28-04-2025
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
“गोड
मुलांनो - तुमचे प्रेम विनाशी शरीरांवर असता कामा नये, एका विदेहीवर प्रेम करा,
देहाला दिसत असतानाही पाहू नका”
प्रश्न:-
बुद्धीला
स्वच्छ बनविण्याचा पुरुषार्थ कोणता आहे? स्वच्छ-बुद्धीची निशाणी काय असेल?
उत्तर:-
देही-अभिमानी बनल्यानेच बुद्धी स्वच्छ बनते. अशी देही-अभिमानी मुले स्वतःला आत्मा
समजून एका बाबांवर प्रेम करतील. बाबांकडूनच ऐकतील. परंतु जे मूढमती (बुद्धू) आहेत
ते देहावर प्रेम करतात, देहालाच शृंगारत राहतात.
ओम शांती।
ओम् शांती कोणी म्हटले आणि कोणी ऐकले? इतर सत्संगामध्ये तर जिज्ञासू ऐकतात.
महात्म्याने किंवा गुरु आदींनी ऐकवले, असे म्हणतील. इथे परमात्म्याने ऐकवले आणि
आत्म्याने ऐकले. नवीन गोष्ट आहे ना. देही-अभिमानी बनावे लागेल. बरेचजण तर इथेही
देह-अभिमानी होऊन बसतात. तुम्हा मुलांना देही-अभिमानी होऊन बसले पाहिजे. मी आत्मा
या शरीरामध्ये विराजमान आहे. शिवबाबा आम्हाला समजावून सांगतात, हे बुद्धीमध्ये
व्यवस्थित लक्षात राहिले पाहिजे. मज आत्म्याचे कनेक्शन परमात्म्या सोबत आहे.
परमात्मा येऊन या शरीराद्वारे ऐकवतात, हा (ब्रह्मा) दलाल झाला. तुम्हाला समजावून
सांगणारे ते आहेत. यांना (ब्रह्मा बाबांना) देखील वारसा तेच देतात. तर बुद्धी त्या
बाजूला गेली पाहिजे. समजा एखाद्याची ५-७ मुले आहेत तर त्यांचा बुद्धियोग आपल्या
वडिलांकडेच राहील ना कारण वडिलांकडून वारसा मिळणार असतो. भावाकडून वारसा मिळत नाही.
वारसा नेहमी पित्याकडून मिळतो. आत्म्याला आत्म्याकडून वारसा मिळत नाही. तुम्ही जाणता
आत्म्याच्या रूपामध्ये आपण सर्व भाऊ-भाऊ आहोत. आपणा सर्व आत्म्यांचे कनेक्शन एका
परमपिता परमात्म्या सोबत आहे. ते म्हणतात - ‘मामेकम् (मज एकाची) आठवण करा. मज एका
सोबतच प्रीत ठेवा, रचने सोबत ठेवू नका. देही-अभिमानी बना’. माझ्याशिवाय दुसऱ्या
कोणत्या देहधारीची आठवण करता, तर याला म्हटले जाते देह-अभिमान. भले हे देह-धारी (ब्रह्मा
बाबा) तुमच्यासमोर आहेत परंतु तुम्ही यांना पाहू नका. बुद्धीमध्ये आठवण त्यांची (शिवबाबांची)
राहिली पाहिजे. ते (दुनियावाले) तर फक्त म्हणण्यापुरते भाऊ-भाऊ म्हणतात, आता तुम्ही
जाणता आपण आत्मे परमपिता परमात्म्याची संतान आहोत. वारसा परमात्मा बाबांकडून मिळतो.
ते बाबा म्हणतात - तुमचे प्रेम माझ्या एकावर असले पाहिजे. मी स्वतः येऊन तुम्हा
आत्म्यांचा माझ्याशी साखरपुडा करवतो. कोणा देहधारीशी साखरपुडा नाही. आणि जे काही
नाते-संबंध आहेत ते देहाचे आहेत, इथली नाती आहेत. यावेळी तुम्हाला देही-अभिमानी
बनायचे आहे. आपण आत्मा बाबांकडून ऐकतो, बुद्धी बाबांकडे गेली पाहिजे. बाबा यांच्या
बाजूला बसून आपल्याला नॉलेज देतात. त्यांनी (शिव बाबांनी) शरीराचे लोन घेतलेले आहे.
आत्मा या शरीररुपी घरामध्ये येऊन पार्ट बजावते. जणू काही स्वतःला पार्ट
बजावण्याकरिता अंडर-हाऊस अरेस्ट करते (देहरूपी घरामध्ये नजरकैद करते). खरे तर आहे
मुक्त. परंतु यामध्ये (ब्रह्मा तनामध्ये) प्रवेश करून स्वतःला या घरामध्ये बंद करून
पार्ट बजावते. आत्माच एक शरीर सोडून दुसरे घेते, पार्ट बजावते. यावेळी जे जितके
देही-अभिमानी राहतील ते उच्च पद प्राप्त करतील. बाबांच्या शरीरावर देखील तुमचे
प्रेम असता कामा नये, किंचितही नको. हे शरीर तर काहीच कामाचे नाहीये. मी या
शरीरामध्ये प्रवेश करतो, फक्त तुम्हाला समजावून सांगण्याकरिता. हे आहे रावण राज्य,
परका देश. रावणाला जाळतात परंतु समजत नाहीत. चित्रे इत्यादी जी काही बनवतात,
त्यांनाच जाणत नाहीत. एकदम मूढमती (बुद्धू) आहेत. रावण राज्यामध्ये सर्व मूढमती
बनतात. देह-अभिमान आहे ना. तुच्छ-बुद्धी बनले आहेत. बाबा म्हणतात जे मूढमती असतील
ते देहाची आठवण करत राहतील, देहावर प्रेम करतील. स्वच्छ-बुद्धी जे असतील ते स्वतःला
आत्मा समजून परमात्म्याची आठवण करत परमात्म्याकडून ऐकत राहतील, यातच मेहनत आहे. हा
(ब्रह्मा तन) तर बाबांचा रथ आहे. बऱ्याच जणांचे यांच्यावर प्रेम जडते. जसा हुसेनचा
घोडा, त्याला किती सजवतात. आता महिमा तर हुसेनची आहे ना, घोड्याची तर नाहीये. जरूर
मनुष्याच्या तनामध्ये हुसेनची आत्मा आली असेल ना. ते या गोष्टींना समजत नाहीत. आता
याला म्हटले जाते - ‘राजस्व अश्वमेध अविनाशी रुद्र ज्ञानयज्ञ’. ‘अश्व’ नाव ऐकून ते
मग घोडा समजले, त्याला स्वाहा करतात. या सर्व कहाण्या आहेत भक्तीमार्गातील. आता
तुम्हाला सुंदर बनविणारा प्रवासी तर हा आहे ना.
आता तुम्ही जाणता आपण पहिले गोरे होतो मग सावळे बनलो आहोत. जे पण आत्मे सर्वात पहिले
येतात तर आधी सतोप्रधान असतात, मग सतो, रजो, तमोमध्ये येतात. बाबा येऊन सर्वांना
सुंदर बनवतात. जे पण आत्मे धर्म स्थापन करण्यासाठी येतात, ते सर्व सुंदर आत्मे (पवित्र
आत्मे) असतात, नंतर मग काम-चितेवर बसून काळे होतात. आधी सुंदर आणि नंतर सावळे बनतात.
हे नंबर वनमध्ये सर्वात प्रथम येतात तर सर्वात जास्त सुंदर बनतात. यांच्या सारखे (लक्ष्मी-नारायणा
सारखे) नॅचरल सुंदर तर कोणी असू शकत नाही. ही ज्ञानाची गोष्ट आहे. भले ख्रिश्चन लोक
भारतवासीयांपेक्षा सुंदर (गोरे) आहेत कारण तिकडचे राहणारे आहेत परंतु सतयुगामध्ये
तर नॅचरल ब्युटी आहे. आत्मा आणि शरीर दोन्ही सुंदर आहेत. यावेळी सर्वजण पतित, सावळे
आहेत मग बाबा येऊन सर्वांना सुंदर बनवतात. आधी सतोप्रधान पवित्र असतात मग उतरत-उतरत
काम-चितेवर बसून काळे होतात. आता बाबा आले आहेत सर्व आत्म्यांना पवित्र
बनविण्याकरिता. बाबांची आठवण केल्यानेच तुम्ही पावन बनाल. तर आठवण एकाचीच करायची आहे.
देह-धारीवर प्रेम करायचे नाही. बुद्धीमध्ये हे असावे की, आम्ही फक्त एका बाबांचेच
आहोत, तेच सर्व काही आहेत. या डोळ्यांनी पाहणारे जे कोणी आहेत, ते सर्व नष्ट होणार
आहेत. हे डोळे देखील नष्ट होतील. परमपिता परमात्म्याला तर त्रिनेत्री म्हटले जाते.
त्यांना ज्ञानाचा तिसरा नेत्र आहे. त्रिनेत्री, त्रिकालदर्शी, त्रिलोकीनाथ ही टायटल
त्यांना मिळाली आहेत . आता तुम्हाला तिन्ही लोकाचे ज्ञान आहे नंतर मग ते लुप्त होते,
ज्यांच्यामध्ये ज्ञान आहे तेच येऊन देतात. तुम्हाला बाबा ८४ जन्मांचे ज्ञान ऐकवतात.
बाबा म्हणतात - स्वतःला आत्मा समजा. मी या शरीरामध्ये प्रवेश करून आलो आहे तुम्हाला
पावन बनविण्याकरिता. माझी आठवण केल्यानेच पावन बनाल इतर कोणाची आठवण कराल तर
सतोप्रधान बनू शकणार नाही. पापे नष्ट होणार नाहीत, तर मग म्हणणार विनाशकाले
विपरीत-बुद्धी विनशन्ती. मनुष्य तर खूप अंधश्रद्धेमध्ये आहेत. देहधारींमध्येच मोह
ठेवतात. आता तुम्हाला देही-अभिमानी बनायचे आहे. एकामध्येच मोह ठेवायचा आहे. दुसऱ्या
कोणामध्ये मोह असेल तर याचा अर्थ बाबांपासून विपरीत बुद्धी आहे. बाबा किती समजावून
सांगतात की, मज पित्याचीच आठवण करा, यातच मेहनत आहे. तुम्ही म्हणता देखील - ‘येऊन
आम्हा पतितांना पावन बनवा’. बाबाच पावन बनवितात. तुम्हा मुलांना ८४ जन्मांची
हिस्ट्री-जिऑग्राफी बाबाच समजावून सांगतात. हे तर सोपे आहे ना. बाकी आठवणच अवघडात
अवघड सब्जेक्ट आहे. बाबांसोबत योग ठेवण्यामध्ये कोणीही हुशार नाहीये.
जी मुले आठवणीमध्ये हुशार नाहीत ती जणू काही पंडित आहेत. ज्ञानामध्ये भले कितीही
हुशार असू देत, आठवणीमध्ये राहत नाहीत तर ते पंडित आहेत. बाबा पंडिताची एक कहाणी
सांगतात ना. ज्याला ऐकवले तो तर परमात्म्याची आठवण करून पार झाला. पंडिताचा
दृष्टांत देखील तुमच्यासाठीच आहे. बाबांची आठवण करा तर पार व्हाल. फक्त मुरलीमध्ये
हुशार असाल तर पार जाऊ शकणार नाही. आठवणी शिवाय विकर्म विनाश होणार नाहीत. हे सर्व
दृष्टांत बनविले आहेत. बाबा बसून यथार्थ रीतीने समजावून सांगतात. त्याला निश्चय झाला.
एकच गोष्ट पकडून ठेवली की परमात्म्याची आठवण केल्याने पार होणार. फक्त ज्ञान असेल,
योग नसेल तर उच्च पद मिळवू शकणार नाही. असे पुष्कळ आहेत, जे आठवणीमध्ये राहत नाहीत,
मूळ गोष्टच आहे आठवणीची. खूप चांगली-चांगली सेवा करणारे आहेत, परंतु बुद्धियोग ठीक
नसेल तर फसतील. योग असणारा कधीही देह-अभिमानामध्ये फसणार नाही, अशुद्ध संकल्प येणार
नाहीत. आठवणीमध्ये कच्चा असेल तर वादळे येतील. योगाने कर्मेंद्रिये एकदम वश होतात.
बाबा राईट आणि रॉंगला ओळखण्याची बुद्धी देखील देतात. इतरांच्या देहाकडे बुद्धी
गेल्याने विपरीत बुद्धी विनशन्ती व्हाल. ज्ञान वेगळे आहे, योग वेगळा आहे. योगाने
हेल्थ, ज्ञानाने वेल्थ मिळते. योगाने शरीराचे वय वाढते, आत्मा काही लहान-मोठी होत
नाही. आत्मा म्हणेल - ‘माझ्या शरीराचे वय वाढत आहे. आता वय कमी आहे मग
अर्ध्याकल्पासाठी शरीराचे वय वाढेल. आपण तमोप्रधानापासून सतोप्रधान बनणार. आत्मा
पवित्र बनते, सर्व काही आत्म्याला पवित्र बनविण्यावर अवलंबून आहे. पवित्र बनला
नाहीत तर पद सुद्धा मिळणार नाही.
माया चार्ट ठेवण्यामध्ये मुलांना आळशी बनवते. मुलांना आठवणीच्या यात्रेचा चार्ट खूप
आवडीने ठेवला पाहिजे. बघितले पाहिजे की आपण बाबांची आठवण करतो का आणखी कोणत्या
मित्र-संबंधी इत्यादींकडे बुद्धी जाते. पूर्ण दिवसभरामध्ये कोणाची आठवण राहिली अथवा
कोणा सोबत प्रीत राहिली, किती वेळ वाया घालवला? आपला चार्ट ठेवला पाहिजे. परंतु
कोणामध्येच ताकद नाहीये जे नियमित चार्ट ठेवू शकतील. कोणी विरळाच ठेवू शकतो. माया
पूर्ण चार्ट ठेवू देत नाही. एकदम आळशी बनवते. चपळपणा नाहीसा होतो. बाबा म्हणतात -
‘मामेकम् (मज एकाची) आठवण करा’. मी तर सर्व आशिकांचा माशुक आहे. तर माशुकची आठवण
केली पाहिजे ना. माशुक बाबा म्हणतात - तुम्ही अर्धा कल्प आठवण केली आहे; आता मी
म्हणतो - माझी आठवण करा तर विकर्म विनाश होतील. असे बाबा जे सुख देणारे आहेत,
त्यांची किती आठवण केली पाहिजे. बाकीचे तर सर्व दुःख देणारे आहेत. ते काही उपयोगी
पडणारे नाहीत. अंत समयी एक परमात्मा बाबाच मदत करतात. अंतिम काळ एक असतो हदचा, एक
असतो बेहदचा.
बाबा समजावून सांगत आहेत - चांगल्या रीतीने आठवण कराल तर अकाले मृत्यू होणार नाही.
तुम्हाला अमर बनवतात. पहिली तर बाबांसोबत प्रीत-बुद्धी पाहिजे. कोणाच्या शरीरावर
प्रेम असेल तर कोसळाल (पतन होईल). नापास व्हाल. चंद्रवंशी मध्ये निघून जाल. स्वर्ग,
सतयुगी सूर्यवंशी राजाईलाच म्हटले जाते. त्रेताला देखील स्वर्ग म्हणणार नाही. जसे
द्वापर आणि कलियुग आहे तर कलियुगाला रौरव नरक, तमोप्रधान म्हटले जाते. द्वापरला इतके
म्हणणार नाही; तर मग तमोप्रधानापासून सतोप्रधान बनण्यासाठी आठवण पाहिजे. स्वतः
देखील समजतात, आपले अमक्यावर खूप प्रेम आहे, त्याच्या आधाराशिवाय माझे कल्याण होणार
नाही. आता अशा अवस्थेमध्ये जर मेला तर काय होईल. विनाशकाले विपरीत बुद्धी विनशन्ती.
मातीमोल पद मिळवाल.
आजकाल दुनियेमध्ये फॅशन, ही देखील खूप मोठी समस्या आहे. स्वतःकडे आकर्षित करण्यासाठी
शरीराला किती टिप-टॉप ठेवतात. आता बाबा म्हणतात - ‘मुलांनो, कोणाच्याही
नावा-रूपामध्ये फसू नका’. लक्ष्मी-नारायणाचा ड्रेस पहा किती रॉयल आहे. ते आहेच
शिवालय, याला म्हटले जाते वेश्यालय. या देवतांच्या समोर जाऊन म्हणतात आम्ही
वेश्यालयामध्ये राहणारे आहोत. आजकाल तर फॅशनची एवढी समस्या आहे, सर्वांची नजर जाते,
आणि मग पकडून पळवून नेतात. सतयुगामध्ये तर कायदेशीर वर्तन असते. तिथे तर नैसर्गिक
सौंदर्य असते ना. अंधश्रद्धेची गोष्ट नाही. इथे तर बघितल्यावरच प्रेम जडते तर मग
दुसऱ्या धर्मवाल्यांशी देखील लग्न करतात. आता तुमची आहे ईश्वरीय-बुद्धी;
पत्थर-बुद्धी पासून पारस-बुद्धी बाबांव्यतिरिक्त इतर कोणीही बनवू शकत नाही. तो आहेच
रावण संप्रदाय. तुम्ही आता राम संप्रदायी बनत आहात. पांडव आणि कौरव एकाच संप्रदायाचे
होते, बाकी यादव आहेत युरोपवासी. गीतेमधून कोणीच समजत नाहीत की यादव युरोपवासी आहेत.
ते तर यादव संप्रदाय देखील इथलाच म्हणतात. बाबा बसून समजावून सांगत आहेत - यादव
आहेत युरोपवासी, ज्यांनी आपल्याच विनाशासाठी ही मुसळे अर्थात मिसाईल्स इत्यादी बनवली
आहेत. पांडवांचा विजय होतो, ते जाऊन स्वर्गाचे मालक बनतील. परमात्माच येऊन स्वर्गाची
स्थापना करतात. शास्त्रांमध्ये तर दाखवले आहे पांडव वितळून मेले, मग पुढे काय झाले?
काहीच समजत नाहीत. पत्थर-बुद्धी आहेत ना. ड्रामाच्या रहस्याला कोणीही जरा सुद्धा
जाणत नाहीत. बाबांकडे मुले येतात, त्यांना सांगतो - भले दागिने इत्यादी घाला. तर
म्हणतात - ‘बाबा, इथे दागिने शोभतात कुठे! पतित आत्मा, पतित शरीराला दागिने कसे
शोभणार! तिथे तर आपण या दागिने इत्यादींनी मढलेले असणार’. अमाप धन असते. सर्वजण
सुखीच सुखी असतात. भले तिथे जाणीव होते की, हा राजा आहे, आपण प्रजा आहोत. परंतु
दुःखाची गोष्ट नाहीये. इथे अन्नधान्य इत्यादी मिळाले नाही, तर मनुष्य दुःखी होतात.
तिथे तर सर्व काही मिळते. दुःख हा शब्द मुखातून निघणारच नाही. नावच आहे स्वर्ग.
युरोपियन लोक त्याला पॅराडाईज म्हणतात. समजतात तिथे गॉड-गॉडेज राहत होते. म्हणून
त्यांची चित्रे देखील खूप खरेदी करतात. परंतु तो स्वर्ग मग कुठे गेला - हे कोणालाच
माहीत नाही. तुम्ही आता जाणता हे चक्र कसे फिरते. नवीन तीच जुनी, जुनी तीच मग नवीन
दुनिया बनते. देही-अभिमानी बनण्यासाठी जास्त मेहनत आहे. तुम्ही देही-अभिमानी
बनल्याने या अनेक आजार इत्यादींपासून सुटू शकाल. बाबांची आठवण केल्याने उच्च पद
प्राप्त कराल. अच्छा!
गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक
आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१) कोणाही
देहधारीला आपला आधार बनवायचा नाही. शरीरांवर प्रेम करायचे नाही. हृदयापासूनचे प्रेम
एका बाबांवर करायचे आहे. कोणाच्याही नावा-रूपामध्ये अडकायचे नाही.
२) आवडीने आठवणीचा
चार्ट ठेवायचा आहे, यामध्ये आळशी बनायचे नाही. चार्टमध्ये बघायचे आहे - माझी बुद्धी
कोणाकडे जाते का? मी किती वेळ वाया घालवतो? मला सुख देणाऱ्या बाबांची किती वेळ आठवण
राहते?
वरदान:-
गृहस्थ
व्यवहार आणि ईश्वरीय व्यवहार दोन्हींच्या समानतेद्वारे हलके आणि सफल भव
सर्व मुलांना शरीर
निर्वाह आणि आत्म निर्वाहाची डबल सेवा मिळालेली आहे. परंतु दोन्ही सेवांमध्ये वेळेचे,
शक्तींचे समान अटेंशन हवे. जर श्रीमताचा काटा ठीक असेल तर दोन्ही साईड समान असतील.
परंतु ‘गृहस्थ’ शब्द बोलताच ‘गृहस्थी’ बनता त्यामुळे मग बहाणेबाजी सुरू होते.
म्हणून ‘गृहस्थी’ नाही ‘ट्रस्टी’ आहोत, या स्मृतीने गृहस्थ व्यवहार आणि ईश्वरीय
व्यवहार दोन्हींमध्ये समानता ठेवा तर कायम हलके आणि सफल रहाल.
बोधवाक्य:-
फर्स्ट
डिव्हिजनमध्ये येण्यासाठी कर्मेंद्रिय जीत, मायाजीत बना.
अव्यक्त इशारे -
“कंबाइंड रुपाच्या स्मृती द्वारे सदा विजयी बना”
तुमच्या शिव-शक्तीच्या
कंबाइंड रुपाचे यादगार कायम पुजले जाते. शक्ती, शिवापासून वेगळी नाही आणि शिव,
शक्तीपासून वेगळा नाही. असे कंबाइंड रुपामध्ये रहा, याच स्वरूपाला ‘सहजयोगी’ म्हटले
जाते. योग लावणारे नाही परंतु कायम कंबाइंड अर्थात सोबत राहणारे. जे वचन दिले आहे
की, ‘सोबत राहू, सोबत जगू, सोबत जाऊ…’, हे वचन पक्के लक्षात ठेवा.