27-07-25 अव्यक्त बापदादा
मराठी मुरली
14.03.2006 ओम शान्ति
मधुबन
“परमात्म मिलनाच्या
अनुभूतीसाठी उलट्या ‘मी’पणाला जाळून टाकण्याची होळी साजरी करा, दृष्टीच्या पिचकारी
द्वारे सर्व आत्म्यांना सुख, शांती, प्रेम, आनंदाचा रंग लावा”
आज होलीएस्ट बाबा
आपल्या होली (पवित्र) मुलांसोबत मिलन साजरे करत आहेत. चोहो बाजूची होली (पवित्र)
मुले दूर बसून देखील समीप आहेत. बापदादा अशा होली अर्थात महान पवित्र मुलांच्या
मस्तकावर चमकणारा भाग्याचा सितारा बघत आहेत. असे महान पवित्र साऱ्या कल्पामध्ये इतर
कोणीही बनत नाही. या संगमयुगावर पवित्रतेचे व्रत घेणारी भाग्यवान मुले भविष्यामध्ये
डबल पवित्र, शरीराने देखील पवित्र आणि आत्मा सुद्धा पवित्र बनते. साऱ्या कल्पामध्ये
फेरी मारा भले कितीही महान आत्मे आले आहेत परंतु शरीर सुद्धा पवित्र आणि आत्मा
देखील पवित्र, असे पवित्र ना धर्म-आत्मे बनले आहेत, ना महात्मे बनले आहेत.
बापदादांना तुम्हा मुलांचा अभिमान आहे. वाह! माझ्या महान पवित्र मुलांनो वाह! डबल
पवित्र, डबल ताजधारी सुद्धा कोणी बनत नाही, डबल ताजधारी देखील तुम्ही श्रेष्ठ आत्मे
बनता. आपले ते डबल पवित्र, डबल ताजधारी स्वरूप समोर येत आहे ना! म्हणून तुम्हा
मुलांचे जे या संगमयुगामध्ये प्रॅक्टिकल जीवन बनले आहे, त्या प्रत्येक जीवनाच्या
विशेषतेचे यादगार दुनियावाले उत्सवाच्या रूपामध्ये साजरे करत राहतात.
आज देखील तुम्ही सर्व
स्नेहाच्या विमानातून होळी साजरी करण्यासाठी पोहोचला आहात. होळी साजरी करण्यासाठी
आला आहात ना! तुम्ही सर्वांनी आपल्या जीवनामध्ये पवित्रतेची होळी साजरी केली आहे,
प्रत्येक अध्यात्मिक रहस्याला दुनियावाल्यांनी स्थूल रूप दिलेले आहे कारण,
बॉडी-कॉन्शस आहेत ना! तुम्ही सोल-कॉन्शस आहात, अध्यात्मिक जीवनशैलीवाले आहात आणि ते
बॉडी कॉन्शस वाले आहेत. तर हे सर्व स्थूल रूपामध्ये घेतले आहे. तुम्ही योग
अग्निद्वारे आपल्या जुन्या संस्कार स्वभावाला भस्म केले, जाळले आणि दुनियावाले
स्थूल आगीमध्ये जाळतात. कशासाठी? जुने संस्कार जाळल्याशिवाय ना परमात्म संगाचा रंग
लागू शकणार, ना परमात्म मिलनाचा अनुभव करू शकणार. तर तुमच्या जीवनाची इतकी व्हॅल्यू
आहे ज्यामुळे तुमचे प्रत्येक पाऊल उत्सवाच्या रूपामध्ये साजरे केले जाते. असे का?
तुम्ही पूर्ण संगमयुग उत्साह, उमंगाचे जीवन बनवले आहे. तुमच्या जीवनाचे यादगार एका
दिवसाचा उत्सव साजरा करतात. तर सर्वांचे असे सदैव उत्साह, उमंग, आनंदाचे जीवन आहे
ना! आहे की कधी-कधी आहे? सदैव उत्साह आहे की कधी-कधी आहे? जे समजतात की सदैव
उत्साहामध्ये राहतो, आनंदामध्ये राहतो, आनंद आमच्या जीवनाचे विशेष परमात्म गिफ्ट आहे,
काहीही होवो परंतु ब्राह्मण जीवनाचा आनंद, उत्साह, उमंग जाऊ शकत नाही. असा अनुभव
होतो त्यांनी हात वर करा. बापदादा प्रत्येक मुलाचा चेहरा सदैव खुशनुम: (प्रफुल्लित)
पाहू इच्छितात कारण की तुमच्यासारखा खुशनशीब (भाग्यशाली) ना कोणी बनला आहे, ना बनू
शकणार. विविध क्षेत्रातील (विंग्जवाले) बसला आहात तर असा अनुभवी मूर्त बनण्याचा स्व
प्रति प्लॅन बनवला आहे का?
बापदादा खुश होतात,
आज अमक्या विंग्जचे, तमक्या विंग्जचे आले आहेत, वेलकम. मुबारक असो आला आहात. सेवेचा
उमंग-उत्साह चांगला आहे. परंतु अगोदर स्वत:(हा)साठीचा प्लॅन; बापदादांनी पाहिले आहे
प्लॅन्स सर्व विंग्जवाले एकमेकांपेक्षा वरचढ बनवतात आणि खूप सुंदर बनवतात,
त्याचसोबत स्व-उन्नतीचा प्लॅन बनवणे खूप आवश्यक आहे. बापदादा हेच इच्छितात की,
प्रत्येक विंग्जने स्व-उन्नतीचा प्रॅक्टिकल प्लॅन बनवावा आणि नंबर घ्यावा. जसे
संगठनमध्ये एकत्र होता, भले फॉरेन वाले किंवा देश वाले मिटिंग करता, प्लॅन बनवता,
बापदादा त्यामध्ये देखील संतुष्ट आहेत परंतु जसे उमंग-उत्साहाने संगठीत रूपामध्ये
सेवेचा प्लॅन बनवता तसाच आणि तितक्याच उमंग-उत्साहाने स्व-उन्नतीसाठी प्राधान्य
देऊन आणि अटेन्शन देऊन प्लॅन बनवायचा आहे. बापदादा ऐकू इच्छितात की या महिन्यामध्ये
या विंग्जवाल्यांनी स्व-उन्नतीचा प्लॅन प्रॅक्टिकल मध्ये आणला आहे? जेपण विंग्जवाले
आले आहेत, सर्व विंग्जवाले हात वर करा. अच्छा, इतके आले आहेत, भरपूर आले आहेत. ऐकले
आहे ५-६ वर्ग आले आहेत. खूप छान स्वागत आहे. आता एक लास्ट टर्न राहीलेला आहे,
बापदादांनी होमवर्क तर दिलेलाच होता. बापदादा तर दररोज रिझल्ट बघतात, तुम्ही समजाल
बापदादा लास्ट टर्नमध्ये हिशोब घेतील परंतु बापदादा दररोज बघतात, अजूनही १५ दिवस
आहेत, या १५ दिवसामध्ये प्रत्येक विंग्जवाले जे आलेले आहेत त्यांना देखील आणि जे
आलेले नाहीत त्यांना देखील त्या विंग्जच्या निमित्त बनलेल्या मुलांना बापदादा हाच
इशारा देत आहेत की, प्रत्येक विंग्जने आपल्या स्व-उन्नतीचा कोणताही प्लॅन बनवा,
कोणत्या विशेष शक्ति स्वरूप बनण्याचा किंवा विशेष कोणता गुणमूर्त बनण्याचा अथवा
विश्व कल्याण प्रति कोणती ना कोणती लाईट-माइट देण्याचा प्रत्येक विंग्जने आपसामध्ये
निश्चित करा आणि मग चेक करा की जे काही विंग्जचे मेंबर्स आहेत, मेंबर बनले खूप छान
केले परंतु प्रत्येक मेंबर नंबर वन बनला पाहिजे. फक्त नाव नोंदले गेले की, अमक्या
विंग्जचे मेंबर आहेत, असे नको, अमक्या विंग्जचे स्व-उन्नतीसाठीचे मेंबर्स आहेत. असे
होऊ शकते का? जे विंग्जचे निमित्त आहेत ते निमित्त असणारे उभे रहा. फॉरेनमध्ये
देखील जे ४-५ निमित्त आहेत त्यांनी उभे रहा. बापदादांना तर सर्वजण खूप शक्तिशाली
मुर्त्या वाटत आहेत. खूप सुंदर मुर्त्या आहेत. तर तुम्ही सर्वजण समजता का की १५
दिवसामध्ये काही करून दाखवू. बोला, होऊ शकते? (पूर्ण पुरुषार्थ करू) अजून बोला, काय
होऊ शकते? (प्रशासकीय वर्गाने प्लॅन बनवला आहे की, कोणीही रागावणार नाही) त्यांची
चौकशी देखील करता ना? तुम्ही बहिणी (टीचर्सना) एवढी हिंमत ठेवता की, १५ दिवसांमध्ये
चौकशी करून रिझल्ट सांगू शकता का. फॉरेनवाले तर हो म्हणत आहेत. तुम्ही काय समजता,
होऊ शकते का? भारतवाले तुम्ही सांगा होऊ शकते का? बापदादांना तर तुम्हा सर्वांचे
चेहरे पाहून असे वाटते की रिझल्ट चांगला आहे. परंतु जर १५ दिवस सुद्धा अटेंशन
ठेवण्याचा पुरुषार्थ कराल तर हा अभ्यास पुढे सुद्धा कामी येईल. आता अशी मिटिंग करा
की ज्यामध्ये जे ज्याला लक्ष्य घ्यायचे असेल कोणत्याही गुणाचे, कोणत्याही शक्ती
रूपाचे, यामध्ये बापदादा नंबर देतील. बापदादा तर चेक करत असतात. स्व सेवेमध्ये
कोण-कोणती विंग नंबरवन आहे? कारण बापदादांनी पाहिले आहे की प्लॅन खूप छान बनवतात
परंतु सेवा आणि स्व-उन्नती दोन्ही जर एकत्र नसेल तर सेवेच्या प्लॅन मध्ये जितकी
सफलता हवी, तितकी होत नाही म्हणून काळाच्या समीपतेला लक्षात घेता सेवा आणि
स्व-उन्नतीला कंबाइंड ठेवा. केवळ स्व-उन्नतीच नको आहे, सेवा देखील हवी परंतु
स्व-उन्नतीच्या स्थितीमुळे सेवेमध्ये अधिक सफलता मिळेल. सेवेच्या किंवा
स्व-उन्नतीच्या सफलतेची निशाणी आहे - स्वतः देखील दोन्ही मध्ये स्वतःवर सुद्धा
संतुष्ट असेल आणि ज्यांची सेवा करता, त्यांना देखील सेवेद्वारे संतुष्टतेचा अनुभव
होईल. जर स्वतःला किंवा ज्यांच्या सेवेच्या निमित्त आहात त्यांना संतुष्टतेचा अनुभव
होत नसेल तर सफलता कमी आणि मेहनत जास्त करावी लागते.
तुम्ही सगळे जाणता की
सेवेमध्ये किंवा स्व-उन्नतीमध्ये सफलता सहज प्राप्त करण्याची गोल्डन चावी कोणती आहे?
अनुभव तर सर्वांना आहे. गोल्डन चावी आहे - चलन-चेहरा, संबंध-संपर्कामध्ये निमित्त
भाव, निर्मान भाव, निर्मल वाणी. जसे ब्रह्मा बाबा आणि जगदंबाला पाहिलेत परंतु आता
कुठे-कुठे सेवेच्या सफलतेमध्ये पर्सेंटेज असते त्याचे कारण, जे हवे आहे, जितके करता,
जितके प्लॅन बनवता, त्यामध्ये पर्सेंटेज का होते? बापदादांनी मेजॉरिटींमध्ये कारण
बघितले आहे की सफलतेमध्ये कमतरतेचे कारण आहे एक शब्द, तो कोणता? “मी”. ‘मी’ शब्द
तीन प्रकारे यूज होतो. देही-अभिमानीमध्ये सुद्धा - ‘मी आत्मा आहे’, ‘मी’ शब्द येतो.
देह-अभिमानामध्ये देखील - ‘मी जे म्हणतो, करतो ते बरोबर आहे, मी बुद्धीवान आहे’, हा
आहे हदचा ‘मी, मी’पणा, देह-अभिमानामध्ये सुद्धा ‘मी’ येतो आणि तिसरा ‘मी’ जेव्हा
कोणी दिलशिकस्त (निराश) होतो तरी देखील ‘मी’ येतो. ‘मी हे करू शकत नाही, माझ्यामध्ये
हिंमत नाही. मी हे ऐकू शकत नाही, मी हे सामावून घेऊ शकत नाही…’ तर बापदादा तिन्ही
प्रकारच्या ‘मी, मी’ ची गाणी खूप ऐकत राहतात. ब्रह्मा बाबांनी, जगत अंबेने जो नंबर
घेतला त्याची विशेषता हीच राहिली - उलट्या ‘मी’पणाचा अभाव होता, अविद्या होती. कधी
ब्रह्मा बाबांनी असे म्हटले नाही की, ‘मी मत देतो, मी राइट आहे’, बाबा, बाबा… बाबा
करत आहेत, मी करत नाही. मी हुशार नाहीये, मुले हुशार आहेत. जगत अंबेचे स्लोगन
लक्षात आहे? जुन्यांना आठवत असेल. जगत अंबा हेच म्हणत असे “हुक्मी हुक्म चलाए रहा”.
मी नाही, चालविणारे बाबा चालवत आहेत. करावनहार बाबा करवून घेत आहेत. तर सर्वप्रथम
सर्वांनी आपल्यातील या अभिमान आणि अपमानाच्या ‘मी’पणाला समाप्त करून पुढे चला.
प्रत्येक गोष्टीमध्ये नॅचरली ‘बाबा, बाबा’ निघावे. नॅचरल निघावे कारण बाप समान
बनण्याचा संकल्प तर सर्वांनी घेतलाच आहे. तर समान बनण्यामध्ये केवळ या एका रॉयल
‘मी’ ला जाळून टाका. अच्छा, क्रोध सुद्धा करणार नाही. क्रोध का येतो? कारण ‘मी’पणा
येतो.
तर होळी साजरी
करण्यासाठी आला आहात ना? मग सुरुवातीला कोणती होळी साजरी करतात? जाळण्याची. तसे खूप
चांगले आहात, खूप योग्य आहात. बाबांच्या आशेचे दीपक आहात, फक्त थोडासा या ‘मी’ ला
काढून टाका. दोन ‘मी’ काढून टाका, एक ‘मी’ ठेवा. कशासाठी? बापदादा बघत आहेत, तुमचेच
अनेक भाऊ-बहीणी, ब्राह्मण नाही परंतु अज्ञानी आत्मे, आपल्या जीवनामध्ये हिंमत हरवून
बसले आहेत. आता त्यांना हिंमतीचे पंख लावावे लागतील. एकदम असहाय्य झाले आहेत, निराश
झाले आहेत. तर हे दयाळू, कृपा दया करणाऱ्या विश्वातील आत्म्यांचे इष्ट देव
आत्म्यांनो आपल्या शुभ भावनेद्वारे, दयेच्या भावनेद्वारे, आत्म भावनेद्वारे त्यांची
भावना पूर्ण करा. तुम्हाला दुःख, अशांतीचे व्हायब्रेशन येत नाही.(?) निमित्त आत्मे
आहात, पूर्वज आहात, पूज्य आहात, वृक्षाचे खोड आहात, फाउंडेशन आहात. सगळे तुम्हाला
शोधत आहेत, कुठे गेले आमचे रक्षक! कुठे गेले आमचे इष्ट देव! बाबांना तर खूप हाका ऐकू
येत आहेत. आता स्व-उन्नती द्वारे भिन्न-भिन्न शक्तींची सकाश द्या. हिंमतीचे पंख लावा.
आपल्या दृष्टी द्वारे, तुमची दृष्टीच पिचकारी आहे, तर आपल्या दृष्टीच्या पिचकारी
द्वारे सुखाचा रंग लावा, शांतीचा रंग लावा, प्रेमाचा रंग लावा, आनंदाचा रंग लावा.
तुम्ही तर परमात्म संगाच्या रंगामध्ये आला आहात. इतर आत्म्यांना देखील थोडासा
अध्यात्मिक रंगाचा अनुभव करवा. परमात्म मिलनाचा, मंगल मेळ्याचा अनुभव करवा.
भटकणाऱ्या आत्म्यांना ठिकाण्याचा मार्ग सांगा.
तर स्व-उन्नतीचे जे
प्लॅन बनवाल त्यामध्ये स्वतःचे चेकर बनून चेक करा, हा रॉयल ‘मी’ तर येत नाही आहे ना
कारण आज होळी साजरी करण्यासाठी आला आहात. तर बापदादा हाच संकल्प देत आहेत की आज
देह-अभिमान आणि अपमानाचा जो ‘मी’ येतो, निराशेचा ‘मी’ येतो, याला जाळूनच जायचे आहे,
सोबत घेऊन जायचे नाही. काहीतरी जाळणार ना. आग जाळणार काय? ज्वालामुखी योग अग्नी
पेटवा. पेटवता येतो का? ज्वालामुखी योग, येतो की साधारण योग येतो? ज्वालामुखी बना.
लाइट माइट हाउस. तर हे पसंत आहे? अटेंशन प्लिज, ‘मी’ ला जाळून टाका.
बापदादा जेव्हा
‘मी-मी’ चे गाणे ऐकतात ना तर स्विच बंद करून टाकतात. वाह! वाह! ची गाणी असतात तेव्हा
आवाज मोठा करतात कारण ‘मी-मी’ मध्ये ओढाताण खूप असते. प्रत्येक गोष्टीला ओढून-ताणून
धरतील, हे नाही, हे नाही, असे नाही, तसे नाही. तर ओढाताण केल्याने तणाव निर्माण होतो.
बापदादांना लगाव, तणाव आणि स्वभाव, उल्टा स्वभाव आवडत नाही. वास्तविक ‘स्वभाव’ शब्द
खूप चांगला आहे. स्वभाव, स्व चा भाव. परंतु त्याला उलटे केले आहे. कोणत्या
गोष्टीलाही ताणून धरू नका आणि कोणाला आपल्या बाजूने ओढूनही घेऊ नका. ते देखील खूप
त्रासदायक होते. कोणी कितीही तुम्हाला सांगेल, परंतु आपल्या बाजूने ओढू नका. ना
गोष्टीला ताणून धरायचे, ना कोणाला आपल्याबाजूने ओढून घ्यायचे, ओढाताण समाप्त. बाबा,
बाबा आणि बाबा. पसंत आहे ना! तर उलट्या ‘मी’ ला इथेच सोडून जायचे, सोबत घेऊन जायचे
नाही, ट्रेनमध्ये ओझे होईल. तुमचे गाणे आहे ना - ‘मैं बाबा की, बाबा मेरा’. आहे ना!
तर फक्त एक ‘मी’ ठेवा, बाकी दोन ‘मी’ संपले. तर होळी साजरी केली, संकल्पामध्ये
जाळून टाकले? आता तर संकल्प करणार. संकल्प केला? हात वर करा. केलात की थोडे-थोडे
राहतील? थोडी-थोडी सूट द्यायची? जे समजतात थोडी-थोडी सूट द्यायला हवी त्यांनी हात
वर करा. थोडे तर राहणार ना, नाही राहणार? तुम्ही तर खूप शूर आहात. मुबारक असो.
आनंदाने नाचा, गाणे गा. तणावामध्ये नाही. ओढाताणीमध्ये नाही. अच्छा.
आता एका सेकंदामध्ये
आपल्या मनातून सर्व संकल्प समाप्त करून एका सेकंदामध्ये बाबांसोबत परमधाम मध्ये
उच्च ते उच्च स्थान, उच्च ते उच्च बाबा, त्यांच्या सोबत उच्च स्थितीमध्ये बसा. आणि
बाबांप्रमाणे मास्टर सर्वशक्तिवान बनून विश्वाच्या आत्म्यांना शक्तींची किरणे द्या.
अच्छा.
चोहो बाजूच्या
होलीएस्ट, हायेस्ट मुलांना सर्व विश्व कल्याणकारी विशेष आत्म्यांना, सर्व पूर्वज आणि
पूज्य आत्म्यांना, सर्व बाबांच्या दिलतख्तनशीन मुलांना बापदादांची प्रेमपूर्वक आठवण
आणि हृदयापासूनच्या आशिर्वादांसहित, हृदयापासून प्रेम आणि नमस्ते.
दूरदूरहून आलेली पत्रे,
कार्ड, ईमेल, कम्प्युटर द्वारे संदेश बापदादांना मिळाले आणि बापदादा त्या मुलांना
सन्मुख पाहून पदम पटीने प्रेमपूर्वक आठवण देत आहेत.
वरदान:-
आपल्या पूर्वज
स्वरूपाच्या स्मृती द्वारे सर्व आत्म्यांना शक्तीशाली बनविणारे आधार, उद्धारमूर्त
भव
या सृष्टी रुपी
वृक्षाचे मूळ खोड, सर्वांचे पूर्वज तुम्ही ब्राह्मण सो देवता आहात. प्रत्येक कर्माचा
आधार, कुळ मर्यादांचा आधार, रीती रिवाजांचा आधार तुम्ही पूर्वज सर्व आत्म्यांचा
आधार आणि उद्धारमूर्त आहात. तुम्हा खोडाद्वारेच सर्व आत्म्यांना श्रेष्ठ संकल्पांची
शक्ती आणि सर्व शक्तींची प्राप्ती होते. सगळे तुम्हाला फॉलो करत आहेत त्यामुळे इतकी
मोठी जबाबदारी लक्षात घेऊन प्रत्येक संकल्प आणि कर्म करा कारण तुम्हा पूर्वज
आत्म्यांच्या आधारावरच सृष्टीचा काळ आणि स्थितीचा आधार आहे.
सुविचार:-
जे सर्व शक्तीरूपी
किरणे चोहो बाजूला पसरवतात तेच मास्टर ज्ञान-सूर्य आहेत.
अव्यक्त इशारे -
संकल्पांची शक्ती जमा करून श्रेष्ठ सेवेच्या निमित्त बना
तीन शब्दांमुळे
कंट्रोलिंग पॉवर, रुलिंग पॉवर कमी होते. ते तीन शब्द आहेत - १) व्हाय (Why का), २)
व्हॉट (What काय), ३) वॉन्ट (Want पाहिजे). हे तीन शब्द समाप्त करून केवळ एक शब्द
बोला. “वाह” तर कंट्रोलींग पॉवर येईल, मग संकल्प शक्तीद्वारे बेहदच्या सेवेच्या
निमित्त बनू शकाल.