23-09-2025      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - प्रत्येक गोष्टीमध्ये योगबलाचा वापर करा, बाबांना काहीही विचारण्याचे कारण नाही, तुम्ही ईश्वरीय संतान आहात त्यामुळे कोणतेही आसुरी काम करू नका”

प्रश्न:-
तुमच्या या योगबलाची करामत कोणती आहे?

उत्तर:-
हेच योगबल आहे ज्याद्वारे तुमची सर्व कर्मेंद्रिये वश होतात. योगबलाशिवाय तुम्ही पावन बनू शकत नाही. योगबलानेच सारी सृष्टी पावन बनते म्हणून पावन बनण्याकरिता अथवा भोजनाला शुद्ध बनविण्याकरिता आठवणीच्या यात्रेमध्ये रहा. युक्तीने चाला. नम्रतेने व्यवहार करा.

ओम शांती।
रुहानी बाबा रुहानी मुलांना समजावून सांगत आहेत. दुनियेमध्ये कोणालाच ठाऊक नाही आहे की रुहानी बाबा येऊन स्वर्गाची अथवा नव्या दुनियेची स्थापना कशी करतात. कोणीही जाणत नाही. तुम्ही बाबांकडून कोणत्याही प्रकारची मागणी करू शकत नाही. बाबा सर्व काही समजावून सांगतात. काहीही विचारण्याची आवश्यकता राहत नाही, सर्व काही स्वतःहून समजावून सांगत राहतात. बाबा म्हणतात - मला कल्प-कल्प या भारत खंडामध्ये येऊन काय करायचे आहे, ते मी जाणतो, तुम्ही जाणत नाही. रोज-रोज समजावून सांगत राहतात. भले कोणी एक अक्षर सुद्धा विचारले नाही तरी सुध्दा सर्व काही समजावून सांगत राहतात. कधी विचारतात खाण्या-पिण्याचा त्रास आहे का. आता ही तर समजून घेण्याची गोष्ट आहे. बाबांनी सांगितले आहे - प्रत्येक गोष्टीमध्ये योगबलाचा वापर करा, आठवणीच्या यात्रेद्वारे काम करा आणि कुठेही गेलात तर मुख्य गोष्ट आहे बाबांची आठवण जरूर करायची आहे. तसेच कोणतेही आसुरी काम करायचे नाही. आपण ईश्वरीय संतान आहोत, ते आहेत सर्वांचे पिता, सर्वांसाठी एकच शिकवण देतील. बाबा शिकवण देतात - मुलांनो, स्वर्गाचा मालक बनायचे आहे. राजाईमध्ये सुद्धा पोझिशन (पद) असते ना. प्रत्येकाच्या पुरुषार्थानुसार पद, असते. पुरुषार्थ मुलांना करायचा आहे आणि प्रारब्ध देखील मुलांनाच उपभोगायचे आहे. पुरुषार्थ करवून घेण्यासाठी बाबा येतात. तुम्हाला काहीच ठाऊक नव्हते की बाबा केव्हा येतील, येऊन काय करतील, कुठे घेऊन जातील. हे सर्व बाबाच येऊन समजावून सांगतात. ड्रामाच्या प्लॅन अनुसार तुम्ही कुठून घसरला आहात. एकदम उंच टोकावरून. थोडे सुद्धा बुद्धीमध्ये येत नाही की आपण कोण आहोत. आता जाणीव होते ना. तुमच्या स्वप्नात सुद्धा नव्हते की बाबा येऊन काय करतील. तुम्ही सुद्धा काहीच जाणत नव्हता. आता बाबा भेटले आहेत तर समजता अशा बाबांवर न्योछावर (समर्पित) व्हावे लागेल. जशी पतिव्रता स्त्री असते तर ती पतीवर किती न्योछावर होते (जीव ओवाळून टाकते). चितेवर चढण्याची सुद्धा भीती वाटत नाही. किती धाडसी असते. पूर्वी चितेवर खूप बलिदान करत होत्या. इथे बाबा तर असा कोणता त्रास देत नाहीत. भले नाव ‘ज्ञान-चिता’ आहे परंतु जाळून घेण्याची काही गरज नाही. बाबा अगदी असे समजावून सांगतात, जणू काही लोण्यातून केस काढावा. मुले समजतात बरोबर जन्म-जन्मांतरीचे ओझे डोक्यावर आहे. कोणी एकच काही अजामिल नाहीये. प्रत्येक मनुष्य एका पेक्षा एक जास्त अजामिल आहे. लोकांना काय माहीत की मागच्या जन्मामध्ये काय-काय केले आहे. आता तुम्ही समजता पापेच केलेली आहेत, वास्तविक एकही पुण्य-आत्मा नाही आहे. सर्व आहेत पाप-आत्मे. पुण्य करतील तर पुण्य-आत्मा बनतील. पुण्य-आत्मे असतात सतयुगामध्ये. कोणी हॉस्पिटल इत्यादी बांधले तर त्यात काय झाले. शिडी उतरण्यापासून थोडेच वाचणार आहेत? चढती कला तर होत नाही ना. घसरतच जातात. हे बाबा तर असे बिलवेड आहेत ज्यांच्यासाठी म्हणतात - जिवंतपणी समर्पित व्हा कारण पतींचाही पती, पित्यांचाही पिता सर्वात श्रेष्ठ आहेत.

मुलांना आता बाबा जागृत करत आहेत. असे बाबा जे स्वर्गाचा मालक बनवतात, किती साधारण आहेत. सुरुवातीला जेव्हा मुली आजारी पडत होत्या तेव्हा बाबा स्वतः त्यांची सेवा करत होते. अजिबात अहंकार नव्हता. बापदादा उच्च ते उच्च आहेत. म्हणतात - जसे कर्म मी यांच्याकडून करून घेईन किंवा करेन. दोघेही जसे एक होऊन जातात. माहित थोडेच होते. बाबा काय करतात, दादा काय करतात. कर्म-अकर्म-विकर्माची गती बाबाच बसून समजावून सांगतात. बाबा अतिशय श्रेष्ठ आहेत. मायेचा देखील किती प्रभाव आहे. ईश्वर बाबा म्हणतात - असे करू नका तरी देखील मानत नाहीत. भगवान म्हणतात - ‘गोड मुलांनो, असे काम करायचे नाही’; तरीही उलटे काम करतात. उलटे काम करण्यासाठीच मनाई करतील ना. परंतु माया देखील अतिशय बलवान आहे. चुकूनही बाबांना विसरायचे नाही. काहीही करो, मारू दे अथवा कुटू दे. बाबा असे काही करत नाहीत परंतु हे एक्स्ट्रीममध्ये (अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये) सांगितले जाते. गाणे देखील आहे - ‘तुम्हारे दर को कभी नहीं छोडेंगे, चाहे कुछ भी कहो’. बाहेर ठेवले तरी काय आहे. बुद्धी देखील म्हणते जाणार तरी कुठे? बाबा बादशाही देतात पुन्हा थोडीच कधी मिळणार आहे. असे थोडेच आहे की दुसऱ्या जन्मामध्ये काही मिळू शकेल. नाही. हे पारलौकिक बाबा आहेत जे बेहद सुखधामचा तुम्हाला मालक बनवतात. मुलांना दैवी गुण देखील धारण करायचे आहेत, तो देखील बाबा सल्ला देतात. आपले पोलीस इत्यादीचे काम देखील करा, नाहीतर डिसमिस करतील. आपले काम तर करायचेच आहे, डोळे वटारून दाखवावे लागतात. जितके शक्य होईल तितके प्रेमाने काम करून घ्या. नाहीतर युक्तीने डोळे वटारून दाखवा. हात चालवायचा नाही (थप्पड मारायचे नाही). बाबांची किती असंख्य मुले आहेत. बाबांना देखील मुलांची काळजी असते ना. मुख्य गोष्ट आहे पवित्र रहाणे. जन्म-जन्मांतर तुम्ही बोलावले आहे ना - ‘हे पतित-पावन येऊन आम्हाला पावन बनवा’. परंतु अर्थ काहीच समजत नाहीत. बोलावतात तर जरूर पतितच आहेत. नाहीतर बोलावण्याची काहीच गरज नाही. पूजेची देखील गरज नाही. बाबा समजावून सांगतात की, तुम्हा अबलांवर किती अत्याचार होतात, सहन करायचेच आहे. युक्त्या देखील सांगत राहतात. खूप नम्रतेने वागा. बोला, ‘तुम्ही तर भगवान आहात मग हे काय मागत आहात? लग्न-गाठ बांधते वेळी म्हणता - मी तुझा पती ईश्वर गुरु सर्व काही आहे आणि आता मी पवित्र राहू इच्छिते तर तुम्ही अडवता कशासाठी. भगवंताला तर पतित-पावन म्हटले जाते ना. तुम्हीच पावन बनविणारे बना’. असे प्रेमाने नम्रतेने बोलले पाहिजे. क्रोध केला तर फुलांची वर्षा करा. मारतात आणि मग पश्चाताप देखील करतात; जसे दारू पितात तर खूप नशा चढतो ना. स्वतःला बादशहा समजतात. तर हे विष देखील अशी चीज आहे काही विचारू नका. पश्चाताप देखील करतात परंतु सवय लागली आहे त्यामुळे ती सुटत नाही. एक-दोनदा विकारामध्ये गेला, बस्स नशा चढला मग घसरतच राहणार (पतन होतच राहणार). जशा नशेच्या वस्तू आनंद देतात, विकार देखील असाच आहे. इथे मग खूप मेहनत आहे. योगबलाशिवाय कोणीही कर्मेंद्रियांना वश करू शकत नाही. योगबलाचाच चमत्कार आहे, तेव्हाच तर नाव प्रसिद्ध आहे, बाहेर देशातून इथे योग शिकण्यासाठी येतात. शांतीमध्ये बसून राहतील. घरादारापासून दूर होतात. ती तर आहे अर्ध्या कल्पासाठी कृत्रिम शांती. कोणालाच खऱ्या शांती विषयी माहीतच नाहीये. बाबा म्हणतात - ‘मुलांनो, तुमचा स्वधर्मच आहे शांत, या शरीराद्वारे तुम्ही कर्म करता. जोपर्यंत शरीर धारण करत नाही तोपर्यंत आत्मा शांत राहते. मग कुठे ना कुठे जाऊन प्रवेश करते. इथे तर काही-काही आत्मे मग सूक्ष्म शरीरामध्ये धक्के खात राहतात. ती सावलीची शरीरे असतात, कोणी दुःख देणारे असतात, कोणी चांगले असतात, इथे देखील काही चांगली माणसे असतात जी कोणाला दुःख देत नाहीत. कोणी तर खूप दुःख देतात. कोणी तर जणू साधू-महात्मा असतात.

बाबा म्हणतात - ‘गोड-गोड सिकीलध्या मुलांनो, तुम्ही ५ हजार वर्षानंतर पुन्हा येऊन भेटले आहात. काय घेण्यासाठी?’ तुम्हाला काय मिळणार आहे ते बाबांनी सांगितले आहे. बाबा तुमच्याकडून काय मिळणार आहे, हा तर प्रश्नच नाहीये. तुम्ही तर आहातच हेवनली गॉड फादर. नवीन दुनियेचे रचयिता. तर जरूर तुमच्याकडून बादशाहीच मिळेल. बाबा म्हणतात - थोडे जरी काही ऐकून, समजून जातात तर स्वर्गामध्ये जरूर येतील. आपण स्वर्गाची स्थापना करण्यासाठी आलो आहोत. मोठ्यात-मोठी असामी आहेत - भगवान आणि प्रजापिता ब्रह्मा. तुम्ही जाणता विष्णू कोण आहेत. बाकी कोणालाच माहित नाही आहे. तुम्ही तर म्हणाल - आम्ही यांच्या घराण्याचे आहोत, हे लक्ष्मी-नारायण तर सतयुगामध्ये राज्य करतात. हे चक्र इत्यादी वास्तविक विष्णूचे थोडेच आहे. हे अलंकार आम्हा ब्राह्मणांचे आहेत. आता हे नॉलेज आहे सतयुगामध्ये थोडेच असे सांगाल. अशा गोष्टी सांगण्याची कोणातच ताकद नाही आहे. तुम्ही या ८४ च्या चक्राला जाणता. याचा अर्थ कोणीही समजू शकत नाही. मुलांना बाबांनी समजावून सांगितले आहे. मुलांना समजले आहे, आपल्याला तर हे अलंकार शोभत नाहीत. आपण आता शिक्षण घेत आहोत. पुरुषार्थ करत आहोत. नंतर मग असे बनणार. स्वदर्शन चक्र फिरवता-फिरवता आपण देवता बनणार. स्वदर्शन चक्र अर्थात रचयिता आणि रचनेच्या आदि-मध्य-अंताला जाणणे आहे. साऱ्या दुनियेमध्ये कोणीही हे समजावून सांगू शकत नाही की हे सृष्टीचे चक्र कसे फिरते. बाबा किती सोपे करून समजावून सांगतात - या चक्राचे आयुर्मान इतके मोठे तर असू शकत नाही. मनुष्य सृष्टीचाच समाचार ऐकवला जातो की, इतके मनुष्य आहेत. असे थोडेच सांगितले जाते की, कासवे किती आहेत, मासे इत्यादी किती आहेत, मनुष्यांचीच गोष्ट आहे. तुम्हाला देखील प्रश्न विचारतात, बाबा सर्व काही सांगत राहतात. फक्त त्यावर पूर्ण लक्ष द्यायचे आहे.

बाबांनी समजावून सांगितले आहे - योगबलाने तुम्ही सृष्टीला पावन बनवता तर काय योगबलाने भोजन शुद्ध होऊ शकत नाही काय? अच्छा, तुम्ही तर असे बनला आहात. मग कोणाला आप समान बनवता का? आता तुम्ही मुले समजता की बाबा आलेले आहेत स्वर्गाची बादशाही पुन्हा देण्यासाठी. तर याला रिफ्युज करायचे नाही (नाकारायचे नाही). विश्वाची बादशाही रिफ्युज केली (नाकारलीत) तर संपलेच. पुन्हा रिफ्युज (कचऱ्याच्या डब्यात) जाऊन पडाल. ही सारी दुनिया आहे कचरा. तर याला रिफ्युजच म्हणणार. दुनियेची हालत बघा काय झाली आहे. तुम्ही तर जाणता आपण विश्वाचे मालक बनतो. हे कोणाला माहितच नाही आहे की, सतयुगामध्ये एकच राज्य होते, मानणारच नाहीत. त्यांना (दुनियावाल्यांना) आपलीच घमेंड असते त्यामुळे जरा सुद्धा ऐकत नाहीत; म्हणतात - ‘ही सर्व तुमची कल्पना आहे. कल्पनेनेच हे शरीर इत्यादी बनलेले आहे’. काहीच अर्थ समजत नाहीत. बस्स, ही ईश्वराची कल्पना आहे, ईश्वर जे पाहिजे ते बनतात, त्यांचा हा खेळ आहे. अशा गोष्टी करतात, काही विचारू नका. आता तुम्ही मुले जाणता बाबा आलेले आहेत. वृद्ध माता देखील म्हणतात - ‘बाबा, दर ५ हजार वर्षानंतर आम्ही तुमच्याकडून स्वर्गाचा वारसा घेतो. आम्ही आता आलो आहोत स्वर्गाची राजाई घेण्यासाठी’. तुम्ही जाणता की सर्व ॲक्टर्सचा आपापला पार्ट आहे. एकाचा पार्ट दुसऱ्याशी मेळ खाऊ शकत नाही. तुम्ही मग याच नावा-रूपामध्ये येऊन याचवेळी बाबांकडून वारसा घेण्याचा पुरुषार्थ कराल. किती अथाह कमाई आहे. भले बाबा म्हणतात - थोडे जरी ऐकले असेल तर स्वर्गामध्ये येतील. परंतु प्रत्येक मनुष्य पुरुषार्थ तर उच्च बनण्याचाच करतात ना. तर पुरुषार्थ आहे फर्स्ट. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) जसे बाबा मुलांची सेवा करतात, कोणताही अहंकार नाही, असे फॉलो करायचे आहे. बाबांच्या श्रीमतावर चालून विश्वाची बादशाही घ्यायची आहे, रिफ्युज करायची नाही (नाकारायची नाही).

२) पित्यांचेही पिता, पतींचाही पती जे सर्वोच्च आहेत, बिलवेड आहेत त्यांच्यावर जिवंतपणी न्योछावर जायचे आहे (समर्पित व्हायचे आहे) ज्ञान-चितेवर बसायचे आहे. कधी चुकूनही बाबांना विसरून उलटे काम करायचे नाही.

वरदान:-
आनंदाच्या अखूट खजिन्यांनी भरपूर सदा निश्चिंत बादशहा भव

आनंदाच्या सागराद्वारे रोज आनंदाचा अखूट खजिना मिळतो आहे त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये आनंद गायब होऊ शकत नाही. कोणत्याही गोष्टीची चिंता वाटू शकत नाही. असे नाही की, प्रॉपर्टीचे काय होईल, परिवाराचे काय होईल. परिवर्तनच होईल ना. जुन्या दुनियेमध्ये कितीही श्रेष्ठ असो परंतु सर्व आहे तर जुनेच ना; त्यामुळे निश्चिंत बनला आहात. जे होईल ते चांगलेच होईल. ब्राह्मणांसाठी सर्व चांगलेच आहे, काहीच वाईट नाही तुमच्याकडे ही अशी बादशाही आहे ज्याला कोणीही हिरावून घेऊ शकत नाही.

बोधवाक्य:-
या संसाराला एक अलौकिक खेळ आणि परिस्थितींना खेळणी समजून चाला तर कधीही निराश होणार नाही.

अव्यक्त इशारे:- आता लगनच्या (उत्कटतेच्या) अग्नीला प्रज्वलित करून योगाला ज्वाला रूपी बनवा.

लास्ट सो फास्ट पुरुषार्थ ज्वाला-रूपाचाच झालेला आहे. पांडवांमुळे यादव थांबलेले आहेत. पांडवांची श्रेष्ठ शानची, रुहानी शानची स्थिती यादवांच्या त्रासदायक परिस्थितीला संपवेल. तर आपल्या शानद्वारे त्रासलेल्या आत्म्यांना शांती आणि समाधानाचे वरदान द्या. ज्वाला स्वरूप अर्थात लाईट हाऊस आणि माईट हाऊस स्थितीला समजून याच पुरुषार्थामध्ये व्यस्त रहा.