28-07-2025
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
“गोड
मुलांनो - सर्वांना ही खुशखबर ऐकवा की आता पुन्हा विश्वामध्ये शांती स्थापन होत
आहे, बाबा आले आहेत एक आदि सनातन देवी-देवता धर्म स्थापन करण्यासाठी”
प्रश्न:-
तुम्हा मुलांना
आठवणीमध्ये राहण्याचा इशारा वारंवार का दिला जातो?
उत्तर:-
कारण एव्हर हेल्दी आणि कायम पावन बनण्यासाठी आहेच मुळी आठवण म्हणून जेव्हा पण वेळ
मिळेल आठवणीमध्ये रहा. पहाटे स्नान इत्यादी करून मग एकांतामध्ये फेरी मारा किंवा बसा.
इथे तर कमाईच कमाई आहे. आठवणीनेच विश्वाचे मालक बनाल.
ओम शांती।
गोड मुले जाणतात की यावेळी सर्वांना विश्वामध्ये शांती हवी आहे. हा आवाज ऐकत राहता
की विश्वामध्ये शांती कशी होईल? परंतु विश्वामध्ये शांती होती कधी जी आता पुन्हा हवी
आहे - हे कोणीही जाणत नाही. तुम्ही मुलेच जाणता विश्वामध्ये शांती तेव्हा होती
जेव्हा या लक्ष्मी-नारायणाचे राज्य होते. आजपर्यंत सुद्धा लक्ष्मी-नारायणाची मंदिरे
बनवत राहतात. तुम्ही कोणालाही हे सांगू शकता विश्वामध्ये शांती ५ हजार वर्षांपूर्वी
होती, आता पुन्हा स्थापन होत आहे. कोण स्थापन करतात? हे मनुष्य जाणत नाहीत. तुम्हा
मुलांना बाबांनी समजावून सांगितले आहे, तुम्ही कोणालाही समजावून सांगू शकता. तुम्ही
लिहू शकता. परंतु अजूनपर्यंत कोणाला हिंमत नाहीये जे कोणाला लिहितील.
वर्तमानपत्रांमध्ये आवाज तर ऐकतात - सर्वजण म्हणतात - विश्वामध्ये शांती व्हावी.
युद्ध इत्यादी झाले की लोक विश्वामध्ये शांतीसाठी यज्ञ करतील. कोणता यज्ञ? रुद्र
यज्ञ करतील. आता मुले जाणतात यावेळी बाबा ज्यांना ‘रुद्र-शिव’ देखील म्हटले जाते,
त्यांनी ज्ञान यज्ञ रचला आहे. विश्वामध्ये शांती आता स्थापन होत आहे. सतयुग नवीन
दुनियेमध्ये जिथे शांती होती जरूर तिथे राज्य करणारे देखील असतील. निराकारी
दुनियेसाठी तर म्हणता येणार नाही की विश्वामध्ये शांती असावी. तिथे तर आहेच शांती.
विश्व मनुष्यांचे असते. निराकारी दुनियेला विश्व म्हणता येणार नाही, ते आहे
शांतीधाम. बाबा वारंवार समजावून सांगत राहतात तरीही कोणी विसरतात, काहींच्या
बुद्धीमध्ये असते तर ते समजावून सांगू शकतात. विश्वामध्ये शांती कशी झाली होती, आता
पुन्हा कशा प्रकारे स्थापन होत आहे - हे कोणालाही समजावून सांगणे खूप सोपे आहे.
भारतामध्ये जेव्हा आदि सनातन देवी-देवता धर्माचे राज्य होते तेव्हा एकच धर्म होता.
विश्वामध्ये शांती होती, ही गोष्ट समजावून सांगणे आणि लिहिणे खूप सोपे आहे. मोठ-मोठी
मंदिरे बनविणाऱ्यांना सुद्धा तुम्ही लिहू शकता - विश्वामध्ये शांती आज पासून ५ हजार
वर्षांपूर्वी होती, जेव्हा यांचे राज्य होते, ज्यांची तुम्ही मंदिरे बनवत आहात.
भारतामध्ये यांचे राज्य होते दुसरा कोणताही धर्म नव्हता. हे तर सोपे आहे आणि
सुज्ञपणाची गोष्ट आहे. ड्रामा अनुसार पुढे चालून सर्व समजतील. तुम्ही ही खुशखबरी
सर्वांना सांगू शकता, सुंदर कार्डावर छापू देखील शकता. आजपासून ५ हजार वर्षांपूर्वी
विश्वामध्ये शांती होती, जेव्हा नवीन दुनिया नवीन भारत होता. लक्ष्मी-नारायणाचे
राज्य होते. आता पुन्हा विश्वामध्ये शांती स्थापन होत आहे. या गोष्टींचे चिंतन
केल्याने देखील तुम्हा मुलांना खूप आनंद झाला पाहिजे. तुम्ही जाणता बाबांची आठवण
केल्यानेच आपण विश्वाचे मालक बनणार आहोत. सर्व काही तुम्हा मुलांच्या पुरुषार्थावर
अवलंबून आहे. बाबांनी सांगितले आहे जेव्हा पण वेळ मिळेल बाबांच्या आठवणीमध्ये रहा.
पहाटे स्नान करून मग एकांतामध्ये फेरी मारा किंवा बसा. इथे तर कमाईच कमाई करायची आहे.
एव्हर हेल्दी आणि कायम पावन बनण्यासाठीच आठवण आहे. इथे भले संन्याशी पवित्र आहेत,
तरी देखील आजारी जरूर पडतात. ही आहेच रोगी दुनिया. ती आहे निरोगी दुनिया. हे देखील
तुम्ही जाणता. दुनियेमध्ये कोणाला काय माहिती की स्वर्गामध्ये सर्व निरोगी असतात.
स्वर्ग कशाला म्हटले जाते, कोणालाच माहित नाही. तुम्ही आता जाणता. बाबा म्हणतात -
कोणीही भेटेल तुम्ही समजावून सांगू शकता. समजा कोणी स्वतःला राजा-राणी म्हणतात. आता
राजा-राणी तर कोणीच नाहीत. बोला, तुम्ही आता राजा-राणी तर नाही आहात. तुम्हाला हे
बुद्धीतून काढावे लागेल. महाराजा-महाराणी श्री लक्ष्मी-नारायणाची राजधानी तर आता
स्थापन होत आहे. तर जरूर इथे कोणीही राजा-राणी असता कामा नयेत. आपण राजा-राणी आहोत
हे देखील विसरा. साधारण मनुष्यांप्रमाणे रहा. यांच्याकडे देखील धन, सोने इत्यादी
असते ना. आता कायदे पास होत आहेत, हे सर्व सरकार काढून घेईल. मग कॉमन
मनुष्यांप्रमाणे होतील. अशा देखील युक्त्या रचत आहेत. गायन देखील आहे ना, ‘किसकी दबी
रहे धूल में, किसकी राजा खाए…’. आता राजा कोणाचे खात नाहीत. राजे तर राहिलेच नाहीत.
प्रजाच प्रजेचे खात आहे. आजकालचे राज्य खूप वंडरफुल आहे. जेव्हा राजांचे नाव
पूर्णपणे नेस्तानाबूत होते तेव्हा मग राजधानी स्थापन होते. आता तुम्ही जाणता - आपण
तिथे जात आहोत जिथे विश्वामध्ये शांती असते; आहेच सुखधाम, सतोप्रधान दुनिया. आपण
तिथे जाण्यासाठी पुरुषार्थ करत आहोत. मुलींनी निर्भयपणे बसून समजावून सांगावे, केवळ
बाह्य कृत्रिम दिखावा नको आहे. आजकाल तर आर्टिफिशियल (कृत्रिम) देखील खूप आले आहेत
ना. इथे तर पक्के ब्रह्माकुमार-कुमारी पाहिजेत.
तुम्ही ब्राह्मण
ब्रह्मा बाबांच्या सोबत विश्वामध्ये शांतीच्या स्थापनेचे कार्य करत आहात. अशी शांती
स्थापन करणारी मुले अतिशय शांतचित्त आणि खूप गोड पाहिजेत कारण जाणता - आपण निमित्त
बनलो आहोत विश्वामध्ये शांती स्थापन करण्यासाठी. तर पहिले आपल्यामध्ये खूप शांती
पाहिजे. संभाषण देखील खूप हळू आणि अतिशय रॉयल्टीने करायचे आहे. तुम्ही एकदम गुप्त
आहात. तुमच्या बुद्धीमध्ये अविनाशी ज्ञान रत्नांचा खजिना भरलेला आहे. बाबांचे तुम्ही
वारसदार आहात ना. जितका बाबांकडे खजिना आहे, तो तुम्ही देखील पूर्ण भरून घेतला
पाहिजे. संपूर्ण जायदाद तुमची आहे, परंतु तेवढी हिंमत नसेल तर ती घेऊ शकत नाही. ती
घेणारेच उच्च पद प्राप्त करतील. एखाद्याला समजावून सांगण्याची खूप आवड असली पाहिजे.
आपल्याला या भारताला पुन्हा स्वर्ग बनवायचे आहे. धंदा इत्यादी करत असताना सोबत ही
देखील सेवा करायची आहे म्हणून बाबा लवकर-लवकर करत आहेत. तरीही होते तर ड्रामा
अनुसारच. प्रत्येक जण आपल्या वेळेनुसार चालत आहे. मुलांकडूनही पुरुषार्थ करवून घेत
आहेत. मुलांना निश्चय आहे की आता फार थोडा वेळ शिल्लक आहे. हा आपला अंतिम जन्म आहे.
मग आपण स्वर्गामध्ये असणार. हे दुःखधाम आहे मग सुखधाम होईल. बनण्यामध्ये वेळ तर
लागतो ना. हा विनाश लहान थोडाच आहे. जसे नवीन घर बनते तर मग नवीन घराचीच आठवण येते.
ती आहे हदची गोष्ट, त्यामध्ये कोणती नाती इत्यादी थोडीच बदलतात. ही तर जुनी दुनियाच
बदलणार आहे; मग जे चांगल्या रीतीने शिकतील ते राजाई कुळामध्ये येतील, नाहीतर
प्रजेमध्ये जातील. मुलांना खूप आनंद झाला पाहिजे. बाबांनी समजावून सांगितले आहे
५०-६० जन्म तुम्ही सुख भोगता. द्वापरमध्ये देखील तुमच्याकडे पुष्कळ धन असते. दुःख
तर नंतर सुरू होते. राजा जेव्हा आपसामध्ये भांडतात, फूट पडते, तेव्हा दुःख सुरू होते.
पूर्वी तर धान्य इत्यादी देखील खूप स्वस्त होते. दुष्काळ इत्यादी देखील नंतर पडतो.
तुमच्याकडे पुष्कळ धन असते. हळू-हळू सत़ोप्रधानतेमधून तमोप्रधानतेमध्ये येता. तर
तुम्हा मुलांना आतून खूप आनंद झाला पाहिजे. स्वतःलाच तो आनंद नसेल, ती शांती नसेल
तर ते विश्वामध्ये शांती कशी काय स्थापन करणार! बऱ्याच जणांच्या मनामध्ये अशांतता
असते. बाबा येतातच शांतीचे वरदान देण्यासाठी. म्हणतात - ‘माझी आठवण करा तर
तमोप्रधान बनल्यामुळे आत्मा जी अशांत झाली आहे ती आठवणीने सतोप्रधान शांत बनेल.
परंतु मुलांकडून आठवणीची मेहनत केलीच जात नाही, आठवणीमध्ये न राहिल्यामुळेच मग
मायेची वादळे येतात. आठवणीमध्ये राहून पूर्ण पावन बनला नाहीत तर सजा भोगावी लागेल.
पद देखील भ्रष्ट होईल. असे समजायचे नाही की, स्वर्गामध्ये तर जाऊच ना. अरे, मार
खाऊन पाई-पैशाचे सुख मिळविणे हे काही चांगले आहे काय. मनुष्य उच्च पद प्राप्त
करण्यासाठी किती पुरुषार्थ करतात. असे नाही की जे मिळाले ते चांगले आहे. असा कोणीही
नसेल जो पुरुषार्थ करणार नाही. भीक मागणारे फकीर लोक देखील आपल्याकडे पैसे गोळा
करतात. पैशांचे तर सगळेच भुकेलेले असतात. प्रत्येक गोष्टीचे सुख पैशाने मिळते.
तुम्ही मुले जाणता आपण बाबांकडून अथाह धन घेतो. पुरुषार्थ कमी कराल तर धन देखील कमी
मिळेल. वडील धन देतात ना. म्हणतात देखील - धन आहे तर अमेरिका इत्यादी ठिकाणी जाऊन
या. तुम्ही जितकी बाबांची आठवण कराल आणि सेवा कराल तितके सुख मिळवाल. बाबा प्रत्येक
गोष्टीमध्ये पुरुषार्थ करवून घेतात, उच्च बनवितात. समजतात मुले आपल्या कुळाचे नाव
प्रसिद्ध करतील. तुम्हा मुलांना देखील ईश्वरीय कुळाचे, बाबांचे नाव प्रसिद्ध करायचे
आहे. हे सत्य पिता, सत्य टीचर, सद्गुरु आहेत. उच्च ते उच्च बाबा, उच्च ते उच्च सच्चे
सद्गुरु देखील आहेत. हे देखील समजावून सांगितले आहे की गुरु एकच असतात, दुसरे कोणीही
नाही. सर्वांचा सद्गती दाता एक आहे. हे देखील तुम्ही जाणता. आता तुम्ही पारस-बुद्धी
बनत आहात. पारसपुरीचे पारसनाथ राजा-राणी बनता. किती सोपी गोष्ट आहे. भारत गोल्डन
एज्ड होता, विश्वामध्ये शांती कशी होती हे तुम्ही या लक्ष्मी-नारायणाच्या
चित्रावरून समजावून सांगू शकता. हेवन मध्ये शांती होती. आता आहे हेल. इथे अशांती आहे.
हेवनमध्ये हे लक्ष्मी-नारायण राहत होते ना. श्रीकृष्णाला लॉर्ड कृष्णा देखील म्हटले
जाते. श्रीकृष्ण भगवान देखील म्हणतात. आता लॉर्ड तर अनेक आहेत, ज्यांच्या जवळ जास्त
जमीन-जुमला असतो त्यांना देखील लँडलॉर्ड म्हणतात. श्रीकृष्ण तर विश्वाचा प्रिन्स
होता, ज्या विश्वामध्ये शांती होती. हे देखील कोणाला माहित नाही राधे-कृष्णच
लक्ष्मी-नारायण बनतात.
तुमच्यासाठी लोक किती
गोष्टी बनवतात, गोंधळ माजवतात, म्हणतात हे तर भाऊ-बहीण बनवितात. समजावून सांगितले
जाते प्रजापिता ब्रह्माची मुखवंशावळी ब्राह्मण, ज्यांच्यासाठीच गातात - ‘ब्राह्मण
देवी-देवताये नमः’. ब्राह्मण देखील त्यांना नमस्ते करतात कारण ते खरे भाऊ-बहीणी
आहेत. पवित्र राहतात. तर पवित्र असणाऱ्यांची का नाही इज्जत करणार. कन्या पवित्र असते
तेव्हा तिच्या देखील पाया पडतात. बाहेरचा व्हिजिटर आला, तर तो देखील कन्येला
नमस्कार करेल. यावेळी कन्येचा इतका मान का झाला आहे? कारण तुम्ही
ब्रह्माकुमार-कुमारी आहात ना. मेजॉरिटी तुम्हा कन्यांची आहे. शिवशक्ती पांडव सेना
गायली गेली आहे. यामध्ये मेल देखील आहेत, मेजॉरिटी मातांची आहे म्हणून गायले जाते.
तर जे चांगल्या रीतीने शिकतात ते श्रेष्ठ बनतात. आता तुम्ही साऱ्या विश्वाचा
इतिहास-भूगोल जाणला आहे. चक्रावर देखील समजावून सांगणे खूप सोपे आहे. भारत पारसपुरी
होता, आता आहे पत्थरपुरी. तर सर्व पत्थरनाथ झाले ना. तुम्ही मुले या ८४ च्या चक्राला
देखील जाणता. आता घरी जायचे आहे तर बाबांचीही आठवण करायची आहे, ज्यामुळे पापे नष्ट
होतात. परंतु मुलांकडून आठवणीची मेहनत केली जात नाही, कारण आळशीपणा आहे. पहाटे उठत
नाहीत. आणि जर उठले तर मजा येत नाही. झोप येऊ लागते तर मग झोपून जातात. होपलेस (हताश)
होतात. बाबा म्हणतात - ‘मुलांनो, हे युद्धाचे मैदान आहे ना. यामध्ये हताश होता कामा
नये. आठवणीच्या बळाद्वारेच मायेवर विजय प्राप्त करायचा आहे, यासाठी मेहनत केली
पाहिजे. खूप चांगली-चांगली मुले जी यथार्थ रीतीने आठवण करत नाहीत, चार्ट ठेवल्याने
फायदा-तोट्या विषयी समजून येते. म्हणतात - चार्टने तर माझ्या अवस्थेमध्ये चमत्कारच
केला आहे. असे विरळेच कोणी चार्ट ठेवतात. ही देखील खूप मेहनत आहे. बऱ्याच
सेंटर्समध्ये खोटे देखील जाऊन बसतात, विकर्म करत राहतात. बाबांचे डायरेक्शन अमलात न
आणल्याने खूप नुकसान करतात. मुलांना थोडेच कळते की, हे निराकार सांगत आहेत की साकार
सांगत आहेत? मुलांना वारं-वार समजावून सांगितले जाते - नेहमी असेच समजा की, शिवबाबा
डायरेक्शन देतात. तर तुमची बुद्धी तिथे टिकून राहील.
आजकाल साखरपुडा होतो
तर फोटो दाखवतात, वर्तमानपत्रामध्ये देखील टाकतात की यांच्यासाठी अशी-अशी चांगल्या
घराण्यातील पाहिजे. दुनियेची काय हालत झाली आहे, काय होणार आहे! तुम्ही मुले जाणता
अनेक प्रकारची मते आहेत. तुम्हा ब्राह्मणांचे आहे एक मत. विश्वामध्ये शांती स्थापन
करण्याचे मत. तुम्ही श्रीमताद्वारे विश्वामध्ये शांती स्थापन करता तर मुलांना देखील
शांतीमध्ये रहावे लागेल. जो करेल त्याला मिळेल. नाही तर खूप नुकसान आहे.
जन्म-जन्मांतरीचा तोटा आहे. मुलांना म्हणतात - आपला नफा आणि तोटा पहा. चार्ट बघा -
आपण कोणाला दुःख तर दिले नाही ना? बाबा म्हणतात - तुमचा हा वेळ, एक-एक सेकंद अतिशय
मौल्यवान आहे, सजा भोगून थोडे फार पद मिळवणे ही काही मोठी गोष्ट नाही! तुम्ही तर
खूप धनवान बनू इच्छिता ना. सर्वात पहिले जे पूज्य आहेत त्यांनाच पुजारी बनायचे आहे.
इतके धन असेल, सोमनाथाचे मंदिर बनवतील तेव्हाच तर पूजा करतील. हा देखील हिशोब आहे.
तरीही मुलांना समजावून सांगतात चार्ट ठेवा तर खूप फायदा होईल. नोट करून ठेवले पाहिजे.
सर्वांना संदेश देत जा, गप्प बसून राहू नका. ट्रेनमध्ये सुद्धा तुम्ही समजावून
सांगून लिटरेचर द्या. बोला, ही करोडोंची संपत्ती आहे. लक्ष्मी-नारायणाचे भारतामध्ये
राज्य होते तेव्हा विश्वामध्ये शांती होती. आता बाबा पुन्हा ती राजधानी स्थापन
करण्यासाठी आले आहेत, तुम्ही बाबांची आठवण करा तर विकर्म विनाश होतील आणि
विश्वामध्ये शांती स्थापित होईल. अच्छा!
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१) आपण
विश्वामध्ये शांती स्थापन करण्यासाठी निमित्त ब्राह्मण आहोत, आपल्याला खूप-खूप
शांतचित्त रहायचे आहे, संभाषण अतिशय हळू आणि रॉयल्टीने करायचे आहे.
२) आळस सोडून आठवणीची
मेहनत करायची आहे. कधीही होपलेस (निराश) व्हायचे नाही.
वरदान:-
पेपरला
घाबरण्या ऐवजी फुल स्टॉप देऊन फुल पास होणारे सफलता मूर्त भव
जेव्हा कोणत्याही
प्रकारचा पेपर येतो तर घाबरू नका, क्वेश्चन मार्कमध्ये जाऊ नका, ‘हा का आला?’ असा
विचार करण्यामध्ये वेळ वाया घालवू नका. क्वेश्चन मार्क संपला आणि फुल स्टॉप;
तेव्हाच क्लास चेंज होईल अर्थात पेपरामध्ये पास व्हाल. फुल स्टॉप देणारा फुल पास
होईल कारण फुलस्टॉप आहे बिंदूची स्टेज. दिसत असताना पाहू नका, ऐकत असताना ऐकू नका.
बाबांनी ऐकवलेलेच ऐका, बाबांनी जे दिले आहे तेच पहा तर फुल पास व्हाल आणि पास
होण्याची निशाणी आहे - नेहमी चढत्या कलेचा अनुभव करत सफलतेचे सितारे बनाल.
बोधवाक्य:-
स्व-उन्नती
करायची असेल तर क्वेश्चन, करेक्शन आणि कोटेशन या सर्वांचा त्याग करून आपले कनेक्शन
ठीक ठेवा.
अव्यक्त इशारे -
संकल्पांची शक्ती जमा करून श्रेष्ठ सेवेच्या निमित्त बना:-
अंतिम समयाला आपल्या
सेफ्टीसाठी मन्साशक्तीच साधन बनेल. मन्सा शक्ती द्वारेच आपला अंत सुंदर बनविण्यासाठी
निमित्त बनू शकाल. त्यावेळी मन्साशक्ती अर्थात श्रेष्ठ संकल्प शक्ती, एका सोबत लाईन
क्लिअर पाहिजे. बेहदच्या सेवेसाठी, स्वतःच्या सेफ्टीसाठी मन्साशक्ती आणि निर्भयतेची
शक्ती जमा करा.