25-07-2026      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो, तुम्ही इथे आला आहात स्वतः सहित साऱ्या दुनियेची काया, कल्पतरू बनविण्याकरिता, आठवणीद्वारेच काया कल्पतरू होईल”

प्रश्न:-
नरकवासी पासून स्वर्गवासी बनण्याची विधी कोणती आहे? आता तुम्हा मुलांना जीवन दान मिळत आहे, ते कसे?

उत्तर:-
नरकवासी पासून स्वर्गवासी बनण्यासाठी जरूर मरावे लागेल. बाबा म्हणतात - ‘मी आलो आहे तुम्हा सर्वांना मृत्यू देण्याकरिता’. तुमच्या या देहाला नष्ट करवून फक्त आत्म्यांना घेऊन जाईन. हेच खरे जीवन दान आहे. यासाठी ही महाभारत लढाई आहे, ज्यामध्ये सर्वांचा विनाश होईल. आणि मग आत्मे पावन बनून परत घरी जातील. नंतर मग स्वर्गामध्ये येतील.

गीत:-
माता ओ माता...

ओम शांती।
गोड-गोड रुहानी मुलांनी गाण्याची ओळ ऐकली. जगत-अंबेची महिमा ऐकली. जगत-अंबा इथे भारतामध्येच गायली जाते. जगत-अंबा आहे तर जगत-पिता देखील जरूर असेल. ‘जगत-अंबा’, सरस्वतीलाच म्हणतात. वास्तविक तिचे नाव एकच असले पाहिजे. तुमचे देखील नाव एकच आहे ना, २-३ तर नाहीत. आता जगत-अंबेला बरोबर साकार मध्ये दाखवतात, शरीरधारी आहे. जगतपिता देखील आहेत, ज्यांना ‘प्रजापिता’ देखील म्हटले जाते. जशी साऱ्या जगाची अंबा आहे, तसे साऱ्या जगाचे पिता आहेत. जरूर दोघेही इथेच असतील. दोघांची नावे देखील सांगितली. दोघेही आहेत - प्रजापिता आणि प्रजा माता. आता दुसरे ‘जगत-पिता’ म्हटले जाते - निराकार शिवबाबांना. जे सर्वांचे पिता आहेत, त्यांचे नावच आहे - परमपिता परम-आत्मा शिव. फक्त ‘ईश्वर’ अथवा ‘परमात्मा’ म्हणायचे नाही. त्यांचे नाव-रूप देखील आहे ना, त्यांना गॉड फादर म्हटले जाते. एक आहेत - आत्म्यांचे पिता, दुसरे आहेत - साकारी मनुष्य आत्म्यांचे पिता आणि मम्मा. शिव आहेत आत्म्यांचे पिता. आत्मा म्हणते - ते आमचे पिता आहेत. मग आत्म्याला हे साकार शरीर मिळते तेव्हा म्हणतात - ‘ब्रह्मा बाबा’, तर दोन पिता झाले. एक शिवबाबा, दुसरे प्रजापिता ब्रह्मा. ब्रह्मा आहे शिवबाबांचा मुलगा. एक निराकार पिता, एक साकारी पिता. निराकार पित्याला म्हटले जाते - पतित-पावन. ब्रह्मा अथवा सरस्वतीला पतित-पावन म्हटले जात नाही. पतित-पावन तर एक आहेत, हे दोन झाले. सर्व बोलावत असतात - ‘पतित-पावन या’, तर दोन पिता झाले. शिवबाबा आहेत रचयिता. नवीन दुनिया रचतात. तर सर्वप्रथम ब्रह्माला जरूर रचावे लागेल. विष्णू आणि शंकराला कधी प्रजापिता म्हणत नाहीत. ब्रह्मालाच प्रजापिता म्हणतात. तर शिवबाबा, प्रजापिता ब्रह्मा द्वारे ॲडॉप्ट करतात. म्हणतात - आम्ही शिवबाबांची मुले आहोत. शिवबाबांनी यांच्यामध्ये प्रवेश करून ॲडॉप्ट केले आहे. तेच आत्म्यांना पावन बनवतात, आत्माच पतित बनली आहे. या कारणाने शरीर देखील पतित मिळते. सोन्यामध्ये चांदी, तांबे, लोखंडाची भेसळ टाकतात, तर आत्म्यामध्ये देखील भेसळ पडते. मुळात आत्मा पवित्र मुक्तिधाम मध्ये राहणारी आहे, जिथे शिवबाबा देखील राहतात. आता शिवबाबा आणि प्रजापिता ब्रह्मा - एकाला ‘बाबा’, एकाला ‘दादा’ म्हणणार. हे तर तुम्ही जाणता, सर्व मनुष्यमात्र ‘शिव’ची संतान आहेत. शिववंशी नंतर मग आहेत ब्रह्माकुमार-कुमारी. शिवबाबा आणि दादा एकत्र आहेत. शिवबाबा यांच्यामध्ये विराजमान आहेत, आपल्याला ब्राह्मण बनवून राजयोग शिकवतात, मनुष्याला देवता बनविण्याकरिता. देवता सतयुगामध्ये राहतात. देवतांना पतित-पावन, ज्ञानाचे सागर म्हटले जात नाही. त्यांना ‘बाबा’ देखील म्हटले जाऊ शकत नाही. आता तुम्ही विष्णुपुरीचे मालक बनत आहात. विष्णूची दोन रूपे - लक्ष्मी-नारायण आहेत, हे मनुष्य जाणत नाहीत. जे भक्ती करतात त्यांना जरूर दोन पिता आहेत. सतयुगामध्ये एकच पिता असतो. तिथे असे म्हणत नाहीत की, ‘हे परमपिता परमात्मा, दुःख हर्ता, सुख कर्ता या’. तिथे तर देवी-देवतांचे राज्य होते. ते कधीही ‘हे गॉड फादर’, ‘लिबरेटर’ असे म्हणणार नाहीत. तिथे कोणी पतित, दुःखी असतच नाहीत, ज्यासाठी पतित-पावनला बोलावतील. तुम्ही जाणता, भारतामध्ये आजपासून ५ हजार वर्षांपूर्वी देवी-देवतांचे राज्य होते. मग १२५० वर्षानंतर असते राम-सीतेचे राज्य. बाबा सिद्ध करून सांगतात - सतयुग-त्रेतामध्ये तुम्ही २१ जन्म घेतले. ब्राह्मण, देवता, क्षत्रिय... सर्व भारतामध्येच बनतात. बाबा येऊन जुन्या दुनियेला नवीन बनवतात. रिज्युवनेट (पुनरुज्जीवित) करतात. काया, कल्पतरू बनवतात,

अमर बनवतात. तुम्हा मुलांना बाबा येऊन अमरलोकचा मालक बनवतात. जेव्हा भारत अमरलोक होता तेव्हा देवतांचे राज्य होते. शिडी उतरत-उतरत येऊन मृत्युलोकचे मालक बनले आहेत. म्हणतात ना - ‘आमचा भारत’, तर प्रजा देखील मालक झाली ना. तुम्ही देखील म्हणाल - ‘आमचा भारत’. आम्ही भारताचे मालक होतो परंतु नरकवासी. देवता म्हणतील, आम्ही स्वर्गवासी आहोत. तुम्ही देखील स्वर्गवासी होता, मग ८४ जन्म भोगून नरकवासी बनला आहात. इथे भारतामध्येच शिवबाबा जन्म घेतात. शिवरात्री आणि शिव जयंती गायली जाते. श्रीकृष्ण जयंती देखील साजरी करतात, त्यांची तर जन्म-वेळ देखील सांगतात. अमुक वेळेला मातेच्या गर्भातून जन्म झाला. सतयुगामध्ये जन्म तर जरूर मातेच्या गर्भातून घेतला असेल. श्रीकृष्ण जयंती असते सतयुग नवीन दुनियेमध्ये, नंतर मग पुनर्जन्मामध्ये येऊ लागला. बाबा फक्त एकाचीच गोष्ट करत नाहीत. कृष्णपुरी सो विष्णुपुरी. राजे उतरतात (पतन होते) तर सारे घराणे उतरते. त्यामध्ये राजा-राणी, प्रजा सर्व येतात. जेव्हा चंद्रवंशींचे राज्य असते तेव्हा सूर्यवंशींचे राज्य भूतकाळ बनलेला असतो. सूर्यवंशींचे राज्य ट्रान्सफर होऊन चंद्रवंशींना मिळते, त्यानंतर मग वैश्यवंशींना मिळते.

आता तुम्हाला समजते आहे - आपण ब्राह्मण कुळाचे आहोत, शेंडी (शिखा) आहोत. शिखेच्या वर बाबा आहेत. आपण आधी ब्राह्मण होतो, नंतर मग शूद्र अर्थात पाय बनलो. पाया पासून एकदम शिखा बनतो. आधी शिवबाबा आहेत, मग आहे शिखा. बाबांनी तुम्हाला ब्राह्मण बनवले आहे. आता तुम्ही शिवबाबांना ‘बाबा-बाबा’ म्हणता. या हिशोबाने नातवंडे झालात. तुम्ही जाणता की, आपण सर्वजण ब्रह्माची संतान - ब्राह्मण-ब्राह्मणी आहोत. एका पित्याची आपण सर्व मुले आहोत. भाऊ-बहिण कधी क्रिमिनल एसॉल्ट (अनैतिक कृत्य) करू शकत नाहीत. किती असंख्य मुले आहेत, सर्वजण म्हणतात - ‘बाबा’. तर इतके सर्व थोडेच खोटे असू शकतात. सर्वांचे पिता तर तेच ‘निराकार शिव’ आणि ‘साकार प्रजापिता ब्रह्मा’ आहेत, बस्स. एका पित्याची मुले भाऊ-बहिणी आहात. तुम्हाला पवित्र जरूर बनायचे आहे. स्त्री-पुरुष पवित्र कसे बनतील, म्हणून ही युक्ती ड्रामामध्ये नोंदलेली आहे. इथे फक्त ब्रह्माकुमार-कुमारी आहेत. कोणी शूद्र कुमार-कुमारी नाहीत. ते आहेत पतित, शूद्र, तुच्छ बुद्धी, कारण बाबांना जाणत नाहीत. म्हणतात ओ गॉड फादर. अच्छा, त्यांचे ऑक्युपेशन (कार्य) माहीत आहे का? नाव, रूप, देश, काळ सांगा. त्यांची जीवन कहाणी सांगा. जर जाणत नाही तर नास्तिक झालात. रचयिता आणि रचनेच्या आदि-मध्य-अंताला जाणत नाहीत. ती आहेच पतित दुनिया. सतयुग पावन दुनिया, कलियुगाला पतित दुनिया म्हटले जाते. यावेळी पूर्णतः तमोप्रधान आहेत, याला रौरव नरक म्हटले जाते. याच्या देखील स्टेजेस असतात. द्वापर पासून नरक बनायला सुरूवात होते, मग वृद्धी होत जाते. भक्ती देखील आधी सतोप्रधान अव्यभिचारी होती, नंतर मग सतो, रजो, तमो होते. तुम्ही पाहिले असेल जिथे तीन रस्ते एकत्र मिळतात त्याला ‘तिठा’ म्हणतात. त्याठिकाणी तेल इत्यादी वाहतात, माथा टेकतात. आता कुठे शिवबाबांची पूजा आणि कुठे तिठ्याची पूजा. याला म्हटले जाते तमोप्रधान भक्ती. पाण्याची देखील पूजा करतात, ‘पतित-पावनी गंगा’ अशी खूप महिमा गातात. आता पतित-पावन कोण? पाण्याची गंगा कशी बरें पतित-पावनी असू शकते! ते तर पाणी आहे ना. पतित-पावन तर बाबा आहेत. शिव जयंती देखील भारतामध्ये केली जाते, तर जरूर भारतामध्येच पतितांना पावन, देवता बनविण्याकरिता येत असतील. ब्रह्मा तनामध्ये येऊन मनुष्यांना देवता बनवतात. इथे तुम्ही येताच मुळी पतितापासून पावन बनण्याकरिता. जशा तुमच्या दोन भुजा आहेत, तशाच त्यांच्या देखील दोन भुजा आहेत. ४-८ भुजावाला कोणी मनुष्य असत नाही. हे अलंकार दिले आहेत. प्रवृत्ती दाखविण्याकरिता चतुर्भुज रूप दाखवले आहे. विष्णुपुरी, लक्ष्मी-नारायणाच्या पुरीला म्हटले जाते. ‘वैष्णव’ शब्द देखील ‘विष्णू’ पासून तयार झाला आहे. देवता, वैष्णव होते. वल्लभाचारी वैष्णव व्हेजिटेरियन (शाकाहारी) असतात, ते काही निर्विकारी नसतात. त्यांच्या मोठ्या हवेल्या असतात. ‘वैष्णव’चा अर्थच समजत नाहीत. विष्णुपुरीमध्ये राहणाऱ्यांना वैष्णव म्हटले जाते. वैष्णव पवित्र असणाऱ्याला म्हटले जाते. राधे-कृष्णाचे वेगळे मंदिर. लक्ष्मी-नारायणाचे वेगळे मंदिर बनवले आहे. भारतवासी जाणतच नाहीत की त्यांच्यामध्ये काय फरक आहे. राधे-कृष्णच लक्ष्मी-नारायण बनतात, हे कोणालाच ठाऊक नाहीये. ते (राधे-कृष्ण) आहे बालपणीचे रूप. ते (लक्ष्मी-नारायण) आहे मोठेपणीचे रूप. लक्ष्मी-नारायणाच्या बालपणीची चित्रे कुठेच नाहीत. लक्ष्मी-नारायणाला सतयुगामध्ये, राधे-कृष्णाला द्वापरमध्ये घेऊन गेले आहेत. आता तुम्ही रचयिता बाबा आणि रचनेच्या आदि-मध्य-अंताला जाणले आहे. बाबा झाडाचे देखील रहस्य समजावून सांगतात. ड्रामाचे देखील रहस्य समजावून सांगतात. झाड पाहिल्याने समजतील की शंकराचार्य तर कलियुगामध्ये येतात. संन्याशांचे घराणे काही सतयुगामध्ये असू शकत नाही. सर्व भगवंताची मुले आहेत तर स्वर्गवासी असली पाहिजेत. परंतु सर्वच काही स्वर्गवासी बनत नाहीत, केवळ देवताच बनतात. आता तुम्ही ब्राह्मणवंशी बनला आहात, नंतर मग देवता बनाल. पवित्र जरूर बनायचे आहे.

तुम्ही जाणता, लहान-थोर सर्व ब्रह्माकुमार-कुमारी आहेत. दोघेही म्हणतात - ‘बाबा, आम्ही तुमची मुले आहोत, ब्राह्मण आहोत’. हे आहेत बापदादा - आदि देव ब्रह्मा आणि शिवबाबा. तुम्ही जाणता, आपण ब्रह्मा बाबा आणि शिवबाबांच्या समोर बसलो आहोत. बाबा म्हणत आहेत - माझी आठवण करा तर पतितापासून पावन बनाल. आपण वारसा शिवबाबांकडून घेतो. शिवबाबा आमचे पिता देखील आहेत, पतित-पावन देखील आहेत, गुरू देखील आहेत. आता हे आहे - संगमयुग; पतितापासून पावन बनण्याचा संगम. पतित-पावन द्वारेच पावन बनतात. संगमयुगावर नद्या आणि सागराचा संगम होतो. नद्यांचा काही संगम होत नाही. आता ज्ञान सागर आणि तुम्हा आत्म्यांचा (मुलांचा) मेळावा भरतो. तुम्ही आलाच आहात - ज्ञान सागराकडे. तुम्ही ज्ञान-सागरातून उगम पावलेल्या ज्ञान-गंगा आहात. तुम्ही ज्ञान-स्नान करवून पावन बनवता, योग शिकवता. सागराचा परिचय देऊन तुम्ही इथे मेळाव्यावर घेऊन आला आहात. यावेळी तुम्ही जेव्हा ब्राह्मण बनता तेव्हा तुम्हाला ३ पिता असतात. लौकिक पिता देखील आहेत आणि प्रजापिता देखील आहेत, आणि मग शिवबाबा देखील आहेत. भक्तिमार्गामध्ये दोन पिता असतात. सतयुगामध्ये एक पिता असेल. या समजून घेण्याच्या गोष्टी आहेत. आता तुमची आत्मा म्हणते, माझे तर एक शिवबाबा, दुसरा कोणीही नाही. मित्र-संबंधी इत्यादी असूनही म्हणतात - माझे तर एक शिवबाबा आहेत. त्यांच्या आठवणीद्वारेच पतितापासून पावन बनायचे आहे. आत्मा जाणते, ते आपले पिता देखील आहेत, टीचर देखील आहेत, सद्गुरू देखील आहेत. मज आत्म्याला बाबा नेण्यासाठी आले आहेत. ब्रह्मा तनामध्ये प्रवेश करून पावन बनवतात. तुम्हाला घेऊन जाण्यासाठी बाबा आले आहेत. मी तुम्हा सर्वांना मृत्यू देण्यासाठी आलो आहे. नरकवासी पासून स्वर्गवासी बनण्यासाठी जरूर मरावे लागेल ना. तुमच्या या देहाला नष्ट करवून बाकी आत्म्यांना घेऊन जाईन. बाबा म्हणतात - तुम्हाला जीवन दान देतो. ही महाभारत लढाई आहे ना. सर्वांचा विनाश होईल. नाहीतर कसे बरे घेऊन जाईन. आत्म्यांना पवित्र बनवून घरी घेऊन जातो. ते तर शांतीधाम आहे. सतयुग येईल तेव्हा कलियुगाचा जरूर विनाश होईल, यासाठी महाभारताचे युद्ध प्रसिद्ध आहे. युद्ध होते देखील या संगमावर, जेव्हा तुम्ही मनुष्यापासून देवता बनता. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) ज्ञान-सागरामध्ये ज्ञान-स्नान करून स्वतःला पावन बनवायचे आहे. मित्र-नातेवाईकांसोबत राहत असतानाही बुद्धीमध्ये राहावे की, ‘माझे तर एक शिवबाबा, दुसरा कोणीही नाही’.

२) विष्णुपुरीमध्ये जाण्याकरिता पक्का वैष्णव अर्थात पवित्र बनायचे आहे. नरकातून जिवंतपणी मरून बुद्धियोग स्वर्गामध्ये लावायचा आहे.

वरदान:-
त्या एकाचाच ध्यास, एकावर भरवसा, एकरस अवस्था याद्वारे नेहमी निर्विघ्न बनणारे निवारण स्वरूप भव

नेहमी एका बाबांचा ध्यास, बाबांच्या कर्तव्याचा ध्यास यामध्ये असे मग्न होऊन रहा की संसारामध्ये कोणतीही वस्तू अथवा व्यक्ती, जरी असली तरीही - तसा अनुभवच होऊ नये. अशा एकाच्या ध्यासामध्ये, एकाच्या भरवशावर, एकरस अवस्थेमध्ये राहणारी मुले सदैव निर्विघ्न बनून चढत्या कलेचा अनुभव करतात. ती ‘कारण’ला परिवर्तन करून ‘निवारण’ रूप बनवतात. कारण पाहून कमजोर बनत नाहीत, निवारण स्वरूप बनतात.

बोधवाक्य:-
प्रशंसेच्या आधारावरील प्रसन्नता अल्पकाळासाठी राहते.

हे अव्यक्त इशारे - ज्वालास्वरूप स्थितीमध्ये राहून शक्तिशाली आठवणीचा अनुभव करा.

ज्वाला स्वरूप स्थितीचा अनुभव करण्यासाठी निरंतर आठवणीची ज्वाला प्रज्वलित राहावी. याची सहज विधी आहे - ‘सदैव स्वतःला “सारथी” आणि “साक्षी” समजून चाला. आत्मा या रथाची सारथी आहे, ही स्मृती स्वतःच या रथा पासून (देहापासून) अथवा कोणत्याही प्रकारच्या देहभाना पासून न्यारे बनवते. स्वतःला सारथी समजल्याने सर्व कर्मेंद्रिये आपल्या कंट्रोलमध्ये राहतात. सूक्ष्म शक्ती “मन-बुद्धी-संस्कार” देखील ऑर्डर प्रमाण राहतात.