27-08-2025      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - आपले सतोप्रधान भाग्य बनविण्यासाठी आठवणीमध्ये राहण्याचा खूप पुरुषार्थ करा, निरंतर आठवण रहावी - ‘मी आत्मा आहे’, बाबांकडून पूर्ण वारसा घ्यायचा आहे”

प्रश्न:-
मुलांना आठवणीचा चार्ट ठेवणे अवघड का वाटते?

उत्तर:-
कारण बरीच मुले आठवणीला यथार्थपणे समजतच नाहीत. बसतात आठवणीमध्ये आणि बुद्धी बाहेर भटकते. शांत होत नाही. ते मग वायुमंडळाला खराब करतात. आठवण करतच नाहीत तर मग चार्ट तरी कसा लिहितील. जर खोटे लिहिले तर कठोर शिक्षा होते. सत्य बाबांना सत्य सांगावे लागते.

गीत:-
तकदीर जगा कर आई हूँ…

ओम शांती।
रुहानी मुलांना तरी देखील रूहानी बाबा रोज-रोज समजावून सांगतात की जितके शक्य असेल देही-अभिमानी बना. स्वतःला आत्मा निश्चय करा आणि बाबांची आठवण करा कारण तुम्ही जाणता आपण त्या बेहदच्या बाबांकडून बेहद सुखाचे भाग्य बनविण्यासाठी आलो आहोत. तर जरूर बाबांची आठवण करावी लागेल. पवित्र सतोप्रधान बनल्याशिवाय सतोप्रधान भाग्य बनू शकत नाही. हे तर व्यवस्थित लक्षात ठेवा. मूळ गोष्ट आहेच मुळी एक. हे तर स्वतःजवळ लिहून ठेवा. हातावर नाव कोरतात ना. तुम्ही देखील लिहा - ‘मी आत्मा आहे’; बेहदच्या बाबांकडून मी वारसा घेत आहे कारण माया विसरायला लावते म्हणून लिहिलेले असेल तर सतत आठवण राहील. मनुष्य आठवणीसाठी ओम् चे अथवा कृष्ण इत्यादीचे चित्र सुद्धा लावतात. ही तर आहे नवीन ते नवीन आठवण. हे फक्त बेहदचे बाबाच समजावून सांगतात. हे समजून घेतल्यामुळे तुम्ही सौभाग्यशालीच तर काय पदम भाग्यशाली बनता. बाबांना न जाणल्याकारणाने, आठवण न केल्यामुळे गरीब बनला आहात. एकच बाबा आहेत जे कायमसाठी जीवनाला सुखी बनविण्यासाठी आले आहेत. भले आठवण देखील करतात परंतु जाणत अजिबात नाहीत. परदेशी लोक देखील सर्वव्यापी म्हणणे भारतवासियांकडून शिकले आहेत. भारत कोसळला आहे तर सर्वच कोसळले आहेत. भारतच जबाबदार आहे स्वतःला पाडण्यासाठी आणि इतरांना पाडविण्यासाठी. बाबा म्हणतात - मी देखील इथेच येऊन भारताला स्वर्ग सचखंड बनवतो. असा स्वर्ग बनविणाऱ्याची किती ग्लानी केली आहे. विसरले आहेत म्हणून लिहिलेले आहे - ‘यदा यदाही…’ याचा देखील अर्थ बाबाच येऊन समजावून सांगतात. बलीहारी एका बाबांची आहे. आता तुम्ही जाणता बाबा येतात जरूर, शिव जयंती साजरी करतात. परंतु शिवजयंतीचे महत्त्व अजिबातच नाहीये. आता तुम्हा मुलांना समजते आहे जरूर होऊन गेले आहेत, ज्याची जयंती साजरी करतात. सतयुगी आदि सनातन देवी-देवता धर्माची स्थापना तेच करतात. बाकीचे सर्व जाणतात की आमचा धर्म अमक्या-अमक्या वेळी स्थापन केला. त्याच्याही अगोदर आहे देवी-देवता धर्म. त्याला बिलकुल जाणत नाहीत की, हा धर्म कुठे नाहीसा झाला. आता बाबा येऊन समजावून सांगतात - बाबाच सर्वात श्रेष्ठ आहेत, आणखी कोणाची महिमाच नाही आहे. धर्म स्थापकाची कसली महिमा असणार. बाबाच पावन दुनियेची स्थापना आणि पतित दुनियेचा विनाश करवितात आणि तुम्हाला मायेवर विजय प्राप्त करून देतात. ही बेहदची गोष्ट आहे. रावणाचे राज्य साऱ्या बेहदच्या दुनियेवर आहे. हदची लंका इत्यादीची गोष्ट नाही. ही जय-पराजयाची कहाणी साऱ्या भारताचीच आहे. बाकीच्या तर आहेत बाय-प्लॉट (उपकथा). भारतामध्येच डबल मुकुटधारी आणि सिंगल मुकुटधारी राजे बनतात; देवी-देवतांशिवाय बाकीचे जे पण मोठे-मोठे बादशाह होऊन गेले आहेत, त्या कोणावरही लाईटचा ताज असत नाही. देवता तर तरीही स्वर्गाचे मालक होते ना. आता शिवबाबांना म्हटलेच जाते परमपिता, पतित-पावन. तर त्यांना लाईट कुठे देणार. लाईट तेव्हा देणार जेव्हा बिना लाईटवाला पतित देखील असेल. ते (शिवबाबा) कधी लाईट शिवाय असतच नाहीत. बिंदूवर लाईट कशी देऊ शकणार. असे होऊ शकत नाही. दिवसेंदिवस तुम्हाला खूप गूढ-गूढ गोष्टी समजावून सांगत राहतात, जेणेकरून जितक्या बुद्धीमध्ये धारण करू शकाल. मुख्य आहेच आठवणीची यात्रा. यामध्येच मायेची खूप विघ्न पडतात. भले कोणी आठवणीच्या चार्टमध्ये ५०-६० टक्के देखील लिहितात परंतु समजत नाहीत की आठवणीची यात्रा कशाला म्हटले जाते. विचारत राहतात - या गोष्टीला आठवण म्हणावे? खूप अवघड आहे. तुम्ही इथे दहा-पंधरा मिनिटे बसता, त्यामध्ये देखील तपासून बघा - आपण चांगल्या प्रकारे आठवणीमध्ये राहतो का? असे पुष्कळ आहेत जे आठवणीमध्ये राहू शकत नाहीत मग ते वायुमंडळाला खराब करतात. असे खूप आहेत जे आठवणीमध्ये न राहिल्यामुळे विघ्न आणतात. पूर्ण दिवस बुद्धी बाहेर भटकत राहते. ती मग इथे थोडीच शांत राहील, म्हणून आठवणीचा चार्ट सुद्धा ठेवत नाहीत. खोटे लिहिल्याने तर अजूनच सजा होईल. बरीच मुले चुका करतात, लपवतात. खरे सांगत नाहीत. बाबा विचारतील आणि खरे सांगितले नाही तर किती दोष चढतो. कितीही मोठे घाणेरडे काम केले असले तरीही सत्य सांगायची लाज वाटेल. बहुतेक करून सगळे खोटेच बोलतील. ‘झुठी माया, झुठी काया…’ आहे ना. एकदम देह-अभिमानामध्ये येतात. सत्य सांगणे तर चांगलेच आहे, बाकीचेही शिकतील. इथे सत्य सांगायचे आहे. नॉलेज सोबतच आठवणीची यात्रा देखील जरुरी आहे कारण आठवणीच्या यात्रेमुळेच आपले आणि विश्वाचे कल्याण होणार आहे. नॉलेज समजावून सांगणे खूप सोपे आहे. आठवणी मध्येच मेहनत आहे. बाकी बीजातून झाड कसे उत्पन्न होते, हे तर सर्वांनाच ठाऊक असते. बुद्धिमध्ये ८४ चे चक्र आहे, बीज आणि झाडाचे नॉलेज असेल ना. बाबा तर सत्य आहेत, चैतन्य आहेत, ज्ञानाचे सागर आहेत. त्यांच्यामध्ये नॉलेज आहे समजावून सांगण्यासाठी. ही तर एकदम अनकॉमन (असामान्य) गोष्ट आहे. हे मनुष्य सृष्टीचे झाड आहे. हे देखील कोणी जाणत नाहीत. सर्व नेती-नेती (आम्ही जाणत नाही) करत गेले. कालावधीच जाणत नाहीत तर मग बाकीचे काय जाणतील. तुमच्यामध्ये देखील असे फार थोडे आहेत जे चांगल्या रीतीने जाणतात, म्हणून सेमिनारला देखील बोलवतात. आपला-आपला सल्ला द्या. सल्ला तर कोणीही देऊ शकतात. असे नाही की ज्यांची नावे आहेत त्यांनाच द्यायचे आहे. आमचे नाव नाहीये, आम्ही कसे देणार. नाही, कोणीही सेवेसाठी कोणता सल्ला असेल, सल्ल्यासाठी लिहू शकता. बाबा म्हणतात - कोणताही सल्ला सुचला असेल तर लिहिले पाहिजे. बाबा, या युक्तीने सेवा खूप वाढू शकते. कोणीही सल्ला देऊ शकतात. बाबा बघतील कोणकोणत्या प्रकारचे सल्ले दिले आहेत. बाबा तर सांगत राहतात - कोणत्या युक्तीने आपण भारताचे कल्याण करावे, सर्वांना संदेश द्यावा. आपसामध्ये विचार विनिमय करा, लिहून पाठवा. मायेने सर्वांना झोपवून ठेवले आहे. बाबा येतातच तेव्हा जेव्हा मृत्यू समोर असतो. आता बाबा म्हणतात - सर्वांची वानप्रस्थ अवस्था आहे, शिका अथवा नका शिकू, मरायचे तर जरूर आहे. तयारी करा अथवा नका करू, नवीन दुनिया जरूर स्थापन होणार आहे. चांगली-चांगली मुले जी आहेत ती आपली तयारी करत आहेत. सुदाम्याचे देखील उदाहरण गायले गेले आहे - ‘मुठभर तांदूळ घेऊन आला’. बाबा आम्हाला सुद्धा महाल मिळाले पाहिजेत. त्यांच्याकडे आहेतच मुठभर तांदूळ तर काय करतील. बाबांनी मम्माचे उदाहरण सांगितले - मुठभर तांदूळ सुद्धा घेऊन आली नाही. तरीही किती उच्च पद मिळवले, यामध्ये पैशाची गोष्ट नाही. आठवणीमध्ये रहायचे आहे आणि आप समान बनवायचे आहे. बाबांची तर काहीही फी वगैरे नाही. समजतात की, आमच्याकडे पैसे पडून आहेत तर का नाही यज्ञामध्ये स्वाहा करावे. विनाश तर होणारच आहे. सर्व व्यर्थ जाईल, यापेक्षा काहीतरी सफल करूया. प्रत्येक मनुष्य काही ना काही दान-पुण्य इत्यादी जरूर करत असतात. ते आहे पाप-आत्म्यांचे पाप-आत्म्यांना दान-पुण्य. तरी देखील त्याचे अल्पकाळासाठी फळ मिळते. असं समजा कोणी युनिव्हर्सिटी, कॉलेज इत्यादी बनवितात, पैसे जास्त आहेत, धर्मशाळा इत्यादी बनवतात तर त्यांना घर इत्यादी चांगले मिळेल. परंतु तरी देखील आजारी इत्यादी तर होतीलच ना. समजा कोणी हॉस्पिटल इत्यादी बनवले असेल तर नाही म्हणायला आरोग्य चांगले राहील. परंतु त्याने सर्व कामना तर सिद्ध होत नाहीत. इथे तर बेहदच्या बाबांद्वारे तुमच्या सर्व कामना पूर्ण होतात.

तुम्ही पावन बनत आहात तर सर्व पैसे विश्वाला पावन बनविण्यामध्ये लावणे चांगले आहे ना. मुक्ती-जीवनमुक्ती देतात ते देखील अर्ध्या कल्पासाठी. सर्वजण म्हणतात - आम्हाला शांती कशी मिळेल. ती तर शांतीधाममध्ये मिळते आणि सतयुगामध्ये एक धर्म असल्याकारणाने तिथे अशांती असत नाही. अशांती असते रावण राज्यामध्ये. गायन देखील आहे ना - ‘राम राजा राम प्रजा…’ ते आहे अमर लोक. तिथे अमरलोकमध्ये ‘मृत्यू’ हा शब्दच असत नाही. इथे तर बसल्या-बसल्या अचानक मरतात, याला मृत्यूलोक, त्याला अमरलोक म्हटले जाते. तिथे मृत्यू होत नाही. जुने एक शरीर सोडून मग बालक बनतात. रोग असत नाहीत. किती फायदा होतो. श्री श्री च्या मतावर तुम्ही एव्हरहेल्दी बनता. तर अशी रूहानी सेन्टर्स किती उघडली पाहिजेत. थोडे जरी आले तरी काय कमी आहे काय. यावेळेस कोणताही मनुष्य ड्रामाच्या कालावधीला जाणत नाही. तुम्हाला मग विचारतील हे सर्व कोणी शिकवले. अरे, आम्हाला सांगणारे बाबा आहेत. इतके असंख्य बी.के. आहेत. तुम्ही देखील बी.के. आहात. शिवबाबांची मुले आहात. प्रजापिता ब्रह्माची देखील मुले आहात. हे आहेत ह्युमॅनिटीचे ग्रेट-ग्रेट ग्रँड फादर. यांच्यापासून आपण बी. के. निर्माण झालो आहोत. वंशावळ्या तर असतात ना. तुमचे देवी-देवतांचे कुळ खूप सुख देणारे आहे. इथे तुम्ही उत्तम बनता मग तिथे राज्य करता. हे कोणाच्याही बुद्धीमध्ये असू शकत नाही. हे देखील मुलांना समजावून सांगितले आहे देवतांचे पाय या तमोप्रधान दुनियेमध्ये पडू शकत नाहीत. जड चित्रांची सावली पडू शकते, चैतन्यची पडू शकत नाही. तर बाबा समजावून सांगतात - ‘मुलांनो, एक तर आठवणीच्या यात्रेमध्ये रहा, कोणतेही विकर्म करू नका आणि सेवेच्या युक्त्या शोधून काढा’. मुले म्हणतात - बाबा, आम्ही तर लक्ष्मी-नारायणासारखे बनणार. बाबा म्हणतात - तुमच्या मुखामध्ये गुलाब परंतु त्यासाठी मेहनत देखील करायची आहे. उच्च पद मिळवायचे असेल तर आप समान बनविण्याची सेवा करा. तुम्ही एक दिवस बघाल - एक-एक पंडा आपल्या सोबत १००-२०० यात्री देखील घेऊन येईल. पुढे चालून बघत रहाल. आधीपासूनच थोडेच काही सांगू शकतो. जे काही होत जाईल ते बघत रहाल.

हा बेहदचा ड्रामा आहे. तुमचा आहे सर्वात मुख्य पार्ट बाबांसोबत, ज्यात तुम्ही जुन्या दुनियेला नवीन बनविता. हे आहे पुरुषोत्तम संगमयुग. आता तुम्ही सुखधामाचे मालक बनता. तिथे दुःखाचे नामोनिशाण नसेल. बाबा आहेतच दुःखहर्ता, सुखकर्ता. येऊन दुःखातून लिबरेट करतात. भारतवासी मग समजतात इतके धन आहे, मोठ-मोठे बंगले आहेत, रोषणाई आहे, बस्स हाच स्वर्ग आहे. हा सर्व आहे मायेचा भपका. सुखासाठी खूप साधने निर्माण करतात. मोठे-मोठे बंगले, घरे बनवतात आणि मग मृत्यू कसा अचानक येतो, तिथे मृत्यूची भीती नाही. इथे तर अचानक मरतात मग किती शोक करतात. मग समाधीवर जाऊन अश्रू ढाळतात. प्रत्येकाचा आपला-आपला रिती रिवाज आहे. अनेक मते आहेत. सतयुगामध्ये अशी गोष्ट असत नाही. तिथे तर एक शरीर सोडून दुसरे घेतात. तर तुम्ही किती सुखामध्ये जाता. त्यासाठी किती पुरुषार्थ केला पाहिजे. पावला-पावलावर मत घेतले पाहिजे. गुरुचे अथवा पतीचे मत घेतात नाहीतर मग आपल्या मतानुसार चालायचे असते. आसुरी मत काय काम करेल. आसूरीपणाकडेच ढकलेल. आता तुम्हाला मिळते ईश्वरीय मत, उच्च ते उच्च मत, म्हणूनच गायले देखील आहे - ‘श्रीमत भगवानुवाच’. तुम्ही मुले श्रीमताद्वारे साऱ्या विश्वाला हेवन बनविता. त्या हेवनचे तुम्ही मालक बनता, म्हणून तुम्हाला प्रत्येक पावलावर श्रीमत घ्यायचे आहे परंतु कोणाच्या भाग्यामध्ये नसेल तर मग त्यांच्या मतावर चालत नाहीत. बाबांनी समजावून सांगितले आहे कोणालाही आपली काही बुद्धी असेल, सल्ला असेल तर बाबांना लिहून पाठवा. बाबा जाणतात कोण-कोण सल्ला देण्यालायक आहेत. नवीन-नवीन मुले येत राहतात. बाबा तर जाणतात ना कोणती चांगली-चांगली मुले आहेत. दुकानदारांचा देखील सल्ला घेतला पाहिजे - असा प्रयत्न करावा ज्यामुळे बाबांचा परिचय मिळेल. दुकानामध्ये देखील सर्वांना आठवण करून देत रहावे. भारतामध्ये जेव्हा सतयुग होते तेव्हा एक धर्म होता. यामध्ये नाराज होण्याचा तर काही प्रश्नच नाही. सर्वांचे पिता एक आहेत. बाबा म्हणतात - मामेकम् (मज एकाची) आठवण करा तर तुमची विकर्म विनाश होतील. स्वर्गाचे मालक बनाल. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) श्रीमतावर चालून साऱ्या विश्वाला स्वर्ग बनविण्याची सेवा करायची आहे, अनेकांना आप समान बनवायचे आहे. आसुरी मतापासून स्वतःला जपायचे आहे.

२) आठवणीच्या मेहनतीद्वारे आत्म्याला सतोप्रधान बनवायचे आहे. सुदाम्या प्रमाणे जे काही मुठभर तांदूळ आहेत ते सर्व सफल करून आपल्या सर्व कामना सिद्ध करायच्या आहेत.

वरदान:-
‘एक बाबा दुसरा ना कोई’ - या दृढ संकल्पाद्वारे अविनाशी, अमर भव

जी मुले हा दृढ संकल्प करतात की ‘एक बाबा दुसरा न कोई…’ त्यांची स्थिती स्वतः आणि सहजच एकरस होते. याच दृढसंकल्पामुळे सर्व नात्यांची अविनाशी तार जोडली जाते आणि त्यांना सदा ‘अविनाशी भव’, ‘अमर भव’चे वरदान मिळते. दृढसंकल्प केल्याने पुरुषार्थामध्ये देखील विशेष रूपाने लिफ्ट मिळते. ज्यांची एका बाबांसोबत सर्व नाती आहेत त्यांना सर्व प्राप्ती स्वतः होतात.

बोधवाक्य:-
विचार करणे, बोलणे आणि करणे तिघांना एकसमान बनवा - तेव्हा म्हणणार सर्वोत्तम पुरुषार्थी.

अव्यक्त इशारे:- सहजयोगी बनायचे असेल तर परमात्म प्रेमाचे अनुभवी बना. ज्यावेळेस ज्या नात्याची आवश्यकता आहे, त्याच नात्याने भगवंताला आपले बनवा. हृदयापासून म्हणा - ‘माझे बाबा’, आणि बाबा म्हणतील - ‘माझी मुले’, याच प्रेमाच्या सागरामध्ये सामावून जा. हा स्नेह छत्रछायेचे काम करतो, यामध्ये माया येऊ शकत नाही, हेच सहजयोगी बनण्याचे साधन आहे.