24-09-2026
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
प्रश्न:-
तुम्हा मुलांना
आपल्या गृहस्थव्यवहारामध्ये अतिशय जपून चालायचे आहे - असे का ?
उत्तर:-
कारण तुमची
गत-मत सर्वांपेक्षा न्यारी आहे (वेगळी आहे). तुमचे ज्ञान गुप्त आहे; त्यामुळे
विशाल-बुद्धी बनून सर्वांशी तोड निभावायची आहे. मनामध्ये असे समजायचे आहे की आपण
सर्व भाऊ-भाऊ अथवा भाऊ-बहीण आहोत. बाकी असे नाही की पत्नी आपल्या पतीला म्हणेल की,
‘तुम्ही माझे भाऊ आहात’. असे ऐकणारे म्हणतील - ‘यांना काय झाले आहे?’ युक्तीने
चालायचे आहे.
ओम शांती।
रुहानी बाबा
बसून मुलांना समजावून सांगतात. ‘रुहानी’ शब्द न म्हणता फक्त ‘बाबा’ म्हटले तरी
देखील समजते की, हे ‘रुहानी बाबा’ आहेत. बाबा बसून मुलांना समजावून सांगतात. सर्वजण
स्वतःला भाऊ-भाऊ तर म्हणतातच. तर बाबा बसून मुलांना समजावून सांगतात. सर्वांनाच काही
समजावून सांगत नसतील. गीतेमध्ये देखील लिहिलेले आहे भगवानुवाच. कोणा प्रती? सर्व जण
भगवंताची मुले आहेत. ते भगवान पिता आहेत तर भगवंताची सर्व मुले ब्रदर्स आहेत.
भगवंतानेच सांगितले असेल, राजयोग शिकविला असेल. आता तुमच्या बुद्धीचे कुलूप उघडले
आहे, असे विचार तुमच्या शिवाय इतर कोणाचेही चालू शकत नाहीत. ज्यांना-ज्यांना संदेश
मिळत जाईल ते स्कूलमध्ये येत जातील आणि शिकत जातील. म्हणतील - ‘प्रदर्शनी तर पाहिली,
आता जाऊन आणखी ऐकूया’. सर्वप्रथम मुख्य गोष्ट आहे ज्ञानसागर पतित-पावन, गीता ज्ञान
दाता शिव भगवानुवाच. त्यांना हे माहीत झाले पाहिजे की, यांना शिकविणारे, समजावून
सांगणारे कोण आहेत. ते सुप्रीम सोल, ज्ञान-सागर, निराकार आहेत. ते आहेतच सत्य. ते
सत्यच सांगतील, मग त्यामध्ये कोणताही प्रश्न मनामध्ये उत्पन्न होऊ शकत नाही. तुम्ही
सर्व काही सत्य बाबांवर सोपवले आहे. सर्वप्रथम तर हे समजावून सांगायचे आहे की,
आम्हाला परमपिता परमात्मा ब्रह्मा द्वारे राजयोग शिकवतात. हे राजाईचे पद आहे, ज्याला
हा निश्चय होईल की, ‘जे सर्वांचे पिता आहेत, ते पारलौकिक बाबा बसून समजावून सांगत
आहेत, आणि तेच सर्वांत मोठी ऑथॉरिटी आहेत’; तर मग दुसरा कोणताही प्रश्न मनामध्ये
उत्पन्न होऊ शकत नाही. ते आहेत पतित-पावन. ते जेव्हा इथे येतात तेव्हा जरूर आपल्या
निश्चित वेळेवर येत असतील. तुम्ही पाहता देखील की, हे तेच महाभारत युद्ध आहे. विनाशा
नंतर वाइसलेस (निर्विकारी) दुनिया होणार आहे. मनुष्य हे जाणत नाहीत की, भारतच
निर्विकारी होता. बुद्धीच चालत नाही. गोदरेजचे कुलूप लागलेले आहे. त्याची चावी फक्त
एका बाबांकडेच आहे म्हणून हे कोणालाच ठाऊक नाहीये की, तुम्हाला शिकविणारे कोण आहेत.
दादा (ब्रह्मा बाबा) शिकवत आहेत असे समजतात, त्यामुळे टिका करतात, काहीतरी बोलतात;
म्हणून सर्वप्रथम हे समजावून सांगा - यामध्ये लिहिलेले आहे - शिव भगवानुवाच. ते तर
आहेतच सत्य. बाबा आहेतच नॉलेजफुल. ते सृष्टीच्या आदि-मध्य-अंताचे रहस्य समजावून
सांगतात. हे शिक्षण आता तुम्हाला त्या बेहदच्या बाबांकडून मिळत आहे. तेच सृष्टीचे
रचयिता आहेत, पतित सृष्टीला पावन बनविणारे आहेत. तर सर्वप्रथम बाबांचाच परिचय
द्यायचा आहे. त्या परमपिता परमात्म्याशी तुमचे काय नाते आहे? ते नरापासून नारायण
बनण्याचे सत्य नॉलेज देतात. मुले जाणतात - बाबा सत्य आहेत, बाबाच सचखंड बनवतात.
तुम्ही इथे आलाच आहात नरापासून नारायण बनण्याकरिता. बॅरिस्टरकडे जातील तर समजतील की
आपण बॅरिस्टर बनण्यासाठी आलो आहोत. आता तुम्हाला निश्चय आहे की आपल्याला स्वयं
भगवान शिकवत आहेत. अनेक जण निश्चय करतात देखील आणि मग संशय-बुद्धी बनतात, तेव्हा
सर्व जण त्यांना म्हणतात - ‘तुम्ही तर म्हणत होता की, आम्हाला भगवान शिकवतात. मग
भगवंताला सोडून का आलात?’ संशय आल्यामुळेच भागन्ती होतात. कोणते ना कोणते विकर्म
करतात. भगवानुवाच - काम महाशत्रू आहे, त्याच्यावर विजय प्राप्त केल्यानेच जगतजीत
बनाल. जे पावन बनतील, तेच पावन दुनियेमध्ये जातील. इथे आहेच राजयोगाची गोष्ट, तुम्ही
जाऊन राजाई कराल. बाकीचे जे आत्मे आहेत, ते आपला कर्मांचा हिशोब चुकता करून परत घरी
निघून जातील. ही कयामतची (महाविनाशाची) वेळ आहे. आता बुद्धी म्हणते - सतयुगाची
स्थापना जरूर होणार आहे. पावन दुनिया सतयुगाला म्हटले जाते. बाकीचे सर्व मुक्तिधाम
मध्ये निघून जातील. त्यांना पुन्हा आपला पार्ट रिपीट करायचा आहे. तुम्ही देखील आपला
पुरुषार्थ करत राहता. पावन बनून पावन दुनियेचे मालक बनण्याकरिता. स्वतःला मालक तर
समजाल ना. प्रजा देखील मालक असते. आता प्रजा देखील म्हणते ना - आमचा भारत. तुम्ही
समजता - आता सगळे नरकवासी आहेत. आता आपण स्वर्गवासी बनण्यासाठी राजयोग शिकत आहोत.
सगळेच काही स्वर्गवासी बनणार नाहीत. बाबा म्हणतात - जेव्हा भक्तिमार्ग पूर्ण होईल
तेव्हाच मी येईन. मलाच येऊन सर्व भक्तांना भक्तीचे फळ द्यायचे आहे. मेजॉरिटी तर
भक्तांचीच आहे ना. सर्व जण बोलावत राहतात - ‘हे गॉडफादर’. भक्तांच्या मुखातून ‘ओ
गॉड फादर’, ‘हे भगवान’ असे जरूर निघेल. आता भक्ती आणि ज्ञानामध्ये फरक आहे. तुमच्या
मुखातून कधीही ‘हे ईश्वर’, ‘हे भगवान’, असे निघणार नाही. लोकांना तर अर्ध्या
कल्पापासून ही सवय लागलेली आहे. तुम्ही जाणता, ते आपले पिता आहेत, तुम्हाला ‘हे बाबा’
असे थोडेच म्हणायचे आहे. तुम्हाला तर बाबांकडून वारसा घ्यायचा आहे. सर्वात पहिले तर
हा निश्चय व्हावा की आपण बाबांकडून वारसा घेत आहोत. बाबा मुलांना वारसा घेण्याचे
अधिकारी बनवतात. हे तर सच्चे बाबा आहेत ना. बाबा जाणतात - ज्या मुलांना मी
ज्ञान-अमृत पाजून, ज्ञान-चितेवर बसवून, विश्वाचे मालक देवता बनवले होते, तीच मुले
काम-चितेवर बसून भस्मीभूत झाली आहेत.
आता मी पुन्हा
ज्ञान-चितेवर बसवून, घोर निद्रेतून जागे करून स्वर्गामध्ये घेऊन जातो.
बाबांनी समजावून
सांगितले आहे - तुम्ही आत्मे तिथे शांतीधाम आणि सुखधाममध्ये राहता. सुखधामला म्हटले
जाते वाईसलेस वर्ल्ड, संपूर्ण निर्विकारी दुनिया. तिथे देवता राहतात आणि ते आहे
स्वीट होम अर्थात आत्म्यांचे घर आहे. सर्व ॲक्टर्स त्या शांतीधाममधून इथे पार्ट
बजावण्याकरिता येतात. आपण आत्मे इथले रहिवासी नाही आहोत. ते (दुनियेतील) ॲक्टर्स
इथलेच रहिवासी असतात. ते फक्त घरातून येऊन ड्रेस बदलून पार्ट बजावतात. तुम्ही तर
समजता आपले घर शांतीधाम आहे, जिथे आपण पुन्हा परत जातो. जेव्हा सर्व ॲक्टर्स
स्टेजवर येतात, तेव्हा बाबा येऊन सर्वांना घेऊन जातात, म्हणून त्यांना लिबरेटर,
गाइड देखील म्हटले जाते. ते दुःख हर्ता, सुख कर्ता आहेत, तर हे एवढे सर्व मनुष्य
कुठे जातील? विचार तर करा - पतित-पावनाला कशासाठी बोलावतात? आपल्या मृत्यू करिता.
दुःखाच्या दुनियेमध्ये राहू इच्छित नाहीत, म्हणून म्हणतात - आम्हाला घरी घेऊन चला.
हे सर्व मुक्तीलाच मानणारे आहेत. भारताचा प्राचीन योग देखील किती प्रसिद्ध आहे,
परदेशामध्ये देखील प्राचीन राजयोग शिकविण्यासाठी जातात. ख्रिश्चनांमध्ये असे भरपूर
आहेत, जे संन्याशांचा मान ठेवतात. गेरू रंगाची कफनी हा हठयोग्यांचा पोशाख आहे.
तुम्हाला काही घरदार तर सोडायचे नाहीये. पांढरे कपडेच घालावेत असेही काही बंधन
नाहीये. परंतु पांढरा रंग चांगला आहे. तुम्ही भट्टीमध्ये राहिलात म्हणून तुमचा
ड्रेस देखील असा बनला. आजकाल लोकांना पांढरा रंग जास्त आवडतो. व्यक्तीचा मृत्यू होतो
तेव्हा त्याच्यावर पांढरी चादर टाकली जाते. तर सर्वप्रथम कोणालाही बाबांचा परिचय
द्यायचा आहे. दोन पिता आहेत, या गोष्टी समजण्यासाठी वेळ लागतो. प्रदर्शनीमध्ये इतके
समजावून सांगता येणार नाही. सतयुगामध्ये एक पिता असतो, या वेळी तुम्हाला तीन पिता
आहेत, कारण भगवान प्रजापिता ब्रह्माच्या तनामध्ये येतात. ते देखील सर्वांचे पिता
आहेत. अच्छा आता या तीन पित्यांमध्ये उच्च वारसा कोणाचा आहे? निराकार बाबा वारसा कसा
देतील? ते मग ब्रह्मा द्वारे देतात. ब्रह्मा द्वारे स्थापना करतात आणि ब्रह्मा
द्वारेच वारसा देखील देतात. या चित्रावर तुम्ही खूप चांगल्या रीतीने समजावून सांगू
शकता. पहिले शिवबाबा आहेत, नंतर हे प्रजापिता ब्रह्मा आदि देव, आदि देवी. हे आहेत
ग्रेट-ग्रेट ग्रँड फादर. बाबा म्हणतात - मज ‘शिव’ला ग्रेट-ग्रेट ग्रँड फादर म्हणता
येणार नाही. मी सर्वांचा पिता आहे. हे आहेत प्रजापिता ब्रह्मा. तुम्ही भाऊ-बहीण झाला,
आपसामध्ये अनैतिक कृत्य करू शकत नाही. जर दोघांचीही एकमेकांकडे विकारी दृष्टी
आकर्षित होत असेल, तर मग ते खाली कोसळतात, बाबांना विसरतात. बाबा म्हणतात - तुम्ही
माझी मुले बनून तोंड काळे करता. बेहदचे बाबा मुलांना समजावून सांगतात. तुम्हाला हा
नशा चढलेला आहे. तुम्ही जाणता की, गृहस्थ व्यवहारामध्ये देखील राहायचे आहे. लौकिक
नातेवाईकांना देखील तोंड द्यायचे आहे. लौकिक पित्याला तुम्ही ‘बाबा’ म्हणाल ना.
त्यांना तुम्ही भाऊ म्हणू शकत नाही. सर्वसामान्यपणे पित्याला ‘बाबा’च म्हणाल.
बुद्धीमध्ये आहे की, हे आमचे लौकिक पिता आहेत. ज्ञान तर आहे ना. हे ज्ञान खूप
विचित्र आहे. आजकाल काही जण नाव देखील घेतात परंतु एखाद्या बाहेरच्या विजिटर समोर
पतीला भाई म्हटले, तर तो समजेल की यांचे डोके फिरले आहे. अशावेळी खूप युक्तीने वागले
पाहिजे. तुमचे ज्ञान गुप्त आहे, नाते देखील गुप्त आहे. बहुतेक स्त्रिया पतीचे नाव
घेत नाहीत. पती मात्र पत्नीचे नाव घेऊ शकतो. याबाबतीत खूप युक्तीने चालायचे आहे.
लौकिक लोकांशी देखील तोड निभावायची आहे. बुद्धी वर (परमधाममध्ये) निघून गेली पाहिजे.
आपण बाबांकडून वारसा घेत आहोत. बाकी काकांना काका, पित्याला बाबा म्हणावे लागेल ना.
जे ब्रह्माकुमार-कुमारी बनलेले नाहीत ते स्वतःला भाऊ-बहीण समजणार नाहीत. जे बी.के.
बनले आहेत, तेच या गोष्टींना समजतील. बाहेरचे तर ऐकताच चकित होतील. यासाठी चांगली
तीक्ष्ण-बुद्धी पाहिजे. बाबा तर मुलांना विशाल-बुद्धी बनवतात. यापूर्वी तुम्ही
हदच्या बुद्धीमध्ये होता. आता बुद्धी बेहदमध्ये जाते. ते आपले बेहदचे बाबा आहेत. हे
सर्व आपले भाऊ-बहीणी आहेत. परंतु घरामध्ये सासूला सासूच म्हणाल, बहीण थोडेच म्हणाल.
घरामध्ये राहताना खूप युक्तीने चालायचे आहे; नाहीतर लोक म्हणतील - हे तर पतीला -
भाऊ आणि सासूला - बहीण म्हणतात, हे काय आहे? या ज्ञानाच्या गोष्टी तुम्हीच जाणता,
इतर कोणीही जाणत नाही. म्हणतात ना - ‘प्रभू तुमची गत-मत तुम्हीच जाणता’. आता तुम्ही
त्यांची संतान बनता, तर तुमची गत-मत तुम्हीच जाणता. खूप जपून चालावे लागते. कुठेही
कोणी गोंधळून जाऊ नये.
प्रदर्शनीमध्ये तर
सर्वप्रथम तुम्हा मुलांना हे समजावून सांगायचे आहे की, आम्हाला शिकविणारे भगवान
आहेत. आता तुम्ही सांगा - भगवान कोण? निराकार शिव की देहधारी श्रीकृष्ण? गीतेमध्ये
जे भगवानुवाच आहे, ते महावाक्य शिव परमात्म्याने उच्चारले आहेत की श्रीकृष्णाने?
श्रीकृष्ण तर स्वर्गाचा पहिला प्रिन्स आहे. असे तर म्हणू शकत नाही की, श्रीकृष्ण
जयंती सो शिव जयंती. शिव जयंती नंतर मग श्रीकृष्ण जयंती. शिव जयंतीमुळे स्वर्गाचा
प्रिन्स श्रीकृष्ण कसा बनला, ही समजून घेण्याची गोष्ट आहे. शिव जयंती, मग गीता जयंती
आणि त्यानंतर लगेचच आहे श्रीकृष्ण जयंती; कारण बाबा राजयोग शिकवतात ना. मुलांच्या
बुद्धीमध्ये आले आहे ना. जोपर्यंत शिव परमात्मा येत नाहीत तोपर्यंत शिव जयंती साजरी
होऊ शकत नाही. जोपर्यंत शिव येऊन कृष्णपुरीची स्थापना करत नाहीत, तोपर्यंत
श्रीकृष्ण जयंती देखील कशी साजरी होऊ शकेल. श्रीकृष्णाचा जन्म तर साजरा करतात परंतु
समजतात थोडेच. श्रीकृष्ण पहिला प्रिन्स होता तर जरूर सतयुगामध्ये असेल ना. जरूर
देवी-देवतांची राजधानी असेल. बादशाही फक्त एका श्रीकृष्णाला तर मिळणार नाही ना.
जरूर कृष्णपुरी असेल ना! म्हणतात देखील - कृष्णपुरी... आणि मग ही आहे कंसपुरी.
कृष्णपुरी आहे - नवीन दुनिया, कंसपुरी आहे - जुनी दुनिया. म्हणतात, देवतांचे आणि
असुरांचे युद्ध झाले. देवतांचा विजय झाला. परंतु असे काही नाहीये. कंसपुरी नष्ट झाली
आणि मग कृष्णपुरीची स्थापना झाली ना. कंसपुरी जुन्या दुनियेमध्ये असेल. नवीन
दुनियेमध्ये हे कंस, दैत्य इत्यादी थोडेच असतील. इथे तर पहा किती मनुष्य आहेत!
सतयुगामध्ये फार थोडे आहेत. हे देखील तुम्हीच समजू शकता. आता तुमची बुद्धी विचार करू
शकते. देवतांनी तर काही कोणते युद्ध केलेले नाही. दैवी संप्रदाय सतयुगामध्येच असतो.
आसुरी संप्रदाय इथे आहे. बाकी ना देवतांची आणि असुरांची लढाई झाली, ना कौरव आणि
पांडवांची लढाई झाली आहे. तुम्ही रावणावर विजय प्राप्त करता. बाबा म्हणतात या
विकारांवर विजय प्राप्त करायचा आहे, तेव्हा मग जगतजीत बनाल. यामध्ये कोणतीही लढाई
करायची नाही. लढाईचे नाव घेतले तर हिंसक बनाल. रावणावर विजय प्राप्त करायचा आहे
परंतु अहिंसेने. फक्त बाबांची आठवण केल्याने आमची विकर्म विनाश होतात. भारताचा
प्राचीन राजयोग प्रसिद्ध आहे.
बाबा म्हणतात -
बुद्धीचा योग माझ्याशी लावा, तर तुमची पापे भस्म होतील. बाबा पतित-पावन आहेत तर
बुद्धियोग त्या बाबांशीच लावायचा आहे, तेव्हाच तुम्ही पतित पासून पावन बनाल. आता
तुम्ही प्रॅक्टिकलमध्ये त्यांच्याशी योग लावत आहात, यामध्ये लढाईची काही गोष्टच नाही.
जे चांगल्या रीतीने शिकतील, बाबांशी योग लावतील, तेच कल्पापूर्वी प्रमाणे बाबांकडून
वारसा प्राप्त करतील. या जुन्या दुनियेचा विनाश देखील होईल. सर्वजण आपल्या कर्मांचा
हिशोब चुकता करून जातील. मग जसे क्लास ट्रान्सफर झाल्यावर नंबरवार जाऊन बसतात ना,
तसे तुम्ही देखील नंबरवार जाऊन तिथे राज्य कराल. किती समजून घेण्याच्या गोष्टी आहेत.
अच्छा!
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१) या
कयामतच्या वेळेला, जेव्हा कि सतयुगाची स्थापना होत आहे तर जरूर पावन बनायचे आहे.
बाबा आणि बाबांच्या कार्याच्या बाबतीत कधीही संशय उत्पन्न होऊ द्यायचा नाही.
२) ज्ञान आणि नाती
गुप्त आहेत, त्यामुळे लौकिकमध्ये अतिशय युक्तीने विशाल-बुद्धी बनून चालायचे आहे. असे
कोणतेही शब्द बोलायचे नाहीत ज्यामुळे ऐकणारे गोंधळून जातील.
वरदान:-
नॉलेजच्या
लाइट - माइट द्वारे कमजोर संस्कारांना नष्ट करणारे शक्ति संपन्न भव
नॉलेज द्वारे आपल्या
कमजोर संस्कारांची जाणीव होते आणि जेव्हा त्या गोष्टीची समज मिळते तेव्हा ते
संस्कार काही काळासाठी दबले जातात; परंतु, ते कमजोर संस्कार पूर्णपणे नष्ट
करण्यासाठी लाइट आणि माइटच्या एक्स्ट्रा फोर्सची आवश्यकता आहे. यासाठी मास्टर
सर्वशक्तिवान, मास्टर नॉलेजफुल असण्या सोबतच ‘चेकिंग मास्टर’ बना. नॉलेज द्वारे
स्वतःमध्ये शक्ती भरा, मनन शक्तीला वाढवा तेव्हा तुम्ही शक्ति संपन्न बनाल.
बोधवाक्य:-
जिथे सर्व
प्राप्ती आहेत, तिथे प्रसन्नता आहे.
अव्यक्त इशारे - आता
आपल्या ‘ दाता ’ स्वरूपाला प्रत्यक्ष करा .
जर दिल्या नंतर असा
देखील संकल्प येत असेल की, मी इतके दिले, तर मला त्याच्या बदल्यात काही मान-सन्मान
अथवा महिमा मिळाली पाहिजे, तर ही देखील घेण्याची भावना झाली. दात्याची मुले जर
घेण्याचा संकल्प जरी करत असतील तर ते दाता झाले नाहीत. हे देखील घेणे झाले,
देणाऱ्याला हे शोभत नाही.