28-09-2026      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो, आता तुम्ही अमरलोकच्या यात्रेवर आहात, तुमची ही बुद्धीची रूहानी यात्रा आहे, जी तुम्ही खरे-खरे ब्राह्मणच करू शकता”

प्रश्न:-
स्वतःच स्वतःशी अथवा आपापसात कोणता वार्तालाप करणेच शुभ संमेलन आहे?

उत्तर:-
स्वतःच स्वतःशी बोला की, आपण आत्मे आता या जुन्या छी-छी शरीराला (पतित शरीराला) सोडून परत घरी जाणार आहोत. हे शरीर काहीच कामाचे नाही, आता तर बाबांसोबत जाणार आहोत. एकमेकांना जेव्हा भेटता तेव्हा हाच वार्तालाप करा की, सेवेची वृद्धी कशी करावी, सर्वांचे कल्याण कशा प्रकारे होईल, सर्वांना मार्ग कसा दाखवायचा... हेच शुभ संमेलन आहे.

गीत:-
दिल का सहारा टूट न जाये...

ओम शांती।
गोड-गोड रुहानी मुलांनो, सर्व सेंटर्सचे ब्रह्मामुखवंशावली सर्वोत्तम ब्राह्मण कुलभूषण आपल्या कुळाला जाणतात. जे ज्या कुळाचे असतात ते आपल्या कुळाला जाणतात. भले कनिष्ठ कुळातील असतील अथवा उच्च कुळातील असोत, प्रत्येक जण आपल्या कुळाला जाणतात आणि समजतात की यांचे कुळ चांगले आहे. कुळ म्हणा अथवा जात म्हणा, दुनियेमध्ये तुम्हा मुलांव्यतिरिक्त इतर कोणीही हे जाणत नाहीत की ब्राह्मणांचेच सर्वोत्तम कुळ आहे. पहिल्या नंबरचे कुळ तुम्हा ब्राह्मणांचे म्हणणार. ब्राह्मण कुळ अर्थात ईश्वरीय कुळ. पहिले आहे निराकारी कुळ, मग साकारी सृष्टीमध्ये येतात. सूक्ष्मवतनमध्ये तर कुळ असत नाही. साकारमध्ये सर्वोच्च कुळ तुम्हा ब्राह्मणांचे कुळ आहे. तुम्ही ब्राह्मण आपसामध्ये भाऊ-बहिणी आहात. बहीण आणि भाऊ असल्यामुळे विकारामध्ये जाऊ शकत नाही. तुम्ही अनुभवाने म्हणू शकता की ही पवित्र राहण्याची खूप चांगली युक्ती आहे. प्रत्येक जण म्हणतो - आम्ही ब्रह्माकुमार-कुमारी आहोत. शिववंशी तर सर्वच आहेत, मग जेव्हा साकारमध्ये येतात तेव्हा प्रजापित्याचे नाव असल्याकारणाने भाऊ-बहीण होतात. प्रजापिता ब्रह्मा आहे तर जरूर रचयिता आहेत, दत्तक घेतात. तुम्ही कुखवंशावळी नाही, मुखवंशावळी आहात. मनुष्य तर कुखवंशावळी आणि मुखवंशावळी यांचा अर्थच जाणत नाहीत. मुखवंशावळी अर्थात दत्तक मुले, कुखवंशावळी अर्थात जन्म घेणारे. तुमचा हा जन्म अलौकिक आहे. पित्याला लौकिक, अलौकिक, पारलौकिक म्हटले जाते. प्रजापिता ब्रह्माला अलौकिक पिता म्हटले जाते. लौकिक पिता तर सर्वांनाच आहे. ते तर सामान्य आहे. पारलौकिक पिता देखील सर्वांचा आहे. भक्तिमार्गामध्ये तर सर्वजण ‘हे भगवान’, ‘हे परमपिता’ असे म्हणत असतात. परंतु या पित्याला (प्रजापिता ब्रह्माला) कधी कोणी बोलावत नाहीत. हे (ब्रह्मा बाबा) ब्राह्मण मुलांचेच पिता आहेत. त्या दोघांना तर सर्व जाणतात. बाकी ब्रह्मामुळे गोंधळतात कारण ब्रह्मा तर असतोच सूक्ष्मवतनमध्ये. इथे तर दाखवत नाहीत. चित्रांमध्ये देखील ब्रह्माला दाढी-मिशीवाला दाखवतात, कारण प्रजापिता ब्रह्मा इथे या सृष्टीमध्ये आहे. सूक्ष्मवतनमध्ये काही प्रजा रचू शकत नाही. हे देखील कोणाच्या बुद्धीमध्ये येत नाही. या सर्व गोष्टी बाबा समजावून सांगत आहेत.

तुम्हा मुलांची ही रूहानी यात्रा देखील गायलेली आहे. रूहानी यात्रा ती असते जिथून पुन्हा परत यायचे नाहीये. बाकीच्या सर्व यात्रा तर जन्म-जन्मांतर करत राहतात आणि जाऊन परत येतात. त्या आहेत भौतिक यात्रा, ही तुमची आहे रूहानी यात्रा. ही रूहानी यात्रा केल्याने तुम्ही मृत्यूलोकमध्ये परत येत नाही. बाबा तुम्हाला अमरलोकची यात्रा शिकवत आहेत. ते काश्मीरकडे अमरनाथच्या यात्रेला जातात. तो काही अमरलोक नाहीये. अमरलोक, एक आहे - आत्म्यांचा, दुसरा आहे - मनुष्यांचा, ज्याला स्वर्ग अथवा अमरलोक म्हणू शकतो. आत्म्यांचे आहे - निर्वाण धाम. बाकी अमरलोक आहे - सतयुग, मृत्यूलोक आहे - कलियुग, आणि निर्वाणधाम आहे - शांती लोक, जिथे आत्मे राहतात. बाबा म्हणतात - तुम्ही अमरपुरीच्या यात्रेवर आहात. पायी चालत जाण्याच्या त्या शारीरिक यात्रा आहेत. ही आहे रूहानी यात्रा, जी शिकविणारे एकमेव रुहानी बाबा आहेत आणि एकदाच येऊन शिकवतात. ती तर जन्म-जन्मांतरीची गोष्ट आहे. ही आहे मृत्यूलोकच्या अंतिम काळातील यात्रा. हे तुम्ही ब्राह्मण कुलभूषणच जाणता. रूहानी यात्रा अर्थात आठवणीमध्ये असणे. गायले देखील जाते - ‘अंत मती सो गति’. तुम्हाला आठवतेच मुळी बाबांचे घर. समजता की आता नाटक पूर्ण होत आहे. हे जुने वस्त्र, जुने शरीर आहे. आत्म्यामध्ये अशुद्धता पडल्यामुळे शरीरामध्ये देखील अशुद्धता पडते. जेव्हा आत्मा पवित्र बनते, तेव्हा आम्हाला शरीर देखील पवित्र मिळते. हे देखील तुम्ही मुले समजता. बाहेरचे तर काहीही समजत नाहीत. तुम्ही बघता की काहीजणांना समजते देखील. कोणाच्याच बुद्धीमध्ये हे ज्ञान नाहीये. समजणारा असेल तर तो जरूर कोणालाही समजावून सांगेल. मनुष्य जेव्हा यात्रेवर जातात तेव्हा पवित्र राहतात. आणि मग घरी येऊन अपवित्र बनतात. महिना-दोन महिने पवित्र राहतात. यात्रेचा देखील सीझन असतो. नेहमीच काही यात्रेवर जाऊ शकत नाहीत. थंडीत अथवा पावसाळ्यात कोणी जाऊ शकत नाही. तुमच्या यात्रेमध्ये तर थंडीचा अथवा उन्हाळ्याचा काही प्रश्नच नाही. बुद्धीद्वारे स्वतः समजू शकता की, आम्ही बाबांच्या घरी जात आहोत. जितकी आपण आठवण करतो तितकी विकर्म विनाश होतात. बाबांच्या घरी जाऊन मग आम्ही नवीन दुनियेमध्ये येणार. हे बाबाच समजावून सांगतात. इथे देखील नंबरवार मुले आहेत. वास्तविक यात्रेला विसरता कामा नये, परंतु माया विसरायला लावते; म्हणून लिहितात देखील - ‘बाबा, तुमची आठवण विसरायला होते’. अरे, आठवणीची यात्रा - जिच्याद्वारे तुम्ही एव्हर-हेल्दी-वेल्दी बनता, अशा औषधाला तुम्ही विसरून जाता? मुले असे देखील म्हणतात की, बाबांची आठवण करणे तर खूप सोपे आहे. स्वतःशीच गोष्टी करायच्या आहेत की, मी आत्मा आधी सतोप्रधान होती, आता तमोप्रधान बनली आहे. आता शिवबाबा आम्हाला युक्ती तर खूप छान सांगतात. बाकी अभ्यास करायचा आहे. डोळे बंद करून विचार केला जात नाही. (बाबांनी ॲक्शन करून दाखवली). अशा स्वतःशी गोष्टी करा की, आपण सतोप्रधान होतो, आम्हीच राज्य करत होतो. ती दुनिया गोल्डन एज्ड होती, मग सिल्व्हर, कॉपर, आयर्न एज्डमध्ये आलो. आता आयर्न एज्डचा अंतिम समय चालू आहे, तेव्हाच तर बाबा आलेले आहेत. बाबा आम्हा आत्म्यांना म्हणतात की माझी आठवण करा आणि जिथून आला आहात त्या आपल्या घराची आठवण करा. म्हणजे मग अंत मती सो गति होईल. तुम्हाला तिथेच जायचे आहे. ही युक्ती बाबा सांगतात की पहाटे उठून स्वतःशीच गोष्टी करा. ब्रह्मा बाबा कृती करून दाखवतात, की मी देखील पहाटे उठून विचार सागर मंथन करतो. खरी कमाई केली पाहिजे ना. सुबह का सांई... तर त्या सांईची आठवण केल्याने तुमचा बेडा (जीवन रुपी नाव) पार होईल. बाबा जे करतात, जसे करतात, ते मुलांना देखील समजावून सांगतात. त्याच्यामध्ये कटकट वाटण्याचा काही प्रश्नच नाही. ही कमाई करण्याची खूप चांगली युक्ती आहे. ‘अल्फ’ची आठवण केल्याने ‘बे’ ची बादशाही तर नक्कीच प्राप्त होईल.

मुले जाणतात की आम्ही राजयोग शिकत आहोत. बाबा बीजरूप, नॉलेजफुल आहेत तर आम्हाला देखील झाडा विषयी पूर्णपणे समजले आहे. हे देखील स्थूल रूपामध्ये नॉलेज आहे. सुरुवातीला या झाडाची कशी वृद्धी होते मग त्याची आयुर्मयादा पूर्ण होते; बाकीची झाडे तर वादळे इत्यादी आल्यामुळे कोसळतात. परंतु या मनुष्य-सृष्टीच्या झाडाचे पहिले फाउंडेशन देवी-देवता धर्म प्रायः लोप होतो. हे देखील होणारच आहे. हा जेव्हा संपुष्टात येतो तेव्हा म्हटले जाईल की, एका धर्माची पुन्हा स्थापना आणि अनेक धर्मांचा विनाश. कल्प-कल्प हा धर्म प्रायः लोप होतो. आत्म्यामध्ये अशुद्धता पडते त्यामुळे दागिना खोटा होतो. मुले समजतात आमच्यामध्ये अशुद्धता होती. आता आम्ही जेव्हा स्वच्छ बनतो तेव्हा इतरांना देखील मार्ग सांगतो. दुनिया तर तमोप्रधान आहे. अगोदर सतोप्रधान स्वर्ग होता. तर मुलांनी पहाटे लवकर उठून स्वतःशीच गप्पागोष्टी केल्या पाहिजेत अर्थात रुहरिहान केले पाहिजे. विचार सागर मंथन केले पाहिजे. आणि मग कोणाला समजावून सांगावे लागते की, हे ८४ जन्मांचे चक्र आहे. ८४ जन्म कसे घेतात, कोण घेतात. जरूर जे सुरुवातीला येतील तेच घेतील. बाबा देखील भारतात येतात. येऊन ८४ चे चक्र समजावून सांगतात. बाबा कुठे आले आहेत, हे देखील जाणत नाहीत. बाबा येऊन स्वतःचा परिचय स्वतः देतात. म्हणतात की, मी तुम्हाला राजयोग शिकवतो, मनमनाभव. माझी आठवण करा तर विकर्म विनाश होतील. असे स्पष्टीकरण कोणीही देऊ शकत नाही. भले गीता इत्यादी ऐकवतात. तिथे देखील लोक जात राहतात. परंतु भगवान कधीतरी आला असेलच, ज्ञान ऐकवले असेल. मग जेव्हा येतील तेव्हाच ऐकवतील ना. ते लोक तर गीतेचे पुस्तक घेऊन बसतात आणि ऐकवतात. इथे तर भगवान ज्ञानाचा सागर आहेत. यांना हातामध्ये काहीही घेऊन वाचायचे नाहीये. हे शिकत नाहीत. कल्पापूर्वी देखील येऊन तुम्हा मुलांना संगमावर शिकवले होते. बाबाच येऊन राजयोग शिकवतात. ही आठवणीची यात्रा आहे. तुमची बुद्धीच हे जाणते की, ब्रह्मामुखवंशावळी सोडून इतर असा कोणीही मनुष्य नसेल ज्याच्याकडे हे ज्ञान असेल. सर्वांमध्ये सर्वव्यापीचे ज्ञान भरलेले आहे. हे कोणीही जाणत नाहीत की, परमात्मा बिंदू आहेत, ज्ञान-सागर, पतित-पावन आहेत; फक्त असेच गात राहतात. गुरु लोक जे शिकवतात ते सर्व सत्-सत् म्हणत रहातात. अर्थ काहीही समजत नाहीत. ना त्यावर कधी विचार करतात की हे सत्य आहे अथवा नाही.

बाबा समजावून सांगतात की, तुम्हा मुलांना चालता-फिरता आठवणीच्या यात्रेमध्ये जरूर रहायचे आहे. नाहीतर विकर्म विनाश होऊ शकणार नाहीत. काहीही कर्म करत रहा परंतु बुद्धीमध्ये बाबांची आठवण पाहिजे. श्रीनाथ द्वारे मध्ये भोजन बनवतात तर बुद्धीमध्ये तो श्रीनाथ असतो ना. मंदिरातच बसलेले आहेत. जाणतात की आम्ही श्रीनाथासाठी बनवत आहोत. भोजन बनवले, भोग लावला, की नंतर मग घरची मंडळी, मुले इत्यादी आठवत राहतील. तिथे भोजन बनवतेवेळी तोंड बंद, बोलणार नाहीत. मनसा द्वारे कोणतेही विकर्म बनत नाही. ते (भक्त लोक) श्रीनाथाच्या मंदिरामध्ये बसले आहेत. इथे तुम्ही तर शिवबाबांपाशी बसला आहात. इथे देखील बाबा युक्ती सांगत राहतात. मुलांनो, कोणतीही फालतू गोष्ट बोलायची नाही. सदैव बाबांसोबत गोड-गोड गोष्टी करायच्या आहेत. जसे बाबा तशी मुले. बाबांच्या स्मृतीमध्ये असते की चक्र कसे फिरते; तेव्हाच तर येऊन तुम्हा मुलांना ऐकवतात. तुम्ही मुले जाणता की आमचे बाबा मनुष्य सृष्टीचे बीजरूप, चैतन्य आहेत. किती सोपी गोष्ट आहे. परंतु तरी देखील समजत नाहीत कारण पत्थर-बुद्धी आहेत. त्या बीजाला (स्थूल झाडाच्या बीजाला) आपण चैतन्य म्हणणार नाही. हे बीज नॉलेजफुल, चैतन्य आहे. हे एकमेव बीज आहे. ती (या दुनियेतील) बीजे तर अनेक प्रकारची असतात. भगवंताला मनुष्य सृष्टीचे बीजरूप म्हटले जाते. तर पिता झाले ना. आत्म्यांचा पिता परमात्मा आहे तर सर्व भाऊ-भाऊ झाले, बाबा देखील तिथेच राहतात जिथे तुम्ही आत्मे निवास करता. निर्वाणधाम मध्ये बाबा आणि मुले राहतात. यावेळी तुम्ही प्रजापिता ब्रह्माची संतान भाऊ आणि बहीण आहात, म्हणून तुम्हाला शिव-वंशी ब्रह्माकुमार-कुमारी संबोधले जाते. तुम्हाला हे देखील लिहायचे आहे की, आम्ही ब्रह्माकुमार-कुमारी भाऊ-बहिणी आहोत. बाबा, ब्रह्माद्वारे सृष्टी रचतात तर भाऊ-बहीण झाले ना. कल्प-कल्प असेच क्रिएट करतात. ॲडॉप्ट करत जातात. मनुष्याला, प्रजापिता ब्रह्मा म्हटले जात नाही. भले ‘बाबा’ म्हणतात परंतु ते आहेत हदचे पिता, यांना ‘प्रजापिता’ म्हणणार कारण भरपूर प्रजा आहे अर्थात असंख्य मुले आहेत. तर बेहदचे बाबा मुलांना सर्व गोष्टी बसून समजावून सांगत आहेत. ही दुनिया एकदम बिघडलेली छी-छी आहे (पतित आहे). आता तुम्हाला ‘वाह-वाह’च्या दुनियेमध्ये घेऊन जात आहेत. तुमच्यामध्ये देखील असे बरेच आहेत जे विसरून जातात. जर हे लक्षात राहिले तर बाबांची देखील आठवण राहील आणि गुरु देखील लक्षात राहील की, आता परत जायचे आहे. जुने शरीर सोडून देणार कारण हे शरीर आता कामाचे राहिलेले नाही. आत्मा आता पवित्र होत जाते तर शरीर देखील पवित्र होणार आहे. बसून आपसात अशा गोष्टी केल्या पाहिजेत. याला म्हटले जाते - शुभ संमेलन, ज्या ठिकाणी - ‘सेवेची वृद्धी कशी करता येईल. सर्वांचे कल्याण कसे करता येईल!’ अशा चांगल्या-चांगल्या गोष्टींवर चर्चा होते. त्यांचे तर छी-छी संमेलन असते, थापा मारत रहातात. इथे थापा इत्यादीचा प्रश्नच नाही. खरे संमेलन तर याला म्हटले जाते. तुम्हाला ही कहाणी ऐकवली आहे की, हे कलियुग आहे, सतयुगाला स्वर्ग म्हटले जाते. भारत स्वर्ग होता. भारतवासीच ८४ जन्म भोगतात. आता अंतिम टप्प्यावर आहोत. आता तुम्ही तमोप्रधानापासून सतोप्रधान बनता. याच्यामध्ये काही गंगा-स्नान इत्यादी करायचे नाहीये. भगवानुवाच की मी सर्वांचा पिता आहे. श्रीकृष्ण सर्वांचा पिता होऊ शकत नाही. एक-दोन मुलांचा पिता श्री नारायण आहेत, श्रीकृष्ण नाही. श्रीकृष्ण तर कुमार आहे. या प्रजापिता ब्रह्माला तर पुष्कळ मुले आहेत. कुठे श्रीकृष्ण भगवानुवाच आणि कुठे शिव भगवानुवाच. किती मोठी चूक केली आहे. कुठेही प्रदर्शनी इत्यादी कराल तर मुख्य गोष्ट हीच सांगायची आहे की, गीतेचे भगवान हे शिवबाबा आहेत का तो श्रीकृष्ण आहे? सर्वप्रथम हे समजावून सांगितले पाहिजे की, भगवान, ‘शिव’ यांना म्हटले जाते. हे त्यांच्या बुद्धीमध्ये पक्के करायचे आहे. याच्यावर भर दिला पाहिजे. गीतेच्या भगवानाचे चित्र देखील खूप मोठे आणि कायमस्वरूपी लावलेले असले पाहिजे. त्याच्या खाली लिहिले पाहिजे की, ‘स्वतः पारखून घ्या आणि येऊन समजून घ्या’. त्यानंतर त्यांना काय समजले आहे त्याची लेखी पुष्टी घेऊन, त्यांची सही घेतली पाहिजे. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) आपसामध्ये शुभ संमेलन करून सेवेच्या वृद्धीचे प्लॅन बनवायचे आहेत. स्वतःच्या आणि सर्वांच्या कल्याणाची युक्ती रचायची आहे. कधीही कोणत्या व्यर्थ, फालतू गोष्टी करायच्या नाहीत.

२) पहाटे लवकर उठून स्वतःच स्वतःशी गोष्टी करायच्या आहेत, विचार सागर मंथन करायचे आहे. भोजन बनवताना एका बाबांच्याच आठवणी मध्ये राहायचे आहे. मनसा देखील बाहेर भटकता कामा नये, हे लक्षात ठेवायचे आहे.

वरदान:-
सर्व आत्म्यांवर प्रेमाचे राज्य करणारे विश्व राज्य अधिकारी भव

जी मुले वर्तमान समयी सर्व आत्म्यांच्या हृदयावर प्रेमाचे राज्य करतात तेच भविष्यामध्ये विश्वाच्या राज्याचा अधिकार प्राप्त करतात. आता कोणावरही हुकूम चालवायचा नाही. आता पासून विश्व महाराजन बनायचे नाही, आता विश्व सेवाधारी बनायचे आहे, प्रेम द्यायचे आहे. बघायचे आहे की आपल्या भविष्याच्या खात्यामध्ये किती प्रेम जमा केले आहे. विश्व महाराजन बनण्यासाठी फक्त ज्ञानदाता बनायचे नाहीये, त्यासाठी सर्वांना प्रेम अर्थात सहयोग द्या.

बोधवाक्य:-
जेव्हा थकल्यासारखे वाटेल तेव्हा खुशीमध्ये डान्स करा, यामुळे मूड बदलेल.

हे अव्यक्त इशारे - आता आपल्या ‘दाता’ स्वरूपाला प्रत्यक्ष करा.

बापदादा आता मुलांकडून हेच इच्छित आहेत की, माझा प्रत्येक मुलगा मास्टर दाता बनावा. आता दयाळू बनून आपल्या गुणांचा आणि शक्तींचा सर्वांना सहयोग द्या, फ्राकदिल बना (दिलदार बना). जितके दुसऱ्यांना देत जाल तितके वाढत जाईल. विनाशी खजिना दिल्यामुळे कमी होतो आणि अविनाशी खजिना दिल्यामुळे वाढतो - एक द्या आणि हजार मिळवा.