26-07-2025      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - हे संगमयुग विकर्म विनाश करण्याचे युग आहे, या युगामध्ये तुम्ही कोणतेही विकर्म करायचे नाही, पावन जरूर बनायचे आहे”

प्रश्न:-
अतींद्रिय सुखाचा अनुभव कोणत्या मुलांना होऊ शकतो?

उत्तर:-
जे अविनाशी ज्ञान रत्नांनी भरपूर आहेत, त्यांनाच अतींद्रिय सुखाचा अनुभव होऊ शकतो. जे जितके ज्ञानाला जीवनामध्ये धारण करतात तितके श्रीमंत बनतात. जर ज्ञान रत्न धारण केली नसतील तर गरीब आहेत. बाबा तुम्हाला पास्ट, प्रेझेंट, फ्युचरचे (भूतकाळ, वर्तमानकाळ, भविष्यकाळाचे) ज्ञान देऊन त्रिकालदर्शी बनवत आहेत.

गीत:-
ओम् नमो शिवाए…

ओम शांती।
पास्ट सो प्रेझेन्ट चालू आहे मग हे जे प्रेझेन्ट आहे, ते पास्ट होईल. आता तुम्ही पुरुषोत्तम संगमयुगावर आहात. ‘पुरुषोत्तम’ हा शब्द जरूर लिहिला पाहिजे. तुम्ही प्रेझेन्ट बघत आहात, जे पास्टचे (भूतकाळाचे) गायन आहे ते आता प्रत्यक्षामध्ये घडत आहे, यामध्ये कोणताही संशय येता कामा नये. मुले जाणतात संगमयुग देखील आहे, कलियुगाचा अंत देखील आहे. बरोबर संगमयुग ५००० वर्षांपूर्वी पास्ट झाले (भूतकाळ झाले) होते, आणि आता मग प्रेझेन्ट (वर्तमान) आहे. आता बाबा आले आहेत, फ्युचर (भविष्य) देखील तेच असेल जे पास्ट झाले. बाबा राजयोग शिकवत आहेत मग सतयुगामध्ये राज्य मिळवणार. आता आहे संगमयुग. ही गोष्ट तुम्हा मुलांशिवाय कोणीही जाणत नाही. तुम्ही प्रॅक्टिकलमध्ये राजयोग शिकत आहात. हा अतिशय सोपा आहे. जी पण छोटी अथवा मोठी मुले आहेत, सर्वांना एक मुख्य गोष्ट जरूर समजावून सांगायची आहे की, ‘बाबांची आठवण करा विकर्म विनाश होतील’. जेव्हा विकर्म विनाश होण्याची वेळ आहे तर असा कोण असेल जो पुन्हा विकर्म करेल. परंतु माया विकर्म करायला लावते, समजतात थोबाडीत बसली. आपल्याकडून ही खूप मोठी चूक झाली. जर का बाबांना बोलावता की, ‘हे पतित-पावन या’. आता बाबा आलेले आहेत पावन बनविण्यासाठी तर मग पावन बनले पाहिजे ना. ईश्वराचे बनून मग परत पतित बनता कामा नये. सतयुगामध्ये सर्व पवित्र होते. हा भारतच पावन होता. गातात देखील - व्हाईसलेस वर्ल्ड आणि विशश वर्ल्ड (निर्विकारी दुनिया आणि विकारी दुनिया). ते संपूर्ण निर्विकारी, आपण विकारी आहोत कारण आपण विकारामध्ये जातो. विकार नावच विशशचे (पापाचे) आहे. पतितच बोलावतात - येऊन पावन बनवा. क्रोधी बोलावत नाहीत. बाबा देखील मग ड्रामा प्लॅन अनुसार येतात. जरा देखील फरक पडू शकत नाही. जे पास्ट झाले आहे ते प्रेझेन्ट होत आहे (जो भूतकाळ झाला आहे तो आता वर्तमानमध्ये होत आहे). पास्ट, प्रेझेन्ट, फ्युचरला जाणणे त्यालाच त्रिकालदर्शी म्हटले जाते. हे लक्षात ठेवावे लागेल. या खूप मेहनतीच्या गोष्टी आहेत. घडोघडी विसरतात. नाहीतर तुम्हा मुलांना किती अतींद्रिय सुखामध्ये राहिले पाहिजे. तुम्ही इथे अविनाशी ज्ञान-धनाने खूप खूप श्रीमंत बनत आहात. जितकी ज्याची धारणा आहे, ते खूप श्रीमंत बनत आहेत, परंतु नवीन दुनियेसाठी. तुम्ही जाणता - आपण जे काही करतो ते फ्युचरच्या नवीन दुनियेकरिता. बाबा आलेच आहेत नवीन दुनियेची स्थापना करण्यासाठी. जुन्या दुनियेचा विनाश करण्यासाठी. हुबेहूब कल्पापूर्वी प्रमाणेच होईल. तुम्ही मुले देखील बघाल. नैसर्गिक आपत्ती देखील येणार आहेत. भूकंप झाला आणि संपले. भारतामध्ये किती भूकंप होतील. आपण तर म्हणतो - हे तर होणारच आहे, कल्पापूर्वी देखील झाले होते; तेव्हाच तर म्हणतात - सोन्याची द्वारका पाताळामध्ये गेली. मुलांनी हे व्यवस्थित बुद्धीमध्ये पक्के केले पाहिजे की आपण ५००० वर्षांपूर्वी देखील हे नॉलेज घेतले होते. यामध्ये जरा देखील फरक नाही. बाबा, ५००० वर्षांपूर्वी देखील आम्ही तुमच्याकडून वारसा घेतला होता. आम्ही तुमच्याकडून अनेकदा वारसा घेतला आहे. त्याची मोजदाद होऊ शकत नाही. किती वेळा तुम्ही विश्वाचे मालक बनता, नंतर फकीर बनता. यावेळी भारत पूर्ण फकीर आहे. तुम्ही लिहिता देखील - ‘ड्रामा प्लॅन अनुसार’. ते (दुनियावाले) ड्रामा शब्द म्हणत नाहीत. त्यांचा प्लॅनच त्यांचा आपला आहे.

तुम्ही म्हणता - ‘ड्रामाच्या प्लॅन अनुसार ५००० वर्षांपूर्वी प्रमाणे आम्ही पुन्हा स्थापना करत आहोत’. कल्पापूर्वी जे कर्तव्य केले होते ते आता देखील श्रीमताद्वारे करतो. श्रीमताद्वारेच शक्ती घेतो. शिव-शक्ती नाव देखील आहे ना. तर तुम्ही शिव-शक्ती देवी आहात, ज्यांचे मंदिरामध्ये पूजन होते. तुम्हीच देवी आहात जे मग विश्वाचे राज्य प्राप्त करता. जगत अंबेची बघा किती पूजा होते. अनेक नावे ठेवली आहेत. आहे तर एकच. जसे बाबा देखील एकच शिव आहेत. तुम्ही देखील विश्वाला स्वर्ग बनविता तर तुमची पूजा होते. अनेक देवी आहेत, लक्ष्मीची किती पूजा करतात. दीपावलीच्या दिवशी महालक्ष्मीची पूजा करतात. ती झाली मुख्य, महाराजा-महाराणी मिळून ‘महालक्ष्मी’ असे म्हणतात. त्यामध्ये दोघेही येतात. आपण देखील महालक्ष्मीची पूजा करत होतो, धनाची वृद्धी झाली तर समजतात महालक्ष्मीची कृपा झाली. बस्स, दरवर्षी पूजा करतात. अच्छा, तिच्याकडून धन मागतात, मग देवीकडे काय मागतील? तुम्ही संगमयुगी देवी स्वर्गाचे वरदान देणाऱ्या आहात. लोकांना हे माहितच नाही आहे की देवींकडून स्वर्गाच्या सर्व कामना पूर्ण होतात. तुम्ही देवी आहात ना. मनुष्यांना ज्ञान दान करता ज्याद्वारे सर्व कामना पूर्ण करता. रोग इत्यादी झाला तर देवींना म्हणतील - ‘बरे करा. रक्षा करा’. अनेक प्रकारच्या देवी आहेत. तुम्ही आहात संगमयुगाच्या शिव-शक्ती देवी. तुम्हीच स्वर्गाचे वरदान देता. बाबा देखील देतात, मुले देखील देतात. महालक्ष्मीला दाखवतात. नारायणाला लपवून ठेवतात. बाबा तुम्हा मुलांचा किती प्रभाव वाढवतात. सर्व देवी २१ जन्मांसाठी सुखाच्या सर्व कामना पूर्ण करतात. लक्ष्मीकडे धन मागतात. धनासाठीच मनुष्य चांगला धंदा इत्यादी करतात. तुम्हाला तर बाबा येऊन साऱ्या विश्वाचा मालक बनवतात, अथाह धन देतात. श्री लक्ष्मी-नारायण विश्वाचे मालक होते. आता गरीब आहेत. तुम्ही मुले जाणता राजाई केली, मग कशी हळू-हळू उतरती कला होते. पुनर्जन्म घेता-घेता कला कमी होता-होता आता बघा कशी अवस्था झाली आहे! ही देखील काही नवीन गोष्ट नाहीये. दर ५००० वर्षानंतर चक्र फिरतच राहते. आता भारत किती गरीब आहे. रावण राज्य आहे. किती श्रेष्ठ नंबर वन होता, आता लास्ट नंबर आहे. लास्टमध्ये आला नाही तर मग नंबर वनमध्ये कसा जाईल. हिशोब आहे ना. संयमाने जर विचार सागर मंथन कराल तर सर्व गोष्टी आपोआप लक्षात येतील. किती गोड-गोड गोष्टी आहेत. आता तर तुम्ही संपूर्ण सृष्टी चक्राला जाणले आहे. अभ्यास फक्त शाळेमध्येच केला जात नाही. टीचर अभ्यास देतात घरी करण्यासाठी, ज्याला होमवर्क म्हणतात. बाबा देखील तुम्हाला घरी करण्यासाठी अभ्यास देतात. दिवसा भले धंदा इत्यादी करा, शरीर निर्वाह तर करायचाच आहे. अमृतवेळेला तर सर्वांना वेळ असतो. पहाटे दोन-तीन वाजताचा काळ खूप चांगला आहे. त्या वेळेला उठून बाबांची प्रेमाने आठवण करा. बाकी या विकारांनीच तुम्हाला आदि-मध्य-अंत दुःखी केले आहे. रावणाला जाळतात परंतु याचा देखील काहीच अर्थ जाणत नाहीत. बस्स, फक्त परंपरेने रावणाला जाळण्याचा रिवाज चालत आला आहे. ड्रामा अनुसार याची देखील नोंद आहे. रावणाला मारत आले आहेत परंतु रावण मरतच नाही. आता तुम्ही मुले जाणता हे रावणाला जाळणे कधी बंद होईल. तुम्ही आता खरी-खरी सत्यनारायणाची कथा ऐकत आहात. तुम्ही जाणता की, आपल्याला आता बाबांकडून वारसा मिळतो. बाबांना न जाणल्याकारणानेच सर्व निधनके (अनाथ) आहेत. बाबा जे भारताला स्वर्ग बनवतात त्यांना देखील जाणत नाहीत. याची देखील ड्रामामध्ये नोंद आहे. शिडी उतरत तमोप्रधान बनलात तेव्हाच तर बाबा पुन्हा आले आहेत. परंतु स्वतःला तमोप्रधान थोडेच समजतात. बाबा म्हणतात - यावेळी संपूर्ण झाड जडजडिभूत अवस्थेला प्राप्त झाले आहे. एकही सतोप्रधान नाही. सतोप्रधान असतातच शांतीधाम आणि सुखधाममध्ये. आता आहेत तमोप्रधान. बाबाच येऊन तुम्हा मुलांना अज्ञान निद्रेतून जागे करतात. तुम्ही मग इतरांना जागे करता. जागे होत राहतात. जसे व्यक्तीचा जेव्हा मृत्यू होतो तर त्याचा दिवा पेटवतात की त्याने प्रकाशामध्ये यावे. आता हा आहे घोर अंधार, आत्मे परत आपल्या घरी जाऊ शकत नाहीत. भले मनात असते दुःखातून सुटावे. परंतु एकही सुटू शकत नाही.

ज्या मुलांना पुरुषोत्तम संगमयुगाची स्मृती असते ते ज्ञान रत्नांचे दान केल्याशिवाय राहू शकत नाहीत. जसे मनुष्य पुरुषोत्तम महिन्यामध्ये खूप दान-पुण्य करतात, तसे या पुरुषोत्तम संगमयुगामध्ये तुम्हाला ज्ञान रत्नांचे दान करायचे आहे. हे देखील समजता स्वयं परमपिता परमात्मा शिकवत आहेत, श्रीकृष्णाची गोष्ट नाहीये. श्रीकृष्ण तर आहे सतयुगातील पहिला प्रिन्स, त्यानंतर तर ते पुनर्जन्म घेत येतात. बाबांनी पास्ट, प्रेझेंट, फ्युचरचे देखील रहस्य समजावून सांगितले आहे. तुम्ही त्रिकालदर्शी बनता, बाबांशिवाय इतर कोणीही त्रिकालदर्शी बनवू शकत नाही. सृष्टीच्या आदि-मध्य-अंताचे ज्ञान बाबांनाच आहे, त्यांनाच ज्ञानाचा सागर म्हटले जाते. उच्च ते उच्च भगवानच गायले जातात, तेच रचता आहेत. ‘हेविनली गॉडफादर’ शब्द अतिशय क्लियर आहे - हेवन स्थापन करणारे. शिवजयंती देखील साजरी करतात परंतु ते केव्हा आले, काय केले - हे काहीच जाणत नाहीत. जयंतीच्या अर्थाविषयी देखील माहिती नाही तर मग साजरी करून काय करणार, हे देखील सर्व ड्रामामध्ये आहे. यावेळीच तुम्ही मुले ड्रामाच्या आदि-मध्य-अंताला जाणता त्यानंतर कधीच नाही. पुन्हा जेव्हा बाबा येतील तेव्हाच जाणणार. आता तुम्हाला स्मृती आली आहे - हे ८४ चे चक्र कसे फिरते. भक्ती मार्गामध्ये काय आहे, त्याने तर काहीच मिळत नाही. किती भक्तलोक गर्दीमध्ये धक्के खाण्यासाठी जातात, बाबांनी तुम्हाला त्यापासून सोडविले आहे. आता तुम्ही जाणता आपण श्रीमतावर पुन्हा भारताला श्रेष्ठ बनवत आहोत. श्रीमताद्वारेच श्रेष्ठ बनतो. श्रीमत संगमावरच मिळते. तुम्ही यथार्थ रीतीने जाणता आपण कोण होतो मग असे परत कसे बनलो, आता पुन्हा पुरुषार्थ करत आहोत. पुरुषार्थ करता-करता मुले कधी जर नापास झाली तर बाबांना समाचार द्या, बाबा पुन्हा उभे राहण्याची सावधानी देतील. कधीही अपयशी बनून बसून रहायचे नाही. परत उभे रहा, औषधपाणी करा. सर्जन तर बसले आहेत ना. बाबा समजावून सांगतात - पाचव्या मजल्यावरून कोसळणे आणि दुसऱ्या मजल्यावरून कोसळणे यामध्ये किती फरक आहे. काम विकार आहे - पाचवा मजला, म्हणून बाबांनी सांगितले आहे - काम महाशत्रू आहे, त्याने तुम्हाला पतित बनवले आहे, आता पावन बना. पतित-पावन बाबाच येऊन पावन बनवतात. संगमावरच बनवतील. कलियुगाचा अंत आणि सतयुगाचा आदि हा संगम आहे.

मुले जाणतात - बाबा आता कलम लावत आहेत पूर्ण झाड इथे वाढेल. ब्राह्मणांचे झाड वाढेल मग सूर्यवंशी-चंद्रवंशीमध्ये जाऊन सुख भोगतील. किती सोपे करून समजावून सांगितले जाते. अच्छा, मुरली मिळत नसेल, तर बाबांची आठवण करा. हे बुद्धीमध्ये पक्के करा की शिवबाबा ब्रह्मातनाद्वारे आम्हाला असे म्हणतात की, माझी आठवण करा तर विष्णूच्या घराण्यामध्ये जाल. सर्व काही पुरुषार्थावर अवलंबून आहे. कल्प-कल्प जो पुरुषार्थ केला होता, हुबेहूब तोच चालेल. अर्धेकल्प देह-अभिमानी बनला आहात, आता देही-अभिमानी बनण्याचा पूर्ण पुरुषार्थ करा, त्यातच मेहनत आहे. अभ्यास तर सोपा आहे, मुख्य गोष्ट आहे पावन बनण्याची. बाबांना विसरणे ही तर खूप मोठी चूक आहे. देह-अभिमानामध्ये आल्यानेच विसरता. शरीर निर्वाह अर्थ धंदा इत्यादी भले आठ तास करा, बाकी आठ तास आठवणीमध्ये राहण्यासाठी पुरुषार्थ करायचा आहे. ती अवस्था लवकर होणार नाही. अंताला जेव्हा ही अवस्था होईल तेव्हा विनाश होईल. कर्मातीत अवस्था झाली तर मग हे शरीर राहू शकणार नाही, सुटेल कारण आत्मा पवित्र बनली ना. जेव्हा नंबरवार कर्मातीत अवस्था होईल तेव्हा युद्ध सुरु होईल, तोपर्यंत रिहर्सल होत राहील. अच्छा !

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) या पुरुषोत्तम महिन्यामध्ये अविनाशी ज्ञान रत्नांचे दान करायचे आहे. अमृतवेलेला उठून विचार सागर मंथन करायचे आहे. श्रीमतावर शरीर निर्वाह करत असताना बाबांनी जो होमवर्क दिला आहे, तो देखील जरूर करायचा आहे.

२) पुरुषार्थामध्ये कधी अडचण आली तर बाबांना समाचार देऊन श्रीमत घ्यायचे आहे (सल्ला घ्यायचा आहे). सर्जनला सर्व सांगायचे आहे. विकर्म विनाश करण्याच्या वेळी कोणतेही विकर्म करायचे नाही.

वरदान:-
अखंड योगाच्या विधी द्वारे अखंड पूज्य बनणारी श्रेष्ठ महान आत्मा भव

आजकाल जे महान आत्मे म्हटले जातात त्यांची नावे अखंडानंद इत्यादी ठेवतात परंतु सर्वांमध्ये अखंड स्वरूप तर तुम्ही आहात - आनंदामध्ये देखील अखंड, सुखामध्ये देखील अखंड… फक्त संगदोषामध्ये येऊ नका, दुसऱ्यांच्या अवगुणांना बघत असताना, ऐकत असताना डोन्ट केअर करा तर या विशेषतेमुळे अखंड योगी बनाल. जे अखंड योगी आहेत तेच अखंड पूज्य बनतात. तर तुम्ही असे महान आत्मे आहात जे अर्धे कल्प तुम्ही स्वतः पूज्य स्वरूपामध्ये राहता आणि अर्धा कल्प तुमच्या जडचित्रांचे पूजन होते.

बोधवाक्य:-
दिव्य-बुद्धीच सायलेन्सच्या शक्तीचा आधार आहे.

अव्यक्त इशारे - संकल्पांची शक्ती जमा करून श्रेष्ठ सेवेच्या निमित्त बना:-

जे आपल्या सूक्ष्म शक्तींना (मन, बुद्धीला) हँडल करू शकतात, ते इतरांनाही हँडल करू शकतात त्यामुळे स्वत:वर कंट्रोलिंग पॉवर, रुलिंग पॉवर असेल तर हिच यथार्थ हँडलिंग पॉवर बनते. भले अज्ञानी आत्म्यांना सेवेद्वारे हँडल करा किंवा ब्राह्मण परिवारामध्ये स्नेह संपन्न, संतुष्टता संपन्न व्यवहार करा. - दोन्हीमध्ये सफल व्हाल.