28-09-25    अव्यक्त बापदादा    मराठी मुरली   15.02.2007  ओम शान्ति   मधुबन


“निष्काळजीपणा, आळस, आणि बहाणेबाजीच्या झोपेतून जागे होणे हेच शिवरात्रीचे खरे जागरण आहे”


आज बापदादा विशेष आपल्या चोहो बाजूच्या अतिशय लाडक्या, खूप-खूप वर्षांनी भेटलेल्या, परमात्म प्रेमाला पात्र असणाऱ्या मुलांना भेटण्यासाठी आणि विचित्र पिता मुलांचा बर्थ डे साजरा करण्यासाठी आले आहेत. तुम्ही देखील सर्व आज विशेष विचित्र बर्थ डे साजरा करण्यासाठी आला आहात ना! असा बर्थ डे साऱ्या कल्पामध्ये कोणाचाही नसतो. कधीही ऐकले नसेल की वडील आणि मुलाचा एकाच दिवशी बर्थ डे आहे. तर तुम्ही सर्व बाबांचा बर्थ डे साजरा करण्यासाठी आला आहात का मुलांचाही साजरा करण्यासाठी आला आहात? कारण साऱ्या कल्पामध्ये परमात्मा पित्याचे आणि परमात्म मुलांचे इतके अथाह प्रेम आहे जो जन्म सुद्धा एकत्र (एकाच दिवशी) आहे. विश्व परिवर्तनाचे कार्य बाबांना एकट्याला करायचे नाहीये, मुलांच्या सोबत करायचे आहे. असे अलौकिक सोबत राहण्याचे प्रेम, साथीदार बनण्याचे प्रेम या संगमावरच अनुभव करता. बाबा आणि मुलांचे इतके गहिरे प्रेम आहे, जन्म देखील सोबत आहे आणि राहता देखील कुठे आहात? एकटे की सोबत? प्रत्येक मुलगा उमंग-उत्साहाने म्हणतो की, ‘मी बाबांसोबत कंबाइंड आहे’. कंबाइंड राहता ना! एकटे तर राहत नाही ना! एकत्र जन्म आहे, सोबत राहतो आणि पुढे देखील कोणता वायदा आहे? सोबत आहोत, सोबत राहणार, सोबत जाणार आपल्या स्वीट होममध्ये. इतर कोणत्याही वडीलांचे आणि मुलांचे इतके प्रेम पाहिले आहे का? कोणीही मुलगा असो, कुठेही आहे, कसा पण आहे, परंतु सोबत आहे आणि सोबतच येणारा आहे. तर असा हा विचित्र आणि प्रिय ते प्रिय जन्म दिवस साजरा करण्यासाठी आला आहात. भले सन्मुख साजरा करत आहात, किंवा देश-विदेशामध्ये चोहो बाजूला एकाच वेळी एकत्र साजरा करत आहात.

बापदादा चोहो बाजूला बघत आहेत की कशी सर्व मुले उमंग-उत्साहाने मनातल्या मनात वाह बाबा! वाह बाबा! वाह बर्थ डे! चे गाणे गात आहेत. जर स्विच चालू केला तर चोहो बाजूंचे आवाज, हृदयातील आवाज, उमंग-उत्साहाचे आवाज बापदादांच्या कानामध्ये ऐकू येत आहेत. बापदादा सर्व मुलांचा उत्साह पाहून मुलांना देखील आपल्या दिव्य जन्माची पद्म-पद्म-पद्मपटीने शुभेच्छा देत आहेत. वास्तविक उत्सवाचा अर्थच आहे उमंग-उत्साहामध्ये राहणे. तर तुम्ही सर्व उत्साहाने हा उत्सव साजरा करत आहात. भक्तांनी नाव देखील ‘शिवरात्री’ ठेवले आहे.

आज बापदादा त्या भक्त आत्म्यांना मुबारक देत होते, ज्यांनी तुमच्या या विचित्र जन्मदिवस साजरा करण्याची कॉपी खूप चांगली केली आहे. तुम्ही ज्ञान आणि प्रेम रूपामध्ये साजरी करता आणि त्या भक्त आत्म्याने भावना, श्रद्धेच्या रूपामध्ये तुमच्या साजरे करण्याच्या रीतीची कॉपी केली आहे. तर आज त्या मुलाला (त्या भक्त आत्म्याला) मुबारक देत होतो की कॉपी करण्यामध्ये चांगला पार्ट बजावला आहे. पहा, प्रत्येक गोष्टीची कॉपी केली आहे. कॉपी करण्याची सुद्धा अक्कल पाहिजे ना! मुख्य गोष्ट तर या दिवशी भक्त लोक सुद्धा व्रत घेतात, ते व्रत खाण्या-पिण्याचे ठेवतात, भावनेमध्ये वृत्तीला श्रेष्ठ बनविण्यासाठी व्रत ठेवतात, त्यांना दरवर्षी ठेवावे लागते आणि तुम्ही काय व्रत घेतले आहे? एकदाच व्रत घेता, वर्षानुवर्षे व्रत घेत नाही. एकदाच व्रत घेतले पवित्रतेचे. सर्वांनी पवित्रतेचे व्रत घेतले आहे, पक्के घेतले आहे? ज्यांनी पक्के घेतले आहे त्यांनी हात वर करा, पक्के, थोडे सुद्धा कच्चे नाही. पक्के? अच्छा. दुसरा सुद्धा प्रश्न आहे, अच्छा व्रत तर घेतले मुबारक असो. परंतु अपवित्रतेचे मुख्य पाच साथीदार आहेत, बरोबर आहे ना! मान हलवा. अच्छा पाचही जणांचे व्रत घेतले आहे? का दोघा-तिघांचे घेतले आहे? कारण जिथे पवित्रता आहे तिथे जर अंश मात्र देखील अपवित्रता असेल तर काय संपूर्ण पवित्र आत्मा म्हटले जाईल का? आणि तुम्हा ब्राह्मण आत्म्यांची तर पवित्रता ब्राह्मण जन्माची प्रॉपर्टी आहे, पर्सनॅलिटी आहे, रॉयल्टी आहे. तर चेक करा की, मुख्य पवित्रतेवर तर अटेंशन आहे परंतु संपूर्ण पवित्रतेसाठी इतरही जे साथीदार आहेत, त्यांना अनावश्यक समजून सोडले तर नाही आहे ना? छोट्यांवर प्रेम करत आहात आणि मोठ्याला ठीक केले आहे. तर काय बाबांची सूट आहे का की, बाकीचे जे चार आहेत त्यांना भले साथीदार बनवा? पवित्रता केवळ ब्रह्मचर्याला म्हटले जात नाही परंतु ब्रह्मचर्यासोबत ‘ब्रह्माचारी’ बनणे अर्थात पवित्रतेच्या व्रताचे पालन केले. बरीच मुले रुहरिहानमध्ये म्हणतात, रुहरिहान तर सगळे करतात ना. तर खूप गोड-गोड गोष्टी करतात. म्हणतात - ‘बाबा, मुख्य तर चांगला आहे ना, बाकी छोटे-छोटे असे कधीतरी मनसा संकल्पामध्ये येतात. मनसामध्ये येतात, वाचेमध्ये येत नाहीत आणि मनसाला तर कोणी पाहू शकत नाही. आणि काहीजण मग म्हणतात की, छोट्या-छोट्या मुला-बाळांवर प्रेम असते ना. तर या चारींवर देखील प्रेम होते. क्रोध येतो, मोह येतो, इच्छा नसते परंतु येतो. बापदादा म्हणतात - कोणीही आले तरी दरवाजा तर तुम्ही उघडला आहे तेव्हाच तर येतात ना! तर दरवाजा का उघडला आहे? कमजोरीचा दरवाजा उघडला आहे, तर कमजोरीचा दरवाजा उघडणे अर्थात आवाहन करणे.

तर आजच्या दिवशी बाबांचा आणि आपला बर्थ डे तर साजरा करत आहात परंतु जो जन्मताच वायदा केला आहे. सर्वात पहिले वरदान बाबांनी कोणते दिले, लक्षात आहे? बर्थ डे चे वरदान लक्षात आहे? काय दिले? ‘पवित्र भव, योगी भव’. सर्वांना वरदान लक्षात आहे ना? लक्षात आहे विसरून तर नाही गेलात? ‘पवित्र भव’ चे वरदान एकासाठी दिलेले नाहीये, पाचही विकारांसाठी दिले आहे. तर आज बापदादा काय इच्छित आहेत? बर्थ डे साजरा करण्यासाठी आला आहात, बाबांचा सुद्धा साजरा करायला आला आहात ना. शिवरात्री साजरी करायला आला आहात, तर बर्थ डे ची सौगात (भेट) आणली आहे की रिकाम्या हाताने आला आहात? स्थापनेची ७० वर्षे पूर्ण होत आहेत. लक्षात आहे ना! ७० वर्षे विचार करा, भले तुम्ही मागाहून आला असाल परंतु स्थापनेची तर ७० वर्षे झाली आहेत ना! भले आता आला आहात, परंतु स्थापनेच्या कर्तव्यामध्ये तुम्ही सर्व साथीदार आहात ना! साथीदार तर आहात ना! मग जरी आज पहिल्यांदा आला आहात. जे मधुबनमध्ये पहिल्यांदा भेटण्यासाठी आले आहेत, त्यांनी उंच हात वर करा. अच्छा. तुम्हा सर्वांना भले आता एक वर्ष झाले आहे, दोन वर्षे झाली आहेत परंतु स्वतःला काय म्हणवून घेता? ब्रह्माकुमारी, ब्रह्माकुमार का पुरुषार्थ कुमार-कुमारी? काय म्हणवून घेता? कोणी स्वतःला पुरुषार्थी कुमार म्हणता का! ब्रह्माकुमारची साइन करता ना! सगळे बी.के. लिहिता की पी.के. लिहिता? पुरुषार्थी कुमार. तर वायदा कोणता आहे? सोबत राहणार, सोबत येणार, कंबाइंड राहणार, मग कंबाइंडमध्ये तर समानता हवी ना!

आजचा ७० वर्षाचा उत्सव तर साजरा करत येत आहात. बापदादांनी पाहिले आहे, जे सुद्धा झोन सेवेचा टर्न देतात ते ७० वर्षाचा सन्मान समारोह साजरा करतात. सगळे साजरा करता ना! बस्स, फक्त छोटीशी गिफ़्ट देतात, झाले. परंतु आज एक तर बर्थ डे आहे, साजरा करण्यासाठी आला आहात ना, पक्के आहे ना? आणि दुसरे ७० वर्षे पूर्ण झाली, तर सन्मान समारोह देखील साजरा करत आहात, बर्थ डे सुद्धा साजरा करत आहात, त्यामध्ये सौगात काय देणार? ट्रे देणार, चादर देणार? कोणती सौगात घेऊन आला आहात? चला, चांदीचा ग्लास देणार! परंतु आजच्या दिवशी बापदादांची शुभ आशा आहे आपल्या आशेचे दीपक मुलांप्रती. ती शुभ आशा कोणती आहे, सांगू? सांगणे किंवा ऐकणे म्हणजेच काय? एका कानाने ऐकणे आणि हृदयामध्ये साठवून ठेवणे, असे का? काढून तर टाकणार नाही, इतके तर नाहीये परंतु हृदयामध्येच साठवून ठेवतात. तर आजच्या दिवशी ती शुभ आशा सांगू, पहिल्या लाइन मधले बोला, मान हलवा, टीचर्स मान हलवा. अच्छा, झेंडा हलवत आहेत. डबल फॉरेनर्स सांगू? स्वतःला बांधून घ्यावे लागेल, तेव्हाच हो म्हणा, असेच हो म्हणू नका, कारण ७० वर्ष तर बापदादांनी सुद्धा निष्काळजीपणा, आळस, आणि बहाणेबाजीचे खेळ पाहिले आहेत. चला ७० वर्ष नाही तर ५०, ४०, ३०, २० वर्षे झाली, परंतु इतका वेळ तर हे तीन खेळ मुलांचे खूप बघितले. तर आजच्या दिवशी भक्त जागरण करतात, झोपत नाहीत, तर तुम्हा मुलांचे जागरण कोणते आहे? कोणत्या झोपेमध्ये घडोघडी झोपून जाता, निष्काळजीपणा, आळस, आणि बहाणेबाजीच्या झोपेमध्ये आरामात झोपून जाता. तर आज बापदादा या तीन गोष्टींचे प्रत्येक क्षणी जागरण पाहू इच्छित आहेत. कधीही पहा क्रोध येतो, अभिमान येतो, लोभ येतो, कारण काय सांगतात? बापदादांना एक ट्रेड-मार्क दिसून येतो, काहीही घडले ना! तर काय म्हणतात - ‘हे तर चालते…’ माहित नाही कोणी हे चालू केले आहे? परंतु शब्द हेच म्हणतात - ‘हे तर होतच असते, हे तर चालूच असते. ही काही नवीन गोष्ट थोडीच आहे, असे होतच असते’. हे काय आहे? निष्काळजीपणा नाहीये का? हा देखील तर करतो, मेजॉरिटी क्रोधा पासून बचाव करण्यासाठी असे केले म्हणून झाले. मी चूक केली, ते मात्र सांगणार नाहीत. यांनी असे केले ना, असे झाले ना, म्हणून झाले. दुसऱ्यावर दोष ठेवणे खूप सोपे आहे. यांनी जर केले नाही तर असे होणार नाही. आणि बाबांनी जे सांगितले ते घडणार नाही. तो करेल तर होईल, बाबांच्या श्रीमतावर क्रोधाला नष्ट करू शकत नाही काय? आजकाल क्रोधाचा मुलगा रोब, रोब देखील वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. तर आज या चारही गोष्टींचे व्रत घेणार काय? जसा पहिल्या गोष्टीचा विशेष दृढ संकल्प बहुतांशी मुलांनी केला आहे. असाच या चारींचा देखील संकल्प करणार काय! असा बहाणा देऊ नका, याने हे केले म्हणून माझे झाले, आणि बाबा जे वारंवार सांगत आहेत, ते लक्षात नाही, त्याने जे केले ते मात्र लगेच आठवले, तर ही बहाणेबाजी झाली ना! तर आज बापदादांना बर्थ डे ची गिफ्ट हवी आहे या तीन गोष्टी, ज्या चार गोष्टींना हलके करतात. संस्कारांचा सामना तर करायचाच आहे, संस्कारांचा सामना नाही, हा पेपर आहे. एका जन्माचे शिक्षण आणि साऱ्या कल्पाची प्राप्ती, अर्धा कल्प राज्य भाग्य, अर्धा कल्प पूज्य, साऱ्या कल्पाची एका जन्मामध्ये प्राप्ती, तो देखील छोटासा जन्म, पूर्ण जन्म नाहीये, छोटासा जन्म (कालावधी) आहे. तर मग हिंमत आहे का? जे समजतात, हिंमत जरूर ठेवणार, असे नाही पुरुषार्थ करणार, अटेंशन ठेवणार… र र नको आहे. काही लहान मुले नाही आहात, ७० वर्षे पूर्ण होत आहेत. ते तर तीन-चार महिन्याची मुले र र करतात. तर तुम्ही बाबांचे साथीदार आहात ना! विश्व कल्याणकारी आहात, त्याला तर ७० वर्ष पूर्ण होत आहेत. बापदादा हात वर करायला सांगत नाहीत कारण बाप-दादांनी पाहिले आहे हात वर करून सुद्धा कधी-कधी बेफिकीर होतात. तर असे वाटते का की, काहीही झाले, पहाडा एवढा पेपर जरी आला तरीही पहाडाला कापूस बनवू, असा दृढ संकल्प करण्याची हिंमत आहे! कारण संकल्प खूप चांगले करता, बापदादा सुद्धा जेव्हा संकल्प करता तेव्हा खुश होतात. परंतु होते काय, ७० वर्षे तर हलके सोडले परंतु बापदादा बघत आहेत की वेळेचा काहीच भरवसा नाही आणि या ज्ञानाच्या आधारे प्रत्येक पुरुषार्थाच्या गोष्टीमध्ये दीर्घकाळाचा हिशोब आहे. ठीक आहे, आता-लगेच कराल, परंतु दीर्घकाळाचा हिशोब आहे कारण प्राप्ती प्रत्येकाला कोणती हवी आहे? आता हात वर करायला सांगत आहेत, कोण राम-सीता बनणार? जे राम-सीता बनू इच्छितात त्यांनी हात वर करा, राजाई मिळेल. कोणी हात वर करत आहे - राम-सीता बनणार? लक्ष्मी-नारायण नाही बनणार? डबल फॉरेनर्स मध्ये कोणी हात वर करत आहे? (कोणीही नाही) जर दीर्घकाळाचे भाग्य प्राप्त करू इच्छिता, लक्ष्मी-नारायण बनणे अर्थात दीर्घकाळ राज्य भाग्य प्राप्त करणे. तर दीर्घकाळासाठी प्राप्ती आहे. तर प्रत्येक गोष्टीमध्ये दीर्घकाळ तर हवा ना! आता ६३ जन्मांचा दीर्घकाळाचा संस्कार आहे त्यामुळे म्हणता ना - माझा भाव नाही आहे, भावना नाहीये, ६३ जन्मांचा संस्कार आहे. तर दीर्घकाळाचा हिशोब आहे ना म्हणून बापदादा हेच इच्छितात की संकल्पामध्ये दृढता असावी, दृढतेचीच कमतरता होते, ‘होऊन जाईल… चालते, चालू दे, कोण बनले आहे’, अजून एक खूप चांगली गोष्ट तर सर्वांना येते, बापदादांनी नोट केले आहे, स्वतःला हिंमत होत नाही तर म्हणतात - महारथी सुद्धा असेच करतात, आम्ही केले तर काय झाले? परंतु बापदादा विचारत आहेत की, ज्यावेळी महारथी चूक करतो, त्यावेळी तो महारथी आहे? तर महारथीचे नाव का खराब करता? त्यावेळी तो महारथीच नाही आहे, तर महारथी म्हणून स्वतःला कमजोर करणे हे स्वतःला धोका देणे आहे. दुसऱ्याला बघणे सोपे असते, स्वतःला बघण्यासाठी थोडी हिंमत पाहिजे. तर आज बापदादा हिशोबाचे पुस्तक नष्ट करण्याची गिफ्ट घेण्यासाठी आले आहेत. कमजोरी आणि बहाणेबाजीच्या हिशोबाचे खूप मोठे पुस्तक आहे, त्याला नष्ट करायचे आहे. तर प्रत्येकजण जे समजतात आम्ही करून दाखवू, करायचेच आहे, वाकायचेच आहे, बदलायचेच आहे, परिवर्तन सेरीमनी साजरी करायचीच आहे, जे समजतात संकल्प करणार त्यांनी हात वर करा. दृढ की कामचलाऊ? कामचलाऊ संकल्प सुद्धा असतो आणि दृढ संकल्प देखील असतो. तर तुम्ही सर्वांनी दृढ संकल्प केला आहे? दृढ केला आहे? मधुबनवाले उंच हात वर करा. इथे समोर मधुबनवाले बसतात, खूप जवळ बसण्याचा चान्स आहे. पहिली सीट मधुबन वाल्यांना मिळते, बापदादा खुश आहेत. पहिल्या लाइनमध्ये बसला आहात, तर पहिल्या नंबरवरच रहा.

तर आजची गिफ्ट तर छान आहे ना. बापदादांना सुद्धा आनंद आहे कारण तुम्ही एक नाही आहात. तुमच्या मागे तुमच्या राजधानीमध्ये तुमची रॉयल फॅमिली, तुमची रॉयल प्रजा, मग द्वापर पासून तुमचे भक्त, सतो, रजो, तमोगुणी, तीन प्रकारचे भक्त, तुमच्या मागे मोठी लाइन आहे. जे तुम्ही कराल ते तुमच्या मागे असणारे करतात. तुम्ही बहाणेबाजी करता तर तुमचे भक्त देखील खूप बहाणेबाजी करतात. आता ब्राह्मण परिवार सुद्धा तुम्हाला पाहून, उलटी कॉपी करण्यामध्ये तर हुशार असतात ना. तर आता दृढ संकल्प करा, संस्कारांची टक्कर असो, स्वभावाचा मतभेद असो, तिसरी गोष्ट कमजोर असणाऱ्यांची असते, कोणी कोणावर खोटा आरोप केला, तर अनेक मुले म्हणतात आम्हाला जास्त क्रोध येतो खोटेपणावर. परंतु सत्य बाबांकडून व्हेरिफाय करवले, सत्य बाबा तुमच्या सोबत आहेत, तर संपूर्ण खोटी दुनिया एका बाजूला असेल आणि एक बाबा तुमच्या सोबत आहेत तर मग तुमचा विजय निश्चित झालेलाच आहे. तुम्हाला कोणीही हलवू शकत नाही, कारण बाबा तुमच्या सोबत आहेत. म्हणत आहेत खोटं आहे. तर खोट्याला खोटेच करून टाका, वाढवता कशासाठी! तर बाबांना बहाणेबाजी आवडत नाही, ‘असे झाले, असे झाले, असे झाले…’ हे असे-असे चे गाणे आता थांबायला हवे. चांगले झाले, चांगले होणार, चांगले राहणार, चांगले सर्वांना बनवणार. चांगले-चांगले-चांगले चे गाणे गा. तर पसंत आहे ना? पसंत आहे का? बहाणेबाजीला समाप्त करणार ना? करणार? दोन्ही हात वर करा. हो, चांगल्या रीतीने हलवा. अच्छा, पाहणारे (टीव्हीवर) देखील हात हलवत आहेत. कुठूनही बघत असाल, हात हलवा. तुम्ही तर हलवत आहात. अच्छा आता खाली करा, आता आपल्या परिवर्तनाच्या टाळ्या वाजवा. (सर्वांनी जोरात टाळ्या वाजवल्या) अच्छा.

अच्छा - आता प्रत्येकजण एका मिनिटासाठी दृढ संकल्प स्वरूपामध्ये बसा की बहाणेबाजी, आळस, निष्काळजीपणाला नेहमी दृढ संकल्पाद्वारे समाप्त करून दीर्घकाळाचा हिशोब जमा करायचाच आहे. काहीही होवो, काहीही बघायचे नाही परंतु बाबांचे दिलतख्तनशीन बनायचेच आहे, विश्वाचे तख्तनशीन बनायचेच आहे. या दृढ संकल्प स्वरूपामध्ये सगळे बसा. अच्छा.

चोहो बाजूच्या सदैव उमंग-उत्साहाच्या अनुभवामध्ये राहणाऱ्या, सदैव दृढता सफलतेच्या चावीला कार्यामध्ये लावणाऱ्या, सदैव बाबांच्या सोबत आणि प्रत्येक कार्यामधे साथीदार बनून राहणाऱ्या, सदैव एक-नामी आणि एकॉनॉमी, एकाग्रता स्वरूपामध्ये पुढेच पुढे उडत राहणाऱ्या, बापदादांच्या खूप लाडक्या, सिकीलध्या, विशेष मुलांना, बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि नमस्ते.

वरदान:-
हदच्या सर्व इच्छांचा त्याग करणारे खरे तपस्वी मूर्त भव

हदच्या इच्छांचा त्याग करून खरेखुरे तपस्वी मूर्त बना. तपस्वी मूर्त अर्थात हदची इच्छा मात्रम् अविद्या रूप. जो घेण्याचा संकल्प करतो तो अल्पकाळासाठी घेतो परंतु सदाकाळासाठी गमावतो. तपस्वी बनण्यामध्ये विशेष विघ्न रूप याच अल्पकालीन इच्छा आहेत त्यामुळे आता तपस्वी मूर्त बनण्याचा पुरावा द्या अर्थात हदचा मान-शान घेण्याचा त्याग करून विधाता बना. जेव्हा विधाता पणाचे संस्कार इमर्ज होतील तेव्हा इतर सर्व संस्कार आपोआप दबून जातील.

सुविचार:-
कर्माच्या फळाची सूक्ष्म कामना ठेवणे हे देखील फळाला पिकण्यापूर्वीच (कच्चे) खाऊन टाकणे आहे.

अव्यक्त इशारे:- आता लगनच्या (एकाग्रतेच्या) अग्नीला प्रज्वलित करून योगाला ज्वाला रूपी बनवा.

पाप कटेश्वर किंवा पाप हारिणी तेव्हा बनू शकता जेव्हा आठवण ज्वाला स्वरूप असेल. याच आठवणीद्वारे अनेक आत्म्यांची निर्बलता दूर होईल, यासाठी प्रत्येक सेकंद, प्रत्येक श्वास बाबा आणि तुम्ही कंबाइंड होऊन रहा. कोणत्याही वेळी साधारण आठवण नसावी. स्नेह आणि शक्ती दोन्ही रूपे कंबाइंड असावीत.