29-04-2025
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
“गोड
मुलांनो - हा तुमचा अतिशय अमूल्य जन्म आहे, याच जन्मामध्ये तुम्हाला मनुष्या पासून
देवता बनण्यासाठी पावन बनण्याचा पुरुषार्थ करायचा आहे”
प्रश्न:-
ईश्वरीय संतान
म्हटले जाणाऱ्या मुलांची मुख्य धारणा कोणती असेल?
उत्तर:-
ते आपसामध्ये खूप-खूप क्षीरखंड होऊन राहतील. कधी लून पाणी (खारे पाणी) होणार नाहीत.
जे देह-अभिमानी मनुष्य आहेत ते उलटे-सुलटे बोलतात, भांडण-तंटे करतात. तुम्हा
मुलांमध्ये ती सवय असू शकत नाही. इथे तुम्हाला दैवी गुण धारण करायचे आहेत, कर्मातीत
अवस्थेला प्राप्त करायचे आहे.
ओम शांती।
सर्वप्रथम बाबा मुलांना म्हणतात - देही-अभिमानी भव. स्वतःला आत्मा समजा. गीता
इत्यादीमध्ये भले काहीही असेल परंतु ती सर्व आहेत भक्तीमार्गाची शास्त्रे. बाबा
म्हणतात - मी ज्ञानाचा सागर आहे. तुम्हा मुलांना ज्ञान ऐकवतो. कोणते ज्ञान ऐकवतो?
सृष्टीचे किंवा ड्रामाच्या आदि-मध्य-अंताचे ज्ञान ऐकवतो. हे आहे शिक्षण. इतिहास आणि
भूगोल आहे ना. भक्तिमार्गामध्ये काही इतिहास आणि भूगोल शिकत नाहीत. नाव देखील घेत
नाहीत. साधु-संत इत्यादी बसून शास्त्र वाचतात. हे बाबा तर कोणते शास्त्र वाचून ऐकवत
नाहीत, तुम्हाला या शिक्षणा द्वारे मनुष्या पासून देवता बनवितात. तुम्ही येताच मुळी
मनुष्यापासून देवता बनण्यासाठी. आहेत ते देखील मनुष्य, हे देखील मनुष्य. परंतु हे
बाबांना बोलावतात की, ‘हे पतित-पावन या’. हे तर जाणता देवता पावन आहेत. बाकी तर
सर्व अपवित्र मनुष्य आहेत, ते देवतांना नमन करतात. त्यांना पावन, स्वतःला पतित
समजतात. परंतु देवता पावन कसे बनले, कोणी बनवले - हे कोणीही मनुष्य मात्र जाणत
नाहीत. तर बाबा म्हणतात - स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण करणे यामध्येच मेहनत आहे.
देह-अभिमान असता कामा नये. आत्मा अविनाशी आहे, संस्कार देखील आत्म्यामध्येच असतात.
आत्माच चांगले किंवा वाईट संस्कार घेऊन जाते; म्हणून आता बाबा म्हणतात देही-अभिमानी
बना. स्वतःच्या आत्म्याला देखील कोणी जाणत नाहीत. जेव्हा रावण राज्य सुरू होते तर
अंधाराचा मार्ग सुरू होतो, देह-अभिमानी बनतात.
बाबा बसून समजावून सांगतात की, तुम्ही मुले इथे कोणाकडे आला आहात? यांच्याकडे (ब्रह्मा
बाबांकडे) नाही. मी यांच्यामध्ये प्रवेश केला आहे. यांच्या अनेक जन्मांतील शेवटचा
हा पतित जन्म आहे. अनेक जन्म कोणते आहेत? ते देखील सांगितले, अर्धा कल्प आहेत
पवित्र जन्म, अर्धा कल्प आहेत पतित जन्म, तर हा देखील पतित झाला. ब्रह्मा स्वतःला
देवता किंवा ईश्वर म्हणत नाही. लोक समजतात प्रजापिता ब्रह्मा देवता होते म्हणून
म्हणतात - ब्रह्मा देवताय नमः. बाबा समजावून सांगत आहेत - ब्रह्मा पतित होते, अनेक
जन्मांच्या अंतामध्ये ते पुन्हा पावन बनून देवता बनतात. तुम्ही आहात बी.के. तुम्ही
देखील ब्राह्मण, हा ब्रह्मा देखील ब्राह्मण. यांना देवता कोण म्हणतो? ब्रह्माला
ब्राह्मण म्हटले जाते, ना की देवता. हे जेव्हा पवित्र बनतात तरी देखील ब्रह्माला
देवता म्हणता येणार नाही. जोपर्यंत विष्णू (लक्ष्मी-नारायण) बनत नाहीत तोपर्यंत
देवता म्हणता येणार नाही. तुम्ही ब्राह्मण-ब्राह्मणी आहात. तुम्हाला सर्वप्रथम
शूद्रापासून ब्राह्मण, ब्राह्मणापासून देवता बनवतो. हा तुमचा अमूल्य हिऱ्यासमान
जन्म म्हटला जातो. भले कर्मभोग तर असतोच. तर आता बाबा म्हणतात - स्वतःला आत्मा
समजून मज पित्याची आठवण करत रहा. ही प्रॅक्टिस असेल तेव्हाच विकर्म विनाश होतील.
देहधारी समजलात तर विकर्म विनाश होणार नाहीत. आत्मा काही ब्राह्मण नाही आहे,
शरीरासोबत आहे तेव्हाच ब्राह्मण मग देवता… शूद्र इत्यादी बनते. तर आता बाबांची आठवण
करण्याची मेहनत करायची आहे. सहजयोग देखील आहे. बाबा म्हणतात सोप्यात सोपा देखील आहे.
कोणा-कोणाला मग अवघड देखील वाटतो. घडो-घडी देह-अभिमानामध्ये येऊन बाबांना विसरतात.
देही-अभिमानी बनण्यामध्ये वेळ तर लागतो ना. असे तर होऊ शकत नाही की आता तुम्ही एकरस
व्हाल आणि बाबांची आठवण स्थायी टिकून राहील. नाही. कर्मातीत अवस्थेला प्राप्त कराल
तेव्हा मग शरीर सुद्धा राहू शकत नाही. पवित्र आत्मा हलकी होऊन एकदम शरीर सोडेल.
पवित्र आत्म्यासोबत अपवित्र शरीर राहू शकत नाही. असेही नाही की हे दादा (ब्रह्मा
बाबा) काही पार पोहोचले आहेत (सम्पूर्ण बनले आहेत). हे देखील म्हणतात - आठवणीची खूप
मेहनत आहे. देह-अभिमानामध्ये आल्याने उलटे-सुलटे बोलणे, भांडण करणे, मारामारी करणे
इत्यादी होते. आपण सर्व आत्मे भाऊ-भाऊ आहोत म्हणजे मग आत्म्याला काहीही होणार नाही.
देह-अभिमानामुळेच घोटाळा झाला आहे. आता तुम्हा मुलांना देही-अभिमानी बनायचे आहे. जसे
देवता क्षीरखंड आहेत असे तुम्हाला देखील आपसामध्ये खूप क्षीरखंड होऊन राहिले पाहिजे.
तुम्ही कधीही लून-पाणी (खारट पाणी) व्हायचे नाही. जे देह-अभिमानी मनुष्य आहेत ते
उलटे-सुलटे बोलतात, भांडण-तंटे करतात. तुम्हा मुलांमध्ये आता ती सवय असू शकत नाही.
इथे तर तुम्हाला देवता बनण्यासाठी दैवी गुण धारण करायचे आहेत. कर्मातीत अवस्थेला
प्राप्त करायचे आहे. तुम्ही जाणता हे शरीर, ही दुनिया जुनी तमोप्रधान आहे. जुन्या
गोष्टींचा, जुन्या नात्यांचा तिटकारा वाटायला हवा. देह-अभिमानाच्या गोष्टींना सोडून
स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण करायची आहे तर पाप विनाश होतील. बरीच मुले
आठवणीमध्ये नापास होतात. ज्ञान सांगण्यामध्ये खूप कुशाग्र होत जातात परंतु आठवणीची
मेहनत खूप अवघड आहे. मोठी परीक्षा आहे. अर्ध्याकल्पाचे जुने भक्तच समजू शकतात.
भक्तीमध्ये जे नंतर आले आहेत ते इतके समजू शकणार नाहीत.
बाबा या शरीरामध्ये येऊन म्हणतात मी दर ५ हजार वर्षानंतर येतो. माझा ड्रामामध्ये
पार्ट आहे आणि मी एकदाच येतो. हे तेच संगमयुग आहे. लढाई देखील समोर उभी आहे. हा
ड्रामा आहेच ५ हजार वर्षांचा. कलियुगाचा कालावधी अजून ४० हजार वर्षे जर असेल तर
माहित नाही काय होईल. ते तर म्हणतात - भले भगवान जरी आलेले आहेत तरी देखील आम्ही
शास्त्रांचा मार्ग काही सोडणार नाही. हे देखील माहित नाहीये की ४० हजार वर्षा नंतर
कोणता भगवान येणार आहे. कोणी समजतात कृष्ण भगवान येणार. पुढे चालून असेच तुमचे नाव
थोडेच प्रसिद्ध होणार. परंतु ती अवस्था झाली पाहिजे. आपसामध्ये खूप-खूप प्रेम असले
पाहिजे. तुम्ही ईश्वरीय संतान आहात ना. तुम्ही खुदाई-खिदमतगार गायले गेले आहात.
तुम्ही म्हणता - आम्ही पतित भारताला पावन बनविण्यासाठी बाबांचे मदतगार आहोत. बाबा,
कल्प-कल्प आम्ही आत्म-अभिमानी बनून तुमच्या श्रीमतावर योगबलाने आमची विकर्म विनाश
करतो. योगबळ आहे सायलेन्स बळ. सायलेन्स बळ आणि सायन्स बळ यामध्ये रात्रं-दिवसाचा
फरक आहे. पुढे जाऊन तुम्हाला खूप साक्षात्कार होत राहतील. सुरुवातीला किती मुलांना
साक्षात्कार झाले, पार्ट बजावला. आज ते इथे नाहीत, मायेने खाऊन टाकले. योगामध्ये न
राहिल्याने माया खाऊन टाकते. जेव्हा की मुले जाणतात भगवान आपल्याला शिकवत आहेत तर
मग नियमानुसार शिकले पाहिजे. नाहीतर अतिशय कमी दर्जाचे पद प्राप्त कराल. सजा देखील
खूप खाल. गातात देखील ना - जन्म-जन्मांतरीचा पापी आहे. तिथे (सतयुगामध्ये) तर
रावणाचे राज्यच नाही तर मग विकाराचे नाव देखील कसे असू शकते. ते आहेच संपूर्ण
निर्विकारी राज्य. ते राम राज्य, हे रावण राज्य. यावेळी सर्व तमोप्रधान आहेत.
प्रत्येक मुलाने आपल्या स्थितीची तपासणी केली पाहिजे की, आपण बाबांच्या आठवणीमध्ये
किती वेळ राहू शकतो? कितपत दैवी गुण धारण केले आहेत? मुख्य गोष्ट म्हणजे -
अंतर्मनामध्ये डोकावून पाहिले पाहिजे की, ‘माझ्यामध्ये कोणते अवगुण तर नाहीत ना?
माझे खाणे-पिणे कसे आहे? संपूर्ण दिवसभरामध्ये कोणती फालतू गोष्ट किंवा खोटे तर
बोलत नाही ना?’ शरीर निर्वाहासाठी देखील खोटे इत्यादी बोलावे लागते ना. मग मनुष्य
धर्माऊ काढतात जेणेकरून पाप हलके व्हावे. चांगली कर्म करतात तर त्याचे देखील रिटर्न
मिळते. कोणी हॉस्पिटल बांधले तर पुढच्या जन्मामध्ये चांगले आरोग्य मिळेल. कॉलेज
बांधले तर चांगले शिकतील. परंतु पापाचे प्रायश्चित्त काय आहे? त्यासाठी मग गंगा
स्नान करण्यासाठी जातात. बाकी जे धन दान करतात तर त्याचे दुसऱ्या जन्मामध्ये मिळते.
त्यामध्ये पाप नष्ट करण्याची गोष्ट राहत नाही. ती असते धनाची देवाण-घेवाण ईश्वर
अर्थ दिले, ईश्वराने अल्प काळासाठी दिले. इथे तर तुम्हाला पावन बनायचे आहे त्यासाठी
मग बाबांच्या आठवणीशिवाय दुसरा कोणताही उपाय नाही. पावन मग पतित दुनियेमध्ये थोडेच
राहतील. ते ईश्वर अर्थ करतात इनडायरेक्ट. आता तर ईश्वर म्हणतात - मी सन्मुख आलो आहे
पावन बनविण्यासाठी. मी तर दाता आहे, मला तुम्ही देता तर मी रिटर्नमध्ये देतो. मी
थोडे माझ्या जवळ ठेवेन. तुम्हा मुलांसाठीच घरे इत्यादी बनवली आहेत. संन्यासी लोक तर
स्वतःसाठी मोठ-मोठे महाल इत्यादी बनवतात. इथे शिवबाबा स्वतःसाठी तर काहीच बनवत
नाहीत. म्हणतात - याचे रिटर्न तुम्हाला २१ जन्मांसाठी नवीन दुनियेमध्ये मिळेल कारण
तुम्ही सन्मुख देवाण-घेवाण करता. जो पैसा देता तो तुमच्याच कार्यासाठी लागतो.
भक्तिमार्गामध्ये देखील दाता आहे तर आता देखील दाता आहे. ते (भक्तीमध्ये) आहे
इनडायरेक्ट, हे (ज्ञानामध्ये) आहे डायरेक्ट. बाबा तर म्हणतात - जे काही आहे त्यातून
सेंटर उघडा. इतरांचे कल्याण करा. मी देखील तर सेंटर उघडतो ना. मुलांनीच दिलेले आहे,
मुलांनाच मदत करतो. मी थोडेच माझ्यासोबत पैसे घेऊन येतो. मला काही स्वर्गामध्ये
यायचे नाहीये. हे सर्व काही तुमच्यासाठी आहे, मी तर अभोक्ता आहे. काहीच घेत नाही.
असे देखील म्हणत नाही की पाया पडा. तुम्हा मुलांचा मोस्ट ओबीडीयंट सर्व्हंट (अति
आज्ञाधारक सेवक) आहे. हे देखील तुम्ही जाणता की, तेच माता-पिता, बंधू-सखा… सर्वकाही
आहेत. ते देखील निराकार आहेत. तुम्ही कोणत्या गुरुला कधी त्वमेव माता-पिता म्हणणार
नाही. गुरुला गुरु, टीचरला टीचरच म्हणाल. यांना माता-पिता म्हणता. बाबा म्हणतात -
मी कल्प-कल्प एकदाच येतो. तुम्हीच १२ महिन्या नंतर जयंती साजरी करता. परंतु शिवबाबा
कधी आले, काय केले, हे कोणालाच माहीत नाही. ब्रह्मा-विष्णू-शंकराच्या ऑक्युपेशन (जीवन
चरित्राविषयी) देखील माहिती नाही आहे. कारण वरचे शिवाचे चित्रच काढून टाकले आहे.
नाहीतर शिवबाबा करन-करावनहार आहेत. ब्रह्मा द्वारे करवून घेतात. हे देखील तुम्ही
मुलेच जाणता, कसे येऊन प्रवेश करतात आणि करून दाखवतात. अर्थात स्वतः म्हणतात तुम्ही
देखील असे करा. एक तर चांगल्या रीतीने शिका. बाबांची आठवण करा, दैवी गुण धारण करा.
जशी यांची (ब्रह्माची) आत्मा म्हणते. हे देखील म्हणतात - मी बाबांची आठवण करतो. बाबा
देखील जसे सोबत आहेत. तुमच्या बुद्धीमध्ये आहे आपण नवीन दुनियेचे मालक बनणार आहोत.
तर चाल-चलन, खान-पान इत्यादी सर्व बदलायचे आहे. विकारांना सोडायचे आहे. सुधारायचे
तर आहे. जस-जसे सुधराल आणि मग शरीर सोडाल तर उच्च कुळामध्ये जन्म घ्याल. नंबरवार
कुळाचे देखील असतात. इथे (या जुन्या दुनियेमध्ये) देखील खूप चांगल्या-चांगल्या
कुळाचे असतात. ४-५ भाऊ सर्व आपसामध्ये एकत्र राहतात, कसलीच भांडणे इत्यादी होत
नाहीत. आता तुम्ही मुले जाणता - आपण अमरलोकमध्ये जातो, जिथे काळ खात नाही. भिती
वाटण्याचा काही प्रश्नच नाही. इथे तर दिवसें-दिवस भय वाढत जाईल. बाहेर निघू शकणार
नाहीत. हे देखील जाणता हे शिक्षण कोटी मधील कोणीच शिकतील. काहीजण तर चांगल्या रीतीने
समजतात, लिहितात देखील खूप चांगले आहे. अशी देखील मुले जरूर येतील. राजधानी तर
स्थापन होणार आहे. बाकी थोडा वेळ राहिलेला आहे.
बाबा त्या पुरुषार्थी मुलांची खूप-खूप महिमा करतात जे आठवणीच्या यात्रेमध्ये वेगाने
दौड लावणारे आहेत. मुख्य आहेच आठवणींची गोष्ट. याद्वारे जुने हिशोब चुकतू होतात.
काही-काही मुले बाबांना लिहीतात - बाबा आम्ही इतके तास रोज आठवण करतो; तर बाबा
देखील समजतात हा खूप पुरुषार्थी आहे. पुरुषार्थ तर करायचा आहे ना म्हणून बाबा
म्हणतात आपसामध्ये कधीही भांडण-तंटा असता कामा नये. हे तर पशूंचे काम आहे.
भांडणे-मारामारी करणे हा आहे देह-अभिमान. बाबांचे नाव बदनाम करतात. बाबासाठीच म्हटले
जाते - ‘सद्गुरू का निंदक ठौर ना पाये’ (सद्गुरूची निंदा करणारा उच्च पद प्राप्त करू
शकत नाही). साधू लोकांनी मग स्वतःसाठी म्हटले आहे. तर माता त्यांना खूप घाबरतात की
कुठे शाप मिळू नये. आता तुम्ही जाणता आपण मनुष्यापासून देवता बनत आहोत. खरी-खरी अमर
कथा ऐकत आहोत. म्हणता - आम्ही या पाठशाळेमध्ये येतो श्री लक्ष्मी-नारायणाचे पद
प्राप्त करण्यासाठी; दुसरीकडे कुठे असे म्हणत नाहीत. आता आपण जातो आपल्या घरी.
यामध्ये आठवणीचा पुरुषार्थच मुख्य आहे. अर्धा कल्प आठवण केलेली नाहीये. आता एकाच
जन्मामध्ये आठवण करायची आहे. ही आहे मेहनत. आठवण करायची आहे, दैवी गुण धारण करायचे
आहेत, कोणते पाप कर्म केले तर शंभर पटीने दंड होईल. पुरुषार्थ करायचा आहे, आपली
उन्नती करायची आहे. आत्माच शरीरा द्वारे शिकून बॅरिस्टर किंवा सर्जन इत्यादी बनते
ना. हे लक्ष्मी-नारायण पद तर खूप श्रेष्ठ आहे ना. पुढे चालून तुम्हाला खूप
साक्षात्कार होतील. तुम्ही आहात - ‘सर्वोत्तम ब्राह्मण कुल भूषण, स्वदर्शन चक्रधारी’.
कल्पापूर्वी देखील तुम्हाला हे ज्ञान ऐकवले होते. पुन्हा तुम्हाला ऐकवतात. तुम्ही
ऐकून पद प्राप्त करता. मग हे ज्ञान प्राय: लोप होते. बाकी ही शास्त्रे इत्यादी सर्व
आहेत भक्ती मार्गाची. अच्छा!
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१)
अंतर्मनामध्ये आपली तपासणी करायची आहे - ‘मी बाबांच्या आठवणीमध्ये किती वेळ राहतो?
दैवी गुण कितपत धारण केले आहेत? माझ्यामध्ये कोणता अवगुण तर नाही ना? माझे खान-पान,
चाल-चलन रॉयल आहे का? मी व्यर्थ गोष्टी तर करत नाही ना? खोटे तर बोलत नाही ना?
२) आठवणीचा चार्ट
वाढविण्याकरिता हा अभ्यास करायचा आहे - ‘आपण सर्व आत्मे भाऊ-भाऊ आहोत.
देह-अभिमानापासून दूर रहायचे आहे. आपली एकरस स्थिती बनवायची आहे, यासाठी वेळ द्यायचा
आहे.
वरदान:-
पाचही तत्व आणि
पाच विकारांना आपले सेवाधारी बनविणारे मायाजीत स्वराज्य अधिकारी भव
जसे सतयुगामध्ये
विश्व महाराजा आणि विश्व महाराणीच्या राजाई ड्रेसला मागून दास-दासी उचलतात, असे
संगमयुगावर तुम्ही मुले जेव्हा मायाजीत स्वराज्य अधिकारी बनून टायटल रुपी ड्रेसने (स्वमान
रुपी पोषाखाने) शृंगारलेले रहाल तर ही ५ तत्वे आणि ५ विकार तुमच्या ड्रेसला मागून
उचलतील अर्थात अधीन होऊन चालतील. यासाठी दृढ संकल्पाच्या बेल्टने टायटल्सच्या
ड्रेसला टाईट करा, विविध ड्रेस आणि शृंगाराच्या सेटने सजून-धजून बाबांच्या सोबत रहा
तर हे विकार आणि तत्व परिवर्तन होऊन सहयोगी सेवाधारी बनतील.
बोधवाक्य:-
ज्या गुणांचे
किंवा शक्तींचे वर्णन करता त्याच्या अनुभवामध्ये हरवून जा. अनुभवच सर्वात मोठी
ऑथॉरिटी आहे.
अव्यक्त इशारे -
“कंबाइंड रुपाच्या स्मृती द्वारे सदा विजयी बना”
स्वतःला बाबांसोबत
कंबाइंड समजल्याने विनाशी साथीदार बनविण्याचा संकल्प नाहीसा होईल; कारण स्वयं
सर्वशक्तिमान साथीदार आहे. जसे सूर्याच्या समोर अंधार टिकू शकत नाही तसेच
सर्वशक्तिमानच्या समोर मायेचा कोणताही व्यर्थ संकल्प टिकू शकत नाही. कोणताही शत्रू
वार करण्यापूर्वी आधी समोरच्याला एकटा पाडतो, त्यामुळे कधीही एकटे होऊ नका.