27-01-2026
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
“गोड
मुलांनो - पावलो-पावली श्रीमतावर चाला, नाहीतर माया दिवाळे काढेल, हे डोळे खूप धोका
देतात, यांची खूप-खूप काळजी घ्या”
प्रश्न:-
कोणत्या
मुलांकडून माया खूप विकर्म करवून घेते? यज्ञामध्ये विघ्न रूप कोण आहेत?
उत्तर:-
ज्यांना आपला अहंकार असतो त्यांच्याकडून माया खूप विकर्म करवून घेते. असे मिथ्या
अहंकार असणारे मुरली देखील वाचत नाहीत. अशी चूक केल्याने माया थप्पड लावून वर्थ नॉट
ए पेनी बनवते. यज्ञामध्ये विघ्न रूप ते आहेत ज्यांच्या बुद्धीमध्ये झरमुई-झगमुई (परचिंतनाच्या)
गोष्टी असतात, ही अतिशय वाईट सवय आहे.
ओम शांती।
रूहानी मुलांना बाबांनी समजावून सांगितले आहे, इथे तुम्हा मुलांना या विचारामध्ये
जरूर बसायचे आहे - हे पिता देखील आहेत, टीचर देखील आहेत, सुप्रीम गुरु देखील आहेत.
आणि याची देखील जाणीव होते की, बाबांची आठवण करता-करता आपण पवित्र बनून पवित्र-धामला
जाऊन पोहोचणार. बाबांनी समजावून सांगितले आहे - पवित्र-धाम मधूनच तुम्ही खाली उतरला
आहात. पहिले तुम्ही सतोप्रधान होता मग सतो, रजो, तमोमध्ये आलात. आता तुम्ही समजता
की, आपली अधोगती झालेली आहे. भले तुम्ही संगमयुगावर आहात परंतु ज्ञानाद्वारे तुम्ही
हे जाणता - आपण किनारा केलेला आहे. मग जर आपण शिवबाबांच्या आठवणीमध्ये राहिलो तर
शिवालय काही दूर नाही. शिवबाबांची आठवणच करत नाहीत तर शिवालय खूप दूर आहे. सजा खावी
लागते ना तर खूप दूर होते. तर बाबा मुलांना काही जास्त त्रास देत नाहीत. एक तर
वारंवार सांगत आहेत - मनसा-वाचा कर्मणा पवित्र बनायचे आहे. हे डोळे देखील खूप धोका
देतात. खूप सांभाळून चालावे लागते.
बाबांनी समजावून
सांगितले आहे - ध्यान आणि योग पूर्णपणे वेगळे आहेत. योग अर्थात आठवण. डोळे उघडे
ठेवून आठवण करू शकता. ध्यानाला योग म्हटले जात नाही. ध्यानामध्ये जातात तर त्याला
ना ज्ञान, ना योग म्हटले जाते. जे ध्यानामध्ये जातात त्यांच्यावर माया देखील खूप
वार करते, म्हणून यामध्ये खूप सावध रहावे लागते. बाबांची कायदे अनुसार आठवण केली
पाहिजे. कायद्या विरुद्ध कोणते काम केले तर माया एकदम खाली पाडेल. ध्यानाची तर कधी
इच्छा देखील ठेवायची नाही, इच्छा मात्रम् अविद्या. तुम्हाला कोणतीही इच्छा ठेवायची
नाहीये. बाबा तुमच्या सर्व मनोकामना मागितल्याशिवाय पूर्ण करतात, जर बाबांच्या
आज्ञेवर चालत असाल तर. जर बाबांच्या आज्ञेचे उल्लंघन करून उलटा रस्ता घेतला असेल तर
होऊ शकते स्वर्गामध्ये जाण्याऐवजी नरकामध्ये जाऊन पडाल. गायन देखील आहे हत्तीला
मगरीने खाल्ले. अनेकांना ज्ञान देणारे, भोग लावणारे आज नाही आहेत कारण कायद्याचे
उल्लंघन करतात तर ते पूर्णपणे मायावी बनतात. डीटी (दैवी) बनता-बनता डेविल (असूर)
बनतात म्हणून या मार्गामध्ये खूप सावधगिरी बाळगली पाहिजे. स्वतःवर कंट्रोल ठेवायचा
असतो. बाबा तर मुलांना सावध करतात. श्रीमताचे उल्लंघन करायचे नाही. आसुरी मतावर
चालल्यानेच तुमची उतरती कला झालेली आहे. कुठून एकदम कुठे पोहोचला आहात. एकदम खाली
पोहोचला आहात. आता देखील श्रीमतावर चालला नाहीत, निष्काळजी राहिलात तर पदभ्रष्ट
व्हाल. बाबांनी काल देखील समजावून सांगितले आहे - श्रीमताच्या आधाराशिवाय जे काही
करतात तर ते खूप डिससर्व्हीस करतात. श्रीमताशिवाय कराल तर घसरतच जाल (अधोगतीच होत
जाईल). बाबांनी सुरुवातीपासूनच मातांना निमित्त बनवले आहे कारण कलश देखील मातांना
मिळतो. ‘वंदे मातरम्’ गायले गेले आहे. बाबांनी देखील मातांची एक कमिटी बनवली आणि
सर्व काही त्यांच्या हवाली केले आहे. मुली विश्वासपात्र असतात. पुरुष जास्त करून
दिवाळखोर (पतित) बनतात. त्यामुळे बाबा देखील मातांवर कलश ठेवतात. या
ज्ञानमार्गामध्ये माता देखील दिवाळखोर बनू शकतात. जे पद्मा-पदम भाग्यशाली बनणारे
आहेत, ते देखील मायेकडून हार खाऊन दिवाळखोर बनू शकतात (पतित बनू शकतात). यामध्ये
स्त्री-पुरुष दोघेही दिवाळखोर बनू शकतात . तिथे फक्त पुरुष दिवाळखोर बनतात. इथे तर
पहा कितीतरी हार होऊन निघून गेले, जणू दिवाळखोर (पतित) बनले ना. बाबा बसून समजावून
सांगत आहेत - भारतवासीच पूर्णपणे दिवाळखोर (पतित) बनले आहेत. माया किती जबरदस्त आहे.
समजू शकत नाहीत की आपण कोण होतो? कुठून एकदम खाली येऊन कोसळलो आहोत! इथे देखील वर
चढता-चढता मग श्रीमताला विसरून आपल्या मतावर चालतात तर दिवाळखोर बनतात. मग सांगा
त्यांचे काय हाल होतील. ते (दुनियावाले) तर दिवाळखोर बनतात आणि मग ५-७ वर्षानंतर
सावरतात. हे तर ८४ जन्मांसाठी दिवाळखोर बनतात. मग उच्च पद प्राप्त करू शकणार नाहीत,
दिवाळखोरीतच जातात (पतित होतच राहतात). कित्येक महारथी अनेकांचे कल्याण करत होते,
आज ते नाही आहेत. दिवाळखोरीमध्ये आहेत. इथे उच्च पदे तर अनेक आहेत, तरीही जर
सावधगिरी बाळगली नाहीत तर एकदम वरून खाली पडाल. माया गिळून टाकते. मुलांनी खूप सावध
रहायचे आहे. आपल्या मतावर कमिटी इत्यादी बनवणे, यामध्ये काहीच फायदा नाही. बाबांशी
बुद्धीयोग ठेवा - ज्याद्वारेच सतोप्रधान बनायचे आहे. बाबांचे बनून मग बाबांशी योग
लावत नाहीत तर श्रीमताचे उल्लंघन करतात त्यामुळे एकदम अधोगती होते. कनेक्शनच तुटून
जाते. लिंक तुटते. लिंक तुटली तर चेक केले पाहिजे की, माया आपल्याला इतकी हैराण का
करत आहे. प्रयत्न करून बाबांशी लिंक जोडली पाहिजे, नाहीतर बॅटरी चार्ज कशी होणार.
विकर्म केल्याने बॅटरी डिस्चार्ज होते. वर चढता-चढता खाली पडतात. तुम्ही जाणता असे
कितीतरी आहेत. सुरुवातीला किती भरपूर जण येऊन बाबांचे बनले. भट्टीमध्ये आले आणि मग
आज कुठे आहेत? कोसळले (अधोगती झाली) कारण जुनी दुनिया आठवली. आता बाबा म्हणतात - मी
तुम्हाला बेहदचे वैराग्य देत आहे. या जुन्या पतित दुनियेवर मन जडू द्यायचे नाही.
प्रेम करा स्वर्गावर, मेहनत आहे. जर असे लक्ष्मी-नारायण बनू इच्छिता तर मेहनत करावी
लागेल. बुध्दीयोग एका बाबांशीच असला पाहिजे. जुन्या दुनियेपासून वैराग्य. अच्छा,
जुन्या दुनियेला विसरून जाणे हे तर ठीक आहे. मग आठवण कोणाची करावी? शांतीधाम आणि
सुखधामची. जितके होईल उठता-बसता, चालता-फिरता बाबांची आठवण करा. बेहद सुख असणाऱ्या
स्वर्गाची आठवण करा. हे तर एकदम सोपे आहे. जर या दोन इच्छांच्या विरुद्ध चालतात तर
पदभ्रष्ट होतात. तुम्ही इथे आलाच आहात नरापासून नारायण बनण्याकरिता. सर्वांना सांगता
- तमोप्रधानापासून सतोप्रधान बनायचे आहे कारण रिटर्न जर्नी आहे. जगाचा इतिहास-भूगोल
रिपीट अर्थात नरका पासून स्वर्गामध्ये, नंतर पुन्हा स्वर्गातून नरकामध्ये. हे चक्र
फिरतच राहते. बाबांनी सांगितले आहे - इथे स्वदर्शन चक्रधारी होऊन बसा. याच
आठवणीमध्ये रहा की, आपण कितीदा हे चक्र फिरलो आहोत. आपण स्वदर्शन चक्रधारी आहोत, आता
पुन्हा देवता बनत आहोत. दुनियेमध्ये कोणीही या रहस्याला जाणत नाही. हे ज्ञान काही
देवतांना ऐकवायचे नाहीये. ते तर आहेतच पवित्र. त्यांना हे ज्ञानच नाही ज्यासाठी शंख
वाजवतील. पवित्र देखील आहेत त्यामुळे त्यांना निशाणी देण्याची गरजच नाही. निशाणी
तेव्हा दाखवली जाते जेव्हा दोघेही एकत्र चतुर्भुज रूपात असतात. तुम्हाला देखील ही
निशाणी दाखवता येत नाही कारण तुम्ही आज देवता आहात तर उद्या मग कोसळता (अधोगती होत
जाते). माया पाडून घालते (अधोगती करते) ना. बाबा डीटी (दैवी) बनवतात, माया मग डेविल
(असूर) बनवते. अनेक प्रकारे माया परीक्षा घेते. बाबा जेव्हा सांगतात तेव्हा कळते.
खरोखर आपली अवस्था घसरलेली आहे (नीच झाली आहे). कितीतरी बिचारे आपले सर्व काही
शिवबाबांच्या खजिन्यामध्ये जमा करतात आणि तरी देखील मायेकडून हार खातात. शिवबाबांचे
बनले मग विसरून का जातात, यामध्ये योगाची यात्रा महत्वाची आहे. योगानेच पवित्र
बनायचे आहे. नॉलेज सोबतच पवित्रता देखील पाहिजे. तुम्ही बोलावता देखील - ‘बाबा,
येऊन आम्हाला पावन बनवा, जेणेकरून आम्ही स्वर्गामध्ये जाऊ शकू. आठवणीची यात्रा आहेच
मुळी पावन बनून उच्च पद प्राप्त करण्याकरिता. जे निघून जातात तरीही काही ना काही
ऐकले आहे तर शिवालयामध्ये येतील जरूर. मग पद भले कोणतेही मिळेल परंतु येतात जरूर.
एकदा जरी आठवण केली तरी स्वर्गामध्ये येतील, परंतु उच्च पद मिळणार नाही. फक्त
स्वर्गाचे नाव ऐकून आनंदीत व्हायचे नाही. नापास होऊन दीडदमडीचे पद घेणे, यामध्ये
आनंदीत होता कामा नये. भले स्वर्ग आहे परंतु त्यामध्ये पदे तर अनेक आहेत ना. जाणीव
तर होते ना - मी नोकर आहे, मेहतर (सफाई कामगार) आहे. शेवटी तुम्हाला सर्व
साक्षात्कार होईल - आपण काय बनणार, आपल्याकडून कोणते विकर्म झाले ज्यामुळे आपली अशी
हालत झाली आहे? मी महाराणी का बनले नाही? पावलो-पावली सावधगिरीने चालल्यामुळे तुम्ही
पद्म-पती बनू शकता. सावधगिरी बाळगली नाही तर पद्म-पती बनू शकणार नाही. मंदिरांमध्ये
देवतांना पद्म-पतीची निशाणी दाखवतात. फरक तर समजू शकता ना. पदाच्या दर्जामध्ये
देखील खूप फरक आहे. आता देखील पहा किती दर्जे आहेत. किती थाट असतो. आहे तर अल्प
काळाचे सुख. तर आता बाबा म्हणतात - हे उच्च पद घ्यायचे आहे, ज्यासाठी सर्वजण हात
उचलतात; तर तितका पुरुषार्थ देखील करायचा आहे. हात उचलणारे स्वतः नष्ट होतात.
म्हणतील - हे तर देवता बनणार होते. पुरुषार्थ करता-करता नष्टच झाले. आता हात उचलणे
सोपे आहे. अनेकांना ज्ञान समजावून सांगणे देखील सोपे आहे, महारथी ज्ञान सांगत असताना
देखील गायब होतात. इतरांचे कल्याण करून स्वतः मात्र आपलेच अकल्याण करून बसतात,
म्हणून बाबा समजावून सांगतात - सावध रहा. अंतर्मुखी होऊन बाबांची आठवण करायची आहे.
कोणत्या प्रकारे? बाबा आपले पिता देखील आहेत, टीचर देखील आहेत, सद्गुरु देखील आहेत,
आपण आपल्या स्वीट होममध्ये जात आहोत. हे सर्व ज्ञान बुद्धीमध्ये असले पाहिजे.
बाबांमध्ये ज्ञान आणि योग दोन्ही आहेत. तुमच्यामध्ये देखील असले पाहिजे. तुम्ही
जाणता - बाबा शिकवत आहेत, तर हे ज्ञान देखील झाले, आठवण देखील झाली. ज्ञान आणि योग
दोन्ही एकत्रच असते. असे नको की, योगामध्ये बसून शिवबाबांना आठवण करत राहिलात आणि
नॉलेज विसरून गेलात. बाबा योग शिकवतात तेव्हा ते नॉलेज विसरतात का! सर्व नॉलेज
त्यामध्येच असते. तुम्हा मुलांमध्ये हे नॉलेज असले पाहिजे. शिकले पाहिजे. जसे कर्म
मी करेन, मला पाहून इतरही करतील. मी मुरली वाचली नाही तर बाकीचे देखील वाचणार नाहीत.
माझी जशी दुर्गती होईल तशी इतरांचीही दुर्गती होईल. इतरांच्या अधोगतीसाठी मी
निमित्त बनेन. बरीच मुले मुरली वाचत नाहीत, मिथ्या अहंकार येतो. माया लगेच वार करते.
पावलो-पावली श्रीमत पाहिजे. नाही तर काही ना काही विकर्म बनतात. अनेक मुले चुका
करतात आणि मग सत्यानाश होतो. चुका केल्यानेच माया थप्पड मारून वर्थ नॉट ए पेनी (कवडीमोल)
बनवते. यामध्ये खूप समजूतदारपणा पाहिजे. अहंकार आल्याने माया खूप विकर्म करायला
लावते. जेव्हा कोणती कमिटी इत्यादी बनवता तर त्यामध्ये हेड एक-दोन फिमेल जरूर असल्या
पाहिजेत, ज्यांच्या मतावर कार्य होईल. कलश तर लक्ष्मी वर ठेवला जातो ना. गायन देखील
आहे - अमृत पाजत होती तर असूर देखील बसून पीत होते. मग यज्ञामध्ये कुठेतरी विघ्न
आणतात, अनेक प्रकारची विघ्ने टाकणारे देखील आहेत. पूर्ण दिवस बुद्धीमध्ये
झरमुई-झगमुईच्या (व्यर्थ) गोष्टीच चालू असतात. हे खूप वाईट आहे. कोणतीही गोष्ट असेल
तर बाबांना रिपोर्ट करा. सुधारणारे तर एक बाबाच आहेत. तुम्ही तुमच्या हातामध्ये
कायदा घेऊ नका. तुम्ही बाबांच्या आठवणीमध्ये रहा. सर्वांना बाबांचा परिचय द्या
तेव्हा असे बनू शकाल. माया खूप बलवान आहे, कोणालाच सोडत नाही. बाबांना नेहमी समाचार
लिहून दिला पाहिजे. मार्गदर्शन घेत राहिले पाहिजे. तसे तर प्रत्येक कार्यासाठी
डायरेक्शन्स मिळतच असतात. मुले समजतात की, बाबांनी तर स्वतःच या विषयावर सांगितले
याचा अर्थ बाबा अंतर्यामी आहेत. बाबा म्हणतात - नाही, मी तर नॉलेज शिकवतो. यामध्ये
अंतर्यामी असण्याचा प्रश्नच नाही. होय, एवढे मात्र जाणतात की ही सर्व माझीच मुले
आहेत. प्रत्येकाच्या शरीरातील आत्मा माझीच संतान आहे. बाकी असे नाही की, बाबा
सर्वांमध्ये विराजमान आहेत. मनुष्य उलटे समजतात.
बाबा म्हणतात - मी
जाणतो सर्वांच्या तख्तावर आत्मा विराजमान आहे. ही तर किती सोपी गोष्ट आहे. तरी
देखील चूक करून परमात्मा सर्वव्यापी आहेत असे म्हणतात. ही आहे एकच चूक, ज्या
कारणामुळेच इतकी अधोगती झाली आहे. विश्वाचा मालक बनविणाऱ्या बाबांनाच तुम्ही शिव्या
देता; म्हणून बाबा म्हणतात - ‘यदा यदा हि…’ बाबा इथे येतात तर मुलांनी व्यवस्थित
विचार सागर मंथन करायचे आहे. नॉलेजवर भरपूर मंथन केले पाहिजे, वेळ दिला पाहिजे
तेव्हाच तुम्ही तुमचे कल्याण करू शकाल, यामध्ये पैसे इत्यादीची गोष्ट नाही. उपाशी
तर कोणी मरणार नाही. जितके जे बाबांकडे जमा करतात, तेवढे भाग्य बनते. बाबांनी
समजावून सांगितले आहे - ज्ञान आणि भक्ती त्या नंतर आहे वैराग्य. वैराग्य अर्थात
सर्व काही विसरून जावे लागते. स्वतःला डिटॅच केले पाहिजे, मी आत्मा आता शरीरातून
जात आहे. अच्छा!
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१) स्वतःवर
खूप कंट्रोल ठेवायचा आहे. श्रीमताच्या बाबतीत कधीही बेफिकीर बनायचे नाही. खूप-खूप
सतर्क रहायचे आहे, कधीही कोणत्या कायद्याचे उल्लंघन होऊ नये.
२) अंतर्मुखी होऊन एका
बाबांशी बुद्धीची लिंक जोडायची आहे. या पतित जुन्या दुनियेपासून बेहदचे वैराग्य
ठेवायचे आहे. बुद्धीमध्ये असावे - जे कर्म मी करेन, मला पाहून सर्व करतील.
वरदान:-
ज्ञानाच्या
पॉईंट्सना दररोज रिवाईज (उजळणी) करून समाधान स्वरूप बनणारे बेगमपूरचे बादशहा भव
ज्ञानाचे पॉईंट्स जे
डायरीमध्ये अथवा बुद्धीमध्ये असतात त्यांना दररोज रिवाइज करा (त्यांची दररोज उजळणी
करा) आणि त्या पॉईंट्सना अनुभवामध्ये आणा तर कोणत्याही प्रकारच्या समस्येचे सहजच
समाधान करू शकाल. कधीही व्यर्थ संकल्पांच्या घावाने समस्यांचे दगड तोडण्यामध्ये वेळ
वाया घालवू नका. “ड्रामा” शब्दाच्या स्मृती द्वारे हाय जंप घेऊन पुढे जा. म्हणजे मग
हे जुने संस्कार तुमचे दास बनतील, परंतु अगोदर बादशहा बना, तख्तनशीन बना.
बोधवाक्य:-
प्रत्येकाला
सन्मान देणे हेच सन्मान प्राप्त करणे आहे.
अव्यक्त इशारे:- या
अव्यक्ती महिन्यामध्ये बंधनमुक्त राहून जीवनमुक्त स्थितीचा अनुभव करा.
जीवन-बंध सोबतच
जीवन-मुक्त स्थितीचा अनुभव होतो, तिथे तर जीवन-बंध असण्याचा प्रश्नच नाही. तिथे तर
फक्त त्याच प्रारब्धामध्ये असाल, मुक्तीधाममधील मुक्तीचा अनुभव जो आता करू शकता तो
तुम्ही तिथे करू शकणार नाही त्यामुळे संगमयुगावर मुक्ती-जीवनमुक्तीचा अनुभव करा.
वारशाचे अधिकारी तर बनला आहात, आता त्याला जीवनामध्ये धारण करून पूर्ण लाभ घ्या.