24-07-2025
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
“गोड
मुलांनो - तुम्ही या शिक्षणाने आपल्या सुखधामला जाता व्हाया शांतीधाम, हेच तुमचे एम
ऑब्जेक्ट आहे, हे कधीही विसरता कामा नये”
प्रश्न:-
तुम्ही मुले
साक्षी होऊन यावेळी ड्रामाचा कोणता सीन बघत आहात?
उत्तर:-
यावेळी ड्रामामध्ये संपूर्ण दुःखाचा सीन आहे. जरी कोणाला सुख असले तरी ते
अल्पकाळासाठी कागविष्ठा समान आहे. बाकी दुःखच दुःख आहे. तुम्ही मुले आता प्रकाशात
आला आहात. जाणता सेकंद बाय सेकंद बेहद सृष्टीचे चक्र फिरत राहते, एक दिवस दुसऱ्या
दिवसाशी मेळ खाऊ शकत नाही. साऱ्या दुनियेची ॲक्ट बदलत राहते. नवीन सीन चालूच असतो.
गीत:-
जो पिया के
साथ है…
ओम शांती।
डबल ओम् शांती. एक - बाबा स्व-धर्मामध्ये टिकून राहिले आहेत, दुसरे - मुलांना देखील
म्हणतात आपल्या स्वधर्मामध्ये टिकून रहा आणि बाबांची आठवण करा. इतर कोणी असे म्हणू
शकणार नाही की, स्व-धर्मामध्ये टिकून रहा. तुम्हा मुलांच्या बुद्धीमध्ये निश्चय आहे.
निश्चय-बुद्धी विजयंती. तेच विजय प्राप्त करतील. कोणता विजय मिळवतील? बाबांच्या
वारशाचा. स्वर्गामध्ये जाणे - हा आहे बाबांच्या वारशाचा विजय मिळवणे. बाकी आहे
पदासाठी पुरुषार्थ. स्वर्गामध्ये तर जरूर जायचे आहे. मुले जाणतात ही आहे छी-छी (विकारी)
दुनिया. अतिशय प्रचंड प्रमाणात दुःखे येणार आहेत. ड्रामाच्या चक्राला देखील तुम्ही
जाणता. अनेकदा बाबा आलेले आहेत पावन बनवून सर्व आत्म्यांना मच्छरांसदृश्य घेऊन
जाण्यासाठी, आणि मग स्वतः देखील निर्वाण धाममध्ये जाऊन निवास करतील. मुले देखील
जातील! तुम्हा मुलांना तर याचा आनंद वाटला पाहिजे - या शिक्षणाने आम्ही आमच्या
सुखधामला जाणार व्हाया शांतीधाम. हे आहे तुमचे एम ऑब्जेक्ट. हे विसरता कामा नये.
दररोज ऐकता, समजता आम्हाला पतिता पासून पावन बनविण्याकरिता बाबा शिकवत आहेत. पावन
बनण्याचा सोपा उपाय सांगतात - आठवण करण्याचा. ही देखील नवीन गोष्ट नाहीये. लिहिलेले
आहे - भगवंताने राजयोग शिकवला. चूक फक्त हीच केली आहे की, श्रीकृष्णाचे नाव घातले
आहे. असे देखील नाही की मुलांना जे नॉलेज मिळत आहे, ते गीते शिवाय अजून दुसऱ्या
कोणत्या शास्त्रामध्ये असेल. मुले जाणतात कोणत्याही मनुष्याची महिमा नाहीये, जशी
बाबांची आहे. बाबा जर आले नाहीत तर सृष्टीचे चक्र फिरूच शकणार नाही. दुःखधाम पासून
सुखधाम कसे बनेल? सृष्टीचे चक्र तर फिरणारच आहे. बाबांना सुद्धा जरूर यायचेच आहे.
बाबा येतात सर्वांना घेऊन जाण्यासाठी मग चक्र फिरत राहते. बाबा जर आलेच नाहीत तर मग
कलियुगापासून सतयुग कसे बनेल? बाकी या गोष्टी काही शास्त्रांमध्ये नाहीत. राजयोग
आहेच गीतेमध्ये. जर समजतील भगवान आबूमध्ये आलेले आहेत तर एकदम पळत येतील भेटण्यासाठी.
संन्याशांचीसुद्धा इच्छा तर आहे ना की भगवंताला भेटावे. पतित-पावनची आठवण करतात परत
जाण्यासाठी. आता तुम्ही मुले पद्मा-पदम भाग्यशाली बनत आहात. तिथे अथाह सुख असते.
नवीन दुनियेमध्ये जो देवी-देवता धर्म होता, तो आता नाही आहे. बाबा दैवी राज्याची
स्थापना करतातच मुळी ब्रह्मा द्वारे. हे तर क्लियर आहे. तुमचे एम ऑब्जेक्टच हे आहे.
यामध्ये संशयाचा प्रश्नच नाही. पुढे जाऊन नक्कीच समजतील, राजधानी जरूर स्थापन होते.
आदि सनातन देवी-देवता धर्म आहे. जेव्हा तुम्ही स्वर्गामध्ये राहता तर याचे नावच
भारत असते मग जेव्हा तुम्ही नरकामध्ये येता तेव्हा हिंदुस्तान नाव पडते. इथे किती
दुःखच दुःख आहे. मग ही सृष्टी बदलते पुन्हा स्वर्गामध्ये आहेच सुखधाम. हे नॉलेज
तुम्हा मुलांना आहे. दुनियेमध्ये मनुष्य काहीही जाणत नाहीत. बाबा स्वतः म्हणतात आता
आहे अंधारी रात्र. रात्री मनुष्य धक्के खात राहतात. तुम्ही मुले प्रकाशामध्ये आहात.
हे देखील साक्षी होऊन बुद्धीमध्ये धारण करायचे आहे. सेकंद बाय सेकंद बेहद सृष्टीचे
चक्र फिरत राहते. एक दिवस दुसऱ्या दिवसाशी मेळ खाऊ शकत नाही. साऱ्या दुनियेची ॲक्ट
बदलत राहते. नवीन सीन चालत राहतो. यावेळी संपूर्ण आहेच दुःखाचा सीन. जर कोणाला सुख
असले जरी तरीही ते अल्पकाळासाठी कागविष्ठा समान आहे. बाकी दुःखच दुःख आहे. या
जन्मामध्ये नाही म्हणायला थोडेफार सुख मिळेलही आणि पुन्हा दुसऱ्या जन्मामध्ये दुःख.
आता तुम्हा मुलांच्या बुद्धीमध्ये हे राहते - आता आम्ही जातो आपल्या घरी. यामध्ये
मेहनत करायची आहे पावन बनण्याची. ‘श्री-श्री’ यांनी श्रीमत दिले आहे श्री
लक्ष्मी-नारायण बनण्याचे. बॅरिस्टर मत देतील - बॅरिस्टर भव. आता बाबा देखील म्हणतात
श्रीमताद्वारे असे बना.
स्वतःला विचारले
पाहिजे - माझ्यामध्ये कोणते अवगुण तर नाहीत ना? यावेळी गातात देखील - ‘मुझ निर्गुण
हारे में कोई गुण नाही, आपेही तरस परोई’. तरस अर्थात दया. बाबा म्हणतात - ‘मुलांनो,
मी काही कोणावर दया करतही नाही’. दया तर प्रत्येकाने स्वतःवर करायची आहे. हा ड्रामा
बनलेला आहे. निर्दयी रावण तुम्हाला दुःखामध्ये घेऊन येतो. ही देखील ड्रामामध्ये
नोंद आहे. यामध्ये रावणाचा सुद्धा काही दोष नाही. बाबा येऊन फक्त मत देतात. हीच
त्यांची दया आहे. बाकी हे रावण राज्य तर चालूच राहील. ड्रामा अनादि आहे. ना रावणाचा
दोष आहे, ना मनुष्यांचा दोष आहे. चक्र तर फिरणारच आहे. रावणा पासून सुटका करून
घेण्यासाठी बाबा युक्त्या सांगत राहतात. रावणाच्या मतावर चालून तुम्ही किती
पाप-आत्मा बनला आहात. आता जुनी दुनिया आहे. मग जरूर नवीन दुनिया येणार. चक्र तर
फिरणार ना. सतयुगाला पुन्हा जरूर यायचे आहे. आता आहे संगमयुग. महाभारत लढाई देखील
यावेळची आहे. ‘विनाश काले विप्रीत बुद्धी विनशन्ती. असे होणारच आहे. आणि आपण
विजयन्ती स्वर्गाचे मालक होणार. बाकीचे सर्व असणारच नाहीत. हे देखील समजता - पवित्र
झाल्याशिवाय देवता बनणे कठीण आहे. आता बाबांकडून श्रीमत मिळते श्रेष्ठ देवता
बनण्याचे. असे मत कधी मिळू शकणार नाही. श्रीमत देण्याचा त्यांचा पार्ट आहे देखील
संगमावर. अजून कोणामध्ये तर हे ज्ञानच नाही आहे. भक्ती अर्थात भक्ती. त्याला ज्ञान
म्हटले जाणार नाही. आत्मिक ज्ञान, ज्ञान-सागर आत्माच देतात. त्यांचीच महिमा आहे
ज्ञानाचा सागर, सुखाचा सागर. बाबा पुरुषार्थाच्या युक्त्या सुद्धा सांगतात. ही काळजी
घेतली पाहिजे की आता फेल झालो तर कल्प-कल्पांतर फेल होणार, खूप दुःख होईल.
श्रीमतावर न चालल्याने दुःख मिळते. ब्राह्मणांचे झाड वाढणे देखील जरूरी आहे. तितकेच
वाढेल जितके देवतांचे झाड आहे. तुम्हाला पुरुषार्थ करायचा आहे आणि करवून घ्यायचा आहे.
कलमे लागत राहतील. झाड मोठे होईल. तुम्ही जाणता की आता आपले कल्याण होत आहे. पतित
दुनियेमधून पावन दुनियेमध्ये जाण्याचे कल्याण होते. तुम्हा मुलांच्या बुद्धीचे
कुलूप आता उघडले आहे. बाबा बुद्धिवानांची बुद्धी आहेत ना. आता तुम्ही समजत आहात मग
पुढे जाऊन पहा कोणा-कोणाचे कुलूप उघडते. हा देखील ड्रामा चालतो. पुन्हा सतयुगापासून
रिपीट होईल. लक्ष्मी-नारायण जेव्हा तख्तावर बसतात तेव्हा संवत सुरु होते. तुम्ही
लिहिता सुद्धा - ‘एक पासून १२५० वर्षांपर्यंत स्वर्ग’, किती स्पष्ट आहे. कहाणी आहे
सत्यनारायणाची. कथा अमरनाथची आहे ना. तुम्ही आता खरी-खरी अमरनाथाची कथा ऐकता त्याचे
मग गायन चालते. उत्सव इत्यादी सर्व या वेळचे आहेत. पहिल्या नंबरचा सण आहे -
शिवबाबांची जयंती. कलियुगाच्या शेवटी दुनियेला चेंज करण्यासाठी जरूर बाबांना यावे
लागेल. चित्रांना कोणीही काळजीपूर्वक पहावे, पूर्ण कल्पाचा हिशोब किती अचूक बनलेला
आहे. तुम्हाला ही खात्री आहे, जितका कल्पापूर्वी पुरुषार्थ केला आहे तितका करतील
जरूर. साक्षी होऊन इतरांचाही पुरुषार्थ बघतील. आपल्या पुरुषार्थाला देखील जाणतात.
तुम्ही देखील जाणता. स्टुडंट आपल्या अभ्यासाबाबत जाणत नसतील काय? मन खाईल जरूर की,
आपण या सब्जेक्ट मध्ये खूप कच्चे आहोत. मग नापास होतात. परीक्षेच्या वेळी जे कच्चे
असतील त्यांचे काळीज धडधडत राहील. तुम्ही मुले देखील साक्षात्कार कराल. परंतु नापास
तर झालाच आहात, तर करू तरी काय शकणार! स्कुलमध्ये नापास होतात तेव्हा नातेवाईक
देखील नाराज, टीचर देखील नाराज होतात. म्हणतील आमच्या स्कुलमधून कमी पास झाले; तर
समजले जाईल की टीचर इतके चांगले नाहीत म्हणून कमी पास झाले. बाबा देखील जाणतात
सेंटरवर कोण-कोण चांगल्या टीचर आहेत, कशा शिकवतात. कोण-कोण चांगल्या रीतीने शिकवून
घेऊन येतात. सर्व माहिती होते. बाबा म्हणतात - ढगांना आणायचे आहे. छोट्या मुलांना
घेऊन आले तर त्यांच्यामध्ये मोह राहील. एकटेच निघून आले पाहिजे तर बुद्धी चांगल्या
रीतीने एकाग्र राहील. मुलांना तर तिथे देखील सांभाळत असता.
बाबा म्हणतात - ही
जुनी दुनिया तर कब्रस्तान होणार आहे. नविन घर बनवतात तर बुद्धीमध्ये असते ना - आमचे
नवीन घर बनत आहे. धंदा इत्यादी तर करत राहतात. परंतु बुद्धी नविन घराकडे राहते,
गप्प तर बसत नाही. ती आहे हदची गोष्ट, ही आहे बेहदची गोष्ट. प्रत्येक कार्य करत
असताना जर हे लक्षात राहिले की, आता आम्ही घरी जाऊन मग आपल्या राजधानीमध्ये जाणार,
तर अपार आनंद होईल. बाबा म्हणतात - मुलांनो, आपली मुले इत्यादींचा सांभाळ देखील
करायचा आहे. परंतु बुद्धी तिथे लागून रहावी. आठवण न केल्याने मग पवित्र सुद्धा बनू
शकत नाहीत. आठवणीद्वारे - पवित्र आणि ज्ञानाद्वारे कमाई. इथे तर सर्व आहेत पतित.
दोन किनारे आहेत. बाबांना खिवैया म्हणतात, परंतु अर्थ समजत नाहीत. तुम्ही जाणता बाबा
त्या किनाऱ्यावर घेऊन जातात. आत्मा जाणते आम्ही आता बाबांची आठवण करून खूप जवळ जात
आहोत. ‘खिवैया’ नाव देखील अर्थ सहित ठेवले आहे ना. हे सर्व महिमा करतात - ‘नईया मेरी
पार लगाओ’. सतयुगामध्ये असे म्हणाल काय? कलियुगामध्येच बोलावतात. तुम्ही मुले समजता
बुद्धू असणाऱ्याने तर इथे यायचे देखील नाही. बाबांची सक्त मनाई आहे. निश्चय नसेल तर
कधीही घेऊन येता कामा नये. काहीही समजणार नाहीत. पहिले तर ७ दिवसांचा कोर्स घ्या.
कोणाला तर २ दिवसात सुद्धा तीर लागतो (ज्ञान काळजाला भिडते). चांगले वाटले तर मग
सोडणार थोडेच. म्हणतील आम्ही अजून ७ दिवस शिकणार. तुम्ही लगेच समजाल हा या कुळाचा
आहे. बुद्धिमान जे असतील ते कोणत्याही गोष्टीची पर्वा करणार नाहीत. ठीक आहे, एक
नोकरी गेली, दुसरी मिळेल, जी मुले उदार असतात त्यांची नोकरी इत्यादी सुटतच नाही.
स्वतःच आश्चर्यचकित होतात. मुली म्हणतात - आमच्या पतीची बुद्धी बदला. बाबा म्हणतात
- मला सांगू नका. तुम्ही योगबळामध्ये राहून मग बसून ज्ञान समजावून सांगा. बाबा असे
थोडेच कोणाच्या बुद्धीला बदलतील. मग तर सगळेच असले धंदे करत राहतील. जो रिवाज पडतो
त्यालाच पकडतात. कोणत्या गुरूकडून कोणाला फायदा झाला, ऐकले, तर बस्स त्यांच्या
मागेच लागतात. नवीन आत्मा येते मग तिची महिमा तर होणार ना. मग भरपूर फॉलोअर्स बनू
लागतात त्यामुळे या सर्व गोष्टींना बघायचेच नाही. तुम्हाला बघायचे आहे स्वतःला - मी
कितपत अभ्यास करतो आहे? हे तर बाबा डिटेलमध्ये जसे चिट-चॅट करतात. बाकी फक्त एवढेच
सांगा - बाबांची आठवण करा, हे तर घरामध्ये राहून देखील करू शकता. परंतु ज्ञानाचा
सागर आहेत तर जरूर ज्ञान देखील देतील ना. ही आहे मुख्य गोष्ट - मनमनाभव. सोबत
सृष्टीच्या आदि-मध्य-अंताचे रहस्य देखील समजावून सांगतात. चित्रे देखील या वेळी खूप
चांगली-चांगली निघाली आहेत. त्यांचा देखील अर्थ बाबा समजावून सांगतात. विष्णूच्या
नाभीतून ब्रह्माला दाखवले आहे. त्रिमूर्ती देखील आहे मग विष्णूच्या नाभीतून ब्रह्मा
हे मग काय आहे? बाबा बसून समजावून सांगतात - हे राईट आहे की रॉंग आहे? कल्पना चित्र
देखील पुष्कळ बनवतात ना. काही-काही शास्त्रांमध्ये चक्र देखील दाखवले आहे. परंतु
कोणी किती वर्षे लिहिली आहेत, तर कोणी किती? अनेक मते आहेत ना. शास्त्रांमध्ये
हदच्या गोष्टी लिहिल्या आहेत, बाबा बेहदच्या गोष्टी समजावून सांगतात की साऱ्या
दुनियेमध्ये आहे रावणराज्य. हे तुमच्या बुद्धीमध्ये ज्ञान आहे - आपण कसे पतित बनलो
पुन्हा पावन कसे बनतो. मागाहून मग इतर धर्म येतात. अनेक व्हरायटी आहे. एक दुसऱ्याशी
मेळ खाऊ शकत नाही. एकसारखे फीचर्सवाले दोघे असू शकणार नाहीत. हा पूर्वनियोजित खेळ
आहे जो रिपीट होत राहतो. बाबा मुलांना बसून समजावून सांगतात. वेळ कमी होत जाते. आपली
तपासणी करा - मी कितपत आनंदी राहतो? आपल्याला कोणते विकर्म करायचे नाहीये. वादळे तर
येतील. बाबा म्हणतात - ‘मुलांनो, अंतर्मुख होऊन आपला चार्ट ठेवा तर ज्या चुका होतात
त्यांचा पश्चाताप करू शकाल’. हे जसे योगबलाने स्वतःला माफ करता. बाबा काही क्षमा
किंवा माफ करत नाहीत. ड्रामामध्ये क्षमा शब्दच नाहीये. तुम्हाला आपली मेहनत करायची
आहे. पापांचा दंड मनुष्य स्वतःच भोगतात. क्षमेची गोष्टच नाही. बाबा म्हणतात
प्रत्येक गोष्टीमध्ये मेहनत करा. बाबा बसून युक्ती सांगतात आत्म्यांना. बाबांना
बोलावता जुन्या रावणाच्या देशामध्ये- ‘या, आम्हा पतितांना येऊन पावन बनवा’. परंतु
मनुष्य समजत नाहीत. तो आहे आसुरी संप्रदाय. तुम्ही आहात ब्राह्मण संप्रदाय, दैवी
संप्रदाय बनत आहात. मुले पुरुषार्थ देखील नंबरवार करतात. मग म्हणतात यांच्या
नशिबामध्ये इतकेच आहे. आपला वेळ वाया घालवतात. जन्म-जन्मांतर, कल्प-कल्पांतर उच्च
पद प्राप्त करू शकणार नाहीत. स्वतःला तोट्यात टाकू नये कारण आता जमा होते नंतर
तोट्यात जाता. रावण राज्यामध्ये किती तोटा आहे. अच्छा!
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१) अंतर्मुखी
बनून स्वतःची तपासणी करायची आहे, ज्याकाही चूका होतात त्यांचा मनापासून पश्चाताप
करून योगबलाद्वारे माफ करायचे आहे. स्वतःची मेहनत करायची आहे.
२) बाबांचे जे मत
मिळते त्यावर पूर्णपणे चालून स्वतःवर स्वतःच दया करायची आहे. साक्षी होऊन आपल्या आणि
दुसऱ्यांच्या पुरुषार्थाला बघायचे आहे. कधीही आपणच आपल्याला तोट्यामध्ये टाकायचे
नाही.
वरदान:-
विश्व
कल्याणाच्या भावनेद्वारे प्रत्येक आत्म्याच्या सेफ्टीचे प्लॅन बनविणारे सच्चे दयाळू
भव
वर्तमान वेळी अनेक
आत्मे आपोआपच स्वतःच्या अकल्याणाच्या निमित्त बनत आहेत, त्यांच्यासाठी दयाळू बनून
काही प्लॅन बनवा. कोणत्याही आत्म्याच्या पार्टला पाहून स्वतः हलचलमध्ये येऊ नका
परंतु त्यांच्या सेफ्टीच्या साधनाचा विचार करा, असे नाही की असे तर होतच राहते, झाड
तर झडणारच आहे. नाही. येणाऱ्या विघ्नांना नष्ट करा. विश्व-कल्याणकारी किंवा
विघ्न-विनाशक चे जे टायटल आहे - त्याप्रमाणे संकल्प, वाणी आणि कर्मामध्ये दयाळू
बनून वायुमंडळाला चेंज करण्यामध्ये सहयोगी बना.
बोधवाक्य:-
कर्मयोगी तोच
बनू शकतो जो बुद्धीवर लक्षपूर्वक पहारा देतो.
अव्यक्त इशारे -
संकल्पांची शक्ती जमा करून श्रेष्ठ सेवेच्या निमित्त बना:-
लास्टमध्ये फायनल
पेपरचा प्रश्न असेल - सेकंदामध्ये फुल स्टॉप, यामध्येच नंबर मिळतील. सेकंदापेक्षा
जास्त झाले तर फेल होणार. “एक बाबा आणि मी”, तिसरी कोणतीही गोष्ट येऊ नये. असे नाही
- ‘हे करू, हे बघू…’, ‘असे झाले, नाही झाले’, ‘हे का झाले, हे काय झाले’ - असा
कोणताही संकल्प आला तर फायनल पेपरमध्ये पास होऊ शकणार नाही.