29-07-2025
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
“गोड
मुलांनो - या शरीराची व्हॅल्यू तेव्हा आहे जेव्हा याच्यामध्ये आत्मा प्रवेश करेल,
परंतु सजावट शरीराची होते, आत्म्याची नाही”
प्रश्न:-
तुम्हा मुलांचे
कर्तव्य काय आहे? तुम्हाला कोणती सेवा करायची आहे?
उत्तर:-
तुमचे कर्तव्य आहे - आपल्या हमजिन्सना (बरोबरीच्यांना) नरापासून नारायण, नारीपासून
लक्ष्मी बनण्याची युक्ती सांगणे. तुम्हाला आता भारताची खरी रूहानी सेवा करायची आहे.
तुम्हाला ज्ञानाचा तिसरा नेत्र मिळाला आहे तर तुमची बुद्धी आणि आचरण अतिशय रिफाइन (शुद्ध)
असले पाहिजे. कशातही जरा देखील मोह नसावा.
गीत:-
नयन हीन को
राह दिखाओ...
ओम शांती।
डबल ओम् शांती. तुम्हा मुलांनी रिस्पॉन्स केला पाहिजे ओम् शांती. आपला स्वधर्म आहे
- शांती. तुम्ही आता शांतीसाठी थोडेच कुठे जाल. मनुष्य मनाच्या शांतीसाठी
साधु-संतांकडे देखील जातात ना. आता मन-बुद्धी तर आहेत आत्म्याचे ऑर्गन्स. जसे हे
शरिराचे ऑर्गन्स आहेत तसे मन, बुद्धी आणि चक्षु. आता चक्षु जसे हे नेत्र आहेत, तसे
ते चक्षु नाहीत. म्हणतात - ‘हे प्रभू, नयन हीन को राह बताओ’. आता प्रभू किंवा ईश्वर
म्हटल्याने तसा पित्याच्या प्रेमाचा अनुभव येत नाही. पित्याकडून तर मुलांना वारसा
मिळतो. इथे तर तुम्ही बाबांच्या समोर बसला आहात. शिकता देखील. तुम्हाला कोण शिकवतात?
तुम्ही असे म्हणणार नाही की परमात्मा किंवा प्रभू शिकवत आहेत. तुम्ही म्हणाल शिवबाबा
शिकवत आहेत. ‘बाबा’ शब्द तर एकदम सिम्पल आहे. आहेत देखील बापदादा. आत्म्याला आत्माच
म्हटले जाते, तसेच तेही परम-आत्मा आहेत. ते म्हणतात मी परम आत्मा अर्थात परमात्मा
तुमचा पिता आहे. मग मज परम आत्म्याचे ड्रामा अनुसार नाव ठेवले आहे - शिव.
ड्रामामध्ये सर्वांचे नाव देखील पाहिजे ना. शिवाचे मंदिर देखील आहे.
भक्तीमार्गवाल्यांनी तर एका ऐवजी अनेक नावे ठेवली आहेत. आणि मग अनेकानेक मंदिरे
बनवत राहतात. वस्तू एकच आहे. सोमनाथाचे मंदिर किती भव्य आहे, किती सजवतात. महाल
इत्यादींची देखील किती सजावट करतात. आत्म्याची तर काहीच सजावट नाही, तसेच परम
आत्म्याची देखील सजावट नाहीये. ते तर बिंदू आहेत, बाकी जी काही सजावट आहे ती
शरिरांची आहे. बाबा म्हणतात - ना माझी सजावट आहे, ना आत्म्यांची सजावट आहे. आत्मा
आहेच बिंदू. इतकी छोटी बिंदी तर काही पार्ट बजावू शकत नाही. ती छोटीशी आत्मा
शरीरामध्ये प्रवेश करते तर शरीराची किती प्रकारे सजावट होते. मनुष्यांची किती नावे
आहेत. किंग-क्वीनची सजावट कशी असते, आत्मा तर साधी बिंदू आहे. आता तुम्हा मुलांना
हे देखील समजले आहे. आत्माच ज्ञान धारण करते. बाबा म्हणतात - माझ्यामध्ये देखील
ज्ञान आहे ना. शरीरामध्ये थोडेच ज्ञान असते. मज आत्म्या मध्ये ज्ञान आहे, मला हे
शरीर घ्यावे लागते, तुम्हाला ऐकविण्यासाठी. शरीराशिवाय तर तुम्ही ऐकू शकणार नाही.
आता हे गाणे जे बनवले आहे - ‘नयन हीन को राह बताओ…’ काय शरीराला मार्ग सांगायचा आहे?
नाही. आत्म्याला. आत्माच बोलावते. शरीराला तर दोन नेत्र आहेत. तीन तर असू शकत नाहीत.
तिसऱ्या नेत्राचा इथे (मस्तकामध्ये) तिलक सुद्धा लावतात. कोणी फक्त बिंदू प्रमाणे
लावतात, कोणी रेघ ओढतात. बिंदू तर आहे आत्मा. बाकी ज्ञानाचा तिसरा नेत्र आत्म्याला
मिळतो. आत्म्याला पहिले हा ज्ञानाचा तिसरा नेत्र नव्हता. कोणत्याही मनुष्य मात्राला
हे ज्ञान नाही आहे, म्हणून ज्ञान नेत्रहीन म्हटले जाते. बाकी हे नेत्र तर सर्वांना
आहेत. साऱ्या दुनियेमध्ये कोणालाही हा तिसरा नेत्र नाही आहे. तुम्ही आहात सर्वोत्तम
ब्राह्मण कुळाचे. तुम्ही जाणता भक्तीमार्ग आणि ज्ञानमार्गामध्ये किती फरक आहे.
तुम्ही रचता आणि रचनेच्या आदि-मध्य-अंताला जाणून चक्रवर्ती राजा बनता. जसे आय.सी.एस
वाले देखील खूप उच्च पद प्राप्त करतात. परंतु इथे शिक्षणाद्वारे कोणीही एम.पी.
इत्यादी बनत नाहीत. इथे तर चुनाव होतात, मतदानावर एम.पी. इत्यादी बनतात. आता तुम्हा
आत्म्यांना बाबांचे श्रीमत मिळते. इतर कोणीही असे म्हणणार नाही की, मज आत्म्याला मत
देतात. ते तर सर्व आहेत देह-अभिमानी. बाबाच येऊन देही-अभिमानी बनणे शिकवतात. आता
सर्व आहेत देह-अभिमानी. माणसे शरीराला किती थाटात ठेवतात. इथे तर बाबा आत्म्यांनाच
बघतात. शरीर तर विनाशी, वर्थ नॉट ए पेनी आहे. प्राण्यांची तर निदान कातडी इत्यादी
तरी विकली जाते. मनुष्याचे शरीर तर काहीच उपयोगात येत नाही. आता बाबा येऊन वर्थ
पाउंड बनवत आहेत.
तुम्ही मुले जाणता
की, आता आपण सो देवता बनत आहोत तर हा नशा चढलेला राहिला पाहिजे. परंतु हा नशा देखील
नंबरवार पुरुषार्था अनुसार राहतो. संपत्तीचा देखील नशा असतो ना. आता तुम्ही मुले
खूप धनवान बनता. तुमची खूप कमाई होत आहे. तुमची महिमा देखील अनेक प्रकारची आहे.
तुम्ही फुलांचा बगीचा बनवता. सतयुगाला म्हटले जाते गार्डन ऑफ फ्लॉवर्स. याचे कलम
केव्हा लागते - हे देखील कोणाला ठाऊक नाहीये. तुम्हाला बाबा समजावून सांगतात.
बोलावतात देखील - हे बागवान या. त्यांना माळी म्हणता येणार नाही. माळी तुम्ही मुले
आहात जे सेंटर्स सांभाळता. माळी अनेक प्रकारचे असतात. बागवान एकच आहे. मुगल
गार्डनच्या माळ्याला पगार देखील तितकाच जास्त मिळत असेल. बगीचा असा सुंदर बनवतात की
सर्वजण पाहण्यासाठी येतात. मुगल लोक खूप शौकीन होते, त्यांची पत्नी मेली तर ताजमहाल
बनवला. त्याचे नाव चालत येते. किती चांगले-चांगले यादगार बनवले आहेत. तर बाबा सांगत
आहेत, मनुष्याची किती महिमा होते. मनुष्य तर मनुष्य आहेत. युद्धामध्ये असंख्य
मनुष्य मरतात. मग काय करतात. घासलेट, पेट्रोल टाकून नष्ट करतात. कोणी तर असेच पडून
राहतात. पुरून थोडेच टाकतात. काहीच मान नसतो. तर आता तुम्हाला किती नारायणी नशा चढला
पाहिजे. हा आहे विश्वाचा मालक बनण्याचा नशा. सत्यनारायणाची कथा आहे तर जरूर नारायणच
बनाल. आत्म्याला ज्ञानाचा तिसरा नेत्र मिळतो. देणारे आहेत बाबा. तिजरीची कथा देखील
आहे. या सर्वांचा अर्थ बाबा बसून समजावून सांगतात. कथा ऐकविणारे काहीच जाणत नाहीत.
अमर कथा देखील ऐकवतात. आता अमरनाथला कुठे दूर-दूर जाता. बाबा तर इथे येऊन ऐकवतात.
वर (परमधाममध्ये) काही ऐकवत नाहीत. तिथे थोडीच पार्वतीला बसून अमर कथा ऐकवली. या कथा
इत्यादी ज्या बनवल्या आहेत - हे देखील ड्रामामध्ये नोंदलेले आहे - अजूनही घडत राहील.
बाबा बसून तुम्हा मुलांना भक्ती आणि ज्ञानातील कॉन्ट्रास्ट (फरक) सांगतात. आता
तुम्हाला ज्ञानाचा तिसरा नेत्र मिळाला आहे. म्हणतात ना - ‘हे प्रभू, आंधळ्यांना
मार्ग दाखवा’. भक्तिमार्गामध्ये बोलावतात. बाबा येऊन तिसरा नेत्र देतात; ज्याच्या
विषयी तुमच्या व्यतिरिक्त इतर कोणालाच ठाऊक नाही आहे. ज्ञानाचा तिसरा नेत्र नसेल तर
म्हणतील एका डोळ्याने आंधळा. डोळे देखील कोणाचे कसे, कोणाचे कसे असतात ना. कोणाचे
खूप सुंदर डोळे असतात. मग त्यानुसार इनाम देखील मिळते आणि मग नाव ठेवतात - मिस
इंडिया, मिस फलानी. तुम्हा मुलांना आता बाबा कोणापासून कोण बनवतात. तिथे तर नॅचरल
ब्युटी (नैसर्गिक सौंदर्य) असते. श्रीकृष्णाची इतकी महिमा का आहे? कारण सर्वात
जास्त ब्युटीफूल बनतात. नंबरवन मध्ये कर्मातीत अवस्थेला प्राप्त करतात, म्हणून
नंबरवन मध्ये गायन आहे. हे देखील बाबा बसून समजावून सांगतात. बाबा वारंवार सांगतात
- ‘मुलांनो, मनमनाभव. हे आत्म्यांनो, आपल्या पित्याची आठवण करा. मुलांमध्ये देखील
नंबरवार आहेत ना. लौकिक पित्याला देखील समजा ५ मुले आहेत, तर त्यामध्ये जो खूप
हुशार असेल त्याला नंबरवन वर ठेवतील. माळेचा मणी झाला ना. म्हणतील हा दुसरा नंबर आहे,
हा तिसरा नंबर आहे. कधीही एक सारखे नसतात. पित्याचे प्रेम देखील नंबरवार असते. ती
आहे हदची गोष्ट, ही आहे बेहदची गोष्ट.
ज्या मुलांना ज्ञानाचा
तिसरा नेत्र मिळाला आहे त्यांची बुद्धी आणि वर्तन इत्यादी खूप रिफाईन (शुद्ध) असते.
एक किंग ऑफ फ्लॉवर असतो तर हे ब्रह्मा आणि सरस्वती किंग क्वीन फ्लॉवर झाले. ज्ञान
आणि आठवण दोन्ही मध्ये हुशार आहेत. तुम्ही जाणता आपण देवता बनतो. मुख्य ८ रत्न
बनतात. सर्वप्रथम आहे फूल. नंतर मग युगल मणी ब्रह्मा-सरस्वती. माळेचा जप करतात ना.
वास्तविक तुमचे पूजन नाहीये, तर जप केला जातो. तुमच्यावर फुले वाहू शकत नाही. फुले
तेव्हा वाहिली जातील जेव्हा शरीर देखील पवित्र असेल. इथे कोणाचेही शरीर पवित्र नाही.
सर्व विषातून (विकारातून) जन्म घेतात, म्हणून विकारी म्हटले जाते. या
लक्ष्मी-नारायणाला म्हटलेच जाते संपूर्ण निर्विकारी. मुले तर जन्म घेत असतील ना. असे
पण नाही की ट्यूबमधून कोणी मूल जन्माला येईल. या देखील सर्व समजून घेण्यासारख्या
गोष्टी आहेत. तुम्हा मुलांना इथे ७ दिवस भट्टीमध्ये बसवले जाते. भट्टीमध्ये काही
विटा पूर्ण भाजल्या जातात, काही कच्च्या राहतात. भट्टीचे उदाहरण देतात. आता
विटांच्या भट्टीचे शास्त्रांमध्ये थोडेच वर्णन असू शकते. आणि मग त्यामध्ये मांजराची
देखील गोष्ट आहे. गुलबकावलीच्या कथेमध्ये देखील मांजरीच्या नावाचा उल्लेख आहे.
दिव्याला विझवत होती. तुमचे देखील हेच हाल होतात ना. माया मांजर विघ्न टाकते.
तुमच्या अवस्थेलाच खाली पाडते. पहिल्या नंबरचा आहे देह-अभिमान त्या नंतर मग इतर
विकार येतात. मोह देखील खूप असतो. मुलगी म्हणेल मी भारताला स्वर्ग बनविण्याची रूहानी
सेवा करणार, मोह वश आई-वडील म्हणतात - आम्ही परवानगी देणार नाही. हा देखील किती मोह
आहे? तुम्हाला मोहाचे मांजर किंवा बोका बनायचे नाहीये. तुमचे एम ऑब्जेक्टच हे आहे.
बाबा येऊन मनुष्यापासून देवता, नरापासून नारायण बनवतात. तुमचे देखील कर्तव्य आहे
आपल्या हमजीन्सची (बरोबरीच्यांची) सेवा करणे, भारताची सेवा करणे. तुम्ही जाणता आपण
काय होतो, काय बनलो आहोत. आता राजांचाही राजा बनण्यासाठी पुन्हा पुरुषार्थ करा.
तुम्ही जाणता आपण आपले राज्य स्थापन करत आहोत. काही त्रासाची गोष्ट नाहीये.
विनाशासाठी देखील ड्रामामध्ये युक्ती रचलेली आहे. पूर्वी देखील मुसळांद्वारे (मिसाईल्स
द्वारे) युद्ध झाले होते. जेव्हा तुमची पूर्ण तयारी होईल, सर्वजण फूल बनाल तेव्हा
विनाश होईल. कोणी किंग ऑफ फ्लॉवर आहेत, कोणी गुलाब, कोणी मोगरा आहेत. प्रत्येक जण
स्वतःला चांगल्या रीतीने समजू शकतो की आपण धोतरा आहोत की फूल आहोत? असे बरेच आहेत
ज्यांना ज्ञानाची काहीच धारणा होत नाही. नंबरवार तर बनतील ना. एक तर एकदम हाइएस्ट,
नाही तर एकदम लोएस्ट. राजधानी इथेच बनते. शास्त्रांमध्ये तर दाखवले आहे पांडव
वितळून मेले, मग पुढे काय झाले, काहीच ठाऊक नाही. कथा तर खूप बनवल्या आहेत, परंतु
अशी काही गोष्टच नाही आहे. आता तुम्ही मुले किती स्वच्छ-बुद्धि बनता. बाबा तुम्हाला
विविध प्रकारे समजावून सांगत राहतात. किती सोपे आहे. फक्त बाबांची आणि वारशाची आठवण
करायची आहे. बाबा म्हणतात - मीच पतित-पावन आहे. तुमची आत्मा आणि शरीर दोन्ही पतित
आहेत. आता पावन बनायचे आहे, आत्मा पवित्र बनते तर शरीर देखील पवित्र बनते. आता
तुम्हाला खूप मेहनत करायची आहे. बाबा म्हणतात - मुले खूप कमजोर आहेत. आठवण विसरली
जाते. बाबा (ब्रह्मा बाबा) स्वत: आपला अनुभव सांगतात. भोजन करत असताना आठवण करतो,
शिवबाबा मला भरवत आहेत आणि मग विसरून जातो. मग पुन्हा लक्षात येते. तुमच्यामध्ये
देखील नंबरवार पुरुषार्थानुसार आहेत. कोणी तर बंधनमुक्त असताना देखील मग अडकतात आणि
मरतात. धर्माची (मानलेली) देखील मुले बनवतात. आता तुम्हा मुलांना ज्ञानाचा तिसरा
नेत्र देणारे बाबा मिळाले आहेत, याला मग नाव दिले आहे - तिजरीची कथा. अर्थात तिसरा
नेत्र प्राप्त होण्याची कथा. आता तुम्ही नास्तिक पासून आस्तिक बनता. मुले जाणतात
बाबा बिंदू आहेत. ज्ञानाचा सागर आहेत. ते (दुनियावाले) तर म्हणतात - नावा-रुपापासून
न्यारे आहेत, अरे, ज्ञानाचा सागर तर जरूर ज्ञान ऐकविणारे असतील ना. यांचे रूप देखील
लिंग दाखवतात मग त्यांना नावा-रुपापासून न्यारा कसे म्हणता! शेकडो नावे ठेवली आहेत.
हे सर्व ज्ञान मुलांच्या बुद्धीमध्ये चांगल्या रीतीने राहिले पाहिजे. म्हणतात देखील
परमात्मा ज्ञानाचे सागर आहेत. साऱ्या जंगलाला कलम बनवा तरी देखील अंत होऊ शकत नाही.
अच्छा!
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१) आता आपण
बाबांद्वारे वर्थ पाउंड बनलो आहोत, हम सो देवता बनणारे आहोत, याच नारायणी नशेमध्ये
रहायचे आहे, बंधन मुक्त बनून सेवा करायची आहे. बंधनांमध्ये अडकायचे नाहीये.
२) ज्ञान-योगामध्ये
हुशार बनून मात-पित्या समान किंग ऑफ फ्लॉवर बनायचे आहे आणि आपल्या हमजीन्स (बरोबरीच्यांची)
देखील सेवा करायची आहे.
वरदान:-
आपल्या सर्व
खजिन्यांना अन्य आत्म्यांच्या सेवेमध्ये लावून सहयोगी बनणारे सहजयोगी भव
सहजयोगी बनण्याचे
साधन आहे - नेहमी आपल्या संकल्पाद्वारे, वाणी द्वारे आणि प्रत्येक कार्याद्वारे
विश्वातील सर्व आत्म्यांप्रती सेवाधारी समजून सेवेमध्येच सर्व काही लावायचे आहे. जो
काही ब्राह्मण जीवनामध्ये शक्तींचा, गुणांचा ज्ञानाचा किंवा श्रेष्ठ कमाईच्या समयाचा
खजिना बाबांद्वारे प्राप्त झालेला आहे तो सेवेमध्ये लावा अर्थात सहयोगी बना तर
सहजयोगी बनाल. परंतु सहयोगी तेच बनू शकतात जे संपन्न आहेत. सहयोगी बनणे अर्थात
महादानी बनणे.
बोधवाक्य:-
बेहदचे वैरागी
बना तेव्हा मग आकर्षणाचे सर्व संस्कार सहजच नष्ट होतील.
अव्यक्त इशारे -
संकल्पांची शक्ती जमा करून श्रेष्ठ सेवेच्या निमित्त बना:-
ज्याप्रमाणे आपल्या
स्थूल कार्याच्या प्रोग्रामला दिनचर्ये प्रमाणे सेट करता, असेच आपल्या मन्सा समर्थ
स्थितीचा प्रोग्राम सेट करा तर संकल्प शक्ती जमा होत जाईल. आपल्या मनाला समर्थ
संकल्पांमध्ये बिझी ठेवाल तर मनाला अपसेट होण्यासाठी वेळच मिळणार नाही. मन नेहमी
सेट अर्थात एकाग्र असेल तर स्वतःच चांगली व्हायब्रेशन्स पसरतात, सेवा होते.