26-08-2025      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - ज्ञान सागर बाबा आले आहेत ज्ञान वर्षा करून या धरतीला सुपीक बनविण्याकरिता, आता स्वर्गाची स्थापना होत आहे, तिथे जाण्यासाठी दैवी संप्रदायाचे बनायचे आहे”

प्रश्न:-
सर्वोत्तम कुळातील मुलांचे मुख्य कर्तव्य काय आहे?

उत्तर:-
कायम उच्च रुहानी सेवा करणे. इथे बसून किंवा चालता-फिरता खास भारत आणि आम संपूर्ण विश्वाला पावन बनविणे, श्रीमतावर बाबांचे मदतगार बनणे - हेच सर्वोत्तम ब्राह्मणांचे कर्तव्य आहे.

गीत:-
जो पिया के साथ है…

ओम शांती।
गोड-गोड रुहानी मुलांप्रती रुहानी बाबा समजावून सांगत आहेत जे रुहानी बाबांच्या सोबत आहेत कारण बाबा आहेत ज्ञानाचा सागर. कोणते बाबा? शिवबाबा. ब्रह्मा बाबांना ज्ञानाचा सागर म्हणणार नाही. शिवबाबा ज्यांनाच परमपिता परमात्मा म्हटले जाते. एक आहेत लौकिक जिस्मानी पिता, दुसरे आहेत पारलौकिक रुहानी पिता. ते देहाचे पिता, ते आत्म्यांचे पिता. या खूप चांगल्याप्रकारे समजून घेण्याच्या गोष्टी आहेत आणि हे ज्ञान ऐकवणारे आहेत ज्ञानाचा सागर. जसे सर्वांचा भगवान एक आहे, तसेच ज्ञान देखील एक देऊ शकतात. बाकीची जी शास्त्रे गीता इत्यादी वाचतात, भक्ती करतात ते काही ज्ञान नाही आहे, त्याने ज्ञान वर्षा होत नाही, म्हणूनच भारत एकदम सुकला आहे. गरीब झाला आहे. तो पाऊस देखील पडत नाही तर जमीन इत्यादी सर्व सुकुन जाते. तो आहे भक्तीमार्ग. त्याला ज्ञान मार्ग म्हणणार नाही. ज्ञानाद्वारे स्वर्गाची स्थापना होते. तिथे कायम धरणी सुपीक असते, कधीही सुकत नाही. हा आहे ज्ञानाचा अभ्यास. ईश्वर बाबा ज्ञान देऊन दैवी संप्रदायाचे बनवतात. बाबांनी सांगितले आहे - मी तुम्हा सर्व आत्म्यांचा पिता आहे. परंतु मला आणि माझ्या कर्तव्याला न जाणल्या कारणाने मनुष्य इतके पतित, दुःखी, निधनके बनले आहेत. आपसामध्ये भांडत राहतात. घरामध्ये वडील नसतील तर मुले भांडणे करतात तर म्हणतात ना की, तुमचे वडील आहेत की नाहीत? यावेळी देखील संपूर्ण दुनिया बाबांना ओळखत नाही. न जाणल्या कारणाने इतकी दुर्गती झाली आहे. जाणल्याने सद्गती होते. सर्वांचे सद्गती दाता एक आहेत. त्यांना बाबा म्हटले जाते. त्यांचे नाव ‘शिव’च आहे. त्यांचे नाव कधी बदलू शकत नाही. जेव्हा संन्यास करतात तेव्हा नाव बदलतात ना. लग्नामध्ये देखील कुमारीचे नाव बदलतात. ही इथे भारतामध्ये प्रथा आहे. बाहेर असे होत नाही. हे शिवबाबा सर्वांचे माय-बाप आहेत. गातात देखील - ‘तुम मात-पिता…’ असे भारतातच आळवतात - ‘तुम्हरी कृपा से सुख घनेरे’. असे नाही की भक्तीमार्गामध्ये भगवान कृपा करत आले आहेत. नाही, भक्तीमध्ये भरभरून सुख असतच नाही. मुले जाणतात स्वर्गामध्ये पुष्कळ सुख आहे. ती नवीन दुनिया आहे. जुन्या दुनियेमध्ये दुःखच असते. जे जिवंतपणी चांगल्याप्रकारे मेलेले आहेत त्यांचे नाव बदलू शकतो. परंतु माया जिंकून घेते तर मग ब्राह्मणापासून बदलून शूद्र बनतात; म्हणून बाबा आता नावे ठेवत नाहीत. ब्राह्मणांची माळा काही असत नाही. तुम्ही मुले सर्वोत्तम उच्च कुळवाले आहात. उच्च रुहानी सेवा करता. इथे बसून किंवा चालता-फिरता तुम्ही भारताची खास आणि विश्वाची आम सेवा करता. विश्वाला तुम्ही पवित्र बनविता. तुम्ही आहात बाबांचे मदतगार. बाबांच्या श्रीमतावर चालून तुम्ही मदत करता. हा भारतच पावन बनणार आहे. तुम्ही म्हणाल - आम्ही कल्प-कल्प या भारताला पवित्र बनवून पवित्र भारतावर राज्य करतो. ब्राह्मणा पासून मग आम्ही भविष्य देवी-देवता बनतो. विराट रूपाचे चित्र देखील आहे. प्रजापिता ब्रह्माची मुले ब्राह्मणच झाली. ब्राह्मण तेव्हा बनतील जेव्हा प्रजापिता सन्मुख असेल. आता तुम्ही सन्मुख आहात. तुम्ही प्रत्येक जण स्वतःला प्रजापिता ब्रह्माची संतान समजता. ही युक्ती आहे. संतान समजल्याने भाऊ-बहीणी होता. भावा-बहिणीची कधीही क्रिमिनल दृष्टी असता कामा नये. आता बाबा वटहुकूम काढतात की तुम्ही ६३ जन्म पतित बनून राहिले आहात, आता पावन दुनिया स्वर्गामध्ये जाऊ इच्छिता तर पवित्र बना. तिथे पतित आत्मा जाऊ नाही शकत म्हणूनच मज बेहदच्या बाबांना तुम्ही बोलावता. ही आत्मा शरीराद्वारे बोलते. शिवबाबा देखील म्हणतात मी या शरीराद्वारे बोलतो. नाहीतर मी कसा येऊ? माझा जन्म दिव्य आहे. सतयुगामध्ये आहेत दैवीगुणवाले देवता. यावेळी आहेत आसुरी गुणवाले मनुष्य. इथल्या मनुष्यांना देवता म्हणणार नाही. भले मग कोणीही असो नावे तर खूप मोठ-मोठी ठेवतात. साधू स्वतःला ‘श्री श्री’ म्हणतात आणि मनुष्यांना श्री म्हणतात कारण स्वतः पवित्र आहेत म्हणून ‘श्री श्री’ म्हणतात. आहेत तर मनुष्यच. भले विकारामध्ये जात नाहीत परंतु विकारी दुनियेमध्ये तर आहेत ना. तुम्ही भविष्यामध्ये निर्विकारी दैवी दुनियेमध्ये राज्य कराल. असाल तिथेही मनुष्यच परंतु दैवी गुणवाले असाल. यावेळी मनुष्य आसुरी गुणवाले पतित आहेत. गुरु नानकांनी देखील म्हटले आहे - ‘मूत पलीती कपड़ धोए…’ गुरु नानक देखील बाबांची महिमा करतात.

आता बाबा आले आहेत स्थापना आणि विनाश करण्यासाठी. इतर जे काही धर्मस्थापक आहेत ते फक्त धर्म स्थापन करतात, इतर धर्मांचा विनाश करत नाहीत, त्यांची तर वृद्धी होत राहते. आता बाबा वृद्धीला बंद करतात. एका धर्माची स्थापना आणि अनेक धर्मांचा विनाश करवतात. ड्रामा अनुसार हे होणारच आहे. बाबा म्हणतात मी आदि सनातन देवी-देवता धर्माची स्थापना करतो, ज्यासाठी तुम्हाला शिकवत आहे. सतयुगामध्ये अनेक धर्मच असत नाहीत. ड्रामामध्ये या सर्वांच्या परत जाण्याची नोंद आहे. या विनाशाला कोणीही टाळू शकत नाही. विश्वामध्ये शांती तेव्हा होते जेव्हा विनाश होतो. या लढाई द्वारेच स्वर्गाचे गेट उघडते. हे देखील तुम्ही लिहू शकता की, ही महाभारी लढाई कल्पापूर्वी देखील झाली होती. तुम्ही प्रदर्शनीचे उद्घाटन करता तेव्हा हे लिहा - ‘बाबा परमधाम मधून आले आहेत - हेवनचे उद्घाटन करण्यासाठी’. बाबा म्हणतात - मी हेवनली गॉड फादर हेवनचे उद्घाटन करण्यासाठी आलो आहे, स्वर्गवासी बनविण्यासाठी मुलांचीच मदत घेतो. नाहीतर इतक्या सर्व आत्म्यांना पावन कोण बनवणार.(?) असंख्य आत्मे आहेत. घरोघरी तुम्ही हे समजावून सांगू शकता. भारतवासी, तुम्ही सतोप्रधान होतात मग ८४ जन्मानंतर तमोप्रधान बनला आहात. आता पुन्हा सतोप्रधान बना. मनमनाभव. असे म्हणू नका की आम्ही शास्त्रांना मानत नाही. बोला, शास्त्रांना आणि भक्ती मार्गाला तर आम्ही मानत होतो परंतु आता या भक्तिमार्गाची रात्र पूर्ण होत आहे. ज्ञानाद्वारे दिवस सुरू होत आहे. बाबा आले आहेत सद्गती करण्यासाठी. समजावून सांगण्याची चांगली युक्ती केली पाहिजे. कुणी चांगल्या प्रकारे धारणा करतात, कोणी कमी करतात. प्रदर्शनीमध्ये देखील जी चांगली-चांगली मुले आहेत - ती छान समजावून सांगतात. जसे बाबा टीचर आहेत तर मुलांना देखील टीचर बनावे लागेल. गायले देखील जाते - ‘सद्गुरु तारे’; बाबांना म्हटले जाते - सचखंडाची स्थापना करणारे सच्चे बाबा. झूटखंड स्थापन करणारा आहे - रावण. आता जेव्हा की सद्गती करणारा मिळाला आहे तर मग आम्ही भक्ती कशी करणार? भक्ती शिकविणारे अनेक गुरू लोक आहेत. सद्गुरु तर एकच आहेत. म्हणतात देखील - ‘सद्गुरु अकाल…’ तरी देखील अनेक गुरु तयार होत राहतात. संन्यासी, उदासी अनेक प्रकारचे गुरु लोक असतात. सिख लोक स्वतःच म्हणतात - ‘सद्गुरु अकाल…’ अर्थात ज्याला काळ खात नाही. मनुष्याला तर काळ खाऊन टाकतो. बाबा म्हणतात - ‘मनमनाभव’. त्यांचे मग आहे ‘जप साहेब को तो सुख मिले…’ मुख्य दोन शब्द आहेत. बाबा म्हणतात - ‘माझी आठवण करा - जप साहेब को’. साहेब तर एकच आहे. गुरु नानकांनी देखील त्यांच्यासाठी इशारा केला आहे की, त्यांचा जप करा. वास्तविक तुम्हाला काही जप करायचा नाहीये, आठवण करायची आहे. हा आहे - अजपाजप. मुखाने काहीच बोलू नका. ‘शिव-शिव’ असे देखील म्हणायचे नाही. तुम्हाला तर जायचे आहे शांतीधामला. आता बाबांची आठवण करा. अजपाजप देखील एकच असतो जो बाबा शिकवतात. ते (भक्तीवाले) किती घंटा वाजवतात, आवाज करतात, महिमा करतात. म्हणतात - अच्युतम केशवम…’ परंतु एकाही अक्षराला समजत नाहीत. सुख देणारे तर एक बाबाच आहेत. व्यास देखील त्यांनाच म्हणणार. त्यांच्यामध्ये नॉलेज आहे जे देतात. सुख देखील तेच देतात. तुम्ही मुले समजता - आता आमची चढती कला होत आहे. शिडीच्या चित्रामध्ये कला देखील दाखवल्या आहेत. यावेळी कोणती कला नाहीये. ‘मुझ निर्गुण हारे में…’. एक ‘निर्गुण’ नावाची संस्था देखील आहे. आता बाबा म्हणतात - बालक तर महात्म्याप्रमाणे असतो. त्याच्यामध्ये कोणताही अवगुण नसतो. त्यांचे मग नाव ठेवतात ‘निर्गुण बालक’. जर बालकामध्ये गुण नाहीत तर मग बाबांमध्ये देखील नाहीत. सर्वांमध्ये अवगुण आहेत. गुणवान फक्त देवता बनतात. नंबर वन अवगुण हाच आहे की बाबांना जाणत नाहीत. दुसरा अवगुण आहे - विषय सागरामध्ये गटांगळ्या खातात. बाबा म्हणतात - अर्धा कल्प तुम्ही गटांगळ्या खाल्ल्या आहेत. आता मी ज्ञान सागर तुम्हाला क्षीरसागरा मध्ये घेऊन जातो. मी तर क्षीर सागरामध्ये जाण्यासाठी तुम्हाला शिकवण देतो. मी यांच्या (ब्रह्मा बाबांच्या) बाजूला येऊन बसतो, जिथे आत्मा राहते. मी स्वतंत्र आहे. कुठेही जाऊ-येऊ शकतो. तुम्ही पितरांना खाऊ घालता तर आत्म्याला खाऊ घालता ना. शरीर तर भस्म होते. त्याला बघू सुद्धा शकत नाही. समजतात अमक्याच्या आत्म्याचे श्राद्ध आहे. आत्म्याला बोलावले जाते - हा देखील ड्रामामध्ये पार्ट आहे. आत्मा कधी येते, कधी येतही नाही. कोणी सांगतात, कोणी सांगतही नाहीत. इथे देखील आत्म्याला बोलावतात, येऊन बोलते. परंतु असे सांगत नाही की, अमक्या ठिकाणी जन्म घेतला आहे. फक्त इतकेच सांगेल की, मी खूप सुखी आहे, चांगल्या घरी जन्म घेतला आहे. चांगली ज्ञानी मुले चांगल्या घरामध्ये जातील. कमी ज्ञानी मुले कमी पद मिळवतील. बाकी सुख तर आहे. राजा बनणे चांगले आहे की दासी बनणे चांगले आहे? राजा बनायचे असेल तर या अभ्यासाला लागा. दुनिया खूप खराब आहे. दुनियेच्या संगाला म्हणणार - कुसंग. एक ‘सत्’चा संगच पार करतो, बाकी सर्वजण बुडवतात. बाबा तर सर्वांची जन्मपत्रिका जाणतात ना. ही पापाची दुनिया आहे, तेव्हाच तर बोलावतात - दुसरीकडे कुठेतरी घेऊन चला. आता बाबा म्हणतात - ‘गोड-गोड मुलांनो, माझे बनून मग माझ्या मतावर चाला’. ही खूप घाणेरडी दुनिया आहे. भ्रष्टाचार आहे. कोट्ट्यावधी रुपयांचे घोटाळे होतात. आता बाबा आले आहेत मुलांना स्वर्गाचा मालक बनविण्यासाठी तर अपार आनंद झाला पाहिजे ना. वास्तविक ही आहे खरी गीता. मग हे ज्ञान प्रायः लोप होईल. आता तुम्हाला हे ज्ञान आहे आणि मग दुसरा जन्म घ्याल तेव्हा हे ज्ञान खलास होईल. नंतर आहे प्रारब्ध. तुम्हाला पुरुषोत्तम बनविण्यासाठी बाबा शिकवतात. आता तुम्ही बाबांना जाणले आहे. आता अमरनाथची यात्रा असते. तुम्ही बोला, ज्यांना सूक्ष्मवतनमध्ये दाखवता ते मग स्थूल वतनमध्ये कुठून आले? पर्वत इत्यादी तर इथे आहेत ना. तिथे पतित कसे असू शकतात. ज्यासाठी पार्वतीला ज्ञान देतील. बर्फाचे लिंग बसून हाताने बनवतात. ते तर कुठेही बनवू शकतात. मनुष्य किती धक्के खातात. हेच समजत नाहीत की, शंकराकडे पार्वती कुठून आली जे तिला पावन बनवतील. शंकर काही परमात्मा नाहीये, तो देखील देवता आहे. मनुष्यांना किती समजावून सांगितले जाते तरी देखील समजत नाहीत. पारस-बुद्धी बनू शकत नाहीत. प्रदर्शनीमध्ये किती येतात. म्हणतात नॉलेज तर खूप चांगले आहे. सर्वांना घ्यायला हवे. अरे, आधी तुम्ही तर घ्या. म्हणतील आम्हाला फुरसत नाही. प्रदर्शनीमध्ये हे सुद्धा लिहायला हवे की, या युद्धापूर्वी बाबा स्वर्गाचे उद्घाटन करत आहेत. विनाशानंतर स्वर्गाचे दरवाजे उघडतील. बाबांनी सांगितले होते - प्रत्येक चित्रामध्ये लिहा - ‘पारलौकिक परमपिता परमात्मा त्रिमूर्ती शिव भगवानुवाच’. त्रिमूर्ती न लिहिल्याने मग म्हणतील शिव तर निराकार आहेत, ते कसे ज्ञान देतील? समजावून सांगितले जाते - हाच आधी गोरा होता, श्रीकृष्ण होता आता पुन्हा सावळा मनुष्य बनला आहे. आता तुम्हाला मनुष्यापासून देवता बनवितात. मग हिस्ट्री रिपीट होणार आहे. गायन देखील आहे - ‘मनुष्य से देवता किये…’ परत शिडी उतरून मनुष्य बनतात. मग बाबा येऊन देवता बनवितात. बाबा म्हणतात - मला यावे लागते. कल्प-कल्प, कल्पाच्या संगमयुगावर येतो. युगे-युगे म्हणणे चुकीचे आहे. मी संगमयुगावर येऊन तुम्हाला पुण्य-आत्मा बनवतो. मग रावण तुम्हाला पाप-आत्मा बनवतो. बाबाच जुन्या दुनियेला नवीन दुनिया बनवतात. ही समजून घेण्याची गोष्ट आहे. अच्छा.

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) बाबांप्रमाणे टीचर बनायचे आहे, अतिशय युक्तीने सर्वांना या झूटखंडातून बाहेर काढून सचखंडा मध्ये जाण्याच्या लायक बनवायचे आहे.

२) दुनियेचा संग कुसंग आहे, त्यामुळे कु-संगापासून किनारा करून एक सत् चा संग करायचा आहे. उच्च पदासाठी या अभ्यासाला लागायचे आहे. एका बाबांच्या मतावरच चालायचे आहे.

वरदान:-
आपले सर्वकाही सेवेमध्ये अर्पित करणारे गुप्तदानी पुण्य आत्मा भव

जी काही सेवा करता त्याला विश्वकल्याणाप्रती अर्पित करत चला. जसे भक्तीमध्ये जे गुप्त दानी पुण्य-आत्मे असतात ते हेच संकल्प करतात की सर्वांच्या भल्यासाठी व्हावे. तसा तुमचा प्रत्येक संकल्प सेवेमध्ये अर्पित व्हावा. कधीही आपलेपणाची इच्छा ठेवू नका. सर्वांप्रती सेवा करा. जी सेवा विघ्नरूप बनेल तिला खरी सेवा म्हणणार नाही; त्यामुळे आपलेपणा सोडून गुप्त आणि सच्चे सेवाधारी बनून सेवेद्वारे विश्वकल्याण करत चला.

बोधवाक्य:-
प्रत्येक गोष्ट प्रभू अर्पण करा तर येणाऱ्या अडचणी सोप्या अनुभव होतील.

अव्यक्त इशारे:- सहजयोगी बनायचे असेल तर परमात्म प्रेमाचे अनुभवी बना.

आदिकाल, अमृतवेलेला आपल्या हृदयामध्ये परमात्म प्रेमाला संपूर्ण रूपाने धारण करा. जर हृदयामध्ये परमात्म प्रेम, परमात्म शक्ती, परमात्म ज्ञान फुल असेल तर कधीही आणि कोणत्याही बाजूला आकर्षण किंवा प्रेम जाऊ शकत नाही. बाबांवर खरे प्रेम आहे तर प्रेमाची निशाणी आहे - समान, कर्मातीत. ‘करावनहार’ बनून कर्म करा आणि करवून घ्या. कधीही मन-बुद्धी अथवा संस्कारांच्या वश होऊन कोणतेही कर्म करू नका.