28-06-2025      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - आपल्या उन्नतीसाठी रोज रात्री झोपण्यापूर्वी आपला पोतामेल पहा, चेक करा - आपण पूर्ण दिवसभरामध्ये कोणाला दुःख तर दिले नाही ना?”

प्रश्न:-
महान सौभाग्यशाली मुलांमध्ये कोणती बहाद्दुरी असेल?

उत्तर:-
जे महान सौभाग्यशाली आहेत ते पती-पत्नी सोबत राहत असताना देखील भाऊ-भाऊ बनून राहतील. पती-पत्नीचे भान नसेल. पक्के निश्चय बुद्धी असतील. महान सौभाग्यशाली मुले लगेच समजतात - मी देखील स्टुडंट, ही देखील स्टुडंट, भाऊ-बहीण झालो; परंतु ती बहाद्दुरी तेव्हा चालू शकते जेव्हा स्वतःला आत्मा समजता.

गीत:-
मुखड़ा देख ले प्राणी…

ओम शांती।
ही गोष्ट दररोज बाबा मुलांना समजावून सांगतात की, झोपतेवेळी आपला पोतामेल आतून पहा की, कोणाला दुःख तर दिले नाही आणि किती वेळ बाबांची आठवण केली? ही आहे मुख्य गोष्ट. गाण्यामध्ये देखील म्हणतात - स्वतःमध्ये पहा - आपण किती तमोप्रधानापासून सतोप्रधान बनलो आहोत? पूर्ण दिवसामध्ये किती वेळ आपल्या गोड बाबांची आठवण केली? कोणत्याही देहधारीची आठवण करायची नाहीये. सर्व आत्म्यांना सांगितले जाते - आपल्या बाबांची आठवण करा. आता वापस जायचे आहे. कुठे जायचे आहे? शांतीधामला जाऊन नवीन दुनियेमध्ये जायचे आहे. ही तर जुनी दुनिया आहे ना. जेव्हा बाबा येतील तेव्हाच स्वर्गाचे दरवाजे उघडतील. आता तुम्ही मुले जाणता आपण संगमयुगावर बसलो आहोत. हे देखील आश्चर्य आहे जे संगमयुगावर येऊन आगबोटीमध्ये बसून देखील नंतर मग उतरतात. आता तुम्ही संगमयुगावर पुरुषोत्तम बनण्यासाठी येऊन नौकेमध्ये बसला आहात, पार जाण्यासाठी. तर मग जुन्या कलियुगी दुनियेमधून मन काढून घ्यावे लागेल. या शरीराद्वारे फक्त पार्ट बजावावा लागेल. आता आपल्याला अतिशय आनंदाने परत जायचे आहे. मनुष्य मुक्तीकरिता किती डोकेफोड करतात परंतु मुक्ती-जीवनमुक्तीचा अर्थ समजत नाहीत. शास्त्रांमधले केवळ शब्द ऐकलेले आहेत परंतु ती काय चीज आहे, कोण देतात, कधी देतात, हे काहीच माहित नाहीये. तुम्ही मुले जाणता बाबा येतात मुक्ती-जीवनमुक्तीचा वारसा देण्यासाठी. आणि ते देखील काही एकदाच नाही तर अनेक वेळा. अगणित वेळा तुम्ही मुक्ती मधून जीवनमुक्तीमध्ये आणि नंतर मग जीवनबंधमध्ये आला आहात. तुम्हाला आता ही समज आली आहे की आपण आत्मा आहोत, बाबा आम्हा मुलांना शिकवण तर खूप देतात. तुम्ही भक्तिमार्गामध्ये दुःखामध्ये आठवण करत होता, परंतु ओळखत नव्हता. आता मी तुम्हाला माझी ओळख दिली आहे की, माझी कशी आठवण करावी ज्यामुळे तुमची विकर्म विनाश होतील. आता पर्यंत किती विकर्म झाली आहेत, ते सर्व आपला पोतामेल ठेवल्याने माहित होईल. जे सेवेमध्ये मग्न राहतात त्यांना माहीत होते, मुलांना सेवेची आवड असते. मनुष्यांचे जीवन हिऱ्यासमान बनविण्याकरिता आपसामध्ये भेटून चर्चा करून सेवा करण्यासाठी जातात. हे किती पुण्याचे कार्य आहे. यामध्ये खर्च इत्यादीचा देखील काही प्रश्नच नाही. हिऱ्यासमान बनण्यासाठी फक्त बाबांची आठवण करायची आहे. पुखराज परी, सब्ज परी ही जी नावे देखील आहेत, ते तुम्हीच आहात. जितके आठवणीमध्ये रहाल तितके हिऱ्यासमान बनाल. कोणी माणकांसारखे, तर कोणी पुखराज सारखे बनतील. ९ रत्ने असतात ना. जेव्हा कोणत्या ग्रहचारीचा (ग्रहांचा प्रभाव) असतो तेव्हा ९ रत्नांची अंगठी घालतात. भक्तीमार्गामध्ये खूप टोटके (तोडगे) देतात. इथे तर सर्व धर्मवाल्यांसाठी एकच टोटका आहे - ‘मनमनाभव’; कारण गॉड इज वन. मनुष्यापासून देवता बनण्यासाठी किंवा मुक्ती-जीवनमुक्ती प्राप्त करण्यासाठी, पुरुषार्थ तर एकच आहे, फक्त बाबांची आठवण करायची आहे, बाकी त्रास इत्यादीचा काही प्रश्नच नाही. विचार केला पाहिजे - माझी आठवण टिकत का नाही. संपूर्ण दिवसभरामध्ये इतकी थोडीशीच का आठवण केली? जर का या आठवणीद्वारे आपण एव्हर हेल्दी, निरोगी बनणार आहोत तर का नाही आपला चार्ट ठेवून उन्नतीला प्राप्त करावे. असे पुष्कळ आहेत जे दोन-चार दिवस चार्ट ठेवून मग विसरून जातात. कोणालाही समजावून सांगणे खूप सोपे आहे. नवीन दुनियेला सतयुग आणि जुन्याला कलियुग म्हटले जाते. कलियुग बदलून सतयुग होईल. बदलते आहे तेव्हाच तर आम्ही सांगत आहोत.

कितीतरी मुलांना हा देखील निश्चय नाहीये की, हे तेच निराकार बाबा आपल्याला ब्रह्माच्या तनामध्ये येऊन शिकवत आहेत. अरे ब्राह्मण आहेत ना. ब्रह्माकुमार-कुमारी म्हणतात, त्याचा अर्थच काय आहे, वारसा कुठून मिळणार! ॲडॉप्शन (दत्तक घेणे) तेव्हा होते जेव्हा काही प्राप्ती होते. तुम्ही ब्रह्माची मुले ब्रह्माकुमार-कुमारी कशासाठी बनला आहात? खरोखरच बनले आहात की यामध्ये देखील कोणाला संशय उत्पन्न होतो. जी महान सौभाग्यशाली मुले आहेत ती पती-पत्नी सोबत राहत असताना देखील भाऊ-भाऊ होऊन राहतील. पती-पत्नीचे भान नसेल. पक्के निश्चय बुद्धी नसतील तर पती-पत्नी ही दृष्टी बदलण्यासाठी देखील वेळ लागतो. महान सौभाग्यशाली मुले लगेच समजून जातात. मी देखील स्टुडंट, ही देखील स्टुडंट भाऊ-बहीण झालो. ही बहाद्दुरी तेव्हाच चालू शकते जेव्हा स्वतःला आत्मा समजता. आत्मे तर सर्व भाऊ-भाऊ आहेत, मग ब्रह्माकुमार-कुमारी बनल्याने भाऊ-बहीणी होतात. कोणी तर बंधनमुक्त देखील आहेत, तरी देखील कशा ना कशामध्ये बुद्धी जाते. कर्मातीत अवस्था होण्यामध्ये वेळ लागतो. तुम्हा मुलांनी खूप आनंदात राहिले पाहिजे. कोणतेही झंझट नाही. आपण आत्मे आता जुने शरीर इत्यादी सर्व सोडून बाबांकडे जातो. आपण किती पार्ट बजावला आहे. आता चक्र पूर्ण होत आहे. अशा प्रकारे आपल्याशीच गोष्टी कराव्या लागतील. जितक्या गोष्टी करत रहाल तितके हर्षित देखील रहाल आणि आपले वर्तन देखील बघत रहाल की, आपण कितपत लक्ष्मी-नारायणाला वरण्यालायक बनलो आहोत? बुद्धीने समजले जाते - आता थोड्याच वेळेत आपल्याला हे जुने शरीर सोडायचे आहे. तुम्ही ॲक्टर्स देखील आहात ना. स्वतःला ॲक्टर्स समजता, या अगोदर असे समजत नव्हता. नॉलेज मिळाले आहे तर तुम्ही आतून खूप आनंदी असले पाहिजे. जुन्यापासून वैराग्य, तिरस्कार वाटला पाहिजे.

तुम्ही बेहदचे संन्याशी. राजयोगी आहात. या जुन्या शरीराचा देखील बुद्धीने संन्यास करायचा आहे. आत्मा समजते - यामध्ये बुद्धी अडकू द्यायची नाहीये. बुद्धीने या जुन्या दुनियेचा, जुन्या शरीराचा संन्यास केला आहे. आता आपण आत्मे जात आहोत, जाऊन बाबांना भेटणार. ते देखील तेव्हा होईल जेव्हा एका बाबांची आठवण कराल. इतर कोणाची आठवण केलीत तर जरूर त्याचीच आठवण येईल. मग सजा देखील भोगावी लागेल आणि पद सुद्धा भ्रष्ट होईल. जे चांगले-चांगले स्टुडंट असतात ते स्वतःशी प्रतिज्ञा करतात की, आम्ही स्कॉलरशिप घेणारच. तर इथे देखील प्रत्येकाने हे लक्षात ठेवायचे आहे की, आम्ही बाबांकडून पूर्ण राज्यभाग्य घेऊनच राहणार. त्यांची मग वागणूक देखील तशीच राहील. पुढे चालून पुरुषार्थ करत-करत गैलप करायचे आहे (वेगाने पुढे जायचे आहे). ते तर तेव्हाच होईल जेव्हा रोज रात्रीला आपली अवस्था पहाल. बाबांकडे समाचार तर प्रत्येकाचा येतो ना. बाबा प्रत्येकाला समजू शकतात, कोणाला तर म्हणतात की, तुझ्यामध्ये ते लक्षण दिसून येत नाही. या लक्ष्मी-नारायणासारखा चेहरा दिसून येत नाही. आपले वर्तन, खाणे-पिणे इत्यादी तर बघ. सेवाच कुठे करतोस! मग काय बनशील! मग मनामध्ये समजतात - आपण काही करून दाखवावे. यामध्ये प्रत्येकाने आपले श्रेष्ठ भाग्य बनविण्यासाठी स्वतंत्रपणे अभ्यास करायचा आहे. जर श्रीमतावर चालत नसाल तर मग इतके उच्च पद देखील प्राप्त करू शकणार नाही. आता तुम्ही पास झाला नाहीत तर कल्प-कल्पांतर होणार नाही. तुम्हाला सर्व साक्षात्कार होतील - आपण कोणते पद घेण्याच्या लायक आहोत? आपल्या पदाचा देखील साक्षात्कार करत रहाल. सुरुवातीला देखील साक्षात्कार घडत होते परंतु मग बाबा ते सांगण्यास मना करत होते. अखेरीला सर्व माहीत होईल की आपण काय बनणार परंतु तेव्हा मग काहीच करू शकणार नाही. कल्प-कल्पांतरासाठी अशी हालत होईल. तुम्ही डबल मुकुट, डबल राज्यभाग्य प्राप्त करू शकणार नाही. आता पुरुषार्थ करण्यासाठी मार्जिन खूप आहे, त्रेताच्या अंतापर्यंत १६१०८ ची मोठी माळा बनणार आहे. इथे तुम्ही आलाच आहात नरापासून नारायण बनण्याचा पुरुषार्थ करण्यासाठी. जेव्हा कमी पदाचा साक्षात्कार होईल तर त्यावेळी जसे तिरस्कार वाटू लागेल, तोंड खाली घालावे लागेल. आपण तर काहीच पुरुषार्थ केला नाही. बाबांनी किती समजावून सांगितले की, चार्ट ठेवा, असे करा त्यासाठी बाबा सांगत होते जी पण मुले येतात सर्वांचा फोटो असावा. भले ग्रुपचा तरी एकत्र फोटो असावा. पार्ट्या घेऊन येता ना. मग त्या फोटो सोबत तारीख आणि निगेटिव्ह कॉपी (ब्लू-प्रिंट) इत्यादी सर्व एकत्र लावलेले असावे. मग बाबा सांगतील कोण-कोण घसरले (पतित बनले)? बाबांकडे समाचार तर सर्व येतात, सांगत राहतात. किती जणांना माया खेचून घेऊन गेली. नष्ट झाले. मुली देखील खूप कोसळतात (अधोगती होते). एकदम दुर्गतीच होऊन जाते, काही विचारू नका; म्हणून बाबा म्हणतात - मुलांनो, सावध रहा. माया कोणते ना कोणते रूप धारण करून पकडते. कोणाच्या नावा-रूपाकडे पाहू देखील नका. भले या डोळ्यांनी बघता परंतु बुद्धीमध्ये एका बाबांची आठवण आहे. तिसरा नेत्र मिळाला आहे, म्हणूनच बाबांनाच पहा आणि आठवण करा. देह-अभिमानाला सोडत जा. असे देखील नाही की नजर खाली करून कोणाशी बोलायचे आहे. असे कमजोर बनायचे नाही. बघत असूनही बुद्धीचा योग आपल्या प्रिय माशुककडे असावा. या जुन्या दुनियेला बघत असताना मनामध्ये समजता हे तर कब्रस्तान होणार आहे. याच्याशी काय संबंध ठेवायचा. तुम्हाला ज्ञान मिळते - त्याला धारण करून त्याप्रमाणे चालायचे आहे.

तुम्ही मुली जेव्हा प्रदर्शनी इत्यादी समजावून सांगता तर हजारदा तोंडातून ‘बाबा-बाबा’ निघाले पाहिजे. बाबांची आठवण केल्याने तुमचा किती फायदा होईल. शिवबाबा म्हणतात - मामेकम् (मज एकाची) आठवण करा तर विकर्म विनाश होतील. शिवबाबांची आठवण करा तर तमोप्रधानापासून सतोप्रधान बनाल. बाबा म्हणतात - माझी आठवण करा. हे विसरू नका, बाबांचे डायरेक्शन मिळाले आहे - मनमनाभव. बाबांनी सांगितले आहे हा ‘बाबा’ शब्द खूप चांगल्या रीतीने घोटत रहा. संपूर्ण दिवस ‘बाबा-बाबा’ करत राहिले पाहिजे, दुसरे काहीच नाही. नंबर वन मुख्य गोष्ट हीच आहे. पहिले बाबांना ओळखणे, यामध्येच कल्याण आहे. हे ८४ जन्मांचे चक्र समजणे तर खूप सोपे आहे. मुलांना प्रदर्शनीमध्ये समजावून सांगण्याची खूप आवड असली पाहिजे. जर कुठे वाटले की आपण हे समजावून सांगू शकत नाही तर त्यांना तुम्ही म्हणू शकता - ‘आम्ही आमच्या मोठ्या बहिणीला बोलावतो’, कारण ही देखील पाठशाळा आहे ना. यामध्ये कोणी कमी, तर कोणी जास्त शिकतात. हे सांगण्यामध्ये देह-अभिमान येता कामा नये. जिथे मोठे सेंटर असेल तिथे प्रदर्शनी देखील लावली पाहिजे. चित्र लावलेले असावे - ‘गेट वे टू हेवन’. आता स्वर्गाचे दरवाजे उघडत आहेत. या होऊ घातलेल्या युद्धापूर्वीच आपला वारसा घ्या. जसे मंदिरामध्ये रोज जावे लागते, तसेच तुमच्या मागे ही पाठशाळा आहे. चित्र लावलेली असतील तर समजावून सांगणे सोपे होईल. प्रयत्न करा आपण आपल्या पाठशाळेला चित्रशाळा कशी बनवावी? आकर्षक सुद्धा असेल तर मनुष्य येतील. वैकुंठाला जाण्याचा रस्ता, एका सेकंदामध्ये समजण्याचा रस्ता. बाबा म्हणतात तमोप्रधान तर कोणी वैकुंठामध्ये जाऊ शकत नाही. नवीन दुनियेमध्ये जाण्यासाठी सतोप्रधान बनायचे आहे, यामध्ये काहीच खर्च नाही. ना कोणत्या मंदिरामध्ये किंवा चर्च इत्यादीमध्ये जाण्याची गरज आहे. आठवण करत-करत पवित्र बनून सरळ स्वीट होममध्ये निघून जाणार. तुम्ही असे अपवित्र पासून पवित्र बनाल याची आम्ही गॅरंटी करतो. गोळ्याच्या चित्रामध्ये गेटचा आकार मोठा असला पाहिजे. स्वर्गाचे गेट कसे उघडते. किती क्लियर आहे. नरकाचे गेट बंद होणार आहे. स्वर्गामध्ये नरकाचे नाव सुद्धा नसते. कृष्णाची किती आठवण करतात. परंतु हे कोणालाच माहित नाहीये की, ते केव्हा येतात, काहीच जाणत नाहीत. बाबांनाच जाणत नाहीत. भगवान आपल्याला पुन्हा राजयोग शिकवत आहेत - हे जरी लक्षात राहिले तरी देखील किती आनंद वाटेल. याचा देखील आनंद असावा की आपण गॉड फादरचे स्टुडंट आहोत; हे विसरता कशाला. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) संपूर्ण दिवस मुखावाटे ‘बाबा-बाबा’ निघत रहावे. कमीत कमी प्रदर्शनी इत्यादी समजावून सांगत असताना तोंडून हजारदा ‘बाबा-बाबा’ निघावे.

२) या डोळ्यांनी सर्वकाही बघत असताना, एका बाबांची आठवण असावी, आपसामध्ये बोलत असताना तिसऱ्या नेत्रा द्वारे आत्म्याला आणि आत्म्याच्या पित्याला पाहण्याचा अभ्यास करायचा आहे.

वरदान:-
प्रत्येक सेकंद आणि संकल्पाला अमूल्य रीतीने व्यतीत करणारे अमूल्य रत्न भव

संगमयुगाच्या एका सेकंदाची देखील खूप मोठी किंमत आहे. जसे एकाचे लाख पटीने बनते तसेच जर एक सेकंद जरी व्यर्थ जात असेल तरी लाख पटीने व्यर्थ जाते - म्हणून इतके अटेंशन ठेवा तर निष्काळजीपणा नाहीसा होईल. आता तर कोणी हिशोब घेणारा नाही आहे परंतु थोड्या काळानंतर पश्चाताप होईल कारण हा वेळ खूप किंमती आहे. जे आपल्या प्रत्येक सेकंदाला, प्रत्येक संकल्पाला अमूल्य रीतीने व्यतीत करतात तेच अमूल्य रत्न बनतात.

बोधवाक्य:-
जे नेहमी योगयुक्त आहेत ते सहयोगाचा अनुभव करत विजयी बनतात.

अव्यक्त इशारे - आत्मिक स्थितीमध्ये राहण्याचा अभ्यास करा, अंतर्मुखी बना:-

‘आत्मा’ शब्द स्मृतीमध्ये आल्यानेच रुहानियत सोबत शुभ भावना देखील येते. पवित्र दृष्टी होते. भले कोणी शिवी जरी देत असेल परंतु ही स्मृती रहावी की ही आत्मा तमोगुणी पार्ट बजावत आहे; तर त्यामुळे त्याचा तिटकारा वाटणार नाही. त्याच्या प्रती देखील शुभ भावना टिकून राहील.