये
किंवा आपल्या जुन्या संस्कारांना परिवर्तन करण्यामध्ये सफलता मिळत नसेल तर कोणत्या
ना कोणत्या विघ्नाच्या अधीन होता. मग त्यापासून मुक्त होण्याची इच्छा ठेवता, परंतु
शक्ती शिवाय ही इच्छा पूर्ण होऊ शकत नाही म्हणून अलंकारी रुप बना. शक्तीरूप धारण करा
तर बंधन मुक्त बनाल.