27-07-2026
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
“गोड मुलांनो, साऱ्या
दुनियेमध्ये तुमच्या सारखा भाग्यवान दुसरा कोणीच नाही, तुम्ही राजऋषी आहात, तुम्ही
राजाई करिता राजयोग शिकत आहात”
प्रश्न:-
निराकार
बाबांमध्ये कोणते संस्कार आहेत, जे संगमावर तुम्ही मुले देखील धारण करता?
उत्तर:-
निराकार
बाबांमध्ये ज्ञानाचे संस्कार आहेत, ते तुम्हाला ज्ञान ऐकवून पतितापासून पावन बनवतात,
म्हणून त्यांना ज्ञानाचा सागर, पतित-पावन म्हटले जाते. तुम्ही मुले देखील आता ते
संस्कार धारण करत आहात. तुम्ही अभिमानाने म्हणता - ‘आम्हाला स्वयं भगवान शिकवत आहेत’.
आम्ही त्यांच्याकडून ऐकून इतरांना ऐकवतो.
गीत:-
आखिर वह दिन
आया आज…
ओम शांती।
गोड-गोड रुहानी
मुलांनी हे गाणे ऐकले. ही महिमा कोणाची आहे? एका बाबांची. शिवाय नमः, उच्च ते उच्च
भगवान आहेत ना. मुले जाणतात, ते आपले पिता आहेत. असे नाही की आपण सर्व पिता आहोत.
गायले देखील जाते - सारी दुनिया ब्रदरहूड (बंधुभाव) आहे. संन्यासी अथवा
विद्वानांच्या म्हणण्यानुसार ईश्वराला सर्वव्यापी म्हटल्याने जसे की फादरहूड (पितृभाव)
होतो. ब्रदर होण्याने पिता तर सिद्ध होतात, ज्यांच्याकडून वारसा मिळणार आहे.
फादरहूड असेल तर मग वारशाची गोष्टच नाही. मुले जाणतात - आम्हा सर्व आत्म्यांचा पिता
एकच आहे, त्यांना म्हटलेच जाते - वर्ल्ड गॉडफादर. वर्ल्ड मध्ये कोण आहेत? सर्व
ब्रदर्स आहेत, आत्मे आहेत. सर्वांचे गॉड फादर एकच आहेत. त्या पित्याची सर्वजण
प्रार्थना करतात. बंदगी (उपासना) अथवा पूजा त्या एकाचीच झाली पाहिजे. ती आहे
सतोप्रधान पूजा. हे देखील समजावून सांगितले आहे - ज्ञान, भक्ती आणि वैराग्य. बाबा
ज्ञान देतात सद्गती करिता. सद्गती म्हटले जाते - जीवनमुक्तीधामला. हे आत्म्याने
बुद्धीमध्ये धारण करायचे आहे. आपले घर शांतीधाम आहे. त्याला मुक्तिधाम, निर्वाणधाम
देखील म्हटले जाते. सर्वात उत्तम नाव आहे - शांतीधाम. इथे तर कर्मेंद्रिये असल्या
कारणाने आत्मा टॉकीमध्ये (आवाजामध्ये) राहते, बोलावे लागते. सूक्ष्मवतनमध्ये आहे
मूव्ही (संकल्पाची भाषा). इशाऱ्यानेच बोलणे होते, आवाज नसतो. तिन्ही लोकांना देखील
तुम्ही जाणले आहे. मूलवतन, सूक्ष्मवतन, स्थूलवतन, बुद्धीमध्ये हे व्यवस्थित पक्के
झाले आहे. मनुष्य सृष्टीसाठीच गायले जाते की, हे सृष्टी चक्र फिरते. त्याला म्हटले
जाते - जगाचा इतिहास-भूगोल. मनुष्यच तर त्याला जाणतील ना. जगाचा इतिहास-भूगोल
ऐकवतात. उच्च ते उच्च बाबा आहेत. जगाचा इतिहास-भूगोल कसा रिपीट होतो, हे तेच एक
जाणतात. या चक्राला जाणल्यानेच तुम्ही चक्रवर्ती राजा बनला आहात. गातात देखील -
देवता संपूर्ण निर्विकारी आहेत. लक्ष्मी-नारायणाची चित्रे आहेत ना. ते - संपूर्ण
निर्विकारी आणि स्वतःला म्हणतात - संपूर्ण विकारी. सतयुगामध्ये आहेत संपूर्ण
निर्विकारी अथवा संपूर्ण पावन. कलियुगामध्ये आहेत संपूर्ण विकारी, संपूर्ण पतित.
भारताचीच गोष्ट आहे. हे बाबाच येऊन बुद्धीमध्ये पक्के करतात, इतर कोणीही जाणत नाही.
त्यांनी (दुनियावाल्यांनी) तर सतयुगाचा कालावधी खूप मोठा असल्याचे सांगितले आहे.
समजतात, लाखो वर्षांपूर्वी सतयुग होते. त्यामुळे ही गोष्ट कोणाच्याही बुद्धीतच येत
नाही.
आता मुले जाणतात -
आपण आता संपूर्ण विकारी पासून संपूर्ण निर्विकारी बनत आहोत. संपूर्ण पतितापासून
संपूर्ण पावन बनायचे आहे. बाबा समजावून सांगत आहेत, आत्म्यामध्येच भेसळ पडलेली आहे,
गोल्डन एज्ड पासून आता आयर्न एज्ड बनली आहे. ही आत्म्याची तुलना केली जात आहे. हे
व्यवस्थित समजून घ्यायचे आहे. तुम्ही मुले खूप भाग्यवान आहात, तुमच्या सारखा
भाग्यवान दुसरा कोणीच नाही. आता तुम्ही राजयोगामध्ये बसला आहात, तुम्ही राजऋषी आहात.
राजाईसाठी कधी कोणते शिक्षण असते काय? बॅरिस्टर बनवतील, परंतु विश्वाचा महाराजा कोण
बनवेल? बाबांव्यतिरिक्त कोणीही बनवू शकत नाही. इथे तर कोणीही महाराजा नाहीये.
सतयुगासाठी तर जरूर पाहिजे. कोणाला तरी जरूर यावे लागेल. बाबा म्हणतात - मी तेव्हा
येतो, जेव्हा भक्ती पूर्ण होणार असते. आता भक्ती पूर्ण झाली आहे; आता यामध्ये इतर
कोणतीही शंका उपस्थित केली जाऊ शकत नाही. आपल्याला बाबा बसून शिकवत आहेत, हा नशा
असला पाहिजे. आम्हा आत्म्यांना निराकार बाबा, परमपिता परमात्मा शिव शिकवत आहेत.
शिवबाबांना तर कोणी जाणतच नाहीत. आता तुम्ही मुले जाणता, बाबा पुन्हा स्वर्गाची
राजाई स्थापन करत आहेत. आपण त्यांना महाराजन श्री नारायण आणि महाराणी श्री लक्ष्मी
म्हणतो. भक्ती मार्गामध्ये सत्यनारायणाची कथा ऐकवतात. अमर कथा आणि तीजरीची कथा. बाबा
तिसरा नेत्र देखील देतात. नरा पासून नारायण बनण्याची कथा ऐकवली जाते. त्याच गोष्टी
ज्या घडून जातात (भूतकाळ बनतात), त्या नंतर भक्तिमार्गामध्ये कामी येतात. आता तुम्ही
मुले समजता, बाबा आपल्याला स्वर्गाचा मालक बनवत आहेत, आपण त्याचे अधिकारी आहोत.
भगवान तर स्वर्गाचे रचयिता आहेत ना. आपण त्या भगवंताची संतान आहोत तर मग आपण
स्वर्गामध्ये का नाही आहोत! कलियुगामध्ये का पडून आहोत? परमपिता परमात्मा तर नवीन
दुनिया रचतात. भगवान थोडीच जुनी दुनिया रचतात. अगोदर नवीन दुनिया तयार करतात,
त्यानंतर मग जुन्या दुनियेला तोडून टाकतील. तुम्ही जाणता, आपण सतयुगासाठी राज्य घेत
आहोत. सतयुगामध्ये कोण असतील? या लक्ष्मी-नारायणाची डिनायस्टी (घराणे) असेल, इतरही
राजे असतील ना. ज्यांची निशाणी आहे - ‘विजय माळा’. मुले जाणतात, आता आपण
विजयमाळेमध्ये गुंफले जाण्यासाठी पुरुषार्थ करत आहोत. दुनियेमध्ये माळेचा अर्थ
कोणीही जाणत नाही की, ही माळा का पूजली जाते, वरचे फूल हे कोणाचे प्रतीक आहे? माळा
जपत-जपत मग शेवटी फुलाला नमस्कार करतात, आणि मग पुन्हा माळेचा जप सुरु करतील. बसून
माळा जपत राहतात जेणेकरून कुठे बाहेर विचार जाऊ नयेत. आतमध्ये ‘राम-राम’ची अशी धून
लावतात, जणू एखादे वाद्य वाजत आहे. खूप प्रॅक्टिस करतात. या सर्व आहेत
भक्तिमार्गाच्या गोष्टी. हो, जास्त भक्ती करणारे कोणते विकर्म मात्र करत नाहीत. खूप
भक्ती करणाऱ्या बद्दल समजतील की हा सत्यवादी असेल. मंदिरामध्ये माळ ठेवलेली असेल,
माळ जपत मुखाने राम-राम म्हणत राहतील. बरीच माणसे असे समजतात की, भक्तीमध्ये पाप
होत नाही. म्हणतात - नवधा भक्ती केल्याने मनुष्य मुक्त होतात. परंतु असे काही होत
नाही. हे एक नाटक आहे. त्यामध्ये सतोप्रधान, सतो, रजो, तमोमध्ये सर्वांना यायचेच आहे.
एकालाही परत जायचे नाहीये. जशी वरती जागा रिकामी होते तशी इथे देखील खूप जागा रिकामी
होईल. दिल्लीच्या आसपास, गोड नद्यांच्या काठावर राजधानी असते, समुद्राच्या बाजूला
नसते. ही बॉम्बे इत्यादी असणार नाही. ती तर आधी मच्छीमयानी होती (मासेमारी करण्याचे
ठिकाण होते). मच्छीमारी करणारे तिथे राहत होते. आता तर समुद्रामध्ये भर टाकून किती
जमीन तयार केली आहे. तरीही पुन्हा मासेमारीचे ठिकाण होईल. सतयुगामध्ये तर बॉम्बे
असत नाही. तिथे कोणतेही डोंगर इत्यादी देखील नसतात. कुठे जाण्याची गरजच नसते. इथे
मनुष्य थकतात तर रेस्ट घेण्यासाठी जातात. सतयुगामध्ये थकण्याचा अथवा कोणत्याही
प्रकारचा त्रास नसतो, तुम्ही स्वर्गवासी बनता. जरा सुद्धा त्रास नसतो. तर आता
मुलांनी बाबांच्या श्रीमतावर चालायचे आहे.
बाबा म्हणतात - गोड
लाडक्या मुलांनो, शरीर निर्वाहासाठी धंदा इत्यादी तर करायचा आहे. स्कूलमध्ये
स्टुडंट शिकून मग घरी जाऊन अभ्यास करतात. घरचे कामकाज देखील करतात. हे देखील असेच
आहे. या शिक्षणामध्ये तर तुम्हाला कोणताही त्रास नाही. त्या शिक्षणामध्ये किती
सब्जेक्ट्स असतात. इथे तर एकच शिक्षण आणि एकच पॉइंट आहे - मनमनाभव, याद्वारे तुमची
पापे नष्ट होतील. भगवानुवाच आहे ना. ते समजतात की, भगवंताने गीता द्वापरमध्ये ऐकवली.
परंतु द्वापरमध्ये ऐकवून काय करतील? श्रीकृष्णाच्या चित्रामध्ये लिखाण खूप चांगले
आहे. हे युद्ध तर एक निमित्त आहे. सर्व मरतील तेव्हाच तर परत मुक्ती-जीवनमुक्ती
मध्ये जातील. तेही फक्त लढाईमध्ये थोडेच मरतील! अनेक प्रकारच्या आपत्ती येतील.
मुलांना कसलेही दुःख होता कामा नये.
व्यक्तीला जेव्हा
हार्ट ॲटॅक येतो तर त्यावेळी त्याला कोणत्याही यातना होत नाहीत. मृत्यू व्हावा तर
असा. बसल्या-बसल्या हार्ट फेल झाले, संपले. डॉक्टर येईपर्यंत आत्मा निघून जाते. आता
तर सर्वांचा मृत्यू होणार आहे. शेवटी ना हॉस्पिटल्स राहतील, ना डॉक्टर राहतील. ना
क्रियाकर्म करणारे राहतील. काहीही नसेल. सर्वांचे प्राण तनातून निघून जातील.
मुसळधार पाऊस पडेल. मृत्यू येण्यासाठी काही उशीर थोडाच लागेल! प्रयत्न करत आहेत की,
असे बॉम्ब्स तयार करावे ज्यामुळे मनुष्य लगेच मरून जातील. अशा प्रकारचे बॉम्ब्स
बनवत राहतात. बॉम्ब्सची इम्प्रूव्हमेंट करत राहतात. हे ड्रामामध्ये नोंदलेले आहे.
ड्रामामध्ये पूर्व-नियोजित खेळ आहे, कल्प-कल्प विनाश होतो. सतयुगामध्ये तुम्हाला हे
ज्ञान राहणार नाही. बाबांनाच येऊन ज्ञान द्यायचे आहे. स्थापना झाली मग ज्ञानाची
गोष्टच राहत नाही. नंतर मग जेव्हा रावण राज्य सुरू होते तेव्हा भक्ती सुरू होते. आता
भक्ती पूर्ण होत आहे, आता तुम्हाला योगबलाने पावन बनायचे आहे. पावन बनल्यानेच तुम्ही
सुखधाम, शांतीधाम मध्ये जाऊ शकता. चार्ट ठेवावा लागेल. हे तर समजला आहात - आपल्याला
बाबांची आठवण करून तमोप्रधानापासून सतोप्रधान इथेच बनायचे आहे. असे कोणत्याही
शास्त्र इत्यादीमध्ये लिहिलेले नाहीये. मुलांनी गाणे ऐकले, ‘आखिर वह दिन आया आज…’
जेव्हा भारतवासी पुन्हा राजांचेही राजा बनतात. राजांचाही राजा अथवा महाराजा बनतात.
नंतर त्रेतामध्ये असतात - राजा-राणी. नंतर मग जे पूज्य महाराजा-महाराणी होते, ते
द्वापरमध्ये वाम मार्गामध्ये येऊन पुजारी बनतात. आपेही पूज्य, आपेही पुजारी बनतात.
बाबा म्हणतात - मी पुजारी बनत नाही. देवता पूज्य असतात; मी काही पूज्य बनत नाही, ना
पुजारी बनतो. भारतवासी देवी-देवतांचीच मंदिरे बनवून त्यांची पूजा करतात.
लक्ष्मी-नारायण जे आधी पूज्य होते, मग भक्तिमार्गामध्ये तेच शिवबाबांचे पुजारी
बनतात. ज्या शिवबाबांनी महाराजा-महाराणी बनवले, त्यांचे मग मंदिर बनवून पूजा करतात.
विकारी देखील काही कोणी लगेच बनत नाहीत. हळूहळू बनतात. देवतांची वाम मार्गामध्ये
निशाणी देखील दाखवतात. जे पूज्य लक्ष्मी-नारायण होते, तेच मग पुजारी बनतात. सर्वात
आधी शिवाचे मंदिर बनवतात. त्या वेळी तर पूजेसाठी हिऱ्यांना कट करून लिंग बनवतात. हे
कोणालाही माहीत नाही की परमात्मा छोटासा बिंदू आहेत. हे तुम्ही आता समजता की, एवढे
मोठे लिंग नाहीये. मंदिरे तर भरपूर बांधतील. राजाला पाहून प्रजा देखील असे करेल.
सर्वात आधी शिवबाबांची पूजा होते. त्याला म्हटले जाते - अव्यभिचारी सतोप्रधान पूजा,
मग सतो, रजो, तमोमध्ये येतात. तुम्ही रजो, तमोमध्ये आला आहात तर नावच हिंदू ठेवले
आहे. मुळात देवी-देवता होता. बाबा म्हणतात - तुम्ही मुळात देवी-देवता धर्माचे आहात.
परंतु तुम्ही खूप पतित बनला आहात, म्हणून स्वतःला देवता म्हणवू शकत नाही कारण
अपवित्र आहात. हिंदू नाव तर खूप उशिरा ठेवतात.
आता तुम्ही समजता,
आपण सो पूज्य होतो, आता संगमयुगावर ना पूज्य आहोत, ना पुजारी आहोत. तुम्ही काय करत
आहात? श्रीमतावर पूज्य बनत आहात, इतरांनाही बनवत आहात. तुम्ही ब्राह्मण आहात, तुमची
आत्मा पवित्र होत जाते. पूर्ण पवित्र बनाल तेव्हा हे जुने शरीर सोडावे लागेल. बाबा
म्हणतात - अगदी सोपे आहे. वृद्ध मातांना धारणा करणे जमत नाही. बाबा म्हणतात - एवढे
तर समजता की आपण आत्मा आहोत. आत्म्यामध्येच चांगले अथवा वाईट संस्कार असतात.
आत्म्याने जे कर्म केले आहे ते दुसऱ्या जन्मामध्ये भोगावे लागते. बाबा देखील
आत्म्यांसोबत बोलतात. बाबा म्हणतात - ‘माझ्या मुलांनो, आत्म-अभिमानी बना’. निराकार
शिवबाबा निराकारी आत्म्यांना शिकवतात. निराकार बाबांमध्ये ज्ञानाचे संस्कार आहेत.
त्यांना काही शरीर तर नाहीये. तर ते ज्ञानाचा सागर, पतित-पावन आहेत. त्यांच्यामध्ये
सर्व गुण आहेत. बाबा म्हणतात, मी येऊन तुम्हा मुलांना पावन बनवतो. युक्ती किती सोपी
आहे. एकच शब्द आहे - ‘मनमनाभव’, मामेकम् (मज एकाची) आठवण करा. आठवणी द्वारेच तुमची
विकर्म विनाश होतील. तुम्ही हे देखील जाणता - आता आपण ब्राह्मण आहोत. नंतर मग
सूर्यवंशी, चंद्रवंशी, वैश्य, शूद्रवंशी बनू. आपणच या ८४ च्या चक्रामध्ये येणार.
वरून खाली उतरणार, आणि मग बाबा येतील. खरोखर, हे सृष्टीचे चक्र फिरत राहते. ही
सृष्टी जुनी होते तेव्हा मग बाबा नवीन बनविण्याकरिता येतात. हे तर बुद्धीला पटते
ना. हे चक्र बुद्धीमध्ये फिरले पाहिजे. आता तुम्ही स्वदर्शन चक्रधारी बनता,
ज्याद्वारे मग जाऊन चक्रवर्ती राजा बनाल. अच्छा!
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१) श्रीमतावर
पूज्य बनायचे आहे. आत्म्यामध्ये जे वाईट संस्कार आलेले आहेत, ते ज्ञान-योगाद्वारे
नष्ट करायचे आहेत. संपूर्ण निर्विकारी बनायचे आहे.
२) शरीर निर्वाहासाठी
कर्म करताना देखील शिक्षण शिकायचे आणि इतरांना शिकवायचे आहे. योगबलाद्वारे पावन
बनून राजाई पद घ्यायचे आहे.
वरदान:-
आपल्या
श्रेष्ठ स्थिती द्वारे मायेला स्वतःसमोर झुकविणारे हाइयेस्ट पदाचे अधिकारी भव
जसे महान आत्मे कधी
कोणा समोर झुकत नाहीत, सर्वजण त्यांच्या समोर झुकतील. तसेच तुम्ही बाबांचे निवडलेले
सर्वश्रेष्ठ आत्मे, कुठेही, कोणत्याही परिस्थितीमध्ये अथवा मायेच्या विविध आकर्षण
करणाऱ्या रूपांसमोर स्वतःला झुकवू शकत नाही. आतापासून जर सदैव झुकविण्याच्या
स्थितीमध्ये स्थित राहाल, तेव्हा हाइयेस्ट पदाचा अधिकार प्राप्त होईल. अशा
आत्म्यांच्या समोर सतयुगामध्ये प्रजा स्वमानाने झुकेल आणि द्वापरमध्ये तुम्हा
लोकांच्या यादगारा समोर भक्त झुकत राहतील.
बोधवाक्य:-
कर्म करतेवेळी
‘योग’चा बॅलन्स ठीक असेल तेव्हाच म्हणणार - कर्मयोगी.
हे अव्यक्त इशारे -
ज्वालास्वरूप स्थितीमध्ये राहून शक्तिशाली आठवणीचा अनुभव करा.
बरीच मुले म्हणतात
की, जेव्हा ‘योग’मध्ये बसतो तेव्हा आत्म-अभिमानी होण्याऐवजी सेवेची आठवण येते. परंतु
असे होता कामा नये, कारण अंतिम समयी जर अशरीरी बनण्याऐवजी सेवेचा देखील संकल्प चालला
तर सेकंदाच्या पेपरमध्ये फेल व्हाल. त्या वेळी बाबांशिवाय, आणि निराकारी, निर्विकारी,
निरहंकारी याशिवाय काहीही आठवता कामा नये. सेवेमध्ये तरीही साकारमध्ये याल, त्यामुळे
ज्या वेळी जी स्थिती हवी तीच स्थिती व्हावी, अन्यथा तुमची फसगत होईल.