24-09-2025      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - बाबा आले आहेत तुमची बॅटरी चार्ज करण्यासाठी, जितके तुम्ही आठवणीमध्ये रहाल तितकी बॅटरी चार्ज होत राहील”

प्रश्न:-
तुमच्या सत्यतेच्या नावेला वादळे का लागतात?

उत्तर:-
कारण यावेळी आर्टिफिशिअल खूप निघाले आहेत. कोणी स्वतःला भगवान म्हणतात, कोणी रिद्धी- सिद्धी दाखवतात, म्हणून मनुष्य सत्याला पारखू शकत नाहीत. सत्यतेच्या नावेला हलवण्याचा प्रयत्न करतात. परंतु तुम्ही जाणता आपली सत्यतेची नाव कधीही बुडू शकत नाही. आज जे विघ्न घालतात, ते उद्या समजतील की, सद्गतीचा रस्ता इथेच भेटणार आहे. सर्वांसाठी ही एकच हट्टी (हे एकच दुकान) आहे.

ओम शांती।
रुहानी मुलांप्रती अथवा आत्म्यांप्रति कारण रुह अथवा आत्मा ऐकते कानांद्वारे. धारणा आत्म्यामध्ये होते. बाबांच्या आत्म्यामध्ये देखील ज्ञान भरलेले आहे. मुलांना आत्म-अभिमानी बनायचे आहे या जन्मामध्ये. भक्ती मार्गाचे ६३ जन्म, द्वापर युगापासून तुम्ही देह-अभिमानामध्ये राहता, आत्मा काय आहे, हे ठाऊक नसते. आत्मा आहे जरूर. आत्माच शरीरामध्ये प्रवेश करते. दुःख देखील आत्म्यालाच होते. म्हटले देखील जाते पतित आत्मा, पावन आत्मा. ‘पतित-परमात्मा’ असे कधी ऐकलेले नाही. सर्वांमध्ये जर परमात्मा असला असता तर ‘पतित परमात्मा’ म्हटले गेले असते. तर मुख्य गोष्ट आहे आत्म-अभिमानी बनणे. आत्मा किती छोटी आहे, त्यामध्ये कसा पार्ट भरलेला आहे, हे कोणालाच माहित नाहीये. तुम्ही तर नवीन गोष्ट ऐकता. ही आठवणीची यात्रा देखील बाबाच शिकवतात, आणखी कोणीही शिकवू शकत नाही. मेहनत देखील यातच आहे. स्वतःला निरंतर आत्मा समजायचे आहे. जसे बघा ही इमर्जन्सी लाइट आली आहे, जी बॅटरीवर चालते. याला मग चार्ज करतात. बाबा आहेत सर्वात मोठी पॉवर (शक्ती). आत्मे किती असंख्य आहेत. सर्वांना त्या पॉवरने भरायचे आहे. बाबा आहेत सर्वशक्तिमान. आम्हा आत्म्यांचा त्यांच्याशी योग नसेल तर बॅटरी चार्ज कशी होणार? डिस्चार्ज होण्यासाठी सारे कल्प लागते. आता पुन्हा बॅटरी चार्ज करायची आहे. मुले समजतात आपली बॅटरी डिस्चार्ज झाली आहे, आता पुन्हा चार्ज करायची आहे. ती कशी? बाबा म्हणतात - माझ्याशी योग लावा. ही तर समजण्यास खूप सोपी गोष्ट आहे. बाबा म्हणतात - माझ्याशी बुद्धी-योग लावा तर तुमच्या आत्म्यामध्ये पॉवर भरून सतोप्रधान बनेल. शिक्षण तर आहेच कमाई. आठवणीने तुम्ही पावन बनता. आयुष्य वाढते. बॅटरी चार्ज होते. प्रत्येकाने बघायचे आहे - आपण बाबांची किती आठवण करतो. बाबांना विसरल्यामुळेच बॅटरी डिस्चार्ज होते, कोणाचेही खरे कनेक्शन नाहीये. खरे कनेक्शन आहेच मुळी तुम्हा मुलांचे. बाबांची आठवण केल्याशिवाय ज्योत जागृत कशी होईल? ज्ञान देखील केवळ एक बाबाच देतात.

तुम्ही जाणता ज्ञान आहे दिवस, भक्ती आहे रात्र. मग रात्रीपासून वैराग्य येते, तेव्हा मग दिवस सुरु होतो. बाबा म्हणतात - रात्रीला विसरा, आता दिवसाची आठवण करा. स्वर्ग आहे - दिवस, नरक आहे - रात्र. तुम्ही मुले आता चैतन्यमध्ये आहात, हे शरीर तर विनाशी आहे. मातीचे बनते, मातीमध्ये मिसळून जाते. आत्मा तर अविनाशी आहे ना. बाकी बॅटरी डिस्चार्ज होते. आता तुम्ही किती बुद्धिवान बनता. तुमची बुद्धी घरी निघून जाते. तिथून आपण आलो आहोत. इथे सूक्ष्मवतन विषयी तर ठाऊक झाले आहे. तिथे विष्णूच्या चार भुजा दाखवतात. इथे तर चार भुजा असत नाहीत. हे तर कोणाच्याही बुद्धीमध्ये नसेल की ब्रह्मा-सरस्वती तेच लक्ष्मी-नारायण बनतात, म्हणून विष्णूला चार भुजा दाखविल्या आहेत. हे बाबांव्यतिरिक्त इतर कोणीही समजावून सांगू शकणार नाही. आत्म्यामध्येच संस्कार भरले जातात. आत्माच तमोप्रधाना पासून मग सतोप्रधान बनते. आत्मेच बाबांना बोलावतात - ‘ओ बाबा, आम्ही डिस्चार्ज झालो आहोत, आता तुम्ही या, आम्हाला चार्ज व्हायचे आहे’. आता बाबा म्हणत आहेत - ‘जितकी आठवण कराल तितकी ताकद येईल’. बाबांवर खूप प्रेम असायला हवे. बाबा आम्ही तुमचे आहोत, तुमच्या सोबतच घरी जाणार आहोत. जसे माहेराहून सासरचे घेऊन जातात. इथे तुम्हाला दोन पिता मिळाले आहेत, शृंगार करविणारे. शृंगार देखील चांगला पाहिजे अर्थात सर्वगुण संपन्न बनायचे आहे. स्वतःला विचारायचे आहे, माझ्यामध्ये कोणते अवगुण तर नाही आहेत ना. मनसामध्ये जरी वादळे येतात, कर्मणामध्ये तर काही करत नाही ना? कोणाला दुःख तर देत नाही ना? बाबा आहेत दुःख हर्ता, सुख कर्ता. आम्ही देखील सर्वांना सुखाचा मार्ग सांगतो. बाबा खूप युक्त्या सांगत राहतात. तुम्ही तर आहात सेना. तुमचे नावच आहे - ‘प्रजापिता ब्रह्माकुमार-कुमारी’, कोणीही आत आले, तर सर्वप्रथम हे विचारा की कुठून आला आहात? कोणाकडे आला आहात? म्हणतील आम्ही बी. के. जवळ आलो आहोत. अच्छा ब्रह्मा कोण आहेत? प्रजापिता ब्रह्माचे नाव कधी ऐकले आहे का? होय, प्रजापिता ब्रह्माची तुम्ही देखील मुले आहात. ते तुमचे पिता आहेत, फक्त तुम्ही जाणत नाही. प्रजा तर सगळीच आहे ना. ब्रह्मा देखील कोणाचा तरी मुलगा असणार ना. त्यांच्या पित्याचे कोणते शरीर तर दिसून येत नाही. ब्रह्मा-विष्णू-शंकर या तिघांच्याही वरती आहेत शिवबाबा. ‘त्रिमूर्ती शिव’ म्हटले जाते तिघांचे रचयिता. वरती आहेत एक शिवबाबा, नंतर आहेत तिघे. जसा सिजरा (जशी वंशावळ) असते ना. ब्रह्माचे पिता जरूर भगवंतच असणार. ते आहेत आत्म्यांचे पिता. ठीक आहे, मग ब्रह्मा कुठून आले. बाबा म्हणतात मी यांच्यामध्ये प्रवेश करून, यांचे नाव ब्रह्मा ठेवतो. तुम्हा मुलांची नावे ठेवली, तर यांचे देखील नाव ठेवले - ब्रह्मा. म्हणतात - हा माझा दिव्य अलौकिक जन्म आहे. तुम्हा मुलांना तर ॲडॉप्ट करतो. बाकी यांच्यामध्ये प्रवेश करतो आणि तुम्हाला ऐकवतो म्हणून हे झाले बाप-दादा. ज्यांच्यामध्ये प्रवेश केला त्यांची आत्मा तर आहे ना. त्यांच्या बाजूला येऊन बसतो. दोन आत्म्यांचा पार्ट तर इथे खूप चालतो. आत्म्याला बोलावतात तर आत्मा कुठे येऊन बसेल. जरूर ब्राह्मणाच्या बाजूला येऊन बसेल. हे देखील दोन आत्मे आहेत बाबा आणि दादा. यांच्यासाठी (ब्रह्मा बाबांसाठी) बाबा म्हणतात - आपल्या जन्मांना जाणत नाही. तुम्हाला देखील म्हणतात - तुम्ही आपल्या जन्मांना जाणत नव्हता. आता स्मृती आली आहे कल्प-कल्प ८४ चे चक्र फिरलो आहोत, मग परत जातो. हे आहे संगमयुग. आता ट्रान्सफर होत आहोत. योगाद्वारे तुम्ही सतोप्रधान बनाल, बॅटरी चार्ज होईल. मग सतयुगामध्ये याल. बुद्धीमध्ये सारे चक्र फिरत राहते. डिटेलमध्ये तर जाऊ शकणार नाही. झाडाचे देखील आयुर्मान असते, नंतर मग सुकून जाते. इथे देखील सगळे मनुष्य जसे सुकून गेले आहेत. सगळे एकमेकांना दुःख देत राहतात. आता सर्वांचे शरीर नष्ट होऊन जाईल. बाकी आत्मे निघून जातील. हे ज्ञान बाबांशिवाय इतर कोणीही देऊ शकणार नाही. बाबाच विश्वाची बादशाही देतात, त्यांची किती आठवण केली पाहिजे. आठवणीमध्ये न राहिल्याने मायेची थप्पड बसते. सर्वात कडक थप्पड आहे विकाराची. युद्धाच्या मैदानामध्ये तुम्ही ब्राह्मणच आहात ना, तर वादळे तुमच्यासमोरच येतील. परंतु कोणतेही विकर्म करायचे नाही. विकर्म केले तर हार पत्करावी लागेल. बाबांना विचारतात - असे करावे लागते. मुले त्रास देतात तर राग येतो. मुलांना चांगल्या रीतीने सांभाळले नाहीत तर बिघडतील. शक्यतो थप्पड नका मारू. श्रीकृष्णासाठी देखील दाखवतात ना उखळाला बांधले. दोरीने बांधा, भोजन देऊ नका. रडून-रडून शेवटी म्हणतील ठीक आहे, ‘आता असे करणार नाही’. मुल आहे परत देखील करेल, शिक्षा द्यायची आहे. बाबा देखील मुलांना शिक्षा देतात - मुलांनो, कधीही विकारामध्ये जाऊ नका, कुल-कलंकित बनू नका. लौकिक मध्ये देखील एखादा मुलगा कुपुत्र असतो तर आई-वडील म्हणतात ना - ‘हे काय काळे तोंड करतोस’. कुळाला कलंक लावतोस. हार-जीत, जिंकणे-हरणे, होता-होता शेवटी जीत होईल. सत्याची बेडी (नाव) आहे, वादळे खूप येतील कारण आर्टिफिशियल (ढोंगी) बरेच निघाले आहेत. कोणी स्वतःला भगवान म्हणतात, कोणी काय म्हणतात. रिद्धी-सिद्धी देखील खूप दाखवतात. साक्षात्कार देखील घडवतात. बाबा येतातच सर्वांची सद्गती करण्यासाठी. मग ना हे जंगल राहणार, ना जंगलामध्ये राहणारे राहतील. आता तुम्ही आहात संगमयुगावर, जाणता की ही जुनी दुनिया कब्रस्तान बनली आहे. कोणी मरणाऱ्यावर थोडेच मन गुंतवतात, ही दुनिया तर गेली की गेली. विनाश झाला की झाला. बाबा येतातच तेव्हा जेव्हा नवीन दुनिया जुनी होते. बाबांची चांगल्या रीतीने आठवण कराल तर बॅटरी चार्ज होईल. भले वाणी तर खूप छान-छान चालवतात. परंतु आठवणीचे जौहर (धार) नसेल तर ती ताकद रहात नाही. धारदार तलवार (शक्तिशाली तलवार) नाही. बाबा म्हणतात - ही काही नवीन गोष्ट नाहीये. ५ हजार वर्षांपूर्वी सुद्धा आला होता. बाबा विचारत आहेत - ‘अगोदर कधी भेटला होता?’ तर म्हणतात - ‘कल्पापूर्वी भेटलो होतो’. कोणी मग म्हणतात - ड्रामा आपोआपच पुरुषार्थ करून घेईल. ठीक आहे, आता ड्रामा पुरुषार्थ करवून घेत आहे ना, तर करा. एका जागी बसून तर रहायचे नाहीये. ज्यांनी कल्पापूर्वी पुरुषार्थ केला आहे, ते करतील. अजूनपर्यंत जे आलेले नाहीत, ते येणार आहेत. जे चालता-चालता पळून गेले, जाऊन लग्न इत्यादी केले, त्यांचा देखील ड्रामामध्ये जर पार्ट असेल तर येऊन पुन्हा पुरुषार्थ करतील, जातील कुठे. शेवटी सर्वांना बाबांसमोरच शेपटी लटकवावी लागेल (शरण पत्करावी लागेल). लिहिलेले आहे - भीष्म-पितामह इत्यादीं देखील अंतिम वेळी येतात. अजून तर किती घमेंड आहे मग त्यांची ती घमेंड उतरेल. तुम्ही देखील दर ५ हजार वर्षानंतर पार्ट बजावता, राजाई घेता, गमावता. दिवसेंदिवस सेंटर्स वाढत जातात. भारतवासी जे खास देवी-देवतांचे पुजारी आहेत त्यांना समजावून सांगायचे आहे, सतयुगामध्ये देवी-देवता धर्म होता तर त्यांची पूजा करतात. ख्रिश्चन लोक क्राईस्टची महिमा करतात, आम्ही आदि सनातन देवी-देवता धर्माची महिमा करतो. तो कोणी स्थापन केला. ते लोक समजतात कृष्णाने स्थापन केला म्हणून त्यांची पूजा करतात. तुमच्यामध्ये देखील नंबरवार आहेत. कोणी किती मेहनत करतात, कोणी किती. दाखवतात ना गोवर्धन पर्वताला करंगळीवर उचलले.

आता ही जुनी दुनिया आहे, सर्व वस्तूंमधून ताकद निघून गेली आहे. सोने देखील खाणींमधून निघत नाही, स्वर्गामध्ये तर सोन्याचे महाल बनतात, आता तर गव्हर्मेंट वैतागून जाते कारण कर्ज द्यावे लागते. तिथे तर अथाह धन आहे. भिंतींना देखील हिरे-माणके जडवलेली असतात. हिऱ्यांनी जडवण्याची आवड असते. तिथे धनाची कमतरता नाही. कुबेराचा खजिना असतो. ‘अल्लाह अवलदीन’चा एक खेळ दाखवतात. ठका केल्याने (टाळी वाजल्यावर) महाल प्रकट होतात. इथे देखील दिव्य-दृष्टी मिळाल्याने स्वर्गामध्ये जातात. तिथे प्रिन्स-प्रिन्सेसकडे बासरी इत्यादी सर्व वस्तू हिऱ्यांच्या असतात. इथे तर अशी कोणती वस्तू घालून बसले तर लुटून नेतील. सुरा खुपसून देखील घेऊन जातील. तिथे अशा गोष्टी होत नाहीत. ही दुनियाच अगदी जुनी घाणेरडी आहे. या लक्ष्मी-नारायणाची दुनिया तर वाह-वाह होती. हिरे-माणकांचे महाल होते. एकटे तर नसतील ना. त्याला म्हटले जात होते - स्वर्ग, तुम्ही जाणता बरोबर आपण स्वर्गाचे मालक होतो. आम्ही हे सोमनाथचे मंदिर बनवले होते. हे समजतात की, आपण काय होतो, मग भक्तीमार्गामध्ये कशी मंदिरे बांधून पूजा केली. आत्म्याला आपल्या ८४ जन्मांचे ज्ञान आहे. कित्ती हिरे-माणके होती, ते सर्व कुठे गेले. हळू-हळू सगळे नष्ट होत गेले. मुसलमान आले, इतके काही लुटून घेऊन गेले जे हिरे कबरींमध्ये नेऊन लावले, ताजमहाल इत्यादी बनवले. मग ब्रिटिश गव्हर्मेंट ते खोदून काढून घेऊन गेली. आता तर काहीच नाहीये. भारत गरीब आहे, कर्जच कर्ज घेत राहतात. धान्य, साखर इत्यादी काहीच मिळत नाही. आता विश्वाला बदलायचे आहे. परंतु त्याआधी आत्म्याच्या बॅटरीला सतोप्रधान बनविण्यासाठी चार्ज करायचे आहे. बाबांची आठवण जरुर करायची आहे. बुद्धीचा योग बाबांसोबत असावा, त्यांच्याकडूनच वारसा मिळतो. यामध्येच मायेचे युद्ध होते. अगोदर या गोष्टींना तुम्ही थोडेच समजत होता. जसे बाकीचे होते तसेच तुम्ही होता. तुम्ही आता आहात संगमयुगी आणि ते सर्व आहेत कलियुगी. मनुष्य म्हणतील - हे तर जे येते ते बोलत राहतात. परंतु समजावून सांगण्याच्या युक्त्या देखील असतात ना. हळू-हळू तुमची वृद्धी होत जाईल. आता बाबा मोठी युनिव्हर्सिटी उघडत आहेत. यामध्ये समजावून सांगण्यासाठी चित्रे तर पाहिजेत ना. पुढे जाऊन तुमच्यापाशी ही सर्व चित्रे ट्रांसलाईटची बनतील जी मग तुम्हाला समजावून सांगण्यासाठी देखील सोपी होतील.

तुम्ही जाणता आम्ही आमची बादशाही पुन्हा स्थापन करत आहोत, बाबांची आठवण आणि ज्ञानाद्वारे. माया मधेच येऊन खूप फसवते. बाबा म्हणतात - धोक्यापासून सावध रहा. युक्त्या तर सांगत राहतात. मुखाने केवळ एवढेच बोला की, बाबांची आठवण करा तर तुमची विकर्म विनाश होतील आणि तुम्ही असे लक्ष्मी-नारायण बनाल. हे बॅज इत्यादी भगवंताने स्वतः बनवले आहेत, तर याची किती कदर केली पाहिजे. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) सर्व गुणांनी आपला शृंगार करायचा आहे, कधी कोणाला दुःख द्यायचे नाही. सर्वांना सुखाचा मार्ग सांगायचा आहे.

२) संपूर्ण दुनिया कब्रस्तान झालेली आहे त्यामुळे यामध्ये मन गुंतवायचे नाही. स्मृती रहावी की आता आपण ट्रांसफर होत आहोत, आम्हाला तर नवीन दुनियेमध्ये जायचे आहे.

वरदान:-
माया किंवा विघ्नांपासून सेफ राहणारे बापदादांच्या छत्रछायेचे अधिकारी भव

जे बापदादांचे सिकीलधे लाडके आहेत त्यांना बापदादांची छत्रछाया अधिकार रूपामध्ये प्राप्त होते. ज्या छत्रछाये मध्ये येण्याची मायेची ताकद नाही. ते सदैव मायेवर विजय प्राप्त करतात. ही आठवण रुपी छत्रछाया सर्व विघ्नांपासून सेफ करते (सुरक्षित ठेवते). छत्रछायेमध्ये राहणाऱ्याकडे कोणत्याही प्रकारचे विघ्न येऊ शकत नाही. छत्रछायेमध्ये राहणाऱ्यांसाठी कठीण ते कठीण गोष्ट सुद्धा सोपी होऊन जाते. पहाडा सारख्या गोष्टी कापसा समान अनुभव होतात.

बोधवाक्य:-
प्रभू प्रिय, लोक प्रिय, आणि स्वयं प्रिय बनण्याकरिता संतुष्टतेचा गुण धारण करा.

अव्यक्त इशारे:- आता लगनच्या (एकाग्रतेच्या) अग्नीला प्रज्वलित करून योगाला ज्वाला रूपी बनवा. विशेष आठवणीच्या यात्रेला पॉवरफुल बनवा, ज्ञान-स्वरूपाचे अनुभवी बना. तुम्हा श्रेष्ठ आत्म्यांची शुभ वृत्ती तसेच कल्याणाची वृत्ती आणि शक्तिशाली वातावरण अनेक तडफडणाऱ्या, भटकणाऱ्या, हाक मारणाऱ्या आत्म्यांना आनंद, शांती आणि शक्तीची अनुभूती करवेल.