23-08-2025      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - बाबा आले आहेत तुमचा ज्ञानरत्नांनी शृंगार करून परत घरी घेऊन जाण्यासाठी, मग राज्यामध्ये पाठवतील तर अपार आनंदामध्ये रहा, एका बाबांवरच प्रेम करा”

प्रश्न:-
आपल्या धारणेला मजबूत बनविण्याचा आधार काय आहे?

उत्तर:-
आपल्या धारणेला मजबूत बनविण्यासाठी सदैव हे पक्के करा की आजच्या दिवशी जे काही घडून गेले ते चांगले झाले पुन्हा कल्पा नंतर होईल. जे काही झाले ते कल्पापूर्वी देखील झाले होते, नथिंग न्यू. ही लढाई देखील ५००० वर्षांपूर्वी झाली होती, पुन्हा होणार जरूर. या भंभोरचा (जुन्या दुनियेचा) विनाश होणारच आहे… असे प्रत्येक क्षणी ड्रामाच्या स्मृतीमध्ये रहा तर धारणा मजबूत होत जाईल.

गीत:-
दूर देश का रहने वाला…

ओम शांती।
मुले या पूर्वी देखील दूर देशातून परक्या देशामध्ये आले आहेत. आता या परक्या देशामध्ये दुःखी आहेत म्हणून बोलावत आहेत - ‘आपल्या देशात घरी घेऊन चला’. ही तुमची हाक आहे ना. खूप काळापासून आठवण करत आला आहात तर बाबा देखील आनंदाने येतात. जाणतात मी जातो मुलांकडे. जी मुले काम चितेवर बसून भस्म झाली आहेत त्यांना आपल्या घरी देखील घेऊन येईन आणि मग राज्यामध्ये पाठवून देईन. त्यासाठी त्यांचा ज्ञानाने शृंगार देखील करेन. मुलांना देखील बाबांपेक्षा जास्त आनंद झाला पाहिजे. बाबा जर का आलेले आहेत तर त्यांचे बनले पाहिजे. त्यांच्यावर खूप प्रेम केले पाहिजे. बाबा रोज समजावून सांगतात, आत्मा बोलते ना. ‘बाबा, ५००० वर्षानंतर ड्रामा अनुसार तुम्ही आला आहात, आम्हाला भरपूर आनंदाचा खजिना मिळत आहे. बाबा तुम्ही आमची झोळी भरत आहात, आम्हाला आमच्या घरी शांतीधाम मध्ये घेऊन जाता आणि मग राजधानीमध्ये पाठवाल’. किती अपार आनंद झाला पाहिजे. बाबा म्हणतात - मला या परक्या राजधानीमध्येच यायचे आहे. बाबांचा अतिशय गोड आणि वंडरफुल पार्ट आहे. खास जेव्हा ते या परक्या देशामध्ये आले आहेत. या गोष्टी तुम्ही आत्ताच समजता नंतर मग हे ज्ञान प्राय:लोप होते. तिथे आवश्यकताच राहत नाही. बाबा म्हणतात - तुम्ही किती अडाणी बनला आहात. ड्रामाचे ॲक्टर असताना देखील बाबांना जाणत नाही! जे बाबाच करनकरावन हार आहेत, काय करतात, काय करवून घेतात - हेच विसरून गेला आहात. संपूर्ण जुन्या दुनियेला हेवन बनविण्यासाठी येतात आणि ज्ञान देतात. ते ज्ञानाचे सागर आहेत तर जरूर ज्ञान देण्याचे कर्तव्य करतील ना. मग तुमच्याकडून करवून देखील घेतात, म्हणतात - इतरांनाही हा मेसेज द्या की, ‘बाबा सर्वांसाठी सांगत आहेत की आता देहाचे भान सोडून माझी आठवण करा तर विकर्म विनाश होतील’. मी श्रीमत देतो. पाप-आत्मे तर सगळेच आहेत. यावेळी पूर्ण झाड तमोप्रधान, जडजडीभूत अवस्थेला प्राप्त झाले आहे. जसे बांबूच्या जंगलाला आग लागते तर एकदम सगळेच जळून नष्ट होते. जंगलामध्ये पाणी कुठून येईल ज्यामुळे आग विझवता येईल. ही जी काही जुनी दुनिया आहे तिला आग लागणार आहे. बाबा म्हणतात - नथिंग न्यू. बाबा चांगले-चांगले पॉईंट्स देत राहतात जे नोट केले पाहिजेत. बाबांनी समजावून सांगितले आहे बाकीचे धर्म स्थापक फक्त आपला धर्म स्थापन करण्यासाठी येतात, त्यांना पैगंबर अथवा मेसेंजर इत्यादी काहीही म्हणू शकत नाही. हे देखील मोठ्या युक्तीने लिहायचे आहे. शिवबाबा मुलांना समजावून सांगत आहेत - मुले तर सर्व भाऊ-भाऊ आहेत. तर प्रत्येक चित्रामध्ये, प्रत्येक लिखाणामध्ये हे जरूर लिहायचे आहे - ‘शिवबाबा असे समजावून सांगतात’. बाबा म्हणतात - मुलांनो, मी येऊन सतयुगी आदि सनातन देवी-देवता धर्माची स्थापना करतो, ज्यामध्ये १०० टक्के सुख-शांती-पवित्रता सर्व आहे म्हणून त्याला हेवन म्हटले जाते. तिथे दुःखाचे नावच नाही आहे. बाकी जे काही सर्व धर्म आहे त्या सर्वांचा विनाश करण्याच्या निमित्त बनतो. सतयुगामध्ये असतोच एक धर्म. ती आहे नवीन दुनिया. जुन्या दुनियेला नष्ट करवितो. असा धंदा तर आणखी कोणी करत नाही. असे म्हटले जाते शंकरा द्वारे विनाश. विष्णू देखील लक्ष्मी-नारायणच आहेत. प्रजापिता ब्रह्मा सुद्धा तर इथेच आहेत. तेच पतितापासून पावन, फरिश्ता बनतात म्हणून मग ‘ब्रह्मा देवता’ म्हटले जाते. ज्यांच्या द्वारे देवी-देवता धर्म स्थापन होतो. हे बाबा (ब्रह्मा बाबा) देखील देवी-देवता धर्माचे प्रथम प्रिन्स बनतात. तर ब्रह्माद्वारे स्थापना, शंकराद्वारे विनाश. चित्र तर द्यावी लागतात ना. समजावून सांगण्यासाठी ही चित्रे बनविली आहेत. यांच्या अर्थाविषयी कोणालाच माहिती नाही आहे. स्वदर्शन चक्रधारी विषयी देखील समजावून सांगितले आहे - परमपिता परमात्मा सृष्टीच्या आदि-मध्य-अंताला जाणतात. त्यांच्यामध्ये सर्व ज्ञान आहे तर स्वदर्शन चक्रधारी झाले ना. जाणतात मीच हे ज्ञान ऐकवितो. बाबा तर असे म्हणणार नाहीत की, मला कमलपुष्प समान बनायचे आहे. सतयुगामध्ये तुम्ही कमळाच्या फुलासारखेच राहता. संन्याशांसाठी असे म्हणणार नाही. ते तर जंगलामध्ये निघून जातात. बाबा देखील म्हणतात - आधी ते पवित्र सतोप्रधान असतात. भारताला थोपवून धरतात, पवित्रतेच्या बळावर. भारतासारखा पवित्र देश आणखी कोणता असतही नाही. जशी बाबांची महिमा आहे तशी भारताची देखील महिमा आहे. भारत हेवन होता, हे लक्ष्मी-नारायण राज्य करत होते तर मग गेले कुठे. हे आता तुम्ही जाणता इतर कोणाच्या बुद्धीमध्ये थोडेच असेल की हे देवताच ८४ जन्म घेऊन मग पुजारी बनतात. आता तुम्हाला सर्व ज्ञान आहे, आपण आता पूज्य देवी-देवता बनतो मग पुजारी मनुष्य बनणार. मनुष्य तर मनुष्यच असतो. ही जी चित्र-विचित्र चित्रे बनवतात, असे कोणते मनुष्य असत नाहीत. ही सर्व भक्ती मार्गातील खंडीभर चित्रे आहेत. तुमचे ज्ञान तर आहे गुप्त. हे ज्ञान सर्वच घेणार नाहीत. जे या देवी-देवता धर्माची पाने असतील तेच घेतील. बाकीचे जे दुसऱ्या धर्मांना मानणारे आहेत ते ऐकणार नाहीत. जे शिव आणि देवतांची भक्ती करतात तेच येतील. अगदी सुरुवातीला माझी देखील पूजा करतात आणि मग पुजारी बनून स्वतःची देखील पूजा करतात. तर आता आनंद होतो की आपण पूज्य पासून पुजारी बनलो, आता पुन्हा पूज्य बनत आहोत. तो आनंद साजरा करतात. इथे तर अल्पकाळासाठी आनंद साजरा करतात. तिथे तर तुम्ही सदैव आनंदात असता. दीपावली इत्यादी काही लक्ष्मीला बोलावण्यासाठी नसते. दीपावली असते कोरोनेशनला (राज्याभिषेकाच्या वेळी). बाकी यावेळी जे उत्सव साजरे केले जातात ते तिथे असत नाहीत. तिथे तर सुखच सुख आहे. ही एकच वेळ आहे जेव्हा तुम्ही आदि-मध्य-अंता विषयी जाणता. हे सर्व पॉईंट्स लिहून काढा. संन्याशांचा आहे हठयोग. हा आहे राजयोग. बाबा म्हणतात - प्रत्येक पानावर जिथे-तिथे शिवबाबांचे नाव जरूर असावे. शिवबाबा आम्हा मुलांना समजावून सांगतात. निराकार आत्मे आता साकार मध्ये बसले आहेत. तर बाबा देखील साकारमध्ये समजावून सांगतील ना. ते म्हणत आहेत - ‘स्वतःला आत्मा समजून माझी आठवण करा’. शिव भगवानुवाच मुलांप्रती. स्वतः इथे उपस्थित आहेत ना. मुख्य-मुख्य पॉईंट्स पुस्तकामध्ये असे क्लियर लिहिलेले असावेत जेणेकरून वाचल्यावर आपोआप ज्ञान समजेल. ‘शिव भगवानुवाच’ असेल तर वाचताना मजा येईल. हे बुद्धीचे काम आहे ना. बाबा देखील शरीराचे लोन घेऊन मग ऐकवतात ना, यांची (ब्रह्मा बाबांची) आत्मा देखील ऐकते. मुलांना खूप नशा असला पाहिजे. बाबांवर खूप प्रेम असले पाहिजे. हा तर त्यांचा रथ आहे, हा अनेक जन्मांतील अंताचा जन्म आहे. यांच्यामध्ये प्रवेश केला आहे. ब्रह्माद्वारे हे ब्राह्मण बनतात मग मनुष्यापासून देवता बनतात. चित्र किती क्लियर आहे. भले आपले स्वतःचे डबल सिरताजवाले चित्र देखील वरती किंवा बाजूला लावा. योग बळाने आपण असे बनतो. वर आहेत शिवबाबा. त्यांची आठवण करता-करता मनुष्यापासून देवता बनतो. अगदी क्लियर आहे. रंगीत चित्रांचे पुस्तक असे असावे जे पाहून माणूस खुश होईल. त्यातील काही मग गरिबांसाठी थोडीशी स्वस्त देखील छापू शकता. मोठ्याला छोटे, छोट्यात छोटे करू शकता, रहस्य त्यामध्ये आले पाहिजे. ‘गीतेचा भगवान’वाले चित्र आहे मुख्य. त्या (भक्ती मधील) गीतेवर कृष्णाचे चित्र आणि या गीतेवर त्रिमूर्तीचे चित्र असल्यामुळे लोकांना समजावून सांगण्यासाठी सोपे होते. प्रजापिता ब्रह्माची मुले ब्राह्मण इथे आहेत. प्रजापिता ब्रह्मा सूक्ष्मवतनमध्ये तर असू शकत नाही. म्हणतात - ‘ब्रह्मा देवताय नमः’, ‘विष्णू देवताय नमः’, आता देवता कोण आहेत. देवता तर इथे राज्य करत होते. डिटीज्म (देवी-देवता धर्म) तर आहे ना. तर हे चांगल्या रीतीने समजावून सांगावे लागते. ब्रह्मा सो विष्णू, विष्णू सो ब्रह्मा दोघेही इथे आहेत. चित्र असेल तर समजावून सांगितले जाऊ शकते. सर्वप्रथम ‘अल्फ’ला सिद्ध करा तेव्हाच सर्व गोष्टी सिद्ध होतील. पॉईंट्स तर भरपूर आहेत बाकीचे सगळे फक्त धर्म स्थापन करण्यासाठी येतात. बाबा तर स्थापना आणि विनाश दोन्ही करतात. होते सर्व ड्रामा अनुसारच. ब्रह्मा बोलू शकतात, विष्णू बोलू शकतात? सूक्ष्मवतनमध्ये काय बोलतील. या सर्व समजून घेण्याच्या गोष्टी आहेत. इथे तुम्ही समजून घेऊन मग ट्रान्सफर होता, वरच्या क्लासमध्ये. रूमच दुसरा मिळतो. मूलवतनमध्ये काही बसून तर रहायचे नाही आहे. मग तिथून नंबरवार यायचे असते. मुख्य गोष्ट एकच आहे पहिले त्यावर जोर दिला पाहिजे. कल्पा पूर्वी देखील असेच झाले होते. हे सेमिनार इत्यादी देखील असेच कल्पापूर्वी देखील झाले होते. असेच पॉईंट्स निघाले होते. आजचा दिवस जो होऊन गेला चांगले झाले पुन्हा कल्पा नंतर असेच होईल. अशा प्रकारे आपली धारणा करत पक्के होत जा. बाबांनी सांगितले होते मॅक्झिन मध्ये सुद्धा छापा - हे युद्ध झाले, नथिंग न्यू. ५००० वर्षांपूर्वी देखील असेच झाले होते. या गोष्टी तुम्हीच समजता. बाहेरवाले समजू शकणार नाहीत. फक्त म्हणतील - गोष्टी तर वंडरफुल आहेत. ठीक आहे, कधीतरी जाऊन समजून घेऊ. शिव भगवानुवाच मुलांप्रती. अशा प्रकारचे शब्द असतील तर येऊन समजून घेतील देखील. नाव लिहिलेले आहे - प्रजापिता ब्रह्माकुमार-कुमारी. प्रजापिता ब्रह्मापासूनच ब्राह्मण रचतात. ‘ब्राह्मण देवी-देवताय नमः’ म्हणतात ना. कोणते ब्राह्मण? तुम्ही ब्राह्मणांना देखील समजावून सांगू शकता ब्रह्माची संतान कोण आहेत? प्रजापिता ब्रह्माची इतकी मुले आहेत, तर जरूर इथे ॲडॉप्ट होत असतील. जे आपल्या कुळाचे असतील त्यांनाच चांगल्या रीतीने समजेल. तुम्ही तर बाबांची मुले बनला आहात ना. बाबा, ब्रह्माला देखील ॲडॉप्ट करतात. नाहीतर शरीर असणारी गोष्ट आली कुठून. ब्राह्मणांना या गोष्टी समजतील, संन्याशांना हे समजणार नाही. अजमेरमध्ये ब्राह्मण असतात आणि हरिद्वारमध्ये संन्याशीच संन्याशी असतात. पंडे ब्राह्मण असतात. परंतु ते तर भुकेलेले असतात. बोला - तुम्ही आता भौतिक पंडे आहात. आता रूहानी पंडे बना. तुमचे देखील नाव ‘पंडा’ आहे. पांडव सेनेला देखील समजत नाहीत. बाबा आहेत पांडवांचे शिरोमणी. म्हणतात - ‘माझ्या मुलांनो, मामेकम् (मज एकाची) आठवण करा तर विकर्म विनाश होतील आणि आपल्या घरी निघून जाल. मग मोठी यात्रा होईल अमरपुरीची. मूलवतनची केवढी मोठी यात्रा असेल. सर्वच्या सर्व आत्मे जातील. जशी टोळांची झुंड जाते ना. मधमाशांची देखील राणी पळते तर तिच्या मागे सर्व पळतात. वंडर आहे ना. सर्व आत्मे देखील मच्छरांसारखे जातील. शिवची वरात आहे ना. तुम्ही सर्व आहात ब्राइड्स (वधू). मी ब्राईडग्रुम (नवरदेव) आलो आहे सर्वांना घेऊन जाण्यासाठी. तुम्ही छी-छी (विकारी) बनले आहात म्हणून शृंगार करून सोबत घेऊन जाणार. जे शृंगार करणार नाहीत ते सजा भोगतील. जायचे तर आहेच. काशी कलवटमध्ये देखील मनुष्य मरतात सेकंदामध्ये किती सजा भोगतात. मनुष्य ओरडत राहतात. हे देखील असेच आहे, समजते आपण जणूकाही जन्म-जन्मांतरीचे दुःख सजा भोगत आहे. ती दुःखाची फिलिंग अशी असते. जन्म-जन्मांतरीच्या पापांची सजा मिळते. जितक्या शिक्षा भोगाल तितके पद कमी होईल म्हणून बाबा म्हणतात योगबलाने हिशोब चुकता करा. आठवणीने जमा करत जा. नॉलेज तर खूप सोपे आहे. आता प्रत्येक कर्म ज्ञानयुक्त करायचे आहे. दान देखील पात्र असणाऱ्यालाच द्यायचे आहे. पाप आत्म्यांना दिल्यामुळे मग देणाऱ्यावर देखील त्याचा परिणाम होतो. ते देखील पाप आत्मे बनतात. अशांना कधीही दान देता कामा नये, जे मग जाऊन त्या पैशाने कोणते पाप इत्यादी करतील. पाप-आत्मांना देणारे तर दुनियेमध्ये भरपूर बसले आहेत. आता तुम्हाला काही असे करायचे नाहीये. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) आता प्रत्येक कर्म ज्ञानयुक्त करायचे आहे, पात्र असणाऱ्याला दान द्यायचे आहे. पाप-आत्म्यांसोबत आता कोणतीही पैसे इत्यादीची देवाण-घेवाण करायची नाही. योगबलाने सर्व जुने हिशोब चुकते करायचे आहेत.

२) अपार आनंदामध्ये राहण्यासाठी आपणच आपल्याशी गोष्टी करायच्या आहेत - बाबा, तुम्ही आले आहात आम्हाला अपार खुशीचा खजिना देण्यासाठी, तुम्ही आमची झोळी भरत आहात, तुमच्यासोबत आधी आम्ही शांतिधामला जाणार मग आपल्या राजधानीमध्ये येणार…

वरदान:-
समस्यांना समाधान रूपामध्ये परिवर्तन करणारे विश्व कल्याणी भव मी विश्व कल्याणी आहे - आता या श्रेष्ठ भावनेचे, श्रेष्ठ कामनेचे संस्कार इमर्ज करा. या श्रेष्ठ संस्कारांच्या पुढे हदचे संस्कार स्वतःच समाप्त होतील. समस्या समाधानाच्या रूपामध्ये परिवर्तित होतील. आता युद्धामध्ये वेळ वाया घालू नका परंतु विजयीपणाचे संस्कार इमर्ज करा. आता सर्व काही सेवेमध्ये लावा तर मेहनती पासून सुटाल. समस्यांमध्ये जाण्याऐवजी दान द्या, वरदान द्या तर स्वतःचे ग्रहण स्वतः समाप्त होईल.

बोधवाक्य:-
कोणाच्या कमी, कमजोरींचे वर्णन करण्याच्या ऐवजी गुण स्वरूप बना, गुणांचेच वर्णन करा.

अव्यक्त इशारे:- सहजयोगी बनायचे असेल तर परमात्म प्रेमाचे अनुभवी बना. बाबांचे मुलांवर इतके प्रेम आहे जे अमृतवेलेपासूनच मुलांची पालना करतात. दिवसाचा प्रारंभच किती श्रेष्ठ होतो! स्वयं भगवान मिलन साजरे करण्यासाठी बोलावतात, रूहरीहान करतात, शक्ती भरतात! बाबांच्या प्रेमाची गाणी तुम्हाला उठवतात. किती प्रेमाने बोलावतात, उठवतात - ‘गोड मुलांनो, लाडक्या मुलांनो, या…’ तर या प्रेमाच्या पालनेचे प्रॅक्टिकल स्वरूप आहे ‘सहज योगी जीवन’.