24-10-2026
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
“गोड मुलांनो,
माता-पित्याला फॉलो करून तख्तनशीन बना, यामध्ये काहीही कठीण नाही, फक्त बाबांची
आठवण करा आणि पवित्र बना”
प्रश्न:-
गरीब-निवाज (दीनानाथ)
बाबा आपल्या मुलांचे भाग्य बनविण्यासाठी कोणता सल्ला देतात?
उत्तर:-
मुलांनो,
शिवबाबांना तुमचे काहीही नको आहे. तुम्ही भले खा, प्या, अभ्यास करा - ताजेतवाने
होऊन निघून जा, परंतु मूठभर तांदुळाचे (सुदाम्याच्या पोह्याचे) देखील गायन आहे. २१
जन्मांसाठी श्रीमंत बनायचे असेल तर गरिबाचा एक पैसा देखील श्रीमंताच्या १००
रुपयांच्या बरोबरीचा आहे, त्यामुळे बाबा जेव्हा प्रत्यक्ष येतात तेव्हा आपले सर्व
काही सफल करा.
गीत:-
तुम्ही हो माता
पिता तुम्हीं हो...
ओम शांती।
गाण्याचा अर्थ
तर मुलांना समजला. ते भले बोलावतात, परंतु समजत नाहीत. तुम्ही जाणता ते आमचे पिता
आहेत. खरे तर ते फक्त तुमचे पिता नाहीत परंतु सर्वांचे पिता आहेत. हे देखील समजून
घ्यायचे आहे. जे काही सर्व आत्मे आहेत त्या सर्वांचे पिता जरूर परमात्माच आहेत.
‘बाबा-बाबा’ म्हटल्याने वारसा जरूर आठवतो. बाबांची आठवण केल्यामुळेच विकर्म नष्ट
होतील. बाबा मुलांना म्हणतात की, तुमची आत्मा पतित बनली आहे, आता तिला पावन बनवायचे
आहे. सर्वांचा पिता आहे, तर मुले जरूर निर्विकारी असली पाहिजेत. कोणे एके काळी सर्व
निर्विकारी होते. बाबा स्वतः समजावून सांगत आहेत - जेव्हा लक्ष्मी-नारायणाचे राज्य
होते तेव्हा सर्व निर्विकारी होते. इतके सर्व जे मनुष्य आत्मे बघत आहात ते देखील
निर्विकारी बनतील, कारण शरीर तर नष्ट होईल, बाकी आत्मे जाऊन निराकारी दुनियेमध्ये
राहतात. तिथे विकाराचे तर नामोनिशाण सुद्धा नसते. शरीरच नाहीये. तिथूनच सर्व आत्मे
पार्ट बजावण्यासाठी या दुनियेमध्ये येतात. सर्वप्रथम भारतवासी येतात. भारतामध्ये
सर्वात पहिले या लक्ष्मी-नारायणाचे राज्य होते, तेव्हा इतर धर्माचे लोक निराकारी
दुनियेमध्ये होते. यावेळी सर्व साकार दुनियेमध्ये आहेत. आता बाबा तुम्हा मुलांना
निर्विकारी देवी-देवता बनविण्यासाठी, निर्विकारी बनवत आहेत. जेव्हा तुम्ही
देवी-देवता बनता तेव्हा तुमच्यासाठी जरूर नवी दुनिया पाहिजे. जुनी दुनिया नष्ट झाली
पाहिजे. शास्त्रांमध्ये महाभारत लढाई देखील दाखवली गेली आहे. दाखवतात की, ५ पांडव
बाकी राहिले, ते देखील पर्वतावर विरघळून गेले. कोणीही वाचले नाहीत. अच्छा, तर मग
इतके सर्व आत्मे कुठे गेले? आत्म्याचा काही विनाश तर होत नाही. तर म्हणतील निराकारी
आत्मे, निर्विकारी दुनियेमध्ये निघून गेले. बाबा विकारी दुनिये मधून निराकारी,
निर्विकारी दुनियेमध्ये घेऊन जातात. तुम्ही जाणता बाबांकडून तर जरूर वारसा मिळाला
पाहिजे. आता दुःख वाढले आहे. यावेळी आम्हाला सुख-शांती दोन्ही हवे आहे. भगवंताकडे
सर्व जण मागतात - ‘हे भगवान आम्हाला सुख द्या, शांती द्या’. प्रत्येक मनुष्य
पैशासाठीच पुरुषार्थ करतो. पैसा आहे तर सुख आहे. तुम्हाला बेहदचे बाबा तर खूप
संपत्ती देतात. सतयुगामध्ये तुम्ही किती धनवान होतात. हिरे-माणकांचे महाल होते.
तुम्ही मुले जाणता आम्ही बेहदच्या बाबांकडून बेहदच्या स्वर्गाचा वारसा घेण्यासाठी
आलो आहोत. सर्व दुनिया तर येणार नाही. बाबा भारतामध्येच येतात. भारतवासीच यावेळी
नरकवासी आहेत; आणि मग बाबा स्वर्गवासी बनवतात. भक्तीमध्ये दुःखामुळे बाबांची
जन्मजन्मांतर आठवण केली आहे - ‘हे परमपिता परमात्मा, हे कल्याणकारी दुःख हर्ता, सुख
कर्ता बाबा’; त्यांची आठवण करतात तर जरूर ते येत देखील असतील. असेच फुकट थोडीच आठवण
करतात. वाटते की, भगवान बाबा येऊन भक्तांना फळ देतील. ते तर सर्वांना देतील ना. बाबा
तर सर्वांचे आहेत ना.
तुम्ही जाणता आम्ही
सुखधाममध्ये जाऊ. बाकी सर्व शांतीधाममध्ये जातील. जेव्हा सुखधाममध्ये असतो तेव्हा
संपूर्ण सृष्टीमध्ये सुख-शांती असते. बाबांचे तर मुलांवर प्रेम असते ना आणि मग
मुलांचे देखील आई-बाबांवर प्रेम असते. असे गातात देखील - ‘तुम मात-पिता…’ शरीराचे
माता-पिता असताना देखील गातात - ‘तुम मात-पिता… तुम्हारी कृपा से सुख घनेरे’. लौकिक
माता-पित्यासाठी काही असे गात नाहीत. भले ते देखील मुलांचे संगोपन करतात, कष्ट
करतात, वारसा देतात. लग्न लावून देतात. तरी देखील भरभरून सुख मात्र पारलौकिक
मात-पिताच देतात. आता तुम्ही आहात ईश्वरीय धर्माची मुले. ती सर्व आहेत आसुरी धर्माची
मुले. सतयुगामध्ये मुलांना कधी कोणी दत्तक घेत नाहीत. तिथे तर सुखच सुख आहे. दुःखाचे
नामोनिशाण नसते. बाबा म्हणतात - मी तुम्हाला २१ पिढ्यांसाठी स्वर्गाचे भरभरून सुख
देण्यासाठी आलो आहे.
आता तुम्ही जाणता -
बेहदच्या बाबांकडून आम्ही स्वर्गाचे भरभरून सुख प्राप्त करत आहोत. ही सर्व दुःखाची
बंधने नष्ट होतील. सतयुगामध्ये आहे सुखाचा संबंध, कलियुगामध्ये आहे दुःखाचे बंधन.
बाबा सुखाच्या संबंधामध्ये घेऊन जातात. त्यांना म्हटलेच जाते - दुःख हर्ता, सुख
कर्ता.
बाबा येऊन मुलांची
सेवा करतात. बाबा म्हणतात - ‘मी आज्ञाधारक सेवक आहे’. तुम्ही अर्धाकल्प माझी आठवण
केली आहे, ‘ओ बाबा, येऊन आम्हाला भरभरून सुख द्या’. आता मी देण्यासाठी आलो आहे तर
मग श्रीमतावर चालायचे आहे. हा मृत्यूलोक सर्व नष्ट होणार आहे. अमरलोक स्थापन होत आहे.
अमरपुरीमध्ये जाण्यासाठी अमरनाथ बाबांकडून तुम्ही अमर कथा ऐकत आहात. तिथे तर कोणाचा
मृत्यू होत नाही. मुखावाटे कधीही असे म्हणणार नाहीत की, अमक्याचा मृत्यू झाला. आत्मा
म्हणतो - मी हे जडजडीभूत शरीर सोडून नवीन घेणार. ते तर चांगले झाले ना. तिथे कोणताही
आजार इत्यादी असत नाही. मृत्यूलोकचे नाव सुद्धा नसते. मी तुम्हाला अमरपुरीचा मालक
बनविण्यासाठी आलो आहे. तिथे जेव्हा तुम्ही राज्य कराल तेव्हा तुम्हाला मृत्यूलोक
मधले काहीही आठवणार नाही. खाली उतरता-उतरता आपण काय बनणार आहोत, हे देखील ठाऊक नसते,
नाही तर आनंदच नाहीसा होईल. इथे तर तुम्हाला संपूर्ण चक्र बुद्धीमध्ये ठेवायचे आहे.
बरोबर स्वर्ग होता, आता नरक आहे, म्हणून तर बाबांना बोलवतात. तुम्ही आत्मे
शांतीधामचे रहिवासी आहात. इथे येऊन पार्ट बजावता. इथून तुम्ही संस्कार घेऊन घरी जाल.
मग तिथून येऊन नवीन शरीर धारण करून राज्य कराल. आता तुम्हाला निराकारी, आकारी आणि
साकारी दुनियेचा समाचार ऐकवत आहे. सतयुगामध्ये थोडेच हे माहीत होईल. तिथे तर फक्त
राज्य कराल. ड्रामाला आता तुम्हीच जाणता. तुमची आत्मा जाणते की, सतयुगासाठी आम्ही
पुरुषार्थ करत आहोत. स्वर्गामध्ये जाण्यासाठी लायक जरूर बनू. स्वतःचे देखील कल्याण
आणि दुसऱ्यांचे देखील कल्याण करू. मग त्यांचे आशीर्वाद तुमच्या डोक्यावर मिळत
राहतील. तुमचा प्लॅन बघा कसा आहे. यावेळी सर्वांचा आपला-आपला प्लॅन आहे. बाबांचा
देखील प्लॅन आहे. ते लोक धरणे इत्यादी बनवतात तेव्हा वीज इत्यादीवर किती करोडो रुपये
खर्च करतात. बाबा म्हणतात - आता ते सर्व आहेत आसुरी प्लॅन. आपला आहे ईश्वरीय प्लॅन.
आता कोणाचा प्लॅन विजयी होईल? ते तर आपापसातच भांडून मग युद्ध करतील. सर्वांचे
प्लॅन्स मातीत मिसळून जातील. ते कोणी स्वर्गाची स्थापना तर करत नाहीत. ते जे काही
करतात, ते दुःखासाठी असते. बाबांचा तर प्लॅन आहे स्वर्ग बनविण्याचा. नरकवासी मनुष्य
नरकामध्येच राहण्यासाठी प्लॅन बनवतात. बाबांचा, स्वर्ग बनवण्याचा प्लॅन चालू आहे.
तर तुम्हाला किती आनंद झाला पाहिजे. गातात देखील - ‘तुम्हरी कृपा से सुख घनेरे’. ते
तर पुरुषार्थ करून घ्यायचे आहे ना. बाबा म्हणतात - जे पाहिजे ते घ्या. पाहिजे तर
विश्वाचे मालक राजा-राणी बना, नाहीतर मग दास-दासी बना. जितका पुरुषार्थ कराल. बाबा
फक्त एवढेच सांगतात - एक तर पवित्र बना आणि प्रत्येकाला बाबांचा परिचय देत राहा.
अल्फची आठवण करा तर बे बादशाही तुमची! बाबांची आठवण करण्यामध्येच माया खूप विघ्न
आणते, बुद्धियोग तोडून टाकते. बाबा म्हणतात - जितकी माझी आठवण कराल तितकी पापे
देखील भस्म होतील आणि उच्च पद देखील मिळवाल; म्हणून भारताचा प्राचीन योग प्रसिद्ध
आहे. बाबांना लिबरेटर (मुक्तिदाता) देखील म्हणतात. २१ जन्मांसाठी बाबा तुम्हाला
दुःखातून मुक्त करतात. भारतवासी सुखधाममध्ये असतील, बाकी सर्व शांतीधाममध्ये असतील.
निराकारी दुनियेचा आणि साकारी दुनियेचा प्लॅन दाखविल्यामुळे लगेच समजतील, बाकी इतर
धर्माचे स्वर्गामध्ये येऊ शकत नाहीत. स्वर्गामध्ये तर आहेतच मुळी देवी-देवता. हे
ड्रामाचे नॉलेज बाबांव्यतिरिक्त इतर कोणीही समजावून सांगू शकणार नाही. मुले येतातच
मुळी बाबांकडून वारसा घेण्यासाठी. भरभरून सुख तर सतयुगामध्येच असते. त्यानंतर मग
रावण राज्य होते. त्याच्यामध्ये भरभरून दुःख असते. आता तुम्ही समजता - बाबा आम्हाला
खरी-खरी कथा ऐकवून अमरलोकामध्ये जाण्यासाठी लायक बनवत आहेत. आता तुम्ही अशी कर्मे
करता तेव्हाच तर २१ जन्मांसाठी श्रीमंत बनता. म्हणतात देखील - ‘धनवान भव’,
‘पुत्रवान भव…’ तिथे तुम्हाला एक मुलगा आणि एक मुलगी जरूर असतील. आयुष्मान भव, तुमचे
आयुष्य देखील १५० वर्षांचे असेल. कधीही अकाली मृत्यू होत नाही. हे बाबाच समजावून
सांगतात. तुम्ही अर्धाकल्प मला बोलवत आला आहात. संन्यासी कधी असे म्हणतील का?
त्यांना काय माहीत! बाबा बसून किती प्रेमाने समजावून सांगत आहेत. मुलांनो, हा एक
जन्म जर पावन बनलात तर २१ जन्म पावन दुनियेचे मालक बनाल. पवित्रतेमध्येच तर सुख आहे
ना. तुम्ही पवित्र दैवी-धर्माचे होतात. आता अपवित्र बनून दुःखामध्ये आला आहात.
स्वर्गामध्ये निर्विकारी होतात, आता विकारी बनल्यामुळे नरकामध्ये दुःखी झाला आहात.
बाबा तर पुरुषार्थ करवून घेतील ना. स्वर्गाचे महाराजा-महाराणी बना. तुमचे बाबा-मम्मा
बनतात ना तर तुम्ही देखील पुरुषार्थ करा. याच्यामध्ये गोंधळून जाण्याची काही गोष्टच
नाही. बाबा तर कोणाला पाया देखील पडू देत नाहीत.
बाबा समजावून सांगत
आहेत - मी तुम्हाला सोने-हिऱ्याचे महाल दिले. स्वर्गाचे मालक बनवले. मग अर्धाकल्प
भक्तिमार्गामध्ये तुम्ही डोके घासत आला आहेत, पैसा देखील देत आला आहात. ते सर्व
सोन्या-हिऱ्याचे महाल गेले कुठे? तुम्ही स्वर्गातून उतरत-उतरत नरकामध्ये येऊन पडला
आहात. आता तुम्हाला पुन्हा स्वर्गामध्ये घेऊन जात आहे. तुम्हाला कोणता त्रास देत
नाही, फक्त माझी आठवण करा आणि पवित्र बना. भले एक नया पैसा सुद्धा देऊ नका. खा, प्या,
अभ्यास करा, रिफ्रेश होऊन निघून जा. बाबा तर फक्त शिकवतात. शिकवण्याचे काही पैसे
घेत नाहीत. म्हणतात - ‘बाबा, आम्ही देणार जरूर नाहीतर तिथे महाल इत्यादी कसे मिळतील.
भक्तिमार्गामध्ये देखील तुम्ही ईश्वरअर्थ गरिबांना दान देत होतात, मग फळ देखील
ईश्वरच देईल, गरीब थोडाच देईल. परंतु ते एका जन्मासाठी मिळते. आता तर बाबा तुम्ही
थेट प्रत्यक्ष आला आहात. आम्ही हे थोडे पैसे देत आहोत, तुम्ही आम्हाला २१ जन्मांसाठी
स्वर्गामध्ये द्या. बाबा सर्वांना श्रीमंत बनवतात. पैसे देता तर तुमच्याच
राहण्यासाठी इमारती इत्यादी बनवतात. नाहीतर हे सर्व कसे बनेल. मुलेच या इमारती
इत्यादी बनवतात ना. शिवबाबा म्हणतात - मला काही त्याच्यामध्ये राहायचे नाहीये.
शिवबाबा तर निराकार दाता आहेत ना. तुम्ही देता, तर तुम्हाला २१ जन्मांसाठी फळ देतात.
मी तर तुमच्या स्वर्गात येणारच नाहीये. मला नरकात यावे लागते तुम्हाला नरकातून
बाहेर काढण्याकरिता. तुमचे गुरु लोक तर अजूनच दलदलीमध्ये अडकवतात. ते काही सद्गती
देत नाहीत. पवित्र दुनियेमध्ये घेऊन जाण्यासाठी आता बाबा आले आहेत, तर मग अशा
बाबांची आठवण का करत नाही? बाबा म्हणतात - काहीही पैसे देऊ नका. फक्त माझी आठवण करा
तर पापे नष्ट होतील आणि तुम्ही माझ्याकडे याल. या इमारती इत्यादी तुम्ही मुलांनी
स्वतःसाठीच बनवल्या आहेत. इथे मूठभर तांदुळाचे (सुदाम्याच्या पोह्याचे) गायन आहे
ना. गरीब आपल्या कुवतीनुसार जितके देतात तेवढे त्यांचे देखील भाग्य बनते. जेवढे
श्रीमंताचे पद तेवढेच गरिबाचे आहे. दोघांचे एकच होते. गरिबाकडे आहेतच शंभर रुपये
त्यातून एक रुपया दिला, श्रीमंताकडे तर भरपूर आहे तर त्याने १०० दिले, दोघांचे एकच
फळ असेल, म्हणून बाबांना गरीब-निवाज म्हटले जाते. सर्वात गरीब भारत आहे. त्यालाच
येऊन मी श्रीमंत बनवतो. गरिबांनाच दान दिले जाते ना. किती स्पष्ट करून बाबा समजावून
सांगतात. मुलांनो, आता मृत्यू समोर उभा आहे, आता लवकर-लवकर तयारी करा. आठवणीचा वेग
वाढवा. सर्वात गोड बाबांची जितकी आठवण कराल तितका वारसा मिळेल. तुम्ही अतिशय
श्रीमंत बनाल. बाबा तुम्हाला असे म्हणत नाहीत की, डोके टेका, यात्रा-जत्रांमध्ये
जा. नाही. घर बसल्या बाबांची आणि वारशाची आठवण करा. बस्स. बाबा बिंदू प्रमाणे आहेत.
त्यांना परमपिता परमात्मा म्हटले जाते; सुप्रीम सोल, सर्वोच्च आहेत. बाबा म्हणतात -
मी देखील बिंदू आहे, तुम्ही देखील बिंदू आहात. फक्त भक्तिमार्गासाठी माझे रूप मोठे
बनवून ठेवले आहे. नाही तर बिंदूची पूजा कशी करणार? त्यांना म्हणतात देखील - शिवबाबा.
कोणी म्हटले? आता तुम्ही म्हणता की, शिवबाबा आम्हाला वारसा देत आहेत. आश्चर्य आहे
ना! ८४ चे चक्र फिरत राहते. अनेक वेळा तुम्ही वारसा घेतला आहे आणि घेतच राहाल. किती
चांगल्या प्रकारे बाबा बसून समजावून सांगतात. अच्छा!
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१) मृत्यू
समोर उभा आहे, त्यामुळे आता आठवणीचा वेग वाढवायचा आहे. सतयुगी दुनियेमध्ये उच्च पद
प्राप्त करण्याचा पूर्ण पुरुषार्थ करायचा आहे.
२) स्वतःचे आणि
दुसऱ्यांचे कल्याण करून आशीर्वाद घ्यायचे आहेत. पवित्र दुनियेमध्ये येण्यासाठी
पवित्र जरूर बनायचे आहे.
वरदान:-
कनेक्शन आणि
रिलेशन द्वारे मनसा शक्तीचे प्रत्यक्ष प्रमाण बघणारे सूक्ष्म सेवाधारी भव
जसे वाणीच्या शक्तीचे
अथवा कर्माच्या शक्तीचे प्रत्यक्ष प्रमाण दिसून येते, तसेच सर्वात शक्तिशाली
सायलेन्सच्या शक्तीचे प्रत्यक्ष प्रमाण बघण्यासाठी बापदादांसोबत निरंतर स्पष्ट
कनेक्शन आणि रिलेशन पाहिजे; यालाच योगबल म्हटले जाते. असे योगबल असणारे आत्मे
स्थूलमध्ये दूर असणाऱ्या आत्म्याला सन्मुख असल्याचा अनुभव करवू शकतात, आत्म्यांचे
आवाहन करून त्यांचे परिवर्तन करू शकतात. हीच सूक्ष्म सेवा आहे, आणि ती करण्यासाठी
एकाग्रतेची शक्ती वाढवा.
बोधवाक्य:-
आपल्या सर्व
खजिन्यांना सफल करणारेच खरे महादानी आत्मा आहेत.
हे अव्यक्त इशारे -
परोपकाराच्या भावनेने संपन्न बनून अपकारीवर देखील उपकार करा.
जर कोणी देहधारीच्या
दृष्टीने तुमच्यासमोर आला तर तुम्ही एका सेकंदामध्ये त्याच्या दृष्टीला आत्मिक
दृष्टीमध्ये परिवर्तित करा. कोणी पाडण्याच्या वृत्तीने अथवा आपल्या संगदोषामध्ये
आणण्याच्या दृष्टीने समोर आला तर तुम्ही त्याला सदैव श्रेष्ठ संगतीच्या आधारे,
संगदोषामधून बाहेर काढून श्रेष्ठ संगत लावणारे बनवा. अशी परिवर्तन करण्याची युक्ती
आल्यामुळे तुम्ही कधीही विघ्नांच्या पुढे हार खाणार नाही. संपर्कामध्ये येणारे
तुमच्या या सूक्ष्म श्रेष्ठ सेवेवर जीव ओवाळून टाकतील.