25-09-2025
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
“गोड
मुलांनो - हा ड्रामाचा खेळ ॲक्युरेट चालू आहे, ज्याचा जो पार्ट ज्या वेळेला व्हायला
पाहिजे, तसाच रिपीट होत आहे, ही गोष्ट यथार्थ रीतीने समजून घ्यायची आहे”
प्रश्न:-
तुम्हा मुलांचा
प्रभाव कधी दिसून येईल? अजूनपर्यंत कोणत्या शक्तीची कमी आहे?
उत्तर:-
जेव्हा योगामध्ये मजबूत व्हाल तेव्हा प्रभाव दिसून येईल. आता ते जौहर (ती ताकद) नाही
आहे. आठवणीनेच शक्ती मिळते. ज्ञान तलवारी मध्ये आठवणीचे जौहर पाहिजे, जे अजूनपर्यंत
कमी आहे. जर स्वतःला आत्मा समजून बाबांना आठवण करत रहाल तर बेडा (जीवन रुपी नाव)
पार होईल. ही सेकंदाची गोष्ट आहे.
ओम शांती।
रूहानी मुलांना रुहानी बाबा बसून समजावून सांगत आहेत. रूहानी बाबा एकालाच म्हटले
जाते. बाकी सर्व आहेत आत्मे. त्यांना परमात्मा म्हटले जाते. बाबा म्हणतात - मी
देखील आहे आत्माच, परंतु मी परम सुप्रीम सत्य आहे. मीच पतित-पावन, ज्ञानाचा सागर आहे.
बाबा म्हणतात मी येतोच भारतामध्ये, मुलांना विश्वाचा मालक बनविण्यासाठी. तुम्हीच
मालक होता ना. आता स्मृती आली आहे. मुलांना स्मृती करुन देतात - तुम्ही सर्वात पहिले
सतयुगामध्ये आलात मग पार्ट बजावत, ८४ जन्म भोगत आता शेवटाला आला आहात. तुम्ही
स्वतःला आत्मा समजा. आत्मा अविनाशी आहे, शरीर विनाशी आहे. आत्माच देहा सोबत
आत्म्यांशी बोलते. आत्म-अभिमानी होऊन राहत नाहीत तर जरूर देह-अभिमान आहे. मी आत्मा
आहे, हे सर्व विसरले आहेत. म्हणतात देखील - पाप-आत्मा, पुण्य-आत्मा, महान्-आत्मा.
ते काही परमात्मा तर बनू शकत नाहीत. कोणीही स्वतःला शिव म्हणू शकत नाही. शरीरांना
शिव नाव तर अनेकांच्या आहे. आत्मा जेव्हा शरीरामध्ये प्रवेश करते तेव्हा नाव दिले
जाते कारण शरीरा द्वारेच पार्ट बजावायचा असतो. तर मनुष्य मग शरीर भानामध्ये येतात,
मी अमका आहे. आता समजते आहे - ‘होय, मी आत्मा आहे. मी ८४ चा पार्ट बजावला आहे. आता
मी आत्म्याला जाणले आहे. मी आत्मा सतोप्रधान होते, नंतर आता तमोप्रधान बनली आहे’.
बाबा येतातच तेव्हा जेव्हा सर्व आत्म्यांवर कट (गंज) लागलेली आहे. जशी सोन्यामध्ये
भेसळ टाकली जाते ना. तुम्ही पहिले खरे सोने आहात, नंतर मग चांदी, तांबे, लोखंड पडून
तुम्ही एकदम काळे बनले आहात. ही गोष्ट दुसरा कोणीही समजावून सांगू शकत नाही. सर्व
म्हणतात - आत्मा निर्लेप आहे. खाद कशी पडते, ते देखील बाबांनी मुलांना सांगितले आहे.
बाबा म्हणतात - मी येतोच मुळी भारतामध्ये. जेव्हा एकदम तमोप्रधान बनतात, तेव्हा येतो.
ॲक्युरेट वेळेवर येतो. जसा ड्रामामध्ये ॲक्युरेट खेळ चालतो ना. जो पार्ट ज्या वेळेला
होणार असेल त्याच वेळेला पुन्हा रिपीट होईल, त्यामध्ये जरा देखील फरक पडू शकत नाही.
तो आहे हदचा ड्रामा, हा आहे बेहदचा ड्रामा. या सर्व खूप महीन समजून घेण्यासारख्या
गोष्टी आहेत. बाबा म्हणतात - तुमचा जो पार्ट चालला, तो ड्रामा अनुसार. कोणीही
मनुष्य मात्र ना रचयित्याला जाणतात, ना रचनेच्या आदि-मध्य-अंताला जाणतात. ऋषी-मुनी
देखील नेती-नेती (आम्हाला माहित नाही) करत गेले. आता तुम्हाला कोणी विचारेल रचयिता
आणि रचनेच्या आदि-मध्य-अंताला जाणता का? तर तुम्ही लगेच म्हणाल - ‘हो, आणि ते देखील
तुम्ही केवळ आताच जाणू शकता पुन्हा कधीच नाही. बाबांनी सांगितले आहे - तुम्हीच मज
रचयित्याला आणि रचनेच्या आदि-मध्य-अंताला जाणता’. अच्छा, या लक्ष्मी-नारायणाचे
राज्य केव्हा असेल, हे तरी ठाऊक आहे? नाही, यांना काहीच ज्ञान नाहीये. हे तर
आश्चर्य आहे. तुम्ही म्हणता आमच्यामध्ये ज्ञान आहे, हे देखील तुम्ही समजता. बाबांचा
पार्टच फक्त एक वेळचा आहे. तुमचे एम ऑब्जेक्टच आहे - हे लक्ष्मी-नारायण बनण्याचे.
एकदा का बनलात की त्यानंतर मग शिक्षणाची गरज राहणार नाही. बॅरिस्टर बनला तो बनला.
बाबा, जे शिकवणारे आहेत, त्यांची आठवण तर केली पाहिजे. तुम्हाला सर्वकाही सोपे करून
दिले आहे. बाबा वारंवार तुम्हाला सांगतात - पहिले स्वतःला आत्मा समजा. मी बाबांचा
आहे. पहिले तुम्ही नास्तिक होता, आता आस्तिक बनला आहात. या लक्ष्मी-नारायणाने देखील
आस्तिक बनूनच हा वारसा घेतला आहे, जो आता तुम्ही घेत आहात. आता तुम्ही आस्तिक बनत
आहात. आस्तिक-नास्तिक हे शब्द या वेळचे आहेत. तिथे हे शब्दच नाहीत. विचारण्याची
गरजच राहत नाही. इथे प्रश्न उठतात तेव्हाच तर विचारतात - रचयिता आणि रचनेला जाणता
का? तर म्हणतात, नाही. बाबाच येऊन आपला परिचय देतात आणि रचनेच्या आदि-मध्य-अंताचे
रहस्य समजावून सांगतात. बाबा आहेत बेहदचे मालक रचता. मुलांना समजावून सांगितले गेले
आहे इतर धर्म स्थापक देखील इथे जरूर येतात. तुम्हाला साक्षात्कार घडविला होता -
इब्राहिम, क्राईस्ट इत्यादी कसे येतात. ते तर शेवटी जेव्हा खूप आवाज निघेल (खूप नाव
होईल) तेव्हा येतील. बाबा म्हणतात - ‘मुलांनो, देहासहीत देहाच्या सर्व धर्मांचा
त्याग करून माझी आठवण करा’. आता तुम्ही सन्मुख बसला आहात. स्वतःला देह समजायचे नाही,
मी आत्मा आहे. स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण करत रहाल तर बेडा पार होईल.
सेकंदाची गोष्ट आहे. मुक्तीमध्ये जाण्यासाठीच भक्ती अर्धा कल्प करतात. परंतु कोणीही
आत्मा परत घरी जाऊ शकत नाही.
५ हजार वर्षांपूर्वी
देखील बाबांनी हे समजावून सांगितले होते आता देखील समजावून सांगत आहेत. श्रीकृष्ण
काही या गोष्टी समजावून सांगू शकत नाही. त्यांना पिता देखील म्हणता येत नाही. पिता
आहेत लौकिक, अलौकिक आणि पारलौकिक. हदचे पिता आहेत - लौकिक, बेहदचे पिता आहेत -
पारलौकिक, आत्म्यांचे पिता. आणि हे एक आहेत संगमयुगी वंडरफुल पिता, यांना अलौकिक
म्हटले जाते. प्रजापिता ब्रह्माची कोणी आठवणच करत नाहीत. ते आपले ग्रेट-ग्रेट ग्रँड
फादर आहेत, हे बुद्धीमध्ये येत नाही. म्हणतात देखील - ‘आदि देव, एडम…’ परंतु
म्हणण्यापुरतेच. मंदिरांमध्ये देखील आदि देवाचे चित्र आहे ना. तुम्ही तिथे जाल तर
समजाल हे तर आपले यादगार आहे. बाबा देखील बसले आहेत, आपण देखील बसलो आहोत. इथे बाबा
चैतन्य मध्ये बसले आहेत, तिथे जड चित्रे ठेवली आहेत. वरती स्वर्ग देखील योग्यच आहे,
ज्यांनी मंदिर पाहिले आहे ते जाणतात की बाबा आम्हाला आता चैतन्य मध्ये राजयोग शिकवत
आहेत. नंतर मग मंदिरे बांधतो. हे लक्षात आले पाहिजे की ही सर्व आपलीच यादगार आहेत.
हे लक्ष्मी-नारायण आता आपण बनत आहोत. आधी होतो, मग शिडी उतरत आलो आहोत, आता पुन्हा
आपण घरी जाऊन राम-राज्यामध्ये येणार. त्या नंतर आहे रावण राज्य तेव्हा पुन्हा आपण
वाम मार्गामध्ये जातो. बाबा किती चांगल्या रीतीने समजावून सांगतात - यावेळी सर्व
मनुष्य मात्र पतित आहेत म्हणून बोलावतात - हे पतित-पावन येऊन आम्हाला पावन बनवा.
दुःख हरण करून सुखाचा रस्ता सांगा. म्हणतात देखील भगवान जरूर कोणत्यातरी रूपामध्ये
येईल. आता कुत्रा-मांजर, दगड-धोंडे इत्यादी मध्ये तर येणार नाही. गायले गेले आहे
भाग्यशाली रथावर येतात. बाबा स्वतः म्हणतात मी या साधारण रथामध्ये प्रवेश करतो. हे
(ब्रह्मा बाबा) आपल्या जन्मांना जाणत नाहीत, तुम्ही आता जाणता. यांच्या अनेक
जन्मांच्या अंतामध्ये जेव्हा वानप्रस्थ अवस्था होते तेव्हा मी प्रवेश करतो. भक्ती
मार्गामध्ये पांडवांची खूप मोठी-मोठी चित्रे बनवली आहेत, रंगून मध्ये बुद्धाचे
देखील खूप मोठे चित्र आहे. इतका मोठा काही कोणी मनुष्य थोडाच असतो. मुलांना तर आता
हसू येत असेल, रावणाचे चित्र कसे बनवले आहे. दिवसेंदिवस मोठे बनवत जातात. ही काय
चीज आहे, जी दरवर्षी जाळतात. असा कोणता शत्रू असेल! शत्रूचेच चित्र बनवून जाळतात.
अच्छा, रावण कोण आहे, कधी शत्रू बनला आहे ज्याला दरवर्षी जाळत येतात? ह्या शत्रू
विषयी कोणालाच ठाऊक नाही आहे. याचा अर्थ अजिबात कोणीही जाणत नाहीत. बाबा समजावून
सांगतात - तो आहेच रावण संप्रदाय, तुम्ही आहात राम संप्रदाय. आता बाबा म्हणतात
गृहस्थ व्यवहारांमध्ये राहून, कमलपुष्प समान बना आणि माझी आठवण करत रहा. तर म्हणतात
- ‘बाबा, हंस आणि बगळे एकत्र कसे राहू शकतात, खिट-पिट होते. ती तर जरूर होईल, सहन
करावे लागेल. यामध्ये खूप युक्त्या देखील आहेत. बाबांना म्हटले जाते रांझू रमजबाज (महान
युक्तिबाज). सर्वजण त्यांना आठवण करतात ना - ‘हे भगवान दुःख हरण करा, दया करा,
लिबरेट करा’. ते लिबरेटर पिता सर्वांचे एकच आहेत. तुमच्याकडे कोणीही येतात तर
त्यांना वेगवेगळे बसवून समजावून सांगा, कराचीमध्ये प्रत्येकाला वेगवेगळे बसवून
समजावून सांगत होते.
तुम्ही मुले जेव्हा
योगामध्ये मजबूत व्हाल तेव्हा मग तुमचा प्रभाव दिसून येईल. आता अजून ते जौहर (ती
ताकद) नाही आहे. आठवणी द्वारे शक्ती मिळते. शिक्षणाने शक्ती मिळत नाही. ज्ञान तलवार
आहे, त्यामध्ये आठवणीचे जौहर भरायचे (ताकद भरायची) आहे. ती ताकद कमी आहे. बाबा रोज
सांगत राहतात - ‘मुलांनो, आठवणीच्या यात्रेमध्ये राहिल्याने तुम्हाला ताकद मिळेल’.
शिक्षणामध्ये इतकी ताकद नाही. आठवणी द्वारेच तुम्ही साऱ्या विश्वाचे मालक बनता.
तुम्ही सर्व काही स्वतःसाठीच करता. असे खूप आले आणि मग गेले. माया देखील अशक्यप्राय
आहे. बरेचजण येत नाहीत, फक्त म्हणतात - ज्ञान तर खूप चांगले आहे, आनंद देखील होतो.
बाहेर गेले आणि खल्लास. जरा देखील टिकू देत नाही. काहीजणांना तर खूप आनंद होतो. ओहो!
आता बाबा आले आहेत, आम्ही तर चाललो आपल्या सुखधामला. बाबा म्हणतात - आता पूर्ण
राजधानी तरी स्थापन कुठे झाली आहे. तुम्ही यावेळी आहात ईश्वरी संतान नंतर असाल देवता.
डिग्री कमी झाली ना. मीटर मध्ये पॉईंट असतात, इतके पॉईंट कमी. तुम्ही आता एकदम उच्च
बनता मग कमी होत-होत खाली येता. शिडी खाली उतरायचीच आहे. आता तुमच्या बुद्धीमध्ये
शिडीचे ज्ञान आहे. चढती कला, सर्व का भला. मग हळू-हळू उतरती कला होते.
सुरुवातीपासून या चक्राला व्यवस्थित रित्या समजून घ्यायचे आहे. यावेळी तुमची चढती
कला होते कारण बाबा सोबत आहेत ना. ईश्वर ज्यांना मनुष्य सर्वव्यापी म्हणतात, ते बाबा
‘गोड-गोड मुलांनो’ असे म्हणत राहतात आणि मुले मग ‘बाबा-बाबा’ म्हणत राहतात. बाबा
आम्हाला शिकविण्याकरिता आले आहेत, आत्मा शिकते. आत्माच कर्म करते. मी आत्मा शांत
स्वरूप आहे. या शरीराद्वारे कर्म करते. ‘अशांत’ शब्दच तेव्हा बोलला जातो जेव्हा
दुःख असते. अन्यथा शांती तर आपला स्वधर्म आहे. बरेच जण म्हणतात - मनाला शांती हवी.
अरे आत्मा तर शांत स्वरूप आहे, तिचे घरच आहे शांतीधाम. तुम्ही स्वतःला विसरला आहात.
तुम्ही तर शांतीधामचे राहणारे होता. शांती तिथेच मिळेल. आजकाल म्हणतात एक राज्य, एक
धर्म, एक भाषा असावी. वन कास्ट, वन रिलीजन, वन गॉड. आता गव्हर्मेंट लिहिते देखील वन
गॉड आहे, मग सर्वव्यापी का म्हणतात? वन गॉड तर कोणी मानतच नाहीत. तर आता तुम्हाला
मग हे लिहायचे आहे. लक्ष्मी-नारायणाचे चित्र बनवता, त्यावर लिहा - सतयुगामध्ये
जेव्हा यांचे राज्य होते तर वन गॉड, वन डीटी रिलीजन (एकच दैवी धर्म) होता. परंतु
मनुष्य काहीच समजत नाहीत. लक्षच देत नाहीत. लक्ष त्यांचे जाईल जे आपल्या ब्राह्मण
कुळाचे असतील. इतर कोणीही समजणार नाहीत, म्हणून बाबा म्हणतात - वेगवेगळे बसवा आणि
मग समजावून सांगा. फॉर्म भरून घ्या तर माहित होईल कारण कोणी कोणत्या धर्माला मानणारा
असेल, तर कोणी कोणत्या. सर्वांना एकत्र बसवून कसे सांगणार. आपली-आपली गोष्ट सांगायला
सुरुवात करतील. सर्वप्रथम तर विचारले पाहिजे की, कुठे आला आहात? बी. के. चे नाव ऐकले
आहे का? प्रजापिता ब्रह्मा तुमचे कोण लागतात? कधी नाव ऐकले आहे का? तुम्ही प्रजापिता
ब्रह्माची संतान नाहीत, आम्ही तर प्रॅक्टिकलमध्ये आहोत. आहात तुम्ही देखील परंतु
समजत नाही आहात. समजावून सांगण्याची खूप युक्ती पाहिजे. अच्छा!
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१) मंदिरे
इत्यादीला पहात असताना नेहमी ही स्मृती रहावी की ही सर्व आपलीच यादगार आहेत. आता
आपण असे लक्ष्मी-नारायण बनत आहोत.
२) गृहस्थ
व्यवहारामध्ये राहत असताना कमलपुष्प समान रहायचे आहे. हंस आणि बगळे सोबत आहेत तर
खूप युक्तीने चालायचे आहे. सहन देखील करायचे आहे.
वरदान:-
एकता आणि
संतुष्टतेच्या सर्टिफिकेट द्वारे सेवेमध्ये सदा सफलतामूर्त भव
सेवेमध्ये सफलतामूर्त
बनण्यासाठी दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत एक - संस्कारांना जुळवून घेण्याच्या
बाबतीत एकता आणि दुसरे - स्वतः देखील नेहमी संतुष्ट रहा तसेच इतरांना देखील संतुष्ट
करा. नेहमी एकमेकांमध्ये स्नेहाच्या भावनेने, श्रेष्ठतेच्या भावनेने, संपर्कामध्ये
या तर दोन्ही सर्टिफिकीटे मिळतील. मग तुमचे प्रॅक्टिकल जीवन बाबांच्या चेहऱ्याचा
आरसा बनेल आणि त्या आरशामध्ये बाबा जे आहेत, जसे आहेत तसे दिसून येतील.
बोधवाक्य:-
आत्म
स्थितीमध्ये स्थित होऊन अनेक आत्म्यांना जीवनदान द्या तर आशीर्वाद मिळतील.
अव्यक्त इशारे:- आता
लगनच्या (एकाग्रतेच्या) अग्नीला प्रज्वलित करून योगाला ज्वाला रूपी बनवा. जसे
अग्नीमध्ये कोणतीही वस्तू टाकाल तर नाव, रुप, गुण सर्व बदलून जाते, असेच जेव्हा
बाबांच्या आठवणीच्या लगनच्या अग्नीमध्ये पडता तेव्हा परिवर्तित होता. मनुष्या पासून
ब्राह्मण बनता, मग ब्राह्मणा पासून फरिश्ता सो देवता बनता. लगनच्या अग्नीद्वारे (एकाग्रतेच्या
अग्नीद्वारे) असे परिवर्तन होते ज्यामुळे कोणत्याही प्रकारचा माझेपणा उरत नाही,
म्हणूनच आठवणीला ज्वाला रूप म्हटले आहे.