29-06-25    अव्यक्त बापदादा    मराठी मुरली   31.12.2005  ओम शान्ति   मधुबन


“नवीन वर्षामध्ये आपल्या जुन्या संस्कारांना योग अग्नीमध्ये भस्म करून ब्रह्मा बाबांसारखे त्याग, तपस्या आणि सेवेमध्ये नंबरवन बना”


आज बापदादा चोहो बाजूच्या भले सन्मुख आहेत, किंवा दूर बसून हृदयाच्या समीप आहेत, सर्वांना तीन मुबारक देत आहेत. एक नवजीवनाची मुबारक, दुसरी नवयुगाची मुबारक आणि तिसरी आजच्या नवीन वर्षाच्या दिवशी मुबारक असो. तुम्ही देखील सर्व नवीन वर्षाची मुबारक देण्यासाठी आणि मुबारक घेण्यासाठी आला आहात. वास्तविक खऱ्या अंतःकरणापासून आनंदाची मुबारक तुम्ही ब्राह्मण आत्मे घेता देखील आणि देता देखील. आजच्या दिवसाचे महत्व आहे. निरोप सुद्धा आहे आणि शुभेच्छा सुद्धा आहेत. विदाई आणि बधाईचे (निरोप आणि शुभेच्छेचे) संगमयुग आहे. आजच्या दिवसाला संगमाचा दिवस म्हटले जाईल. संगमाची महिमा खूप मोठी आहे. तुम्ही सर्व जाणता की संगमयुगाच्या महिमेमुळे आजकाल जुन्या आणि नवीन वर्षाचा संगम किती धुमधडाक्यात साजरा करतात. संगमयुगाच्या महिमेमुळेच या जुन्या नवीन वर्षाच्या संगमाची महिमा आहे. जिथे दोन नद्या मिळतात, संगम असतो, त्यांची देखील महिमा आहे. जिथे नदी आणि सागराचा संगम होतो त्याची देखील महिमा आहे. परंतु सर्वांत जास्त महिमा या संगम-युगाची, पुरुषोत्तम युगाची आहे, जिथे तुम्ही ब्राह्मण भाग्यवान आत्मे बसले आहात. हा नशा आहे ना! जर तुम्हाला कोणी विचारले तुम्ही कोणत्या काळामध्ये आहात? कलियुगामध्ये राहता की सतयुगामध्ये राहता? तर अभिमानाने काय म्हणाल? आम्ही यावेळी पुरुषोत्तम संगमयुगामध्ये राहतो. तुम्ही कलियुगी नाही आहात, संगमयुगी आहात. आणि या संगमयुगाची विशेष महिमा का आहे? कारण स्वयं भगवान आणि मुलांचे मिलन होते (भेट होते). मेळा होतो, मिलन होते, जे कोणत्याही युगामध्ये होत नाही. तर मेळावा साजरा करण्यासाठी आला आहात ना! तुम्ही भेटीचा मेळावा साजरा करण्यासाठी कुठून-कुठून आला आहात. कधी स्वप्नामध्ये तरी असा विचार केला होता का की ड्रामामध्ये मज आत्म्याचे असे देखील भाग्य नोंदलेले आहे. आत्म्याचे परमात्म्याला भेटण्याचे भाग्य होते आणि आहे. बाबा देखील प्रत्येक मुलाच्या भाग्याला पाहून हर्षित होत आहेत. वाह! भाग्यवान मुलांनो वाह! आपल्या भाग्याला पाहून मनामध्ये स्वतःप्रती वाह! मी वाह! वाह! माझे भाग्य वाह! वाह! माझे बाबा वाह! वाह! माझा ब्राह्मण परिवार वाह! हे वाह, वाहचे गाणे ऑटोमॅटिक मनामध्ये गात राहता ना!

तर आज या संगमाच्या समयी आपल्या मनामध्ये विचार केला आहे का की कोण-कोणत्या गोष्टींना निरोप द्यायचा आहे? सर्वांनी विचार केला आहे? कायमचा निरोप द्यायचा आहे कारण कायमसाठी निरोप दिल्याने सदाकाळच्या शुभेच्छा साजऱ्या करू शकाल. अशा शुभेच्छा द्या ज्यामुळे तुमच्या चेहऱ्याला पाहून जी पण आत्मा समोर येईल ती देखील शुभेच्छा प्राप्त करून आनंदित होईल. जे अंतःकरणापासून शुभेच्छा देतात किंवा घेतात ते सदैव कसे दिसून येतात? संगमयुगी फरिश्ता. सर्वांचा हाच पुरुषार्थ आहे ना. ‘O’ (शिव) ब्राह्मण सो फरिश्ता आणि फरिश्ता सो देवता! कारण बाबांना सर्व प्रकारचे संकल्प किंवा जे ही काही प्रवृत्तीचे, कर्माचे ओझे आहे ते देऊन टाकले आहे ना! ओझे दिले आहे की थोडेसे राहून गेले आहे? कारण थोडेसे देखील ओझे फरिश्ता बनू देणार नाही आणि जर बाबा मुलांचे ओझे घेण्यासाठी आले आहेत तर ओझे देणे कठीण आहे का! कठीण आहे की सोपे आहे? जे समजतात ओझे दिले आहे त्यांनी हात वर करा. दिले आहे? बघा विचार करून हात वर करा. ओझे दिले आहे? अच्छा, दिले आहे तर खूप मुबारक असो. आणि ज्यांनी दिलेले नाही त्यांनी कशासाठी ठेवले आहे? ओझ्यावर प्रेम आहे का? ओझे चांगले वाटते? पहा, बापदादा प्रत्येक मुलाला काय म्हणतात? ओ माझ्या निश्चिंत बादशहा मुलांनो. तर ओझ्याची चिंता वाटते ना! तर ओझे घेण्यासाठी बाबा आले आहेत कारण ६३ जन्मांपासून बाबा बघत आहेत ओझे उचलून-उचलून सर्व मुले खूप थकली आहेत म्हणून जर बाबा मुलांना प्रेमाने सांगत आहेत की ओझे द्या. तरीही ठेवून का घेतले आहे? ओझे चांगले वाटते का? सर्वात सूक्ष्म ओझे आहे - जुन्या संस्कारांचे. बापदादांनी प्रत्येक मुलाचा या वर्षाचा, कारण वर्ष पूर्ण होत आहे ना, तर या वर्षाचा चार्ट बघितला. तुम्ही सर्वांनी देखील आपला-आपला चार्ट चेक केला असेल? तर बापदादांनी बघितले की बऱ्याच मुलांचे या जुन्या संसाराचे आकर्षण कमी झाले आहे, जुन्या नात्यांचे देखील आकर्षण कमी झाले आहे परंतु जुने संस्कार, त्याचे ओझे मेजॉरिटी मुलांमध्ये अजूनही बाकी आहे. कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये मग मनसा अशुद्ध संकल्प नाहीत परंतु व्यर्थ संकल्पाचा संस्कार अजूनही काही प्रमाणात दिसून येतो. वाचेमध्ये देखील दिसून येतो. संबंध-संपर्कामध्ये सुद्धा कोणता ना कोणता संस्कार अजूनही दिसून येतो.

तर आज बापदादा सर्व मुलांना मुबारक सोबत हाच इशारा देत आहेत की हा राहिलेला संस्कार ऐन वेळेला देखील धोका देतो आणि अंताला सुद्धा धोका देण्याच्या निमित्त बनेल म्हणून आज संस्काराचा संस्कार करा. प्रत्येकजण आपल्या संस्काराला जाणतो सुद्धा, सोडू सुद्धा इच्छितो, वैतागलेला देखील आहे, परंतु कायमसाठी परिवर्तन करण्यामध्ये तीव्र पुरुषार्थी नाही आहे. पुरुषार्थ करतात परंतु तीव्र पुरुषार्थी नाहीत. कारण? तीव्र पुरुषार्थ का होत नाही? कारण हेच आहे, जसे रावणाला मारलेही परंतु केवळ मारले नाही, जाळले सुद्धा. असा संस्कार मारण्यासाठी पुरुषार्थ करतात, संस्कार थोडा बेशुद्ध देखील होतो, परंतु जाळला नाहीये त्यामुळे बेशुद्ध झालेला मधून-मधून जागा होतो. यासाठी जुन्या संस्काराचा संस्कार करण्यासाठी या नवीन वर्षामध्ये योग अग्नीने जाळण्याचे, दृढ संकल्पाचे अटेंशन ठेवा. विचारता ना नवीन वर्षामध्ये काय करायचे आहे? सेवेची तर गोष्ट वेगळी आहे परंतु पहिल्यांदा स्वतःची गोष्ट आहे - योग लावता, बापदादा मुलांना योगाचा अभ्यास करताना पाहतात. अमृतवेलेला सुद्धा खूप पुरुषार्थ करतात परंतु योग तपस्या, तपाच्या रूपामध्ये करत नाहीत. प्रेमाने आठवण जरूर करतात, रुहरिहान देखील खूप करतात, शक्ती सुद्धा घेण्याचा अभ्यास करतात परंतु आठवणीला इतके शक्तिशाली बनवलेले नाहीये, की जो-जो संकल्प केला निरोप दिला, तर निरोप घेईल. योगाला योग अग्नीच्या रूपामध्ये कार्यामध्ये लावत नाही तर योगाला पॉवरफुल बनवा. संस्कार भस्म करण्यासाठी विशेष एकाग्रतेची शक्ती आवश्यक आहे. ज्या स्वरूपामध्ये एकाग्र होऊ इच्छिता, जितका वेळ एकाग्र होऊ इच्छिता, अशी एकाग्रता संकल्प केला आणि तो संस्कार भस्म झाला. याला म्हटले जाते योग अग्नी. नामोनिशाण समाप्त. मारल्याने तरीही शव तर राहते ना! भस्म झाल्यानंतर नामोनिशाणही नष्ट होते. तर या वर्षी योगाला पॉवरफुल स्टेजमध्ये आणा. ज्या स्वरूपामध्ये राहू इच्छिता मास्टर सर्वशक्तीवान, ऑर्डर करा, समाप्त करण्याची शक्ती तुमच्या ऑर्डरला मानणार नाही, असे होऊ शकत नाही. मालक आहात. मास्टर म्हटले जाते ना! तर मास्टर ऑर्डर करेल आणि शक्ती हजर झाली नाही तर काय तो मास्टर आहे? तर बापदादांनी पाहिले की जुन्या संस्कारांचा काही ना काही अंश अजूनही राहिलेला आहे आणि तो अंश मधून-मधून वंश सुद्धा उत्पन्न करतो, ज्याने कर्मापर्यंत देखील काम होऊन जाते. युद्ध करावे लागते. तर बापदादांना मुलांचे वेळेनुसार युद्धाचे स्वरूप आवडत नाही. बापदादा प्रत्येक मुलाला मालकाच्या रूपामध्ये पाहू इच्छितात. ऑर्डर करा जी हजूर.

तर ऐकले या वर्षी स्वतःप्रती काय करायचे आहे? शक्तीशाली, निश्चिंत बादशाह कारण सर्वांचे लक्ष्य आहे, कोणालाही विचाराल तर काय म्हणतात? आम्ही विश्वाचे राज्य प्राप्त करणार, राज्य अधिकारी बनणार. स्वतःला ‘राजयोगी’ म्हणवता. ‘प्रजायोगी’ आहात का? संपूर्ण सभेमध्ये कोणी असे आहेत जे प्रजायोगी आहेत? आहेत? जे प्रजायोगी आहेत राजयोगी नाहीत. टिचर कोणी आहेत? तुमच्या सेंटरवर कोणी प्रजायोगी आहेत? म्हणतात तर सर्वांना राजयोगी. प्रजायोगी मध्ये कोणी हात वर करत नाहीत. चांगले वाटत नाही ना! आणि बाबांना देखील अभिमान आहे. बापदादा अभिमानाने म्हणतात की संगमावर सुद्धा प्रत्येक मुलगा राजा मुलगा आहे. कोणताही पिता असे गर्वाने म्हणू शकणार नाही की माझा प्रत्येक मुलगा राजा आहे. परंतु बापदादा म्हणतात की प्रत्येक मुलगा स्वराज्य अधिकारी राजा आहे. प्रजायोगीमध्ये तर हात वर केला नाहीत ना! म्हणजे राजा आहात ना! परंतु असे कमकुवत राजा बनू नका जो ऑर्डर करेल आणि शक्ती येणारच नाही. कमजोर राजा बनू नका. मागे बसलेले कोण आहात? जे समजतात राजयोगी आहेत त्यांनी हात वर करा. वरती देखील बसले आहेत, (गॅलरीमध्ये बसलेले हात हलवत आहेत, आज हॉल मध्ये १८००० भाऊ-बहिणी बसले आहेत) बापदादा बघत आहेत, वरती असणारे हात वर करा.

तर आता हे लास्ट टर्नमध्ये सुरु होईल. तर बापदादा तीन महिने देत आहेत, ठीक आहे देऊ ना? होमवर्क देणार कारण हे अधून-मधून केलेले होमवर्क सुद्धा लास्ट पेपरमध्ये जमा होईल. तर तीन महिन्यामध्ये प्रत्येकजण आपला चार्ट चेक करा की, मी मास्टर सर्वशक्तीवान होऊन कोणत्याही कर्मेंद्रियाला, कोणत्याही शक्तीला जेव्हा ऑर्डर केली, जी ऑर्डर केली ती प्रॅक्टिकलमध्ये ऑर्डर मानली की नाही मानली? करू शकता ना? पहिल्या लाईन मध्ये बसलेले करू शकता ना? हात वर करा. अच्छा. तीन महिने कोणत्याही जुन्या संस्काराने वार करु नये. निष्काळजी बनू नका, रॉयल निष्काळजीपणा आणू नका, होऊन जाईल… बापदादांसोबत खूप गोड-गोड गोष्टी करतात, म्हणतात बाबा तुम्ही काळजी करू नका, मी होईन. बापदादा काय करतील? ऐकून हसतात. परंतु बापदादा या तीन महिन्यामध्ये जर अशी गोष्ट केली तर ऐकणार नाहीत. मंजूर असेल तर हात वर करा. मनापासून हात वर करा, सभेमध्ये आहे म्हणून हात वर करू नका. करायचेच आहे, मग काहीही सहन करावे लागले, काही सोडावे लागले, काही हरकत नाही. करायचेच आहे. पक्के? पक्के? पक्के? टीचर्स करायचे आहे ना?

अच्छा, ही ताज घातलेली मुले काय करणार? (छोटी मुले ताज घालून समोर बसली आहेत) ताज तर छान घातला आहे? करावे लागेल. अच्छा. बघा मुले हात वर करत आहेत. जर नाही केले तर काय करायचे? ते देखील सांगा. मग बापदादाच्या सीझनमध्ये एक वेळ येऊ देणार नाही कारण बापदादा बघत आहेत की वेळ तुमची प्रतीक्षा करत आहे. तुम्ही वेळेची प्रतीक्षा करणारे नाही आहात, तुम्ही तयारी करणारे आहात, वेळ तुमची प्रतीक्षा करत आहे. प्रकृती सुद्धा, सतोप्रधान प्रकृती तुमचे आवाहन करत आहे. तर तीन महिन्यामध्ये आपल्या शक्तीशाली स्टेजद्वारे राहिलेल्या संस्कारांना परिवर्तन करा. जर तीन महिने अटेंशन ठेवलेत ना तर त्याचा पुढे देखील अभ्यास होऊन जाईल. एकदा का परिवर्तनाची विधी जमली तर खूप उपयोगी पडेल. वेळेची तुम्ही प्रतीक्षा करू नका, ‘कधी विनाश होणार, कधी विनाश होणार’, सगळे रुहरिहानमध्ये विचारत असतात, असे बाहेरून बोलत नाहीत परंतु आतमध्ये बोलत असतात - ‘माहित नाही कधी विनाश होणार, दोन वर्षांमध्ये होणार १० वर्षांमध्ये होणार, किती वर्षात होणार?’ तुम्ही वेळेची प्रतीक्षा का करता, वेळ तुमची प्रतीक्षा करत आहे. बाबांना विचारतात तारीख सांगा, थोडे साल तरी सांगा, १० वर्षे लागतील, २० वर्षे लागतील, किती वर्षे लागतील?

बापदादा मुलांना प्रश्न विचारत आहेत की तुम्ही सगळे बाप समान बनला आहात? पडदा उघडायचा का की पडदा उघडल्यावर कोणी केस विंचरत आहे, कोणी चेहऱ्याला क्रीम लावत आहे, जर एव्हररेडी आहात, संस्कार समाप्त झाले असतील तर बापदादांना पडदा उघडायला कितीसा वेळ लागेल. एव्हररेडी तर व्हा ना! होऊ, होऊ असे म्हणून बाबांना खूप वेळ खुश केले आहे. आता असे करू नका. होणारच आहे, करणारच आहे. बाप समान बनायचे आहे यामध्ये तर सगळे हात वर करतात, वर करायला सांगण्याची गरज नाही. ब्रह्मा बाबांना पहा, साकारमध्ये तर ब्रह्मा बाबांना फॉलो करायचे आहे ना! ब्रह्मा बाबांनी त्याग, तपस्या आणि सेवा अखेरच्या क्षणापर्यंत साकार रूपामध्ये प्रत्यक्ष करून दाखवली. आपली ड्युटी, शिवबाबांद्वारे महावाक्य उच्चारण करण्याची ड्युटी शेवटच्या दिवसापर्यंत निभावली. लास्ट मुरली लक्षात आहे ना? तीन शब्दांचे वरदान, लक्षात आहे? (निराकारी, निर्विकारी आणि निरहंकारी बना) ज्यांच्या लक्षात आहे त्यांनी हात वर करा. अच्छा सर्वांच्या लक्षात आहे, मुबारक असो. त्याग देखील शेवटच्या दिवसापर्यंत केला, आपली जुनी खोली सोडली नाही. मुलांनी किती प्रेमाने ब्रह्मा बाबांना सांगितले परंतु मुलांसाठी बनवले, स्वतःसाठी वापरले नाही. आणि नेहमी अडीच तीन वाजता उठून स्वतःप्रती तपस्या केली, संस्कार भस्म केले तेव्हा कर्मातीत अव्यक्त बनले, फरिश्ता बनले. जो विचार केला ते करून दाखवले. बोलणे, विचार करणे आणि करणे तिन्ही एक समान. फॉलो फादर. शेवटपर्यंत आपल्या कर्तव्यामध्ये तत्पर राहीले, पत्र सुद्धा लिहिली, किती पत्रे लिहिली? सेवा देखील सोडली नाही. फॉलो फादर. अखंड महादानी, महादानी नाही, अखंड महादानीचे प्रॅक्टिकल रूप दाखवले, शेवट पर्यंत. अखेरपर्यंत आधाराशिवाय तपस्वी रूपामध्ये बसले. आता तर मुले बसण्यासाठी आधार घेतात ना. परंतु ब्रह्मा बाबांनी आदि पासून अंतापर्यंत तपस्वी रूप कायम ठेवले. डोळ्यांना चष्मा नाही लावला. ही सूक्ष्म शक्ती आहे. निराधार. शरीर जुने आहे, दिवसेंदिवस प्रकृती, हवा, पाणी दूषित होत आहे त्यामुळे तुम्हाला बापदादा असे सांगत नाहीत की, आधार का घेता, चष्मा का लावता, घाला जरूर घाला, परंतु शक्तिशाली स्थिती जरूर बनवा. संपूर्ण विश्वाचे कार्य समाप्त केले आहे? बापदादा तुम्हाला प्रश्न विचारत आहेत, तुम्ही सर्व संतुष्ट आहात का की विश्व कल्याणाचे कार्य पूर्ण झाले आहे! जे समजतात की विश्व कल्याणाचे कार्य समाप्त झाले आहे, त्यांनी हात वर करा. एकही नाही? तर कसे म्हणता विनाश होईल? काम तर पूर्ण केले नाहीत. अच्छा.

चोहो बाजूच्या सदैव उमंग-उत्साहामध्ये पुढे जाणाऱ्या, सदैव हिंमतीने बापदादांच्या पद्मगुणा मदतीच्या पात्र असणाऱ्या मुलांना, सदैव विजयी रत्न आहेत, प्रत्येक कल्पामध्ये विजयी बनले होते, आता देखील आहेत आणि प्रत्येक कल्पामध्ये विजयी आहेतच. अशा विजयी मुलांना सदैव एक बाबा दुसरे कोणी नाही, ना संसाराचे आकर्षण, ना संस्कारांचे आकर्षण, दोन्ही आकर्षणापासून मुक्त राहणाऱ्या, सदैव बाप समान मुलांना बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि नमस्ते.

वरदान:-
सततच्या अटेंशन द्वारे विजयी माळेमध्ये गुंफले जाणारे दीर्घ काळाचे विजयी भव

दीर्घ काळाचे विजयी, विजयी माळेचे मणी बनतात. विजयी बनण्यासाठी कायम बाबांना समोर ठेवा - जे बाबांनी केले तेच आपल्याला करायचे आहे. प्रत्येक पावलावर जो बाबांचा संकल्प तोच मुलांचा संकल्प, जे बाबांचे बोल तेच मुलांचे बोल - तेव्हा विजयी बनाल. हे अटेंशन सदा काळासाठी हवे तेव्हा सदा काळचे राज्य भाग्य प्राप्त होईल कारण जसा पुरुषार्थ तसे प्रारब्ध आहे. निरंतर पुरुषार्थ आहे तर निरंतर राज्य भाग्य आहे.

सुविचार:-
सेवेमध्ये सदैव ‘जी हाजिर’ करणे - हाच प्रेमाचा खरा पुरावा आहे.

अव्यक्त इशारे - आत्मिक स्थितीमध्ये राहण्याचा अभ्यास करा, अंतर्मुखी बना:-

जसे कोणतीही व्यक्ती आरशासमोर उभी राहताच स्वतःचा साक्षात्कार करते, तशी तुमची आत्मिक स्थिती, शक्तीरूपी आरशासमोर कोणतीही आत्मा येवो तर ती एका सेकंदामध्ये स्व-स्वरूपाचे दर्शन अथवा साक्षात्कार करेल. तुमच्या प्रत्येक कर्मामध्ये, प्रत्येक चलनमध्ये रूहानियतचे अट्रॅक्शन (आत्मिक आकर्षण) असावे. जे स्वच्छ, आत्मिक बळ असणारे आत्मे आहेत, ते सर्वांना आपल्याकडे आकर्षित जरूर करतात.