23-09-2026      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो, तुम्ही रुहानी बाबांकडून नवीन-नवीन रुहानी गोष्टी ऐकत आहात, तुम्ही जाणता जसे आपण आत्मे आपले रूप बदलून आलो आहोत, तसे बाबा देखील आले आहेत”

प्रश्न:-
छोट्या मुलांनी बाबांच्या कोणत्या एका स्पष्टीकरणावर व्यवस्थित लक्ष दिले, तर ते कोणते टायटल घेऊ शकतील?

उत्तर:-
स्पिरिच्युअल लीडरचे (अध्यात्मिक नेत्याचे टायटल). लहान मुलांनी जर एखादे धाडसी काम करून दाखवले, बाबांकडून जे ऐकतात त्यावर लक्ष दिले आणि त्या गोष्टी इतरांना समजावून सांगितल्या तर सर्वजण त्यांच्यावर खूप प्रेम करतील. बाबांचे नाव देखील मोठे होईल.

गीत:-
छोड़ भी दे आकाश सिंहासन...

ओम शांती।
मुलांनी बोलावले, बाबांनी प्रतिसाद दिला - प्रॅक्टिकलमध्ये मुले काय म्हणत आहेत की, बाबा तुम्ही पुन्हा एकदा रावण राज्यामध्ये या. शब्दही आहेत ना - पुन्हा मायेची सावली पडली आहे. माया म्हटले जाते - रावणाला. तर बोलावतात - रावण राज्य आले आहे म्हणून आता पुन्हा या. इथे रावणाच्या राज्यामध्ये अतोनात दुःख आहे. आम्ही खूप दुःखी, पापी-आत्मा बनलो आहोत. आता बाबा प्रॅक्टिकलमध्ये उपस्थित आहेत. मुले जाणतात, पुन्हा तीच महाभारत लढाईसुद्धा उभी आहे. बाबा ज्ञान आणि राजयोग शिकवत आहेत. बोलावतात देखील - ‘हे निराकार परमपिता परमात्मा, निराकार मधून येऊन साकारी रूप घ्या, रूप बदला’. बाबा समजावून सांगत आहेत - तुम्ही देखील तिथले ब्रह्म महतत्त्व अथवा निराकारी दुनियेमध्ये राहणारे आहात. तुम्ही देखील रूप बदलले आहे. हे कोणीही जाणत नाही. जी आत्मा निराकार आहे, तीच येऊन साकार शरीर धारण करते. ती आहे निराकारी दुनिया. ही आहे साकारी दुनिया आणि ते आहे सटल वर्ल्ड (आकारी दुनिया). ती वेगळी आहे. तुमच्या बुद्धीमध्ये आहे की आपण शांतीधाम अथवा निर्वाणधाममधून येतो. बाबांना जेव्हा सर्वात आधी नवीन रचना रचायची असते तेव्हा अगोदर सूक्ष्मवतनलाच रचतील. सूक्ष्मवतनमध्ये आता तुम्ही जाऊ शकता, नंतर कधी जाणे होत नाही. सर्वप्रथम जेव्हा तुम्ही येता तेव्हा तुम्ही काही व्हाया सूक्ष्मवतन मधून येत नाही. थेट येता. आता तुम्ही सूक्ष्मवतनमध्ये येऊ-जाऊ शकता. पायी इत्यादी जाण्याची गोष्ट नाहीये. हा तुम्हा मुलांना साक्षात्कार होतो. मूलवतनाचा देखील साक्षात्कार होऊ शकतो, परंतु जाऊ शकत नाही. वैकुंठाचा देखील साक्षात्कार होऊ शकतो, जाऊ शकत नाही. जोपर्यंत संपूर्ण पवित्र बनत नाही तोपर्यंत तिथे जाऊ शकत नाही. तुम्ही असे म्हणू शकत नाही की, आम्ही सूक्ष्मवतनमध्ये जाऊ शकतो. तुम्ही साक्षात्कार करू शकता. शिवबाबा आणि दादा आणि तुम्ही मुले आहात. तुम्ही मुले कशा नवीन-नवीन रुहानी गोष्टी ऐकता. या गोष्टी दुनियेमध्ये कोणीही जाणत नाहीत. भले म्हणतात - इनकॉर्पोरियल वर्ल्ड (निराकारी दुनिया) परंतु हेच ठाऊक नाहीये की ते कसे असते. पहिले तर आत्म्यालाच जाणत नाहीत, मग निराकारी दुनियेला कसेबरे जाणतील? बाबा येऊन सर्वप्रथम आत्म्याचे रियलायझेशन (ओळख) करून देतात. तुम्ही आत्मा आहात, नंतर मग रूप बदलले आहे अर्थात निराकार मधून साकारमध्ये आला आहात.

आता तुम्हाला समजते आहे की, आपली आत्मा कसे ८४ जन्म भोगते. तो सर्व पार्ट आत्म्यामध्ये टेपरेकॉर्डर सारखा भरलेला आहे. आधी या गोष्टी ऐकवत होते. बाबा म्हणतात - आता मी तुम्हाला रहस्यमय आणि मनोरंजक गोष्टी ऐकवतो. ज्या तुम्ही यापूर्वी जाणत नव्हता, त्या आता जाणता. नवीन-नवीन पॉइंट्स बुद्धीमध्ये येत जातात म्हणून इतरांनाही पटकन समजावून सांगू शकता. दिवसेंदिवस हे ब्राह्मणांचे झाड वाढत जात आहे. हेच मग दैवी झाड बनणार आहे, ब्राह्मणच वृद्धीला प्राप्त करतील. दिसायला किती छोटे दिसते. जसे जगाच्या नकाशामध्ये इंडिया पाहतात तर किती लहान दिसते. वास्तविक इंडिया किती मोठी आहे. तसेच ज्ञानासाठी म्हटले जाते - मनमनाभव अर्थात अल्फची आठवण करा. बीज किती लहान असते आणि त्यातून उगवणारे झाड किती विशाल निघते. तर हे ब्राह्मण कुळ देखील लहान आहे, वृद्धीला प्राप्त करत जाते. तुमच्या बुद्धीमध्ये आहे की आपण यावेळी ब्राह्मण आहोत, मग देवता बनणार आहोत. ८४ जन्मांची शिडी तर खूप सुंदर आहे. मुले यावर समजावून सांगू शकतात; जे ८४ जन्म घेतात तेच येऊन समजून घेतात, मग कोणी ८४ जन्म, कोणी ८० जन्म देखील घेत असतील. एवढे तर समजतात की, आपण या दैवी कुळातील आहोत. आपण सूर्यवंशी घराण्याचे बनू. जर नापास झाले तर मग उशिरा येतील. सगळेच काही एकत्र तर येणार नाहीत. भले भरपूर ज्ञान घेत राहतात परंतु एकत्र तर येणार नाहीत ना. जातील एकत्र, येतील थोडे-थोडे ही तर समजून घेण्याची गोष्ट आहे ना. सगळेच कसे काय एकत्र ८४ जन्म घेतील. बाबांना बोलावतातच मुळी यासाठी की ‘बाबा, पुन्हा एकदा येऊन गीतेचे ज्ञान ऐकवा’. तर हे सिद्ध होते की, जेव्हा महाभारत लढाई होते, त्याचवेळी येऊन गीतेचे ज्ञान ऐकवतात. त्यालाच राजयोग म्हटले जाते. आता तुम्ही राजयोग शिकत आहात. कल्प-कल्प, ५ हजार वर्षांनंतर बाबा आम्हाला येऊन ज्ञान देतात. सत्यनारायणाची कथा ऐकतात ना. ते कोठून आले, आणि मग गेले कोठे! काहीच जाणत नाहीत. बाबा समजावून सांगत आहेत - मुलांनो, ही जी रावणाची सावली पडली आहे, आता ड्रामा अनुसार रावण-राज्य नष्ट होणार आहे. सतयुगामध्ये आहे राम-राज्य आणि यावेळी आहे रावण-राज्य.

आता तुम्ही समजता की आपल्याकडे जे ज्ञान आहे ते या दुनियेमध्ये कोणाकडेच नाहीये. आपले हे नवीन शिक्षण आहे, नवीन दुनियेकरिता. गीतेमध्ये श्रीकृष्णाचे नाव लिहिले आहे, ती तर जुनी गोष्ट झाली ना. तुम्ही आता नवीन गोष्टी ऐकत आहात. म्हणतील - हे तर कधीच ऐकले नव्हते, शिव भगवानुवाच आम्ही तर श्रीकृष्ण भगवानुवाच ऐकत आलो होतो. तुम्ही नवीन दुनियेसाठी एव्हरीथिंग न्यू (प्रत्येक गोष्ट नवीन) ऐकता. हे सर्व जाणतात की, भारत प्राचीन आहे. परंतु कधी होता, या लक्ष्मी-नारायणाचे राज्य कसे चालले, यांनी कसे राज्य मिळवले आणि मग ते राज्य कुठे गेले, हे कोणाच्याही लक्षात येत नाही. असे काय घडले ज्यामुळे यांचे राज्य नष्ट झाले. कोणी विजय मिळवला, काहीही समजत नाहीत. ते लोक (दुनियावाले) तर सतयुगाचा कालावधी लाखो वर्षांचा असल्याचे मानतात. असे तर होऊ शकत नाही की, लक्ष्मी-नारायणाने लाखो वर्षे राज्य केले असेल. मग तर असंख्य सूर्यवंशी राजे होतील. असे कोणाचेही नाव तर आढळत नाही. १२५० वर्षांविषयी कोणालाही काहीच माहीती नाही; आणि मग लक्ष्मी-नारायणाचे राज्य कधीपर्यंत चालले, हे देखील कोणाला माहीती नाहीये तर मग लाखो वर्षांचे कोणाला कसे बरे माहीती होऊ शकते. कोणाचीही बुद्धी काम करत नाही. आता तुम्ही लहान मुले लगेच समजावून सांगू शकता. हे आहे अतिशय सोपे. भारताची कहाणी आहे, संपूर्ण स्टोरी आहे. सतयुग, त्रेतामध्ये देखील भारतवासी राजे होते. वेगवेगळी चित्रे देखील आहेत. इथे तर हजारो वर्षे म्हणतात; बाबा म्हणतात - ही आहेच मुळी ५ हजार वर्षांची कहाणी. आजपासून ५ हजार वर्षांपूर्वी लक्ष्मी-नारायणाचे राज्य होते, डिनायस्टी होती (घराणे होते), मग पुनर्जन्म घ्यावा लागतो. छोट्या मुलींनी फक्त एवढे जरी बसून समजावून सांगितले, तरी लोकांना असे वाटेल की, यांनी तर या ज्ञानाचा खूप चांगला अभ्यास केलेला आहे. हे स्पिरिच्युअल नॉलेज स्पिरिच्युअल फादर शिवाय इतर कोणाकडेही नाही. तुम्ही म्हणाल - आम्हाला देखील स्पिरिच्युअल फादरने येऊन हे ज्ञान दिले आहे. आत्मा शरीराद्वारे ऐकते. आत्माच म्हणेल की मी अमुक बनतो. मनुष्य स्वतःला ओळखत नाहीत. आमची ओळख आम्हाला बाबांनी करून दिली. आम्ही आत्मे पूर्ण ८४ जन्म घेतो. अशा प्रकारच्या गोष्टी बसून समजावून सांगितल्या तर म्हणतील यांना तर खूप चांगले नॉलेज आहे. गॉड नॉलेजफुल आहेत ना. गातात देखील - ‘गॉड इज नॉलेजफुल, ब्लिसफुल, लिबरेटर, गाइड’, परंतु कुठे घेऊन जाणार आहेत, हे कोणीही जाणत नाहीत. हे मुलेच समजावून सांगू शकतात. स्पिरिच्युअल फादर नॉलेजफुल आहेत, यांना ब्लिसफुल म्हटले जाते. लिबरेट तेव्हा येऊन करतात जेव्हा मनुष्य अत्यंत दुःखी असतात. रावणाचे एक राज्य आहे. म्हटले जाते - ‘हेवनली गॉडफादर’. हेलला (नरकाला) रावण राज्य म्हटले जाते. हे नॉलेज कोणाला बसून ऐकवा, लगेच म्हणतील की, येऊन हे सर्वांना ऐकवा. परंतु धारणा खूप चांगली पाहिजे. प्रदर्शनीच्या चित्रांचे एक मासिक देखील आहे, ते नीट समजून घ्याल तर या माध्यमातून खूप मोठी सेवा करू शकता.

ही मुलगी देखील (जयंती बहेन) लंडनमध्ये तिथे आपल्या टीचरला समजावून सांगू शकते. तिथे लंडनमध्ये आपण ही सेवा करू शकतो. दुनियेमध्ये ठगी खूप आहे ना. रावणाने एकदम सर्वांना ठग बनवून टाकले आहे. मुले साऱ्या दुनियेचा इतिहास-भूगोल समजावून सांगू शकतात. लक्ष्मी-नारायणाचे राज्य किती काळ चालले, मग अमुक संवत पासून इस्लामी, बौद्धी, ख्रिश्चन येतात. वृद्धी होत-होत व्हरायटी धर्मांचे झाड किती विशाल होत जाते. अर्ध्या कल्पा नंतर बाकीचे इतर धर्म येतात. अशा काही गोष्टी बसून ही (जयंतीबेन) ऐकवेल तर ऐकणारे हिला म्हणतील - ‘या तर स्पिरिच्युअल लीडर आहेत, यांच्याकडे स्पिरिच्युअल नॉलेज आहे’. ही (जयंतीबेन) मग म्हणेल - हे नॉलेज तर इंडियामध्ये मिळत आहे. स्पिरिच्युअल गॉड फादर हे नॉलेज देत आहेत. ते बीजरूप आहेत. हे उलटे झाड आहे. बीज आहे - नॉलेजफुल. बीजाला झाडाचे नॉलेज असणार ना. हे व्हरायटी रिलिजनचे (विविध धर्मांचे) झाड आहे. भारताचा डीटी रिलिजन (देवता धर्म) यांना म्हटले जाते. आधी लक्ष्मी-नारायणाचे राज्य, नंतर मग होते राम-सीतेचे राज्य. हे अर्धाकल्प चालते; त्यानंतर मग येतात इस्लामी... झाड वृद्धीला प्राप्त करत राहते. या मुलीने (जयंतीबेनने) जाऊन असे भाषण करावे आणि समजावून सांगावे की, हा वृक्ष कसा इमर्ज होतो. हे सृष्टी चक्र कसे फिरते, हे आम्ही समजावून सांगू शकतो. परदेशामध्ये तर दुसरे कोणीही नाही. या मुलीने जाऊन समजावून सांगावे की आता आयर्न एज्डचा (कलियुगाचा) अंत होत आहे, गोल्डन एज्ड (सतयुग) येणार आहे, हे ऐकून तर ते लोक खूप खूश होतील. बाबा युक्ती सांगत राहतात, यावर लक्ष दिले पाहिजे. लहान मुलांना खूप मान मिळेल. लहान मुले एखादे धाडसी काम करतात तर त्यांच्यावर खूप प्रेम करतात. बाबांना असे वाटते की अशा काही मुलांनी यामध्ये अटेंशन दिले तर स्पिरिच्युअल लीडर बनतील. स्पिरिच्युअल गॉड फादरच बसून नॉलेज देतात. श्रीकृष्णाला गॉड फादर म्हणणे चुकीचे आहे. गॉड तर आहेत निराकार. आपण सर्व आत्मे ब्रदर्स आहोत, ते पिता आहेत. सर्व आयर्न एज्डमध्ये जेव्हा दुःखी होतात, तेव्हा बाबा येतात. जेव्हा पुन्हा आयर्न एज्ड येते, तेव्हा बाबांना गोल्डन एज्ड स्थापन करण्यासाठी यावे लागते. भारत प्राचीन सुखधाम होता, हेवन होता. फार थोडे मनुष्य होते. बाकी इतके सर्व आत्मे कुठे होते. शांतीधाम मध्ये होते ना. तर असे समजावून सांगितले पाहिजे. यामध्ये घाबरण्यासारखे काहीच नाही, ही तर कहाणी आहे. कहाणी आनंदाने सांगितली जाते. जगाचा इतिहास-भूगोल कसा रिपीट होतो, त्याला कहाणी देखील म्हणू शकता, नॉलेज देखील म्हणू शकता. तुम्हाला तर ही कहाणी पक्की लक्षात राहिली पाहिजे. बाबा म्हणतात - माझ्या आत्म्यामध्ये संपूर्ण झाडाचे ज्ञान आहे जे मी रिपीट करतो. नॉलेजफुल बाबा मुलांना नॉलेज देत आहेत. ही (जयंतीबेन) जाऊन नॉलेज देईल तर म्हणतील - ‘तुम्ही इतरांनाही बोलवा’. तर बोला - ‘हो, आम्ही बोलावू शकतो’. कारण ते लोक जाणून घेऊ इच्छितात की, भारताचा प्राचीन राजयोग काय होता! ज्याद्वारे भारत स्वर्ग बनला, ते कोणीतरी आपल्याला सांगावे. आता संन्यासी काय ऐकवणार? स्पिरिच्युअल ज्ञान फक्त गीतेमध्ये आहे. तर ते जाऊन गीताच ऐकवतात. गीतेचे किती वाचन करतात, पाठांतर करत असतात. हे काय स्पिरिच्युअल नॉलेज आहे? ही तर मनुष्याच्या नावावर तयार केली गेली आहे. स्पिरिच्युअल नॉलेज तर मनुष्य देऊ शकत नाहीत. तुम्ही आता फरक समजता - त्या गीतेमध्ये आणि बाबा जे ऐकवतात त्यामध्ये दिवस-रात्री इतका फरक आहे. दिले परमपित्याने आणि नाव घातले आहे श्रीकृष्णाचे. सतयुगामध्ये श्रीकृष्णाला हे नॉलेजच नाहीये. नॉलेजफुल आहेतच फादर. किती विचित्र गोष्टी आहेत. श्रीकृष्णाची आत्मा जेव्हा सतयुगामध्ये होती तेव्हा तर नॉलेजच नाहीये. सूत किती गुंतलेले आहे. हे सर्व परदेशात जाऊन नाव गाजवू शकतात. भाषण करू शकता. बोला, ‘जगाच्या इतिहास-भूगोलाचे नॉलेज आम्ही तुम्हाला देऊ शकतो. गॉड, स्वर्ग कसा स्थापन करतात, तो स्वर्ग मग नरक कसा बनतो, ते आम्ही तुम्हाला समजावून सांगतो’. हे बसून लिहा, आणि मग चेक करा की, आपण कोणता पॉइंट विसरलो तर नाही ना. मग आठवून लिहा. अशी प्रॅक्टिस केल्याने खूप चांगले लिहाल, खूप छान समजावून सांगाल, तर नाव उज्ज्वल होईल. इथून देखील बाबा कोणाला बाहेर पाठवू शकतात. यांनी जाऊन समजावून सांगितले तरी देखील खूप चांगले आहे. ७ दिवसांत देखील खूप हुशार होऊ शकतात. बुद्धीमध्ये धारणा करायची आहे, बीज आणि झाडा विषयी, विस्तृत स्पष्टीकरण आहे. चित्रांवरून खूप चांगल्या प्रकारे समजावून सांगू शकता. सेवेची आवड असली पाहिजे. खूप उच्च पद मिळेल. नॉलेज खूप सोपे आहे. ही आहे जुनी छी-छी (घाणेरडी) दुनिया. स्वर्गापुढे ही जुनी दुनिया जणू शेणासारखी आहे, यातून दुर्गंधी येते. ती आहे सोन्याची दुनिया, ही आहे शेणाची दुनिया. तुम्ही मुले जाणता - आता आपण हे शरीर सोडून जाऊन प्रिन्स-प्रिन्सेस बनणार. अशा स्कुलमध्ये शिकायला जाऊ. तिथे अशी विमाने असतील, फुल प्रूफ असतील. हा आनंद जर मुलांच्या मनात राहिला तर कधीही कोणत्याही गोष्टीमध्ये रडू येणार नाही. तुम्ही समजता ना की, आपण प्रिन्स-प्रिन्सेस बनणार आहोत. तर तुम्हाला याचा का नाही आनंद झाला पाहिजे. भविष्यामध्ये आम्ही अशा शाळेत जाऊ, हे-हे करू. कळत नाही, मुले हे विसरून का जातात. खूप नशा चढला पाहिजे. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) या जुन्या घाणेरड्या शेणासारख्या दुनियेला बुद्धीने विसरून सतयुगी दुनियेची आठवण करून अपार आनंदात आणि नशेमध्ये राहायचे आहे. कधीही रडायचे नाही.

२) बाबा ज्या रहस्यमय मनोरंजक गोष्टी ऐकवतात त्या धारण करून सर्वांना समजावून सांगायच्या आहेत. ‘स्पिरिच्युअल लीडरचे’ टायटल प्राप्त करायचे आहे.

वरदान:-
‘स्वमाना’मध्ये स्थित राहून देह-अभिमानाला समाप्त करणारे सफलतामूर्त भव

जी मुले स्वमानामध्ये स्थित राहतात तीच बाबांच्या प्रत्येक आदेशाचे सहजच पालन करू शकतात. स्वमान, विविध प्रकारच्या देह-अभिमानाला समाप्त करून टाकतो. परंतु जेव्हा ‘स्वमाना’तून ‘स्व’ शब्द विसरायला होतो आणि ‘मान-शान’मध्ये येता, तेव्हा या एका शब्दाच्या चुकीमुळे अनेक चुका होऊ लागतात; त्यामुळे मेहनत जास्त आणि प्रत्यक्ष फळ कमी मिळते. परंतु सदैव स्वमानामध्ये स्थित राहा तेव्हाच पुरुषार्थ अथवा सेवेमध्ये सहजच सफलतामूर्त बनाल.

बोधवाक्य:-
तपस्या करायची असेल तर वेळेची बचत करा, बहाणे देऊ नका.

अव्यक्त इशारे - आता आपल्या ‘दाता’ स्वरूपाला प्रत्यक्ष करा.

जितके दाता बनता तितके वाढत जाते. भांडार जर भरपूर आहे तर का नाही दाता बनावे, यालाच म्हटले जाते - निरंतर रुहानी सेवाधारी. विश्व महाराजन् बनण्याकरिता फक्त ज्ञान-दाता बनायचे नाहीये. यासाठी स्नेह आणि सहयोग देखील द्यायचा आहे. जर ही हाय जम्प घ्याल, तर सर्व गोष्टींमध्ये सहजच श्रेष्ठ बनाल.