24-02-2026      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - तुम्ही आपल्या जीवनाची दोरी एका बाबांसोबत बांधली आहे, तुमचे कनेक्शन एकाशीच आहे, एकाशीच तोड निभावायची आहे”

प्रश्न:-
संगमयुगामध्ये आत्मा आपली दोरी परमात्म्या सोबत जोडते, हा रिवाज अज्ञान काळामध्ये कोणत्या पद्धतीने चालत आला आहे?

उत्तर:-
लग्नाच्या वेळी पत्नीचा पदर पतीसोबत बांधतात. पत्नी असे समजते की आयुष्यभर त्याचीच सोबतीण होऊन राहायचे आहे. तुम्ही तर आता तुमचा पदर बाबांसोबत बांधला आहे. तुम्ही जाणता की अर्ध्याकल्पासाठी आपले संगोपन बाबांकडून होईल.

गीत:-
जीवन डोर तुम्हीं संग बांधी…

ओम शांती।
बघा, गाण्यामध्ये म्हणतात - जीवनाची दोरी तुमच्यासोबत बांधली आहे. जशी एखादी कन्या आहे, ती आपल्या जीवनाची दोरी पतीसोबत बांधते. समजते की आयुष्यभर त्या पतीचीच सोबतीण बनून राहायचे आहे. त्यालाच तिचे संगोपन करायचे आहे. असे नाही की, कन्येला त्याचे (पतीचे) संगोपन करायचे आहे. नाही, आयुष्यभर पतिलाच पत्नीचे संगोपन करायचे आहे. तुम्हा मुलांनी देखील जीवनाची दोरी बांधली आहे. बेहदचे बाबा म्हणा, टीचर म्हणा, गुरू म्हणा… ही आत्म्यांच्या जीवनाची दोरी परमात्म्या सोबत बांधण्याची गोष्ट आहे. ती आहे हदची स्थूल गोष्ट, ही आहे सूक्ष्म गोष्ट. कन्येच्या जीवनाची दोरी पतीसोबत बांधली जाते. ती त्याच्या घरी जाते. आता बघा, प्रत्येक गोष्ट समजून घेण्याची बुद्धी पाहिजे. कलियुगामध्ये साऱ्या आहेत आसुरी मताच्या गोष्टी. तुम्ही जाणता आपण जीवनाची दोरी एका सोबत बांधली आहे. तुमचे कनेक्शन एका सोबत आहे. एकाशीच तोड निभावायची आहे कारण त्यांच्याकडून आपल्याला फार चांगले सुख मिळते. ते तर आपल्याला स्वर्गाचा मालक बनवतात. तर अशा बाबांच्या श्रीमतावर चालले पाहिजे. ही आहे रूहानी दोरी. आत्माच श्रीमत घेते. आसुरी मत घेतल्याने तर खाली घसरला आहात (पतन झाले आहे). आता रूहानी बाबांच्या श्रीमतावर चालले पाहिजे.

तुम्ही जाणता की आपण आपल्या आत्म्याची दोरी परमात्म्या सोबत बांधतो, तर आपल्याला त्यांच्याकडून २१ जन्मांसाठी सदैव सुखाचा वारसा मिळतो. त्या अल्पकालीन जीवनाच्या दोरीने तर खाली घसरत आले आहेत (पतित बनत आले आहेत). या परमात्म्याशी बांधलेल्या दोरीची तर २१ जन्मांसाठीची गॅरंटी आहे. तुमची कमाई किती जबरदस्त आहे, यामध्ये कधीही चूक करता कामा नये. माया खूप चुका करायला लावते. या लक्ष्मी-नारायणाने जरूर कोणाशी तरी जीवनाची दोरी बांधली आहे ज्यामुळे त्यांना २१ जन्मांचा वारसा मिळाला. तुम्हा आत्म्यांची परमात्म्याशी जीवनाची दोरी कल्प-कल्प बांधली जाते. त्यांची तर गणतीच नाही. बुद्धीमध्ये पक्के होते - आपण शिवबाबांचे बनलो आहोत, त्यांच्यासोबत जीवनाची दोरी बांधली आहे. प्रत्येक गोष्ट बाबा बसून समजावून सांगतात. तुम्ही जाणता कल्पापूर्वी देखील जीवनाची दोरी बांधली होती. आता शिवजयंती साजरी करतात परंतु कोणाची साजरी करतात हेच माहीत नाही आहे. शिवबाबा जे पतित-पावन आहेत, ते जरूर संगमावरच येतील - हे तुम्ही जाणता, परंतु दुनिया जाणत नाही, यासाठीच गायले गेले आहे - कोटींमध्ये कोणी. आदि सनातन देवी-देवता धर्म प्रायः लोप झाला आहे आणि बाकी सर्व शास्त्रे, कथा-कहाण्या इत्यादी राहिल्या आहेत. हा धर्मच उरलेला नाही तर मग कळणार तरी कसे? आता तुम्ही जीवनाची दोरी बांधत आहात. आत्म्यांची परमात्म्याशी दोरी जोडलेली आहे; यामध्ये शरीराची कोणती गोष्ट नाहीये. भले घरी बसून रहा, बुद्धीने आठवण करायची आहे. तुम्हा आत्म्यांच्या जीवनाची दोरी बांधली गेली आहे. जसा शेला-पदराची गाठ बांधतात ना. तो स्थूल पदर आहे, हा आहे आत्म्यांचा परमात्म्याशी योग. भारतामध्ये शिवजयंती देखील साजरी करतात, परंतु ते कधी आले होते, हे मात्र कोणालाच ठाऊक नाहीये. श्रीकृष्णाची जयंती कधी असते, रामाची जयंती कधी असते, हेच जाणत नाहीत. तुम्ही मुले “त्रिमूर्ती शिवजयंती” असे शब्द लिहिता, परंतु या वेळी तीन मूर्त्या काही नाही आहेत. तुम्ही म्हणाल - शिवबाबा ब्रह्माद्वारे सृष्टी रचतात, तर ब्रह्मा जरूर साकारमध्ये पाहिजे ना. मग विष्णु आणि शंकर यावेळी कुठे आहेत, ज्यासाठी तुम्ही त्रिमूर्ती म्हणता. या गोष्टी नीट समजून घेण्यासारख्या आहेत. त्रिमूर्तीचा अर्थच ब्रह्मा-विष्णु-शंकर असा आहे. ब्रह्माद्वारे स्थापना, ती तर यावेळी होत आहे. विष्णुद्वारा सतयुगामध्ये पालना होईल. विनाशाचे कार्य शेवटी होणार आहे. हा आदि सनातन देवी-देवता धर्म भारताचा एकच आहे. ते सर्व (धर्म स्थापक) तर येतात धर्म स्थापन करण्यासाठी. प्रत्येकजण जाणतो की, हा-हा धर्म स्थापन केला, त्यांचे संवत हे आहे. अमक्या वेळी अमका धर्म स्थापन केला. परंतु भारताविषयी कोणालाच ठाऊक नाहीये. गीता जयंती कधी झाली, शिवजयंती कधी झाली, कोणालाच ठाऊक नाही. श्रीकृष्ण आणि राधेच्या वयामध्ये २-३ वर्षांचा फरक असणार. सतयुगामध्ये जरूर पहिला श्रीकृष्णाने जन्म घेतला असेल, नंतर राधेने. परंतु सतयुग कधी होते, हे कोणालाच माहीत नाही आहे. तुम्हाला देखील हे समजण्यासाठी बरीच वर्षे लागली आहेत, तर मग दोन दिवसांत इतर कोणाला समजणार तरी कितीसे. बाबा तर खूप सोपे करून सांगतात. ते आहेत बेहदचे बाबा, तर जरूर त्यांच्याकडून सर्वांना वारसा मिळाला पाहिजे ना. ‘ओ गॉड फादर’ असे म्हणून आठवण करतात. लक्ष्मी-नारायणाचे मंदिर आहे. ते स्वर्गामध्ये राज्य करत होते, परंतु त्यांना हा वारसा कोणी दिला? जरूर जो स्वर्गाच्या रचयित्याने दिला असेल. परंतु केव्हा आणि कसा दिला, ते मात्र कोणीही जाणत नाहीत. तुम्ही मुले जाणता जेव्हा सतयुग होते तेव्हा इतर कोणताही धर्म नव्हता. सतयुगामध्ये आपण पवित्र होतो, कलियुगामध्ये आपण पतित आहोत. तर संगमावर ज्ञान दिले असेल, सतयुगामध्ये नाही. तिथे तर प्रारब्ध आहे. जरूर आधीच्या जन्मामध्ये ज्ञान घेतले असेल. तुम्ही देखील आता घेत आहात. तुम्ही जाणता आदि सनातन देवी-देवता धर्माची स्थापना बाबाच करतील. श्रीकृष्ण तर सतयुगामध्ये होता, त्याला हे प्रारब्ध कुठून मिळाले? लक्ष्मी-नारायणच राधा-कृष्ण होते, हे कोणीही जाणत नाही. बाबा म्हणतात - ज्यांना कल्पापूर्वी समजले होते त्यांनाच समजेल. हे सैपलिंग (कलम) लागत आहे. मोस्ट स्वीटेस्ट झाडाचे कलम लागते. तुम्ही जाणता आज पासून ५००० वर्षांपूर्वी बाबांनी येऊन आपल्याला मनुष्यापासून देवता बनवले होते. आता तुम्ही ट्रान्सफर होत आहात. प्रथम ब्राह्मण बनायचे आहे. बाजोली खेळतात (कोलांट्या उडीचा खेळ खेळतात) तेव्हा शेंडी जरूर वर येईल. बरोबर आता आपण ब्राह्मण बनत आहोत. यज्ञामध्ये तर ब्राह्मण जरूर पाहिजेत. हा शिवाचा अथवा रुद्रचा यज्ञ आहे. ‘रुद्र ज्ञान यज्ञ’ असेच म्हटले जाते. श्रीकृष्णाने यज्ञ रचलेला नाहीये. या रुद्र ज्ञान यज्ञामधून विनाश ज्वाळा प्रज्वलित होते. हा शिवबाबांचा यज्ञ पतितांना पावन बनविण्यासाठी आहे. रुद्र शिवबाबा निराकार आहेत, ते जोपर्यंत मनुष्यतनामध्ये येत नाहीत तोपर्यंत यज्ञ कसे रचतील. मनुष्यच यज्ञ रचतात. सूक्ष्म अथवा मूलवतनमध्ये या गोष्टी असत नाहीत. बाबा समजावून सांगतात - हे संगमयुग आहे. जेव्हा लक्ष्मी-नारायणाचे राज्य होते तर सतयुग होते. आता पुन्हा तुम्ही असे बनत आहात. या जीवनाची दोरी आत्म्यांची परमात्म्या सोबत आहे. ही दोरी का बांधली आहे? कायम सुखाचा वारसा मिळविण्यासाठी. तुम्ही जाणता बेहदच्या बाबांद्वारे आपण असे लक्ष्मी-नारायण बनत आहोत. बाबांनी समजावून सांगितले आहे तुम्ही सो देवी-देवता धर्माचे होता. तुमचे राज्य होते. नंतर तुम्ही पुनर्जन्म घेत-घेत क्षत्रिय धर्मामध्ये आलात. सूर्यवंशींचे राज्य संपुष्टात आले आणि मग चंद्रवंशी आले. तुम्हाला ठाऊक आहे की, आपण हे चक्र कसे फिरतो. इतके-इतके जन्म घेतले. भगवानुवाच - ‘माझ्या मुलांनो, तुम्ही आपल्या जन्मांना जाणत नाही, मी जाणतो’. आता यावेळी या तनामध्ये दोन मूर्ती आहेत. ब्रह्माची आत्मा आणि शिव परम-आत्मा. यावेळेस दोन मूर्ती एकत्र आहेत - ब्रह्मा आणि शिव. शंकर तर कधी पार्टमध्ये येतच नाही. बाकी विष्णू सतयुगामध्ये आहे. आता तुम्ही ब्राह्मण सो देवता बनणार आहात. खरे तर ‘हम सो’ चा अर्थ हा आहे. त्यांनी (लोकांनी) मग म्हटले आहे - आत्मा सो परमात्मा, परमात्मा सो आत्मा. किती फरक आहे. रावणाच्या येण्यानेच रावणाचे मत सुरु झाले. सतयुगामध्ये तर हे ज्ञानच प्राय: लोप होईल. हे सर्वकाही असे होण्याची ड्रामामध्ये नोंद आहे तेव्हाच तर बाबा येऊन स्थापना करतील. आता आहे संगम. बाबा म्हणतात - ‘मी कल्प-कल्प, कल्पाच्या संगमयुगावर येऊन तुम्हाला मनुष्यापासून देवता बनवतो. ज्ञान यज्ञ रचतो’. बाकी जे आहेत ते या यज्ञामध्ये स्वाहा होणार आहेत. ही विनाश ज्वाळा या यज्ञामधून प्रज्वलित होणार आहे. पतित दुनियेचा तर विनाश होणार आहे. नाहीतर पावन दुनिया कशी बनेल. तुम्ही म्हणता देखील - ‘हे पतित-पावन या’ तर पतित दुनिया आणि पावन दुनिया दोन्ही एकत्र असतील काय? पतित दुनियेचा विनाश होईल, याचा तर आनंद झाला पाहिजे. महाभारताची लढाई लागली होती, ज्याद्वारे स्वर्गाचे गेट उघडले. म्हणतात - ही तीच महाभारत लढाई आहे. हे तर चांगले आहे, पतित दुनिया नष्ट होईल. शांतीसाठी डोकेफोड करण्याची गरज नाही. तुम्हाला आता जो तिसरा नेत्र मिळाला आहे तो कोणालाच नाहीये. तुम्हा मुलांना तर आनंद झाला पाहिजे - आपण बेहदच्या बाबांकडून पुन्हा वारसा घेत आहोत. बाबा आम्ही अनेकदा तुमच्याकडून वारसा घेतला आहे. मग रावणाने शाप दिला. या गोष्टींची आठवण करणे सोपे आहे. बाकी सर्व दंतकथा आहेत. तुम्हाला इतके श्रीमंत बनवले मग गरीब का बनलात? हे सर्व ड्रामामध्ये नोंदलेले आहे. गायले देखील जाते ज्ञान, भक्ती आणि वैराग्य. भक्तीपासून वैराग्य तेव्हा येईल जेव्हा ज्ञान मिळेल. तुम्हाला ज्ञान मिळाले तेव्हाच तर भक्तीपासून वैराग्य आले. साऱ्या जुन्या दुनियेपासून वैराग्य. हे तर कब्रस्तान आहे. ८४ जन्मांचे चक्र फिरलो आहोत. आता घरी जायचे आहे. माझी आठवण करा तर माझ्याकडे निघून याल. विकर्म विनाश होतील दुसरा कोणताही उपाय नाही. योग-अग्नीद्वारे पापे भस्म होतील. गंगा स्नान केल्याने होणार नाहीत.

बाबा म्हणतात - मायेने तुम्हाला मूर्ख बनवले आहे, एप्रिल-फुल, असे म्हणतात ना. आता मी तुम्हाला लक्ष्मी-नारायणासारखे बनविण्यासाठी आलो आहे. चित्रे तर खूप सुंदर आहेत - आज आपण काय आहोत, उद्या आपण काय असणार? परंतु माया काही कमी नाहीये. माया दोरी बांधू देत नाही. ओढाताण होते. आम्ही बाबांची आठवण करतो मग माहित नाही काय होते? विसरून जातो. यामध्ये मेहनत आहे म्हणून भारताचा प्राचीन योग प्रसिद्ध आहे. त्यांना वारसा कोणी दिला, हे कोणालाच समजत नाही. बाबा म्हणतात - ‘मुलांनो, मी तुम्हाला पुन्हा वारसा देण्यासाठी आलो आहे’. हे तर बाबांचे काम आहे. यावेळी सर्व नरकवासी आहेत. तुम्ही आनंदीत होता. इथे कोणी येतात आणि त्यांना ज्ञान समजते तेव्हा त्यांना आनंद होतो, खरोखर हे ठीक आहे. ८४ जन्मांचा हिशोब आहे. बाबांकडून वारसा घ्यायचा आहे. बाबा जाणतात - अर्धा कल्प भक्ती करून तुम्ही थकले आहात. गोड मुलांनो, बाबा तुमचा सर्व थकवा दूर करतील. आता भक्तीचा अंधारा मार्ग पूर्ण होत आहे. कुठे हे दु:खधाम आणि कुठे ते सुखधाम. मी दुःखधामला सुखधाम बनविण्यासाठी कल्पाच्या संगमावर येतो. बाबांचा परिचय द्यायचा आहे. बाबा बेहदचा वारसा देणारे आहेत. एकाचीच महिमा आहे. शिवबाबा नसते तर तुम्हाला पावन कोणी बनवले असते. ड्रामामध्ये सारी नोंद आहे. कल्प-कल्प तुम्ही मला बोलावता की, ‘हे पतित पावन या’. शिवाची जयंती आहे. म्हणतात की, ब्रह्माने स्वर्गाची स्थापना केली, मग शिवाने काय केले ज्यासाठी शिवजयंती साजरी करता. काहीच समजत नाहीत. तुमच्या बुद्धीमध्ये ज्ञान एकदम फिट बसले पाहिजे. एका सोबत दोरी बांधली आहे तर मग आणखी कोणासोबत बांधू नका. नाहीतर कोसळाल (पतन होईल). पारलौकिक बाबा मोस्ट सिंपल आहेत. कोणताही थाट-माट नाही. ते पिता (लौकिक पिता) तर गाड्यांमधून, विमानातून फिरतात. हे बेहदचे बाबा म्हणतात - ‘मी पतित दुनिया, पतित शरीरामध्ये मुलांच्या सेवेसाठी आलो आहे. तुम्ही बोलावले आहे - ‘ओ अविनाशी सर्जन या, येऊन आम्हाला इंजेक्शन द्या’. तर इंजेक्शन देत आहे’. बाबा म्हणतात - योग लावा तर तुमची पापे भस्म होतील. बाबा आहेतच ६३ जन्मांचे दु:खहर्ता. २१ जन्मांचे सुख कर्ता. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) आपल्या बुद्धीची रूहानी दोरी एका बाबांसोबत बांधायची आहे. एकाच्याच श्रीमतावर चालायचे आहे.

२) आपण मोस्ट स्वीटेस्ट झाडाचे कलम लावत आहोत, त्यामुळे अगोदर स्वतःला खूप-खूप स्वीट बनवायचे आहे. आठवणीच्या यात्रेमध्ये तत्पर राहून विकर्म विनाश करायची आहेत.

वरदान:-
मननशक्तीद्वारे प्रत्येक प्वाइंटचे अनुभवी बनणारे सदा शक्तिशाली, मायाप्रूफ, विघ्नप्रूफ भव

जसे शरीराच्या ताकदीसाठी पाचनशक्ती किंवा पचन करण्याची शक्ती आवश्यक असते, तसे आत्म्याला शक्तिशाली बनविण्यासाठी मनन शक्ती पाहिजे. मनन शक्तीद्वारे अनुभव स्वरूप बनणे - हीच सर्वात मोठ्यात मोठी शक्ती आहे. असे अनुभवी कधीही धोका खाऊ शकत नाहीत, ऐकीव गोष्टींमुळे विचलित होऊ शकत नाहीत. अनुभवी सदैव भरपूर असतात. ते सदैव शक्तिशाली, मायाप्रूफ, विघ्नप्रूफ बनतात.

बोधवाक्य:-
खुशीचा खजिना कायमचा सोबत असेल तर बाकीचे सर्व खजिने आपोआप सोबत येतील.

हे अव्यक्त इशारे:- एकता आणि विश्वासाच्या विशेषतेद्वारे सफलता संपन्न बना.

सफलता संपन्न बनण्यासाठी - साधारण कार्य करत असतानाही फरिश्त्याची चाल आणि हाल असावी (फरिश्त्यासारखे वर्तन आणि अवस्था असावी). असे म्हणू नका की, ‘काय करणार, गोष्टच अशी होती, कामच असे होते, परिस्थितीच अशी होती, समस्याच अशी होती, म्हणून साधारणता आली’. कोणत्याही वेळी, कोणत्याही परिस्थितीमध्ये तुमचे अलौकिक स्वरूप प्रत्येकाला जाणवले पाहिजे. जशी गोष्ट तसे आपले स्वरूप बनवू नका. गोष्टींनी तुम्हाला बदलू नये तेव्हा सर्वांच्या समीप याल आणि एकतेचे संघटन मजबूत होईल.