27-09-26 अव्यक्त बापदादा
मराठी मुरली
15.12.2011 ओम शान्ति
मधुबन
सदैव फखुरमध्ये (नशे
मध्ये) राहा, निश्चिंत बादशहा बना, तीव्र पुरुषार्थाद्वारे संपन्न आणि समान बनून
सोबत येण्याची तयारी करा
आज बापदादा निश्चिंत
बादशहांची सभा पाहत आहेत. ही सभा याच वेळी भरते कारण सर्व मुलांनी आपली फिकीर (चिंता)
बाबांना देऊन बाबांकडून फखुर (नशा) घेतला आहे. ही सभा आताच भरते. तुम्ही देखील
प्रत्येक जण सकाळी उठल्यापासून कर्म करताना देखील निश्चिंत आणि बादशहा बनून चालता
ना! हे निश्चिंत जीवन किती सुंदर वाटते. निश्चिंत असण्याची कोणती निशाणी दिसून येते?
प्रत्येकाच्या मस्तकावर लाईट, आत्मा चमकताना दिसून येते. हे निश्चिंत जीवन कसे बनले?
बाबांनी सर्व मुलांच्या जीवनातून फिकीर (चिंता) घेऊन त्यांना फखुर (नशा) दिला आहे.
ज्यांच्या जीवनामध्ये फखुर (नशा) नसून चिंता आहे, त्यांच्या मस्तकावर लाईट चमकत नाही.
त्यांच्या मस्तकावर ओझ्याच्या रेषा पाहायला मिळतात. तर सांगा तुम्हाला काय आवडते?
लाईट की ओझे? जर काही ओझे आले जरी तरीही ओझे अर्थात चिंता बाबांना देऊन फखुर (नशा)
घेऊ शकता. तुम्हा सर्वांना निश्चिंत जीवन आवडते ना! तुम्हाला पाहणारे देखील
निश्चिंत जीवन पसंत करतात.
तर बापदादा आज चोहो
बाजूंच्या मुलांच्या भले मग ते समोर आहेत अथवा कुठेही बसलेले आहेत, मुलांच्या
मस्तकाच्या मध्यभागी चमकणारी लाईटच पाहत आहेत. तर सदैव निश्चिंत राहता की कधी काही
चिंता देखील येते? आहे कोणती चिंता? जर बाबांनी प्रकृतिजीत, विकारजीत बनवले आहे तर
चिंता कशी येऊ शकते? तर हात वर करा - निश्चिंत बनला आहात? सदैव बनला आहात? सदैव बनला
आहात की कधी-कधी? कधी-कधी असणारे देखील आहेत? हात काही वर करत नाहीत, बापदादा देखील
पाहू इच्छित नाहीत. बापदादा प्रत्येक मुलाला निश्चिंत बादशहा पाहू इच्छित आहेत. जर
कधी-कधी असणारे देखील असतील तर त्यांच्यासाठी खूप सोपी विधी आहे - जी काही थोडीफार
चिंता वाटते तर त्यासाठी ‘माझे’ ला ‘तुझे’ मध्ये बदलून टाका. या हदच्या
‘माझे’पणाला, ‘माझे’ ला ‘तुझे’ मध्ये बदलण्याची खूप सोपी विधी आहे. तुम्ही तर म्हणता
देखील की, ‘माझे बाबा’, तर मग आता ‘माझे’ राहिलेच काय? हदचा ‘माझे’पणा तर संपुष्टात
आला ना! ‘माझे बाबा’ झाले. सर्व जण हृदयापासून बोलता ना - ‘मेरा बाबा! प्यारा बाबा!
मीठा बाबा!’ तर मग ‘माझे’ला ‘तुझे’मध्ये विलीन करणे काही अवघड आहे का? फरक काय आहे?
‘त’ आणि ‘म’, इतका छोटासा फरक आहे. संकल्प केला की, ‘सर्व काही तुझे’, आणि मग
‘माझे’ काय राहिले? ‘माझे बाबा’.
तर बापदादांनी पाहिले
की मेजॉरिटी मुलांनी हदच्या ‘माझे’ ला ‘तुझे’ बनवले आहे, त्यामुळे ते कोण बनले आहेत?
निश्चिंत बादशहा. तर आज बापदादा मुलांना निश्चिंत बादशहा या स्वरूपामध्ये पाहत आहेत.
पहा, भक्तिमार्गामध्ये देखील तुमची चित्रे जेव्हा बनवतात तेव्हा डबल ताज (मुकुट)
दाखवतात. एक तर लाईटचा ताज आहेच; कारण निश्चिंत आत्म्याची निशाणी आहे - मस्तकावर
लाईट चमकते, आणि दुसरा ताज विकारांवर विजयी बनला आहात म्हणून ताज दाखवला आहे.
म्हणून हे अटेंशन ठेवा की जर बापदादांनी चिंता घेऊन फखुर (नशा) दिला आहे, तर तुम्ही
कोण बनलात? निश्चिंत बादशहा. बादशहा बनला आहात तर तख्त (सिंहासन) देखील हवे ना! तर
बापदादांनी तीन तख्ताचे मालक बनवले आहे. जाणता का की, ते तीन तख्त कोणते आहेत? एक
तख्त आहे - भृकुटीचे, हे तर सर्वांचे आहेच. दुसरे तख्त आहे - बापदादांचे दिल-तख्त
आणि तिसरे आहे - विश्वाचे तख्त, राज्याचे तख्त. तर तुम्हा सर्वांना हे तीन तख्त
प्राप्त आहेत ना! सर्वात श्रेष्ठ आहे बापदादांचे दिलतख्त तर चेक करा की तख्तावर
राहता? कारण बापदादांच्या दिलतख्तावर कोण बसतो? ज्याने स्वतः देखील सदैव बापदादांना
आपल्या दिलतख्तामध्ये बसवले आहे, जो सदैव श्रेष्ठ स्थितीमध्ये मास्टर सर्वशक्तिवान
आहे. तर चेक करा की सदैव तख्तनशीन आहात? की कधी मातीमध्ये देखील जाता. देहभान ही
माती आहे. खूप काळ मातीमध्ये (देहभानामध्ये) राहिला आहात तर कधी-कधी मातीमध्ये तर
जात नाही ना?
तर बापदादा सर्व
मुलांना वेळेचा इशारा देत आहेत. अचानकचा धडा पक्का करून घेत आहेत, यासाठी या
संगमाच्या वेळेचे खूप-खूप महत्व ठेवायचे आहे; कारण या एका जन्मामध्ये अनेक जन्मांचे
प्रारब्ध बनवायचे आहे म्हणून बापदादांनी इशारा दिला होता; तर संगमाच्या वेळेमध्ये
दोन गोष्टींवर नेहमी अटेन्शन द्यायचे आहे. त्या दोन गोष्टी तर लक्षात असतीलच - समय
आणि संकल्प. बापदादांना सर्वांनी व्यर्थ संकल्प, संकल्पाद्वारे देण्याची हिंमत
बाळगली होती. तर चेक करा - हिंमत सदैव टिकून आहे? कारण मुलांची हिंमत एक पट असेल,
तर बाबा हजार पटीने मदतगार आहेत. तर आता तुम्हाला काय वाटते? व्यर्थ संकल्पांबाबत
जी हिंमत ठेवून बाबांसमोर संकल्प केला होता तो अजूनही टिकून आहे? कारण या व्यर्थ
संकल्पांमध्ये वेळ खूप जातो आणि आताच्या समयानुसार तुमचे कार्य विश्वातील आत्म्यांना
संदेश देण्याचे आहे. तर व्यर्थ संकल्पांना नष्ट करायचे आहे तेव्हाच दुःखी, अशांत
आत्म्यांना सुख-शांतीचा अनुभव करून देऊ शकाल. बापदादांना दुःखी मुलांना पाहून दया
येते. तुम्हाला देखील तुमच्या भाऊ-बहिणींना पाहून दया तर येते ना!
बापदादांनी पाहिले की
वर्तमानसमयी सर्वांना आवड आहे, प्लॅन देखील बनवला आहे, प्रॅक्टिकल देखील केले आहे.
सर्व प्रोग्राम खूप छान केले आहेत, याची मुबारक देखील देत आहेत. परंतु आता
समयानुसार त्यांना लवकर-लवकर वारसदार बनवा, जेणेकरून काही प्रमाणात तरी वारशाचे
अधिकारी बनतील. ‘खूप छान, खूप छान’ असे खुपजण म्हणतात, बापदादांनी देखील मुलांच्या
सेवेचा हा रिझल्ट तर पाहिला आहे आणि बाबा मुलांवर खुष देखील आहेत. मनापासून करत
आहेत आणि आता समयानुसार आवडीने ऐकतात देखील. एवढा फरक तर पडला आहे. छान-छान वाटते,
परंतु चांगले बनवून काही प्रमाणात तरी वारशाचे अधिकारी बनवा. यासाठी बापदादांनी
यापूर्वी देखील इशारा दिला आहे की आता समयानुसार तीव्र पुरुषार्थी बनण्याची गरज आहे.
तीव्र पुरुषार्थी बनण्यासाठी मुख्य पुरुषार्थ आहे - सेकंदामध्ये बिंदू लावणे. सेकंद
आणि बिंदू, दोन्ही समान. तर आता बापदादा मुलांचे निश्चिंत बादशहाचे रूप तर पाहत
आहेत. आता याच रूपाचा सदैव अनुभव करा. कोणीही आले आणि काहीही झाले तरी ‘माझे’ ला
‘तुझे’ मध्ये सामावून टाका.
आज बापदादांनी पाहिले,
गुरुवारचा दिवस आहे, बरीच मुले बापदादांकडे पोहोचली, तर बापदादा म्हणाले आठवड्याचे
दोन दिवस विशेष आहेत. एक गुरुवार आणि दुसरा रविवार, संडे. तर गुरुवारच्या दिवशी
गुरुचा दिवस आहे, गुरूकडून काय मिळते? वरदान. तर गुरुवारचा दिवस विशेष वरदानाचा
दिवस आहे, या रूपामध्ये गुरुवार साजरा करा. अमृतवेलेपासून कोणते ना कोणते विशेष
वरदान आपल्या बुद्धीमध्ये इमर्ज ठेवा. वरदान तर अनेक आहेत परंतु विशेष एक वरदान
स्वतःसाठी बुद्धीमध्ये ठेवून चेक करा की वरदानी दिवसामध्ये वरदान स्वरूप बनून,
वरदान रिपीट करायचे नाही, परंतु वरदान स्वरूप बनायचे आहे आणि चेक करत राहा की आज
किती वेळ वरदान स्वरूप बनून राहिलात? रविवारचा दिवस विशेष दुनियेमध्ये सुट्टीचा
दिवस असतो. तर संडेचा दिवस असा साजरा करा - आपल्या जीवनामध्ये संकल्प मात्र जीकाही
कमजोरी असेल, स्वप्न मात्र सुद्धा कमजोरी असेल तर तिला सुट्टी द्यायची आहे. तर जसे
लोक हे दोन्ही दिवस आनंदात घालवतात, तसेच तुम्ही देखील या दोन्ही दिवशी विशेष हे
लक्ष्य आणि लक्षण केवळ लक्ष्य नाही तर लक्ष्या सोबत लक्षणाला सुद्धा अटेंशनमध्ये
ठेवा. बापदादांनी सर्व मुलांना सोबत घेऊन जाण्याचा वायदा केला आहे. तर मग सोबत
जाण्यासाठी कोणती तयारी करायची आहे? बाबा तर सेकंदामध्ये अशरीरी बनतील परंतु तुम्ही
जो वायदा केला आहे, बाबांनी देखील वायदा केला आहे - सोबत जाऊ; तर चेक करा त्याची
तयारी आहे? सेकंदामध्ये बिंदू लावला, संपन्न आणि संपूर्ण बनून निघाला. तर अशी तयारी
आहे? सोबत तर जायचे आहे ना! जायचे आहे? मान हलवा. जायचे आहे, अच्छा. पक्के?
हातामध्ये हात देणे, याचा अर्थ आहे - समान बनणे. तर चेक करा वेळ तर अचानक येणार आहे,
तर इतकी तयारी आहे का, जेणेकरून बाबांसोबत घरी जाऊ शकाल?
बाबांचे मुलांवर
प्रेम आहे ना! तर बाबा जाताना एकालाही मागे सोडू इच्छित नाहीत. सोबत आहोत, सोबत
राहणार, सोबत जाणार आणि सोबत राजधानीमध्ये राजघराण्यामध्ये येणार. मंजूर आहे ना!
मंजूर आहे? तयारी आहे? मंजूर आहे यामध्ये तर हात वर कराल, एवढासाच हात वर करायचा
नाही. तयारी आहे, यामध्ये हात वर करा . उंच हात वर करा. अच्छा. उद्या जरी विनाश झाला
तरी तयार आहात? परंतु आपली सेवा पूर्ण केली आहे? सेवा तर अजून बाकी आहे की सेवा
पूर्ण झाली आहे? संदेश सर्वांपर्यंत पोहोचला आहे? फक्त आपल्या गल्लीमध्येच पाहा,
तुम्ही प्रत्येकाला ‘बाबा आले आहेत, वारसा घ्यायचा असेल तर घ्या’, हा संदेश दिला आहे?
आता प्लॅन बनवत आहात. बापदादांनी ऐकले की घरोघरी संदेश देण्याचा प्लॅन बनवत आहात.
चांगले आहे, संदेश तर द्यायचाच आहे, नाहीतर तक्रार करतील. प्रोग्राम बनवला आहे ना!
उभे रहा, बाबांना प्लॅन सांगितला आहे ना! उठा. (मीडियावाल्यांना उठवले) चांगले आहे,
बाबांचा संदेश देऊन त्यांची नाराजी दूर करा; कारण व्हायचे तर अचानकच आहे. तर आपसात
मिळून याच प्लॅनला प्रॅक्टिकलमध्ये आणा. आपसामध्ये सल्ला-मसलत लवकर करा, मध्ये
जास्त वेळ गेला ना, तर मग उमंग देखील थोडा कमी होतो. बाकी बापदादांना हे पसंत आहे
की, घरोघरी ही तक्रार पूर्णपणे दूर व्हावी. कोणी असे म्हणू नये की, ‘आम्हाला तर
कळलेच नाही, बाबा आले आणि निघून देखील गेले, आम्ही वंचित राहिलो!’ सर्वांना उमंग आहे
ना! सर्वांना उमंग आहे? सेवा करून तक्रार दूर करायची आहे. जिथे उमंग असतो तर तिथे
बापदादांचा सहयोग देखील असतो. अच्छा.
तर बापदादांच्या
मनातील इच्छेला तर सर्वजण जाणताच. समान आणि संपूर्ण, हे दोन शब्द सदैव चेक करा; तर
मग बाबांची ही आशा पूर्ण केली आहे काय? कारण बापदादा प्रत्येक मुलाला बाबांच्या
आशांचा तारा मानतात. प्रत्येक मुलाचे बाबांवर प्रेम आहे, हे तर बापदादा देखील
जाणतात. या सर्वांना मधुबनमध्ये आणणारे काय आहे? हे प्रेमाच्या ट्रेनमधून येतात.
प्रेमाच्या प्लेनमधून येतात. तर बाबा देखील मुलांच्या प्रेमाच्या सब्जेक्टमध्ये
मुलांवर खूश आहेत. परंतु जे दोन शब्द बाबांना हवे आहेत ‘समान’ आणि ‘संपूर्ण’, याला
देखील संपन्न करायचेच आहे. तर आज बापदादा चोहो बाजूंच्या मुलांना मनापासून प्रेमाने
बघत एका-एका मुलाला अंतःकरणापासून प्रेमाने मुबारक देत आहेत. अच्छा.
टीचर्स भरपूर आल्या
आहेत:-
टीचर्सची तर बापदादा सदैव आठवण करतात, प्रेम करतात कारण टीचर्स, प्रत्येक भाऊ आणि
बहिणींना पुढे घेऊन जाण्यासाठी निमित्त बनतात. टीचरला बापदादा ‘गुरुभाई’ म्हणतात.
गुरुभाईचा अर्थ आहे - ‘समान’; कारण जसे बाबांचे सदैव सेवेमध्ये बिझी राहणे हे
कर्तव्य आहे, तसे योग्य टीचर्स पित्यासमान सदैव सेवाधारी आणि सदैव सफलता स्वरूप
बनून सफल स्वरूप बनविणाऱ्या आहेत. बापदादांना टीचर्स प्रति नेहमीच मनामध्ये प्रेम
आहे. असे का? टीचर अर्थात सदैव सेवाधारी, सदैव पित्यासमान बनविणारी आणि नवीन
येणाऱ्या आत्म्यांना बाबांचा परिचय देऊन, अनुभवी बनवून बाबांच्या वारशाचे अधिकारी
बनविणारी. तर बापदादा टीचर्सवर खुश आहेत आणि हेच हृदयापासूनचे प्रेम, बाबांचे प्रेम
स्टुडंट्स मध्ये देखील भरून त्यांना देखील बाबांच्या पूर्ण वारशाचे अधिकारी
बनविणाऱ्या आहेत. बाबांची प्रत्येक टीचरकडून हीच अपेक्षा असते की ही प्रत्येक टीचर,
बाबांच्या ज्या आशा आहेत, बाबांना जे हवे आहे ते प्रत्यक्ष करणारी आणि करवून घेणारी
आहे म्हणून एक-एक टीचरला बापदादा पदमपटीने मुबारक देत आहेत. मुबारक देत आहेत. अच्छा.
डबल विदेशी
भाऊ-बहिणींसोबत:-
बापदादांनी पाहिले
डबल विदेशी देखील सेवेमध्ये भारतातील आत्म्यांपेक्षा कमी नाहीत. बापदादा खुश होतात
की प्रत्येकजण आपापल्या स्थानावर सेवेची वृद्धी देखील करत आहेत आणि स्वतःला देखील
चांगल्या उमंग-उत्साहामध्ये चालवत आहेत. डबल विदेशियांचा हा संस्कार आहे की जे
करतील ते उमंग-उत्साहाने करून पूर्ण करतील आणि पुरुषार्थाकडे देखील अटेंशन आहे. तर
सर्वांनी हात वर करा की सर्व तीव्र पुरुषार्थी आहेत? तीव्र पुरुषार्थी आहात? अच्छा.
सर्वांच्या वतीने सुद्धा खूप-खूप मुबारक आहे, का? तीव्र पुरुषार्थी अर्थात
बापदादांच्या आशांना पूर्ण प्रत्यक्ष करणारे. तर बापदादा तीव्र पुरुषार्थाची मुबारक
देत आहेत. तीव्र पुरुषार्थी आहात आणि सदैव तीव्र पुरुषार्थी बनून इतरांना देखील
तीव्र पुरुषार्थी बनवाल. तर संपूर्ण विदेश तीव्र पुरुषार्थींच्या लिस्टमध्ये यावा.
असे रेकॉर्ड काही प्रमाणात आहे आणि थोडे सिद्ध करून दाखवायचे आहे. परंतु बापदादा
पुरुषार्थाची मुबारक देत आहेत. मुरलीवर देखील अटेंशन आहे, बापदादांना हे मुरलीवरचे
प्रेम खूप आवडते. मधुबनवर देखील प्रेम, मुरलीवर देखील प्रेम, परिवारावर देखील प्रेम
आणि ‘माझे बाबा’ यावर देखील प्रेम. आता सूक्ष्म पुरुषार्थाकडे देखील अटेंशन चांगले
आहे आणि बापदादांनी पाहिले की जनक बच्चीचे (जानकी दादीचे) देखील खूप लक्ष आहे. इथे
राहून देखील प्रत्येक क्लास पहिला फॉरेनमध्ये पोहोचतो. तर पालना देखील चांगली मिळत
आहे. हे देखील तुमचे लक आहे. लकीएस्ट आणि स्वीटेस्ट दोन्ही आहात. अच्छा.
पहिल्यांदा
आलेल्यांसोबत:-
हे तर भरपूर आहेत.
हात हलवा. तर सगळे आपल्या मधुबन घरामध्ये पोहोचला आहात, त्याची बापदादा एक-एक मुलाला
मुबारक देत आहेत कारण लास्ट समयाच्याआधी पोहोचला आहात. लास्ट सो फास्ट जाण्याचा
चान्स आहे. बापदादा मुलांना पाहून खूश होत आहेत. आलात, स्वागत आहे आणि पुढील
काळासाठी आता तीव्र पुरुषार्थ करून अजून-अजून पुढे जाण्याचा दृढ संकल्प करा. दृढता
सफलतेची चावी आहे. तर बापदादा आज जी काही मुले आली आहेत त्यांना विशेष दृढतेच्या
चावीची सौगात देत आहेत. दृढतेला कधीही शिथिल होऊ देऊ नका. दृढता तुम्हाला सदैव सहज
पुढे नेत राहील. तर बापदादा खुश आहेत, स्वागत आहे, आपला वारसा घेण्यासाठी आलात,
यासाठी खूप-खूप मुबारक. अच्छा.
चोहो बाजूंच्या सर्व
ब्राह्मणांना बापदादा हृदयापासूनचे प्रेम आणि सदैव पुढे जाण्याचा श्रेष्ठ संकल्प
देत आहेत. एका-एका मुलाला बाबा पाहत देखील आहेत आणि बघता-बघता हृदयामध्ये सामावून
घेत आहेत. जवळ असणारे तर बापदादांना समोर पाहत आहेत आणि तुम्ही सर्व साधनांद्वारे
समोरच पाहत आहात. बापदादा देखील तुम्हा सर्वांना जिथे कुठे बसला आहात तरी असेच पाहत
आहेत की जणूकाही सन्मुख बसला आहात आणि प्रत्येकाला हृदयापासूनचे प्रेम देत आहेत.
पुढे जात राहा, तीव्र पुरुषार्थ करून अधिकाधिक पुढे जात राहा. अच्छा. समोर
बसणाऱ्यांना देखील बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सदैव पुढे जाण्याची मुबारक असो,
मुबारक असो, मुबारक असो. अच्छा.
वरदान:-
प्रत्येक
शिकवणीला स्वरूपामध्ये आणून प्रमाण देणारे सपूत अथवा साक्षात्कार मूर्त भव
जी मुले मिळालेल्या
शिकवणींना केवळ शिकवण म्हणून बुद्धीमध्ये ठेवत नाहीत, परंतु त्यांना स्वरूपामध्ये
आणतात ती नेहमी ज्ञान स्वरूप, प्रेम स्वरूप, आनंद स्वरूप स्थितीमध्ये स्थित राहतात.
जे प्रत्येक ‘पॉईंट’ला स्वरूपामध्ये आणतील तेच ‘पॉईंट’ रूपामध्ये स्थित होऊ शकतील.
पॉईंटचे मनन अथवा वर्णन करणे सोपे आहे परंतु स्वरूप बनून इतर आत्म्यांना देखील त्या
स्वरूपाचा अनुभव करून देणे - हेच आहे प्रमाण देणे, अर्थात सपूत अथवा साक्षात्कार
मूर्त बनणे.
सुविचार:-
एकाग्रतेच्या शक्तीला
वाढवा म्हणजे मग मन-बुद्धीचे भटकणे बंद होईल.
हे अव्यक्त इशारे -
आता आपल्या ‘दाता’ स्वरूपाला प्रत्यक्ष करा.
कोणतीही निर्बल आत्मा
तुमच्यासमोर आली तर त्या निर्बल असणाऱ्याला बळ द्या. सर्व शक्तींचा वारसा जो
प्राप्त केला आहे तो त्याला द्या. सर्व आत्म्यांना बाबांचा खजिना देणारे दाता बना,
आपल्या शक्तींद्वारे तहानलेल्या आणि तडफडणाऱ्या आत्म्यांना जीवनदान द्या, वरदाता
बनून प्राप्त झालेल्या वरदानांद्वारे त्यांना देखील बाबांच्या समीप संबंधामध्ये आणा,
इथल्या दातापणाच्या संस्कारांमुळे भविष्यामध्ये २१ जन्मांपर्यंत राज्यपद प्राप्त
होईल.