23-07-2025      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - जेव्हा वेळ मिळेल तेव्हा एकांतामध्ये बसून विचार सागर मंथन करा, जे पॉईंट्स ऐकता त्यांना रिवाईज करा (जे मुद्दे ऐकता त्यांची उजळणी करा)”

प्रश्न:-
तुमची आठवणीची यात्रा केव्हा पूर्ण होईल?

उत्तर:-
जेव्हा तुमचे कोणतेही कर्मेंद्रिय धोका देणार नाही, कर्मातीत अवस्था होईल तेव्हा आठवणीची यात्रा पूर्ण होईल. आता तुम्हाला पूर्ण पुरुषार्थ करायचा आहे, हताश व्हायचे नाही. सेवेवर तत्पर रहायचे आहे.

ओम शांती।
गोड-गोड मुलांनो, आत्म - अभिमानी होऊन बसला आहात? मुले समजतात अर्धा कल्प आपण देह-अभिमानी होऊन राहिले आहोत. आता देही-अभिमानी होऊन राहण्यासाठी मेहनत करावी लागते. बाबा येऊन समजावून सांगतात - स्वतःला आत्मा समजून बसा तेव्हाच बाबांची आठवण येईल. नाहीतर विसरून जाल. आठवण केली नाहीत तर मग यात्रा कशी करू शकाल! पापे कशी नष्ट होतील! नुकसान होईल. हे तर घडोघडी लक्षात ठेवा. ही आहे मुख्य गोष्ट. बाकी तर बाबा अनेक प्रकारच्या युक्त्या सांगतात. चूक काय आहे, बरोबर काय आहे - ते देखील समजावून सांगितले आहे. बाबा तर ज्ञानाचा सागर आहेत. भक्तीला देखील जाणतात. मुलांना भक्तीमध्ये काय-काय करावे लागते. समजावतात हे यज्ञ-तप इत्यादी करणे, हा सर्व आहे भक्तिमार्ग. भले बाबांची महिमा करतात, परंतु उलटी. वास्तविक श्रीकृष्णाची महिमा देखील पूर्णपणे जाणत नाहीत. प्रत्येक गोष्टीला समजून घेतले पाहिजे ना. जसे श्रीकृष्णाला ‘वैकुंठ नाथ’ म्हटले जाते. अच्छा, बाबा विचारतात, श्रीकृष्णाला त्रिलोकीनाथ म्हटले जाऊ शकते काय? गायले जाते ना - त्रिलोकीनाथ. आता त्रिलोकीनाथ अर्थात तीन लोक - मुलवतन, सूक्ष्मवतन, स्थूलवतन. तुम्हा मुलांना समजावून सांगितले जाते - तुम्ही ब्रह्मांडाचे देखील मालक आहात. श्रीकृष्ण असे समजत असतील का की मी देखील ब्रह्मांडाचा मालक आहे? नाही. ते तर वैकुंठामध्ये होते. वैकुंठ म्हटले जाते स्वर्ग नव्या दुनियेला. तर वास्तविक त्रिलोकीनाथ कोणीच नाहीये. बाबा राईट गोष्ट समजावून सांगतात. तीन लोक तर आहेत. ब्रह्मांडाचे मालक शिवबाबा सुद्धा आहेत, तुम्ही सुद्धा आहात. सूक्ष्मवतनची तर गोष्टच नाही. स्थूलवतनमध्ये देखील ते मालक नाही आहेत, ना स्वर्गाचे, ना नरकाचे मालक आहेत. श्रीकृष्ण आहे स्वर्गाचा मालक. नरकाचा मालक आहे रावण. याला रावण राज्य, आसुरी राज्य म्हटले जाते. मनुष्य म्हणतात देखील परंतु समजत नाहीत. तुम्हा मुलांना बाबा बसून समजावून सांगतात. रावणाला दहा डोकी दाखवतात. ५ विकार स्त्रीचे, ५ विकार पुरुषाचे. आता ५ विकार तर सर्वांसाठी आहेत. सर्व जण आहेतच रावण राज्यामध्ये. आता तुम्ही श्रेष्ठाचारी बनत आहात. बाबा येऊन श्रेष्ठाचारी दुनिया बनवतात. एकांतामध्ये बसल्याने अशा प्रकारे विचार सागर मंथन चालेल. त्या शिक्षणामध्ये देखील स्टुडंट पुस्तक घेऊन एकांतामध्ये जाऊन वाचतात. तुम्हाला काही पुस्तक वाचण्याची गरज नाही. हो, तुम्ही पॉईंट्स नोट करता. त्यांना मग रिवाईज केले पाहिजे. या खूप गुह्य गोष्टी समजून घ्यायच्या आहेत. बाबा म्हणतात ना - आज तुम्हाला गुह्य ते गुह्य नवीन-नवीन पॉइंट्स समजावून सांगतो. पारसपुरीचे मालक तर लक्ष्मी-नारायण आहेत. असे देखील म्हणणार नाही की विष्णू आहे. विष्णूला देखील मग हेच लक्ष्मी-नारायण आहेत असेही समजत नाहीत. आत्ता तुम्ही शॉर्टमध्ये (संक्षिप्तमध्ये) एम ऑब्जेक्ट समजावून सांगता. ब्रह्मा-सरस्वती काही आपसात पती-पत्नी नाही आहेत. हे तर प्रजापिता ब्रह्मा आहेत ना. प्रजापिता ब्रह्मांना ग्रेट-ग्रेट ग्रँड फादर म्हणू शकतो, शिव बाबांना फक्त बाबाच म्हणणार. बाकी सर्व आहेत ब्रदर्स. इतकी सर्व ब्रह्माची मुले आहेत. सर्वांना माहित आहे - आपण ईश्वराची मुले भाऊ-भाऊ झालो. परंतु ते आहेत निराकारी दुनियेमध्ये. आता तुम्ही ब्राह्मण बनला आहात. नवी दुनिया सतयुगाला म्हटले जाते. याचे नाव मग पुरुषोत्तम संगमयुग ठेवले आहे. सतयुगामध्ये असतातच पुरुषोत्तम. या खूप वंडरफुल गोष्टी आहेत. तुम्ही नव्या दुनियेसाठी तयार होत आहात. या संगमयुगावरच तुम्ही पुरुषोत्तम बनता. म्हणतात देखील आम्ही लक्ष्मी-नारायण बनणार. हे आहेत सर्वात उत्तम पुरुष. त्यांना मग देवता म्हटले जाते. सर्वोत्तम नंबर वन आहेत लक्ष्मी-नारायण त्यानंतर नंबरवार तुम्ही मुले बनाल. सूर्यवंशी घराण्याला उत्तम म्हणणार. नंबरवन तर आहेत ना. हळूहळू कला कमी होतात.

आता तुम्ही मुले नवीन दुनियेचा मुहूर्त करता. जसे नवीन घर तयार होते तेव्हा मुले आनंदीत होतात, मुहूर्त करतात. तुम्ही मुले देखील नव्या दुनियेला पाहून आनंदीत होता. मुहूर्त करता. लिहिलेले देखील आहे - ‘सोन्याच्या फुलांची वर्षा होते’. तुम्हा मुलांचा आनंदाचा पारा किती चढला पाहिजे. तुम्हाला सुख आणि शांती दोन्ही मिळतात. दुसरे असे कोणीही नाही ज्यांना इतके सुख आणि शांती मिळेल. दुसरे धर्म येतात तेव्हा मग द्वैत होते. तुम्हा मुलांना अपार आनंद होतो - आपण पुरुषार्थ करून उच्च पद मिळवावे. असे नाही की जे नशिबात असेल ते मिळेल, पास होणार असू तर होऊ. नाही, प्रत्येक गोष्टीमध्ये पुरुषार्थ जरूर करायचा आहे. पुरुषार्थ करणे झेपत नाही तर म्हणतात जे नशिबात असेल. आणि मग पुरुषार्थ करणेच बंद होते. बाबा म्हणतात - तुम्हा मातांना किती उच्च बनवतो. स्त्रीचा मान सर्व ठिकाणी आहे. विलायत मध्ये देखील मान आहे. इथे मुलगी जन्माला आली तर पलंग उलटा करतात. दुनिया अगदीच खराब आहे. यावेळी तुम्ही मुले जाणता भारत काय होता, आता काय आहे. मनुष्य विसरले आहेत फक्त शांती-शांती मागत राहतात. विश्वामध्ये शांतीची इच्छा करतात. तुम्ही हे लक्ष्मी-नारायणाचे चित्र दाखवा. यांचे राज्य होते तर पवित्रता-सुख-शांती सुद्धा होती. तुम्हाला असे राज्य हवे ना. मूलवतनमध्ये तर विश्वाला शांती हवी असे म्हणणार नाही. विश्वामध्ये शांती तर इथे असेल ना. देवतांचे राज्य साऱ्या विश्वावर होते. मूलवतन तर आहे आत्म्यांची दुनिया. मनुष्य तर हे देखील जाणत नाहीत की आत्म्यांची दुनिया असते. बाबा म्हणतात - ‘मी तुम्हाला किती श्रेष्ठ पुरुषोत्तम बनवतो’. ही समजावून सांगण्याची गोष्ट आहे. असे नाही, घसा फोडून ओरडणार की, ‘भगवान आले आहेत’, तर कोणीही मानणार नाही. अजूनच शिव्या खाल आणि खाऊ घालाल. म्हणतील बी. के. आपल्या बाबांना भगवान म्हणतात. अशी सेवा केली जात नाही. बाबा युक्ती सांगत राहतात. खोलीमध्ये भिंतीवर आठ-दहा चित्र व्यवस्थित लावा आणि बाहेर लिहा - बेहदच्या बाबांकडून बेहद सुखाचा वारसा घ्यायचा आहे अथवा मनुष्यापासून देवता बनायचे आहे, तर या, आम्ही तुम्हाला समजावून सांगतो. याने भरपूर येऊ लागतील. आपोआप येत राहतील. विश्वामध्ये शांती तर होती ना. आता इतके अनेक धर्म आहेत. तमोप्रधान दुनियेमध्ये शांती कशी होऊ शकते. विश्वामध्ये शांती ती तर भगवंतच करू शकतात. शिवबाबा येतात जरूर काही सौगात आणत असतील. एकच बाबा आहेत जे इतक्या दुरून येतात आणि हे बाबा एकदाच येतात. इतके मोठे बाबा ५००० वर्षांनंतर येतात. यात्रेवरून परत येतात तेव्हा मुलांसाठी सौगात घेऊन येतात ना. स्त्रीचा पती देखील, मुलांचा पिता तर बनतात ना. मग आजोबा, पणजोबा, खापर पणजोबा बनतात. यांना तुम्ही बाबा म्हणता, तर मग ग्रँड फादर देखील असेल. ग्रेट ग्रँड फादर देखील असेल. वंशावळी आहेत ना. ॲडम, आदि देव नाव आहे परंतु मनुष्य समजत नाहीत. तुम्हा मुलांना बाबा बसून समजावून सांगतात. बाबांद्वारे सृष्टीचक्राच्या इतिहास-भूगोलाला तुम्ही जाणून चक्रवर्ती राजा बनत आहात. बाबा किती प्रेमाने आणि आवडीने शिकवतात तर तितके शिकले पाहिजे ना. सकाळचा वेळ तर सर्व जण मोकळे असतात. सकाळचा क्लास असतो - अर्धा-पाऊण तास, मुरली ऐकून मग जा. आठवण तर कुठेही राहून करू शकता. रविवारच्या दिवशी तर सुट्टी आहे. सकाळी २-३ तास बसा. दिवसाच्या कमाईला मेकअप करा (भरून काढा). पूर्ण झोळी भरून घ्या. वेळ तर मिळतो ना. मायेची वादळे आल्याने आठवण करू शकत नाही. बाबा अगदी सोपे करून सांगतात. भक्तिमार्गामध्ये किती सत्संगांमध्ये जातात. श्रीकृष्णाच्या मंदिरामध्ये, मग श्रीनाथाच्या मंदिरामध्ये, मग अजून कोणाच्या मंदिरात जातील. यात्रेमध्ये देखील किती व्यभिचारी बनतात. इतके कष्ट देखील घेतात, फायदा काहीच नाही. ड्रामामध्ये हे देखील नोंदलेले आहे अजूनही पुन्हा होईल. तुमच्या आत्म्यामध्ये पार्ट भरलेला आहे. सतयुग, त्रेतामध्ये जो पार्ट कल्पपूर्वी बजावला आहे तोच बजावतील. मंद-बुद्धीवाले हे देखील समजत नाहीत. जे महीन-बुद्धी आहेत तेच चांगल्या प्रकारे समजून घेऊन मग इतरांना समजावून सांगू शकतील. त्यांना आतून आभास होतो की हे अनादि नाटक बनलेले आहे. दुनियेमध्ये कोणीही समजत नाहीत की हे बेहदचे नाटक आहे. हे समजण्यासाठी देखील वेळ लागतो. प्रत्येक गोष्ट डिटेलमध्ये सांगून मग म्हटले जाते - मुख्य आहे आठवणीची यात्रा. सेकंदामध्ये जीवनमुक्ती देखील गायले गेले आहे. आणि मग हे देखील गायन आहे की ज्ञानाचा सागर आहेत. सर्व समुद्र शाई बनवा, जंगलाला लेखणी बनवा, पृथ्वीला कागद बनवा… तरीही अंत येऊ शकत नाही. सुरुवातीपासून तुम्ही किती लिहीत आले आहात. ढिगांनी कागद होईल. तुम्हाला कोणताही त्रास सहन करायचा नाहीये. मुख्य आहेच अल्फ. बाबांची आठवण करायची आहे. इथे देखील तुम्ही येता शिवबाबांकडे. शिवबाबा यांच्यामध्ये प्रवेश करून तुम्हाला किती प्रेमाने शिकवतात. कसलाही बडेजाव नाहीये. बाबा म्हणतात - मी येतो जुन्या शरीरामध्ये. कसे साधारण रीतीने शिवबाबा येऊन शिकवतात. कसलाही अहंकार नाही. बाबा म्हणतात - तुम्ही मला म्हणताच मुळी - ‘बाबा, पतित दुनियेमध्ये, पतित शरीरामध्ये या, येऊन आम्हाला शिकवा’. सतयुगामध्ये बोलावत नाहीत की येऊन हिरे-माणकांच्या महालामध्ये बसा भोजन इत्यादी करा… शिवबाबा भोजन करतच नाहीत. पूर्वी बोलावत होता की येऊन भोजन करा. ३६ प्रकारचे भोजन खाऊ घालत होता, हे तरीही पुन्हा होईल. हे देखील चरित्रच म्हणू. श्रीकृष्णाचे चरित्र काय आहे? तो तर सतयुगाचा प्रिन्स आहे. त्यांना पतित-पावन म्हटले जात नाही. सतयुगामध्ये हे विश्वाचे मालक कसे बनले आहेत - हे देखील आता तुम्ही जाणता. मनुष्य तर अगदी घोर अंधारामध्ये आहेत. आता तुम्ही लख्ख प्रकाशामध्ये आहात. बाबा येऊन रात्रीला दिवस बनवतात. अर्धा कल्प तुम्ही राज्य करता तर किती आनंद झाला पाहिजे.

तुमची आठवणीची यात्रा पूर्ण तेव्हा होईल जेव्हा तुमचे कोणतेही कर्मेंद्रिय धोका देणार नाही. कर्मातीत अवस्था होईल तेव्हा आठवणीची यात्रा पूर्ण होईल. अजून पूर्ण झालेली नाहीये. अजून तुम्हाला पूर्ण पुरुषार्थ करायचा आहे. निराश व्हायचे नाही. सेवा आणि सेवा. बाबा देखील येऊन वृद्ध तनाद्वारे सेवा करत आहेत ना. बाबा करन-करावनहार आहेत. मुलांसाठी किती काळजी असते - हे बनवायचे आहे, घर बनवायचे आहे. जसे लौकिक पित्याला हदचे विचार असतात, तसे पारलौकिक पित्याला बेहदचे विचार असतात. तुम्हा मुलांनाच सेवा करायची आहे. दिवसेंदिवस खूप सोपे होत जाते. जितके विनाशाच्या जवळ येत जाल तितकी ताकद येत जाईल. गायले देखील आहे भीष्म पितामह इत्यादींना शेवटी तीर लागले (ज्ञान काळजाला भिडले). आता जर तीर लागले तर खूप गोंधळ माजेल. इतकी गर्दी होईल काही विचारू नका. म्हणतात ना - डोके खाजवण्यासाठी देखील वेळ नाही. असे काही नाहीये. परंतु गर्दी होते तर मग असे म्हटले जाते. जेव्हा यांना तीर लागेल तेव्हा तुमचा प्रभाव दिसून येईल. सर्व मुलांना बाबांचा परिचय मिळणार तर आहेच.

तुम्ही पृथ्वीच्या ३ पावलामध्ये देखील हे अविनाशी हॉस्पिटल आणि गॉडली युनिव्हर्सिटी उघडू शकता. पैसे नसतील तरीही हरकत नाही. चित्र तुम्हाला मिळून जातील. सेवेमध्ये मान-अपमान, सुख-दुःख, थंडी-गर्मी सर्व सहन करायचे आहे. कोणाला हिऱ्या समान बनविणे काही कमी गोष्ट आहे का! बाबा कधी थकतात का? तुम्ही का थकता? अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) सकाळी अर्धा-पाऊण तास खूप प्रेमाने आणि आवडीने अभ्यास करायचा आहे. बाबांच्या आठवणीमध्ये रहायचे आहे. आठवणीचा असा पुरुषार्थ असावा जेणेकरून सर्व कर्मेंद्रिये वश होतील (कंट्रोलमध्ये राहतील).

२) सेवेमध्ये सुख-दुःख, मान-अपमान, थंडी-गर्मी सर्व काही सहन करायचे आहे. कधीही सेवेमध्ये थकायचे नाही. पृथ्वीच्या ३ पावलामध्ये देखील हॉस्पिटल कम युनिव्हर्सिटी उघडून हिऱ्या समान बनविण्याची सेवा करायची आहे.

वरदान:-
खऱ्या आत्मिक स्नेहाची अनुभूती करविणारे मास्टर स्नेहाचे सागर भव

जसे सागर किनारी जातात तर शीतलतेचा अनुभव होतो तसे तुम्ही मुले मास्टर प्रेमाचा सागर बना म्हणजे जो कोणी आत्मा तुमच्यासमोर येईल तो अनुभव करेल की प्रेमाच्या मास्टर सागराच्या लाटा प्रेमाची अनुभूती करवत आहेत कारण आजची दुनिया खऱ्या आत्मिक प्रेमाची भुकेलेली आहे. स्वार्थी प्रेम बघून-बघून त्या प्रेमापासून मन उदासीन झाले आहे म्हणून आत्मिक प्रेमाच्या काही क्षणांच्या अनुभूतीला देखील जीवनाचा आधार समजतील.

बोधवाक्य:-
ज्ञान-धनाने भरपूर रहा तर स्थूलधनाची प्राप्ती स्वतः होत राहील.

अव्यक्त इशारे - संकल्पांची शक्ती जमा करून श्रेष्ठ सेवेच्या निमित्त बना:-

जसे सतयुगी सृष्टी करिता म्हणतात - ‘एक राज्य, एक धर्म आहे’. असेच आता स्वराज्यामध्ये देखील एक राज्य अर्थात स्व च्या इशाऱ्यावर सर्व चालणारे असावेत. मनाने आपले मनमत चालवू नये, बुद्धीने आपली निर्णय शक्तीची गडबड करू नये. संस्कार आत्म्याला नाचविणारे नसावेत, तेव्हा म्हणणार - एक धर्म, एक राज्य. तर अशी कंट्रोलिंग पॉवर धारण करा, हेच बेहद सेवेचे साधन आहे.