28-01-2026
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
“गोड
मुलांनो - मोस्ट बिलवेड (सर्वात प्रिय) शिवबाबा आले आहेत तुम्हा मुलांना विश्वाचा
मालक बनविण्याकरिता, तुम्ही त्यांच्या श्रीमतावर चाला”
प्रश्न:-
मनुष्य
परमात्म्याच्या बाबतीत कोणत्या दोन गोष्टी एकमेकांच्या विरुद्ध बोलतात?
उत्तर:-
एकीकडे म्हणतात - परमात्मा अखंड ज्योती आहे आणि दुसरीकडे म्हणतात ते तर
नावा-रूपापासून न्यारे आहेत. ह्या दोन्ही गोष्टी एकमेकांच्या विरुद्ध आहेत. यथार्थ
रूपाने न जाणल्याकारणानेच पतित बनतात. बाबा जेव्हा येतात तेव्हा ते स्वतःची खरी ओळख
देतात.
गीत:-
मरना तेरी गली
में...
ओम शांती।
मुलांनी गाणे ऐकले. जेव्हा कोणी मरतात तेव्हा बाबांकडे जन्म घेतील. हेच म्हटले जाते
की पित्याकडे जन्म घेतला, आईचे नाव घेत नाहीत. अभिनंदन पित्याचे केले जाते. आता
तुम्ही मुले जाणता आम्ही आत्मे आहोत, ती झाली शरीराची गोष्ट. एक शरीर सोडून मग
दुसऱ्या पित्याकडे जातात. तुम्ही ८४ जन्मांमध्ये ८४ साकार पिता घेतले आहेत.
वास्तविक तुम्ही मूलतः निराकार पित्याची मुले आहात. तुम्ही आत्मे परमपिता
परमात्म्याची मुले आहात. रहाणारे देखील तिथलेच आहात, ज्याला निर्वाणधाम अथवा
शांतीधाम म्हणतात. मूलतः तुम्ही तिथे राहणारे आहात. बाबा देखील तिथे राहतात. इथे
येऊन तुम्ही लौकिक पित्याची मुले बनता तेव्हा मग त्या पित्याला विसरून जाता.
सतयुगामध्ये देखील तुम्ही सुखी बनता आणि त्या पारलौकिक पित्याला विसरून जाता.
सुखामध्ये त्या पित्याची कोणीही आठवण करत नाहीत. दुःखामध्ये आठवण करतात आणि आठवण
देखील आत्माच करते. जेव्हा लौकिक पित्याची आठवण करतात तेव्हा बुद्धी शरीराकडे असते.
हे बाबा त्यांची आठवण करताना म्हणतील - ‘ओ बाबा’. आहेत दोघेही बाबा. बरोबर शब्द
‘बाबा’च आहे. हे देखील फादर, ते देखील फादर आहेत. आत्मा त्या रूहानी बाबांची आठवण
करते तेव्हा बुद्धी तिथे जाते. हे बाबा बसून मुलांना समजावून सांगत आहेत. आता तुम्ही
हे जाणता की, बाबा आलेले आहेत, आम्हाला आपले बनवले आहे. बाबा म्हणतात - मी
सर्वप्रथम तुम्हाला स्वर्गात पाठवले. तुम्ही अतिशय श्रीमंत होता आणि मग ८४ जन्म घेत
ड्रामा प्लॅन अनुसार आता तुम्ही दुःखी झाला आहात. आता ड्रामा अनुसार जुनी दुनिया
नष्ट होणार आहे. तुमची आत्मा आणि शरीर रुपी वस्त्र सतोप्रधान होते, मग गोल्डन एज्ड
मधून सिल्व्हर एज्डमध्ये आत्मा आली तेव्हा शरीर देखील सिल्व्हर एज्डमध्ये आले, नंतर
मग कॉपर एज्डमध्ये आले. आता तर तुमची आत्मा अगदीच पतित बनली आहे तर शरीर देखील पतित
आहे. जसे १४ कॅरेटचे सोने कोणी पसंत करत नाही. काळे पडते. तुम्ही देखील आता काळे
आयर्न एज्ड बनला आहात. आता आत्मा आणि शरीर जे असे काळे बनले आहेत तर पुन्हा प्युअर
(पावन) कसे बनतील. आत्मा पावन बनली तर शरीर देखील पावन मिळेल. ते कसे होणार? गंगा
स्नान केल्याने होणार का? नाही. बोलावतातच ‘हे पतित-पावन…’ हे आत्मा म्हणते. बुद्धी
पारलौकिक पित्याकडे जाते - ओ बाबा! बघा ‘बाबा’ शब्दच किती गोड आहे. भारतातच
‘बाबा-बाबा’ म्हणतात. आता तुम्ही आत्म-अभिमानी बनून बाबांचे बनला आहात. बाबा
म्हणतात मी तुम्हाला स्वर्गामध्ये पाठवले होते. नवीन शरीर धारण केले होते. आता
तुम्ही काय बनला आहात. या गोष्टी नेहमी लक्षात राहिल्या पाहिजेत. बाबांचीच आठवण केली
पाहिजे. आठवण देखील करतात ना - ‘ओ बाबा, आम्ही आत्मे पतित बनलो आहोत. आता तुम्ही
येऊन पावन बनवा’. ड्रामामध्ये देखील हा पार्ट आहे त्यामुळेच तर बोलवतात. ड्रामा
प्लॅन अनुसार येतील देखील तेव्हाच जेव्हा जुन्या दुनियेपासून नवीन बनायची असेल; तर
जरूर संगमावरच येतील.
तुम्हा मुलांना निश्चय आहे की सर्वात प्रिय बाबा आहेत. म्हणतात देखील स्वीट, स्वीटर,
स्वीटेस्ट. आता स्वीट कोण आहे? लौकिक नात्यामध्ये पहिले आहेत वडील, जे जन्म देतात.
नंतर मग शिक्षक. ते चांगले असतात. त्यांच्याकडून शिकून पद मिळवता. ‘नॉलेज इज सोर्स
ऑफ इन्कम’ म्हटले जाते. ज्ञान आहे नॉलेज. योग आहे आठवण. तर बेहदचे बाबा ज्यांनी
तुम्हाला स्वर्गाचा मालक बनवले होते, त्यांना आता तुम्ही विसरले आहात. शिवबाबा कसे
आले कोणालाच ठाऊक नाही. चित्रांमध्ये देखील स्पष्ट दाखवले आहे. शिवबाबा, ब्रह्मा
द्वारे स्थापना करवून घेतात. श्रीकृष्ण राजयोग कसा शिकवेल? राजयोग शिकवतातच
सतयुगासाठी. त्यामुळे जरूर संगमावर बाबांनीच शिकवला असेल. सतयुगाची स्थापना करणारे
बाबा आहेत. शिवबाबा यांच्याद्वारे (ब्रह्मा द्वारे) करवितात, करनकरावनहार आहेत ना.
ते लोक त्रिमूर्ती ब्रह्मा म्हणतात. सर्वात श्रेष्ठ शिव आहेत ना. हे साकार आहेत, ते
निराकार आहेत. सृष्टी देखील इथेच आहे. या सृष्टीचेच चक्र आहे जे फिरत रहाते, रिपीट
होत रहाते. सूक्ष्मवतनच्या सृष्टीचे चक्र म्हटले जात नाही. मनुष्यांच्या जगाचा
इतिहास-भूगोल रिपीट होतो. सूक्ष्मवतनमध्ये काही चक्र इत्यादी नसते. गातात देखील
जगाचा इतिहास-भूगोल रिपीट! ती इथलीच गोष्ट आहे. सतयुग-त्रेता... मध्ये जरूर संगमयुग
पाहिजे; नाही तर कलियुगाला सतयुग कोण बनवेल? नरकवासियांना स्वर्गवासी बनविण्याकरिता
बाबा संगमावर येतात. हे तर हाईएस्ट ऑथॉरिटी गॉडफादरली गव्हर्मेंट (सर्वोच्च अधिकारी
ईश्वरीय सत्ता) आहे. सोबत धर्मराज देखील आहेत. आत्मा म्हणते ‘मुझ निर्गुण हारे में
कोई गुण नाही’. कोणीही देवतेच्या मंदिरामध्ये जातात तेव्हा त्यांच्यापुढे असे
म्हणतात. म्हटले पाहिजे बाबांसमोर. त्यांना सोडून भावांसमोर (देवतांसमोर) येऊन
म्हणतात. हे देवता भाऊ आहेत ना. भावांकडून तर काहीही मिळत नाही. भावांची पूजा
करता-करता खालीच घसरत आले आहेत. आता तुम्ही मुले जाणता - बाबा आलेले आहेत,
त्यांच्याकडून आम्हाला वारसा मिळतो. बाबांनाच जाणत नाहीत, सर्वव्यापी म्हणतात. कोणी
तर म्हणतात - अखंड ज्योती तत्त्व आहे. कोणी म्हणतात - ते नावा-रूपापासून न्यारे
आहेत. जर अखंड ज्योती स्वरूप आहेत तर मग नावा-रूपापासून न्यारे कसे म्हणता. बाबांना
न जाणल्यामुळेच पतित बनले आहेत. तमोप्रधान देखील बनायचेच आहे. मग जेव्हा बाबा येतात
तेव्हा येऊन सर्वांना सतोप्रधान बनवतात. सर्व आत्मे निराकारी दुनियेमध्ये बाबांसोबत
राहतात, आणि मग इथे सतो-रजो-तमोमध्ये येऊन पार्ट बजावतात. आत्माच बाबांची आठवण करते.
बाबा येतात देखील, सांगतात देखील की, मी ब्रह्मातनाचा आधार घेतो. हा भाग्यशाली रथ
आहे. आत्म्याविना रथ थोडाच असतो. आता तुम्हा मुलांना समजावून सांगितले आहे, हा
ज्ञानाचा पाऊस आहे. नॉलेज आहे, ज्याच्यामुळे काय होते? पतित दुनियेची पावन दुनिया
बनते. गंगा-जमुना तर सतयुगामध्ये देखील असतात. म्हणतात - श्रीकृष्ण यमुनेच्या
काठावर खेळ खेळतात. अशा तर काही गोष्टी नाही आहेत. तो तर सतयुगाचा प्रिन्स आहे. खूप
चांगल्या प्रकारे त्याला सांभाळले जाते कारण फूल आहे ना. फुले किती चांगली सुंदर
असतात. सर्व जण येऊन फुलांचा सुगंध घेतात. काट्यांचा थोडाच सुगंध घेतील. आता ही तर
आहे काट्यांची दुनिया. बाबा येऊन काट्यांच्या जंगलाला फुलांचा बगीचा बनवतात म्हणून
त्यांचे नाव बबूलनाथ असे देखील ठेवले आहे. काट्यांना फूल बनवतात म्हणून महिमा गातात
- ‘काट्यांना फूल बनवणारे बाबा’. आता तुम्हा मुलांचे बाबांवर किती प्रेम असायला
पाहिजे. ते लौकिक वडील तर तुम्हाला गटारात (विकारामध्ये) टाकतात. हे बाबा तुम्हाला
गटारातून काढून २१ जन्मांसाठी पावन बनवतात. ते तुम्हांला पतित बनवतात तेव्हाच तर
लौकिक पिता असताना देखील आत्मा पारलौकिक पित्याची आठवण करते.
आता तुम्ही जाणता अर्धेकल्प बाबांची आठवण केली आहे. बाबा येतात देखील जरूर. शिवजयंती
साजरी करतात ना. तुम्ही जाणता आपण बेहदच्या बाबांचे बनलो आहोत. आता आपले नाते
त्यांच्याशी देखील आहे तसेच लौकिक पित्याशी देखील आहे. पारलौकिक बाबांची आठवण
केल्याने तुम्ही पावन बनाल. आत्मा जाणते ते आमचे लौकिक आणि हे पारलौकिक बाबा आहेत.
भक्तीमार्गामध्ये देखील हे आत्मा जाणते. तेव्हाच तर म्हणतात - हे भगवान, ओ गॉड फादर.
अविनाशी बाबांची आठवण करतात. ते बाबा येऊन स्वर्ग स्थापन करतात, हे कोणालाच ठाऊक
नाहीये. शास्त्रांमध्ये तर युगांचा कालावधी देखील खूपच प्रदीर्घ लिहून ठेवला आहे.
हे कोणाच्याही डोक्यात येत नाही की बाबा येतातच पतितांना पावन बनविण्यासाठी, तर
जरूर संगमावर येतील. कल्पाचे आयुर्मान लाखो वर्षे लिहून लोकांना एकदम घोर
अंधारामध्ये टाकले आहे. बाबांना भेटण्यासाठी खस्ता खात राहतात. म्हणतात - जे खूप
भक्ती करतात त्यांना भगवान भेटतो. सर्वात जास्त भक्ती करणाऱ्यांना जरूर सर्वात पहिला
भेटला पाहिजे. बाबांनी हिशोब देखील सांगितला आहे. सर्वात अगोदर भक्ती तुम्ही करता.
तर सर्वात पहिले तुम्हालाच भगवंताकडून ज्ञान मिळाले पाहिजे, ज्यामुळे मग तुम्हीच
नवीन दुनियेमध्ये राज्य कराल. बेहदचे बाबा तुम्हा मुलांना ज्ञान देत आहेत. यामध्ये
काही त्रास होण्याचा प्रश्नच नाही. बाबा म्हणतात - तुम्ही अर्धेकल्प आठवण केली आहे.
सुखामध्ये तर कोणी आठवणच करत नाही. शेवटी जेव्हा दुःखी होतात तेव्हा मी येऊन सुखी
बनवतो. आता तुम्ही खूप मोठे असामी बनत आहात. बघा मुख्यमंत्री, पंतप्रधान इत्यादींचे
बंगले किती फर्स्ट क्लास असतात. तिथे मग गाई इत्यादी सर्व वस्तू एकदम फर्स्ट क्लास
असतील. तुम्ही तर किती मोठे असामी (देवता) बनता. दैवी गुणवाले देवता स्वर्गाचे मालक
बनता. तिथे तुमच्यासाठी महाल देखील हिरे-माणकांचे असतात. तिथे तुमचे फर्निचर
सोन्याने मढवलेले फर्स्ट क्लास असेल. इथे तर झोपाळे इत्यादि सर्व भिकारडे आहेत. तिथे
तर सर्व वस्तू फर्स्ट क्लास हिरे-माणकांच्या असतील. हा रुद्र ज्ञान यज्ञ आहे. शिवाला
रुद्र देखील म्हणतात. जेव्हा भक्ती पूर्ण होते तेव्हा मग भगवान रुद्र यज्ञ रचतात.
सतयुगामध्ये यज्ञ किंवा भक्तीचा प्रश्नच नाही. यावेळीच बाबा हा अविनाशी रुद्र ज्ञान
यज्ञ रचतात, ज्याचे नंतर गायन चालत रहाते. भक्ती काही कायमचीच चालत राहणार नाही.
भक्ती आणि ज्ञान. भक्ती आहे रात्र, ज्ञान आहे दिवस. बाबा येऊन दिवस बनवतात तर
मुलांचे बाबांवर किती प्रेम असायला हवे! बाबा आम्हाला विश्वाचा मालक बनवत आहेत.
सर्वात प्रिय बाबा आहेत. त्यांच्यापेक्षा जास्त प्रिय वस्तू कोणती असू शकत नाही.
अर्ध्याकल्पापासून आठवण करत आला आहात. बाबा येऊन आमची दुःख हरण करा. आता बाबा आले
आहेत. समजावून सांगत आहेत की, तुम्हाला तुमच्या घर-गृहस्थीमध्ये तर रहायचेच आहे. इथे
बाबांसोबत किती काळ बसणार. बाबांसोबत तर परमधाममध्येच राहू शकता. इथे इतकी सर्व मुले
काही राहू शकणार नाहीत. टीचर प्रश्न कसे विचारतील? लाऊडस्पीकर वर उत्तर कसे देणार?
म्हणून थोड्या-थोड्या स्टुडंट्सना शिकवतात. कॉलेजेस तर खूप असतात मग त्यांच्या
परीक्षा होतात. यादी निघते. इथे तर एकच बाबा शिकवतात. हे देखील समजावून सांगितले
पाहिजे की, सर्वजण दुःखामध्येच त्या पारलौकिक बाबांची आठवण करतात. आता ते बाबा आलेले
आहेत. महाभारी महाभारत युद्ध देखील समोर उभे आहे. ते समजतात महाभारत युद्धाच्या वेळी
श्रीकृष्ण आला. असे तर होऊ शकत नाही. बिचारे गोंधळलेले आहेत ना. तरी देखील
कृष्ण-कृष्ण असे म्हणत आठवण करत रहातात. आता मोस्ट बिलवेड (सर्वात प्रिय) शिव देखील
आहेत, तर श्रीकृष्ण देखील आहे. परंतु ते शिव आहेत निराकार, तो श्रीकृष्ण आहे साकार.
निराकार बाबा सर्व आत्म्यांचे पिता आहेत. दोघेही सर्वात प्रिय आहेत. श्रीकृष्ण
देखील विश्वाचा मालक आहे ना. आता तुम्ही निर्णय करू शकता - जास्त प्रिय कोण?
शिवबाबाच तर असे लायक बनवतात ना. श्रीकृष्ण काय करतो? बाबाच त्याला असे बनवतात, तर
गायन देखील त्या बाबांचे जास्त व्हायला पाहिजे. शंकराचे तांडव दाखवतात. खरेतर तांडव
इत्यादींचा तर प्रश्नच नाही. बाबांनी समजावून सांगितले आहे तुम्ही सर्व पार्वती
आहात. हे शिव अमरनाथ तुम्हाला कथा ऐकवत आहेत. ते आहे व्हाइसलेस वर्ल्ड (निर्विकारी
दुनिया). विकाराची गोष्टच नाही. बाबा विकारी दुनिया थोडेच रचतील! विकारामध्येच दुःख
आहे. मनुष्य हठयोग इत्यादी खूप शिकतात. गुहेमध्ये जाऊन बसतात, आगीवरून देखील चालतात.
रिद्धी-सिद्धी देखील खूप आहे. जादूने खूप गोष्टी काढतात. भगवंताला देखील जादूगार,
रत्नाकर, सौदागर, म्हणतात तर जरूर चैतन्य (सजीव) आहेत ना. म्हणतात देखील मी येतो,
जादूगार आहेत ना. मनुष्यांना देवता, भिकाऱ्याला राजपुत्र बनवतात. अशी जादू कधी
बघितली आहे? अच्छा!
गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक
आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१) फुलांच्या
बागेमध्ये जायचे आहे म्हणून सुगंधी फूल बनायचे आहे. कोणालाही दुःख द्यायचे नाही.
सर्व नाती एका पारलौकिक बाबांसोबत जोडायची आहेत.
२) शिवबाबा सर्वात
प्रिय आहेत त्या एकावरच प्रेम करायचे आहे. सुखदाता बाबांची आठवण करायची आहे.
वरदान:-
कोणाचीही
कमतरता, कमजोरी न बघता आपल्या गुण आणि शक्तींचा सहयोग देणारे मास्टर दाता भव
मास्टर दाता ते आहेत,
जे सदैव याच आत्मिक भावनेमध्ये राहतात की, सर्व आत्मे आपल्यासारखे वारशाचे अधिकारी
बनावेत. कोणाच्याही कमतरतेला, कमजोरीला न बघता, ते आपण धारण केलेल्या गुणांचा आणि
शक्तींचा सहयोग देतात. ‘हा असाच आहे’ - या भावने ऐवजी ‘आपण याला देखील बाप समान
बनवायचे’, अशी शुभ भावना असावी. त्याच सोबत हीच श्रेष्ठ कामना असावी की, हे सर्व
आत्मे गरीब, दुःखी, अशांत पासून सदैव शांत, सुख-स्वरूप श्रीमंत बनावेत - तेव्हा
म्हणणार - ‘मास्टर दाता’.
बोधवाक्य:-
मनसा-वाचा-कर्मणा सेवा करणारेच निरंतर सेवाधारी आहेत, त्यांच्या प्रत्येक
श्वासामध्ये सेवा सामावलेली आहे.
अव्यक्त इशारे:- या
अव्यक्ती महिन्यामध्ये बंधनमुक्त राहून जीवनमुक्त स्थितीचा अनुभव करा.
प्रथम आपल्या
देहापासून, देहाच्या नात्यांपासून आणि जुन्या दुनियेच्या आठवणी पासून मुक्त बना.
जेव्हा या मुक्तीच्या अवस्थेचा अनुभव कराल तेव्हाच मुक्त झाल्यानंतर जीवनमुक्तीचा
अनुभव आपोआप होईल. तर चेक करा की, मी जीवन जगत असताना देखील देह, देहाची नाती आणि
जुन्या दुनियेच्या आकर्षणा पासून कितपत मुक्त बनलो आहे?