29-07-2026      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो, आपल्या स्वधर्मामध्ये स्थित होऊन आपसात प्रेमाने एकमेकांना ओम् शांती म्हणा - हा देखील एकमेकांना रिगार्ड देणे आहे”

प्रश्न:-
भक्तीमध्ये देखील भगवंताला भोग लावतात, इथे तुम्ही मुले देखील भोग लावता, ही परंपरा का आहे?

उत्तर:-
कारण हे देखील त्यांचा रिगार्ड ठेवणे आहे. भले तुम्ही जाणता शिवबाबा निराकार आहेत, अभोक्ता आहेत. खात नाहीत, परंतु वासना तर पोहोचते. सर्वांचे सद्गती दाता, पतित-पावन बाबा आहेत. तर जरूर भोग देखील त्यांना लावला पाहिजे.

गीत:-
हमारे तीर्थ न्यारे हैं...

ओम शांती।
मुलांच्या अंतःकरणामध्ये देखील ‘ओम् शांती’ शब्द उमटला. जसे एखाद्याला ‘नमस्ते’ म्हटले जाते, तर ते देखील रिटर्नमध्ये नमस्ते म्हणतात. इथे बाबांनी म्हटले - ‘ओम् शांती’. तर सर्व मुले, यांच्या (ब्रह्मा बाबांच्या) आत्म्या सहित सर्वांच्या अंतःकरणातून येईल - ‘ओम् शांती’ अर्थात मी आत्मा शांत स्वरूप आहे. रिस्पॉन्ड (प्रतिसाद) तर दिला पाहिजे ना. हा प्रतिसाद झाला ना. दुसरे कोणीही अर्थासहित असे म्हणू शकणार नाहीत. ज्ञान-सूर्य बाबा देखील म्हणतात - ‘ओम् शांती’. ज्ञान-चंद्रमा देखील म्हणतात - ‘ओम् शांती’. ज्ञान-सितारे देखील म्हणतात - ‘ओम् शांती’. सिताऱ्यांमध्ये सर्वच आले. आता तुम्हा मुलांना आपल्या स्वधर्माबद्दल ठाऊक झाले आहे की, आपण शांत स्वरूप आहोत आणि शांतीधामचे रहिवासी आहोत. तुम्हाला हा निश्चय झाला आहे. तुम्ही चांगल्या रीतीने आत्म्याला जाणता. खरोखर, म्हटले देखील जाते - महान-आत्मा, पाप-आत्मा. आत्माच एक शरीर सोडून दुसरे घेते. परंतु आत्म्याचा यथार्थ परिचय कोणालाच नाहीये. आपण आत्मा इतकी सूक्ष्म आहोत. ८४ जन्मांचा पार्ट बजावतो. हे ना तुम्हाला माहीत होते, ना इतर कोणी जाणतात. आता तुम्ही मुले सन्मुख बसला आहात. बाबांना आपले बनवता. मुले बाबांना आपले बनवतात वारसा घेण्यासाठी.

तुम्ही मुले जाणता, आम्हा आत्म्यांचे बेहदचे बाबा या ब्रह्माच्या तनामध्ये आलेले आहेत, ब्रह्मा तनामध्ये येऊन आदि सनातन देवी-देवता धर्माची स्थापना करतात. कल्पापूर्वी देखील आदि सनातन देवी-देवता धर्म अर्थात सूर्यवंशी राजधानी स्थापन झाली होती. हे स्थापनेचे कार्य कल्प-कल्प बाबाच करतात, ज्यांना ईश्वर म्हटले जाते. ईश्वर पित्याकडेच सर्व जण मागत असतात की, दुःख हरण करा, सुख द्या. जेव्हा सुख मिळते तेव्हा मागण्याची गरज राहत नाही. इथे मागतात कारण दुःख आहे. तिथे काहीही मागण्याची गरज राहत नाही कारण बाबा सर्व काही देऊन जातात, म्हणून सतयुगामध्ये कोणीही बाबांची आठवण करत नाही. बाबा म्हणतात की, मुलांना मी सुखधामाचा मालक बनवतो. तुम्ही मुले जाणता - या बाबांकडून आम्ही पुन्हा सुखधामचा वारसा घेत आहोत. बेहदच्या बाबांकडून बेहदचे सुख घेतो. हे तुम्हाला समजावून सांगितले जाते की, भक्तिमार्ग कसा चालतो, मनुष्य सृष्टी रूपी झाडाची उत्पत्ती, पालना आणि संहार कसा होतो अथवा ड्रामाचा आदि-मध्य-अंत काय आहे. ही आहे साकारी दुनिया, ती आहे निराकारी दुनिया. मुलांना आता समजले आहे की, आपण पूर्ण अर्धाकल्प भक्ती केली आहे. आता कलियुगाचा अंत आहे. वारसा मिळतोच मुळी संगमावर. हे मुलांना व्यवस्थित समजले पाहिजे. आता आपण संगमावर आहोत, हे तुम्हा मुलांनाच समजते. जोपर्यंत परिचय देणार नाही तोपर्यंत दुसऱ्या कोणालाही समजणार नाही. जरूर संगमयुग येते, जेव्हा जुनी दुनिया बदलून नवीन होते. ही सारी जुनी दुनिया आहे, याला आयर्न एज्ड म्हटले जाते. हे देखील तुम्ही जाणता, सर्व प्रथम साऱ्या दुनियेमध्ये एकच धर्म असतो. नवीन दुनियेमध्ये फक्त भारत खंडच असतो, फार थोडे मनुष्य असतात. नवीन दुनियेलाच स्वर्ग म्हटले जाते. यावरून हे सिद्ध होते की नवीन दुनियेमध्ये नवीन भारत होता. आता जुन्या दुनियेमध्ये जुना भारत आहे. गांधीजी देखील म्हणत होते, नवीन दुनिया, नवीन भारत व्हावा, नवीन दिल्ली असावी. आता नवीन भारत अथवा नवीन दिल्ली काही राहिलेली नाही. नवीन भारतामध्ये तर या लक्ष्मी-नारायणाचे राज्य होते. आता त्याच भारतावर रावणाचे राज्य आहे. हे देखील लिहिले पाहिजे - नवीन दुनिया, नवीन दिल्ली. अमुक वेळेपासून अमुक वेळेपर्यंत यांचे राज्य. हे समजावून देखील तेच सांगू शकतात जे नवीन दुनिया बनविणारे आहेत. ब्रह्मा द्वारे नवीन दुनिया, स्वर्ग स्थापन करतात, ज्या स्वर्गाचा वारसा घेण्यासाठी तुम्ही येता. बाबा तुम्हाला युक्ती सांगतात अथवा पुरुषार्थ करवून घेतात. सन्मुख भेटायला देखील येता अथवा तिथे देखील बसून शिकता. मन होते की सन्मुख भेटावे. ते सन्मुख भेटतात मनुष्य, मनुष्याला. इथे तुम्ही म्हणाल, आम्ही जातो - शिवबाबांना भेटायला. तर म्हणतील - ते तर निराकार आहेत ना. आपण आत्मे देखील निराकार आहोत. आपण देखील इथे पार्ट बजावण्याकरिता येतो ना. ज्यांचे नाव आहे ते जरूर पार्टधारी देखील आहेत. भगवंताचे देखील नाव आहे ना. निराकार ‘शिव’नाच भगवान म्हटले जाते, इतर कोणालाही भगवान म्हणणार नाहीत. भगवान निराकार म्हणूनच गायले जातात. त्यांची पूजा होते, आत्म्यांची देखील पूजा होते. रुद्र यज्ञ रचतात ना. ते मातीचे शाळिग्राम बनवतात. दगडाचे बनवा किंवा मातीचे. मातीचे तोडणे आणि पुन्हा बनवणे सोपे आहे. दुनिया तर या गोष्टींना जाणत नाही. रुद्र यज्ञामध्ये किती आत्म्यांची पूजा करू शकतात. मुले तर असंख्य आहेत. सर्व भक्त भगवंताची मुले आहेत, पित्याची आठवण करतात. बाबांनी सांगितले आहे - शिवबाबा येतातच भारतामध्ये. तुम्ही थोडीशी मुले जी त्यांचे मदतगार, खुदाई खिदमतगार (ईश्वरीय सेवाधारी) बनता, त्यांचीच पूजा भक्त लोक शाळिग्राम बनवून करतात. यज्ञ जो रचतात, त्यामध्ये छोटा यज्ञ देखील असतो, मोठा देखील असतो. मोठे श्रीमंत लोक मोठा यज्ञ रचतात. लाख-लाख शाळिग्राम बनवतात. छोटा यज्ञ असेल तर ५-१० हजार शाळिग्राम बनवतील. जसा शेठ असेल तसा यज्ञ आणि मग तितकेच शाळिग्राम बनवतात. एक शिव, आणि बाकी शाळिग्राम बनवतात, मग तितके ब्राह्मण देखील पाहिजेत. बऱ्याच जणांनी यज्ञ पाहिला असेल. तुम्ही जाणता, बाबा आम्हा मुलांची सेवा करतात, आपण मग इतरांची सेवा करतो म्हणून पूजा होते. तुम्ही आता पूज्य बनता. आत्मा म्हणते - बाबा, तुम्ही तर सदैव पूज्य आहात. आम्हाला देखील पूज्य बनवत आहात. तुम्ही पूज्य आत्मा जेव्हा शरीर घ्याल तर तेव्हा म्हणतील - पूज्य देवी-देवता. आत्माच पूज्य अथवा पुजारी बनते. बाबा येतात देखील एकदाच; त्यानंतर पुन्हा कधी बाबा आत्म्यांना शिकवतील - असे घडत सुद्धा नाही. आत्माच ऐकते. जशी आत्मा शरीराद्वारे ऐकते, तसेच परमपिता परमात्मा, सुप्रीम आत्मा देखील शरीराचा आधार घेऊन यांच्या द्वारे (ब्रह्मा बाबांद्वारे) ऐकवतात. यांच्या द्वारे तुम्हाला राजयोग शिकवतात. त्यांना स्वतःचे काही शरीर नाहीये. ब्रह्मा, विष्णू, शंकराला देखील स्वतःचे सूक्ष्म शरीर आहे. इथे तर सर्वांना आपले-आपले शरीर आहे. ही आहेच साकारी दुनिया. शिवबाबा आहेत निराकार. ते ज्ञानाचा सागर, सुखाचा सागर, प्रेमाचा देखील सागर आहेत. ते येऊन सर्वांना पतितापासून पावन बनवतात. यामध्ये प्रेरणेची काही गोष्टच नाही. जर प्रेरणेद्वारे तुम्हाला पावन बनवायचे असते तर मला इथे येऊन रथ घेण्याची काय गरज आहे? ‘शिव’च्या मंदिरामध्ये गाभाऱ्याच्या बाहेर समोर नंदी ठेवतात. मनुष्यांची बुद्धी अगदीच पत्थर-बुद्धी झाल्या कारणाने काहीही समजत नाहीत. शिवलिंगा समोर नंदी का ठेवला आहे? ‘गो-शाळा’ नाव ऐकले आहे त्यामुळे नंदी ठेवला आहे. आता नंदीवर कोणी स्वारी केली! श्रीकृष्णाची आत्मा तर सतयुगामध्ये असते. त्यांना काय पडले आहे जे प्राण्यामध्ये येऊन बसतील. अजिबात काहीही समजत नाहीत. द्रौपदी देखील एक थोडीच होती. असंख्य आहेत ज्या हाका मारत आहेत. त्यांनी (दुनियावाल्यांनी) तर एक नाटक सुद्धा बनवले आहे की, श्रीकृष्ण, द्रौपदीला साड्या देत जातात, अर्थ काहीही समजत नाहीत. आता तुम्ही मुले समजता, तुम्हाला २१ जन्मांसाठी विवस्त्र व्हायचे नाहीये. कुठली गोष्ट कुठे घेऊन गेले आहेत. भक्तिमार्गामध्ये असंख्य कहाण्या आहेत. म्हणतात - या कथा इत्यादी सर्व अनादि आहेत. पुनर्जन्म घेत ऐकत आले आहेत. अनादि म्हटले, तरी देखील कधी पासून सुरू झाले, काहीच माहित नाही. हे देखील माहित नाही की रावण राज्य कधीपासून सुरू होते. त्याचे कुठेच कोणतेही वर्णन नाहीये. तुम्ही किती सेवा करता. ते सूर्य, चंद्र, तारे इत्यादी तर अस्तित्वात आहेतच. सतयुगामध्ये देखील आहेत तर आताही आहेत. त्यांच्यामध्ये कोणताही बदल होत नाही. भारतालाच पुन्हा अंधारातून बाहेर काढून प्रकाशामध्ये आणण्याकरिता, तुम्ही आता निमित्त बनला आहात. भक्तिमार्गाला अंधार म्हटले जाते. तुमची महिमा आहे, तुम्ही धरतीवरील तारे आहात. तारे आहेत तर सूर्य-चंद्र देखील असले पाहिजेत.

हे तुमचे रूहानी तीर्थ आहे. तुम्ही अशा यात्रेवर जाता, जिथून पुन्हा तुम्ही या मृत्युलोकमध्ये येणार नाही. आता हा मृत्युलोक आहे, पुन्हा इथेच अमरलोक होईल. द्वापरपासून मृत्युलोक सुरू होतो. आता तुम्ही अमर लोकामध्ये जाण्याकरिता खरी-खरी अमरकथा ऐकत आहात. तुम्ही समजता की, आम्हा आत्म्यांची यात्रा अतिशय वेगळी आहे. तुम्ही इथे बसून यात्रेवर जाण्याचा पुरुषार्थ करता. आठवणीद्वारेच तुमची विकर्म विनाश होतील. ते (दुनियावाले) यात्रेला जातात, परंतु त्यांची विकर्म कुठे विनाश होतात! लोकांना दारूची इतकी सवय झाली आहे की, ते लपवून जरूर घेऊन जातात. आज-काल तर यात्रेमध्ये देखील खूप घाणेरड्या वृत्तीचे असतात. आहेत तर सर्व पतितच ना. जसे ब्राह्मण पतित, तसे यात्रेकरू देखील पतित. पंडे लोक यात्रा करवतात, ते काही पावन थोडेच आहेत. तुम्ही तर पवित्र राहता. खरे ब्राह्मण तुम्ही आहात. तुमची आत्मा पवित्र राहते. आठवणीच्या यात्रेद्वारेच तुम्ही पवित्र बनता. सतोप्रधान बनायचे आहे. बाबा वारंवार लिहितात - “गोड मुलांनो”. हे शिवबाबांनी आत्म्यांसाठी लिहिले आहे. माझी आठवण करा तर तुम्ही तमोप्रधानापासून सतोप्रधान बनून सतोप्रधान दुनियेचे मालक बनाल. मुख्य डायरेक्शन फक्त एकच आहे; किती सोपे आहे. आठवणीद्वारेच विकर्म विनाश होतील. आठवण केली नाहीत तर विकर्म विनाश होणार नाहीत, मग सजा भोगावी लागेल. बाबा तर म्हणतात की, तुम्ही कुठेही गेलात तरी, तुम्ही तुमची कमाई करू शकता. उठा-बसा, खा-प्या फक्त बाबांची आठवण करा, ही तुमची कमाई आहे. मुलांसाठी तर हे अजूनच सोपे आहे. यामध्ये लक्ष केंद्रित करणे इत्यादीचा काही प्रश्नच उद्भवत नाही. श्रीनाथाच्या मंदिरामध्ये श्रीनाथाच्या आठवणीमध्ये बसतात. भोग लावला जातो. आहे तर दगडाची मूर्ती ना. भोग देखील कोणाला लावला पाहिजे? अधिकारी तर एक शिवबाबाच आहेत. सर्वांचे सद्गती दाता, पतित-पावन तेच आहेत. बाबा म्हणतात - मी तर स्वीकारसुद्धा करत नाही. तुम्ही माझ्यावर दूध सुद्धा पाणी मिसळलेले वाहता, हा भोग लावता, कशासाठी? मी तर निराकार, अभोक्ता आहे! माझी पूजा कशासाठी करता? माझ्या समोर भोग ठेवतात, परंतु भक्तांनीच भोग लावला आणि त्यांनीच तो वाटून खाल्ला. तुम्ही जाणता, शिवबाबांना भोग तर जरूर लावायचा आहे. नंतर वाटून तुम्हीच खाता. हा जसा काही कोणाचा आदर ठेवणे आहे. आपण शिवबाबांना भोग लावतो. हा शिवबाबांचा भंडारा आहे ना. ज्याचा भंडारा आहे, त्याला भोग जरूर लावावा लागेल. भले तुम्ही भोग लावता, खाता देखील तुम्ही मुलेच. हे ब्रह्मा खातात, मी खात नाही. बाकी वासना तर येईल ना, खूप उत्तम भोग बनवला आहे. सांगण्याकरिता कर्मेंद्रिये तर आहेत ना. हे ब्रह्मा खाऊ शकतात. हे शरीर तर यांचे आहे ना. मी फक्त यांच्यामध्ये येऊन प्रवेश करतो. तुम्हा मुलांना पतितापासून पावन बनविण्याकरिता फक्त मुखाचाच तर उपयोग करतो. ‘गोमुख’ देखील म्हणतात ना. बरोबर गाय देखील आहे. तुम्ही जाणता, यांच्या द्वारेच (ब्रह्मा द्वारेच) तुम्हा मुलांना ॲडॉप्ट करतात. हे माता-पिता दोन्ही आहेत. परंतु मातांना सांभाळणार कोण! म्हणून ड्रामा प्लॅन अनुसार सरस्वतीला निमित्त बनवले आहे. माता-गुरूची महिमा देखील पाहिजे ना. गुरू मध्ये तर पहिल्या क्रमांकावर हेच प्रसिद्ध आहेत. ‘गुरू ब्रह्मा’ हे बरोबर आहे. जसा पिता तशी मुले. तुम्ही ब्राह्मण देखील सच्चे गुरू बनता. सर्वांना स्वर्गाचा खरा मार्ग सांगता. आत्माच मुखाद्वारे मार्ग सांगते की, मनमनाभव, मध्याजी भव. पिता, माता आणि मुले सर्व जण तोच मार्ग सांगतात. इथे तुम्ही सन्मुख बसले आहात, त्यामुळे आठवण राहते. आणि मग घरी जाता तेव्हा खूप मुले विसरून जातात. इथे आनंद होतो, बाबांकडे आलो आहोत. बाबा म्हणतात - स्वदर्शन चक्रधारी बनून ही युक्ती सांगा की, मुक्तिधामची, बाबांची आणि वारशाची आठवण करा. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) आपसामध्ये एकमेकांना आणि बाबांना यथार्थ रिगार्ड द्यायचा आहे. बाबा भले अभोक्ता आहेत, परंतु ज्यांच्या भंडाऱ्यातून पालना होते, सर्वप्रथम त्यांना भोग जरूर स्वीकार करवायचा आहे.

२) पूजनीय बनण्याकरिता खुदाई खिदमतगार (ईश्वरीय सेवाधारी) बनायचे आहे. बाबांसोबत सेवेमध्ये मदतगार बनायचे आहे. जेव्हा आत्मा आणि शरीर दोन्ही पावन बनतील, तेव्हा पूजा होईल.

वरदान:-
स्वयंप्रती आणि सर्व आत्म्यांप्रती लॉ-फुल बनणारे, लॉ मेकर सो न्यू वर्ल्ड मेकर भव

जे स्वयं प्रती लॉ-फुल बनतात (कायद्याचे पालन करणारे बनतात), तेच इतरां प्रती देखील लॉ-फुल बनू शकतात. जे स्वतः लॉ ब्रेक करतात, ते इतरांवर लॉ चालवू शकत नाहीत. त्यामुळे आपणच आपले निरीक्षण करा की, पहाटे पासून रात्री पर्यंत मनसा संकल्पामध्ये, वाणीमध्ये, कर्मामध्ये, संपर्कामध्ये, एकमेकांना सहयोग देण्यामध्ये किंवा सेवेमध्ये कुठेही लॉ ब्रेक (नियमाचे उल्लंघन) तर होत नाही ना! जे लॉ मेकर आहेत, ते लॉ ब्रेकर बनू शकत नाहीत. जे या वेळी ‘लॉ मेकर’ बनतात, तेच ‘पीस मेकर’ आणि ‘न्यू वर्ल्ड मेकर’ (शांती प्रस्थापित करणारे आणि नव्या दुनियेचे निर्माता) बनतात.

बोधवाक्य:-
कर्म करत असताना कर्माच्या चांगल्या अथवा वाईट प्रभावामध्ये न येणे, हेच कर्मातीत बनणे आहे.

हे अव्यक्त इशारे - ज्वालास्वरूप स्थितीमध्ये राहून शक्तिशाली आठवणीचा अनुभव करा.

ज्वाला स्वरूप आठवणी करिता मन आणि बुद्धी या दोघांनाही एक तर पॉवरफुल ब्रेक पाहिजेत आणि वळविण्याची शक्ती देखील पाहिजे. यामुळे बुद्धीची शक्ती अथवा कोणतीही एनर्जी वेस्ट न होता (शक्ती वाया न जाता) जमा होत जाईल. जितकी शक्ती जमा होईल, तितकीच पारखण्याची आणि निर्णय घेण्याची शक्ती वाढेल. याकरिता आता संकल्पांचा विस्तार बंद करत जा अर्थात समेटण्याची शक्ती धारण करा.