25-10-26 अव्यक्त बापदादा
मराठी मुरली
19.02.2012 ओम शान्ति
मधुबन
घराचे गेट उघडण्यासाठी
बेहदच्या वैराग्य वृत्तीद्वारे देह-अभिमानाच्या ‘मी’पणाचा त्याग करा, बर्थ डे ला
दृढतेद्वारे बोलणे आणि करणे एक समान करून सफलता मूर्त बना
आज बापदादा चोहो
बाजूच्या मुलांना पाहून हर्षित होत आहेत. चोहोबाजूंनी हाच हृदयातील आवाज येत आहे -
‘वाह बाबा वाह!’ आणि बाबांच्या हृदयातून हाच आवाज आहे - ‘वाह मुलांनो वाह!’ आज
सर्वजण उमंग-उत्साहाने दिव्य जन्माचा आनंद साजरा करत आहेत. आज आनंद साजरा देखील करत
आहेत आणि त्याचसोबत मुलांच्या आनंदामध्ये बाबा देखील आनंद साजरा करत आहेत. आजचाच हा
विचित्र जयंतीचा दिवस आहे जो बाबा आणि मुलांचा एकत्र दिव्य जन्माचा दिवस आहे. तर
तुम्ही सर्वजण मुबारक देत सुद्धा आहात आणि घेतही आहात, कारण बाबांनी जन्म घेतलाच आहे
यज्ञ रचण्याकरिता. तर यज्ञामध्ये ब्राह्मण मुलेच हवीत. तर ही एकच अशी जयंती आहे जी
बाबांची आणि मुलांची एकत्र जयंती आहे, म्हणून या शिवजयंतीला हिरे तुल्य जयंती म्हटले
जाते. तर बाबा बघत आहेत की, प्रत्येक मूल किती प्रेमाने मुबारक देण्यासाठी आले आहे
आणि बाबा देखील मुबारक देण्यासाठी आले आहेत. ही जयंती अतिशय प्रेममयी जयंती आहे.
लाडकी मुले, प्रेमळ बाबा आणि अतिशय प्रेमाने ओतप्रोत असलेली अशी ही जयंती आहे.
बापदादांकडे चोहो
बाजूच्या देश-विदेशातील सर्व मुलांचे प्रेम पोहोचत आहे. बाबा एक-एक लाडक्या मुलाला
पद्मपटीने प्रेमभरी मुबारक देत आहेत. हे प्रेम प्रत्येक मुलाला सहजच कर्मयोगी
बनविणारे आहे. हे प्रेम सदैव सहज बनविणारे आहे, शक्तिशाली बनवणारे आहे. बापदादांचा
एकट्याचा जन्मदिवस नाहीये कारण बाबा नेहमीच मुलांसोबत राहणारे आहेत. सोबत राहणार,
सोबत येणार, सोबत राज्य करणार. तुमचा देखील सर्वांचा हाच वायदा आहे ना! सोबत राहायचे
आहे, सोबत उडायचे आहे आणि सोबत राज्य करायचे आहे!
बापदादांना आज तुमच्या
भक्तांची देखील विशेष आठवण येत आहे; कारण तुमच्या भक्तांनी जे तुम्ही केले आहे
त्याची कॉपी खूप छान केली आहे. कारण द्वापरमध्ये परमधाम मधून सर्वात आधी आले आहेत
तर पहिला जन्म नेहमी सतोप्रधान असतो, त्यामुळे त्यांनी कॉपी खूप छान केली आहे. तर
आजच्या दिवशी मुलांसोबत तुमच्या भक्तांची देखील आठवण येत आहे. वतनमध्ये तर आज
अमृतवेलेपासून भरपूर मुलांची रौनक होती (मुलांची चैतन्यमयी लगबग चालू होती).
प्रत्येक मुलाला वाटत होते की, आपण बापदादांना आपली मुबारक द्यावी, आणि बापदादांनी
देखील प्रत्येक मुलाची मुबारक अतिशय प्रेमाने स्वीकारली. तर वतनमध्ये आज असा मेळावा
भरला होता. एका बाजूला तुम्ही मुले होतात, दुसऱ्या बाजूला ॲडव्हान्स पार्टीमध्ये
गेलेले तुमचे साथीदार सोबत आलेले होते. बापदादांनी पाहिले की तुमच्या दादी आणि
अनन्य भावांची लिस्ट खूप मोठी होती. प्रत्येक दादी बापदादांना देखील मुबारक देत
होत्या, परंतु त्याचसोबत तुम्हा सर्व भाग्यवान मुलांना देखील मुबारक देत होत्या. तर
वतनमध्ये आज मुबारक देण्याचा एक मेळावाच भरला होता. सर्व ॲडव्हान्स पार्टीच्या
विशेष दादी आणि भाऊ तुम्हां विशेष निमित्त सोबत राहणाऱ्या आत्म्यांची आठवण करत खूप
मनापासून मुबारक देत होते. तर तुम्हा सर्वांना बापदादा सर्वांच्या वतीने सुद्धा
मुबारक देत आहेत. स्वीकार केल्या?
सर्व विशेष बहिणी आणि
भावांचा एकच आवाज होता की आता घराचे गेट कधी उघडणार! तर विशेष दीदी, दादी म्हणत
होत्या की आमच्या सख्यांना, भावांना आमच्याकडून हेच सांगा की, आता घरी परतण्यासाठी
कोणती तारीख फिक्स केली आहे? सर्व एकत्र जाणार ना! वेगवेगळे तर जाणार नाही? दार
उघडण्यासाठी सगळे एकत्र हजर होतील. तर ते डेट मागत होते. बापदादा हसले, कारण बाबांची
देखील इच्छा आहे की आता गेट उघडण्यासाठी सर्व मुलांची बेहदची वैराग्य वृत्ती असणे
आवश्यक आहे, हीच गेट उघडण्याची चावी आहे. बापदादा तर नेहमी सांगत असतात की, बेहदचे
वैरागी बनून वेस्ट संकल्प आणि वेस्ट समय या दोघांचा मिळून लवकरात लवकर त्याग करणे
अर्थात बेहदचे वैरागी बनणे कारण बापदादांनी पाहिले आहे की सर्वात मोठे विघ्न आहे -
देह-अभिमान. या देह-अभिमानाचा त्याग करणे, चालता-बोलता देही-अभिमानी बनणे, हेच
बेहदचे वैराग्य आहे.
तसेतर सर्वजण म्हणतात
खरे - ‘माझे बाबा, गोड बाबा, प्यारे बाबा’. जेव्हा की मनापासून ‘माझे’ म्हणता तेव्हा
हा देह-अभिमान जो ‘मी’ च्या रूपामध्ये येतो; बाबा नेहमी सांगतात की हे ‘मी’चे हे जे
भान येते की, ‘मी जे करतो, मी जे सांगतो, तेच बरोबर आहे’. एक आहे कॉमन ‘मी’, मी
आत्मा आहे आणि हे माझे शरीर आहे. दुसरा जो महीन ‘मी’ आहे जो सांगितला आहे - ‘मी हे
केले, मी हे करू शकतो, मीच बरोबर आहे…’, हा जो महीन ‘मी’ आहे याला नष्ट करायचे आहे.
तर हा देह-अभिमान, या रूपामध्ये येतो. तर आजच्या दिवशी, जे कधीकधी बाबांच्या
विशेषतेला देखील ‘माझे’ मानून ‘मी’ चे भान ठेवतात त्यांनी हा महीन ‘मी’ जो आहे, याला
समाप्त करायचे आहे. पहा, यादगार जी बनवतात त्यामध्ये देखील जेव्हा बळी चढवतात तेव्हा
स्वतःला बळी देत नाहीत परंतु कोणाला बळी चढवतात? बकऱ्याला. बकऱ्यालाच का शोधले?
कारण बकरा ‘मे-मे’ असेच करतो. भक्तांनी कॉपी तर खूप चांगली केली आहे. तर आजच्या
दिवशी हा देह-अभिमानाचा ‘मी’, तुम्ही कोणता पुरुषार्थ करून समाप्त करू शकता?
बाबांच्या बर्थ डे ला आला आहात तर काही सौगात तर द्याल ना! तर बाबांना दुसरी कोणतीही
सौगात नको आहे; बाबा म्हणतात - हा महीन ‘मी’पणा जो आहे, हाच आजच्या
जन्मदिवसानिमित्त बाबांना सौगात मध्ये द्या. देऊ शकता का? द्यायची आहे? आहे हिंमत?
हिंमत आहे का? हात वर करा. हात वर करून तर खूश केले. हात वर केला, तर सौगात दिलीत
ना! दिलेली सौगात कोणी परत घेते का? बरीच मुले म्हणतात - बाबा, आमची इच्छा नसते
परंतु येते. याचे कारण काय? कारण जर विचारले तर उत्तर खूप चांगले देतात. म्हणतात -
जाणतो सुद्धा, मानतो देखील परंतु काय करणार परत येते. विचार करा! दिलेली वस्तू जर
तुमच्याकडे परत आली तर काय दिलेली वस्तू स्वतःजवळ ठेवाल? तर जर तुम्ही मनापासून दिली,
आणि परत आली जरी, तरी तिला आपल्याकडे ठेवाल का? कारण काय आहे? बाबांवर प्रेम आहे
ना, तर प्रेम असल्याकारणाने जे बाबा सांगतात ते करू इच्छितात, हा बाबांकडे सुद्धा
रिझल्ट येतो परंतु काय आहे, दृढतेची कमी आहे, दृढतेला यूज करा. संकल्प करता परंतु
एक आहे संकल्प करणे, दुसरे आहे ‘दृढ संकल्प’ करणे. तर वारंवार केलेल्या संकल्पामध्ये
दृढता आणणे, यावर कमी लक्ष आहे. दृढता सफलतेची चावी आहे. तर आज काय कराल? ‘संकल्प’
कराल की ‘दृढ संकल्प’ कराल? जर तुमचा दृढ संकल्प आहे तर त्याची निशाणी आहे - दृढता
सफलतेची चावी आहे. तर चावी लावण्यात काही कमतरता राहून जाते आणि म्हणून संपूर्ण
सफलता मिळत नाही.
तर आज बापदादांसोबत
मुलांचाही बर्थ डे आहे, बाबांचाही बर्थ डे आहे. तसा तर हा विशेष दिवस आहे ना!
संपूर्ण कल्पामध्ये पित्याचा आणि मुलांचा एकाच वेळी जन्म असणे ही केवळ याच बर्थ डे
ची विशेषता आहे. तर आजच्या दिवशी बाबांना हेच हवे आहे की, प्रत्येक मुलाने आज आपल्या
मनामध्ये दृढता पूर्वक हा दृढ संकल्प करावा की, ‘मला व्यर्थ संकल्प आणि व्यर्थ वेळ
गमवायचा नाही आहे’; कारण संपूर्ण दिवसाला जर लक्ष देऊन चेक केले तर अधून-मधून वेळ
आणि संकल्प व्यर्थ जातो. बापदादा तर सर्वांचे रजिस्टर पाहतात ना! व्यर्थला वाचवणे
अर्थात समाप्तीची वेळ जवळ आणणे. तयार आहात? की अजूनही म्हणाल - ‘आपणच येते, काय करू?’
व्यर्थचे काम आहे येणे, तुमचे काम काय आहे, बसवणे? तर बसवून घेता म्हणूनच तर त्याने
देखील घर बनवले आहे. ते देखील समजून गेले आहेत की दृढता नाही आहे; त्यामुळे आजच्या
स्नेहाच्या दिवशी सर्वांच्या मनामध्ये आता काय आहे? आज अमृतवेलेपासून मनामध्ये
वारंवार काय येत आहे? ‘माझे बाबा, माझे बाबा, माझे बाबा’. बाबांच्या देखील मनात आहे
- ‘माझी मुले, माझी मुले, माझी मुले…’ तर मेजॉरिटी जसे बाबांच्या आठवणीमध्ये राहिले
आहेत. दिवसाचा प्रभाव आहे, बापदादांनी नोट केले. स्नेहाचा दिवस असल्याकारणाने
वारंवार सर्वांना ‘माझे बाबा, माझे बाबा’, अशी खूप वेळ आठवण येत आहे. असे आहे?
यामध्ये हात वर करा. आजच्या दिवसाची गोष्ट आहे. ‘माझे बाबा’ आठवणीमध्ये राहिले? आणखी
काही आठवणीमध्ये राहिले? नाही. असे-असे हात करत आहेत, खूप छान. तर दररोज वारंवार
चेक करा, संगमचा प्रत्येक दिवस बाबांच्या स्नेहाचा दिवस आहे. जसे आज विशेष दिवस
असल्यामुळे जास्त आठवण राहिली ना! असे अमृतवेलेला नेहमी हे लक्षात ठेवा की, हा
संगमाचा एक-एक दिवस किती महान आहे. एका छोट्याशा जन्मामध्ये २१ जन्मांची प्राप्ती
ही गॅरंटी आहे. तर प्रत्येक दिवसाचे किती महत्व झाले! कुठे २१ जन्म आणि कुठे हा
छोटासा एक जन्म.
तर बापदादांना आज
तुम्हा मुलांकडून बर्थ डे ची हीच सौगात हवी आहे. द्याल सौगात? द्याल? हात वर करा.
दृढ निश्चयाचा हात. ‘बघू, करू’ असे नको. ‘करायचेच’ आहे. काहीही झाले तरी त्याग
म्हणजे त्याग. हा त्याग नाहीये परंतु भाग्य आहे. तर आजचा दिवस जर खरेच हात वर केला
असेल तर हा महत्वाचा दिवस आहे ना! आतापासून तुमच्या चेहऱ्यावर व्यर्थची समाप्ती आणि
सदैव स्मृती स्वरूपाची झलक चेहऱ्यावर आणि वर्तनामध्ये आली पाहिजे. हे मायेचे जे
शब्द आहेत ना! ‘काय, का, कधी, कसे…; हे समाप्त व्हावेत, तेव्हाच चेहरा आणि वर्तन
सेवा करेल. आता जास्त प्रभाव भाषणांचा आहे. बापदादा खूश आहेत भाषणे खूप छान करत
आहात; परंतु दिवसेंदिवस आता जसे या भाषणांद्वारे, वाणीद्वारे सेवेचा उमंग चांगला
ठेवला आणि सफलता सुद्धा प्राप्त केली. असेच आता समयानुसार तुमची जास्त सेवा चेहरा
आणि चलन द्वारे होईल. त्याचा अभ्यास हवा, जसे भाषणांचा अभ्यास करता-करता हुशार झाला
आहात ना! असे आता चेहरा आणि वर्तनामधून कोणालाही खुशीचे वरदान द्या, हा अभ्यास करा;
कारण वेळ फार थोडा मिळेल, म्हणून समय आणि संकल्पाचे महत्व ठेवत पुढे जात राहा.
होणार सर्व अचानक आहे म्हणून बर्थ डे तर लक्षात राहतो ना! बर्थ डे येणार आहे, येणार
आहे किती वेळा आठवण आली? ‘बापदादा येणार आहेत, येणार आहेत, भेटायचे आहे’, हे
कधीपासून लक्षात ठेवले? आता हा संकल्प करा - दृढतेद्वारे व्यर्थ समय आणि संकल्पाला
समाप्त करायचे आहे. ‘माझे बाबा, माझे बाबा’ हे शब्द आपल्या हृदयामध्ये सामावून घ्या,
केवळ तोंडाने म्हणणे ही वेगळी गोष्ट आहे, परंतु हृदयामध्ये सामावून घ्या, हृदयात
साठवून ठेवलेली गोष्ट कधीही विसरली जात नाही. बोललेली एखादी गोष्ट विसरली जाऊ शकते,
परंतु हृदयातील गोष्ट चांगली अथवा व्यर्थ दोन्ही विसरल्या जात नाहीत. तर आज
बापदादांना सौगात तर दिली ना! दोन्ही हात वर करा. अरे व्वा! हा फोटो काढा. बापदादा
फक्त हाताला पाहत नाहीत, बापदादा तुमच्या मनाला पाहत आहेत.
तर आजच्या दिवसाची
सौगात स्वतःला देखील दिली आणि बाबांना सुद्धा दिली. जर तुमचा व्यर्थ समय आणि व्यर्थ
संकल्प वाचला तर तुमचा दिवस कसा जाईल? सदैव खुशनसीब आणि खुशनुमा (भाग्यशाली आणि
आनंदी) व्हाल. तर आता दररोज अमृतवेलेला बापदादांसोबत मिलन साजरे केल्यानंतर हा
संकल्प स्मृतीमध्ये आणा आणि संपूर्ण दिवसामध्ये अधून-मधून चेक करा. बापदादा टाइम
फिक्स करत नाहीत परंतु तुमचा टाइम तुम्ही फिक्स करा. मधून-मधून चेक करा की,
बापदादांसमोर बर्थ डे ला जे वचन दिले होते, ते वचन आपण पाळत आहोत का? हे स्वतःच
स्वतःशी चेक करा. इच्छा तर सर्वांचीच आहे. बापदादा आज चेहरे पाहत आहेत की, इच्छा आहे
- ‘हो करू, करू, करू’, परंतु हे वेस्ट येते ना, तेव्हा ते मग बाबांसोबत केलेला वायदा
सुद्धा विसरायला लावते. तर वेस्ट समाप्त. आताही एक मिनिट पॉवरफुल आत्मा बनून संकल्प
करा - वेस्टला समाप्त करायचेच आहे. (बापदादांनी ड्रिल करवून घेतली) अच्छा.
बापदादा एकाही मुलाला
आप समान बनविल्याशिवाय राहू इच्छित नाहीत. प्रेम आहे ना! बघा प्रेमाची निशाणी आजचा
दिवस आहे. संपूर्ण कल्पामध्ये पित्याचा आणि मुलाचा असा दिवस नसतो जो पित्याचा आणि
मुलाचा जन्म एकाच दिवशी असेल. बाबांचे प्रत्येक मुलावर मनापासून प्रेम आहे की माझा
बच्चा, परमात्म्याचा बच्चा, जो संकल्प कराल तो संकल्प सफल व्हावा. एक-एक
संकल्पामध्ये शक्ती असावी, बोलणे आणि करणे एक व्हावे. म्हटले अर्थात झाले. शुद्ध
संकल्प असावा. म्हणजे मग व्यर्थ आपोआपच संपून जाईल कारण ॲडव्हान्स पार्टीला डेट हवी
आहे. तर तुमच्या ज्या मोठ्या दादी आहेत, मोठे भाऊ आहेत, त्यांच्यावर प्रेम तर आहे
ना. किती आठवण काढतात, दादीची, दीदीची, चंद्रमणीची. सर्वांची नावे घेत जावी.
सर्वांची आठवण काढतात. तर त्या जे इच्छित आहेत ते करून दाखवा ना. तर आजचा संकल्प
काय राहिला? बोलणे आणि करणे एक असावे. ठीक आहे! तर आज चोहो बाजूच्या मुलांना बापदादा
बर्थ डेची हीच सौगात देत आहेत “बोलणे आणि करणे” एक समान करा. आजच्या दिवसाची,
दृढतेची सौगात बापदादा प्रत्येक मुलाला देत आहेत. शुभ कार्य दृढतेने सफल करा.
बाकी जे कोणी आज
पहिल्यांदा आले आहेत, ते उठा. हात हलवा. बापदादा येणाऱ्या मुलांना, ‘आले आणि जाणले
- माझे बाबा’, यासाठी खूप-खूप मुबारक देत आहेत. बापदादांना आनंद आहे तरीही जी खळबळ
माजणार आहे त्याच्या अगोदरच पोहोचला आहात, याची मुबारक असो. आता येणाऱ्या प्रत्येक
मुलाने हा संकल्प करा, दृढ करा, साधारण संकल्प नाही, दृढ संकल्प करा की तीव्र
पुरुषार्थी बनायचेच आहे. ‘तीव्र’, साधारण नाही. तर आपल्या येणाऱ्या राज्यामध्ये याल,
त्यामुळे आता साधारण संकल्पांची वेळ संपली आहे; आता तीव्र पुरुषार्थाची वेळ आहे,
चान्स आहे. तरीही चान्स घेणारे चान्सलर तर बनलात. तर बापदादा प्रत्येक मुलाला पाहून
खूश आहेत आणि प्रत्येक मुलाला सांगत आहेत की, तीव्र पुरुषार्थ कराल तर सोबत जाल,
सोबत राहाल. तर मुबारक असो, मुबारक असो, मुबारक असो.
बापदादांना मनापासून
वाटते की एकही बच्चा मागे राहू नये, सोबत यावा. मागाहून येणारे चांगले वाटत नाहीत.
सोबत असावेत, हातात हात असावा, घरी जायचे आहे ना. रिटर्न जर्नी आहे. त्यासाठी जसे
ब्रह्मा बाबा फरिश्ता आहेत, असे फालो फादर. साकारमध्ये असताना फरिश्ता, ज्याला पण
पाहाल फरिश्ताच फरिश्ता, तेव्हा गेट उघडेल. अच्छा. सर्व मुलांना सदा खुशनसीब,
खुशनुमा स्वरूपाची प्रेमपूर्वक आठवण.
वरदान:-
आपल्या एकाग्र
स्वरूपा द्वारे सूक्ष्म शक्तीच्या लीलांचा अनुभव करणारे अंतर्मुखी भव
एकाग्रतेचा आधार
अंतर्मुखता आहे. जे अंतर्मुखी आहेत ते आतल्या आत सूक्ष्म शक्तीच्या लीलांचा अनुभव
करतात. आत्म्यांचे आवाहन करणे, आत्म्यांसोबत रूहरिहान करणे, आत्म्यांच्या
संस्कार-स्वभावाला परिवर्तन करणे, बाबांसोबत कनेक्शन जोडून देणे - अशा आत्म्यांच्या
दुनियेमध्ये आत्मिक सेवा करण्यासाठी एकाग्रतेची शक्ती वाढवा, यामुळे सर्व प्रकारची
विघ्ने आपोआप समाप्त होतील.
सुविचार:-
सर्व प्राप्तींना
स्वतःमध्ये धारण करून विश्वाच्या स्टेजवर प्रत्यक्ष होणे हाच प्रत्यक्षतेचा आधार आहे.
हे अव्यक्त इशारे -
परोपकाराच्या भावनेने संपन्न बनून अपकारीवर देखील उपकार करा.
जर कोणी रोज तुमची
निंदा करेल, तो नेहमीच अकल्याण करेल, परंतु तुम्ही त्याच्यापासून दूर जाण्याऐवजी
त्याचेही कल्याण करत राहा, हेच तुम्हा ज्ञानी-तू-आत्म्याचे कर्तव्य आहे. जसे
बाबांच्या महिमेमध्ये विशेष दयाळूपणाचा गुण गायला जातो. भले मग देशात असो अथवा
परदेशात, बाबांसमोर जातील तर दयाळू, मर्सीफुल म्हणतील. तर तुम्ही देखील सर्व मास्टर
दयाळू आहात. असे दयाळू बनून सर्वांवर उपकार करा.