25-08-2025      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - पावलो-पावली जे होते ते कल्याणकारी आहे, या ड्रामामध्ये सर्वात अधिक कल्याण त्यांचे होते जे बाबांच्या आठवणीमध्ये राहतात”

प्रश्न:-
ड्रामाच्या कोणत्या नोंदीला जाणणारी मुले अपार खुशीमध्ये राहू शकतात?

उत्तर:-
जे जाणतात की ड्रामा अनुसार आता या जुन्या दुनियेचा विनाश होईल, नैसर्गिक आपत्ती देखील येतील, परंतु आमची राजधानी तर स्थापन होणारच आहे, यामध्ये कोणीही काहीही करू शकत नाही. भले अवस्था खाली-वर होत राहील, कधी खूप उमंग येईल, कधी थंड ठार होतील, यामध्ये गोंधळून जायचे नाही. सर्व आत्म्यांचे पिता भगवान आम्हाला शिकवत आहेत, या आनंदामध्ये राहायचे आहे.

गीत:-
महफिल में जल उठी शमा…

ओम शांती।
गोड-गोड नंबरवार पुरुषार्था नुसार चैतन्य परवान्यांना बाबा प्रेमपूर्वक आठवण देत आहेत. तुम्ही सर्व आहात चैतन्य परवाने. बाबांना शमा देखील म्हणतात, परंतु त्यांना अजिबात जाणत नाहीत. शमा काही मोठी नाहीये, एक बिंदू आहे. हे कोणाच्याही बुद्धीमध्ये नसेल की आपण आत्मा बिंदू आहोत. आमच्या आत्म्यामध्ये सर्व पार्ट आहे. आत्मा आणि परमात्म्याचे नॉलेज इतर कोणाच्याच बुद्धीमध्ये नाही आहे. तुम्हा मुलांनाच बाबांनी येऊन समजावून सांगितले आहे, आत्म्याचे रिअलाइझेशन दिले (जाणीव करून दिली) आहे. पूर्वी हे माहित नव्हते की आत्मा काय आहे, परमात्मा काय आहे! म्हणून देह-अभिमानामुळे मुलांमध्ये मोह देखील आहे, विकार देखील खूप आहेत. भारत किती उच्च होता. विकाराचे नाव देखील नव्हते. तो होता व्हाईसलेस (निर्विकारी) भारत. आता आहे विशश (विकारी) भारत. कोणताही मनुष्य असे म्हणणार नाही जसे बाबा समजावून सांगतात. आजपासून ५ हजार वर्षांपूर्वी मी याला शिवालय बनविले होते. मीच शिवालय स्थापन केले होते. ते कसे? ते देखील तुम्ही आता समजत आहात. तुम्ही जाणता पावलो-पावली जे होते ते कल्याणकारीच आहे. प्रत्येक दिवस जास्त कल्याणकारी त्यांचा आहे जे बाबांची चांगल्या प्रकारे आठवण करून स्वतःचे देखील कल्याण करत राहतात. हे आहेच कल्याणकारी पुरुषोत्तम बनण्याचे युग. बाबांची किती महिमा आहे. तुम्ही जाणता आता खरेखुरे भागवत चालू आहे. द्वापरमध्ये जेव्हा भक्तिमार्ग सुरु होतो तर सर्वप्रथम तुम्ही देखील हिऱ्यांचे लिंग बनवून पूजा करता. आता तुम्हाला स्मृती आली आहे, आपण जेव्हा पुजारी बनलो होतो तेव्हा मंदिरे बनविली होती. हिऱ्या-माणकांचे बनवत होतो. ते चित्र तर आता मिळू शकत नाही. इथे तर हे लोक चांदी इत्यादीचे बनवून पूजा करतात. अशा पुजाऱ्यांचा देखील मान बघा किती आहे. शिवाची पूजा तर सर्वच करतात. परंतु अव्यभिचारी पूजा काही नाही आहे.

हे देखील मुले जाणतात - विनाश सुद्धा येणार आहे जरूर, तयारी चालू आहे. नैसर्गिक आपत्तीची सुद्धा ड्रामामध्ये नोंद आहे. कोणी कितीही डोके आपटले, तुमची राजधानी तर स्थापन होणारच आहे. कोणाचीही ताकद नाही जे यामध्ये काही करू शकतील. बाकी अवस्था तर खाली-वर होणारच. ही आहे खूप मोठी कमाई. तुम्ही कधी खूप आनंदामध्ये चांगल्या विचारात रहाल, कधी थंड पडाल. यात्रेमध्ये देखील खाली-वर होतात, यामध्ये देखील असे होते. कधी तर पहाटे उठून बाबांची आठवण केल्याने खूप आनंद होतो, ओहो! बाबा आम्हाला शिकवत आहेत. वंडर आहे. सर्व आत्म्यांचे पिता भगवान आम्हाला शिकवत आहेत. त्यांनी मग श्रीकृष्णाला भगवान समजले आहे. सर्व दुनियेमध्ये गीतेचा मान खूप आहे कारण भगवानुवाच आहे ना. परंतु हे कोणालाच माहित नाही आहे की भगवान कोणाला म्हटले जाते. भले कितीही पोझिशनवाले मोठ-मोठे विद्वान, पंडित इत्यादी आहेत, म्हणतात देखील - ‘गॉड फादरची आठवण करतो’; परंतु ते कधी आले, येऊन काय केले हे सर्व विसरले आहेत. बाबा सर्व गोष्टी समजावून सांगत राहतात. ड्रामामध्ये हे सर्व नोंदलेले आहे. हे रावणराज्य तरीही पुन्हा होईल आणि मला यावे लागेल. रावणच तुम्हाला अज्ञानाच्या घोर अंधारामध्ये झोपवतो. ज्ञान तर केवळ एक ज्ञान सागरच देतात ज्याद्वारे सद्गती होते. बाबांव्यतिरिक्त इतर कोणीही सद्गती करू शकत नाही. सर्वांचे सद्गती दाता एक आहेत. गीतेचे ज्ञान जे बाबांनी ऐकवले होते ते मग प्रायः लोप पावले. असे नाही की, हे ज्ञान परंपरेने चालत येते. इतरांचे कुराण, बायबल इत्यादी परंपरेने चालत येतात, नष्ट होत नाहीत. तुम्हाला तर जे ज्ञान आता मी देतो; याचे कोणतेही शास्त्र बनत नाही, जी परंपरा अनादि होईल. हे तर तुम्हीच लिहिता नंतर मग नष्ट करता. हे तर सर्व नैसर्गिक रित्या नष्ट होतील. बाबांनी कल्पापूर्वी देखील सांगितले होते, आता सुद्धा तुम्हाला सांगत आहेत - हे ज्ञान तुम्हाला मिळते मग जाऊन प्रारब्ध मिळवता तर मग या ज्ञानाची आवश्यकता रहात नाही. भक्तिमार्गामध्ये सर्व शास्त्र आहेत. बाबा तुम्हाला काही गीता वाचून ऐकवत नाहीत. ते तर राजयोगाची शिकवण देतात, ज्याचे मग भक्तिमार्गामध्ये शास्त्र बनवतात तर ती अगडम-बगडम करून (सर्व एकत्र करून निरर्थक बनवून) टाकतात. तर तुमची मुख्य गोष्ट आहे की, गीतेचे ज्ञान कोणी दिले! त्यांचे नाव बदलून टाकले आहे, बाकी कोणाचीही नावे बदली झालेली नाहीत. सर्वांचे मुख्य धर्म ग्रंथ आहेत ना. यामध्ये मुख्य आहेत डिटीज्म, इस्लामीज्म, बुद्धिज्म (देवी-देवता धर्म, ईस्लामी धर्म, बौद्ध धर्म). भले कोणी म्हणतात की आधी बौद्ध धर्म आहे मागाहून ईस्लामी धर्म. बोला, या गोष्टींशी गीतेचा काहीही संबंध नाही. आमचे तर काम आहे बाबांकडून वारसा घेण्याचे. बाबा किती चांगल्या प्रकारे समजावून सांगतात - हे आहे मोठे झाड. सुंदर आहे, जणूकाही फुलदाणी आहे. ३ ट्यूब (३ धर्म) निघतात. झाड किती चांगले विचारपूर्वक बनवले आहे. कोणीही लगेच समजतील की, आपण कोणत्या धर्माचे आहोत. आमचा धर्म कोणी स्थापन केला? हे दयानंद, अरविंद घोष इत्यादी तर आत्ता होऊन गेले आहेत. ते लोक देखील योग इत्यादी शिकवतात. आहे सर्व भक्ती. ज्ञानाचे तर नामोनिशाणही नाही. किती मोठ-मोठी टायटल्स (उपाध्या) मिळतात. हे देखील सर्व ड्रामामध्ये नोंदलेले आहे, तरीही ५ हजार वर्षांनंतर पुन्हा होईल. सुरुवातीपासून हे चक्र कसे चालत आहे, आणि मग कसे रिपीट होत राहते? हे तुम्ही जाणता. आताचा वर्तमान मग भूतकाळ होऊन तेच भविष्य होईल. पास्ट, प्रेझेंट, फ्युचर. जे पास्ट होते ते मग फ्युचर होते. यावेळी तुम्हाला नॉलेज मिळते मग तुम्ही राजाई घेता, या देवतांचे राज्य होते ना. त्यावेळी इतर कोणाचे राज्य नव्हते. हे देखील एका कहाणी प्रमाणे सांगा. खूप सुंदर गोष्ट बनेल. लॉंग-लॉंग ५ हजार वर्षांपूर्वी हा भारत सतयुग होता, कोणताही धर्म नव्हता, फक्त देवी-देवतांचेच राज्य होते. त्यांना सूर्यवंशी राज्य म्हटले जात होते. लक्ष्मी-नारायणाचे राज्य चालले १२५० वर्ष, मग त्यांनी राज्य दिले दुसऱ्या भावांना अर्थात क्षत्रियांना तर मग त्यांचे राज्य चालले. तुम्ही समजावून सांगू शकता की बाबांनी येऊन शिकवले होते. जे चांगल्यारितीने शिकले ते सूर्यवंशी बनले. जे फेल झाले त्यांचे नाव क्षत्रिय पडले. बाकी युद्ध इत्यादीची गोष्ट नाही. बाबा म्हणतात - ‘मुलांनो तुम्ही माझी आठवण करा तर तुमची विकर्म विनाश होतील’. तुम्हाला विकारांवर विजय मिळवायचा आहे. बाबांनी ऑर्डिनन्स (वटहुकूम) काढला आहे, जे काम विकारावर विजय मिळवतील तेच जगतजीत बनतील. त्याच्या अर्ध्या कल्पानंतर परत वाम-मार्गामध्ये पडतात. त्यांची देखील चित्र आहेत. चेहरा देवतांचा बनलेला आहे. राम-राज्य आणि रावण-राज्य अर्धे-अर्धे आहे. त्यांची कहाणी बसून बनवली पाहिजे. मग काय झाले, त्यानंतर मग काय झाले. हीच सत्यनारायणाची कथा आहे. सत्य तर एक बाबाच आहेत, जे या वेळी येऊन सर्व आदि-मध्य-अंताचे तुम्हाला नॉलेज देत आहेत, जे इतर कुणी देऊ शकत नाही. मनुष्य तर आपल्या पित्यालाच जाणत नाहीत. स्वतः ज्या ड्रामामध्ये ॲक्टर आहेत, त्याच्या क्रिएटर-डायरेक्टर इत्यादींनाच जाणत नाहीत, तर मग अजून कोण जाणणार! आता तुम्हाला बाबा सांगत आहेत - ड्रामा अनुसार हे पुन्हा असेच होईल. बाबा येऊन तुम्हा मुलांना पुन्हा शिकवतील. इथे दुसरे कोणीही येऊ शकत नाही. बाबा म्हणतात - मी मुलांनाच शिकवतो. कुणा नव्याला इथे बसवू शकत नाही. इंद्रप्रस्थाची गोष्ट देखील आहे ना. नीलम परी, पुखराज परी नावे आहेत ना. तुमच्यामध्ये देखील कोणी हिऱ्यासारखी रत्न आहेत. बघा रमेशने प्रदर्शनीची अशी गोष्ट काढली ज्यामुळे सर्वांचे विचार सागर मंथन झाले. तर हिऱ्यासारखे काम केले ना. कोणी पुखराज आहे, कोणी काय आहे! कोणी तर अजिबात काहीच जाणत नाहीत. हे देखील जाणता की राजधानी स्थापन होते. त्यामध्ये राजा-राणी इत्यादी सर्व हवेत. तुम्ही समजता आपण ब्राह्मण श्रीमतावर शिकून विश्वाचे मालक बनतो. किती आनंद झाला पाहिजे. हा मृत्युलोक नष्ट होणार आहे. या बाबांना (ब्रह्मा बाबांना) तर आत्तापासूनच वाटत राहते की, आपण जाऊन बाळ बनणार. बालपणीच्या त्या गोष्टी आताच समोर येत आहेत, वर्तनच बदलून जाते. असेच तिथे सुद्धा जेव्हा वृद्ध होतील तेव्हा समजतील आता हे वानप्रस्थ शरीर सोडून आम्ही किशोर अवस्थेमध्ये जाणार. बालपण आहे सतोप्रधान अवस्था. लक्ष्मी-नारायण तर युवा आहेत, लग्न केलेल्याला किशोरावस्था थोडीच म्हणणार. युवा अवस्थेला रजो, वृद्धला तमो म्हणतात म्हणून श्रीकृष्णावर प्रेम जास्ती असते. आहेत तर लक्ष्मी नारायण सुद्धा तेच. परंतु मनुष्य या गोष्टी जाणत नाहीत. श्रीकृष्णाला द्वापरमध्ये, लक्ष्मी-नारायणाला सतयुगामध्ये घेऊन गेले आहेत. आता तुम्ही देवता बनण्याचा पुरुषार्थ करत आहात.

बाबा म्हणतात - कुमारींना तर जास्त तयारीत राहिले पाहिजे. कुमारी कन्या, अधर कुमारी, देलवाडा इत्यादी जी काही मंदिरे आहेत, ही तुमचीच ॲक्युरेट यादगार आहेत. ते जड, हे चैतन्य. तुम्ही इथे चैतन्यमध्ये बसला आहात, भारताला स्वर्ग बनवत आहात. स्वर्ग तर इथेच असेल. मुलवतन, सूक्ष्मवतन कुठे आहे, तुम्हा मुलांना सर्व माहित आहे. संपूर्ण ड्रामाला तुम्ही जाणता. जे पास्ट झाले आहे ते मग फ्युचर होईल परत पास्ट होईल. तुम्हाला कोण शिकवत आहे, हे समजून घ्यायचे आहे. आम्हाला भगवान शिकवत आहेत. बस आनंदामध्ये बुडून गेले पाहिजे. बाबांच्या आठवणीने सर्व घोटाळे निघून जातात. बाबा आमचे पिता देखील आहेत, आम्हाला शिकवतात देखील आणि मग आम्हाला सोबतही घेऊन जातील. स्वतःला आत्मा समजून परमात्म बाबांशी अशा गोष्टी करायच्या आहेत. बाबा आम्हाला आता माहित झाले आहे, ब्रह्मा आणि विष्णू विषयी देखील माहित झाले आहे. विष्णूच्या नाभीतून ब्रह्मा निघाले. आता विष्णू दाखवतात क्षीरसागरा मध्ये. ब्रह्माला सूक्ष्मवतन मध्ये दाखवतात. वास्तविक आहेत इथे. विष्णू तर झाला राज्य करणारा. जर विष्णु मधून ब्रह्मा निघाले तर जरूर राज्य देखील करतील. विष्णूच्या नाभीतून निघाले तर जसे की संतान झाले. या सर्व गोष्टी बाबा बसून समजावून सांगतात. ब्रह्माच ८४ जन्म पूर्ण करून आता पुन्हा विष्णूपुरीचे मालक बनतात. या गोष्टी देखील कोणी पूर्णपणे समजत नाहीत, तेव्हाच तर तो आनंदाचा पारा चढत नाही. गोप-गोपी तर तुम्ही आहात. सतयुगामध्ये थोडेच असतील. तिथे तर असतील प्रिन्स-प्रिन्सेस. गोप-गोपींचा, ‘गोपी वल्लभ’ आहे ना. प्रजापिता ब्रह्मा आहेत सर्वांचे पिता आणि मग सर्व आत्म्यांचे पिता आहेत निराकार शिव. हे सर्व आहेत मुखवंशावळी. तुम्ही सर्व बी.के. भाऊ-बहीणी झालात. क्रिमिनल दृष्टी (विकारी दृष्टी) होऊ शकत नाही, यामध्येच माया हरवून टाकते. बाबा म्हणतात - अजून पर्यंत तर जे काही वाचले आहे ते बुद्धीने विसरा. मी जे ऐकवतो ते शिका. शिडी तर खूप फर्स्टक्लास आहे. सर्व आधार आहे एका गोष्टीवर. गीतेचा भगवान कोण? श्रीकृष्णाला भगवान म्हणू शकत नाही. तो तर सर्वगुण संपन्न देवता आहे. त्यांचे नाव गीतेमध्ये दिले आहे. सावळा देखील त्यांनाच बनवले आहे आणि मग लक्ष्मी-नारायणाला देखील सावळे करून टाकतात. काहीच ताळमेळ नाही. रामचंद्राला देखील काळे करून टाकतात. बाबा म्हणतात - कामचितेवर बसल्याने सावळा झाला आहे. नाव एकाचे घेतले जाते. तुम्ही सर्वजण ब्राह्मण आहात. आता तुम्ही ज्ञान-चितेवर बसता. शूद्र काम-चितेवर बसतात. बाबा म्हणतात - विचार सागर मंथन करून युक्त्या काढा की कसे जागे करावे? जागे होतील देखील ड्रामा नुसार. ड्रामा फार हळू-हळू चालतो. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) कायम याच स्मृतीमध्ये रहायचे आहे की, आम्ही गोपी वल्लभच्या गोप-गोपी आहोत. याच स्मृतीने कायम आनंदाचा पारा चढलेला रहावा.

२) आजपर्यंत जे काही वाचले आहे, त्याला बुद्धीने विसरून बाबा जे ऐकवतात तेच शिकायचे आहे. आपण भाऊ-बहीणी आहोत याच स्मृतीद्वारे क्रिमिनल दृष्टीला नष्ट करायचे आहे. मायेकडून हार पत्करायची नाही.

वरदान:-
सेवेद्वारे योगयुक्त स्थितीचा अनुभव करणारे रुहानी सेवाधारी भव ब्राह्मण जीवन सेवेचे जीवन आहे. मायेपासून जिवंत ठेवण्याचे साधन - सेवा आहे. सेवा योगयुक्त बनवते परंतु केवळ मुखाची सेवा नाही, ऐकलेल्या मधुर वाक्यांचे स्वरूप बनून सेवा करणे, नि:स्वार्थ सेवा करणे, त्याग, तपस्या स्वरूपाने सेवा करणे, हदच्या कामनांपासून दूर निष्काम सेवा करणे - याला म्हटले जाते ईश्वरीय अथवा रुहानी सेवा. मुखासोबतच मनाद्वारे सेवा करणे अर्थात मनमनाभव स्थितीमध्ये स्थित होणे.

बोधवाक्य:-
आकृतीला न बघता निराकार बाबांना बघाल तर आकर्षणमूर्त बनाल.

अव्यक्त इशारे:- सहजयोगी बनायचे असेल तर परमात्म प्रेमाचे अनुभवी बना. बापदादांचे मुलांवर इतके प्रेम आहे ज्यामुळे त्यांना वाटते की, प्रत्येक मुलाने आपल्यापेक्षाही पुढे असले पाहिजे. दुनियेमध्ये देखील ज्याच्यावर जास्त प्रेम असते त्याला आपल्यापेक्षाही पुढे घेऊन जातात. हीच प्रेमाची निशाणी आहे. तर बापदादासुद्धा म्हणतात - माझ्या मुलांमध्ये आता कोणतीही कमतरता राहू नये, सर्वजण संपूर्ण, संपन्न आणि समान बनावेत. हेच परमात्म प्रेम सहजयोगी बनविते.