25-02-2026
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
“गोड
मुलांनो - तुम्ही ब्राह्मण सो देवता बनता, तुम्हीच भारताला स्वर्ग बनवता, तर
तुम्हाला आपल्या ब्राह्मण जातीचा अभिमान असला पाहिजे”
प्रश्न:-
खऱ्या
ब्राह्मणांची मुख्य लक्षणे कोणती असतील?
उत्तर:-
१) खऱ्या ब्राह्मणांचा या जुन्या दुनियेतून नांगर उठलेला असेल. जणू काही त्यांनी या
जुन्या दुनियेचा किनारा सोडून दिलेला आहे. २) खरे ब्राह्मण ते जे हातांनी काम करतील
आणि बुद्धी सदैव बाबांच्या आठवणीमध्ये राहील अर्थात कर्मयोगी असतील. ३) ब्राह्मण
अर्थात कमलपुष्प समान. ४) ब्राह्मण अर्थात सदैव आत्म-अभिमानी रहाण्याचा पुरुषार्थ
करणारे. ५) ब्राह्मण अर्थात काम महाशत्रुवर विजय प्राप्त करणारे.
ओम शांती।
रूहानी बाबा रूहानी मुलांना समजावून सांगत आहेत. कोणती मुले? हे ब्राह्मण. हे कधीही
विसरू नका की आपण ब्राह्मण आहोत, देवता बनणार आहोत. वर्णांची देखील आठवण ठेवावी
लागते. येथे तुम्ही आपसात फक्त ब्राह्मणच ब्राह्मण आहात. ब्राह्मणांना बेहदचे बाबा
शिकवत आहेत. हे ब्रह्मा बाबा शिकवत नाहीत, शिवबाबा शिकवत आहेत ब्रह्मा द्वारे.
ब्राह्मणांनाच शिकवतात. शूद्रापासून ब्राह्मण बनल्याशिवाय देवी-देवता बनू शकणार नाही.
वारसा शिवबाबांकडून मिळतो. ते शिवबाबा तर सर्वांचे पिता आहेत. या ब्रह्मा बाबांना
ग्रेट ग्रेट ग्रँड फादर म्हटले जाते. लौकिक पिता तर सर्वांनाच असतात. पारलौकिक
पित्याची भक्तिमार्गामध्ये आठवण करतात. आता तुम्ही मुले समजता की, हे (ब्रह्मा बाबा)
आहेत अलौकिक पिता ज्यांना कोणीही जाणत नाही. भले ब्रह्माचे मंदिर आहे, इथे देखील
प्रजापिता आदि देवाचे मंदिर आहे. त्यांना कोणी ‘महावीर’ म्हणतात, ‘दिलवाला’ देखील
म्हणतात. परंतु वास्तवात दिल घेणारे आहेत शिवबाबा, ना की प्रजापिता आदिदेव ब्रह्मा.
सर्व आत्म्यांना सदा सुखी बनविणारे, खुश करणारे एक बाबाच आहेत. हे सुद्धा फक्त
तुम्हीच जाणता. दुनियेमध्ये तर मनुष्य काहीच जाणत नाहीत. तुच्छ बुद्धी आहेत. आपण
ब्राह्मणच शिवबाबांकडून वारसा घेत आहोत. तुम्ही देखील हे पदोपदी विसरून जाता. आठवण
आहे अतिशय सोपी. ‘योग’ शब्द संन्याशांनी ठेवला आहे. तुम्ही तर बाबांची आठवण करता.
योग कॉमन शब्द आहे. याला ‘योग-आश्रम’ देखील म्हणता येणार नाही, मुले आणि बाबा बसलेले
आहेत. मुलांचे कर्तव्य आहे - बेहदच्या बाबांची आठवण करणे. आम्ही ब्राह्मण आहोत,
डाडेकडून (आजोबांकडून) वारसा घेत आहोत ब्रह्मा द्वारे, म्हणूनच शिवबाबा म्हणतात
जेवढी शक्य होईल तेवढी आठवण करत राहा. चित्र सुद्धा भले ठेवा तरीही आठवण राहील. आपण
ब्राह्मण आहोत, बाबांकडून वारसा घेत आहोत. ब्राह्मण कधी आपल्या जातीला विसरतात का?
तुम्ही शूद्रांच्या संगतीत आल्यामुळे ब्राह्मणपणा विसरून जाता. ब्राह्मण तर
देवतांपेक्षाही उच्च आहेत कारण तुम्ही ब्राह्मण नॉलेजफुल आहात. भगवंताला जानी
जाननहार म्हणतात ना. त्याचा सुद्धा अर्थ जाणत नाहीत. असे नाही की सर्वांच्या
अंतर्मनामध्ये काय आहे ते बसून बघतात. नाही, त्यांना सृष्टीच्या आदि-मध्य-अंताचे
नॉलेज आहे. ते बीजरूप आहेत. झाडाच्या आदि-मध्य-अंताला जाणतात. तर अशा बाबांची खूप
आठवण करायची आहे. यांची (ब्रह्मा बाबांची) आत्मा सुद्धा त्या बाबांची आठवण करते. ते
बाबा (शिवबाबा) म्हणतात - हे ब्रह्मा देखील जेव्हा माझी आठवण करतील तेव्हा हे पद
प्राप्त करतील. तुम्ही देखील आठवण कराल तेव्हा पद प्राप्त कराल. सर्वात पहिले तुम्ही
अशरीरी आला होता आता पुन्हा अशरीरी बनून परत जायचे आहे. बाकीचे सर्व तुम्हाला दुःख
देणारे आहेत, त्यांची का आठवण करायची? जेव्हा की मी तुम्हाला भेटलो आहे, मी तुम्हाला
नवीन दुनियेमध्ये घेऊन जाण्यासाठी आलो आहे. तिथे कोणतेही दुःख नाही. ते आहे दैवी
नाते. इथे सर्वात आधी दुःख सुरू होते पती-पत्नीच्या नात्यामध्ये कारण विकारी बनतात.
तुम्हाला आता मी त्या दुनियेच्या लायक बनवतो, जेथे विकाराची गोष्टच नाही. हा
कामविकार महाशत्रू गायला गेला आहे जो आदि-मध्य-अंत दुःख देतो. क्रोधासाठी असे
म्हणणार नाही की हा आदि-मध्य-अंत दुःख देतो, नाही. कामविकाराला जिंकायचे आहे. तोच
आदि-मध्य-अंत दुःख देतो. पतित बनवतो. ‘पतित’ शब्द विकारासाठी वापरला जातो. या
शत्रूवर विजय मिळवायचा आहे. तुम्ही जाणता - आम्ही स्वर्गाचे देवी-देवता बनत आहोत.
जोपर्यंत हा निश्चय नाही तोपर्यंत काहीही प्राप्त करू शकणार नाही.
बाबा मुलांना समजावून
सांगतात की, मनसा-वाचा-कर्मणा ॲक्युरेट (अचूक) बनायचे आहे. मेहनत आहे. दुनियेमध्ये
हे कोणालाच ठाऊक नाही आहे की तुम्ही भारताला स्वर्ग बनवत आहात. पुढे जाऊन समजतील.
इच्छा देखील आहे की वन वर्ल्ड, एक राज्य, एक धर्म, एक भाषा असावी. तुम्ही समजावून
सांगू शकता - सतयुगामध्ये आजपासून ५ हजार वर्षांपूर्वी एक राज्य, एक धर्म होता
ज्याला स्वर्ग म्हटले जाते. रामराज्य आणि रावणराज्याला देखील कोणीही जाणत नाही. १००
टक्के तुच्छ-बुद्धीचे आता तुम्ही स्वच्छ-बुद्धीचे बनत आहात नंबरवार पुरुषार्थानुसार.
बाबा बसून तुम्हाला शिकवत आहेत. फक्त बाबांच्या मतानुसार चाला. बाबा म्हणतात की,
जुन्या दुनियेमध्ये राहून कमलपुष्प समान पवित्र राहा. माझी आठवण करत राहा. बाबा
आत्म्यांना समजावून सांगतात. मी आत्म्यांनाच शिकवायला आलो आहे या ऑरगन्स द्वारे (ब्रह्मा
तनाद्वारे). तुम्ही आत्मे देखील ऑरगन्सद्वारे ऐकता. मुलांनी आत्म-अभिमानी बनायचे आहे.
हे तर जुने छी-छी (विकारी) शरीर आहे. तुम्ही ब्राह्मण पूजेच्या लायक नाही आहात,
तुम्ही गायन योग्य आहात, पूजन करण्यायोग्य देवता आहेत. तुम्ही श्रीमतावर विश्वाला
पवित्र स्वर्ग बनवता म्हणून तुमचे गायन आहे. तुमची पूजा होऊ शकत नाही. गायन फक्त
तुम्हा ब्राह्मणांचेच आहे, ना की देवतांचे. बाबा तुम्हालाच शूद्रापासून ब्राह्मण
बनवतात. जगत अंबा आणि ब्रह्मा इत्यादींची मंदिरे बांधतात परंतु त्यांना हे ठाऊक नाही
आहे की हे कोण आहेत? जगतपिता तर ब्रह्मा आहेत ना. त्यांना देवता म्हणणार नाही.
देवतांची आत्मा आणि शरीर दोन्ही पवित्र असतात. आता तुमची आत्मा पवित्र होत जाते.
शरीर पवित्र नाही आहे. आता तुम्ही ईश्वराच्या मतावर भारताला स्वर्ग बनवत आहात.
तुम्ही देखील स्वर्गाच्या लायक बनत आहात. सतोप्रधान जरूर बनायचे आहे. फक्त तुम्ही
ब्राह्मणच असे आहात ज्यांना बाबा बसून शिकवतात. ब्राह्मणांच्या झाडाची वृद्धी होतच
राहील. जे ब्राह्मण पक्के होतील तेच जाऊन देवता बनतील. हे नवीन झाड आहे. मायेची
वादळे देखील लागतात. सतयुगामध्ये कोणतेही वादळ लागत नाही. इथे माया बाबांच्या
आठवणीमध्ये राहू देत नाही. आपल्याला वाटते की बाबांच्या आठवणीत रहावे, तमोपासून
सतोप्रधान बनावे. सर्व काही आठवणीवर अवलंबून आहे. भारताचा प्राचीन योग प्रसिद्ध आहे.
परदेशातील लोकांनाही वाटते की कोणीतरी येऊन प्राचीन योग शिकवावा. आता योगी देखील
दोन प्रकारचे आहेत - एक हठयोगी, दुसरे राजयोगी. तुम्ही आहात राजयोगी. हा भारताचा
प्राचीन राजयोग आहे जो बाबाच शिकवतात. फक्त गीतेमध्ये माझ्या ऐवजी श्रीकृष्णाचे नाव
टाकले आहे. किती फरक पडला आहे. शिवजयंती असते तेव्हा तुमच्या वैकुंठाची देखील जयंती
असते, ज्यामध्ये श्रीकृष्णाचे राज्य आहे. तुम्ही जाणता की शिवबाबांची जयंती आहे तर
गीतेची सुद्धा जयंती आहे. वैकुंठाची देखील जयंती असते ज्यामध्ये तुम्ही पवित्र बनाल.
कल्पापूर्वीप्रमाणेच स्थापना करतात. आता बाबा म्हणतात माझी आठवण करा. आठवण न
केल्यामुळे माया काही ना काही विकर्म करायला भाग पाडते. आठवण केली नाही की बसली
थप्पड. आठवणीमध्ये राहिल्याने थप्पड बसणार नाही. ही एक प्रकारची बॉक्सिंग असते.
तुम्ही जाणता - आपला शत्रू कोणी मनुष्य नाही. रावण आहे शत्रू.
बाबा म्हणतात - या
काळातील लग्न म्हणजे बरबाद होणे आहे. एकमेकांना बरबाद करतात (पतित बनवतात). आता
पारलौकिक बाबांनी वटहुकूम काढला आहे - मुलांनो, हा कामविकार महाशत्रू आहे. यावर
विजय मिळवा आणि पवित्रतेची प्रतिज्ञा करा. कोणीही पतित बनू नका. जन्म-जन्मांतर
तुम्ही या विकारामुळेच पतित बनला आहात म्हणूनच कामविकाराला महाशत्रू म्हटले जाते.
साधू-संत सर्वच म्हणतात - ‘पतित-पावन या’. सतयुगामध्ये कोणीही पतित नसते. बाबा येऊन
ज्ञानाद्वारे सर्वांची सद्गती करतात. आता सर्वजण दुर्गतीमध्ये आहेत. ज्ञान देणारे
कोणीही नाही. ज्ञान देणारे एकच ज्ञान-सागर आहेत. ज्ञानाद्वारे दिवस आहे. दिवस आहे
रामाचा, रात्र आहे रावणाची. या शब्दांचा यथार्थ अर्थ देखील तुम्ही मुलेच समजता.
फक्त पुरुषार्थामध्ये कमजोरी आहे. बाबा तर खूप चांगल्या प्रकारे समजावून सांगतात.
तुम्ही ८४ जन्म पूर्ण केले आहेत, आता पवित्र बनून परत जायचे आहे. तुम्हांला तर
शुद्ध अहंकार (अभिमान) असला पाहिजे. आम्ही आत्मे बाबांच्या मतावर या भारताला स्वर्ग
बनवत आहोत, ज्या स्वर्गामध्ये मग आपण राज्य करू. जेवढी मेहनत कराल तेवढे पद प्राप्त
कराल. भले मग राजा-राणी बना, नाहीतर प्रजा बना. राजा-राणी कसे बनतात, ते देखील बघत
आहात. फॉलो फादर असे गायले जाते, ही आताची गोष्ट आहे. लौकिक नात्यासाठी असे म्हटले
जात नाही. हे बाबा मत देतात - मामेकम् (मज एकाची) आठवण करा तर विकर्म विनाश होतील.
तुम्ही समजता - आता आपण श्रीमतावर चालत आहोत. अनेकांची सेवा करतो. मुले जेव्हा
बाबांकडे येतात तेव्हा शिवबाबा देखील ज्ञानाने त्यांचे मन रिझवतात. हे (ब्रह्मा बाबा)
देखील शिकत आहेत ना. शिवबाबा म्हणतात - मी येतो सकाळी. अच्छा, मग कोणी भेटायला आले
तर हे (ब्रह्मा बाबा) समजावून सांगणार नाहीत का? असे म्हणतील का की, ‘बाबा, तुम्ही
येऊन ज्ञान सांगा, मी सांगणार नाही’. या अतिशय गुप्त गुढ गोष्टी आहेत ना. मी तर
सर्वात उत्तम समजावून सांगू शकतो. तुम्ही असे का समजता की शिवबाबाच समजावून सांगतात,
हे (ब्रह्मा बाबा) समजावून सांगत नसतील. हे देखील जाणता की कल्पापूर्वी यांनी (ब्रह्मा
बाबांनी) देखील समजावून सांगितले आहे, तेव्हाच तर हे पद प्राप्त केले आहे. मम्मा
देखील समजावून सांगत होती ना. ती देखील उच्च पद प्राप्त करते. मम्मा-बाबांना
सूक्ष्मवतनमध्ये बघतात तर मुलांनी फॉलो फादर करायचे आहे. गरीबच सरेंडर होतात,
श्रीमंत होऊ शकत नाहीत. गरीबच म्हणतात - ‘बाबा, हे सर्व काही तुमचेच आहे’. शिवबाबा
तर दाता आहेत. ते कधी काही घेत नाहीत. मुलांना म्हणतात - हे सर्व काही तुमचेच आहे.
मी स्वतःसाठी महाल ना इथे बांधतो, ना तिथे बांधतो. तुम्हाला स्वर्गाचा मालक बनवतो.
आता या ज्ञानरत्नांनी झोळी भरायची आहे. मंदिरामध्ये जाऊन म्हणतात - ‘माझी झोळी भरा’.
परंतु कशा प्रकारची, कोणत्या गोष्टीने झोळी भरायची… झोळी भरणारी तर लक्ष्मी आहे, जी
पैसे देते. शिवाकडे तर जात नाहीत, शंकराकडे जाऊन म्हणतात. समजतात शिव आणि शंकर एकच
आहेत परंतु असे थोडेच आहे.
बाबा येऊन सत्य गोष्ट
सांगतात. बाबाच दु:ख हर्ता, सुख कर्ता आहेत. तुम्हा मुलांना गृहस्थ व्यवहारामध्ये
देखील रहायचे आहे. कामधंदा देखील करायचा आहे. प्रत्येकजण स्वतःसाठी सल्ला विचारतात
- बाबा आम्हाला या गोष्टीत खोटे बोलावे लागते. बाबा प्रत्येकाची नाडी पाहून सल्ला
देतात कारण बाबा समजतात - मी सांगितले आणि करू शकत नाही असा सल्लाच का देऊ. नाडी
पाहून सल्लाच असा दिला जातो जो करू देखील शकतील. सांगितले आणि जर ते केले नाही तर
तो नाफरमानबरदारच्या (आज्ञा भंग करणाऱ्यांच्या) लाईनमध्ये येईल. प्रत्येकाचा
आपला-आपला हिशोब आहे. सर्जन तर एकच आहेत, त्यांच्याकडेच यावे लागेल. ते व्यवस्थित
सल्ला देतील. सर्वांनी विचारले पाहिजे - ‘बाबा, या परिस्थितीमध्ये मला कसे वागले
पाहिजे? आता काय करायला हवे?’ बाबा स्वर्गामध्ये तर घेऊन जातात. तुम्ही जाणता की,
आपण स्वर्गवासी तर बनणारच आहोत. आता आपण संगम-वासी आहोत. तुम्ही आता ना नरकामध्ये
आहात, ना स्वर्गामध्ये आहात. जे-जे ब्राह्मण बनत आहेत त्यांचा नांगर या छी-छी (घाणेरड्या)
दुनियेमधून उठलेला आहे. तुम्ही कलियुगी दुनियेचा किनारा सोडलेला आहे. कोणी ब्राह्मण
आठवणीच्या यात्रेमध्ये वेगाने पुढे जात आहे, कोणी कमी. काही जण हात सोडून देतात
अर्थात पुन्हा कलियुगामध्ये निघून जातात. तुम्ही जाणता की खिवैया (नावाडी बाबा) आता
आम्हाला घेऊन जात आहेत. त्या यात्रा तर अनेक प्रकारच्या असतात. तुमची एकच यात्रा आहे.
ही पूर्णपणे न्यारी (वेगळी) यात्रा आहे. हो, वादळे येतात जी आठवणीला तोडून टाकतात.
या आठवणीच्या यात्रेला चांगल्या रितीने पक्के करा. मेहनत करा. तुम्ही कर्मयोगी आहात.
जितके शक्य होईल तितके ‘हथ कार डे दिल यार डे…’ (हाताने काम करताना मनाने बाबांची
आठवण करा). अर्धा कल्प तुम्ही आशिक, माशूकची आठवण करत आला आहात. बाबा इथे खूप दुःख
आहे, आता आम्हाला सुखधामचे मालक बनवा. आठवणीच्या यात्रेमध्ये रहाल तर तुमची पापे
भस्म होतील. तुम्हीच स्वर्गाचा वारसा मिळवला होता, आता तो गमावला आहे. भारतच स्वर्ग
होता म्हणूनच त्याला प्राचीन भारत म्हणतात. भारतालाच खूप मान दिला जातो. सर्वात मोठा
देखील आहे, सर्वात जुना देखील आहे. आता तर भारत किती गरीब आहे म्हणूनच सर्वजण त्याला
मदत करतात. ते (विदेशी) लोक समजतात, आमच्याकडे खूप धान्य होईल, कुठूनही मागवावे
लागणार नाही परंतु हे तर तुम्ही जाणता - विनाश समोर उभा आहे; जे चांगल्या प्रकारे
याला समजतात त्यांना आतून खूप आनंद होत असतो. प्रदर्शनीमध्ये कितीतरी येतात.
म्हणतात - तुम्ही सत्य सांगता; परंतु हे समजतील की, आपल्याला बाबांकडून वारसा
घ्यायचा आहे, हे थोडेच लक्षात येते. इथून बाहेर गेले आणि संपले. तुम्ही जाणता की
बाबा आपल्याला स्वर्गामध्ये घेऊन जातात. तिथे ना गर्भ-जेलमध्ये जाल, ना त्या
जेलमध्ये जाणार. आता जेलची यात्रा देखील किती सोपी झाली आहे. मग सतयुगामध्ये कधी
जेलचे तोंड पहायला मिळणार नाही. दोन्ही जेल रहाणार नाहीत. इथे हे सर्व मायेचे पाम्प
(भपके) आहेत. मोठ-मोठ्या व्यक्तींना जसे संपवून टाकतात. आज खूप मान देत आहेत, उद्या
तो मानच संपुष्टात येतो. आज प्रत्येक गोष्ट खूप क्वीक (वेगाने) होते. मृत्यू देखील
वेगाने होत राहतील. सतयुगामध्ये असे कोणतेही उपद्रव होत नाहीत. पुढे चालून बघा काय
होते. खूप भयंकर सीन आहे. तुम्ही मुलांनी साक्षात्कार देखील केला आहे. मुलांसाठी
मुख्य आहे आठवणीची यात्रा. अच्छा!
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१)
मनसा-वाचा-कर्मणा खूप-खूप एक्यूरेट बनायचे आहे. ब्राह्मण बनून शूद्रांप्रमाणे
कोणतेही कर्म करायचे नाही.
२) बाबांकडून जो सल्ला
मिळतो त्यावर पूर्णपणे चालून आज्ञाधारक बनायचे आहे. कर्मयोगी बनून प्रत्येक कार्य
करायचे आहे. सर्वांची झोळी ज्ञान रत्नांनी भरायची आहे.
वरदान:-
डबल लाईट बनून
कर्मातीत अवस्थेचा अनुभव करणारे कर्मयोगी भव
जसे कर्मामध्ये येणे
स्वाभाविक झाले आहे तसेच कर्मातीत होणे देखील स्वाभाविक व्हावे, यासाठी डबल लाईट रहा.
डबल लाईट राहण्यासाठी कर्म करत असताना देखील स्वतःला ट्रस्टी समजा आणि आत्मिक
स्थितीमध्ये राहण्याचा अभ्यास करा, या दोन गोष्टींचे अटेन्शन ठेवल्यास सेकंदामध्ये
कर्मातीत, सेकंदामध्ये कर्मयोगी बनाल. निमित्तमात्र कर्म करण्यासाठी कर्मयोगी बना
आणि पुन्हा कर्मातीत अवस्थेचा अनुभव करा.
बोधवाक्य:-
ज्यांचे मन
मोठे आहे त्यांच्यासाठी असंभव कार्य देखील संभव होतात.
हे अव्यक्त इशारे:-
एकता आणि विश्वासाच्या विशेषतेद्वारे सफलता संपन्न बना.
तुमच्यामध्ये ज्या
काही विशेषता आहेत, त्यांना समोर ठेवा, कमजोरींना नाही, तर आपल्या स्वतःवर विश्वास
राहील. कमजोरीच्या गोष्टींचा जास्त विचार करू नका, तरच नेहमी आनंदात पुढे जात रहाल.
प्रॅक्टिकलमध्ये अनेक देश, अनेक भाषा, अनेक रूप-रंग आहेत परंतु अनेकतेमध्येही
सर्वांच्या मनात एकता आहे ना! कारण मनामध्ये एक बाबा आहेत. एकाच श्रीमतावर चालणारे
आहात. अनेक भाषावाले असूनही मनाचे गीत, मनाची भाषा एकच आहे.