23-10-2026
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
“गोड मुलांनो, ब्लड
कनेक्शन मध्येच दुःख आहे, तुम्हाला त्याचा त्याग करून आपसामध्ये आत्मिक प्रेम
ठेवायचे आहे, हाच सुख आणि आनंदाचा आधार आहे”
प्रश्न:-
विजयीमाळेमध्ये
येण्यासाठी विशेष कोणता पुरुषार्थ असला पाहिजे?
उत्तर:-
विजयीमाळेमध्ये
यायचे असेल तर विशेष होली (पवित्र) बनण्याचा पुरुषार्थ करा. जेव्हा पक्के संन्यासी
अर्थात निर्विकारी बनाल, तेव्हा विजयीमाळेचा मणी बनाल. कोणताही कर्मबंधनाचा हिशोब
बाकी असेल तर वारसदार बनू शकणार नाही, प्रजेमध्ये जाल.
गीत:-
महफिल में जल
उठी शमा परवानों के लिए...
ओम शांती।
बघा, आपण
आपल्या बाबांचीच महिमा करतो. मी आत्मा जरूर आपल्या फादरचा शो करेन ना. सन शोज फादर.
तर, ‘मी आत्मा’, तुम्ही देखील म्हणाल - ‘आम्ही आत्मे’, आम्हा सर्वांचा फादर एक
परमात्मा आहे जो सर्वांचा पिता आहे; हे तर सर्व मानतील. असे म्हणणार नाहीत की, आम्हा
आत्म्यांचा फादर वेगवेगळा आहे. फादर सर्वांचा एकच आहे. आता आपण त्यांची मुले
असल्यामुळे त्यांच्या ऑक्युपेशनला जाणतो. आपण असे म्हणू शकत नाही की परमात्मा
सर्वव्यापी आहे. मग तर सर्वांमध्ये परमात्मा होईल. फादरची आठवण करून मुले खुश होतात
कारण जे काही फादरकडे असते त्याचा वारसा मुलाला मिळतो. आता आपण परमात्म्याचे
वारसदार आहोत, त्यांच्याकडे काय आहे? ते आनंदाचा सागर आहेत, ज्ञानाचा सागर आहेत,
प्रेमाचा सागर आहेत. आपल्याला माहीत आहे, तेव्हाच तर आपण त्यांची महिमा करतो. दुसरे
कोणी असे म्हणणार नाहीत. कोणी म्हणतात देखील, परंतु ते कसे आहेत, हे तर त्यांना
माहीतच नाहीये. बाकीचे तर सर्व जण म्हणतात - परमात्मा सर्वव्यापी आहे. परंतु आपण
त्यांची मुले आहोत, म्हणून आपल्या निराकार इमॉर्टल (अमर) बाबांची महिमा वर्णन करतो
की, ते आनंदाचा सागर, ज्ञानाचा सागर, प्रेमाचा भंडार आहेत. परंतु कोणी प्रश्न
विचारेल की, ‘तुम्ही म्हणता की तिथे इन्कॉर्पोरियल वर्ल्डमध्ये (निराकारी
दुनियेमध्ये) तर सुख-दुःखा पासून न्यारी अवस्था असते. मग तिथे सुख अथवा आनंद अथवा
प्रेम कुठून आले?’ आता या समजून घेण्याच्या गोष्टी आहेत. हा जो आनंद, सुख अथवा
प्रेम म्हणता, ती तर झाली सुखाची अवस्था, परंतु तिथे शांतीच्या देशामध्ये आनंद,
प्रेम अथवा ज्ञान कुठून आले? ते सुखाचे सागर जेव्हा या साकार सृष्टीमध्ये येतात,
तेव्हा येऊन सुख देतात. तिथे तर दुःख-सुखा पासून न्याऱ्या अवस्थेमध्ये राहतात कारण
तुम्हाला सांगितले गेले आहे की, एक आहे - दुःख-सुखा पासून न्यारी दुनिया, ज्याला
इन्कॉर्पोरियल वर्ल्ड (निराकारी दुनिया) म्हटले जाते. दुसरी आहे - सुखाची दुनिया,
जिथे सदैव सुख, आनंद असतो, ज्याला स्वर्ग म्हटले जाते आणि ही आहे दुःखाची दुनिया
ज्याला नरक अथवा आयर्न एज्ड वर्ल्ड (कलियुगी दुनिया) म्हटले जाते. आता या आयर्न
एज्ड वर्ल्डला परमपिता परमात्मा जे सुखाचे सागर आहेत, ते येऊन बदलून आनंद, सुख आणि
प्रेमाचा, भंडार बनवतात. जिथे सुखच सुख आहे. प्रेमच प्रेम आहे. तिथे प्राण्यांमध्ये
देखील खूप प्रेम असते. वाघ आणि गाय देखील एकत्र पाणी पितात, इतके त्यांच्यामध्ये
प्रेम असते. तर परमात्मा येऊन आमची जी राजधानी स्थापन करतात, त्यामध्ये सुख आणि
आनंद आहे. बाकी इन्कॉर्पोरियल दुनियेमध्ये (निराकारी दुनियेमध्ये) तर सुख-आनंदाची
गोष्टच नाही, प्रेमाची गोष्टच नाही. ते तर इन्कॉर्पोरियल आत्म्यांचे (निराकारी
आत्म्यांचे) निवास स्थान आहे. ती आहे सर्वांची ‘रिटायर्ड लाइफ’ अथवा ‘निर्वाण’
अवस्था. जिथे सुख-दुःखाची कोणतीही फीलिंग राहत नाही. सुख-दुःखाचा पार्ट तर या
कॉर्पोरियल वर्ल्डमध्ये (साकारी दुनियेमध्ये) चालतो. याच सृष्टीवर जेव्हा स्वर्ग
असतो तेव्हा इटरनल आत्मिक लव (शाश्वत आत्मिक प्रेम) असते; आणि दुःख आहे - ब्लड
कनेक्शनमध्ये (रक्ताच्या नात्यामध्ये). संन्याशी लोकांचे देखील ब्लड कनेक्शन नसते,
त्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये देखील कोणतीही दुःखाची भावना नसते. ते तर म्हणतात -
‘मी सत्-चित्-आनंद स्वरूप आहे’; कारण ब्लड कनेक्शनचा (रक्ताच्या नात्याचा) त्याग
करतात. तसे तुमचे देखील इथे कोणतेही ब्लड कनेक्शन (रक्ताचे नाते) नाहीये. इथे आम्हा
सर्वांचे आत्मिक प्रेम आहे, जे परमात्मा शिकवतात.
बाबा म्हणतात - ‘यू
आर माय बिलवेड सन्स’ (‘तुम्ही माझी लाडकी मुले आहात’). माझे प्रेम, आनंद, सुख
सर्वकाही तुमचे आहे, कारण तुम्ही ती दुनिया सोडून येऊन माझे दत्तक पुत्र बनला आहात.
ते देखील तुम्ही प्रॅक्टिकल लाइफमध्ये येऊन माझ्या गोदमध्ये बसला आहात. असे नाही की
बाकी जे संन्यास घेऊन आपल्या गुरुकडे दत्तक जातात तेच बिलवेड सन बनतात; कारण तेच
गुरूच्या मागे गादीवर बसतात. संतान आणि प्रजेमध्ये दिवस-रात्री इतका फरक असतो. ते
वारसदार बनून वारसा घेतात. जसे तुम्ही आपल्या आप्तेष्टांशी असलेले रक्ताचे नाते
तोडून, या निराकार अथवा साकाराकडे येऊन दत्तक पुत्र बनला आहात तर वारसदार बनला आहात.
मग इथे देखील जितके तुम्ही ज्ञान घ्याल ते आहे - ब्लिस (परम आनंद). शिक्षणाला ब्लिस
म्हटले जाते, तर जितके हे शिकाल तितके त्या राजधानीमध्ये प्रजेमध्ये सुख उपभोगाल.
हे गॉडली एज्युकेशन ब्लिस आहे ना (हे ईश्वरीय ज्ञान एक परम आनंद आहे ना), ज्याद्वारे
सुप्रीम पीस अँड हॅपीनेस मिळतो (परम शांती आणि आनंद मिळतो). हे अटल, अखंड
सुख-शांतीमय स्वराज्य ही गॉडची प्रॉपर्टी (ईश्वरीय मालमत्ता) आहे, जी मुलांना मिळते.
मग जितके जे ज्ञान घेतील, तितका बाबांचा वारसा मिळेल. जसे तुमच्याकडे इतके जिज्ञासू
येतात, ती आहे तुमची ‘बिलवेड प्रजा’ (लाडकी प्रजा), ती तुमची मुले नाहीत. कारण
येत-जात राहतात, मुले देखील असू शकतात कारण प्रजेमधून काही तर वारसदार देखील बनतात.
ज्ञान घेता-घेता जेव्हा पाहतात की इथे तर अथाह सुख आणि शांती आहे, त्या दुनियेमध्ये
तर दुःख आहे, त्यामुळे येऊन दत्तक पुत्र बनतात. लगेचच काही कोणी मूल बनत नाही.
तुम्ही देखील सुरुवातीला येत-जात होता, आणि मग ऐकता-ऐकता इथेच राहिलात, तर वारसदार
बनला. संन्याशांकडे देखील असेच होते. ऐकता-ऐकता जेव्हा वाटते की संन्यास घेण्यामध्ये
शांती-सुख आहे तर संन्यास घेतात. इथे देखील जेव्हा ती टेस्ट येते तेव्हा बिलवेड सन
बनतात आणि जन्मजन्मांतरासाठी वारसा मिळतो. ते मग दैवी सिजऱ्यामध्ये (दैवी कुळामध्ये)
येत जातात. प्रजा तर सोबत राहत नाही, ती तर जिथे कुठे कर्मबंधन असेल तिथे निघून जाते.
जसे गाण्यामध्ये
म्हणतात - ‘महफिल में जल उठी शमा परवानों के लिए’. तर परवाने देखील शमेवर डान्स
करता-करता मरून जातात. कोणी फेरी मारून निघून जातात. हे तन (ब्रह्मा बाबांचे शरीर)
देखील एक शमा आहे (दिवा आहे) ज्यामध्ये ऑलमाइटी बाबांची प्रवेशता झालेली आहे. तुम्ही
परवाने (पतंग) बनून आलात, ये-जा करता-करता शेवटी जेव्हा रहस्य समजले तेव्हा इथेच
थांबलात. येतात तर हजारो-लाखो, तुमच्या द्वारे देखील ऐकत राहतात. ते तर जितके ऐकतील
तितके पीस आणि ब्लिसचे (शांतीचे आणि आनंदाचे) वरदान घेत जातील; कारण या इमॉर्टल
फादरच्या (अमर पित्याच्या) ज्ञानाचा विनाश तर होत नाही. याला म्हटले जाते - अविनाशी
ज्ञान धन. त्याचा कधीही विनाश होत नाही. तर थोडे-फार जरी ऐकले तरी ते प्रजेमध्ये
जरूर येतील. तिथे तर प्रजा देखील अतिशय सुखी असते. इटरनल ब्लिस (शाश्वत आनंद) आहे;
कारण तिथे सर्वजण सोल कॉन्शस असतात (आत्म-अभिमानी असतात). इथे बॉडी-कॉन्सस (देह-अभिमानी)
बनले आहेत त्यामुळे दुःखी आहेत. तिथे तर आहेच स्वर्ग, तिथे दुःखाचे नामोनिशाण सुद्धा
नसते. प्राणीच किती सुख-शांतीमध्ये राहतात तर प्रजेमध्ये किती प्रेम आणि सुख असेल.
हे तर खरे आहे की सगळेच काही वारसदार बनत नाहीत. इथे तर १०८ पक्के संन्यासी
विजयीमाळेचे मणी बनणार आहेत. ते देखील अजून बनलेले नाहीत, बनत आहेत. तसेच प्रजा
देखील बनत आहे. ते देखील बाहेर राहून (घरी राहून) ऐकत राहतात. घरी बसून योग लावत
आहेत. योग लावता-लावता कोणी मग आत येतात (सेंटरवर राहू लागतात) तर प्रजेमधून
वारसदार बनतात. ते जोपर्यंत काही कर्मबंधनाचा हिशोब आहे तोपर्यंत काहीजण बाहेर
राहून योग लावत, निर्विकारी बनून राहू लागतात. तर घरी राहून जे निर्विकारी राहतात
तर घरामध्ये जरूर भांडण होईल कारण ‘कामेषु क्रोधेषु…’ कामविकार या महाशत्रूवर जेव्हा
तुम्ही विजय मिळवता, विष देणे बंद करता तेव्हा भांडण होते.
बाबा म्हणतात -
मुलांनो, मृत्यू समोर उभा आहे. संपूर्ण दुनियेचा विनाश होणार आहे. जसे वृद्ध
व्यक्तींना सांगतात - मृत्यू समोर आहे, परमात्म्याची आठवण करा. बाबा देखील म्हणतात
- ‘मुलांनो, निर्विकारी बना. परमात्म्याची आठवण करा’. जसे तीर्थयात्रेला जातात
तेव्हा काम-क्रोध सर्व बंद करतात. यात्रेवर असताना कामविकारामध्ये जाण्याचा थोडाच
प्रयत्न करतील. ते तर संपूर्ण रस्ता ‘अमरनाथाचा जयजयकार असो’ असे म्हणत जातात, परंतु
परत येतात तेव्हा पुन्हा त्याच विकारांमध्ये गटांगळ्या खात राहतात; तुम्हाला काही
परत यायचे नाहीये. काम, क्रोधामध्ये यायचे नाही. विकारांमध्ये जाल तर पद भ्रष्ट
होईल. होलीनेस (पवित्र) बनू शकणार नाही. जे होली (पवित्र) बनतील ते विजयीमाळेमध्ये
येतील. जे फेल होतील ते चंद्रवंशी घराण्यामध्ये जातील.
हे तुम्हा सर्वांना
परमपिता परमात्मा बसून शिकवत आहेत. तेच ज्ञानाचा सागर आहेत ना. तिथे इन्कॉर्पोरियल
दुनियेमध्ये तर बसून आत्म्यांना ज्ञान ऐकवणार नाहीत. इथे येऊन तुम्हाला ज्ञान
ऐकवतात. म्हणतात तुम्ही माझी मुले आहात. जसा मी प्युअर (शुद्ध) आहे तसे तुम्ही
देखील प्युअर बना. तेव्हा मग तुम्ही सतयुगामध्ये सुखमय, प्रेममय राज्य कराल, ज्याला
वैकुंठ म्हटले जाते. आता ही दुनिया बदलत आहे कारण आयर्न एज्ड पासून गोल्डन एज्ड बनत
आहे. मग गोल्डन एज्ड पासून सिल्वर एज्डमध्ये बदलेल. सिल्वर एज्ड पासून कॉपर एज्ड,
मग कॉपर एज्ड पासून आयर्न एज्डमध्ये बदलत जाईल. अशा प्रकारे दुनिया बदलत राहते. तर
आता ही दुनिया बदलत आहे. कोण बदलत आहेत? गॉड हिमसेल्फ (स्वयं भगवान), ज्यांची तुम्ही
बिलवेड मुले बनला आहात. प्रजा देखील बनत आहे परंतु मुले, मुले आहेत, प्रजा, प्रजा
आहे. जे संन्यास करतात ते वारसदार बनतात. त्यांना रॉयल घराण्यामध्ये जरूर घेऊन जायचे
आहे. परंतु त्यांनी जर पुरेसे ज्ञान संपादन केले नाही तर त्यांना पद मिळणार नाही.
जो शिकेल तो नवाब बनेल. जे येत-जात राहतात ते मग प्रजेमध्ये येतील. आणि मग जितके
होली (पवित्र) बनाल तितके सुख मिळेल. बिलवेड तर ते देखील बनतात परंतु फुल बिलवेड
तेव्हा बनतात जेव्हा मूल बनतात. समजले.
संन्यासी देखील विविध
प्रकारचे असतात. एक असतात जे घरदार सोडून निघून जातात, दुसरे मग असे देखील असतात जे
गृहस्थीमध्ये राहून विकारामध्ये जात नाहीत. ते फॉलोअर्सना बसून शास्त्र इत्यादी
ऐकवतात. आत्म्याचे ज्ञान देतात, त्यांचे देखील शिष्य असतात. परंतु त्यांचे शिष्य
त्यांचे बिलवेड सन (लाडकी मुले) बनू शकत नाहीत कारण त्यांना तर स्वतःचा संसार आणि
मुले-बाळे असतात. तर ते त्यांना आपल्या सोबत ठेऊ शकत नाहीत. ना स्वतः संन्यास केलेला
आहे, ना इतरांना संन्यास करवू शकतात. त्यांचे शिष्य देखील गृहस्थीमध्ये राहतात.
त्यांच्याकडे येत-जात राहतात. ते फक्त त्यांना ज्ञान देत राहतात अथवा मंत्र देतात.
बस्स. आता त्यांचे वारसदार तर बनले नाहीत; मग त्यांची वृद्धी कशी होईल? बस्स, ज्ञान
देता-देता शरीर सोडून निघून जातात.
बघा, एक माळ आहे १०८
ची, दुसरी मग त्यापेक्षा मोठी १६,१०८ ची माळ असते. ती आहे चंद्रवंशी घराण्यातील
रॉयल प्रिन्स-प्रिन्सेसची माळा. तर इथे जे फारसे ज्ञान आत्मसात करू शकत नाहीत,
प्युरिफाय (पावन) बनत नाहीत ते शिक्षा भोगून चंद्रवंशी घराण्याच्या माळेमध्ये येतील.
प्रिन्स-प्रिन्सेस तर खूप असतात.
हे रहस्य देखील तुम्ही
आता ऐकता, जाणता. तिथे या ज्ञानाच्या गोष्टी राहत नाहीत. हे ज्ञान तर फक्त आता
संगमावर मिळते जेव्हा दैवी धर्माची स्थापना होत आहे. तर, तुम्हाला सांगितले होते
की, जे कर्मेंद्रियांना पूर्णपणे जिंकणार नाहीत ते चंद्रवंशी घराण्याच्या माळेमध्ये
जातील, जे जिंकतील ते सूर्यवंशी घराण्यामध्ये येतील. त्यांच्यामध्ये देखील जरूर
नंबरवार बनतात. शरीर देखील अवस्थे नुसार मिळते. पहा, मम्मा सर्वात वेगाने पुढे
गेल्या आहेत त्यामुळे त्यांना स्कॉलरशिप मिळाली आहे. मॉनिटर बनल्या. ब्रह्मा बाबा
म्हणाले - ‘त्यांना संपूर्ण ज्ञानाचा कलश दिला आहे, त्यांना मी देखील ‘माता’ म्हणतो,
कारण मी देखील संपूर्ण तन-मन-धन त्यांच्या चरणांमध्ये स्वाहा केले, लौकिक मुलांना
दिले नाही कारण ते तर ब्लड कनेक्शन (रक्ताचे नाते) झाले’. ही तर इटरनल मुले (शाश्वत
मुले) बनतात; सर्व जण संन्यास करून येतात म्हणून त्यांच्याविषयी जास्त प्रेम वाटते.
इटरनल लव (शाश्वत प्रेम) तर सर्वांत गहिरे असते. संन्यासी तर एकटे घरदार सोडून पळून
जातात. इथे तर सर्व काही घेऊन येऊन स्वाहा केले आहे. परमात्मा स्वतः प्रॅक्टिकलमध्ये
ॲक्ट करून दाखवतात.
तुम्हाला कोणत्याही
प्रश्नाचे उत्तर इथे मिळू शकते. ते परमात्मा स्वतः देखील येऊन सांगू शकतात. ते तर
जादूगार आहेत, त्यांचा हा जादूगाराचा पार्ट आता चालू आहे. तुम्ही तर खूप लाडकी मुले
आहात, बाबा तुम्हाला कधी खफा (नाराज) करू शकत नाहीत. नाराज केले तर मुले देखील राग
करायला शिकतील. इथे तर सर्वांचे आंतरिक प्रेम आहे. स्वर्गामध्ये देखील किती प्रेम
असते. तिथे तर सतोप्रधान असतात.
इथे जे व्हीजिटर्स
येतात त्यांची देखील खूप सेवा होते कारण त्यांच्यावर देखील पीस आणि हॅपीनेसची (शांती
आणि आनंदाची) वर्षा होते. ते बिलवेड प्रजा बनणारे आहेत. माता-पिता, मुले सर्व
त्यांच्या सेवेला लागतात. भले देवी-देवता बनत आहेत परंतु इथे त्या पदाचा अहंकार
राहत नाही. सर्व जण ओबीडियंट सर्व्हंट (आज्ञाधारक सेवक) बनून सेवेमध्ये हजर होतात.
गॉड देखील ओबीडियन्ट सर्वेन्ट बनून आपल्या लाडक्या मुलांची आणि प्रजेची सेवा करतात.
ते आपल्या मुलांवरच ब्लिसचा (परमानंदाचा) वर्षाव करतात. अच्छा!
गोड-गोड सिकिलधे नुरे
रत्न, कल्प-कल्पाची दुरावलेली मुले जी पुन्हा आता भेटली आहेत, अशा मुलांप्रती
मात-पिता बापदादांची अंतःकरणापासून, उत्कटपणे प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१) जसे बापदादा
मुलांना कधीही खफा (नाराज) करत नाहीत, असेच तुम्हा मुलांनी देखील कोणालाही नाराज
करायचे नाही, आपसामध्ये आंतरिक प्रेमाने राहायचे आहे. कधीही राग करायचा नाही.
२) पीस आणि ब्लिसचे (शांतीचे
आणि परमानंदाचे) वरदान घेण्यासाठी शमेवर पूर्णपणे फिदा व्हायचे आहे. शिक्षणाद्वारे
सुप्रीम पीस आणि हॅपीनेसचा (परम शांती आणि आनंदाचा) ईश्वरीय अधिकार घ्यायचा आहे.
वरदान:-
आपल्या
प्रत्यक्ष प्रमाणाद्वारे बाबांना प्रत्यक्ष करणारे श्रेष्ठ तकदीरवान भव
कोणतीही गोष्ट स्पष्ट
करण्यासाठी विविध प्रकारचे प्रमाण (पुरावे) दिले जातात. परंतु सर्वांत श्रेष्ठ
प्रमाण आहे, प्रत्यक्ष प्रमाण. प्रत्यक्ष प्रमाण अर्थात जे आहात, ज्यांचे आहात
त्यांच्या आठवणीमध्ये राहणे. जी मुले आपल्या यथार्थ अथवा अनादि स्वरूपामध्ये स्थित
राहतात तीच बाबांना प्रत्यक्ष करण्यासाठी निमित्त आहेत. त्यांच्या भाग्याला पाहून
भाग्य बनविणाऱ्याची आपोआप आठवण येते.
बोधवाक्य:-
आपल्या दयेच्या
दृष्टीद्वारे प्रत्येक आत्म्याला परिवर्तन करणारेच पुण्य-आत्मा आहेत.
हे अव्यक्त इशारे -
परोपकाराच्या भावनेने संपन्न बनून अपकारीवर देखील उपकार करा.
कोणी आपल्या
संस्कारामुळे अथवा स्वभावामुळे तुमच्या समोर परीक्षेच्या रूपामध्ये आले, तरी तुम्ही
एका सेकंदामध्ये आपल्या श्रेष्ठ संस्कारा द्वारे, एकाच्या स्मृतीद्वारे अशा
आत्म्याप्रति देखील दयाळूपणाचा संस्कार अथवा स्वभाव धारण करा - हेच उपकार करणे आहे.