28-05-2026
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
“गोड मुलांनो - तुम्ही
बाबांकडे आला आहात आपले श्रेष्ठ भाग्य बनविण्याकरिता, जितके श्रीमतावर चालाल तितके
श्रेष्ठ भाग्य बनेल”
प्रश्न:-
भक्तीची अशी
कोणती एक सवय आता तुम्हा मुलांमध्ये असता कामा नये?
उत्तर:-
भक्तीमध्ये
थोडेजरी दुःख झाले, आजारपण आले की म्हणतात - ‘हे राम’, ‘हे भगवान’. ‘हाय-हाय’
करण्याची सवय भक्तीमध्ये असते. तुम्ही आता कधीही मुखातून असे बोल काढायचे नाहीत.
तुम्हाला तर आतल्या आत गोड बाबांची प्रेमाने आठवण करायची आहे.
गीत:-
तकदीर जगाकर
आई हूँ...
ओम शांती।
प्रत्येक
मनुष्य पुरुषार्थ करतो - सुख आणि शांतीचे नशीब बनविण्याकरिता. साधू-संत, संन्यासी
इत्यादी म्हणतात, आम्हाला शांती हवी आहे. दुःख दूर करा, सुख द्या. समजतात - भगवानच
मनुष्यमात्रांचा दुःख-हर्ता, सुख-कर्ता आहे. आता मनुष्य काही भगवंताला जाणत नाहीत.
तुम्ही तर म्हणता - शिव-बाबा. ब्रह्मा, विष्णू, शंकर यांना काही ‘बाबा’ म्हणणार नाही.
ते तर देवता आहेत. भगवंतालाच ‘बाबा’ म्हणणार, ते आहेत निराकार, ज्यांची पूजा करतात.
जाणतात की शिवबाबा सर्वांचे आहेत. परंतु हे समजत नाहीत की, आपण त्यांना ‘बाबा’ का
म्हणतो. ‘बाबा’, तर एक लौकिक देखील असतात, मग हे कोणते ‘बाबा’ आहेत! हे आत्मा म्हणते
की, ते निराकार बाबा आहेत. ते देखील निराकार आहेत, आपण आत्मे देखील निराकार आहोत.
साकार बाबा असताना देखील आत्मा त्या बाबांना विसरत नाही. गॉड फादर आहे, आपण त्यांची
मुले आहोत. इथे म्हणतात - परमपिता. इंग्रजीमध्ये म्हणतात - गॉड फादर, सुप्रीम सोल,
सर्वोच्च. लौकिक बाबा तर शरीराचे रचयिता आहेत आणि ते आहेत पारलौकिक बाबा. बाबाच
बसून मुलांना समजावून सांगतात. बाबांची आठवण करतात कारण बाबांकडून वारसा मिळतो.
तुम्ही बाबांकडे आलाच आहात वारसा घेण्यासाठी. दुःख-हर्ता, सुख-कर्ता बाबाच येऊन
सुखाचा मार्ग सांगतात. तिथे मग दुःखाचे नामोनिशाण सुद्धा राहत नाही. इथे तर खूप
दुःख आहे ना, सर्वजण आळवणी करतात. दुनियेमध्ये अजूनही खूप दुःख येणार आहे. कोणाचा
मृत्यू होतो तेव्हा किती दुःखी होतात. ‘हाय भगवान’ असे म्हणून रडतात. तेच कल्याणकारी
बाबा आहेत. गाता तर जरूर दुःख हरण केले आहे, सुख दिले आहे ना. बाबा येऊन समजावून
सांगत आहेत - मुलांनो तुम्ही कल्प-कल्प जेव्हा खूप दुःखी, पतित होता तेव्हा मला
बोलावता, ‘ओ बाबा, या’. मी कल्प-कल्प येतोच, संगमावर. पावन दुनियेचा आदि काळ आणि
पतित दुनियेचा अंत काळ याच्या मधल्या काळाला संगम म्हटले जाते. हे एकच संगमयुग गायले
जाते. बाबा येतात सर्वांची ज्योत जागृत करण्यासाठी, दुःख हरण करून सुख देण्यासाठी.
तुम्ही जाणता आम्ही पारलौकिक बाबांपाशी आलो आहोत, जे बाबा यांच्यामध्ये (ब्रह्मा
बाबांमध्ये) प्रवेश करून आले आहेत. ते स्वतः सांगतात - ‘मी यांच्यामध्ये प्रवेश
करून यांचे नाव ब्रह्मा ठेवतो’. तुम्ही सर्व आहात ब्रह्माकुमार आणि कुमारी. तुम्हाला
हा निश्चय आहे की आम्ही बाबांकडून सुखाचा वारसा घेण्याकरिता ब्रह्माची संतान बनलो
आहोत. तुम्हा मुलांनाच सुख मिळाले होते, जेव्हा या लक्ष्मी-नारायणाचे राज्य होते.
आता आहे कलियुग, दुःख-धाम. त्यानंतर पुन्हा सतयुग येईल. वर्ल्डची हिस्ट्री-जिओग्राफी
रिपीट होते ना. सतयुगामध्ये पुन्हा या लक्ष्मी-नारायणाचेच राज्य असायला हवे. हे
चक्र फिरतच राहते. बाबांनी समजावून सांगितले आहे - तुम्ही नरकवासी बनला आहात आता
पुन्हा स्वर्गवासी बनायचे आहे. तुम्हा देवी-देवतांचे झाड खूप छोटे होते. आता
तुम्हाला स्मृती आली आहे, आम्हीच ८४ जन्म घेतले आहेत. आम्ही साऱ्या विश्वाचे मालक
होतो, आणि मग पुनर्जन्म घेत आलो आहोत. आता हा तुमच्या ८४ जन्मांमधील अंतिम जन्माचा
देखील अंतिम काळ आहे. दुनिया नवीन पासून जुनी नक्कीच होणार. नवीन दुनिया पावन होती,
आता जुनी पतित दुनिया आहे. किती दुःखी कंगाल आहेत. भारत खूप श्रीमंत होता. पवित्र
गृहस्थ आश्रम होता. पवित्र प्रवृत्ती मार्ग होता, संपूर्ण निर्विकारी होते, सर्वगुण
संपन्न, १६ कला संपूर्ण होते. या गोष्टी शास्त्रांमध्ये नाहीत. शास्त्रे आहेत भक्ती
मार्गासाठी. त्यामध्ये भक्तीच्याच चालीरीती आहेत. बाबांना भेटण्याचा मार्ग
शास्त्रांमध्ये सापडू शकत नाही. समजतात देखील - भगवंताला इथे यायचे आहे मग तिथे
पोहोचण्याचा तर प्रश्नच येत नाही. यज्ञ, तप इत्यादी करणे - हा काही मार्ग नाहीये.
भगवंताला बोलावतातच की ‘या, येऊन मार्ग सांगा. आमची आत्मा तमोप्रधान बनली आहे,
ज्यामुळे उडू शकत नाही म्हणजेच बाबांकडे जाऊ शकत नाही’. तसे तर आत्मा एक शरीर सोडून
दुसरे घेते. कुठून कुठल्या कुठे निघून जाते. अमेरिकेलाही जाऊ शकते. जर कोणाचा कोणाशी
संबंध असेल तर आत्मा लगेच एका सेकंदामध्ये तिथे उडून जाईल. बाकी उडून आपल्या घरी
परत जाईल, हे होऊ शकत नाही. पतित तिथे जाऊ शकत नाहीत, म्हणून बोलावतात, ‘हे
पतित-पावन या’. बाबा जेव्हा येतात तेव्हा येऊन समजावून सांगतात - ‘मी येतोच तेव्हा,
जेव्हा सारी दुनिया पतित असते’. पतित दुनियेमध्ये एकही पावन नाहीये. समजतात की गंगा
पतित-पावनी आहे, म्हणून तिथे स्नान करण्यासाठी जातात. परंतु पाण्याने काही कोणी
पावन होऊ शकत नाही. जुनी दुनिया आहेच पतित, नवीन दुनिया आहे पावन. आता तुम्ही
बेहदच्या बाबांकडून वारसा घेण्यासाठी आला आहात. तुम्हाला पुण्य-आत्मा बनायचे आहे.
तुमची आत्मा सतोप्रधान होती ती आता तमोप्रधान आहे. आता पुन्हा सतोप्रधान काही गंगा
स्नान केल्याने बनणार नाहीये. पतितांना पावन बनविणे - हे तर बाबांचेच काम आहे. बाकी
ती पाण्याची नदी तर सर्व ठिकाणी आहे. ढगांमधून पावसाचे पाणी पडते, ते सर्वांना मिळते.
पाण्याची नदी जर पावन बनवत असती, मग तर सर्वांना पावन केले असते. पावन बनण्याची
युक्ती बाबाच येऊन यांच्याद्वारे (ब्रह्मा बाबांद्वारे) सांगतात. यांची स्वतःची
आत्मा आहे. बाबा म्हणतात - मला स्वतःचे शरीर नाहीये. कल्प-कल्प तुम्हाला समजावून
सांगण्यासाठी मी यांच्यामध्येच येतो. तुम्ही आपल्या जन्मांना जाणत नाही. कल्पाचे
आयुष्य लाखो वर्षे आहे असे म्हणतात.
बाबा म्हणतात - हे ८४
जन्मांचे चक्र आहे. ५ हजार वर्षांमध्ये ८४ लाख जन्म कोणीही घेऊ शकत नाही. तर बाबा
समजावून सांगत आहेत की, स्वर्गामध्ये तुम्ही १६ कला संपूर्ण होता मग २ कला कमी
झाल्या, नंतर मग हळूहळू कला कमी होत जातात. नवीन दुनिया मग पुन्हा जुनी होते.
द्वापर कलियुगाला पतित दुनिया म्हटले जाते. या गोष्टी काही शास्त्रांमध्ये नाहीत.
मलाच ज्ञानाचा सागर म्हणतात. मी काही शास्त्रे वाचतो का? मी या सृष्टीच्या
आदि-मध्य-अंताला जाणतो. भक्तीमार्ग वाल्यांना हे ज्ञान असू शकत नाही. ते सर्व आहे
भक्तीचे ज्ञान. गातात देखील - ‘आम्ही पापी, नीच आहोत. आमच्यामध्ये कोणताही गुण नाही,
तुम्हीच दया करा…’ यांच्यावर दया केली गेली आहे तेव्हाच तर मनुष्यापासून देवता बनले
आहेत, यालाच म्हटले जाते सर्वश्रेष्ठ भाग्य. शाळेमध्ये नशीब घडविण्यासाठी जातात.
कोणी जज, कोणी इंजिनिअर बनतात. ते आहे विकारी भाग्य, हे तुमचे बनते ईश्वरा द्वारे
भाग्य; म्हणूनच बोलावतात - दुःख-हर्ता सुख-कर्ता. देवता बनविण्याकरिता बाबांशिवाय
इतर कोणीही शिकवू शकत नाही. बाबा आत्म्यांशी बसून बोलत आहेत. आत्मा म्हणते - ‘हे
माझे शरीर आहे’. शरीर काही असे म्हणणार नाही की, ‘माझी आत्मा’. शरीराच्या आत आत्मा
आहे, ती म्हणते - ‘हे माझे शरीर आहे’. मनुष्य म्हणतात - ‘माझ्या आत्म्याला वेदना
देऊ नका’. आत्मा शरीरात नसेल तर बोलणारही नाही. आत्मा म्हणते, ‘मी एक शरीर सोडून
दुसरे घेतो’. आम्ही नक्कीच ८४ जन्म भोगले आहेत, नरकवासी बनलो आहोत. आता पुन्हा
तुम्ही स्वर्गवासी बनण्याचा पुरुषार्थ करत आहात. स्वर्गवासी तर बाबाच बनवतील.
स्वर्ग म्हटलेच जाते सतयुगाला. हे जे म्हणतात की, अमका स्वर्गवासी झाला, हे खोटे
बोलतात. हा तर नरक आहे. कोणाचा मृत्यू झाला तर म्हणतात - स्वर्गवासी झाला; तर मग
पुन्हा नरकामध्ये कशाला बोलावतात की, येऊन भोजन करा. स्वर्गामध्ये तर त्यांना खूप
पक्वान्ने मिळतात मग तुम्ही नरकामध्ये कशाला बोलावता? माणसांना एवढी सुद्धा समज
नाहीये. बाबा बसून समजावून सांगतात - आता हे कलियुग संपणार आहे, याला आग लागेल. हे
सर्व नष्ट होतील. तुम्ही मुले जी बाबांकडून वारसा घेता, ती सतयुगामध्ये येऊन राज्य
करतील. या लक्ष्मी-नारायणाला हा वारसा कोणी दिला? बाबांनी. तुम्ही आता बाबांद्वारे
लायक बनत आहात. तुम्ही म्हणाल - आम्ही नरक-वासीचे स्वर्ग-वासी बनत आहोत. बाबा
म्हणतात - मी काही स्वर्गवासी बनत नाही. मी तर परमधाममध्ये राहतो.
नरकवासी-स्वर्गवासी तुम्ही बनता. आत्म्याचे निवासस्थान शांतीधाम आहे, मग तुम्ही
सुखधाम मध्ये येता. हे आहेच दुःख-धाम, याचा आता विनाश होणार आहे. हे कोणालाच ठाऊक
नाहीये की भगवान ब्रह्माच्या तना मध्ये येऊन राजयोग शिकवतात. ते (दुनियावाले)
समजतात की श्रीकृष्ण आला, श्रीकृष्णाच्या तना मध्ये सुद्धा म्हणत नाहीत. कृष्णाला
भगवान म्हणू शकत नाही. तो तर विश्वाचा मालक आहे. सर्वांचे लिबरेटर (मुक्तीदाता) एक
आहेत, ते आहेत सुप्रीम आत्मा, परम-आत्मा. दुनियेमध्ये असा कोणताही सत्संग असत नाही,
जिथे असे समजतील की आम्ही बाबांकडून स्वर्गाचा वारसा घेतो. पतितापासून पावन बनविणारे
तर एकच बाबा आहेत. बाबा म्हणतात - मी तुमचा खरा गुरू आहे, तुम्हाला पावन बनवतो. बाकी
गंगेचे पाणी काही पावन बनवू शकत नाही. ही आहेच पापात्म्यांची दुनिया. काहीही करा
शिडी खाली उतरायचीच आहे. सतोप्रधानापासून तमोप्रधान बनायचेच आहे. तुम्ही काही भक्ती
करत नाही, ‘हाय-राम’ सुद्धा म्हणणार नाही. ते तर तुमचे बाबा आहेत, तुम्हाला शिकवत
आहेत. ‘हे भगवान या’, ‘हे राम’, असे देखील म्हणता कामा नये. परंतु खूपजणांना ही सवय
जडलेली आहे त्यामुळे शब्द निघून जातात. तुम्हाला बाबा म्हणतात - माझी आठवण करा तर
विकर्म विनाश होतील आणि तुम्ही माझ्याजवळ याल. आठवण एकाचीच करायची आहे.
बाबा म्हणतात - हा
तुमचा अंतिम जन्म आहे. आता वारसा घेतला तो घेतला, पुन्हा कधीही मिळू शकणार नाही.
बाबांनी समजावून सांगितले आहे, हे जे स्वतःला हिंदू म्हणवतात, ते मुळचे देवी-देवता
धर्माचे आहेत. ख्रिश्चन धर्माचे लोक कधीही नाव बदलत नाहीत. भले ते तमोप्रधान आहेत
तरीही ख्रिश्चन धर्मामध्येच आहेत. तुम्ही देवी-देवता आहात परंतु पतित असल्याकारणाने
स्वतःला हिंदू म्हणवून घेता, स्वतःला देवता म्हणू शकत नाही. हे विसरले आहात की आपण
मुळचे देवी-देवता होतो. कोणीही स्वतःला देवता धर्माचे म्हणवून घेत नाहीत कारण विकारी
आहेत. हा आहे देह-अभिमान. मुलांना खूप चांगल्या प्रकारे समजावून सांगितले जाते. इथे
काही कोणी साधू-संत इत्यादी नाहीत. मी व्यापारी आहे, अमका आहे - हा सर्व आहे
देह-अभिमान. आता तुम्हाला देही-अभिमानी बनायचे आहे. देही-अभिमानी बनण्यामध्येच
मेहनत आहे. तुम्हाला बाबांकडून वारसा घ्यायचा असेल तर बाबांची आठवण करायची आहे. ‘कम
कार डे, दिल यार डे… (हाताने काम करत रहा आणि मनाने बाबांची आठवण करत रहा). तुम्ही
आशिक आहात, एका माशुकचे. सर्वांचे सद्गती दाता एक माशूक आहेत. ते येतातच तेव्हा,
जेव्हा सर्वांना सद्गती मिळते, स्वर्गाची स्थापना होते, दुःखाचे नामोनिशाण नाहीसे
होते. आता तुम्ही मुले इथे आला आहात - बेहदच्या बाबांकडून स्वर्गाचा, २१ जन्मांसाठी
कायम सुखाचा वारसा घेण्यासाठी. इतर कोणताही मनुष्यमात्र कोणालाही स्वर्गाचा मालक
बनवू शकत नाही. शिवबाबा भारतामध्येच येऊन भारताला स्वर्ग बनवतात. शिवजयंती देखील
साजरी करतात परंतु बाबांकडून आपल्याला स्वर्गाचा वारसा मिळतो हेच विसरून गेले आहेत.
अच्छा!
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१) अभ्यासाच्या
आधारे आपले भाग्य श्रेष्ठ बनवायचे आहे, मनुष्यापासून देवता बनायचे आहे. पावन बनून
परत घरी जायचे आहे आणि मग नवीन दुनियेमध्ये यायचे आहे.
२) हातांनी काम करत
असताना एका बाबांच्या आठवणीमध्ये राहायचे आहे. कोणतीही उलट-सुलट गोष्ट ना ऐकायची आहे,
ना ऐकवायची आहे.
वरदान:-
सदैव आपल्या
पवित्र स्वरूपामध्ये स्थित राहून गुणरूपी मोती टिपणारे होली-हंस भव
तुम्हा होलीहंसांचे
स्वरूप आहे पवित्र आणि कर्तव्य आहे सदैव गुणरूपी मोती टिपणे. अवगुण रूपी खडे कधीही
बुद्धीमध्ये स्वीकारू नयेत. परंतु या कर्तव्याचे पालन करण्यासाठी सदैव एक आज्ञा
लक्षात राहावी की, ना वाईट विचार करायचा आहे, ना वाईट ऐकायचे आहे, ना वाईट बघायचे
आहे, ना वाईट बोलायचे आहे… जे या आज्ञेला कायमचे लक्षात ठेवतात ते सदैव सागराच्या (ज्ञान
सागराच्या) काठावर राहतात. सागरच हंसांचे राहण्याचे ठिकाण आहे.
बोधवाक्य:-
चालता-फिरता
फरिश्ता स्वरूपामध्ये राहणे - हीच ब्रह्मा बाबांची दिल-पसंत गिफ्ट आहे.
हे अव्यक्त इशारे -
सदैव अचल, अडोल एकरस स्थितीचा अनुभव करा.
सदैव अचल-अडोल
राहण्यासाठी स्व-उन्नती आणि सेवेच्या उन्नतीमध्ये सदैव बिझी रहा, सर्वांप्रति शुभ
भावना ठेवा. नात्याच्या आधारावर पार्ट नको, सेवेच्या नात्याने पार्ट बजावा. दुसरे -
विनाशी साधनांना सहारा अथवा आधार बनवू नका. हे सर्व निमित्त मात्र आहे, सेवेसाठी आहे.
सेवार्थ कार्यामध्ये वापरा आणि न्यारे व्हा. साधनांच्या आकर्षणामध्ये मन आकर्षित
होता कामा नये.