26-09-2026      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो, आपला खरा-खरा चार्ट ठेवा, तर अवस्था चांगली राहील. चार्ट ठेवल्याने कल्याण होत राहील”

प्रश्न:-
कोणती स्मृती जुन्या दुनियेपासून सहजच अलिप्त करते?

उत्तर:-
जर ही स्मृती राहिली की, आपण कल्प-कल्प बाबांकडून बेहदचा वारसा घेतो. आता पुन्हा वारसा घेण्यासाठी आपण शिवबाबांचे दत्तक पुत्र बनलो आहोत. बाबांनी आम्हाला ॲडॉप्ट केले आहे, आपण खरे-खरे ब्राह्मण बनलो आहोत. शिवबाबा आम्हाला गीता ऐकवत आहेत. हीच स्मृती जुन्या दुनियेपासून अलिप्त करेल.

ओम शांती।
तुम्ही मुले इथे शिवबाबांच्या आठवणीमध्ये बसला आहात, तर तुम्ही जाणता की, ते आम्हाला पुन्हा एकदा सुखधामचे मालक बनवत आहेत. मुलांच्या बुद्धीमध्ये आतून किती आनंद झाला पाहिजे, इथे बसलेल्या मुलांना खजिना मिळत आहे ना. विविध प्रकारच्या कॉलेजेसमध्ये, युनिव्हर्सिटीजमध्ये कोणाच्याही बुद्धीमध्ये या गोष्टी नसतात. फक्त तुम्हीच जाणता की बाबा आम्हाला स्वर्गाचे मालक बनवत आहेत. याचा आनंद झाला पाहिजे ना. या वेळी इतर सर्व विचार काढून टाकून एका बाबांचीच आठवण करायची आहे. इथे जेव्हा बसता तेव्हा बुद्धीमध्ये हा नशा राहिला पाहिजे की आपण आता सुखधामचे मालक बनत आहोत. आम्ही कल्प-कल्प सुख आणि शांतीचा वारसा घेतो. मनुष्य तर काहीच जाणत नाहीत. कल्पापूर्वी देखील अनेक मनुष्य अज्ञानाच्या अंधारामध्ये कुंभकर्णाच्या निद्रेमध्ये झोपून नष्ट झाले होते. पुन्हा तरीही तसेच होईल. मुले समजतात - बाबांनी आम्हाला ॲडॉप्ट केले आहे किंवा आम्ही शिवबाबांचे धर्माचे दत्तक पुत्र बनलो आहोत. जे आदि सनातन देवी-देवता धर्माची स्थापना करत आहेत. आता आपण ब्राह्मण आहोत. आपण खरा-खरा गीतेचा पाठ ऐकत आहोत. आम्ही बाबांकडून पुन्हा राजयोग आणि ज्ञानबलाद्वारे वारसा घेत आहोत. अशा प्रकारचे विचार अंतर्मनामध्ये आले पाहिजेत ना. बाबा देखील येऊन आनंदाच्या गोष्टी सांगतात ना. बाबा जाणतात की मुले काम-चितेवर बसून काळी भस्मीभूत झाली आहेत, म्हणून मी अमरलोकमधून मृत्युलोकमध्ये येतो. तुम्ही मग म्हणता - आम्ही मृत्युलोकमधून अमरलोकमध्ये जातो. बाबा म्हणतात - मी मृत्युलोकामध्ये जातो, जिथे सर्वांचा जणू मृत्यु झाला आहे, त्यांना पुन्हा अमरलोकमध्ये घेऊन जातो. शास्त्रांमध्ये तर काय-काय लिहिले आहे - ‘ते सर्वशक्तिमान आहेत, जे पाहिजे ते करू शकतात’. परंतु मुले जाणतात की, त्यांना बोलावलेच जाते ‘हे पतित-पावन बाबा या, येऊन आम्हाला पतितापासून पावन बनवा, दुःख दूर करून सुख द्या.’ यामध्ये जादूची काही कोणती गोष्ट नाहीये. बाबा येतातच काट्यांपासून फुले बनविण्याकरिता.

तुम्ही जाणता की आपणच सुखधामचे देवता होतो, सतोप्रधान होतो. प्रत्येकाला सतोप्रधानते मधून तमोप्रधानते मध्ये यायचेच आहे. मुलांना इथे बसले असताना आणखीच मजा वाटली पाहिजे. आठवण झाली पाहिजे. सारी दुनिया बाबांचीच आठवण करते - ‘हे लिबरेटर, गाइड, हे पतित-पावन या’. बोलावतात तेव्हाच जेव्हा रावण राज्यामध्ये असतात. सतयुगामध्ये थोडेच बोलावतात, या गोष्टी समजायला अत्यंत सोप्या आहेत. या गोष्टी कोणी ऐकवल्या आहेत? बाबांची देखील महिमा करतील, टीचर, सद्गुरुची देखील महिमा करतील, तिघेही एकच आहेत. हे तुमच्या बुद्धीमध्ये आहे. हे पिता, टीचर आणि सद्गुरु देखील आहेत. शिवबाबांचा धंदाच आहे पतितांना पावन बनविणे. पतित जरूर दुःखी असतील. सतोप्रधान सुखी आणि तमोप्रधान दुःखी असतात. या देवतांचा स्वभाव किती सतोगुणी आहे. इथे मनुष्यांचा कलियुगी तमोगुणी स्वभाव आहे. बाकी होय, मनुष्य नंबरवार चांगले किंवा वाईट असतात. सतयुगामध्ये कधीही असे म्हणणार नाही की, ‘हा वाईट आहे, हा असा आहे’. तिथे कोणतीही वाईट लक्षणे नसतात. तो आहेच दैवी संप्रदाय. हां, श्रीमंत आणि गरीब असू शकतात. बाकी चांगल्या किंवा वाईट गुणांची तुलना तिथे असत नाही, सर्वजण सुखी असतात. दुःखाची गोष्टच नाही; नावच आहे - सुखधाम. तर मुलांनी बाबांकडून संपूर्ण वारसा घेण्याचा पुरुषार्थ केला पाहिजे. आपले चित्र आणि लक्ष्मी-नारायणाचे चित्र देखील सोबत ठेवू शकता. म्हणतील - कोणी तरी यांना शिकविणारे जरूर असतील. हे तर भगवानुवाच आहे ना. भगवंताला स्वतःचे शरीर नाही. ते येऊन देहाचे लोन घेतात. गायन देखील केलेले आहे - भागीरथ, तर जरूर रथावर विराजमान आहेत. नंदीवर थोडेच येतील. शिव आणि शंकर यांना एकत्र केले आहे, म्हणून नंदी दाखवला आहे. तर बाबा म्हणतात - तुम्हाला किती आनंद झाला पाहिजे की, आपण बाबांचे बनलो आहोत. बाबा देखील म्हणतात - तुम्ही माझे आहात. बाबांना कोणते पद प्राप्त करण्याचा आनंद नाही. टीचर तर टीचर आहे, त्यांना शिकवायचे आहे. बाबा म्हणतात - मुलांनो, मी सुखाचा सागर आहे. आता तुम्हाला अतींद्रिय सुखाचा अनुभव होतो, जेव्हा मी तुम्हाला ॲडॉप्ट केले आहे. ॲडॉप्शन तर विविध प्रकारचे असते. पुरुष देखील कन्येला ॲडॉप्ट करतात. ती समजते - हा माझा पती आहे. आता तुम्ही समजता शिवबाबांनी आम्हाला ॲडॉप्ट केले आहे. दुनियेमध्ये कोणीही या गोष्टी समजू शकत नाही. त्यांचे ते ॲडॉप्शन आहे - एकमेकांवर काम-कटारी चालविण्याचे. समजा, एखादा राजा एखाद्या मुलाला दत्तक पुत्र बनवतो, ॲडॉप्ट करतो ते सुखासाठी, परंतु ते आहे अल्पकाळाचे सुख. संन्यासी देखील ॲडॉप्ट करतात ना. तो (चेला) म्हणेल - हा माझा गुरू आहे, आणि गुरू म्हणेल - हा माझा चेला आहे. किती प्रकारचे ॲडॉप्शन आहे. वडील मुलाला ॲडॉप्ट करतात. त्याला सुख तर देतात परंतु नंतर विवाह करून जणू दुःखाचा वारसा देतात. गुरूचे ॲडॉप्शन किती फर्स्टक्लास आहे. हे मग आहे आत्म्यांना आपले बनविण्याचे ईश्वरीय ॲडॉप्शन. आता तुम्हा मुलांनी सर्व प्रकारचे ॲडॉप्शन पाहिले आहे. संन्यासी असताना देखील गायन करत राहतात - ‘हे पतित-पावन या, येऊन आम्हाला ॲडॉप्ट करून पावन बनवा’. सर्वजण ब्रदर्स आहेत; परंतु बाबा येऊन आपले बनवतील तेव्हा ना. म्हणतात - ‘बाबा, आम्ही दुःखी झालो आहोत’. रावण राज्याचा अर्थ देखील समजत नाहीत. रावणाचा पुतळा बनवून जाळत राहतात. जसे कोणी दुःख देत असेल, तर समजतात की, याच्यावर केस केली पाहिजे. परंतु हा केव्हा पासून शत्रू बनला आहे? शेवटी हा शत्रू मरणार आहे की नाही? या शत्रू विषयी फक्त तुम्हालाच माहीत आहे, त्याच्यावर विजय प्राप्त करण्यासाठीच तुम्हाला ॲडॉप्ट केले जाते. हे देखील तुम्ही मुलेच जाणता की, विनाश होणार आहे. अणू बॉम्ब्स देखील तयार आहेत. या ज्ञान-यज्ञामधूनच विनाश ज्वाळा प्रज्वलित झाली आहे. आता तुम्ही जाणता की, रावणावर विजय प्राप्त करून मग नवीन सृष्टीवर राज्य करू. बाकी तर सर्व बाहुल्यांचा खेळ आहे. रावणाच्या बाहुलीवर तर खूप खर्च होतो. मनुष्य खूप पैसा वाया घालवतात. किती रात्रं-दिवसाचा फरक आहे. ते (दुनियावाले) भटकतात, दुःखी होतात, खस्ता खात राहतात. आणि आम्ही आता श्रीमतावर श्रेष्ठाचारी, सतयुगी स्वराज्य प्राप्त करत आहोत. श्रेष्ठ ते श्रेष्ठ सतयुगाची स्थापना करणारे शिवबाबा आम्हाला श्रेष्ठ देवता, विश्वाचे मालक बनवतात. श्री श्री शिवबाबा आम्हाला ‘श्री’ बनवतात. ‘श्री श्री’ फक्त एकालाच म्हटले जाते. देवतांना ‘श्री’ म्हटले जाते, कारण ते पुनर्जन्मामध्ये येतात ना. खरेतर विकारी राजांना देखील ‘श्री’ म्हणू शकत नाही.

आता तुमची बुद्धी किती विशाल असली पाहिजे. तुम्ही जाणता की, या शिक्षणाद्वारे आपण डबल सिरताज (डबल मुकुटधारी) बनतो. आपणच डबल सिरताज होतो, आता तर सिंगल ताज सुद्धा राहिलेला नाहीये. पतित आहोत ना. इथे कोणालाही लाईटचा मुकुट दाखवता येणार नाही. या चित्रांमध्ये जिथे तुम्ही तपस्येला बसलेले आहात, तिथे लाइटचा मुकुट देता कामा नये. तुम्हाला डबल सिरताज (डबल मुकुटधारी) तर भविष्यामध्ये बनायचे आहे. तुम्ही मुले जाणता की आपण बाबांकडून डबल सिरताज महाराजा-महाराणी बनण्यासाठी आलो आहोत. हा आनंद असायला हवा. शिवबाबांची आठवण केली पाहिजे तर पतितापासून पावन बनून स्वर्गाचे मालक बनाल, यामध्ये काही त्रास होण्याचा प्रश्नच नाही. इथे तुम्ही स्टुडंट बसलेले आहात. बाहेर मित्र-नातलग इत्यादींकडे गेल्यावर स्टुडंट लाइफ विसरून जाते. मग मित्र-नातेवाईक आठवू लागतात. मायेचा फोर्स आहे ना. हॉस्टेलवर राहिल्याने चांगले शिकतात. बाहेर येणे-जाणे केल्याने संगदोषामुळे खराब होतात. इथून बाहेर गेल्यावर स्टुडंट लाईफचा (विद्यार्थी जीवनाचा) नशा नाहीसा होतो. शिकविणाऱ्या ब्राह्मणींना देखील बाहेर इतका नशा राहणार नाही, जितका इथे राहतो. हे हेड ऑफिस मधुबन आहे. स्टुडंट टीचर समोर राहतात. इथे कोणतेही उलटे धंदे नाहीत. रात्रं-दिवसाचा फरक आहे. काही जण तर संपूर्ण दिवसभरामध्ये शिवबाबांची आठवण सुद्धा करत नाहीत. शिवबाबांचे मदतगार बनत नाहीत. शिवबाबांची मुले बनला आहात तर सेवा करा. जर सेवा करत नसाल तर जणू ती कपूत मुले आहेत. बाबा तर समजतात ना. यांचे कर्तव्य आहे सांगणे - ‘माझी आठवण करा’. फॉलो कराल तर खूप-खूप कल्याण आहे. विकारी नाती तर भ्रष्टाचारी आहेत. त्यांना मागे सोडत जा, त्यांच्याशी संगत ठेवू नका. बाबा तर समजावून सांगतात परंतु कोणाच्या भाग्यात सुद्धा हवे ना. बाबा म्हणतात - चार्ट ठेवायचा आहे, याने देखील खूप कल्याण होईल. कोणी एक तास सुद्धा अगदी मुश्किलीने आठवणीमध्ये राहत असेल. ८ तासांपर्यंत तर शेवटी पोहोचायचे आहे. कर्मयोगी आहात ना. काहीजणांना कधी-कधी उमंग येतो तर चार्ट ठेवतात. हे चांगले आहे. जितकी बाबांची आठवण कराल तितका फायदाच आहे. गायले गेले आहे - ‘अन्तकाल जो हरि को सुमिरे…’; ‘वल-वल’ चा अर्थ काय आहे? जे चांगल्या रीतीने आठवण करत नाहीत, तर जन्म-जन्मांतरीचे जे ओझे आहे, त्यांना ‘वल-वल’ अर्थात वारंवार जन्म देऊन साक्षात्कार करवून मग सजा दिली जाते. जसे काशी कलवट खातात तेव्हा ताबडतोब पापांचा साक्षात्कार होतो. जाणीव होते की आपण पापांची शिक्षा भोगत आहोत. खूप मार खाणार आहेत. बाबांच्या सेवेमध्ये जे विघ्न आणतात, ते शिक्षेस पात्र आहेत. बाबांच्या सेवेमध्ये अडथळा आणतात, ज्यांचा राइट हॅण्ड धर्मराज आहे. बाबा म्हणतात - स्वतःशी प्रतिज्ञा करा कारण बाबांच्या आठवणीनेच तुम्ही पावन बनाल, अन्यथा पावन बनणार नाही. बाबा प्रतिज्ञा करवून घेतात, मग करा अथवा नका करू, तुमची मर्जी. जो करेल तो प्राप्त करेल. असे बरेच आहेत जे प्रतिज्ञा करतात, तरी देखील वाईट कामे करत राहतात. भक्तिमार्गामध्ये गात राहतात - ‘मेरा तो एक दूसरा न कोई’. परंतु ती गोष्ट आता लक्षात येत आहे की, आत्मा असे का गात आली आहे. संपूर्ण दिवस गात राहतात - ‘मेरा तो एक गिरधर गोपाल…’ हे तर संगमावर बाबा येतील तेव्हा आपल्या घरी घेऊन जातील. कृष्णपुरीमध्ये जाण्यासाठी तुम्ही शिकत आहात ना. ‘प्रिन्सेस कॉलेज’ असतात, जिथे प्रिन्स-प्रिन्सेस शिक्षण घेतात. ती तर आहे हदची गोष्ट. कधी आजारी पडतात, कधी मृत्यू देखील होतो. ही तर आहे प्रिन्स-प्रिन्सेस बनण्याची गॉडफादरली युनिव्हर्सिटी. हा राजयोग आहे ना. तुम्ही नरापासून नारायण बनता. तुम्ही बाबांकडून वारसा घेऊन सतयुगाचे प्रिन्स-प्रिन्सेस बनता.

बाबा बसून तुम्हा मुलांना किती मजेशीर गोष्टी ऐकवतात. त्या आठवणीत राहिल्या पाहिजेत ना. काही जण तर इथून बाहेर पडताच जाळ्यात अडकतात. बाबांची आठवण देखील नंबरवार करतात. जे जास्त आठवण करत असतील ते इतरांना देखील आठवण करून देत असतील. बुद्धीमध्ये हेच राहिले पाहिजे की अनेकांचे कल्याण कसे करावे. बाहेरचे प्रजेमध्ये दास-दासी बनतील, इथले मग राजांच्या दरबारामध्ये दास-दासी बनतील. पुढे चालून सर्व साक्षात्कार होत जातील. तुम्हाला देखील जाणीव होईल की, खरोखर आपण पूर्ण पुरुषार्थ केला नाही, खूप चमत्कार पाहाल. जे चांगल्या रीतीने शिकतील तेच नवाब बनतील. बाबा किती सांगत राहतात - सेंटर्सना प्रदर्शनी देतो, तर मुलांना शिकवून हुशार बनवा. तेव्हा बाबा समजतील की बी.के. सेवा करणे जाणतात. सेवा कराल तरच उच्च पद प्राप्त कराल, म्हणून बाबा प्रदर्शनी बनविण्यावर जोर देत आहेत. ही चित्रे बनविणे तर खूप सामान्य गोष्ट आहे. हिंमत करून प्रदर्शनीची चित्रे बनविण्यामध्ये मदत केली पाहिजे, म्हणजे मग मुलांना समजावून सांगणे सोपे होईल. बाबा समजतात - टीचर्स, मॅनेजर्स थंड आहेत. काही-काही ब्राह्मणी मॅनेजर बनतात तर देह-अभिमान येतो. स्वतःलाच मियाँ मिट्ठू समजतात. आम्ही खूप चांगल्या चालतो. इतरांना विचाराल तर ते १० गोष्टी ऐकवतील. माया खूप भ्रमात टाकते. मुलांनी तर सेवा आणि सेवेमध्येच राहिले पाहिजे. बाबा दयाळू, दुःख हर्ता, सुख कर्ता आहेत तर मुलांनी देखील तसे बनायचे आहे; फक्त बाबांचा परिचय द्यायचा आहे. बाबा म्हणतात - मामेकम् (मज एकाची) आठवण करा, तर नरकवासी पासून स्वर्गवासी बनाल. किती सोपे आहे. बाबा म्हणतात - माझी आठवण कराल तर पतितापासून पावन बनून तुम्ही शांतीधाम, सुखधाममध्ये याल. निश्चय झाला असेल तर मग लगेच लिहून घेतले पाहिजे. लिहितात देखील की, बरोबर ब्रह्माकुमार-कुमारी शिवबाबांकडून वारसा घेतात, तेव्हा वाटेल की अशा बाबांचे तर जरूर बनले पाहिजे. त्यांना शरण आले पाहिजे (त्यांचा आश्रय घेतला पाहिजे). तुम्ही बाबांचा आश्रय घेतला आहात ना अर्थात त्यांच्या गोद मध्ये आला आहात. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) पित्यासमान दयाळू, दुःखहर्ता-सुखकर्ता बनायचे आहे.

२) संगदोषा पासून स्वतःला खूप-खूप जपायचे आहे. एका बाबांनाच फॉलो करायचे आहे. अनेकांच्या कल्याणाची सेवा करायची आहे. कधीही अहंकारामध्ये येऊन मियाँ मिट्ठू बनायचे नाही.

वरदान:-
अंतर्मुखी बनून आपल्या वेळेची आणि संकल्पांची बचत करणारे विघ्न जीत भव

कोणतेही नवीन शक्तिशाली संशोधन करतात तर तेव्हा अंडरग्राउंड करतात (गुप्तपणे करतात). तुम्ही देखील जितके अंतर्मुखी अर्थात अंडरग्राउंड राहाल तितके वायुमंडळापासून सुरक्षित राहाल, मननशक्ती वाढेल आणि मायेच्या विघ्नांपासून देखील सुरक्षित राहाल. बाह्यमुखतेमध्ये येत असताना देखील अंतर्मुख, हर्षितमुख, आकर्षणमूर्त रहा, कर्म करत असताना देखील हा अभ्यास करा; यामुळे तुमचा वेळही वाचेल आणि तुम्हाला यश देखील जास्त मिळेल.

बोधवाक्य:-
आजाराला घाबरू नका, त्याला औषध रूपी फ्रूट खाऊ घालून विदाई द्या.

हे अव्यक्त इशारे - आता आपल्या ‘दाता’ स्वरूपाला प्रत्यक्ष करा.

तुम्हा मुलांना कोणत्याही आत्म्या कडून काहीही घ्यायचे नाहीये. फक्त एका बाबांकडूनच घ्यायचे आहे आणि जे घेतले आहे ते सर्वांना द्यायचे आहे. जिथे द्यायचे आहे, तिथे घेण्याची इच्छा ठेवायची नाही. जर आत्मा, दुसऱ्या आत्म्याकडून काहीही घेण्याची इच्छा ठेवत असेल तर तिला अल्पज्ञ आत्म्यांकडून अल्पकाळाचीच प्राप्ती होईल. केवळ सर्वज्ञ बाबांकडूनच सदाकाळाची प्राप्ती होईल. कोणत्याही प्रकारची घेण्याची इच्छा आपल्या स्वमानापासून खाली आणते.