24-08-25 अव्यक्त बापदादा
मराठी मुरली
30.11.2006 ओम शान्ति
मधुबन
“ज्वालामुखी
तपस्येद्वारे ‘मी’पणाच्या शेपटीला जाळून बापदादांच्या समान बना तेव्हा समाप्ती समीप
येईल”
आज अखुट अविनाशी
खजिन्यांचे मालक बापदादा आपल्या चोहो बाजूच्या संपन्न मुलांच्या जमेच्या खात्याला
बघत आहेत. तीन प्रकारची खाती बघत आहेत - एक आहे आपल्या पुरुषार्थाद्वारे श्रेष्ठ
प्रारब्ध जमेचे खाते. दुसरे आहे सदैव संतुष्ट राहणे आणि संतुष्ट करणे, या
संतुष्टतेद्वारे आशीर्वादांचे खाते. तिसरे आहे मनसा-वाचा-कर्मणा,
संबंध-संपर्काद्वारे बेहदच्या नि:स्वार्थ सेवेद्वारे पुण्याचे खाते. तुम्ही सर्वजण
आपल्या या तिन्ही खात्यांना चेक करतच आहात. ही तिन्ही खाती किती जमा आहेत, आहेत की
नाही आहेत त्याची निशाणी आहे - सदैव सर्वांप्रति, स्वयंप्रति संतुष्टता स्वरूप,
सर्वांप्रति शुभ भावना, शुभ कामना आणि सदैव स्वतःला प्रफुल्लित, भाग्यशाली
स्थितीमध्ये अनुभव करणे. तर चेक करा दोन्ही खात्यांची लक्षणे स्वतःमध्ये अनुभव
होतात का? या सर्व खजिन्यांना जमा करण्याची चावी आहे - निमित्त भाव, निर्माण भाव,
नि:स्वार्थ भाव. चेक करत जा आणि चावीचा नंबर ठाऊक आहे! चावीचा नंबर आहे - तीन बिंदू.
थ्री डॉट. एक - आत्मा बिंदू, दुसरा - बाबा बिंदू, तिसरा - ड्रामाचा फुलस्टॉप बिंदू.
तुम्हा सर्वांकडे चावी तर आहे ना! खजिन्याला उघडून बघत असता ना! या सर्व
खजिन्यांच्या वृद्धीची विधी आहे - दृढता. दृढता असेल तर कोणत्याही कार्यामध्ये हा
संकल्प नाही चालणार की, होईल का नाही होणार. दृढतेची स्थिती आहे - झाल्यातच जमा आहे,
बनल्यातच जमा आहे. बनेल, जमा होईल, नाही होईल, नाही. ‘करत तर आहोत, व्हायला तर
पाहिजे…’ हे ‘तर-तर’ सुद्धा नको. दृढतावाला निश्चयबुद्धी, निश्चिंत आणि निश्चित
अनुभव करेल.
बापदादांनी या पूर्वी
देखील सांगितले आहे - जर जास्तीत जास्त सर्व खजिन्यांचे खाते जमा करायचे असेल तर
मनमनाभवच्या मंत्राला यंत्र बनवा. ज्यामुळे सदैव बाबांसोबत आणि समीप असल्याचा स्वतः
अनुभव होईल. पास व्हायचेच आहे, तीन प्रकारचे ‘पास’ आहेत - एक आहे - पास राहणे (जवळ
राहणे), दुसरे आहे - जे झाले ते पास झाले (होऊन गेले) आणि तिसरे आहे - पास विद ऑनर
होणे. जर तिन्ही पास असतील, तर तुम्हा सर्वांना राज्य अधिकारी बनण्याचा फुल पास आहे.
तर फुल पास घेतले आहेत की घ्यायचे आहेत? ज्यांनी फुल पास घेतले आहेत त्यांनी हात वर
करा. घ्यायचे नाही आहेत, घेतलेले आहेत? पहिल्या लाइनमधले हात वर करत नाहीत, घ्यायचे
आहेत तुम्हाला? विचार करत आहेत अजून संपूर्ण बनलेलो नाही आहोत, म्हणून का. परंतु
निश्चयबुद्धी विजयी आहातच, की व्हायचे आहे? आता तर काळाची हाक, भक्तांची हाक, आपल्या
मनाचा आवाज काय येत आहे? आत्ताच्या आत्ता संपन्न आणि समान बनायचेच आहे का असा विचार
करता - ‘बनूया, विचार करूया, करूया’! आता समयानुसार एव्हररेडीचा पाठ सदैव पक्का
राहिलाच पाहिजे. जेव्हा ‘माझे बाबा’ म्हटले, ‘लाडके बाबा’, ‘गोड बाबा’ मानतच आहात.
तर जो लाडका असतो त्याच्या समान बनणे काही अवघड नसते.
बापदादांनी पाहिले आहे
की वेळोवेळी समान बनण्यामध्ये जी विघ्न पडतात त्यासाठी सर्वांकडे एक प्रसिद्ध शब्द
आहे, सर्वजण जाणतात, अनुभवी आहेत. तो आहे - “मी”, “मी”पणा, म्हणून बापदादांनी या
पूर्वी देखील सांगितले आहे जेव्हापण ‘मी’ शब्द बोलता तर फक्त ‘मी’ म्हणू नका, ‘मी
आत्मा’. जुळा शब्द बोला. तर ‘मी’ कधी अभिमान घेऊन येतो, बॉडी कॉन्शसवाला मी, आत्मा
वाला नाही. कधी अभिमान घेऊन येतो, कधी अपमान देखील आणतो. कधी दिलशिकस्त देखील बनवतो
म्हणून या बॉडी कॉन्शसच्या ‘मी’पणाला स्वप्नातसुद्धा येऊ देऊ नका.
बापदादांनी पाहिले आहे
स्नेहाच्या सब्जेक्टमध्ये मेजॉरिटी पास आहेत. तुम्हा सर्वांना इथे कोणी आणले? सर्व
भले प्लेनने आला आहात, नाहीतर ट्रेनने, किंवा बसने आला आहात, परंतु वास्तवामध्ये
बापदादांच्या स्नेहाच्या विमानामधून इथे पोहोचला आहात. तर जसे स्नेहाच्या
सब्जेक्टमध्ये पास आहात, आता हा चमत्कार करा - समान बनण्याच्या सब्जेक्टमध्ये देखील
पास विद ऑनर बनून दाखवा. पसंत आहे? समान बनणे पसंत आहे? पसंत आहे परंतु बनण्यामध्ये
थोडे अवघड आहे! समान बना तर समाप्ति समोर येईल. परंतु कधी-कधी जी मनामध्ये प्रतिज्ञा
करता, बनायचेच आहे. तर प्रतिज्ञा कमजोर होऊन जाते आणि परीक्षा मजबूत होते. इच्छा
सर्वांचीच आहे परंतु इच्छा एक असते आणि प्रॅक्टिकलमध्ये काही दुसरेच होते कारण की
प्रतिज्ञा करता परंतु दृढतेची कमतरता होते. समानता बाजूलाच राहते, समस्या प्रबळ
होऊन जाते. तर आता काय करणार?
बापदादांना एका
गोष्टीवर खूप हसू येत आहे. कोणती गोष्ट? आहेत महावीर परंतु जसे शास्त्रांमध्ये
हनुमानाला महावीर देखील म्हटले जाते परंतु शेपटी देखील दाखवली आहे. ही शेपटी ‘मी’-पणाची
दाखवली आहे. जोपर्यंत महावीर या शेपटीला जाळणार नाहीत तोपर्यंत लंका अर्थात जुनी
दुनिया देखील समाप्त होणार नाही. तर आता या ‘मी, मी’ च्या शेपटीला जाळून टाका
तेव्हाच समाप्ती समीप येईल. जाळून टाकण्यासाठी ज्वालामुखी तपस्या, साधारण आठवण नाही.
ज्वालामुखी आठवणीची आवश्यकता आहे. म्हणून ज्वाला देवीची देखील यादगार आहे. शक्तिशाली
आठवण. तर ऐकले काय करायचे आहे? आता ही मनामध्ये धून लागलेली असावी - समान बनायचेच
आहे, समाप्तीला समीप आणायचेच आहे. तुम्ही म्हणाल संगमयुग तर खूप सुंदर आहे ना तर
समाप्ती का व्हावी? परंतु तुम्ही बाप समान दयाळू, कृपाळू, दयावान आत्मे आहात, तर
आजच्या दुःखी आत्म्यांवर आणि भक्त आत्म्यांवर हे दयावान आत्म्यांनो दया करा.
मर्सिफुल बना. दुःख वाढत चालले आहे, दुःखी असलेल्यांवर दया करून त्यांना मुक्तिधाम
मध्ये तर पाठवा. फक्त वाणीची सेवा नाही परंतु आता गरज आहे मनसा आणि वाणीची सेवा
एकत्र व्हावी. एकाच वेळी दोन्ही सेवा सोबत व्हाव्यात. फक्त सेवेचा चान्स मिळू दे,
असा विचार करू नका, चालता-फिरता आपल्या चलन आणि चेहऱ्याद्वारे बाबांचा परिचय देत
पुढे चला. तुमच्या चेहऱ्याने बाबांचा परिचय द्यावा. तुमचे आचरण बाबांना प्रत्यक्ष
करत रहावे. तर असे सदैव सेवाधारी भव! अच्छा.
बापदादांच्या समोर
स्थूलमध्ये तर तुम्ही सर्व बसला आहात परंतु सूक्ष्म स्वरूपाने चोहो बाजूंची मुले
हृदयामध्ये आहेत. बघतही आहेत, ऐकत देखील आहेत. देश-विदेशच्या अनेक मुलांनी ई-मेल
द्वारे, पत्रांच्या द्वारे, संदेशांद्वारे प्रेमपूर्वक आठवण पाठवली आहे. सर्वांची
नावासहीत बापदादांना आठवण मिळाली आहे आणि बापदादा अंतःकरणापासून सर्व मुलांना समोर
पाहून गाणे गात आहेत - ‘वाह! मुलांनो वाह!’ प्रत्येकाला यावेळी इमर्ज रूपामध्ये
आठवण राहते. सर्वजण संदेशीला वेगवेगळे सांगतात अमक्याने आठवण दिली आहे, तमक्याने
आठवण दिली आहे. बाबा म्हणतात, बाबांकडे तर जेव्हा संकल्प करता, साधनाद्वारे नंतर
मिळते परंतु स्नेहाचा संकल्प साधनाच्या अगोदर पोहोचतो. बरोबर आहे ना! कितीतरी जणांना
आठवण मिळाली आहे ना! अच्छा.
अच्छा - पहिल्यांदा
हात वर करा जे पहिल्यांदाच आले आहेत. या सेवेमध्ये देखील पहिल्या वेळी आलेले आहेत.
अच्छा, बापदादा म्हणतात - स्वागत आहे, तुमच्या येण्याचा सिझन आहे. अच्छा.
इंदोर झोन:-
(सर्वांच्या हातामध्ये
“मेरा बाबा” ची हृदयाच्या शेपमध्ये चिन्ह आहेत) हात तर खूप छान हलवत आहेत, परंतु
मनाला देखील हलवा. फक्त सदैव लक्षात ठेवा, ‘मेरा (माझे)’ विसरायचे नाही. चांगला
चान्स घेतला आहे, बापदादा नेहमी म्हणतात, हिंमत ठेवणाऱ्यांना बापदादा पद्मपटीने मदत
देतात. तर हिंमत ठेवली आहे ना! चांगले केलेत. इंदोर झोन आहे. चांगले आहे इंदोर झोन
साकार बाबांचे शेवटचे स्मृतिचे स्थान आहे. छान आहे. सर्वजण खूप आनंदित होत आहात ना!
गोल्डन लॉटरी मिळाली आहे. झोनची सेवा मिळाल्यामुळे सर्व सेवाधारींना सुट्टी मिळते
आणि तशी संख्या मिळते की इतक्यांना घेऊन या आणि आता बघा इतके आहेत. हा देखील
झोन-झोनला चांगला चान्स आहे ना, जितके आणायचे आहेत आणा. तर तुम्हा सर्वांचे थोड्या
वेळामध्ये पुण्याचे खाते किती मोठ्या प्रमाणात जमा झाले. यज्ञ सेवा मनापासून करणे
अर्थात आपल्या पुण्याचे खाते तीव्र गतीने वाढविणे कारण की संकल्प, वेळ आणि शरीर
तिन्ही सफल केले. संकल्प देखील चालेल तोही यज्ञ सेवेचा, वेळ देखील यज्ञ सेवेमध्ये
व्यतीत झाला आणि शरीर सुद्धा यज्ञ सेवेमध्ये अर्पण केले. तर सेवा आहे की मेवा आहे?
प्रत्यक्ष फळ - यज्ञ सेवा करत असताना कोणाला कोणता व्यर्थ संकल्प आला? आला कोणाला?
आनंदी राहिलात आणि आनंद वाटलात. तर हा जो इथे गोल्डन अनुभव केलात, या अनुभवाला तिथे
देखील इमर्ज करून वाढवत रहा. कधीही कोणता मायेचा संकल्प जरी आला तर मनाच्या विमानाने
शांतीवन मध्ये पोहोचा. मनाचे विमान तर आहे ना! सर्वांकडे मनाचे विमान आहे.
बाप-दादांनी प्रत्येक ब्राह्मणाला जन्माची सौगात श्रेष्ठ मनाचे विमान दिलेले आहे.
या विमानामध्ये जास्त मेहनत करावी लागत नाही. स्टार्ट करायचे असेल तर ‘मेरा बाबा’,
बस्स. विमान चालवता येते ना! तर जेव्हा पण काही झाले तर मधुबन मध्ये पोहोचा.
भक्तिमार्गामध्ये चारधाम करणारे स्वतःला खूप भाग्यवान समजतात आणि मधुबन मध्ये देखील
चारधाम आहेत, तर चारधाम केले आहेत? पांडव भवनमध्ये बघा, चारधाम आहेत. जे कोणी येता
ते पांडव भवनला तर जाता ना, एक आहे - शांती स्तंभ महाधाम. दुसरा आहे - बापदादांचा
कमरा, हे स्नेहाचे धाम. आणि तिसरी आहे - झोपडी, हे स्नेहमिलनाचे धाम आणि चौथे आहे -
हिस्ट्री हॉल; तर तुम्ही सर्वांनी चारधाम केले आहेत? मग महान भाग्यवान तर झालाच
आहात. आता कोणत्याही धामची आठवण करा, कधी उदास झालात तर झोपडीमध्ये रुहरिहान
करण्यासाठी या. शक्तिशाली बनण्याची आवश्यकता असेल तर शांती स्तंभला पोहोचा आणि
वेस्ट थॉट्स खूप जोरात असतील, खूप फास्ट असतील तर हिस्ट्री हॉलमध्ये पोहोचा. समान
बनण्याचा दृढ संकल्प उत्पन्न झाला तर बापदादांच्या कमऱ्यामध्ये या. चांगले आहे,
सर्वांनी गोल्डन चान्स घेतला आहे परंतु तिथे रहात असताना देखील सदैव गोल्डन चान्स
घेत रहा. अच्छा. चांगले हिंमतवान आहेत.
कॅड ग्रुप (दिलवाले
बसले आहेत, खूप चांगली कॉन्फरन्स सर्वांनी मिळून केली):-
छान केले आहे, आपसामध्ये मिटिंग देखील केली आहे आणि प्रेसिडेंट जे आहेत त्यांचीही
इच्छा आहे असे काम व्हायला हवे. तर जशी त्यांची देखील इच्छा आहे, त्यांना देखील
सोबत घेत पुढे चालत रहा आणि त्याचसोबत ब्राह्मणांची जी मिटिंग आहे, त्यामध्ये देखील
आपल्या प्रोग्रामचा समाचार ऐकवून मत घ्या तर सर्व ब्राह्मणांच्या मताने अजून जास्त
शक्ती भरते. बाकी काम सुंदर आहे, करत चला, पसरवत चला आणि भारताची विशेषता प्रकट करत
चला. मेहनत चांगली करत आहात. प्रोग्राम देखील छान केला आहे, आणि दिलवाल्यांनी आपले
मोठे मन दाखवले, त्यासाठी मुबारक असो. अच्छा.
डबल विदेशी भाऊ
बहिणींसोबत संवाद:-
हे चांगले आहे प्रत्येक टर्नमध्ये डबल विदेशींचे येणे या संगठनला चार चांद लावते (संगठनच्या
वैभवात भर पाडते). डबल विदेशींना पाहून सर्वांना उमंग देखील येतो, सर्व डबल विदेशी
डबल उमंग उत्साहाने पुढे उडत जात आहेत, चालत नाही आहेत, उडत आहेत, असे आहेत! उडणारे
आहात की चालणारे आहात? जे सदैव उडत राहतात, चालत नाहीत त्यांनी हात वर करा. अच्छा.
तसेही बघा विमानामध्ये उडतच यावे लागते. तर उडण्याचा तर तुम्हाला अभ्यास आहेच. ते
शरीराने उडण्याचे, हे मनाने उडण्याचे, हिंमत सुद्धा चांगली ठेवली आहे. बापदादांनी
पहा काना-कोपऱ्यातून आपल्या मुलांना शोधून काढले ना! खूप छान आहे, म्हणायला डबल
विदेशी आहेत, तसे तर ओरिजिनल भारताचे आहात. आणि राज्य देखील कुठे करायचे आहे?
भारतामध्ये करायचे आहे ना! परंतु सेवा अर्थ पाचही खंडांमध्ये पोहोचला आहात. आणि
पाचही खंडांमध्ये भिन्न-भिन्न स्थानावर सेवा देखील चांगल्या उमंग-उत्साहाने करत
आहेत. विघ्न-विनाशक आहात ना! कोणतेही विघ्न आले तरी घाबरणारे तर नाही आहात ना, ‘असे
का होत आहे, हे काय होत आहे’, नाही. जे होत आहे ते आमची आणखी हिंमत वाढवण्याचे साधन
आहे. घाबरायचे नाही, उमंग-उत्साह वाढवण्याचे साधन आहे. असे पक्के आहात ना! पक्के
आहात? की थोडे-थोडे कच्चे? नाही, कच्चा शब्द चांगला वाटत नाही. पक्के आहात, पक्के
राहणार, पक्के होऊन सोबत येणार. अच्छा.
दादी जानकी
ऑस्ट्रेलियाची चक्कर मारून आल्या आहेत, त्यांनी खूप आठवण दिली आहे:- बापदादांकडे ई-मेलमध्ये
देखील संदेश आले आहेत आणि बापदादा बघत आहेत की आजकाल मोठे प्रोग्राम देखील असे झाले
आहेत जणूकाही झालेलेच आहेत. सगळे शिकले आहेत. सेवेच्या साधनांना कार्यामध्ये
लावण्याचा चांगला अभ्यास झाला आहे. बापदादांना ऑस्ट्रेलिया नंबर वन दिसून येतो परंतु
आता यू.के. चा नंबर थोडा पुढे जात आहे. ऑस्ट्रेलियाने सर्वात आधी नंबर वन घेतला आहे,
आता पुन्हा ऑस्ट्रेलियाला नंबर वन व्हायचेच आहे. यू.के. चा नंबर दुसरा होणार नाही,
तो देखील नंबर वन च असेल. ऑस्ट्रेलियाची जुनी-जुनी मुले बापदादांना लक्षात आहेत. आणि
बापदादांची लाडकी निर्मल आश्रम, तुम्ही लोक तर म्हणता निर्मला दीदी, दीदी म्हणता
ना, परंतु बापदादांनी सुरुवातीपासून त्यांना टायटल दिले आहे - ‘निर्मल आश्रम’, ज्या
आश्रमामध्ये अनेक आत्म्यांनी आधार घेतला आणि बाबांचे बनले आहेत आणि बनत आहेत, बनत
जातील. तर प्रत्येक ऑस्ट्रेलियाच्या निवासी मुलांना विशेष आठवण, हे समोर बसले आहेत,
ऑस्ट्रेलियाचे आहेत ना! ऑस्ट्रेलियावाले उठा. खूप सुंदर. यांना किती चांगला उमंग
येत आहे, विश्वाच्या सेवेसाठी खूप तयारी करत आहेत. बापदादांची मदत आहे आणि सफलता
देखील आहेच.
अच्छा - आता काय दृढ
संकल्प करत आहात? आता याच संकल्पामध्ये बसा की, ‘सफलता आमचा जन्मसिद्ध अधिकार आहे’.
‘विजय आमच्या गळ्यातील हार आहे’. या निश्चय आणि रुहानी नशेमध्ये अनुभवी स्वरूप होऊन
बसा. अच्छा.
चोहो बाजूंच्या चिंते
पासून मुक्त निश्चिंत बादशहांना, सदैव बेगमपूरचे बादशहाच्या स्वरूपामध्ये स्थित
राहणाऱ्या मुलांना, सर्व खजिन्यांनी संपन्न रिचेस्ट इन द वर्ल्ड सर्व मुलांना, सदैव
उमंग-उत्साहाच्या पंखांनी उडत्या कलेवाल्या मुलांना, सदैव समाप्तीला समीप आणणाऱ्या
बापदादा समान मुलांना बापदादांची प्रेमपूर्वक आठवण, हृदयापासून आशीर्वाद, वरदात्याची
वरदाने आणि नमस्ते.
वरदान:-
स्वतःच्या
सर्व कमजोरींना दान करण्याच्या विधीने समाप्त करणारे दाता, विधाता भव
भक्तिमध्ये हा नियम
असतो की जेव्हा कोणत्या वस्तूची कमी असते तर म्हणतात - दान करा. दान केल्यामुळे
देणे-घेणे होऊन जाते. तर कोणत्याही कमजोरीला समाप्त करण्यासाठी दाता आणि विधाता बना.
जर तुम्ही इतरांना बाबांचा खजिना देण्यासाठी निमित्त आधार बनाल तर कमजोरी स्वतः दूर
होतील. आपल्या दाता-विधाता पणाच्या शक्तिशाली संस्काराला इमर्ज कराल तर कमजोर
संस्कार स्वतः समाप्त होतील.
सुविचार:-
आपल्या श्रेष्ठ
भाग्याचे गुण गात रहा - कमजोरींचे नाही.
अव्यक्त इशारे:-
सहजयोगी बनायचे असेल तर परमात्म प्रेमाचे अनुभवी बना. ज्याच्यावर प्रेम असते, त्याला
जे आवडते तेच केले जाते. तर बाबांना मुलांचे अपसेट होणे आवडत नाही, म्हणून कधीही असे
म्हणू नका की, ‘काय करू, गोष्टच अशी होती म्हणून अपसेट झालो…’ जर गोष्ट अपसेट
होण्याची जरी आली तरीही तुम्ही अपसेट स्थितीमध्ये येऊ नका. मनापासून ‘बाबा’ म्हणा
आणि त्याच प्रेमामध्ये सामावून जा.