28-08-2025
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
“गोड
मुलांनो - आता तुमची सुनावणी झाली आहे, शेवटी तो दिवस आला जेव्हा तुम्ही या
पुरुषोत्तम संगमयुगावर उत्तम ते उत्तम पुरुष बनत आहात”
प्रश्न:-
जय आणि पराजया
संदर्भात कोणते असे एक भ्रष्ट कर्म आहे जे मनुष्याला दु:खी करते?
उत्तर:-
“जुगार”. पुष्कळ लोकांना जुगार खेळण्याची सवय असते, हे भ्रष्ट कर्म आहे कारण
हरल्यावर दुःख आणि जिंकल्यावर खुशी होते. तुम्हा मुलांना बाबांचा आदेश आहे - मुलांनो,
दैवी कर्म करा. असे कोणतेही कर्म करायचे नाही ज्यामध्ये वेळ वाया जाईल. सदैव बेहदचा
विजय प्राप्त करण्याचा पुरुषार्थ करा.
गीत:-
आखिर वह दिन
आया आज…
ओम शांती।
डबल ओम् शांती. तुम्हा मुलांनी देखील म्हटले पाहिजे ओम् शांती. इथे मग आहे डबल ओम्
शांती. एक सुप्रीम आत्मा (शिवबाबा) म्हणतात - ओम् शांती, दुसरे हे दादा म्हणतात -
ओम् शांती. मग तुम्ही मुले देखील म्हणता - ‘आम्ही आत्मा शांत स्वरूप आहोत, राहणारे
देखील शांती देशाचे आहोत. इथे या स्थूल देशामध्ये पार्ट बजावण्यासाठी आलो आहोत’. या
गोष्टी आत्मे विसरली आहेत मग शेवटी तो दिवस जरूर आला आहे, जेव्हा सुनावणी होते.
कोणती सुनावणी? म्हणतात - ‘बाबा, दुःख हरून सुख द्या’. प्रत्येक मनुष्य सुख-शांतीच
पसंत करतो. बाबा आहेत देखील गरीब निवाज (गरिबांचे कैवारी). यावेळेस भारत एकदमच गरीब
आहे. मुले जाणतात आपण खूप श्रीमंत होतो. हे देखील तुम्ही ब्राह्मण मुले जाणता, बाकी
तर सर्व जंगलामध्ये आहेत. तुम्हा मुलांना देखील नंबरवार पुरुषार्था नुसार निश्चय आहे.
तुम्ही जाणता हे आहेतच ‘श्री श्री’, त्यांचे मत देखील श्रेष्ठ ते श्रेष्ठ आहे.
भगवानुवाच आहे ना. मनुष्य तर ‘राम-राम’ची अशी काही धून लावतात जसा काही बाजा वाजतो.
आता राम तर त्रेतामधला राजा होता, त्यांची खूप महिमा मोठी होती. १४ कला होता. दोन
कला कमी, त्याच्यासाठी देखील गातात - ‘राम राजा, राम प्रजा…’ तुम्ही श्रीमंत बनता
ना. रामापेक्षा जास्त श्रीमंत मग लक्ष्मी-नारायण असतील. राजाला अन्नदाता म्हटले जाते.
बाबा देखील दाता आहेत, ते सर्वकाही देतात. मुलांना विश्वाचा मालक बनवतात. तिथे
कोणतीही वस्तू अप्राप्त असत नाही, ज्याच्यासाठी पाप करावे लागेल. तिथे पापाचे नावही
नसते. अर्धा कल्प आहे दैवी राज्य मग अर्धाकल्प आहे आसुरी राज्य. असुर अर्थात
ज्यांच्यामध्ये देह-अभिमान आहे, ५ विकार आहेत.
आता तुम्ही आले आहात
खिवय्या (नावाड्याजवळ) अथवा बागवाना जवळ. तुम्ही जाणता आपण डायरेक्ट त्यांच्याजवळ
बसलो आहोत. तुम्ही मुले देखील बसल्या-बसल्या विसरून जाता. भगवान जो आदेश देतात तो
मानला पाहिजे ना. पहिले तर ते श्रीमत देतात श्रेष्ठ ते श्रेष्ठ बनण्यासाठी. तर
मतावर चालले पाहिजे ना. सर्वात पहिले मत देतात - ‘देही-अभिमानी बना’. बाबा आम्हा
आत्म्यांना शिकवत आहेत. हे एकदम पक्के लक्षात ठेवा. हा शब्द लक्षात ठेवलात तरी बेडा
पार होईल. मुलांना समजावून सांगितले आहे, तुम्हीच ८४ जन्म घेता. तुम्हीच
तमोप्रधानापासून सतोप्रधान बनता. ही दुनिया तर पतित दुःखी आहे. स्वर्गाला म्हटलेच
जाते सुखधाम. मुले जाणतात शिवबाबा, भगवान आम्हाला शिकवतात. त्यांचे आपण स्टुडंट
आहोत. ते पिता देखील आहेत, टीचर देखील आहेत, तर अभ्यास देखील चांगल्या रीतीने केला
पाहिजे ना. दैवी कर्म देखील पाहिजेत. कोणतेही भ्रष्ट कर्म करता कामा नये. भ्रष्ट
कर्मामध्ये जुगार देखील येतो. हा देखील दुःख देतो. हरला तर दुःख होईल, जिंकला तर
आनंद होईल. आता तुम्हा मुलांनी मायेकडून बेहदची हार खाल्ली आहे. हा आहे देखील
बेहदच्या हार आणि जीतचा खेळ. ५ विकार रुपी रावणाकडून हारे हार आहे, त्यावर विजय
प्राप्त करायचा आहे. मायेकडून हारे हार आहे (मायेकडून हरणारा पराभूत होतो). आता
तुम्हा मुलांची जीत होणार आहे. आता तुम्हाला देखील जुगार इत्यादी सर्व सोडून दिले
पाहिजे. आता बेहदचा विजय प्राप्त करण्यावर पूर्ण अटेंशन दिले पाहिजे. कोणतेही असे
कर्म करायचे नाही, वेळ वाया घालवायचा नाही. बेहदचा विजय प्राप्त करण्यासाठी
पुरुषार्थ करायचा आहे. करविणारे बाबा समर्थ आहेत. ते आहेत तर सर्वशक्तीमान. हे
देखील समजावून सांगितले आहे फक्त बाबाच सर्वशक्तिमान नाहीत. तर रावण देखील
सर्वशक्तिमान आहे. अर्धा कल्प रावणाचे राज्य, अर्धा कल्प रामराज्य चालते. आता तुम्ही
रावणावर विजय प्राप्त करता. आता त्या हदच्या गोष्टी सोडून बेहदमध्ये लक्ष द्यायचे
आहे. खिवय्या आले आहेत. शेवटी तो दिवस आला तर आहे ना. मारलेल्या हाकेची सुनावणी होते
उच्च ते उच्च बाबांकडे. बाबा म्हणतात - मुलांनो, तुम्ही अर्धा कल्प खूप धक्के खाल्ले
आहेत. पतित बनला आहात. पावन भारत शिवालय होता. तुम्ही शिवालयामध्ये राहत होता. आता
तुम्ही वेश्यालयामध्ये आहात. तुम्ही शिवालयामध्ये राहणाऱ्यांची पूजा करता. इथे या
अनेक धर्मांचा किती संघर्ष आहे. बाबा म्हणतात - या सर्वांना मी खल्लास करतो.
सर्वांचा विनाश होणार आहे बाकीचे धर्म-स्थापक विनाश करत नाहीत. ते सद्गती देणारे
गुरु देखील नाही आहेत. सद्गती ज्ञानाद्वारेच होते. सर्वांचे सद्गती दाता ज्ञान-सागर
बाबाच आहेत. हे शब्द व्यवस्थित लक्षात ठेवा. असे खूप आहेत जे इथे ऐकून बाहेर गेले
की इथले इथेच राहून जाते. जसे गर्भ-जेलमध्ये असताना म्हणतात - ‘आम्ही पाप करणार नाही’.
बाहेर पडले (जन्म घेतला), बस तिथले तिथेच राहिले. थोडे मोठे झाले की पाप करायला
लागतात. काम कटारी चालवतात. सतयुगामध्ये तर गर्भ देखील महाल असतो. तर बाबा बसून
समजावून सांगत आहेत - ‘आखिर वह दिन आया आज’. कोणता दिवस? पुरुषोत्तम संगमयुगाचा.
ज्याची कोणालाही माहिती नाही. मुलांना जाणीव होते आपण पुरुषोत्तम बनत आहोत. उत्तम
ते उत्तम पुरुष आपणच होतो, श्रेष्ठ ते श्रेष्ठ धर्म होता. कर्म देखील श्रेष्ठ ते
श्रेष्ठ होती. रावण राज्यच नसते. शेवटी तो दिवस आला जेव्हा बाबा आले आहेत
शिकविण्याकरिता. तेच पतित-पावन आहेत. तर अशा बाबांच्या श्रीमतावर चालले पाहिजे ना.
आता आहे कलियुगाचा अंत. थोडा अवधी तर पाहिजे ना, पावन बनण्यासाठी. ६० वर्षानंतर
वानप्रस्थ म्हणतात. साठीला आली काठी. आता तर बघा ८० वर्षांचे म्हातारे सुद्धा
विकारांना सोडत नाहीत. बाबा म्हणतात - ‘मी यांच्या वानप्रस्थ अवस्थेमध्ये प्रवेश
करून यांना ज्ञान सांगतो’. आत्माच पवित्र बनून पार जाते. आत्माच उडते. आता आत्म्याचे
पंख तुटलेले आहेत. उडू शकत नाही. रावणाने पंख कापले आहेत. पतित बनली आहे. एकही कोणी
परत जाऊ शकत नाही. पहिले तर सुप्रीम बाबांना गेले पाहिजे. शिवाची वरात म्हणतात ना.
शंकराची वरात असत नाही. बाबांच्या मागे आपण सर्व मुले जातो. बाबा आलेले आहेत घेऊन
जाण्यासाठी. शरीरासहित तर घेऊन जाणार नाहीत. सर्व आत्मे पतित आहेत. जोपर्यंत पवित्र
बनत नाहीत तोपर्यंत परत जाऊ शकत नाही. प्युरिटी होती तेव्हा पीस आणि प्रॉस्पेरिटी (शांती
आणि समृद्धी) होती. फक्त तुम्ही आदि सनातन देवी-देवता धर्माचेच होता. आता बाकी सर्व
धर्माचे आहेत. डीटीज्म (देवी-देवता धर्मच) नाही आहे. याला कल्पवृक्ष म्हटले जाते.
वडाच्या झाडा सोबत याची तुलना केली जाते. खोड राहिलेले नाही आहे. बाकी संपूर्ण झाड
उभे आहे. तसेच या देवी-देवता धर्माचे देखील फाउंडेशन राहिलेले नाहीये. बाकी संपूर्ण
झाड उभे आहे. होते जरूर परंतु प्रायः लोप झाले आहे परत रिपीट होईल. बाबा म्हणतात -
मी पुन्हा येतो एका धर्माची स्थापना करण्यासाठी, बाकी सर्व धर्मांचा विनाश होतो.
नाहीतर सृष्टी चक्र कसे फिरणार? म्हटले देखील जाते वर्ल्डचा इतिहास-भूगोल रिपीट होतो.
आता जुनी दुनिया आहे परत नवीन दुनियेला रिपीट व्हायचे आहे. ही जुनी दुनिया बदलून
नवीन दुनिया स्थापन होईल. हाच भारत नवीन सो जुना बनतो. म्हणतात - यमुनेच्या तीरावर
परिस्तान होते. बाबा म्हणतात - तुम्ही काम-चितेवर बसून कब्रस्तानी बनला आहात. पुन्हा
तुम्हाला परिस्तानी बनवतो. श्रीकृष्णाला श्याम-सुंदर म्हणतात - कशासाठी? कोणाच्याच
बुद्धीमध्ये नसेल. नाव तर चांगले आहे ना. राधा आणि कृष्ण - हे आहेत नवीन दुनियेचे
प्रिन्स-प्रिन्सेस. बाबा म्हणतात - काम-चितेवर बसल्यामुळे आयरन एज्डमध्ये (कलियुगामध्ये)
आहात. गायले देखील आहे - ‘सागराची मुले काम-चितेवर जळून मेली’. आता बाबा सर्वांवर
ज्ञान वर्षा करतात. मग सर्वजण निघून जातील गोल्डन एज्डमध्ये (सुवर्ण युगामध्ये). आता
आहे संगमयुग. तुम्हाला अविनाशी ज्ञान रत्नांचे दान मिळते, ज्यामुळे तुम्ही श्रीमंत
बनता. हे एक-एक रत्न लाखो रुपयांचे आहे. ते लोक मग समजतात - शास्त्रांमधील महावाक्ये
लाखो रुपयांची आहेत. तुम्ही मुले या शिक्षणाद्वारे पदम-पती बनता. सोर्स ऑफ इन्कम आहे
ना. या ज्ञान रत्नांना तुम्ही धारण करता. झोळी भरता. ते मग शंकरासाठी म्हणतात - ‘हे
बम बम महादेव, भर दो झोली’. शंकरावर किती आरोप केले आहेत. ब्रह्मा आणि विष्णूचा
पार्ट इथे आहे. हे देखील तुम्ही जाणता ८४ जन्म विष्णूसाठी देखील म्हणणार,
लक्ष्मी-नारायणासाठी देखील म्हणणार. तुम्ही ब्रह्मासाठी देखील म्हणाल. बाबा बसून
समजावून सांगतात - बरोबर काय आहे, चुकीचे काय आहे, ब्रह्मा आणि विष्णूचा पार्ट काय
आहे. तुम्हीच देवता होतात, आता चक्र फिरून ब्राह्मण बनलात आता परत देवता बनत आहात.
सर्व पार्ट इथे बजावला जातो. वैकुंठातील खेळणे-बागडणे बघतात. इथे काही वैकुंठ नाहीये.
मीरा डान्स करत असे. त्याला सर्व साक्षात्कार म्हणणार. त्यांचा किती मान आहे.
साक्षात्कार झाला, श्रीकृष्णा सोबत डान्स केला. मग काय! स्वर्गामध्ये तर गेली नाही
ना. गती-सद्गती तर संगमावरच मिळू शकते. या पुरुषोत्तम संगमयुगाला तुम्ही समजता. आपण
बाबांद्वारे आता मनुष्यापासून देवता बनत आहोत. विराट रूपाचे देखील नॉलेज पाहिजे ना.
चित्रे ठेवतात, समजत काहीच नाही. अकासुर-बकासुर ही सर्व या संगमातील नावे आहेत.
भस्मासुर देखील नाव आहे. काम-चितेवर बसून भस्म झाले आहेत. आता बाबा म्हणतात - मी
सर्वांना परत ज्ञान-चितेवर बसवून घेऊन जातो. सर्व आत्मे भाऊ-भाऊ आहेत. म्हणतात
देखील - ‘हिंदू-चिनी भाई-भाई, हिंदू-मुस्लिम भाई-भाई’ आहेत. आता भाऊ-भाऊ सुद्धा
आपसामध्ये भांडत राहतात. कर्म तर आत्मा करते ना. शरीराद्वारे आत्मा भांडते. पाप
देखील आत्म्यावरच चढते, म्हणून पाप-आत्मा म्हटले जाते. बाबा किती प्रेमाने बसून
समजावून सांगतात. शिवबाबा आणि ब्रह्मा बाबा दोघांनाही हक्क आहे ‘बाळांनो-बाळांनो’
म्हणण्याचा. बाबा, (pause घेणे) दादांद्वारे म्हणतात - माझ्या मुलांनो! तुम्ही समजता
ना, आपण आत्मा इथे येऊन पार्ट बजावतो. मग अंतामध्ये बाबा येऊन सर्वांना पवित्र
बनवून सोबत घेऊन जातात. बाबाच येऊन नॉलेज देतात, येतात देखील इथेच. शिवजयंती देखील
साजरी करतात. शिवजयंती नंतर मग असते कृष्ण जयंती. श्रीकृष्णच मग श्रीनारायण बनतात.
चक्र फिरून मग अंतामध्ये सावळे (पतित) बनतात. बाबा येऊन मग गोरा बनवतात. तुम्ही
ब्राह्मण सो देवता बनणार. आणि मग शिडी उतराल. या ८४ जन्मांचा हिशोब आणखी कोणाच्या
बुद्धीमध्ये नसेल. बाबाच मुलांना समजावून सांगतात. गाणे देखील ऐकले - शेवटी भक्तांची
सुनावणी होते. बोलावतात देखील - हे भगवान येऊन आम्हाला भक्तीचे फळ द्या. भक्ती काही
फळ देत नाही. फळ भगवान देतात. भक्तांना देवता बनवतात. जास्त भक्ती तुम्ही केली आहे.
सर्वप्रथम तुम्हीच शिवाची भक्ती केली. जे चांगल्या रीतीने या गोष्टींना समजतील, तर
तुम्हाला जाणिव होईल की, हे आपल्या कुळातील आहेत. जर कोणाच्या बुद्धीमध्ये जात नसेल
तर समजा यांनी खूप भक्ती केलेली नाही आहे, नंतर आला आहे. मग तिथे देखील आधी येणार
नाहीत. हा हिशोब आहे. ज्यांनी खूप भक्ती केली आहे त्यांना खूप फळ मिळेल. थोडी भक्ती
थोडे फळ. ते स्वर्गाचे सुख भोगू शकत नाहीत कारण सुरुवातीला शिवाची भक्ती थोडी केली
आहे. तुमची बुद्धी आता काम करत आहे. बाबा विविध युक्त्या पुष्कळ सांगत असतात. अच्छा!
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१) एक-एक
अविनाशी रत्न जे पदमा समान आहे, त्याने आपली झोळी भरून, बुद्धीमध्ये धारण करून मग
दान करायचे आहे.
२) श्री श्री च्या
श्रेष्ठ मतावर पूर्णपणे चालायचे आहे. आत्म्याला सतोप्रधान बनविण्याकरिता
देही-अभिमानी बनण्याचा पूर्णपणे पुरुषार्थ करायचा आहे.
वरदान:-
सर्वांप्रति
शुभ भाव आणि श्रेष्ठ भावना धारण करणारे हंस-बुद्धि होलीहंस भव
हंस-बुद्धी अर्थात
सदैव प्रत्येक आत्म्याप्रती श्रेष्ठ आणि शुभ विचार करणारे. आधी प्रत्येक आत्म्याच्या
भावाला परखणारे आणि मग धारण करणारे. कधीही बुद्धीमध्ये कोणत्याही आत्म्याप्रती अशुभ
अथवा साधारण भाव धारण नसावा. सदा शुभ भाव आणि शुभ भावना ठेवणारेच होलीहंस आहेत. ते
कोणत्याही आत्म्याच्या अकल्याणाच्या गोष्टी ऐकत असताना, बघत असताना देखील अकल्याणाला
कल्याणाच्या वृत्तीमध्ये बदलतील. त्यांची दृष्टी प्रत्येक आत्म्याप्रति श्रेष्ठ
शुद्ध स्नेहाची असेल.
बोधवाक्य:-
प्रेमाने
भरपूर अशी गंगा बना जेणेकरून तुमच्या द्वारे प्रेमाचा सागर बाबा दिसून येतील.
अव्यक्त इशारे:-
सहजयोगी बनायचे असेल तर परमात्म प्रेमाचे अनुभवी बना. कित्येक भक्त आत्मे प्रभू
प्रेमामध्ये लीन होऊ इच्छितात आणि कोणी मग ज्योतीमध्ये लीन होऊ इच्छितात. अशा
आत्म्यांना सेकंदामध्ये बाबांचा परिचय, बाबांची महिमा आणि प्राप्ती ऐकवून नात्यातील
लवलीन अवस्थेचा अनुभव करवा. लवलीन होतील तर सहजच लीन होण्याच्या रहस्याला सुद्धा
समजतील.