25-01-26    अव्यक्त बापदादा    मराठी मुरली   02.04.2008  ओम शान्ति   मधुबन


“यावर्षी चारही सब्जेक्टमध्ये अनुभवाची ऑथॉरिटी बना, लक्ष्य आणि लक्षणाला समान बनवा”


आज बापदादा आपल्या चोहो बाजूच्या संतुष्ट राहणाऱ्या संतुष्ट मण्यांना बघत आहेत. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर संतुष्टतेची चमक दिसून येत आहे. संतुष्ट मणी स्वतःला देखील प्रिय आहेत, बाबांना सुद्धा प्रिय आहेत आणि परिवाराला सुद्धा प्रिय आहेत कारण संतुष्टता एक महान शक्ती आहे. संतुष्टता तेव्हा धारण होते जेव्हा सर्व प्राप्ती प्राप्त होतात. जर प्राप्ती कमी असेल तर संतुष्टता देखील कमी असते. संतुष्टता इतर शक्तींना देखील आवाहन करते. संतुष्टतेचे वायुमंडळ इतरांना देखील यथाशक्ती संतुष्टतेची व्हायब्रेशन देते. जो संतुष्ट राहतो त्याची निशाणी - तो सदैव प्रसन्नचित्त दिसून येतो. नेहमी चेहरा आपोआपच हर्षितमुख राहतो. संतुष्ट आत्म्यासमोर कोणतीही परिस्थिती स्व-स्थितीला हलवू शकत नाही. कितीही मोठी परिस्थिती असेल परंतु संतुष्ट आत्म्यासाठी कार्टून शो प्रमाणे मनोरंजन दिसून येते, म्हणून तो परिस्थितीमध्ये कधी हैराण होत नाही आणि परिस्थिती त्याच्यावर वार करू शकत नाही, हार खाते त्यामुळे तो अतींद्रिय सुखमय मनोरंजनाचे जीवन अनुभव करतो. मेहनत करावी लागत नाही, तो एक मनोरंजन अनुभव करतो. तर प्रत्येकाने स्वतःला चेक करा. चेक करायला तर येते ना! येते का? ज्यांना स्वतःला चेक करता येते, दुसऱ्यांना नाही स्वतःला चेक करता येते, त्यांनी हात वर करा. चेक करायला येते ना? अच्छा. मुबारक असो.

बापदादांचे वरदान देखील प्रत्येक मुलाला रोज अमृतवेलेला वेगवेगळ्या रूपामध्ये हेच मिळते, ‘आनंदी रहा, समृद्ध रहा. सर्वांना रोजचे वरदान मिळते, बापदादा सर्वांना एकच, एकसारखे, एकत्रित वरदान देतात. परंतु फरक काय होतो? नंबरवार का बनतात? दाता एक आहेत, आणि देतात देखील एकसारखे, कोणाला थोडे कोणाला जास्त देत नाहीत, मोठ्या मनाने देतात परंतु फरक काय पडतो, याचा सर्वांना अनुभव सुद्धा आहे कारण अजून पर्यंत बापदादांकडे हा आवाज पोहोचतो आहे. कोणता आवाज? जाणता ना? “कधी-कधी” “थोडे-थोडे”, हा आवाज अजून पर्यंत सुद्धा येतो. बापदादांनी सांगितले आहे की, ब्राह्मण आत्म्यांच्या जीवन रुपी डिक्शनरीमधून हे दोन शब्द निघून गेले पाहिजेत. अविनाशी बाबा आहेत, अविनाशी खजिने आहेत, तुम्ही देखील सर्व अविनाशी श्रेष्ठ आत्मे आहात. तर कोणता शब्द असला पाहिजे? ‘कधी-कधी’ की ‘सदैव’? प्रत्येक खजिन्याला चेक करा - सर्व शक्ती सदैव आहेत? सर्व गुण सदैव आहेत? तुमचे सर्व भक्त जेव्हा तुमचे गुणगान करतात तेव्हा काय म्हणतात? कधी-कधी गुणदाता, असे म्हणतात का? बापदादांनी प्रत्येक वरदानामध्ये ‘सदैव’ शब्द म्हटला आहे. सदैव सर्वशक्तीवान, कधी शक्तिवान, कधी सर्वशक्तिवान असे म्हटलेले नाहीये. प्रत्येकवेळी दोन शब्द तुम्ही देखील म्हणता, बाबा देखील म्हणतात - समान बना. असे म्हणत नाहीत की, थोडे-थोडे समान बना. संपन्न आणि संपूर्ण; तर मुले ‘कधी-कधी’ का करतात? बापदादा देखील खेळ तर बघत असतात ना! मुलांचा खेळ तर बघतच असतात. मुले काय करतात, काही-काही मुले, सगळेच नाहीत. जे वरदान मिळाले त्या वरदानाचा विचार करून, वर्णन करून वहीमध्ये लिहून ठेवतात, आठवण देखील करतात परंतु वरदान रुपी बीजाला फलीभूत करत नाहीत. बीजाला फलदायी करत नाहीत. केवळ वर्णन करत आनंदित होतात खूप छान वरदान आहे. वरदान आहे बीज परंतु बीजाला जितके फलीभूत करता तितकी त्याची वृद्धी होत जाते. फलीभूत करण्याचे रहस्य काय आहे? वेळेवर कार्यामध्ये वापरणे. कार्यामध्ये वापरणे विसरून जातात, केवळ वहीत पाहून, वर्णन करतात खूप चांगले, खूप छान. बाबांनी वरदान खूप छान दिले आहे. परंतु कशासाठी दिले आहे? त्याला फलीभूत करण्यासाठी दिले आहे. बीजापासून फळाचा विस्तार होतो. वरदानाचे स्मरण करतात, परंतु वरदान स्वरूप बनण्यामध्ये नंबरवार बनतात. आणि बापदादा प्रत्येकाच्या भाग्याला पाहून हर्षित होत राहतात परंतु बापदादांच्या मनातील आशा यापूर्वी देखील ऐकवली आहे. सर्वांनी हात वर केला होता ना, लक्षात आहे की, आम्ही कारणाला समाप्त करून समाधान स्वरूप बनणार. लक्षात आहे होमवर्क? बऱ्याच मुलांनी रुह-रुहानमध्ये किंवा पत्रांद्वारे, ईमेल द्वारे रिजल्ट लिहिला देखील आहे. चांगले आहे, लक्ष तर गेले आहे परंतु बापदादांना जो शब्द आवडतो - ‘सदैव’; तो आहे? तुम्ही सर्व जे पण आले आहात, मग भले ऐकले असेल, किंवा वाचले असेल परंतु एका महिन्याच्या होमवर्कमध्ये, एक महिना झाला आहे बस्स, जास्त झालेला नाहीए तर एका महिन्याचे लक्ष्य तर ठेवले आहे. एकमेकांमध्ये वर्णन देखील केले आहे परंतु जे एका महिन्यामध्ये होमवर्कमध्ये चांगले मार्क्स घेणारे बनले आहेत त्यांनी हात वर करा. जे पास झाले आहेत, पास झालेले आहेत. पास विद ऑनर? पास विद ऑनर, उठा. पास विद ऑनर झालेल्यांचे दर्शन करायला हवे ना. माता नाही आहेत. बहिणींमध्ये, टीचर्सनी हात वर केलेला नाही? कोणीच नाही. मधुबन वाले. हा तर खूप कमी रिजल्ट आहे. (खूप थोडे हात उठले आहेत) अच्छा सेंटरमध्ये देखील असतील. मुबारक असो, टाळ्या तर वाजवा. बापदादांना हसू येते की, जेव्हा बापदादा विचारतात की बापदादांवर कोणाचे प्रेम आहे आणि किती आहे? तर काय उत्तर देतात? ‘बाबा, इतके आहे जे सांगू शकत नाही’. उत्तर खूप छान देतात. बापदादा देखील खुश होऊन जातात. परंतु प्रेमाचा पुरावा काय? आजकालच्या दुनियेमध्ये बॉडी-कॉन्शसवाले (देह भानवाले) प्रेमी तर प्राण देखील अर्पण करतात. परमात्म प्रेमामध्ये अवघड का वाटते? बाबांनी म्हटले आणि मुलांनी केले. गाणी तर खूप छान-छान गाता, ‘बाबा, आम्ही सर्व काही अर्पण करणारे परवाने आहोत, शमेवर फिदा होणारे आहोत…’ तर तुम्ही या ‘कारण’ शब्दाला स्वाहा करू शकत नाही काय?

आता तर यावर्षीचा लास्ट टर्न आला. दुसऱ्या वर्षामध्ये काय होईल ते तर तुम्ही आणि बाबा आपण बघत आहोत, बघणार आहोत परंतु समयाला पाहून तुम्ही लोक हा एक शब्द बोलता ना की, ‘ही काळाची हाक आहे’. भक्तांची हाक, काळाची हाक, दुःखी आत्म्यांची हाक, तुमच्या स्नेही, सहयोगी आत्म्यांची हाक तुम्हीच पूर्ण कराल ना! तुमचे टायटल कोणते आहे? तुमचे कर्तव्य कोणते आहे? कोणत्या कर्तव्यासाठी ब्राह्मण बनला आहात? विश्व परिवर्तक तुमचे टायटल आहे. विश्व परिवर्तन हे तुमचे कार्य आहे आणि सोबती कोण आहे? बापदादांच्या सोबत या कार्यामध्ये निमित्त बनला आहात. तर काय करायचे आहे? आता सुद्धा हात वर करायला सांगितले की, तुम्ही करणार ना, तर सगळेच हात उंच करतात. लक्ष्य ठेवले आहे, बापदादांनी बघितले, टोटल या वर्षाच्या सीझनमध्ये सर्वांनी संकल्प केला परंतु सफलतेची चावी दृढता - ‘करायचेच आहे’, त्याऐवजी ‘कधी-कधी’ करत आहे, चालत आहे, करू. हे संकल्प दृढतेला साधारण बनवतात. दृढतेमध्ये ‘कारण’ हा शब्द येतच नाही. निवारण होते. कारणे येतात देखील परंतु चेकिंग करत असल्याकारणाने, ‘कारण’ ‘निवारण’मध्ये बदलते.

बापदादांनी रिझल्टमध्ये चेक केले तर काय पाहिले? ज्ञानी, योगी, धारणा स्वरूप, सेवाधारी, चारही सब्जेक्टमध्ये प्रत्येकजण यथाशक्ती ज्ञानी सुद्धा आहे, योगी देखील आहे, धारणा सुद्धा करत आहे, सेवा ही करत आहे. परंतु चारही सब्जेक्टमध्ये अनुभव स्वरूप, अनुभवाची ऑथॉरिटी - त्याची कमतरता दिसून आली. अनुभवी स्वरूप, ज्ञान स्वरूपामध्ये सुद्धा अनुभवी स्वरूप अर्थात ज्ञानाला नॉलेज म्हटले जाते तर अनुभवी मूर्त आत्म्यामध्ये नॉलेज अर्थात समज आहे की काय करायचे आहे, काय करायचे नाहीये. नॉलेजची लाईट आणि माईट, तर अनुभवी स्वरूपाचा अर्थच आहे ज्ञानी तू आत्म्याच्या प्रत्येक कर्मामध्ये लाईट आणि माईट नॅचरल असले पाहिजे. ज्ञानी अर्थात ज्ञान, नॉलेजला जाणणे, वर्णन करणे, त्याचसोबत प्रत्येक कर्मामध्ये लाईट-माईट असावी. अनुभवी स्वरूपाद्वारे प्रत्येक कर्म नॅचरल श्रेष्ठ आणि यशस्वी होईल. मेहनत करावी लागणार नाही कारण ज्ञानाचे अनुभवी मूर्त आहेत. अनुभवाची ऑथॉरिटी सर्व ऑथॉरिटींपेक्षा श्रेष्ठ आहे. ज्ञानाला जाणणे आणि ज्ञानाच्या अनुभव स्वरूपाच्या ऑथॉरिटीने प्रत्येक कर्म करणे, यामध्ये अंतर आहे. तर अनुभवी स्वरूप आहात? चेक करा. चारही सब्जेक्टमध्ये, मी आत्मा आहे परंतु मी अनुभवी स्वरूप होऊन प्रत्येक कर्म करतो का? अनुभवाच्या ऑथॉरिटीच्या सीटवर सेट असाल तर श्रेष्ठ कर्म, सफलता स्वरूप कर्म ऑथॉरिटीच्या बाबतीत नॅचरल नेचर दिसून येईल. विचार करता परंतु अनुभवी स्वरूप बनणे, योगयुक्त राजयुक्त नेचर बनावे, नॅचरल व्हावे. धारणेमध्ये देखील प्रत्येक कर्मामध्ये सर्व गुण आपोआपच दिसून यावेत. असे अनुभवी स्वरूपामध्ये सदैव राहणे, अनुभवाच्या सीटवर सेट होणे याची आवश्यकता आहे त्याचे अटेंशन ठेवा, हे गरजेचे आहे. अनुभवाच्या ऑथॉरिटीची सीट अति महान आहे. अनुभवी असणाऱ्याला माया सुद्धा नष्ट करू शकत नाही कारण मायेच्या ऑथॉरिटी पेक्षा अनुभवाची ऑथॉरिटी पदम पटीने मोठी आहे. विचार करणे वेगळे आहे, मनन करणे वेगळे आहे, अनुभवी स्वरूप बनून चालणे, आता याची आवश्यकता आहे.

तर आता या वर्षामध्ये काय कराल? बापदादांनी पाहिले आहे की, एका सब्जेक्टमध्ये मेजॉरिटी (बहुसंख्य) पास आहेत. कोणता सब्जेक्ट? सेवेचा सब्जेक्ट. चोहो बाजूने बापदादांकडे सेवेचे रिपोर्ट खूप चांगले-चांगले आले आहेत. आणि सेवेचा उमंग-उत्साह यावर्षीच्या सेवा समाचाराच्या तुलनेमध्ये चांगला दिसून आला आहे. प्रत्येक वर्गाने (विंगने), प्रत्येक झोनने वेगवेगळ्या प्रकारे सेवेमध्ये सफलता प्राप्त केली आहे. याची बापदादा प्रत्येक झोन, प्रत्येक विंगला पद्म-पद्मपटीने मुबारक देत आहेत. मुबारक असो. प्लॅन देखील खूप चांगले-चांगले बनवले आहेत. परंतु आता समयानुसार ‘अचानक’चा सिझन (कालावधी) सुरु आहे. तुम्ही बघितलेही असेल आणि ऐकलेही असेल की या वर्षामध्ये किती ब्राह्मण अचानक गेले आहेत. तर अचानकची घंटा आता वेगवान होत आहे. त्यानुसार आता यावर्षी चारही सब्जेक्टमध्ये मी कितपत अनुभवी स्वरूप बनलो आहे, कारण चारही सब्जेक्टमध्ये चांगले मार्क्स हवेत. आणि एका जरी सब्जेक्टमध्ये पासिंग पेक्षा कमी मार्क्स असतील तर पास विद ऑनर माळेचा मणी, बापदादांच्या गळयातील हार कसे बनाल! कोणत्याही रूपामध्ये हार खाणारा बाबांच्या गळ्यातील हार बनू शकत नाही. आणि इथे जेव्हा हात वर करायला सांगतात तेव्हा सर्वजण काय म्हणतात? ‘आम्ही लक्ष्मी-नारायण बनणार’. चला लक्ष्मी-नारायण किंवा लक्ष्मी-नारायणाच्या परिवारामध्ये सोबती, ते बनणे देखील श्रेष्ठ पद आहे म्हणून बापदादा केवळ एक शब्द सांगतात, आता तीव्र गतीने उडत्या कलेमध्ये उडत रहा आणि आपल्या उडत्या कलेच्या व्हायब्रेशन द्वारे वायुमंडळामध्ये सहयोगाचे वायुमंडळ पसरवा. जर का तुम्ही सर्वांनी प्रकृतीला चॅलेंज केले आहे, की प्रकृतीचे देखील परिवर्तन करूनच राहू. आहे ना हा वायदा? वायदा केला आहे? केला आहे. मान हलवा, हात नाही. तर मग तुम्ही आपल्या हमजीन्स मनुष्य-आत्म्यांना दुःख आणि अशांती मधून परिवर्तन करू शकत नाही काय? एक तर तुम्ही चॅलेंज केले आहे आणि दुसरे बापदादांसोबत देखील वायदा केला आहे, आम्ही सर्व आता देखील तुमच्या कार्यामध्ये साथीदार आहोत, परमधाममध्ये सुद्धा साथीदार आहोत आणि राज्यामध्ये देखील ब्रह्मा बाबांचे साथीदार बनून राहणार. हा वायदा केला आहे ना! तर सोबत येणार, सोबत राहणार आणि आता सुद्धा सोबत आहोत. तर वेळोवेळी बाबांचा इशारा तुम्ही प्रॅक्टिकल मध्ये बघत आहात - अचानक एव्हररेडी. दादींच्या बाबतीत असा विचार केला होता का की सोडून जाऊ शकते? अचानकचा खेळ पाहिलात ना.

तर यावर्षी एव्हररेडी. बाबांच्या मनातील अपेक्षांना पूर्ण करणारे आशेचे दीपक बनायचेच आहे. बाबांच्या अपेक्षा तर जाणताच ना. बनायचे आहे का बनून जाऊ, पाहूया…! जे समजतात की, बनायचेच आहे, त्यांनी हात वर करा. पहा कॅमेरामध्ये येत आहे. बापदादांना तर खूप चांगले खुश करता. बापदादा सुद्धा मुलांशिवाय एकटे जाऊ शकत नाहीत. पहा, ब्रह्मा बाबा सुद्धा तुम्हा मुलांसाठी मुक्तीचे गेट उघडण्यासाठी प्रतीक्षा करत आहेत. एडव्हान्स पार्टी सुद्धा प्रतीक्षा करत आहे. तुम्ही तयारी करणारे आहात. तुम्ही प्रतीक्षा करणारे नाही आहात, तयारी करणारे आहात. तर यावर्षी लक्ष्य ठेवा परंतु लक्ष्य आणि लक्षण याला समान ठेवा. असे होऊ नये की, लक्ष्य खूप उच्च आहे आणि लक्षणामध्ये कमजोरी आहे, नाही. लक्ष्य आणि लक्षण समान असावे. तुमच्या मनातील जी इच्छा आहे समान बनण्याची, ती तेव्हाच पूर्ण होईल जेव्हा लक्ष्य आणि लक्षण समान असतील. आता लक्ष्य आणि लक्षणामध्ये थोडासा फरक आहे. प्लॅन खूप छान बनवता, आपसामध्ये रुहरिहान देखील खूप चांगले-चांगले करता. एकमेकांना लक्षात सुद्धा आणून देता. आता ‘दृढता आमचा जन्मसिद्ध अधिकार आहे’, या संकल्पाला अनुभवाच्या स्वरूपामध्ये आणा. चेक करा - जे बोलतो त्याचा अनुभव देखील करतो का? पहिला शब्द - ‘मी आत्मा आहे’, यालाच चेक करा. मी या आत्मिक स्वरूपाच्या अनुभवाची ऑथॉरिटी आहे का? कारण अनुभवाची ऑथॉरिटी नंबर वन ऑथॉरिटी आहे. अच्छा. कोणत्याही परिस्थितीमध्ये स्व-स्थितीमध्ये स्थित राहू शकता का?

मनाची एकाग्रता (ड्रिल) अच्छा. तीन बिंदूचे स्मृती स्वरूप बनू शकता ना! बस्स, फुलस्टॉप. अच्छा.

आता एका सेकंदामध्ये आपला श्रेष्ठ स्वमान ‘मी बापदादांच्या दिलतख्तनशीन आहे’, या आत्मिक स्वमानाच्या नशेमध्ये स्थित व्हा. तख्तनशीन आत्मा आहे, या अनुभवामध्ये लवलीन व्हा. अच्छा.

चोहो बाजूच्या अति लव्हली सदैव बाबांच्या प्रेमामध्ये लीन होऊन राहणारे, सदैव स्वमानधारी, स्वराज्यधारी विशेष आत्म्यांना, चोहो बाजूच्या उमंग-उत्साहाच्या पंखांनी उडणाऱ्या आणि आपल्या मनाच्या व्हायब्रेशनद्वारे वायुमंडळाला शांत श्रेष्ठ बनविणाऱ्या, सर्वांना बाबांचा संदेश देऊन दुःखातून सोडवून मुक्तीचा वारसा देणाऱ्या, सदैव दृढतेद्वारे सफलता प्राप्त करणाऱ्या अशा चोहो बाजूच्या हृदयाच्या समीप राहणाऱ्या आणि समोर येणाऱ्या सर्व मुलांना अंतःकरणापासून प्रेम आणि अंतःकरणापासून आशीर्वाद, प्रेमपूर्वक आठवण आणि नमस्ते.

वरदान:-
धर्म आणि कर्म दोन्हीचा व्यवस्थित बॅलन्स ठेवणारे दिव्य अथवा श्रेष्ठ बुद्धिवान भव कर्म करते वेळी धर्म अर्थात धारणा देखील संपूर्ण असावी तेव्हा धर्म आणि कर्म दोन्हीचा बॅलन्स व्यवस्थित असल्यामुळे प्रभाव वाढेल. असे नाही की, कर्म संपल्या नंतर धारणेची आठवण होईल. बुद्धीमध्ये दोन्ही गोष्टींचा बॅलन्स व्यवस्थित असेल तेव्हाच म्हटले जाईल श्रेष्ठ अथवा दिव्य बुद्धीवान. नाहीतर साधारण बुद्धी, कर्म देखील साधारण, धारणा सुद्धा साधारण होतात. तर साधारणतेमध्ये समानता आणायची नाहीये परंतु श्रेष्ठतेमध्ये समानता असावी. जसे कर्म श्रेष्ठ तशी धारणा देखील श्रेष्ठ असावी.

सुविचार:-
आपल्या मन-बुद्धीला अनुभवाच्या सीटवर सेट करा म्हणजे कधी अपसेट होणार नाही.

अव्यक्त इशारे:- या अव्यक्ती महिन्यामध्ये बंधनमुक्त राहून जीवनमुक्त स्थितीचा अनुभव करा. ज्ञान स्वरूप मास्टर नॉलेजफुल, मास्टर सर्वशक्तिमान बनल्यानंतर जर कोणते असे कर्म जे युक्तियुक्त नाहीए, ते करता तर अशा कर्माचे बंधन अज्ञान काळातील कर्मबंधना पेक्षाही पद्म पटीने जास्त आहे. या कारणामुळे बंधनयुक्त आत्मा स्वतंत्र नसल्या कारणाने जे हवे ते करू शकत नाही त्यामुळे युक्तियुक्त कर्माद्वारे मुक्तीला प्राप्त करा.