26-07-26    अव्यक्त बापदादा    मराठी मुरली   02.02.2011  ओम शान्ति   मधुबन


आपले भाग्य आणि प्राप्तींना स्मृतीमध्ये ठेवून सदैव हर्षित आणि संतुष्ट राहा; दृष्टी, वृत्ती आणि प्रवृत्ती द्वारा संतुष्टतेचा अनुभव करवा


आज बापदादा सर्व मुलांना पाहून खुश होत आहेत. प्रत्येक बच्चा परमात्म प्रेमाद्वारे पोहोचला आहे. तर आज बापदादा प्रत्येक मुलाच्या मस्तकामध्ये भाग्याच्या रेषा पाहत आहेत. असे भाग्य आणि एवढे मोठे भाग्य संपूर्ण कल्पामध्ये कोणालाच प्राप्त नाहीए, कारण तुम्हाला भाग्य देणारा स्वयं भाग्यदाता आहे. प्रत्येकाच्या मस्तकामध्ये सर्वात आधी तर चमकत्या ताऱ्याचे भाग्य चमकत आहे. मुखामध्ये मधुर वाणीची रेषा चमकत आहे. ओठांवर मधुर हास्याची रेषा चमकत आहे. हृदयामध्ये दिलाराम बाबांच्या प्रेमामध्ये लवलीन असल्याची रेषा चमकत आहे. हातांमध्ये सर्व खजिन्यांच्या श्रेष्ठतेची रेषा चमकत आहे. पावलामध्ये प्रत्येक पावलावर पद्मची रेषा चमकत आहे. आता विचार करा असे भाग्य आणखी कोणाचे झाले आहे! म्हणूनच तुमच्या यादगार चित्रांच्या भाग्याचे देखील वर्णन होत राहते. आणि हे भाग्य स्वयं भाग्यविधात्याने प्रत्येक मुलाचे बनवले आहे.

बापदादा प्रत्येक मुलाचे भाग्य पाहून प्रत्येक मुलाला मुबारक देत आहेत - ‘वाह मुलांनो वाह!’ आणि हे भाग्य याच संगमावर मिळते आणि चालते. संगमयुगाचे सुख सर्व युगांपेक्षा श्रेष्ठ आहे. सतयुगाचे भाग्य देखील संगमाच्या पुरुषार्थाचे प्रारब्ध आहे; त्यामुळे संगमयुगाची प्राप्ती सतयुगाच्या प्रारब्धा पेक्षाही जास्त श्रेष्ठ आहे. आपल्या भाग्यामध्ये हरवून जा. काहीही झाले तरी, आपले भाग्य स्मृतीमध्ये आणा, तर आतून काय निघते? ‘वाह माझे भाग्य!’ कारण स्वयं भाग्य दाता तुमचा पिता आहे. तर भाग्य-दात्याकडून प्रत्येकाला आपले भाग्य मिळाले आहे. असे वाटते का की आपण इतके भाग्यवान आहोत, की कधी-कधी वाटते, कायम हा नशा राहतो का? दुनियेतील लोक तर पाहून विचारतात - ‘तुम्हाला काय मिळाले आहे?’ आणि तुम्ही लोक काय उत्तर देता? जो पाना था वह पा लिया (जे काही हवे होते ते सर्व आम्ही प्राप्त केले आहे). प्राप्त केले आहे का, हात वर करा. प्राप्त केले आहे? अच्छा. प्राप्त केले आहे. अभिमानाने म्हणता, कोणतीही अप्राप्त वस्तूच नाही, आहे ना असा अभिमान? आणि मिळाले कसे? फक्त बाबांना जाणले, मानले, आपले बनवले आणि भाग्य मिळाले. या भाग्याला जितके स्मृतीमध्ये आणत राहाल तितके हर्षित होत राहाल. भाग्यवान आत्म्याचा चेहरा सदैव हर्षित राहील. राहील नाही, राहतो. त्यांची दृष्टी, त्यांची वृत्ती आणि त्यांची प्रवृत्ती सदैव संतुष्ट आत्मा बनून स्वतः देखील संतुष्ट राहील आणि इतरांनाही संतुष्ट बनवेल. तर तुम्हा सर्वांना संतुष्टतेचा नशा असतो का? कारण संतुष्टतेचा आधार आहे - सर्व प्राप्ती. अप्राप्ती, असंतुष्टतेचा आधार आहे. तर तुम्ही काय अनुभव करता? अप्राप्त अशी कोणती वस्तू आहे की सर्व प्राप्ती आहे? प्राप्तीचा नशा आहे का? आहे, नेहमी असतो की कधी-कधी असतो? तसे तर हेच म्हणता की, ‘पा लिया जो पाना था’. तर जिथे सर्व प्राप्ती आहे तिथे असंतुष्टतेचे नाव नसते.

तर बापदादा आज देश-विदेश, कितीतरी देशांतून सर्व मुले येऊन एकत्र झाली आहेत परंतु सर्वात दुरून येणारे कोण आहेत? काय अमेरिकावाले दुरून आले आहेत? अमेरिकावाले दुरून आले आहेत ना! आणि बाबा कुठून आले आहेत? अमेरिका तर याच लोक मध्ये आहे परंतु बापदादा कुठून आले आहेत? परमधामहून, ब्रह्मा बाबा देखील सूक्ष्मवतनमधून आले आहेत. तर कोण दुरून आले? सर्वात दूर कोण? हे आहे बाबा आणि मुलांमधील प्रेमाचे दृश्य. तुम्ही म्हणालात - ‘माझे बाबा’ आणि बाबांनी म्हटले - ‘माझा बच्चा’. केवळ त्या एकाला जाणल्याने किती मोठा वारसा मिळाला. दुनियावाले सुख, शांतीच्या शोधात आहेत - कुठे शांती मिळेल, कुठे सुख मिळेल आणि तुमचे जीवनच सुख-शांतीने संपन्न झाले आहे. बापदादांना विचारता ना की, बापदादांना काय हवे आहे? तर बापदादांना प्रत्येक मुलाकडून हेच हवे आहे की, प्रत्येक मुलाने सदैव स्वराज्य अधिकारी बनून राहावे. कधी-कधी नको, कारण आताच्या स्वराज्य अधिकाराचे वरदान बाबांनी या संगमयुगासाठी पूर्ण दिले आहे, थोडे नाही, कधी-कधी असणारे नाही, कायमसाठी. तर विचार करा कायमचे स्वराज्य अधिकारी बनून राहता का? कारण बापदादांनी सांगितले आहे की, या सर्व कर्मेंद्रियांचे, मन-बुद्धी-संस्कारांचे देखील मालक आहात. सर्वांसाठी ‘माझे’ हा शब्द बोलता, ‘मी’ म्हणत नाही, ‘माझे’ म्हणता. मग मन-बुद्धी-संस्कार ‘माझे’ आहेत तर ‘माझ्या’वर नेहमी अधिकार असतो. असे मन-बुद्धी-संस्कारांवर पूर्णपणे अधिकारी आहात, याला म्हटले जाते - ‘स्वराज्यधारी’. जी ऑर्डर द्याल त्यानुसारच कार्य करण्यासाठी हे निमित्त आहेत. परंतु यासाठी चालता-फिरता कार्य करत असताना मालकीपणाचा नशा असायला हवा. निश्चय आणि नशा.

आता तर आत्म्यांना मनसाद्वारे सुद्धा सेवा देण्याची वेळ आहे. ओरडत आहेत - ‘हे पूर्वज आम्हाला थोडीशी सुख-शांतीची किरणे द्या’. तर हे पूर्वजांनो, दुःखी असणाऱ्यांची हाक ऐकू येते आहे ना! बापदादांनी इशारा दिला आहे की कोणतीही आपत्ती अचानक येणार आहे, यासाठी सेकंदामध्ये फुलस्टॉप लावता आला पाहिजे. ती प्रॅक्टिस देखील करत आहात, कारण त्या वेळी पुरुषार्थ करण्यासाठी वेळ नसेल; अभ्यास कराल - फुलस्टॉप लावावा आणि होईल आश्चर्याची मात्रा. त्यामुळे पुरुषार्थासाठी आता वेळ मिळालेला आहे. त्यावेळी प्रॅक्टिकल करण्याचा (प्रत्यक्ष कृती करण्याचा) काळ आहे, तर आतापासूनच हा अभ्यास करत देखील आहात, बापदादा रिझल्ट पाहत आहेत, लक्षात आहे, करतही आहेत परंतु अटेंशनला आणखी अंडरलाईन करा. पहा, पुरुषार्थ किती सोपा आहे, मी सुद्धा बिंदू, लावायचा देखील बिंदू आहे, फक्त अटेंशन द्यायचे आहे.

बापदादा विशेष मुलांना सौगात देत आहेत - ‘मुलांनो मी सदैव तुमच्या सोबत आहे’. ‘बाबा’ म्हटले आणि मुलांसाठी बाबा सदैव हजर आहेत. जे म्हटले गेले आहे - ‘हजूर हाजिर आहे’, सर्वव्यापी नाहीये, परंतु मुलांसमोर हजूर हाजिर आहे. तर सदा विजयी बना, जिथे स्वयं भगवान सोबत आहेत तिथे विजयी बनणे काय कठीण आहे. विजय तुमचा जन्मसिद्ध अधिकार आहे. फक्त ‘माझे बाबा’ म्हटले आणि विजयी आहातच; त्यामुळे सदैव विजयी बना, जो आठवणीमध्ये राहतो त्याच्यासाठी हे अतिशय सोपे आहे, काहीच अवघड नाही. जिथे भगवान आहे तिथे विजय आहेच. तर आज बापदादा सर्व मुलांना पाहून आनंदीत होत आहेत की किती प्रेमाने, कोणत्या साधनाने आला आहात? ट्रेनने अथवा विमानाने, ते तर शरीराने पोहोचला आहात परंतु खरे तर मनातील प्रेम तुम्हाला इथे घेऊन आले आहे. हिंमत तुमची आहे तर मदत बाबांची आहेच. आता बापदादांची हीच इच्छा आहे की, प्रत्येक मुलाने प्रत्येक कर्मामध्ये आपल्या स्वराज्याच्या सीटवर स्थित राहावे. अच्छा.

आज पहिल्यांदा कोण आले आहेत, ते हात वर करा. उभे राहा. भरपूर आहेत. अच्छा, जसे पहिल्यांदा आला आहात तसेच तुम्हाला नंबर वन मध्ये जायचे आहे ना! जायचे आहे? बाबांचे वरदान आहे की, जो हिंमत ठेवेल त्याला बाबांची मदत देखील मिळेल आणि हिंमतीने जितके पुढे जाऊ इच्छिता तितका चान्स आहे कारण टू लेट चा बोर्ड लागलेला नाहीये. आठवणीमध्ये राहा आणि जे प्राप्त झाले आहे त्याद्वारे इतरांची सेवा करा. जेवढी सेवा कराल तेवढे आशीर्वाद मिळतील आणि ते आशीर्वाद तुम्हाला पुढे नेत राहतील. संदेश देत जा बाकी प्रत्येकाचे नशीब. परंतु तुम्ही संदेश द्या. आपले पुण्य जमा करत राहा. म्हणजे मग पुण्य तुम्हाला पुढे नेत राहील. अच्छा.

अमृतवेलेला बापदादा सगळीकडे चक्कर मारतात, त्यांच्यासाठी चक्कर मारणे काही मोठी गोष्ट नाहीये. आणि बापदादांनी हे देखील सांगितले आहे की, ४ वाजताच्या भेटीची ही देखील एक विशेषता आहे की ४ वाजता बापदादा सर्व मुलांना सहजच वरदान देतात. ‘वरदान दाता’ म्हणून विशेष पार्ट अमृतवेलेला असतो. जे काही वरदान तुम्हाला हवे आहे ते बापदादा देतात. ट्रायल करून पहा. परंतु तुम्ही देखील सर्वजण वरदान घेण्यासाठी अलर्ट राहा. जर अलर्ट राहिला नाहीत तर बापदादा चक्कर मारून निघून जातील आणि तुम्ही विचार करत राहाल; म्हणून अमृतवेलेला महत्त्व तर देता परंतु आणखी अटेंशन द्या. बापदादांनी पाहिले आहे की समयानुसार सेवा देखील वाढत आहे आणि सेवेच्या कारणाने बाबांकडून वरदान घेण्यापासून दूर राहू शकत नाहीत. बाकी डबल फॉरेनर्स मेजॉरिटी पुरुषार्थ करत देखील आहेत, तरीही अटेंशनला अंडरलाईन करा. बाकी मधुबनमध्ये कसेही करून पोहोचताच; बापदादा त्याबद्दल विशेष सर्व मुलांना मुबारक देत आहेत. बापदादांनी ऐकले की, बापदादांनी संस्कारांबद्दल जो इशारा दिला आहे, त्याबाबतीत समजतात की आपल्याला हे करायचेच आहे आणि करण्यासाठी दररोज अमृतवेलेला जसा स्वमान घेता, त्याचसोबत वेगवेगळ्या प्रकारे कोणत्याही एका संस्कारावर अटेंशन द्या की, ‘आजच्या दिवशी या संस्कारावर विशेष अटेंशन द्यायचे आहे’ आणि मग रात्री जेव्हा बापदादांना आपल्या पूर्ण दिवसाचा चार्ट देता त्यावेळी त्या संस्काराचा रिझल्ट देखील विशेष रूपाने सांगा म्हणजे विशेष अटेंशन राहील. कोणत्या ना कोणत्या संस्कारावर अटेंशन ठेवायचे आहे. तर जसे आठवण करण्यावर अटेंशन देता त्याचसोबत त्याचवेळी हा रिझल्ट देखील बापदादांना द्या. जर समजा तुमची इच्छा आहे परंतु त्या दिवशी तुमच्याकडून तो संस्कार नाहीसा करण्याचे काम झाले नाही, तर आपणच स्वतःला बाबांच्या वतीने मुबारक द्या आणि दररोज अशी बाबांची मुबारक विशेषत: या संस्कारासाठी घेत जा; म्हणजे मग तो संस्कार प्रत्यक्ष व्यवहारामध्ये येणे कमी होत जाईल. तर जसे योग विषयी चेक करता, तसेच संस्काराच्या बाबतीतही चेक करा. संस्कार रोज येत नाही, कधी-कधी येतो; जे पुरुषार्थी आहेत त्यांना अचानक पेपर येतो, बाकी रोज येत नाही. परंतु रोज चेकिंग झाले तर मग हे अटेंशन टेन्शनला संपवत जाईल. कारण बापदादांनी पाहिले आहे की फॉरेनमधील काही मुले एखादे कार्य सुरू करतात तेव्हा अटेंशन देतात. तर अटेंशन देणारेच मुक्ती प्राप्त करू शकतात. बाबांचे देखील वरदान आहे. समजले. तर आता तुम्ही याचा पाठपुरावा कराल, आणि दररोज रिझल्टची चेकिंग (केलेल्या प्रयत्नांची तपासणी) कराल ना, तर त्याचा परिणाम म्हणून तुमचा तो संस्कार आपोआपच कमजोर होत जाईल. आणि बापदादांची जी इच्छा आहे की, मुलांनी संस्काराच्या सब्जेक्टमध्ये पहिला नंबर घ्यावा, जो संस्कार हवा आहे तोच कृतीमध्ये यावा. हे नक्कीच घडेल. लक्षात आले आहे ना, तर जरूर होईल. परंतु हे असेच होणार नाही, अटेंशन द्यावे लागेल. संघटन मध्येच हे संस्कार दिसून येतात, असे का? तुमच्या चित्रांची जे पूजा करतात ते तुमच्या संस्कारांचे किती गुणगान करतात. तर तसे बनला आहात म्हणूनच तर वर्णन करत आहेत. आपले देवताई चित्र इमर्ज करा, काय गातात? असे देवता बनायचे तर आहे ना. अच्छा.

बाकी सर्व डबल परदेशी पुरुषार्थामध्ये सफलतेचा अनुभव करत असता ना! करता का? हात वर करा जे सफलतेचा अनुभव करतात. वाह! हात तर छान वर करत आहेत. तर लक्ष्य ठेवा, आता यावर लक्ष केंद्रित करायचेच आहे. यामध्ये देखील नंबर मिळवायचाच आहे. तर तुम्हाला पाहून इतरांनाही उमंग येईल कारण तुम्ही निमित्त आहात ना. आणि निमित्त असणाऱ्यांना बापदादांची विशेष मदत सुद्धा मिळते. बाकी बाबा खुश आहेत की सेंटर्सची वृद्धी होत चालली आहे. पुरुषार्थाकडे अटेंशन आहे परंतु आता परिवर्तनाच्या बाबतीत निमित्त बनणारे बना, म्हणजे मग तुम्हाला पाहून इतरांनाही परिवर्तन शक्तीचा उमंग येईल. बाकी बापदादा खुश आहेत की पुरुषार्थामध्ये नंबरवार तर असतातच, ते तर साहजिकच आहे; परंतु पुरुषार्थाकडे जे लक्ष आहे, ते अजून जास्त वाढवायचे आहे. बाकी बापदादांची दररोज प्रेमपूर्वक आठवण तर मिळतच राहते. पहा, घरी बसूनही बापदादांची प्रेमपूर्वक आठवण एकही दिवस मिस होत नाही, जर रोज विधीपूर्वक मुरली वाचत असाल तर. एकही दिवस प्रेमपूर्वक आठवण मिस करत नाहीत. मिळते ना! मिळते? रोज प्रेमपूर्वक आठवण मिळते. सर्वांना मिळते ना? ही आहे बापदादांच्या प्रेमाची निशाणी. मुरली मिस तर प्रेमपूर्वक आठवण देखील मिस. फक्त मुरलीच मिस केली नाहीत, परंतु बापदादांची प्रेमपूर्वक आठवण, वरदान सर्व मिस केले. मुरली तर नंतर वाचाल सुद्धा, परंतु बापदादांची प्रेमपूर्वक आठवण घेण्याची जी वेळ फिक्स आहे, ती तर मिस झाली ना. तर उमंग आहे, यावर बापदादा खुश सुद्धा आहेत. अच्छा, मुरली मिस करणारे कोणी आहेत का? डबल फॉरेनर्समध्ये कोणी आहेत, असा कोणी आहे जो मुरली मिस करतो? काही कारणामुळे? कोणी नाही. मिस करत नाहीत. एकाने हात वर केला आहे. आता मिस करायचे नाही, मुरली मिस करायची नाही. मग भले फोनद्वारे ऐका. वाचू शकत नसाल तर कशीही करून ऐका जरूर. हजेरी जरूर लावा. अच्छा. बाकी जे कोणी सभेमध्ये आले आहेत, नवीन देखील आहेत जुने सुद्धा आहेत तर हे पक्के पक्के पक्के नोट करा की, मुरली मिस करायची नाही; कारण बाबा दररोज परमधाम मधून येतात, किती दुरून येतात, मुलांसाठी येतात ना! जसे बाबा मुरली मिस करत नाहीत, तसे मुलांनीही मुरली मिस करायची नाही. अच्छा.

आता जे मधुबनमध्ये येतात ना, तर जसा फॉर्म भरता, त्यामध्ये हे देखील लिहा की, ‘रोज मुरली ऐकली?’ किंवा ‘किती दिवस मुरली मिस केली?’ मंजूर आहे? ज्यांना हे मंजूर आहे त्यांनी हात वर करा. मधुबनवाल्यांनी सुद्धा हात वर करा. कोणत्याही कारणास्तव मुरली मिस करायची नाही. जसे भोजन मिस करत नाही, तसेच हे देखील भोजन आहे ना. ते शरीराचे भोजन, हे आत्म्याचे भोजन. छान वाटले. नवीन सुद्धा जे आले आहेत, यायला तर मिळाले आहे ना. त्यांनी देखील या नियमाचे पालन करायचे आहे. जसे इतर नियम आहेत तसाच हा देखील नियम आहे. ब्राह्मण अर्थात मुरली ऐकणारा, सेवा करणारा. अच्छा.

आता सर्व ठिकाणच्या मुलांना बापदादा प्रेमपूर्वक आठवणी सोबत मुबारक सुद्धा देत आहेत. सदैव उमंग-उत्साहामध्ये पुढे जातही आहात आणि जातच राहा. कधीही आपला उमंग-उत्साह कोणत्याही कारणास्तव, कोणत्याही गोष्टीमुळे कमी करू नका. घटना तर घटना असते, परंतु पुरुषार्थ आणि बाबांचे प्रेम ते तर आपले आहे त्यामुळे कधीही आपल्या बुद्धीला बाबांशिवाय इतर कोणत्याही गोष्टींमध्ये बिझी करू नका. बाबा आणि बाबांची मुरली आणि बाबांद्वारे जी सेवा मिळाली आहे ती सेवा करत राहा. अच्छा. अजून काय सांगू, सोबत तर राहायचेच आहे ना; त्यामुळे ‘निरोप घेतो’, असेही म्हणू शकत नाही. सोबत राहणार, सोबत जाणार आणि सोबत येणार. अच्छा. आता समाप्ती.

वरदान:-
शक्ती रूपाच्या स्मृती द्वारा पतित संस्कारांचा विनाश करणारे काली रूप भव

सदैव आपले हे स्वरूप स्मृतीमध्ये रहावे की, ‘मी सर्व शस्त्रधारी शक्ती आहे’, मज पतित-पावनीवर कोणत्याही पतित आत्म्याच्या दृष्टीची सावली सुद्धा पडू शकत नाही. पतित आत्म्याचे पतित संकल्प देखील चालू शकणार नाहीत - इतका आपला ब्रेक पॉवरफुल असला पाहिजे. जर एखाद्या पतित आत्म्याचा प्रभाव पडत असेल - तर याचा अर्थ आहे की, तुम्ही प्रभावशाली नाही आहात. जे स्वतः संहार करणारे आहेत ते कधीही कोणाची शिकार बनू शकत नाहीत. तर असे काली रूप बना जेणेकरून कोणीही तुमच्यासमोर असा संकल्प जरी केला तरी त्याचा तो संकल्प मूर्च्छित होईल (निष्प्रभ होईल).

सुविचार:-
रॉयल रूपातील इच्छेचे स्वरूप - नाम, मान आणि शान आहे.

हे अव्यक्त इशारे - ज्वालास्वरूप स्थितीमध्ये राहून शक्तिशाली आठवणीचा अनुभव करा.

सारथी अर्थात आत्म-अभिमानी कारण आत्माच सारथी आहे. ब्रह्मा बाबांनी याच विधीने ‘नंबर वन’ची सिद्धी प्राप्त केली. तर फॉलो फादर करा. जसे बाबा देहाला अधीन करून प्रवेश करतात अर्थात सारथी बनतात, देहाच्या अधीन होत नाहीत, म्हणून न्यारे आणि प्यारे आहेत (अलिप्त आणि प्रेमळ). असेच तुम्ही सर्व ब्राह्मण आत्मे देखील पित्यासमान सारथीच्या स्थितीमध्ये राहा. सारथी स्वतःच साक्षी होऊन काहीही करतील, पाहतील, ऐकतील आणि सर्व काही करत असतानाही मायेच्या लेप-छेप पासून निर्लेप राहतील (मायेच्या प्रभावापासून अलिप्त राहतील).