27-04-25 अव्यक्त बापदादा
मराठी मुरली
03.02.2005 ओम शान्ति
मधुबन
“सेवा करत असताना
उपराम आणि बेहद वृत्तीद्वारे एव्हररेडी बनून ब्रह्मा बाप समान संपन्न बना”
आज ग्रेट ग्रेट ग्रँड
फादर आपल्या चोहो बाजूंच्या कोटींमध्ये कोणी आणि कोणी मध्ये कोणी मुलांच्या भाग्याला
पाहून हर्षित होत आहेत. इतके विशेष भाग्य इतर कोणालाही मिळू शकत नाही. प्रत्येक
मुलाच्या विशेषतेला पाहून हर्षित होत आहेत. ज्या मुलांनी बापदादांशी हृदयापासून
संबंध जोडला त्या प्रत्येक मुलामध्ये कोणती ना कोणती विशेषता जरूर आहे. सर्वात पहिली
विशेषता - साधारण रूपामध्ये आलेल्या बाबांना ओळखून “माझे बाबा” मानले. ही ओळख
सर्वात मोठी विशेषता आहे. मनापासून मानले - ‘मेरा बाबा’, बाबांनी मानले - ‘मेरा
बच्चा’. जे मोठ-मोठे फिलॉसॉफर, सायंटिस्ट, धर्मात्मा यांच्या पैकी कोणीही ओळखू शकले
नाहीत, ते साधारण मुलांनी ओळखून आपला अधिकार घेतला. कोणीही येऊन या सभेतील मुलांना
पाहिले तर समजू शकणार नाही की या भोळ्या-भोळ्या मातांनी, या साधारण मुलांनी इतक्या
मोठ्या बाबांना ओळखले! तर ही विशेषता - ओळखणे, बाबांना ओळखून आपले बनवणे, हे तुम्हा
कोटींमध्ये कोणी मुलांचे भाग्य आहे. सर्व मुलांनी जे पण सन्मुख बसले आहेत किंवा दूर
बसून सन्मुख असल्याचा अनुभव करत आहेत, तर सर्व मुलांनी हृदयापासून ओळखले आहे! ओळखले
आहे की ओळखत आहात? ज्यांनी ओळखले आहे त्यांनी हात वर करा. (सर्वांनी हात वर केला)
ओळखलेत? अच्छा. तर बापदादा ओळखण्याच्या विशेषतेची प्रत्येक मुलाला मुबारक देत आहेत
- ‘वाह भाग्यवान बच्चे वाह!’ ओळखण्याचा तिसरा नेत्र प्राप्त केला. मुलांच्या मनातील
गाणे बापदादा ऐकत राहतात, कोणते गाणे? ‘पाना था वो पा लिया’. बाबा देखील म्हणतात -
‘लाडक्या मुलांनो, जे बाबांकडून घ्यायचे होते ते घेतलेत’. प्रत्येक मूल अनेक आत्मिक
खजिन्यांचे बालक सो मालक बनले.
तर आज बापदादा
खजिन्यांचे मालक असणाऱ्या मुलांच्या खजिन्यांचा पोतामेल बघत होते. बाबांनी खजिना तर
सर्वांना एक समान आणि सारख्या प्रमाणात दिला आहे. कोणाला पदम, कोणाला लाख दिलेला
नाही. परंतु खजिन्यांना ओळखणे आणि प्राप्त करणे, जीवनामध्ये सामावून घेणे यामध्ये
नंबरवार आहेत. बापदादा आजकाल वारंवार वेगवेगळ्या प्रकारे मुलांचे लक्ष वेधून घेत
आहेत - समयाच्या समीपतेला पाहून स्वतःच स्वतःला सूक्ष्म विशाल बुद्धीने चेक करा की,
काय मिळाले, काय घेतले आणि निरंतर त्या खजिन्यांमधून संगोपन होत आहे? चेकिंग खूप
आवश्यक आहे कारण माया वर्तमान वेळी विविध प्रकारचा रॉयल बेफिकीरपणा आणि रॉयल आळस या
दोन रूपामध्ये ट्रायल करत राहते म्हणून नेहमी आपली चेकिंग करत रहा. अगदी लक्षपूर्वक,
बेफिकीरपणाने चेकिंग नाही - ‘काही वाईट केले नाही, दुःख दिले नाही, दृष्टी खराब झाली
नाही’, हे चेकिंग तर झाले परंतु चांगल्यात-चांगले काय केले? आत्मिक दृष्टी सदैव
नॅचरल राहिली? का विस्मृती-स्मृतीचा खेळ केला? कितीजणांना शुभ भावना, शुभ कामना,
आशीर्वाद दिले? असे जमेचे खाते किती आणि कसे राहीले? कारण चांगल्या रीतीने जाणता की
जमेचे खाते केवळ आताच करू शकता. हा काळ, पूर्ण सिझन खाते जमा करण्याचा आहे. नंतरचा
संपूर्ण काळ जमेच्या खात्यानुसार राज्य भाग्य आणि पूज्य देवी-देवता बनण्याचा आहे.
जमा कमी असेल तर राज्य भाग्य सुद्धा कमी आणि पूज्य बनण्यामध्ये देखील नंबरवार होते.
जमा कमी तर पूजा देखील कमी, विधिपूर्वक जमा नाही तर पूजा देखील विधिपूर्वक नाही,
कधी-कधी विधिपूर्वक आहे तर पूजा सुद्धा आणि पद सुद्धा कधी-कधी आहे, म्हणून
बापदादांचे प्रत्येक मुलावर अति प्रेम आहे, तर बापदादा हेच इच्छितात की प्रत्येक
मुलगा संपन्न बनावा, समान बनावा. सेवा करा परंतु सेवेमध्ये देखील उपराम, बेहद.
बापदादांनी पाहिले आहे
मेजॉरिटी मुलांची योग अर्थात आठवण करण्याच्या सब्जेक्टमध्ये आवड किंवा अटेंशन कमी
असते, सेवेमध्ये जास्त आहे. परंतु आठवणी शिवाय केलेली सेवा जास्त असेल तर त्यामध्ये
हद (मर्यादा) येते. उपराम वृत्ती नसते. नाव आणि मान, पोझीशन या गोष्टी मिक्स होतात.
बेहदची वृत्ती कमी होते म्हणून बापदादा इच्छितात की कोटींमध्ये कोणी, कोणीमध्ये कोणी
अशी माझी मुले आतापासूनच एव्हररेडी व्हावीत, कशासाठी? बरेचजण असा विचार करतात वेळ
आल्यावर होऊन जाऊ. परंतु वेळ तुमची क्रिएशन (रचना) आहे आणि तुम्ही आपल्याच रचनेला
आपला शिक्षक बनवणार काय? दुसरी गोष्ट - जाणता की खूप काळाचा हिशोब आहे, खूप काळाची
संपन्नता खूप काळाची प्राप्ती करवते. तर आता वेळेच्या समीपते प्रमाणे खूप काळाचे जमा
होणे आवश्यक आहे नंतर तक्रार करू नका की आम्ही तर समजलो खूप काळासाठी अजून खूप वेळ
बाकी आहे. आतापासून खूप काळाचे अटेंशन ठेवा. समजले! अटेंशन प्लीज.
बापदादांना हेच हवे
आहे की एकाही मुलामध्ये कोणत्याही सब्जेक्टची कमतरता राहू नये. ब्रह्मा बाबांवर तर
प्रेम आहे ना! प्रेमाचे रिटर्न तर द्याल ना! तर प्रेमाचे रिटर्न आहे - आपल्यातील
कमतरतेला चेक करा आणि रिटर्न द्या, टर्न करा. आपणच आपल्याला टर्न करणे, हे रिटर्न
आहे. तर रिटर्न देण्याची हिंमत आहे? हात तर उंच करता, खूप खुश करता. हात पाहून तर
बापदादा खुश होतात, आता मनामध्ये पक्के-पक्के एक टक्का सुद्धा कच्चे नाही, पक्के
व्रत घ्या - रिटर्न द्यायचेच आहे. आपणच आपल्याला टर्न करायचे आहे.
आता शिवरात्री येत आहे
ना! तर सर्व मुलांना बाबांची जयंती सो आपली जयंती खूप प्रेमाने साजरी करण्याचा
उत्साह येतो. चांगले-चांगले प्रोग्राम बनवत आहेत. सेवेचे प्लॅन तर खूप चांगले बनवता,
बापदादा खुश होतात. परंतु…, ‘परंतु (लेकिन)’, म्हणायला चांगले वाटत नाही. जगत अंबा
माँ (मम्मा) ‘लेकिन’ शब्दाला म्हणत असे की, सिंधी भाषेमध्ये, ले-किन, ‘किन’ म्हणतात
कचऱ्याला. तर ‘लेकिन’ म्हणणे म्हणजे काही ना काही कचरा घेणे. तर ‘लेकिन’ (‘परंतु’)
म्हणणे चांगले वाटत नाही. म्हणावे लागते. जसे इतर सेवेचे प्लॅन बनवले देखील आहेत आणि
बनवणार सुद्धा परंतु हे व्रत घेण्याचा सुद्धा प्रोग्राम बनवा. रिटर्न द्यायचेच आहे
कारण की जेव्हा बापदादा किंवा कोणी विचारतात - ‘कसे आहात?’ तर मेजॉरिटींचे हेच
उत्तर येते, ‘आहोत तर खूप छान परंतु जितके बापदादा म्हणतात तितके नाही’. आता हे
उत्तर असायला हवे की, ‘जे बापदादा इच्छितात तसेच आहोत’. नोट करा बापदादा काय
इच्छितात, ती लिस्ट काढा आणि चेक करा बापदादा हे इच्छितात, ते आपल्यामध्ये आहे की
नाही? दुनियावाले तुम्हा पूर्वजांद्वारे मुक्तीची इच्छा करतात, ओरडत आहेत, ‘मुक्ती
द्या, मुक्ती द्या’. जोपर्यंत जास्तीत-जास्त मुले आपले जुने संस्कार, ज्याला तुम्ही
नेचर (स्वभाव) म्हणता, नॅचरल नाही नेचर, त्यामध्ये थोडे काही तरी बाकी राहिलेले आहे,
तुम्ही मुक्त झालेले नाही आहात तर सर्व आत्म्यांना मुक्ती मिळू शकत नाही. तर बापदादा
म्हणतात - ‘हे मुक्तिदात्याच्या मुलांनो, मास्टर मुक्तिदाता आता स्वतःला मुक्त करा
म्हणजे सर्व आत्म्यांसाठी मुक्तीचा दरवाजा उघडेल. सांगितले होते ना - गेटची चावी
कोणती आहे? बेहदचे वैराग्य. सर्व कार्य करा परंतु जसे भाषणांमध्ये
प्रवृत्तिवाल्यांना सांगता ना की ‘कमलपुष्प समान बना’, असे सर्व काही करत असताना,
कर्तेपणाच्या भावनेपासून मुक्त, न्यारे; ना साधनांच्या आहारी, ना पोझिशच्या आहारी.
‘काही ना काही मिळावे’, ही पोझिशन नाही तर मायेचे अपोझिशन आहे. न्यारे आणि बाबांचे
प्रिय. न्यारे आणि प्रिय बनणे अवघड आहे काय? ज्यांना अवघड वाटते त्यांनी हात वर करा.
(कोणीही हात वर केला नाही) कोणालाही अवघड वाटत नाही मग तर शिवरात्रीपर्यंत सर्व
संपन्न होऊन जाल. जर अवघड नाहीये म्हणजे मग बनायचेच आहे. ब्रह्मा बाप समान बनायचेच
आहे. संकल्पामध्येही, बोल मध्येही, सेवेमध्ये देखील, संबंध-संपर्कामध्ये देखील,
सगळ्यामध्ये ब्रह्मा बाप समान.
अच्छा जे समजतात,
ब्रह्मा बाबा आणि दादा, ग्रेट ग्रेट ग्रॅण्ड फादर, त्यांच्याशी माझे खूप-खूप १००
टक्क्यांपेक्षाही जास्ती प्रेम आहे, त्यांनी हात वर करा. खुश करू नका, फक्त आता
पुरते खुश करायचे नाही. सर्वांनी हात वर केला आहे. हे टी. व्ही. मध्ये शूट करत आहात
ना. शिवरात्रीला हा टी. व्ही. बघणार आणि हिशोब घेणार. ठीक आहे! जरा सुद्धा
समानतेमध्ये अंतर नसावे. प्रेमापोटी त्याग करणे, काही मोठी गोष्ट आहे काय!
दुनियावाले तर अशुद्ध प्रेमाच्या मागे जीवन देखील द्यायला तयार होतात. बापदादा तर
फक्त म्हणतात, कचरा द्या, बस्स. चांगली वस्तू देऊ नका, कचरा द्या. कमजोरी, कमी हे
काय आहे? कचरा आहे ना! कचऱ्याचा त्याग करणे काही मोठी गोष्ट आहे काय! परिस्थिती
समाप्त व्हावी, स्व-स्थिती श्रेष्ठ व्हावी. सांगता तर हेच ना, ‘काय करू परिस्थितीच
अशी होती’. तर डळमळीत करणाऱ्या पर-स्थितीचे नाव सुद्धा नसावे, अशी स्व-स्थिती
शक्तीशाली असावी. समाप्तीचा पडदा उघडला तर सर्वजण काय दिसले पाहिजेत? फरिश्ते चमकत
आहेत. सर्व मुले चमकत असलेली दिसावीत म्हणून अजून पडदा उघडायचा थांबलेला आहे.
दुनियावाले ओरडत आहेत - ‘पडदा उघडा, पडदा उघडा’. तर आपला प्लॅन स्वतःच बनवा. बनलेला
प्लॅन देता ना तर मग खूप गोष्टी होतात. आपला प्लॅन आपल्या हिंमतीने बनवा. दृढतेची
चावी लावा तर सफलता मिळणारच आहे. दृढ संकल्प करता आणि बापदादा खुश होतात ‘वाह बच्चे
वाह!’ दृढ संकल्प केला परंतु दृढतेमध्ये मग थोडा-थोडा बेफिकीरपणा मिक्स होतो म्हणून
सफलता सुद्धा कधी अर्धी, कधी पाऊण अशी परसेंटेजमध्ये होते. जसे प्रेम १०० परसेंट आहे
तशी पुरुषार्थामध्ये संपन्नता, ही देखील १०० परसेंट असावी. जास्त भले असू दे, कमी
नसावी. पसंत आहे? पसंत आहे ना? शिवरात्रीला जलवा दाखवणार ना! बनायचेच आहे. आम्ही
नाही बनणार तर कोण बनणार! हा निश्चय ठेवा - आम्हीच होतो, आम्हीच आहोत आणि नंतर
सुद्धा आम्हीच असणार. हा निश्चय विजयी बनवेल. पर-दर्शन करू नका, स्वतःलाच बघा. खूप
मुले रुहरिहान करतात ना, म्हणतात - ‘बस याला थोडेसे ठीक करा, म्हणजे मग मी ठीक होईन’.
‘याला थोडे बदला तर मी सुद्धा बदलेन परंतु ना तो बदलणार ना तुम्ही बदलणार. स्वतःला
बदलाल तर तो देखील बदलेल. कोणताही आधार ठेऊ नका, हे झाले तर हे होईल. मला करायचेच
आहे.
अच्छा, जे
पहिल्यांदाच आले आहेत -
त्यांनी हात वर करा. तर जे पहिल्यांदाच आले आहेत त्यांच्यासाठी विशेष बापदादा
म्हणतात की अशा वेळी आला आहात जेव्हा वेळ खूप कमी शिल्लक आहे परंतु पुरुषार्थ इतका
तीव्र करा जे लास्ट सो फास्ट, फास्ट सो फर्स्ट नंबरमध्ये या; कारण आता खुर्च्यांचा
खेळ चालू आहे. आता कोण जिंकतो, तो आउट झालेला नाहीये. लेट तर आला आहात परंतु फास्ट
चालल्याने पोहोचाल. फक्त अमृतवेलेला स्वतःला ‘अमर भव’च्या वरदानाची आठवण करून द्या.
अच्छा - सर्वजण कोणी लांबून कोणी जवळून आले आहेत. बापदादा म्हणतात - आपल्या घरी
आलात हे चांगले झाले. संघटन चांगले वाटते. टी.व्ही. मध्ये बघता ना, सभेचा हॉल भरलेला
किती छान वाटतो. ठीक आहे. तर एव्हररेडी? एव्हररेडीचा धडा पक्का कराल ना! अच्छा.
मधुबन निवासींसोबत
संवाद:-
मधुबनवाले हात वर करा. भरपूर आहेत. मधुबनवाले होस्ट आहेत दुसरे तर गेस्ट होऊन येतात
आणि निघून जातात परंतु मधुबनवाले होस्ट आहेत. नियरेस्ट (सर्वात जवळचे) सुद्धा आहेत,
डियरेस्ट (सर्वात लाडके) सुद्धा आहेत. मधुबनवाल्यांना पाहून सर्वजण खुश होतात ना.
कोणत्याही स्थानावर मधुबनवाले जातात तेव्हा कोणत्या नजरेने पाहतात. वाह मधुबनहून आले
आहेत! कारण मधुबन नाव ऐकताच मधुबनचे बाबा आठवतात म्हणून मधुबनवाल्यांचे महत्व आहे.
आहे महत्व? खुश होता ना! असे प्रेम पूर्वक पालनेचे स्थान कोटींमधून काहींनाच मिळाले
आहे. सर्वांना वाटते मधुबनमध्येच रहावे, राहू शकतात का! तुम्ही राहत आहात. तर चांगले
आहे. मधुबनवाले विसरले जात नाहीत, समजतात की आम्हाला विचारले नाही परंतु बापदादा
सदैव हृदयामध्ये विचारतात. आधी मधुबनवाले. मधुबनवाले नसतील तर येणार कुठे! सेवेच्या
निमित्त तर आहात ना! सेवाधारी कितीही मिळाले, तरीही फाउंडेशन तर मधुबनवाले आहेत. तर
जे वरती ज्ञान सरोवर मध्ये, पांडव भवनमध्ये आहेत, त्या सर्वांना बापदादा
अंतःकरणापासून आशीर्वाद आणि प्रेमपूर्वक आठवण देत आहेत. इथे जी टोली देतात ती वर
मधुबनमध्ये मिळते का? तर मधुबनवाल्यांना टोली सुद्धा मिळते, बोली सुद्धा मिळते.
दोन्ही मिळते. अच्छा.
ग्लोबल हॉस्पिटल
वाल्यांसोबत संवाद:-
सर्व हॉस्पिटलवाले
ठीक आहेत कारण हॉस्पिटलचा देखील विशेष पार्ट आहे ना. खाली (शांतीवनला) येता ना.
अच्छा थोडेजण येतात. हॉस्पिटलवाले सुद्धा चांगली सेवा करत आहेत. पहा आईवेल मध्ये (गरजेच्या
वेळी) तरीही हॉस्पिटलच कामी येते ना. आणि जेव्हापासून हॉस्पिटल उघडले आहे
तेव्हापासून सर्वांच्या नजरेमध्ये हे आले आहे की ब्रह्माकुमारी केवळ ज्ञान देत
नाहीत, परंतु वेळेवर मदत सुद्धा करतात, सामाजिक सेवा सुद्धा करतात. तर हॉस्पिटल
बनल्यानंतर आबूमध्ये हे वातावरण बदलले आहे. आधी ज्या नजरेने पाहत होते, आता त्या
नजरेने पाहत नाहीत. आता सहयोगाच्या नजरेने पाहतात. ज्ञान पटेल न पटेल परंतु
सहयोगाच्या नजरेने बघतात तर हॉस्पिटलवाल्यांनी सेवा केली ना. चांगले आहे.
अच्छा - आजची गोष्ट
लक्षात राहिली? संपन्न बनायचेच आहे, काहीही होवो, संपन्न बनायचेच आहे. हा ध्यास लागू
दे - ‘संपन्न बनायचे आहे, समान बनायचे आहे’. अच्छा.
चोहो बाजूंच्या
कोटींमध्ये कोणी, कोणीमध्येही कोणी भाग्यवान, भगवंताची मुले श्रेष्ठ आत्मे, सदैव
तीव्र पुरुषार्थाद्वारे जो विचार केला ते केले, श्रेष्ठ चिंतन, श्रेष्ठ कृती,
लक्ष्य आणि लक्षणाला समान बनविणे, अशा विशेष आत्म्यांना सदैव खूप काळाच्या
पुरुषार्थाद्वारे राज्य-भाग्य आणि पूज्य बनणाऱ्या श्रेष्ठ आत्म्यांना, सदैव
बाबांच्या स्नेहाचे रिटर्न म्हणून स्वतःला टर्न करणाऱ्या नंबरवन, विन करणाऱ्या
भाग्यवान मुलांना बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि नमस्ते.
वरदान:-
विश्व
कल्याणकारीच्या उच्च स्टेजवर स्थित राहून विनाशाची लीला पाहणारे साक्षी दृष्टा भव
अंतिम विनाशाची लीला
पाहण्यासाठी विश्व कल्याणकारीची उच्च स्टेज पाहिजे. ज्या स्टेजवर स्थित झाल्याने
देहाचे सर्व आकर्षण अर्थात नातेसंबंध, पदार्थ, संस्कार, प्रकृतीच्या हालचालींबद्दलचे
आकर्षण सर्व काही संपुष्टात येते. जेव्हा अशी स्टेज होईल तेव्हा साक्षी दृष्टा बनून
उच्च स्टेजवर स्थित होऊन शांतीची, शक्तीची किरणे सर्व आत्म्यांना देऊ शकाल.
सुविचार:-
बलवान बना तर मायेचा
फोर्स (शक्ती) नष्ट होईल.
अव्यक्त इशारे -
“कंबाइंड रुपाच्या स्मृती द्वारे सदा विजयी बना”
वरदाता बाबा आणि आपण
वरदानी आत्मे दोघेही कंबाइंड आहोत. ही स्मृती सदैव रहावी म्हणजे आपोआपच पवित्रतेची
छत्रछाया राहील कारण जिथे सर्वशक्तिमान बाबा आहेत तिथे अपवित्रता स्वप्नातही येऊ
शकत नाही. कायम बाबा आणि तुम्ही युगल रूपामध्ये रहा, सिंगल नाही. सिंगल होता तर
पवित्रतेचे सौभाग्य निघून जाते.