27-09-2025      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - तुम्ही आता खऱ्याखुऱ्या पाठशाळेमध्ये बसला आहात, हा सत्संग सुध्दा आहे, इथे तुम्हाला सत बाबांचा संग मिळाला आहे, जो तुम्हाला पार घेऊन जातो”

प्रश्न:-
कर्मांच्या हिशोबाच्या खेळामध्ये लोकांची समज आणि तुमची समज यामध्ये कोणता फरक आहे?

उत्तर:-
लोक समजतात - हा जो सुख-दुःखाचा खेळ चालला आहे, हे सुख-दुःख सर्व परमात्माच देतात आणि तुम्ही मुले समजता की हा प्रत्येकाच्या कर्मांच्या हिशोबाचा खेळ आहे. बाबा कोणालाही दुःख देत नाहीत. ते तर येतातच सुखाचा मार्ग सांगण्याकरिता. बाबा म्हणतात - ‘मुलांनो, मी कोणालाही दुःखी केलेले नाही. हे तर तुमच्या कर्मांचे फळ आहे’.

गीत:-
इस पाप की दुनिया से...

ओम शांती।
गोड-गोड रुहानी मुलांनी गाणे ऐकले. कोणाला बोलावत आहेत? बाबांना. बाबा येऊन या पापी कलियुगी दुनियेमधून सतयुगी पुण्याच्या दुनियेमध्ये घेऊन जा. आता सर्व जीव-आत्मे कलियुगी आहेत. त्यांची बुद्धी वरती जाते. बाबा म्हणतात - मी जो आहे, जसा आहे, तसे मला कोणीही ओळखत नाहीत. ऋषी-मुनी इत्यादी सुद्धा म्हणतात - आम्ही रचयिता मालक अर्थात बेहदचा पिता आणि त्यांच्या बेहदच्या रचनेच्या आदि-मध्य-अंताला जाणत नाही. आत्मे जिथे राहतात ते आहे ब्रह्म महतत्त्व, जिथे सूर्य-चंद्र असत नाहीत. ना मूलवतनमध्ये, ना सूक्ष्मवतनमध्ये. बाकी या मंडपामध्ये तर लाईट्स इत्यादी सर्व पाहिजे ना. तर या मंडपाला वीज मिळते - रात्रीची चंद्र-ताऱ्यांकडून आणि दिवसा सूर्याकडून. हे आहेत दिवे. हे दिवे असताना सुद्धा अंध:कार म्हटला जातो. रात्रीला तरी सुद्धा दिवा लावावा लागतो. सतयुग-त्रेताला म्हटले जाते - दिवस आणि भक्तिमार्गाला म्हटले जाते - रात्र. या देखील समजून घेण्यासारख्या गोष्टी आहेत. नवीन दुनिया मग पुन्हा जुनी जरूर बनेल. मग नवीन होईल तेव्हा जुन्याचा विनाश जरूर होईल. ही आहे बेहदची दुनिया. घरे देखील काही खूप मोठी-मोठी असतात ती देखील राजा-महाराजा इत्यादींची. हे आहे बेहदचे घर, मंडप अथवा स्टेज, याला कर्म-क्षेत्र सुद्धा म्हटले जाते. कर्म तर जरूर करावे लागते. सर्व मनुष्यांसाठी हे कर्म-क्षेत्र आहे. सर्वांना कर्म करायचेच आहे, पार्ट बजावायचाच आहे. प्रत्येक आत्म्याला पार्ट आधीपासूनच मिळालेला आहे. तुमच्यामध्ये देखील कोणी आहेत जे या गोष्टींना चांगल्या प्रकारे समजू शकतात. खरेतर ही गीता पाठशाळा आहे. पाठशाळेमध्ये कधी वृद्ध इत्यादी शिकतात का? इथे तर वृद्ध, तरुण इत्यादी सर्वजण शिकतात. वेदांची पाठशाळा म्हणता येणार नाही. तिथे कोणतेही एम ऑब्जेक्ट असत नाही. आपण इतकी वेद-शास्त्रे इत्यादी शिकतो, हे शिकून काय बनणार - हेच जाणत नाहीत. कोणतेही जे सत्संग आहेत, त्यांचे एम ऑब्जेक्ट काहीच नसते. आता तर त्यांना सत्संग म्हणायला लाज वाटते. सत् तर एक बाबाच आहेत, ज्यांच्यासाठी म्हटले जाते - ‘संग तारे, कुसंग बोरे…’ कुसंग आहे कलियुगी मनुष्यांचा. सत् चा संग तर एकच आहे. आता तुम्हाला आश्चर्य वाटते, साऱ्या सृष्टीच्या आदि-मध्य-अंताचे ज्ञान बाबा कसे देतात, तुम्हाला तर आनंद झाला पाहिजे. तुम्ही खऱ्या-खुऱ्या पाठशाळेमध्ये बसला आहात. बाकीच्या सर्व आहेत खोट्या पाठशाळा, त्या सत्संगांमधून कोणी काही बनून बाहेर पडत नाही. शाळा-कॉलेज इत्यादी मधून तरीही काहीतरी बनून बाहेर पडतात कारण शिकतात. बाकी कुठेही शिक्षण नाहीये. सत्संगाला शिक्षण, म्हणता येणार नाही. शास्त्र इत्यादी शिकून तर दुकान उघडून बसतात, पैसा कमावतात. थोडासा ग्रंथ (ग्रंथ साहेब) शिकून गुरुद्वारा उघडून बसतात. गुरुद्वारे देखील किती उघडतात. गुरूचे द्वार अर्थात घर म्हणणार ना. फाटक उघडते, तिथे जाऊन शास्त्र इत्यादी शिकतात. तुमचा गुरुद्वारा आहे - मुक्ती आणि जीवनमुक्तीधाम, सद्गुरू द्वार. सद्गुरूचे नाव काय आहे? अकाल मूर्त. सद्गुरुला अकाल मूर्त म्हणतात, ते येऊन मुक्ती-जीवनमुक्तीचा दरवाजा उघडतात. अकाल मूर्त आहेत ना, ज्याला काळ सुद्धा खाऊ शकत नाही. आत्मा आहेच बिंदू, तिला काळ कसा खाईल? ती आत्मा तर शरीर सोडून पळून जाते! मनुष्य समजतात थोडेच की, एक जूने शरीर सोडून जाऊन दुसरे घेईल, मग यामध्ये रडण्याची काय गरज आहे? हे तुम्ही जाणता - ड्रामा अनादि बनलेला आहे. प्रत्येकाला पार्ट बजावायचाच आहे. बाबांनी समजावले आहे - सतयुगामध्ये आहेत नष्टोमोहा. मोहजीतची देखील गोष्ट आहे ना. पंडित लोक ऐकवतात, माता देखील ऐकून-ऐकून मग ग्रंथ घेऊन ऐकवण्यासाठी बसतात. भरपूर लोक जाऊन ऐकतात. त्याला म्हटले जाते कनरस. ड्रामा प्लॅन अनुसार मनुष्य तर म्हणतील आमचा काय दोष आहे. बाबा म्हणतात - तुम्ही मला बोलावता की दुःखाच्या दुनियेमधून घेऊन जा. आता मी आलो आहे तर माझे ऐकले पाहिजे ना. बाबा बसून मुलांना समजावून सांगतात, चांगले मत मिळत आहे तर ते घेतले (ऐकले) पाहिजे ना. तुमचा देखील काही दोष नाही. हा देखील ड्रामा होता. राम राज्य, रावण राज्याचा खेळ बनलेला आहे. खेळामध्ये कोणी हरतात तर त्यांचा दोष थोडाच आहे? जय आणि पराजय होतच असतो, यामध्ये युद्ध करण्याचा काही प्रश्नच नाही. तुमची बादशाही होती, हे देखील पूर्वी तुम्हाला माहीत नव्हते, आता तुम्हाला समजले आहे. जे सेवाभावी आहेत, त्यांचे नाव मोठे होते. दिल्लीमध्ये ज्ञान समजावून सांगणारा सर्वात नामिग्रामी कोण आहे? तर लगेच जगदीशचे नाव घेतील. तुमच्यासाठी मासिक सुद्धा काढतात. त्याच्यात सर्व काही येते. अनेक प्रकारचे पॉईंट्स लिहितात, बृजमोहन सुद्धा लिहितात. लिहिणे काही मावशीचे घर थोडेच आहे (सोपी गोष्ट थोडीच आहे). जरूर विचार सागर मंथन करतात, चांगली सेवा करतात. किती लोक वाचून आनंदित होतात. मुलांना सुद्धा रिफ्रेशमेंट (वेगळेपणा) मिळतो. कोणी-कोणी प्रदर्शनीमध्ये खूप परिश्रम करतात, कोणी-कोणी कर्मबंधनामध्ये अडकलेले आहेत, त्यामुळे इतके ज्ञान आत्मसात करू शकत नाहीत. हा देखील म्हणणार ड्रामा, अबलांवर अत्याचार होण्याचा सुद्धा ड्रामामध्ये पार्ट आहे. असा पार्ट का बजावला हा प्रश्नच येत नाही. हा तर अनादि पूर्व नियोजित ड्रामा आहे. त्याला थोडेच काही करू शकतो? कोणी म्हणतात आम्ही काय गुन्हा केला होता ज्यामुळे असा पार्ट दिला आहे. आता गुन्ह्याचा तर प्रश्नच नाही, हा तर पार्ट आहे. कोणीतरी अबला निमित्त बनतील, ज्यांच्यावर अत्याचार होतील. असे तर मग सगळेच म्हणतील की, आम्हाला हा पार्ट का? नाही, हा तर पूर्व नियोजित ड्रामा आहे. पुरुषांवर देखील अत्याचार होतात. या गोष्टींमध्ये किती सहनशीलता ठेवावी लागते. सहनशीलता खूप पाहिजे. मायेची विघ्ने तर खूप येतील. विश्वाची बादशाही घेता तर काही मेहनत तर करावी लागेल. ड्रामामध्ये संकटे, संघर्ष इत्यादी किती आहेत. अबलांवर अत्याचार होणे हे लिहिलेलेच आहे. रक्ताच्या नद्या देखील वाहतील. कुठेच सुरक्षितता राहणार नाही. आता तर सेंटरवर सकाळच्या क्लास इत्यादीला जाता. ती देखील वेळ येईल जेव्हा तुम्ही बाहेरही पडू शकणार नाही. दिवसेंदिवस काळ बिघडत जात आहे आणि बिघडणारच आहे. दुःखाचे दिवस खूप प्रखरतेने येतील. आजारपण इत्यादीमध्ये दुःख होते तर मग भगवंताची आठवण करतात, आळवतात. आता तुम्हाला माहित झाले आहे बाकी थोडे दिवस आहेत. मग आपण आपल्या शांतीधाम, सुखधाममध्ये जरूर जाणार. दुनियेला तर हे ठाऊक देखील नाही आहे. आता तुम्हा मुलांना फील होते ना (जाणवते ना). आता बाबांना पूर्ण रीतीने जाणले आहे. ते सर्व (दुनियावाले) तर समजतात परमात्मा लिंग आहे. शिवलिंगाची पूजा देखील करतात. तुम्ही शिवाच्या मंदिरामध्ये जात होता, कधी हा विचार केला की, शिवलिंग काय चीज आहे? जरूर हे जड आहेत तर चैतन्य देखील असतील! हे मग काय आहेत? भगवान रचता तर वर आहेत. त्यांची निशाणी आहे केवळ पूजेकरिता. जेव्हा पूज्य बनतील तेव्हा या गोष्टी असणार नाहीत. शिव-काशीच्या मंदिरामध्ये जातात, कोणाला हे ठाऊक थोडेच आहे की, भगवान निराकार आहेत. आपण देखील त्यांची संतान आहोत. अशा पित्याची मुले असून मग आपण दुःखी का आहोत? विचार करण्यासारखी गोष्ट आहे ना. आत्मा म्हणते - ‘मी परमात्म्याची संतान आहे मग मी दुःखी का आहे?’ बाबा तर आहेतच सुख देणारे. बोलवतात देखील - ‘हे भगवान, आमचे दुःख दूर करा’. आता ते कसे दूर करतील? सुख-दुःख हा तर आपल्या कर्मांचा हिशोब आहे. मनुष्य समजतात सुखाच्या बदल्यात सुख, दुःखाच्या बदल्यात दु:ख परमात्माच देतात. त्यांना जबाबदार ठरवितात, बाबा म्हणतात - ‘मी कधी दुःख देत नाही. मी तर अर्ध्या कल्पासाठी सुख देऊन जातो’. हा मग सुख आणि दुःखाचा खेळ आहे. फक्त सुखाचाच खेळ असला असता तर भक्ती इत्यादीची गरजच पडली नसती, भगवंताला भेटण्यासाठीच ही भक्ती इत्यादी सर्व करतात ना. आता बाबा बसून सर्व समाचार ऐकवतात. बाबा म्हणतात - तुम्ही मुले किती भाग्यशाली आहात. त्या ऋषी-मुनी इत्यादींचे किती नाव आहे. तुम्ही आहात - राजऋषी, ते आहेत - हठयोग-ऋषी. ऋषी अर्थात पवित्र. तुम्ही स्वर्गाचे राजा बनता तर पवित्र जरूर बनावे लागेल. सतयुग-त्रेतामध्ये ज्यांचे राज्य होते त्यांचेच परत असेल. बाकी सर्व मागाहून येतील. आता तुम्ही म्हणता - आम्ही श्रीमतावर आपले राज्य स्थापन करत आहोत. जुन्या दुनियेचा विनाश होण्यासाठी देखील वेळ तर लागेल ना. सतयुग येणार आहे, कलियुग जाणार आहे.

किती मोठी दुनिया आहे. एक-एक शहर मनुष्य-वस्तीने किती भरलेले आहे. श्रीमंत लोक जगभर प्रवास करतात. परंतु इथे संपूर्ण जग कोणीही पाहू शकत नाही. होय, सतयुगामध्ये पाहू शकतात कारण युगामध्ये आहेच एक राज्य, इतके थोडे राजे असतील, इथे तर बघा किती मोठी दुनिया आहे. इतकी मोठी दुनिया कोण फिरणार. तिथे तुम्हाला समुद्रामध्ये जायचे नाहीये. तिथे श्रीलंका, बांगलादेश इत्यादी असतील? नाही, काहीही असणार नाही. ही कराची सुद्धा असणार नाही. तुम्ही सर्व गोड्या नद्यांच्या काठावर राहता. शेतीवाडी इत्यादी सर्व असते, सृष्टी तर मोठी आहे. मनुष्य फार थोडे असतात नंतर मागाहून वृद्धी होते. मग तिथे जाऊन आपले राज्य स्थापन केले. नंतर हळूहळू गिळंकृत करत गेले. आपले राज्य स्थापन केले. आता तर सर्वांना सोडावे लागते. एक भारतच आहे, ज्याने कोणाचेही राज्य हिसकावून घेतलेले नाहीये कारण भारत खरेतर अहिंसक आहे ना. भारतच साऱ्या दुनियेचा मालक होता बाकीचे सगळे नंतर आले आहेत जे तुकडे-तुकडे काबीज करत गेले आहेत. तुम्ही कोणाला हडप केलेले नाही आहे, इंग्रजांनी काबीज केले आहे. तुम्हा भारतवासीयांना तर बाबा विश्वाचा मालक बनवितात. तुम्ही कुठे गेलात थोडेच आहात. तुम्हा मुलांच्या बुद्धीमध्ये या सर्व गोष्टी आहेत, वृद्ध माता तर इतके सर्व समजू शकणार नाहीत. बाबा म्हणतात - चांगले आहे जे तुम्ही काहीही शिकलेल्या नाही आहात. शिकलेले सर्व बुद्धीतून काढावे लागते, फक्त एक गोष्ट धारण करायची आहे - ‘गोड मुलांनो, बाबांची आठवण करा’. तुम्ही म्हणत देखील होता ना - ‘बाबा, तुम्ही याल तेव्हा आम्ही तुमच्यावर वारी (समर्पित) जाणार, कुर्बान होणार’. तुम्हाला मग माझ्यावर कुर्बान व्हायचे आहे. देणे-घेणे होते ना. लग्नाच्या वेळेस पती-पत्नी एकमेकांच्या हातात मीठ देतात. बाबांना देखील म्हणतात, आम्ही जुने सर्व काही तुम्हाला देतो. मरायचे तर आहे, हे सर्व नष्ट होणार आहे. तुम्ही आम्हाला मग नवीन दुनियेमध्ये द्या. बाबा येतातच सर्वांना घेऊन जाण्यासाठी. काळ आहेत ना. सिंधमध्ये म्हणत होते - हा कोणता काळ आहे जो सर्वांना पळवून घेऊन जातो, तुम्ही मुले तर खुश होता. बाबा येतातच घेऊन जाण्यासाठी. आपण तर आनंदाने आपल्या घरी जाणार. सहन देखील करावे लागते. चांगल्या-चांगल्या मोठ्या-मोठ्या घरच्या माता मार खातात. तुम्ही खरी कमाई करता. मनुष्य थोडेच जाणतात, तो आहेच कलियुगी शूद्र संप्रदाय. तुम्ही आहात संगमयुगी, पुरुषोत्तम बनत आहात. जाणता पहिल्या नंबरचे पुरुषोत्तम हे लक्ष्मी-नारायण आहेत ना. मग डिग्री कमी होत जाते. वरून खाली येत राहतील. नंतर हळूहळू घसरत राहतील. यावेळी सर्व कोसळलेले आहेत (पतित झालेले आहेत). झाड जुने झाले आहे, खोड सडले आहे. आता पुन्हा स्थापना होत आहे. फाउंडेशन घातले जाते ना. कलम किती छोटे असते मग त्यापासून किती मोठे झाड वाढत जाते. हे देखील झाड आहे, सतयुगामध्ये खूप छोटे झाड असते. आता किती मोठे झाड आहे. मनुष्य सृष्टीची किती व्हरायटी फुले आहेत. एकाच झाडामध्ये किती व्हरायटी आहे. अनेक व्हरायटी धर्मांचे झाड आहे - मनुष्यांचे. एकाचा चेहरा दुसऱ्याशी मेळ खाऊ शकत नाही. पूर्वनियोजित ड्रामा आहे ना. कोणाचाही एक सारखा पार्ट असू शकत नाही. याला म्हटले जाते नैसर्गिक पूर्वनियोजित बेहदचा ड्रामा, यामध्ये देखील खूप बनावटी आहे. जी गोष्ट खरी असते ती नष्ट देखील होते. परत ५ हजार वर्षानंतर रियल्टीमध्ये (वास्तवात) येतील. चित्रे इत्यादी देखील काही खरी थोडीच बनलेली आहेत. ब्रह्माचा चेहरा देखील परत ५००० वर्षानंतर तुम्ही बघणार. या ड्रामाच्या रहस्याला समजून घेण्यासाठी बुद्धी खूप विशाल पाहिजे. बाकी काहीही नाही समजले तरी चालेल फक्त एक गोष्ट बुद्धीमध्ये ठेवा - ‘एक शिवबाबा दुसरा न कोई’. हे आत्म्याने म्हटले - बाबा, आम्ही तुमचीच आठवण करणार. हे तर सोपे आहे ना. हातांनी कर्म करत रहा आणि बुद्धीने बाबांची आठवण करत राहा. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) सहनशीलतेचा गुण धारण करून मायेच्या विघ्नांमध्ये पास व्हायचे आहे. अनेक संकटे येतील, अत्याचार होतील - अशावेळी सहन करत बाबांच्या आठवणीमध्ये रहायचे आहे, खरी कमाई करायची आहे.

२) विशाल-बुद्धी बनून या पूर्वनियोजित ड्रामाला चांगल्या रीतीने समजून घ्यायचे आहे, हा नैसर्गिक ड्रामा पूर्वनियोजित आहे त्यामुळे प्रश्न उत्पन्न होऊ शकत नाही. बाबा जे चांगले मत देतात, त्यावर चालत रहायचे आहे.

वरदान:-
मायाजीत, विजयी बनण्या सोबतच पर-उपकारी भव

आजपर्यंत स्व कल्याणमध्ये खूप वेळ जात आहे. आता पर-उपकारी बना. मायाजीत विजयी बनण्यासोबतच सर्व खजिन्यांचे विधाता बना अर्थात प्रत्येक खजिन्याला कार्यामध्ये लावा. खुशीचा खजिना, शांतीचा खजिना, शक्तींचा खजिना, ज्ञानाचा खजिना, गुणांचा खजिना, सहयोग देण्याचा खजिना वाटा आणि वाढवा. जर आता विधातापणाच्या स्थितीचा अनुभव कराल अर्थात पर-उपकारी बनाल तेव्हा अनेक जन्म विश्व-राज्य अधिकारी बनाल.

बोधवाक्य:-
विश्व कल्याणकारी बनायचे असेल तर आपल्या सर्व कमजोरींना सदाकाळासाठी निरोप द्या.

अव्यक्त इशारे:- आता लगनच्या (एकाग्रतेच्या) अग्नीला प्रज्वलित करून योगाला ज्वाला रूपी बनवा. जसा किल्ला बांधला जातो, ज्यामुळे प्रजा किल्ल्याच्या आत सुरक्षित राहील. एका राजासाठी महाल बनवत नाहीत, किल्ला बनवतात. तुम्ही देखील सर्व स्वतःसाठी, साथीदारांसाठी, अन्य आत्म्यांकरिता ज्वालारूपी आठवणीचा किल्ला बांधा. आठवणीच्या शक्तीची ज्वाळा असेल तर प्रत्येक आत्मा सेफ्टीचा अनुभव करेल.