29-01-2026      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - आपल्या स्वीट बाबांची आठवण करा तर तुम्ही सतोप्रधान देवता बनाल, सर्व काही आठवणीच्या यात्रेवर अवलंबून आहे”

प्रश्न:-
कोणत्या मुलांकडून माया खूप विकर्म करवून घेते? यज्ञामध्ये विघ्न रूप कोण आहेत?
उत्तर:-
जे फूल बनले आहेत. जशी छोटी मुले फूल असतात, त्यांना विकारा विषयी माहिती देखील नसते तर ते सर्वांना आकर्षित करतात ना. असे तुम्ही मुले देखील जेव्हा फूल अर्थात पवित्र बनाल तेव्हा सर्वांना आकर्षण होईल. तुमच्यामध्ये विकाराचा कोणताही काटा असता कामा नये.

ओम शांती।
रुहानी मुले जाणतात की हे पुरुषोत्तम संगमयुग आहे. आपल्या भविष्याचा पुरुषोत्तम मुखडा बघत आहात? पुरुषोत्तम चोला (शरीर) बघत आहात? फील करता (अनुभव करता) की आपण नवीन दुनिया सतयुगामध्ये यांच्या (लक्ष्मी-नारायणाच्या) वंशावळीमध्ये जाणार अर्थात सुखधाममध्ये जाणार अथवा पुरुषोत्तम बनणार. बसल्या-बसल्या हे विचार येतात! स्टुडंट जे शिकतात, ज्या दर्जाचे शिक्षण घेतात, ते जरूर बुद्धीमध्ये असेल ना - मी बॅरिस्टर अथवा अमका बनणार. तसे तुम्ही देखील जेव्हा इथे बसता तर हे जाणता आपण विष्णू डिनायस्टीमध्ये (विष्णूच्या घराण्यामध्ये) जाणार. विष्णूची दोन रुपे आहेत - लक्ष्मी-नारायण, देवी-देवता. तुमची बुद्धी आता अलौकिक आहे. इतर कोणत्या मनुष्याच्या बुद्धीमध्ये या गोष्टी रमण करत नसतील. तुम्हा मुलांच्या बुद्धीमध्ये या सर्व गोष्टी आहेत. हा काही कॉमन सत्संग नाहीये. इथे बसला आहात तर समजता - आपण सत् बाबा ज्यांना ‘शिव’ म्हटले जाते, त्यांच्या संगामध्ये बसलो आहोत. शिवबाबाच रचता आहेत, तेच रचनेच्या आदि-मध्य-अंताला जाणतात आणि हे नॉलेज देतात. जणू काही कालचीच गोष्ट ऐकवत आहेत. इथे बसला आहात तर एवढे तरी लक्षात असेल ना की आपण आलो आहोत - रिज्युवनेट (पुनरुज्जीवित होण्यासाठी) अर्थात हे शरीर बदलून देवतांचे शरीर धारण करण्यासाठी. आत्मा म्हणते - आमचे हे तमोप्रधान जुने शरीर आहे, याला बदलून असे लक्ष्मी-नारायण बनायचे आहे. एम ऑब्जेक्ट किती श्रेष्ठ आहे. शिकवणारा टिचर जरूर शिकणाऱ्या स्टुडंटपेक्षा हुशार असेल ना. शिकवतात, चांगली कर्म शिकवतात तर जरूर श्रेष्ठ असतील ना. तुम्ही जाणता आम्हाला सर्वात उच्च ते उच्च भगवान शिकवत आहेत. भविष्यामध्ये आपण सो देवता बनणार. आम्ही जे शिकतो ते भविष्य नवीन दुनियेकरिता. इतर कोणालाच नवीन दुनिये विषयी ठाऊक देखील नाहीये. तुमच्या बुद्धीमध्ये आता आहे हे लक्ष्मी-नारायण नवीन दुनियेचे मालक होते. तर जरूर पुन्हा रिपीट होईल. बाबा समजावून सांगत आहेत तुम्हाला शिकवून मनुष्यापासून देवता बनवतो. देवतांमध्ये देखील जरूर नंबरवार असतील. दैवी राजधानी असते ना. तुमचा पूर्ण दिवस हाच विचार चालत असेल की, आपण आत्मा आहोत. आपली आत्मा जी खूप पतित होती, ती आता पावन बनण्यासाठी पावन बाबांची आठवण करत आहे. आठवणीचा अर्थ देखील समजून घ्यायचा आहे. आत्मा आठवण करते आपल्या स्वीट बाबांची. बाबा स्वतः म्हणतात - मुलांनो, माझी आठवण केल्याने तुम्ही सतोप्रधान देवता बनाल. सर्व काही आठवणीच्या यात्रेवर अवलंबून आहे. बाबा जरूर विचारतील ना - मुलांनो, किती वेळ आठवण करता? आठवण करण्यामध्येच मायेचे युद्ध होते. तुम्ही स्वतः समजता की ही यात्रा नाही परंतु जणूकाही युद्ध आहे, यामध्ये खूप विघ्न पडतात. आठवणीच्या यात्रेमध्ये राहण्यातच माया विघ्न निर्माण करते अर्थात आठवण विसरायला लावते. म्हणतात देखील - बाबा, आम्हाला तुमच्या आठवणीमध्ये राहताना मायेची खूप वादळे येतात. एक नंबरचे वादळ आहे देह-अभिमानाचे. नंतर आहे काम, क्रोध, लोभ, मोह… आज काम विकाराचे वादळ, उद्या क्रोधाचे वादळ, लोभाचे वादळ आले… आज आमची अवस्था चांगली राहिली, कोणतेही वादळ आले नाही. दिवसभर आठवणीच्या यात्रेमध्ये राहिलो, खूप आनंद झाला. बाबांची खूप आठवण केली. आठवणीमध्ये प्रेमाचे अश्रू वाहत राहतात. बाबांच्या आठवणी मध्ये राहिल्याने तुम्ही खूप गोड बनाल.

तुम्ही मुले हे देखील समजता की आपण मायेकडून हार खात-खात कुठपर्यंत येऊन पोहोचलो आहोत. मुले हिशोब काढतात. कल्पामध्ये किती महिने, किती दिवस… आहेत. बुद्धीमध्ये येते ना. जर कोणी म्हटले की, कल्पाचे आयुष्य लाखो वर्षे आहे तर मग कोणी हिशोब थोडाच करू शकतील. बाबा समजावून सांगतात - हे सृष्टीचे चक्र फिरतच राहते. या संपूर्ण चक्रामध्ये आपण किती जन्म घेतो. कसे राजाई घराण्यामध्ये जातो. हे तर जाणता ना. या एकदम नवीन गोष्टी आहेत, नवीन नॉलेज आहे नवीन दुनियेकरिता. नवीन दुनिया स्वर्गाला म्हटले जाते. तुम्ही म्हणाल आम्ही आता मनुष्य आहोत, देवता बनत आहोत. देवता पद आहे - अति श्रेष्ठ. तुम्ही मुले जाणता आपण सर्वात न्यारे नॉलेज घेत आहोत. आम्हाला शिकवणारे पूर्णत: न्यारे विचित्र आहेत. त्यांना असे साकार चित्र (शरीर) नाहीये. ते आहेतच निराकार. तर ड्रामामध्ये बघा कसा चांगला पार्ट ठेवला गेला आहे. बाबा शिकवतील कसे? तर स्वतः सांगतात - मी अमक्या शरीरामध्ये येतो. कोणाच्या तनामध्ये येतो, ते देखील सांगतात. मनुष्य गोंधळून जातात की, एकाच तनामध्ये येतील काय! परंतु हा तर ड्रामा आहे ना. यामध्ये बदल होऊ शकत नाही. या गोष्टी तुम्हीच ऐकता आणि धारण करता आणि ऐकवता की, कसे शिवबाबा आम्हाला शिकवत आहेत? आम्ही मग अजून इतर आत्म्यांना शिकवतो. शिकते आहे आत्मा. आत्माच शिकते, शिकवते. आत्मा अतिशय मौल्यवान आहे. आत्मा अविनाशी आहे, अमर आहे. फक्त शरीर नष्ट होते. आपण आत्मे आपल्या परमपिता परमात्म्याकडून नॉलेज घेत आहोत. रचयिता आणि रचनेच्या आदि-मध्य-अंताचे, ८४ जन्मांचे नॉलेज घेत आहोत. नॉलेज कोण घेते? आत्मा. आत्मा अविनाशी आहे. मोह देखील ठेवला पाहिजे अविनाशी गोष्टीमध्ये, विनाशी गोष्टीमध्ये नको. इतका वेळ तुम्ही विनाशी शरीरामध्ये मोह ठेवत आला आहात. आता समजता - आपण आत्मा आहोत, शरीराचे भान सोडायचे आहे. काही-काही मुले लिहितात सुद्धा - ‘मज आत्म्याने हे काम केले’. मज आत्म्याने आज हे भाषण केले. मज आत्म्याने आज बाबांची खूप आठवण केली’. ते आहेत सुप्रीम आत्मा, नॉलेजफुल. तुम्हा मुलांना किती नॉलेज देतात. मूलवतन, सूक्ष्मवतनला तुम्ही जाणता. मनुष्यांच्या बुद्धीमध्ये तर काहीच नाहीये. तुमच्या बुद्धीमध्ये हे आहे की, रचता कोण आहेत? या मनुष्य सृष्टीचे क्रीएटर असे म्हटले जाते, तर जरूर ते कर्तव्य देखील करत असतील.

तुम्ही जाणता आणखी कोणताही मनुष्य नाही ज्याला आत्म्याची आणि परमात्मा बाबांची आठवण आहे. बाबाच नॉलेज देतात की स्वतःला आत्मा समजा. तुम्ही स्वतःला शरीर समजून उलटे लटकलेले आहात. आत्मा सत् चित् आनंद स्वरूप आहे. आत्म्याची सर्वात जास्त महिमा आहे. एका बाबांच्या आत्म्याची किती महिमा आहे. तेच दुःख हर्ता, सुख कर्ता आहेत. मच्छर इत्यादींची तर महिमा करणार नाही की, ते दुःख हर्ता, सुख कर्ता आहेत, ज्ञानाचा सागर आहेत. नाही, ही बाबांची महिमा आहे. तुम्ही देखील प्रत्येकजण स्वतः दुःख हर्ता, सुख कर्ता आहात कारण त्या पित्याची मुले आहात, जे सर्वांचे दुःख हरण करतात आणि सुख देतात. ते देखील अर्ध्या कल्पासाठी. हे नॉलेज आणखी कोणाकडेच नाही आहे. नॉलेजफुल एक बाबाच आहेत. आपल्यामध्ये सुद्धा नॉलेज नाही. एका बाबांनाच जाणत नाहीत तर मग नॉलेज तरी कसे असणार. आता तुम्ही फिल करता की आपण आधी नॉलेज घेत होतो परंतु काहीच जाणत नव्हतो. लहान मुलामध्ये नॉलेज नसते आणि कोणता अवगुण सुद्धा नसतो, म्हणून त्याला महात्मा म्हटले जाते कारण पवित्र आहे. जितके छोटे मूल तितके नंबर वन फूल. एकदम जशी की कर्मातीत अवस्था असते. कर्म-विकर्माला अजिबात जाणत नाहीत. फक्त स्वतःलाच जाणतात. ते फूल असतात म्हणून सर्वांना आकर्षित करतात. जसे आता बाबा आकर्षित करतात. बाबा आलेच आहेत तुम्हा सर्वांना फूल बनविण्यासाठी. तुमच्यामध्ये कितीतरी अतिशय खराब काटे देखील आहेत. ५ विकार रुपी काटे आहेत ना. यावेळी तुम्हाला फुलांचे आणि काट्यांचे ज्ञान आहे. काट्यांचे जंगल देखील असते. बाभळीचा काटा सर्वात मोठा असतो. त्या काट्यापासून सुद्धा खूप साऱ्या गोष्टी बनतात. त्याची तुलना मनुष्यासोबत केली जाते. बाबा समजावून सांगत आहेत, यावेळी खूप दुःख देणारे मनुष्य जसे की काटे आहेत म्हणून याला दुःखाची दुनिया म्हटले जाते. म्हणतात देखील बाबा सुख-दाता आहेत. माया रावण दुःख दाता आहे. नंतर सतयुगामध्ये माया असणार नाही त्यामुळे या कोणत्याही गोष्टी असणार नाहीत. ड्रामामध्ये एक पार्ट दोनदा असू शकत नाही. बुद्धीमध्ये आहे की, साऱ्या दुनियेमध्ये जो काही पार्ट बजावला जातो, तो सर्व नवीन. तुम्ही विचार करा - सतयुगापासून आत्तापर्यंतचे दिवसच बदलून जातात, ॲक्टिव्हिटी बदलते. ५००० वर्षांचे पूर्ण ॲक्टिव्हिटीचे रेकॉर्ड आत्म्यामध्ये भरलेले आहे, ते बदलू शकत नाही. प्रत्येक आत्म्यामध्ये स्वतःचा पार्ट भरलेला आहे. एवढी एक गोष्ट सुद्धा कोणी समजू शकत नाही. आता आदि-मध्य-अंताला तुम्ही जाणता. ही शाळा आहे ना. सृष्टीच्या आदि-मध्य-अंताला समजून घ्यायचे आहे शिवाय बाबांची आठवण करून पवित्र कसे बनायचे ते शिकायचे आहे. याच्या अगोदर हे जाणत होतो का की, आपल्याला हे बनायचे आहे. बाबा किती क्लिअर करून समजावून सांगतात. तुम्ही पहिल्या नंबरमध्ये हे होता नंतर मग तुम्ही खाली उतरत-उतरत आता काय बनला आहात. दुनिया तर बघा कशी झाली आहे! किती असंख्य मनुष्य आहेत. या लक्ष्मी-नारायणाच्या राजधानीचा विचार करा - कशी असेल! हे जिथे राहत असतील तिथे कसे हिरे-माणकांचे महाल असतील. बुद्धीमध्ये येते - आता आपण स्वर्गवासी बनत आहोत. तिथे आपण आपली घरे इत्यादी बनवणार. असे नाही की पाताळातून द्वारका बाहेर येईल. जसे शास्त्रांमध्ये दाखवले आहे. ‘शास्त्र’ हेच नाव चालत येते, दुसरे तर कोणते नाव ठेऊ शकत नाही. बाकीची पुस्तके असतात शिक्षणासाठी. दुसऱ्या कादंबऱ्या असतात. बाकी याला ग्रंथ अथवा शास्त्र म्हणतात. ती आहेत शैक्षणिक पुस्तके. शास्त्र पठण करणाऱ्यांना भक्त म्हटले जाते. भक्ती आणि ज्ञान दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आता वैराग्य कशाचे? भक्तीचे का ज्ञानाचे? जरुर म्हणणार भक्तीचे. आता तुम्हाला ज्ञान मिळत आहे, ज्यामुळे तुम्ही इतके श्रेष्ठ बनता. आता बाबा तुम्हाला सुखदाई बनवत आहेत. सुखधामलाच स्वर्ग म्हटले जाते. तुम्ही सुखधाममध्ये जाणार आहात तर तुम्हालाच शिकवतात. हे ज्ञान देखील तुमची आत्माच घेते. आत्म्याचा कोणता धर्म नाही आहे. ती तर आत्मा आहे. मग आत्मा जेव्हा शरीरामध्ये येते तर शरीराचे धर्म वेगळे असतात. आत्म्याचा धर्म कोणता आहे? एक तर आत्मा बिंदू सारखी आहे आणि शांत स्वरूप आहे. शांतीधाम, मुक्तिधाममध्ये राहते. आता बाबा समजावून सांगत आहेत - सर्व मुलांचा अधिकार आहे. अशी पुष्कळ मुले आहेत जी इतर धर्मांमध्ये कन्व्हर्ट झाली आहेत. ते मग तिथून निघून आपल्या खऱ्या धर्मामध्ये येतील. जे देवी-देवता धर्म सोडून दुसऱ्या धर्मामध्ये गेले आहेत, ती सर्व पाने (आत्मे) परत आपल्या जागी येतील. या सर्व गोष्टींना इतर कोणीही समजू शकणार नाही. सर्वप्रथम तर बाबांचा परिचय द्यायचा आहे यामध्येच सर्व जण गोंधळून गेले आहेत. तुम्ही मुले जाणता आता आपल्याला कोण शिकवत आहेत? बाबा शिकवत आहेत. श्रीकृष्ण तर देहधारी आहे. यांना (ब्रह्मा बाबांना) दादा म्हणतात. सर्व जण भाऊ-भाऊ आहेत ना. त्यानंतर देहावर अवलंबून आहे. हे भावाचे शरीर आहे, हे बहिणीचे शरीर आहे. हे देखील आता तुम्ही जाणता. आत्मा तर एक छोटासा तारा आहे. इतके सर्व नॉलेज त्या छोट्या ताऱ्यामध्ये आहे. तारा शरीराशिवाय बोलू देखील शकत नाही. ताऱ्याचा पार्ट बजावण्यासाठी अवयव देखील पाहिजेत. ताऱ्यांची दुनियाच वेगळी आहे. आणि मग इथे येऊन आत्मा शरीर धारण करते. ते आहे आत्म्यांचे घर. आत्मा छोटा बिंदू आहे. शरीर मोठी गोष्ट आहे. तर त्यांची किती आठवण करतात! आता तुम्हाला आठवण करायची आहे - एका परमपिता परमात्म्याची. हेच सत्य आहे जेव्हा की आत्म्यांचे आणि परमात्म्याचे मिलन होते. गायन देखील आहे - ‘आत्मायें परमात्मा अलग रहे बहुकाल…’ आपण बाबांपासून दुरावलो आहोत ना. आठवते आहे की, किती काळ दूर राहिलो आहोत! बाबा जे कल्प-कल्प ऐकवत आले आहेत, तेच येऊन ऐकवतात. यामध्ये जरा देखील फरक पडू शकत नाही. सेकंद बाय सेकंद जी कृती घडते ती नवीन. एक सेकंद पास होतो, मिनिट पास होतो, त्याला जसे की मागे सोडत जातो. पार करत जातो तेव्हाच तर म्हणणार - इतकी वर्षे, इतके दिवस, मिनिटे, इतके सेकंद पार करून आलो आहोत. पूर्ण ५००० वर्षे होतील मग पुन्हा एक नंबर पासून चालू होईल. अचूक हिशोब आहे ना. मिनिटे, सेकंद सर्व काही नोट करतात. आता तुम्हाला कोणी विचारले - याने कधी जन्म घेतला होता? तुम्ही मोजून सांगता. श्रीकृष्णाने पहिल्या नंबरमध्ये जन्म घेतला आहे. शिवबाबांची तर मिनिटे, सेकंद काहीही काढू शकत नाही. श्रीकृष्णाची तिथी-तारीख पूर्ण लिहिलेली आहे. मनुष्यांच्या घड्याळामध्ये मिनिट-सेकंदाचा फरक पडू शकतो. शिवबाबांच्या अवतरणामध्ये अजिबात फरक पडू शकत नाही. समजत सुद्धा नाही की केव्हा आले! असे देखील नाही की साक्षात्कार झाला तेव्हा आले. नाही, अंदाजाने सांगतात. बाकी असे नाही की, त्यावेळी प्रवेशता झाली. साक्षात्कार झाला की मी अमका बनणार. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) सुखधाममध्ये जाण्यासाठी सुखदायी बनायचे आहे. सर्वांचे दुःख हरण करून सुख द्यायचे आहे. कधीही दुःखदायी काटा बनायचे नाही.

२) या विनाशी शरीरामध्ये आत्माच अतिशय मौल्यवान आहे, तीच अमर अविनाशी आहे म्हणून अविनाशी गोष्टीवर प्रेम ठेवायचे आहे. देहाचे भान नष्ट करायचे आहे.

वरदान:-
आपल्या अनादि, आदि स्वरूपाच्या स्मृतीद्वारे निर्बंधन बनणारे आणि बनविणारे मरजीवा भव

जसे बाबा लोन घेतात, बंधनामध्ये येत नाहीत, तसे तुम्ही मरजीवा जन्म घेणारी मुले शरीराच्या, संस्कारांच्या, स्वभावाच्या बंधनांपासून मुक्त बना, जेव्हा पाहिजे, जसे पाहिजे तसे स्वतःचे संस्कार बनवा. जसे बाबा निर्बंधन आहेत असे निर्बंधन बना. मूलवतनच्या स्थितीमध्ये स्थित होऊन मग खाली या. आपल्या अनादि, आदि स्वरूपाच्या स्मृतीमध्ये रहा, अवतरित झालेली आत्मा समजून कर्म करा तर दुसरे देखील तुम्हाला फॉलो करतील.

बोधवाक्य:-
आठवणीच्या वृत्ती द्वारे वायुमंडळाला पॉवरफुल बनविणे - हीच मनसा सेवा आहे.

अव्यक्त इशारे:- या अव्यक्ती महिन्यामध्ये बंधनमुक्त राहून जीवनमुक्त स्थितीचा अनुभव करा.

जोपर्यंत कोणत्याही प्रकारचा लगाव (आसक्ती) आहे, मग तो संकल्पाच्या रुपातील असो, नात्याच्या रुपातील असो, संपर्काच्या रूपातील असो, नाहीतर आपल्या एखाद्या विशेषतेमध्ये असो. कोणतीही आसक्ती बंधन-युक्त करेल. ती आसक्ती अशरीरी बनू देणार नाही आणि तो विश्व-कल्याणकारी देखील बनवू शकणार नाही. म्हणून पहिले स्वतः लगाव मुक्त बना तेव्हाच विश्वाला मुक्ती आणि जीवनमुक्तीचा वारसा देऊ शकाल.