25-07-2025
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
“गोड
मुलांनो - सदा एकाच चिंतेमध्ये रहा की आपल्याला चांगल्या रीतीने शिकून स्वतःला
राज्य तिलक द्यायचा आहे, शिक्षणानेच राजाई मिळते”
प्रश्न:-
मुलांना
कोणत्या उत्साहामध्ये राहायचे आहे? दिलशिकस्त (निराश) व्हायचे नाही, का?
उत्तर:-
सदैव याच उत्साहामध्ये रहा की आपल्याला या लक्ष्मी-नारायणासारखे बनायचे आहे, याचा
पुरुषार्थ करायचा आहे. कधीही निराश व्हायचे नाही कारण हे शिक्षण खूप सोपे आहे, घरी
राहून देखील शिकू शकता, याची कोणतीही फी नाही, परंतु हिंमत जरूर पाहिजे.
गीत:-
तुम्हीं हो
माता पिता तुम्हीं हो…
ओम शांती।
मुलांनी आपल्या पित्याची महिमा ऐकली. महिमा एकाचीच आहे आणखी कुणाचीही महिमा गायली
जाऊ शकत नाही. जेव्हा की ब्रह्मा-विष्णू-शंकराची देखील काहीच महिमा नाही. ब्रह्मा
द्वारे स्थापना करतात, शंकरा द्वारे विनाश करतात, विष्णू द्वारा पालना करतात.
लक्ष्मी-नारायणाला असे लायक देखील शिवबाबाच बनवतात, त्यांचीच महिमा आहे,
त्यांच्याशिवाय मग अजून कुणाची महिमा गायली जाणार. यांना (लक्ष्मी-नारायणाला) असे
बनविणारा टीचर नसेल तर हे देखील असे बनू शकणार नाहीत. नंतर महिमा आहे सूर्यवंशी
घराण्याची, जे राज्य करतात. बाबा संगमावर आले नाहीत तर यांना राजाई देखील मिळू
शकणार नाही. अजून तर कोणाची महिमाच नाही. फॉरेनर्स इत्यादी कोणाचीही महिमा करण्याची
आवश्यकता नाही. महिमा आहेच फक्त एकाची, दुसऱ्या कोणाची नाही. उच्च ते उच्च शिवबाबाच
आहेत. त्यांच्याकडूनच उच्च पद मिळते तर त्यांची चांगल्या रीतीने आठवण केली पाहिजे.
स्वतःला राजा बनविण्यासाठी स्वतःच अभ्यास करायचा आहे. जसे बॅरिस्टर शिकतात तर
स्वतःला शिक्षणाने बॅरिस्टर बनवतात ना. तुम्ही मुले जाणता शिवबाबा आपल्याला शिकवत
आहेत. जो चांगल्या रीतीने शिकेल, तोच उच्च पद मिळवेल. न शिकणारे पद मिळवू शकणार
नाहीत. शिकण्यासाठी श्रीमत मिळते. मूळ गोष्ट आहे पावन बनण्याची, ज्यासाठी हे शिक्षण
आहे. तुम्ही जाणता या वेळी सर्व तमोप्रधान पतित आहेत. चांगले किंवा वाईट मनुष्य तर
असतातच. पवित्र राहणाऱ्याला चांगले म्हटले जाते. चांगला शिकून मोठी व्यक्ती बनतो
तेव्हा महिमा होते परंतु आहेत तर सर्व पतित. पतितच पतिताची महिमा करतात. सतयुगामध्ये
आहेत पावन. तिथे कोणी कोणाची महिमा करत नाहीत. इथे पवित्र संन्यासी देखील आहेत,
अपवित्र गृहस्थी देखील आहेत, तर पवित्र असणाऱ्याची महिमा गायली जाते. तिथे तर यथा
राजा-राणी तथा प्रजा असतात. आणखी कोणता धर्म नाही ज्याच्यासाठी पवित्र, अपवित्र
म्हणतील. इथे तर कोणी गृहस्थींची देखील महिमा गात राहतात. त्यांच्यासाठी जणू काही
तेच खुदा, अल्लाह आहेत. परंतु अल्लाह ला तर पतित-पावन, लिब्रेटर, गाईड म्हटले जाते.
ते (दुनियावाले) मग अशी सर्व महिमा असणारे कसे बरे असू शकतील! दुनियेमध्ये किती घोर
अंधार आहे. आता तुम्ही मुले समजता तर मुलांना हीच काळजी राहिली पाहिजे - आपल्याला
शिकून स्वतःलाच राजा बनवायचे आहे. जे चांगल्या रीतीने पुरुषार्थ करतील तेच राज-तिलक
घेतील. मुलांनी उत्साहामध्ये राहिले पाहिजे - आपण देखील या लक्ष्मी-नारायणासारखे
बनावे. यामध्ये गोंधळून जाण्याची गरज नाही. पुरुषार्थ केला पाहिजे. दिलशिकस्त (निराश)
व्हायचे नाही. हे शिक्षणच असे आहे, पलंगावर झोपून देखील शिकू शकता. परदेशात राहून
देखील शिकू शकता. घरी राहून देखील शिकू शकता. इतके हे सोपे शिक्षण आहे. मेहनत करून
आपल्या पापांना नष्ट करायचे आहे आणि इतरांना देखील समजावून सांगायचे आहे. दुसऱ्या
धर्मवाल्यांना देखील तुम्ही समजावून सांगू शकता. कोणालाही हेच सांगायचे आहे -
‘तुम्ही आत्मा आहात’. आत्म्याचा स्वधर्म एकच आहे, यामध्ये कोणताही फरक पडू शकत नाही.
शरीराचेच अनेक धर्म असतात. आत्मा तर एकच आहे. सर्व एकाच पित्याची मुले आहेत.
आत्म्यांना बाबांनी ॲडॉप्ट केले आहे म्हणून ब्रह्मा मुखवंशावली गायले जातात.
कोणालाही समजावून
सांगू शकता - आत्म्याचे पिता कोण आहेत? तुम्ही जो फॉर्म भरून घेता त्यामध्ये खूप
मोठा अर्थ आहे. बाबा तर जरूर आहेत ना, ज्यांची आठवण देखील करतात, आत्मा आपल्या
पित्याची आठवण करते. आजकाल तर भारतामध्ये कोणालाही ‘फादर’ म्हणतात. मेयरला (महापौरला)
देखील फादर म्हणतात. परंतु आत्म्याचे पिता कोण आहेत, त्याला जाणत नाहीत. गातात
देखील - ‘तुम मात पिता…’ परंतु ते कोण आहेत, कसे आहेत, काहीच माहिती नाही.
भारतामध्येच तुम्ही माता-पिता म्हणून बोलावता. बाबाच इथे येऊन मुख वंशावली रचतात.
भारतालाच मदर कंट्री (भारतमाता) म्हटले जाते कारण इथेच शिवबाबा माता-पित्याच्या
रूपामध्ये पार्ट बजावतात. इथेच भगवंताला माता-पित्याच्या रूपामध्ये आठवण करतात.
विदेशामध्ये फक्त ‘गॉड फादर’ असे म्हणून बोलावतात, परंतु माता देखील पाहिजे ना
जिच्याद्वारे मुलांना ॲडॉप्ट केले जाईल. पती देखील पत्नीला ॲडॉप्ट करतो मग
तिच्याद्वारे मुले जन्माला येतात. रचना रचली जाते. इथे देखील यांच्यामध्ये (ब्रह्मा
बाबांमध्ये) परमपिता परमात्मा बाबा प्रवेश करून ॲडॉप्ट करतात. मुले जन्माला येतात
म्हणून यांना माता-पिता म्हटले जाते. ते आहेत आत्म्यांचे पिता मग इथे येऊन उत्पत्ती
करतात. इथे तुम्ही मुले बनता फादर आणि मदर म्हटले जाते. ते तर आहे स्वीट होम, जिथे
सर्व आत्मे राहतात. तिथे देखील बाबांशिवाय कोणीही घेऊन जाऊ शकत नाही. कोणीही भेटले
तर बोला - ‘तुम्ही स्वीट होमला जाऊ इच्छिता? मग जरूर पावन बनावे लागेल’. आता तुम्ही
पतित आहात, ही आहे आयरन एज्ड तमोप्रधान दुनिया. आता तुम्हाला परत घरी जायचे आहे.
आयरन एज्ड (कलियुगी) आत्मे तर परत घरी जाऊ शकणार नाहीत. स्वीट होममध्ये आत्मे
पवित्रच असतात तर आता बाबा समजावून सांगतात, बाबांच्या आठवणीनेच विकर्म विनाश होतील.
कोणत्याही देहधारीची आठवण करू नका. जितकी बाबांची आठवण कराल तितके पावन बनाल आणि मग
नंबरवार उच्च पद प्राप्त कराल. लक्ष्मी-नारायणाच्या चित्रावर कोणालाही समजावून
सांगणे सोपे आहे. भारतामध्ये यांचे राज्य होते. हे जेव्हा राज्य करत होते तेव्हा
विश्वामध्ये शांती होती. विश्वामध्ये शांती बाबाच करू शकतात इतर कोणाचीही ताकत नाही.
आता बाबा आपल्याला राजयोग शिकवत आहेत, नवीन दुनियेसाठी, राजांचाही राजा कसे बनवू
शकतो ते सांगतात. बाबाच नॉलेज फुल आहेत. परंतु त्यांच्यामध्ये कोणते नॉलेज आहे, हे
कोणीही जाणत नाही. सृष्टीच्या आदि-मध्य-अंताचा इतिहास-भूगोल बेहदचे बाबाच ऐकवतात.
मनुष्य तर कधी म्हणतील सर्वव्यापी आहेत किंवा मग म्हणतात सर्वांच्या मनातील जाणणारे
आहेत. आणि तसे स्वतःला तर म्हणू शकत नाहीत. या सर्व गोष्टी बाबा बसून समजावून
सांगतात. चांगल्या रीतीने धारण करून अजून हर्षित व्हायचे आहे. या लक्ष्मी-नारायणाचे
चित्र सदैव हर्षितमुख असणारेच बनवतात. शाळेमध्ये उच्च दर्जाचे शिक्षण घेणारे किती
आनंदी असतील. बाकीचे देखील समजतील हे तर खूप मोठी परीक्षा पास करत आहेत. हे ज्ञान
तर खूप उच्च शिक्षण आहे. फी इत्यादीचा काही प्रश्नच नाही फक्त हिंमतीचा प्रश्न आहे.
स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण करायची आहे, ज्यामध्येच माया विघ्न आणते. बाबा
म्हणतात - पवित्र बना. बाबांकडे प्रतिज्ञा करून मग तोंड काळे करतात, माया खूप
शक्तिशाली आहे, फेल होता तर मग त्यांचे नाव गायले जाऊ शकत नाही. ‘अमके-अमके
सुरुवातीपासून खूप चांगले ज्ञानामध्ये चालत आहेत’ - महिमा गायली जाते. बाबा म्हणतात
- स्वतःसाठी स्वतःच पुरुषार्थ करून राजधानी प्राप्त करायची आहे. शिक्षणाने उच्च पद
मिळवायचे आहे. हा आहेच राजयोग, प्रजा योग नाहीये. परंतु प्रजा देखील तर बनणार ना.
चेहरा आणि सेवेवरून माहिती होते की हे कोण बनण्याच्या लायक आहेत. घरामध्ये
स्टुडंटच्या वर्तनावरून समजतात, हा पहिल्या नंबरमध्ये येईल, हा थर्ड नंबरमध्ये येईल.
इथे देखील असेच आहे. जेव्हा शेवटी परीक्षा पूर्ण होईल तेव्हा तुम्हाला सर्व
साक्षात्कार होतील. साक्षात्कार होण्यासाठी काही उशीर लागत नाही मग लाज वाटेल, आपण
नापास झालो. नापास होणाऱ्यावर कोण प्रेम करणार?
मनुष्य चित्रपट
बघण्यामध्ये आनंदाचा अनुभव करतात परंतु बाबा म्हणतात - घाणेरडा बनविणारा एक नंबरचा
आहे - चित्रपट. ते बघणारे बहुतेक करून फेल होऊन कोसळतात (पतन होते). काही-काही
स्त्रिया देखील अशा आहेत ज्यांना चित्रपट बघितल्याशिवाय झोप येत नाही. चित्रपट
बघणारे अपवित्र बनण्याचा पुरुषार्थ जरूर करतील. इथे जे काही होत आहे, ज्यामध्ये
मनुष्य आनंद आहे असे समजतात ते सर्व दुःखासाठी आहे. हे आहेत विनाशी आनंद. अविनाशी
आनंद, अविनाशी बाबांकडूनच मिळतो. तुम्ही समजता बाबा आम्हाला या लक्ष्मी-नारायणासारखे
बनवत आहेत. तसे आधी तर २१ जन्मांसाठी लिहीत होते. आता बाबा लिहितात ५०-६० जन्म कारण
द्वापरमध्ये सुद्धा सुरुवातीला तर खूप धनवान सुखी असता ना. भले पतित बनता तरी देखील
धन पुष्कळ असते. ते तर जेव्हा एकदम तमोप्रधान बनता तेव्हा दुःखाची सुरुवात होते. आधी
तर सुखी असता. जेव्हा खूप दुःखी होता तेव्हा बाबा येतात. महा अजामील सारख्या
पाप्यांचा देखील उद्धार करतात. बाबा म्हणतात - मी सर्वांना घेऊन जाणार मुक्तिधामला.
मग सतयुगाची राजाई देखील तुम्हाला देतो. सर्वांचे कल्याण तर होते ना. सर्वांना
त्यांच्या ठिकाण्यावर पोहोचवतात - शांतीमध्ये किंवा सुखामध्ये. सतयुगामध्ये सर्वांना
सुख असते. शांतीधाममध्ये देखील सुखी असतात. म्हणतात की, विश्वामध्ये शांती व्हावी.
तुम्ही बोला - ‘या लक्ष्मी-नारायणाचे जेव्हा राज्य होते तेव्हा विश्वामध्ये शांती
होती ना. दुःखाची गोष्ट असूच शकत नाही. ना दुःख, ना अशांती. इथे तर घरा-घरामध्ये
अशांती आहे. देशा-देशामध्ये अशांती आहे. साऱ्या विश्वामध्येच अशांती आहे. किती
तुकडे-तुकडे झाले आहेत. किती मतभेद आहेत. १०० मैलावर वेगळी भाषा आहे. आता म्हणतात -
भारताची प्राचीन भाषा संस्कृत आहे. आता आदि सनातन देवी-देवता धर्मा विषयीच कोणाला
माहिती नाही तर मग कसे म्हणतात की संस्कृत ही प्राचीन भाषा आहे. तुम्ही सांगू शकता
- आदि सनातन देवी-देवता धर्म केव्हा होता? तुमच्यामध्ये देखील नंबरवार आहेत. कोणी
तर मठ्ठ सुद्धा असतात. दिसूनही येते की हा जसा काही पत्थर-बुद्धी आहे. अज्ञान
काळामध्ये देखील म्हणतात ना - ‘हे भगवान, यांच्या बुद्धीचे कुलूप उघडा’.
बाबा तुम्हा सर्व
मुलांना ज्ञानाचा प्रकाश देतात त्यामुळे कुलूप उघडते. तरी देखील काही जणांच्या
बुद्धीची प्रगतीच होत नाही. म्हणतात - ‘बाबा, तुम्ही बुद्धिवानांची बुद्धी आहात.
माझ्या पतीच्या बुद्धीचे कुलूप उघडा’. बाबा म्हणतात - यासाठी मी थोडाच आलो आहे, जे
प्रत्येकाच्या बुद्धीचे कुलूप उघडत बसू. मग तर सर्वांचीच बुद्धी उघडेल, सगळेच
महाराजा-महाराणी बनतील. मी कसे सर्वांचे कुलूप उघडणार. त्यांना सतयुगामध्ये यायचेच
नसेल तर मी कुलूप कसे उघडणार! ड्रामा अनुसार ठरलेल्या वेळेवरच त्यांची बुद्धी उघडेल
(जाणीव होईल). मी कशी उघडणार! ड्रामावर देखील अवलंबून आहे ना. सगळे थोडेच फुल पास
होतात. शाळेमध्ये देखील नंबरवार असतात. हे देखील शिक्षण आहे. प्रजा देखील बनणार आहे.
सर्वांचे कुलूप उघडले तर प्रजा कुठून येईल. हा तर नियमच नाही. तुम्हा मुलांना
पुरुषार्थ करायचा आहे. प्रत्येकाच्या पुरुषार्था वरून समजले जाते, जे चांगल्या
रीतीने शिकतात, त्यांना जिथे-तिथे बोलावले जाते. बाबा जाणतात - कोण-कोण चांगल्या
रीतीने सेवा करत आहेत. मुलांना चांगल्या रीतीने शिकायचे आहे. चांगल्या रीतीने
शिकतील तर घरी घेऊन जाणार मग स्वर्गामध्ये पाठवेन. नाहीतर सजा खूप कडक लागेल. पद
देखील भ्रष्ट होईल. स्टुडंट्सनी टीचरचा शो केला पाहिजे. गोल्डन एजमध्ये पारस-बुद्धी
होते, आता आहे आयरन एज्ड तर इथे गोल्डन एज्ड बुद्धी कशी असू शकते. विश्वामध्ये शांती
होती जेव्हा एक राज्य, एकच धर्म होता. वर्तमानपत्रांमध्ये देखील तुम्ही देऊ शकता -
भारतामध्ये जेव्हा यांचे राज्य होते तेव्हा विश्वामध्ये शांती होती. सरतेशेवटी
समजतील जरूर. तुम्हा मुलांचे नाव प्रसिद्ध होणार आहे. त्या शिक्षणामध्ये किती
पुस्तके इत्यादी वाचतात. इथे तर काहीच नाही. अभ्यास एकदम सोपा आहे. बाकी आठवणीमध्ये
चांगले-चांगले महारथी देखील फेल आहेत. आठवणीचे जौहर (ताकद) नसेल तर ज्ञान तलवार
चालणार नाही. खूप आठवण कराल तेव्हा ताकद येईल. भले बंधनामध्ये देखील आहात तरी देखील
आठवण करत रहाल तर खूप फायदा आहे. कधी बाबांना बघितले देखील नाही, आठवणीमध्येच प्राण
सोडतात तरीही खूप चांगले पद मिळवू शकतात, कारण आठवण खूप करतात. बाबांच्या आठवणीमध्ये
प्रेमाने अश्रू ढाळतात, ते अश्रू मोती बनतात. अच्छा!
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१) स्वतःसाठी
स्वतःच पुरुषार्थ करून उच्च पद मिळवायचे आहे. अभ्यासाने स्वतःलाच राज-तिलक द्यायचा
आहे. ज्ञानाला चांगल्या रीतीने धारण करून सदैव हर्षित रहायचे आहे.
२) ज्ञान तलवारीमध्ये
आठवणीचे जौहर (ताकद) भरायचे आहे. आठवणीनेच बंधने नष्ट करायची आहेत. कधीही घाणेरडे
चित्रपट बघून आपल्या संकल्पांना अपवित्र बनवायचे नाही.
वरदान:-
लौकिकला
अलौकिकमध्ये परिवर्तन करून सर्व कमजोरींपासून मुक्त होणारे मास्टर सर्वशक्तिवान भव
जे मास्टर
सर्वशक्तिवान नॉलेजफुल आत्मे आहेत ते कधी कोणत्याही कमजोरीच्या अथवा समस्यांच्या
वशिभूत होत नाहीत कारण ते अमृतवेलेपासून जे काही बघतात, ऐकतात, विचार करतात किंवा
कर्म करतात त्याला लौकिकपासून अलौकिक मध्ये परिवर्तन करतात. कोणताही लौकिक व्यवहार
निमित्तमात्र करत असूनही अलौकिक कार्य सदैव लक्षात राहिले तर कोणत्याही प्रकारच्या
मायावी विकारांच्या वशिभूत, व्यक्तीच्या संपर्काने स्वतः वशिभूत होणार नाहीत.
तमोगुणी व्हायब्रेशन मध्ये देखील सदैव कमळा समान राहतील. लौकिक कचऱ्यामध्ये राहत
असताना देखील त्यापासून न्यारे राहतील.
बोधवाक्य:-
सर्वांना
संतुष्ट करा तर पुरुषार्थामध्ये आपोआप हाय जंप घ्याल.
अव्यक्त इशारे -
संकल्पांची शक्ती जमा करून श्रेष्ठ सेवेच्या निमित्त बना:- संकल्प शक्ती जमा करायची
असेल तर कोणतीही गोष्ट बघत असताना, ऐकत असताना, सेकंदामध्ये फुलस्टॉप लावण्याचा
अभ्यास करा. जर संकल्पांमध्ये ‘का, काय’ ची रांग लावलीत, व्यर्थची रचना रचलीत तर
त्याची पालना करावी लागेल. त्यामध्ये संकल्प, वेळ, एनर्जी खर्च होत राहील म्हणून आता
या व्यर्थ रचनेचा बर्थ कंट्रोल करा तेव्हाच बेहद सेवेसाठी निमित्त बनू शकाल.