26-01-2026
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
“गोड
मुलांनो - तुम्ही अर्धाकल्प ज्यांची भक्ती केली आहे, तेच पिता स्वतः तुम्हाला शिकवत
आहेत, या शिक्षणाद्वारेच तुम्ही देवी-देवता बनता”
प्रश्न:-
योगबळाच्या
लिफ्टची कोणती कमाल आहे?
उत्तर:-
तुम्ही मुले योगबळाच्या लिफ्टद्वारे सेकंदामध्ये वर चढता अर्थात सेकंदामध्ये
तुम्हाला जीवनमुक्तीचा वारसा मिळतो. तुम्ही जाणता शिडी उतरण्यासाठी ५ हजार वर्षे
लागली आहेत आणि चढता एका सेकंदामध्ये, हीच योगबळाची कमाल आहे. बाबांच्या
आठवणीद्वारेच सर्व पापे नष्ट होतात. आत्मा सतोप्रधान बनते .
ओम शांती।
रूहानी बाबा रूहानी मुलांना बसून समजावून सांगत आहेत. रूहानी बाबांची महिमा तर
मुलांना सांगितली आहे. ते ज्ञानाचा सागर, सत-चित्-आनंद स्वरूप आहेत. शांतीचे सागर
आहेत. त्यांच्यासाठी सर्व बेहदची शिफ्ते (वैशिष्ट्ये) सांगितली जातात. आता बाबा
आहेत ज्ञानाचे सागर. आणि यावेळी जे काही मनुष्य आहेत ते सर्व जाणतात की, आपण भक्तीचे
सागर आहोत. भक्तीमध्ये जो सर्वात जास्त भक्ती करणारा असतो त्याला मान मिळतो. यावेळी
कलियुगामध्ये आहे भक्ती, दुःख. सतयुगामध्ये आहे ज्ञानाचे सुख. असे नाही की तिथे
ज्ञान आहे. तर ही महिमा केवळ एका बाबांची आहे आणि मुलांची देखील महिमा आहे कारण बाबा
मुलांना शिकवतात, यात्रा देखील शिकवतात. बाबांनी दोन यात्रा सांगितल्या आहेत. भक्त
लोक तीर्थयात्रा करतात, चारी बाजूला परिक्रमा लावतात. तर जितका वेळ चारी बाजूला
परिक्रमा लावतात, तितका वेळ विकारामध्ये जात नाहीत. दारू इत्यादी कोणतीच छी-छी वस्तू
खात-पीत नाहीत. कधी बद्रीनाथ, कधी काशीला फेरी मारतात. भक्ती करतात भगवंताची. आता
भगवान तर एकच असायला पाहिजेत ना. सर्वत्र परिक्रमा तर करता कामा नये ना!
शिवबाबांच्या तीर्थक्षेत्राची देखील परिक्रमा करतात. सर्वात मोठे बनारसचे
तीर्थक्षेत्र गायले गेले आहे, ज्याला ‘शिवा’ची पुरी म्हटले जाते. सर्वत्र जातात
परंतु ज्यांचे दर्शन करण्याकरिता जातात किंवा ज्यांची भक्ती करतात, त्यांची
बायोग्राफी, ऑक्युपेशन विषयी कोणालाच ठाऊक नाही आहे म्हणून त्याला म्हटले जाते -
अंधश्रद्धा. कोणाची पूजा करणे, डोके टेकवणे आणि त्यांच्या जीवन कहाणीला न जाणणे,
यालाच म्हटले जाते - ब्लाइंड फेथ (अंध विश्वास). घरामध्ये देखील साजरे करतात,
देवींची किती पूजा करतात, मातीच्या किंवा दगडाच्या देवी बनवून त्यांचा खूप शृंगार
करतात. समजा लक्ष्मीची मूर्ती बनवतात, तर त्यांना विचारा - ‘यांची बायोग्राफी सांगा’.
तर म्हणतील - सतयुगाची महाराणी होती आणि त्रेताची मग सीता होती. बाकी यांनी मग किती
वेळ राज्य केले, लक्ष्मी-नारायणाचे राज्य किती कधीपासून कधीपर्यंत चालले, हे कोणीही
जाणत नाही. भक्तीमार्गामध्ये यात्रेला जातात, हे सर्व आहेत भगवंताला भेटण्याचे उपाय.
वेद-शास्त्र पठण करणे हा देखील भगवंताला भेटण्याचा एक उपाय आहे. परंतु भगवान आहेत
कुठे? तर म्हणतील ते तर सर्वव्यापी आहेत.
आता तुम्ही जाणता
शिक्षणाद्वारेच आपण हे (देवी-देवता) बनतो. बाबा स्वतः येऊन शिकवत आहेत, ज्यांच्या
भेटीसाठी अर्धाकल्प भक्तीमार्ग चालतो. म्हणतात - बाबा, पावन बनवा आणि तुमचा परिचय
देखील द्या की तुम्ही कोण आहात? बाबांनी सांगितले आहे की, तुम्ही आत्मा बिंदू आहात,
आत्म्यालाच इथे शरीर मिळालेले आहे, म्हणून इथे कर्म करते. देवतांसाठी म्हणता येईल
की, हे सतयुगामध्ये राज्य करून गेले आहेत. ख्रिश्चन लोक तर समजतात खरोखर गॉड फादरने
पॅराडाईज स्थापन केला. आपण तिथे नव्हतो. भारतामध्ये पॅराडाईज होता, त्यांची बुद्धी
तरी देखील चांगली आहे. भारतवासी सतोप्रधान देखील बनतात तर मग तमोप्रधान देखील बनतात.
ते इतके सुखही पाहत नाहीत तर इतके दुःख देखील पाहत नाहीत. आता शेवटचे ख्रिश्चन लोक
किती सुखी आहेत. पहिले तर ते गरीब होते. पैसा तर मेहनत करूनच कमावला जातो ना.
सुरुवातीला एक क्राइस्ट आला, मग त्यांचा धर्म स्थापन होतो, वृद्धी होत जाते. एकाचे
दोन, दोनाचे चार… याप्रकारे वृद्धी होत जाते. आता बघा ख्रिश्चनांचे झाड किती मोठे
झाले आहे. फाउंडेशन आहे देवी-देवता घराणे. ते मग इथे यावेळी स्थापन होते. पहिला एक
ब्रह्मा नंतर मग ब्राह्मणांची ॲडॉप्टेड संतान वृद्धिंगत होते. बाबा शिकवतात तर खूप
जास्त ब्राह्मण बनतात. पहिला तर हा (ब्रह्मा) एकटाच होता ना. एका पासून किती वृद्धी
झाली आहे. अजून कितीतरी होणार आहे. जितके सूर्यवंशी, चंद्रवंशी देवता होते, तेवढे
सर्व बनणार आहेत. पहिले आहेत एक शिवबाबा, त्यांची आत्मा तर आहेच. बाबांची संतान आपण
आत्मे किती आहोत? आम्हा सर्व आत्म्यांचे पिता एक अनादि आहेत. मग सृष्टीचे चक्र फिरत
राहते. सगळेच मनुष्य कायमचे तर नसतात ना. आत्म्यांना भिन्न-भिन्न पार्ट बजावायचा आहे.
या झाडाचे सर्वात पहिले खोड आहे देवी-देवतांचे, मग त्यांच्या पासून शाखा निघाल्या
आहेत. तर बाबा बसून मुलांना समजावून सांगत आहेत - ‘मुलांनो, मी येऊन काय करतो?’
आत्म्यामध्येच धारणा होते. बाबा बसून सांगत आहेत की, मी कसा आलो? तुम्ही सर्व मुले
जेव्हा पतित बनले आहात तर आठवण करता. सतयुग-त्रेतामध्ये तर तुम्ही सुखी होता
त्यामुळे आठवण करत नव्हता. द्वापरच्या नंतर जेव्हा दुःख वाढले तेव्हा मला बोलावले
आहे - ‘हे परमपिता परमात्मा बाबा’. ‘होय बाळांनो, ऐकले. काय पाहिजे आहे?’ बाबा,
येऊन पतितांना पावन बनवा. बाबा, आम्ही खूप दुःखी, पतित आहोत. येऊन आम्हाला पावन बनवा.
कृपा करा, आशीर्वाद करा. तुम्ही मला बोलावले आहे - बाबा, येऊन पतितांना पावन बनवा.
पावन सतयुगाला म्हटले जाते. हे देखील बाबा स्वतः सांगत आहेत. ड्रामाच्या प्लॅन
अनुसार जेव्हा संगमयुग असते, सृष्टी जुनी होते तेव्हा मी येतो.
तुम्ही समजता संन्यासी
देखील दोन प्रकारचे आहेत. ते आहेत हठयोगी, त्यांना राजयोगी म्हटले जात नाही. त्यांचा
आहे हदचा संन्यास. घरदार सोडून जंगलामध्ये जाऊन राहतात. गुरूंचे फॉलोअर्स बनतात.
गोपीचंद राजाची देखील एक कथा सांगतात. त्याने विचारले - ‘तुम्ही घरदार का सोडता?
कुठे जाता?’ शास्त्रांमध्ये तर अनेक कथा आहेत. आता तुम्ही बी. के. राजांना देखील
जाऊन ज्ञान आणि योग शिकवत आहात. एक ‘अष्टावक्र गीता’ देखील आहे, ज्यामध्ये दाखवतात
की, राजाला वैराग्य आले, म्हणाले मला कोणीतरी परमात्म्याची भेट घालून द्या. सर्वत्र
दवंडी पिटवली. ही तीच वेळ आहे. तुम्ही जाऊन राजांना ज्ञान देता ना, बाबांशी भेट
घालून देण्याकरिता. जसे तुम्ही भेटले आहात तर इतरांना देखील भेटविण्याचा प्रयत्न
करता. तुम्ही म्हणता - आम्ही तुम्हाला स्वर्गाचा मालक बनवू, मुक्ती-जीवनमुक्ती देऊ.
आणि मग त्यांना बोला - शिवबाबांना आठवण करा, इतर कोणाचीही नाही. तुमच्याकडे देखील
सुरुवातीला बसल्या-बसल्या एकमेकांना दृष्टी देत ध्यानामध्ये जात होते ना. खूप
आश्चर्य वाटत होते. यांच्यामध्ये (ब्रह्मा बाबांमध्ये) बाबा होते ना, तर ते चमत्कार
दाखवत होते. सर्वांची दोरी खेचून घेत होते. बापदादा एकत्रित होते ना. कब्रस्तान
बनवत होते. सर्वांनी बाबांच्या आठवणीमध्ये झोपून जा. सर्वजण ध्यानामध्ये जात होते.
ही सर्व शिवबाबांची चतुराई होती. त्याला मग बरेचजण जादू समजू लागले. तो होता
शिवबाबांचा खेळ. बाबा जादूगार, सौदागर, रत्नाकर आहेत ना. धोबी देखील आहेत, सोनार
देखील आहेत, वकील देखील आहेत. सर्वांना रावणाच्या जेलमधून सोडवतात. त्यांनाच सर्वजण
बोलावतात - ‘हे पतित-पावन, हे दूर देशामध्ये राहणारे… आम्हाला येऊन पावन बनवा’. या
देखील पतित दुनियेमध्ये, पतित शरीरामध्ये येऊन आम्हाला पावन बनवा. आता तुम्ही त्याचा
देखील अर्थ समजता. बाबा येऊन सांगतात - तुम्हा मुलांनी रावणाच्या देशामध्ये मला
बोलावले आहे, मी तर परमधाममध्ये बसलो होतो. स्वर्ग स्थापन करण्यासाठी मला तुम्ही
नरकामध्ये, रावणाच्या देशामध्ये बोलावले आहे की, आता सुखधाममध्ये घेऊन चला. आता
तुम्हा मुलांना घेऊन जातात ना. तर हा आहे ड्रामा. मी जे तुम्हाला राज्य दिले होते
ते संपुष्टात आले आहे, नंतर मग द्वापरपासून रावण राज्य सुरू झाले. ५ विकारांमध्ये
जाऊन पडले (पतन झाले), तर त्यांची चित्रे देखील जगन्नाथपुरीमध्ये आहेत. प्रथम
क्रमांकावर जो होता तोच मग ८४ जन्म घेऊन आता शेवटच्या जन्मामध्ये आहे आता पुन्हा
त्यालाच पहिल्या नंबरमध्ये जायचे आहे. हा ब्रह्मा बसला आहे, विष्णू देखील बसला आहे.
यांचे आपसामध्ये काय कनेक्शन आहे? दुनियेमध्ये हे कोणीही जाणत नाही. ब्रह्मा-सरस्वती
देखील खरे तर सतयुगाचे मालक लक्ष्मी-नारायण होते. आता नरकाचे मालक आहेत. आता ते
तपस्या करत आहेत - हे लक्ष्मी-नारायण बनण्याकरिता. दिलवाडा मंदिरामध्ये पूर्ण
यादगार दाखवले आहे. बाबा देखील इथेच आले आहेत म्हणून आता लिहितात देखील - ‘आबू सर्व
तीर्थांमध्ये, सर्व धर्मांच्या तीर्थांमध्ये मुख्य तीर्थ आहे’; कारण बाबा इथेच येऊन
सर्व धर्मांची सद्गती करतात. तुम्ही शांतीधामला जाऊन मग स्वर्गामध्ये जाता. बाकीचे
सर्व शांतीधामला निघून जातात. ते आहे जड यादगार, हे आहे चैतन्य. जेव्हा तुम्ही
चैतन्यमध्ये तसे बनाल तेव्हा मग ही मंदिरे इत्यादी सर्व नष्ट होतील. मग पुन्हा
भक्तिमार्गामध्ये हे यादगार बनवतील. आता तुम्ही स्वर्गाची स्थापना करत आहात. मनुष्य
समजतात - स्वर्ग वरती आहे. आता तुम्ही समजता हाच भारत स्वर्ग होता, आता नरक आहे. हे
चक्र पाहताच सर्व ज्ञान बुद्धीमध्ये येते. द्वापर पासून बाकीचे इतर धर्म येतात तर
आता पहा किती धर्म आहेत. हे आहे आयरन एज्ड. आता तुम्ही संगमावर आहात. सतयुगामध्ये
जाण्यासाठी पुरुषार्थ करत आहात. कलियुगामध्ये आहेत सर्व पत्थर-बुद्धी. सतयुगामध्ये
आहेत पारस-बुद्धी. तुम्हीच पारस-बुद्धी होता, तुम्हीच मग पत्थर-बुद्धी बनला आहात,
पुन्हा पारस-बुद्धी बनायचे आहे. आता बाबा म्हणतात - तुम्ही मला बोलावले आहे तर मी
आलो आहे आणि तुम्हाला सांगत आहे - ‘काम विकाराला जिंका तर जगतजीत बनाल’. मुख्य हे
विकारच आहेत. सतयुगामध्ये आहेत सर्व निर्विकारी. कलियुगामध्ये आहेत सर्व विकारी.
बाबा म्हणतात मुलांनो,
आता निर्विकारी बना. ६३ जन्म विकारामध्ये गेला आहात. आता हा अंतिम जन्म पवित्र बना.
आता मरायचे तर सर्वांनाच आहे. स्वर्ग स्थापन करण्यासाठी आलो आहे तर आता माझ्या
श्रीमतावर चाला. मी जे सांगतो ते ऐका. आता तुम्ही पत्थर-बुद्धीला पारस-बुद्धी
बनविण्याचा पुरुषार्थ करत आहात. तुम्हीच पूर्ण शिडी खाली उतरता आणि मग चढता. तुम्ही
जणू काही जिन्न आहात. जिन्नची कथा आहे ना - तो म्हणाला मला काम द्या. तर राजाने
म्हटले - ठीक आहे शिडी उतर आणि चढ. पुष्कळ मनुष्य असे म्हणतात की, भगवंताला काय पडले
होते जे शिडी चढायला आणि उतरायला लावतात. भगवंताला काय झाले जी अशी शिडी बनवली! बाबा
समजावून सांगत आहेत की, हा अनादि खेळ आहे. तुम्ही ५ हजार वर्षांमध्ये ८४ जन्म घेतले
आहेत. तुम्हाला खाली उतरण्यामध्ये ५ हजार वर्षे लागली आहेत आणि मग वर एका
सेकंदामध्ये जाता. ही आहे तुमच्या योगबलाची लिफ्ट. बाबा म्हणतात - आठवण करा तर तुमची
पापे नष्ट होतील. बाबा येतात तर सेकंदामध्ये तुम्ही वर चढता आणि मग खाली उतरण्यासाठी
५ हजार वर्षे लागली आहेत. कला कमी होत जातात. चढण्याची तर लिफ्ट आहे. सेकंदामध्ये
जीवनमुक्ती. सतोप्रधान बनायचे आहे. मग हळू-हळू तमोप्रधान बनाल. ५ हजार वर्षे लागतात.
अच्छा, आणि मग एका जन्मामध्ये तमोप्रधानापासून सतोप्रधान बनायचे आहे. आता जेव्हा की
मी तुम्हाला स्वर्गाची बादशाही देत आहे तर तुम्ही पवित्र का नाही बनणार. परंतु
कामेशु, क्रोधेशु देखील आहेत ना. विकार न मिळाल्याने मग पत्नीला मारतात, बाहेर
काढतात, आग लावतात. अबलांवर किती अत्याचार होतात. हे देखील ड्रामामध्ये नोंदलेले आहे.
अच्छा!
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१) जगाचा मालक
बनण्यासाठी किंवा विश्वाची बादशाही घेण्यासाठी मुख्य म्हणजे कामविकारावर विजय
प्राप्त करायचा आहे. संपूर्ण निर्विकारी जरूर बनायचे आहे.
२) जसे आपल्याला बाबा
मिळाले आहेत तसा सर्वांना बाबांची भेट घालून देण्याचा प्रयत्न करायचा आहे. बाबांची
खरी ओळख द्यायची आहे. खरीखुरी यात्रा शिकवायची आहे.
वरदान:-
दुःखाची दुनिया
समोर असताना देखील बेगमपूरच्या बादशाहीचा अनुभव करणारे अष्टशक्ती स्वरूप भव
गम आणि बेगम (दुःख आणि
चिंता रहित) या विषयीचे नॉलेज तुम्हाला आताच आहे, दुःखाची दुनिया समोर असताना देखील
नेहमी बेगमपूरच्या बादशाहीचा (चिंतारहित राज्याचा सम्राट असल्याचा) अनुभव करणे -
हीच अष्ट शक्ती स्वरूप, कर्मेंद्रियजीत मुलांची निशाणी आहे. आताच तुम्हाला
बाबांद्वारे सर्व शक्तींची प्राप्ती होते परंतु जर कोणता ना कोणता संगदोष किंवा
कोणत्या कर्मेंद्रियाच्या अधीन होऊन आपली शक्ती हरवून बसता तेव्हा बेगमपूरचा जो नशा
किंवा आनंद प्राप्त आहे तो आपणच नाहीसा होतो. बेगमपूरचे बादशहा देखील गरीब बनतात.
बोधवाक्य:-
दृढतेची शक्ती
सदैव सोबत असेल तर सफलता गळ्यातील हार आहे.
अव्यक्त इशारे:- या
अव्यक्ती महिन्यामध्ये बंधनमुक्त राहून जीवनमुक्त स्थितीचा अनुभव करा.
आपल्या संकल्पांची
वादळे किंवा कोणत्याही संबंधाद्वारे, प्रकृती किंवा समस्यांद्वारे संकटे किंवा
विघ्न येतात तर त्यापासून मुक्ती मिळविण्याकरिता योग-युक्त, युक्तियुक्त बना.
जोपर्यंत योग-युक्त नाही तोपर्यंत विघ्नांनी युक्त आहात (विघ्नांनी ग्रासलेले आहात).