29-08-2025      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - आपल्या सेफ्टीसाठी (सुरक्षिततेसाठी) विकार रुपी मायेच्या पंजा पासून नेहमी सुरक्षित रहायचे आहे, कधीही देह-अभिमानामध्ये यायचे नाही”

प्रश्न:-
पुण्य-आत्मा बनण्यासाठी बाबा सर्व मुलांना कोणती मुख्य शिकवण देतात?

उत्तर:-
बाबा म्हणतात - मुलांनो, पुण्य-आत्मा बनायचे असेल तर १) सदैव श्रीमतावर चालत रहा. आठवणीच्या यात्रेमध्ये निष्काळजीपणा करू नका. २) आत्म-अभिमानी बनण्याचा पूर्णत: पुरुषार्थ करून काम महाशत्रूवर विजय प्राप्त करा. हीच वेळ आहे - पुण्यात्मा बनून या दुःखधामातून पार सुखधाममध्ये जाण्याची.

ओम शांती।
बाबाच रोज मुलांना विचारतात. शिवबाबांसाठी असे म्हणणार नाही की, मुला-बाळांवाले आहेत. आत्मे तर अनादि आहेतच. बाबा देखील आहेत. यावेळेस जेव्हा बाबा आणि दादा दोघेही आहेत तेव्हाच मुलांचा सांभाळ करावा लागतो. किती मुले आहेत ज्यांचा सांभाळ करावा लागतो. प्रत्येकाचा पोतामेल ठेवावा लागतो. जसे लौकिक पित्याला देखील चिंता असते ना. वाटते की, आपला मुलगा देखील या ब्राह्मण कुळामध्ये येईल तर चांगले होईल. आमच्या मुलांनी देखील पवित्र बनून पवित्र दुनियेमध्ये यावे. कुठे या जुन्या मायेच्या नाल्यामध्ये वाहून जाऊ नयेत. बेहदच्या बाबांना मुलांची चिंता असते. किती सेंटर्स आहेत, कोणत्या मुलाला कुठे पाठवावे ज्यामुळे तो सुरक्षित राहील. आजकाल सुरक्षितता देखील अवघड आहे. दुनियेमध्ये काहीही सुरक्षित नाही आहे. स्वर्गामध्ये प्रत्येकजण सुरक्षित आहे. इथे कोणीही सुरक्षित नाही आहे. कुठे ना कुठे विकार रुपी मायेच्या तावडीत अडकून पडतात. आता तुम्हा मुलांना इथे शिकवण मिळत आहे. सत् चा संग देखील इथेच आहे. इथेच दुःखधाम मधून पार सुखधाममध्ये जायचे आहे कारण आता मुलांना माहित झाले आहे की, दुःखधाम काय आहे, सुखधाम काय आहे. बरोबर आता दुःखधाम आहे. आपण खूप पापे केली आहेत आणि तिथे पुण्य-आत्मेच राहतात. आपल्याला आता पुण्य-आत्मा बनायचे आहे. आता तुम्ही प्रत्येकाने आपल्या ८४ जन्मांच्या इतिहास-भूगोलाला जाणले आहे. दुनियेमध्ये कोणीही ८४ जन्मांच्या इतिहास-भूगोलाला जाणत नाहीत. आता बाबांनी येऊन सारी जीवन कहाणी समजावून सांगितली आहे. आता तुम्ही जाणता आपल्याला संपूर्ण पुण्य-आत्मा बनायचे आहे - आठवणीच्या यात्रेद्वारे. यामध्येच निष्काळजीपणा केल्यामुळे खूप धोका खातात. बाबा म्हणतात - यावेळेस निष्काळजीपणा चांगला नाही. श्रीमतावर चालायचे आहे. यामध्ये देखील मुख्य गोष्ट सांगतात की, एकतर - आठवणीच्या यात्रेमध्ये रहा, दुसरे - काम महाशत्रूवर विजय प्राप्त करायचा आहे. बाबांना सर्वजण बोलावतात कारण त्यांच्याकडून शांती आणि सुखाचा वारसा आत्म्यांना मिळतो. आधी देह-अभिमानी होता तर काही माहिती होत नव्हते. आता मुलांना आत्म-अभिमानी बनवले जाते. नवीन लोकांना सर्वात आधी एक हदच्या आणि दुसरा बेहदच्या बाबांचा परिचय द्यायचा आहे. बेहदच्या बाबांकडून स्वर्गाचे नशीब मिळते. हदच्या पित्याकडून नरकाचे नशीब मिळते. मुलगा जेव्हा सज्ञान होतो तेव्हा प्रॉपर्टीचा अधिकारी बनतो. जेव्हा समज येते तेव्हा हळूहळू मायेच्या अधीन होतात. ते सर्व आहेत रावण राज्याचे (विकारी दुनियेचे) रितीरिवाज. आता तुम्ही मुले जाणता ही दुनिया बदलत आहे. या जुन्या दुनियेचा विनाश होत आहे. एका गीतेमध्येच विनाशाचे वर्णन आहे इतर कोणत्याही शास्त्रामध्ये महाभारत महाभारी लढाईचे वर्णन नाही आहे. गीतेचे हे आहेच पुरुषोत्तम संगमयुग. गीतेचे युग अर्थात आदि सनातन देवी-देवता धर्माची स्थापना. गीता आहेच देवी-देवता धर्माचे शास्त्र. तर हे गीतेचे युग आहे, जेव्हा की नवीन दुनिया स्थापन होत आहे. मनुष्यांना देखील बदलावे लागेल. मनुष्यापासून देवता बनायचे आहे. नवीन दुनियेमध्ये जरूर दैवी गुणवाले मनुष्य पाहिजेत ना. या गोष्टींना दुनिया जाणत नाही. त्यांनी कल्पाच्या आयुष्याचा कालावधी खूप दिला आहे. आता तुम्हा मुलांना बाबा समजावून सांगत आहेत - तुम्ही समजता - खरोखर बाबा आम्हाला शिकवत आहेत. श्रीकृष्णाला कधी पिता, टीचर किंवा गुरु म्हणू शकत नाही. श्रीकृष्ण जर टीचर असेल तर मग शिकला कुठून? त्याला काही ज्ञान-सागर म्हटले जाऊ शकत नाही.

आता तुम्हा मुलांना मोठ्या-मोठ्यांना समजावून सांगायचे आहे, आपसामध्ये मिळून सल्लामसलत करायची आहे की सेवेची वृद्धी कशी करता येईल. विहंग मार्गाची सेवा कशी करता येईल. ब्रह्माकुमारींसाठी इतका जो गोंधळ घालतात ते नंतर समजतील हे तर खरे आहेत. बाकी दुनिया तर खोटी आहे, त्यामुळे सत्याची नाव हलवत राहतील. वादळे तर येतात ना. तुम्ही नाव आहात ज्या पार जाता. तुम्ही जाणता आपल्याला या मायावी दुनियेपासून पार पलीकडे जायचे आहे. सर्वात पहिल्या नंबरचे वादळ येते देह-अभिमानाचे. हेच सर्वात वाईट आहे, यानेच सर्वांना पतित बनवले आहे. तेव्हाच तर बाबा म्हणतात - काम महाशत्रू आहे. हे जसे की खूप जोराचे वादळ आहे. कोणी तर यावर विजय प्राप्त केलेले देखील आहेत. गृहस्थ व्यवहारामध्ये गेलेले आहेत मग वाचण्यासाठी पुन्हा प्रयत्न करतात. कुमार-कुमारींसाठी तर खूप सोपे आहे म्हणून नाव देखील गायले गेले आहे - कन्हैया. इतक्या कन्या जरूर शिवबाबांच्याच असतील. देहधारी श्रीकृष्णाच्या तर इतक्या कन्या असू शकत नाहीत. आता तुम्ही या शिक्षणाद्वारे पट्टराणी बनत आहात, यामध्ये मुख्य पवित्रता देखील असली पाहिजे. आपणच आपल्याला बघायचे आहे की, आठवणीचा चार्ट ठीक आहे? बाबांकडे कोणाचा ५ तासांचा, कोणाचा २-३ तासांचा देखील चार्ट येतो. कोणी तर लिहीतच नाहीत. खूप कमी आठवण करतात. सर्वांची यात्रा एकसारखी असू शकत नाही. अजून पुष्कळ मुलांची वृद्धी होईल. प्रत्येकाने आपला चार्ट बघायचा आहे - मी कोणत्या प्रकारचे पद मिळवू शकतो? कितपत आनंद खुशी आहे? आपण सदैव आनंदी का राहू शकत नाही. जेव्हा की उच्च ते उच्च बाबांचे बनलो आहोत. ड्रामा अनुसार तुम्ही खूप भक्ती केली आहे. भक्तांना फळ देण्यासाठीच बाबा आले आहेत. रावण राज्यामध्ये तर विकर्मच होतात. तुम्ही पुरुषार्थ करता - सतोप्रधान दुनियेमध्ये जाण्याचा. जे पूर्ण पुरुषार्थ करणार नाहीत ते सतो मध्ये येतील. सर्व थोडेच इतके ज्ञान घेतील. संदेश जरूर ऐकतील. भले ते कुठेही असतील म्हणून कानाकोपऱ्यामध्ये गेले पाहिजे. परदेशामध्ये देखील मिशन (कार्य) गेले पाहिजे. जसे बुद्धांचे, ख्रिश्चनांचे इथे मिशन आहे ना. दुसऱ्या धर्मातील लोकांना आपल्या धर्मामध्ये आणण्याचे मिशन असते. तुम्ही समजावून सांगता की, आपण खरे तर देवी-देवता धर्माचे होतो. आता हिंदू धर्माचे बनलो आहोत. तुमच्याकडे जास्त करून हिंदू धर्माचेच येतील. त्यांच्यामध्ये देखील जे शिवचे, देवतांचे पुजारी असतील ते येतील. जसे बाबांनी सांगितले - राजांची सेवा करा. ते जास्त करून देवतांचे पुजारी असतात. त्यांच्या घरामध्ये मंदिर असते. त्यांचे देखील कल्याण करायचे आहे. तुम्ही देखील असेच समजा की, आपण बाबांसोबत दूरदेशाहून आलो आहोत. बाबा आलेच आहेत नवीन दुनिया स्थापन करण्यासाठी. तुम्ही देखील करत आहात. जे स्थापना करतील ते पालना देखील करतील. आतमध्ये नशा असला पाहिजे - आपण शिवबाबांसोबत दैवी राज्य स्थापन करण्यासाठी, साऱ्या विश्वाला स्वर्ग बनविण्यासाठी आलो आहोत. आश्चर्य वाटते या देशामध्ये काय-काय करत असतात. पूजा कशी करतात. नवरात्रीमध्ये देवींची पूजा होते ना. रात्र आहे तर दिवस देखील आहे. तुमचे एक गाणे देखील आहे ना - ‘क्या कौतिक देखा…’ मातीचा पुतळा बनवून, शृंगार करून त्याची पूजा करतात, त्याच्यावर मग इतका जीव जडतो तर जेव्हा ते विसर्जित करायला जातात तर रडू लागतात. मनुष्य जेव्हा मरतात तेव्हा प्रेताला देखील घेऊन जातात. ‘हरी बोल, हरी बोल’ असे म्हणत पाण्यात बुडवतात. जातात तर खूपजण ना. नदी तर कायम आहेच. तुम्ही जाणता हा यमुनेचा तिर होता, जिथे रास-विलास इत्यादी करत होते. तिथे तर मोठे-मोठे महाल असतात. तुम्हालाच जाऊन बनवायचे आहेत. जेव्हा कोणती मोठी परीक्षा पास करतात तर त्यांच्या बुद्धीमध्ये चालत असते - पास होऊन मग असे करणार, घर बांधणार. तुम्हा मुलांना देखील लक्षात ठेवायचे आहे - आपण देवता बनत आहोत. आता आपण आपल्या घरी जाणार. घराची आठवण करून आनंदीत झाले पाहिजे. मनुष्य प्रवास करून घरी परत येतात तर आनंद होतो ना. आता आपण आपल्या घरी जातो, जिथे जन्म झाला होता. आम्हा आत्म्यांचे देखील घर आहे मूलवतन. किती आनंद होतो. मनुष्य इतकी भक्ती करतातच मुक्ती करिता. परंतु ड्रामामध्ये पार्टच असा आहे जे परत कोणालाही जाता येत नाही. तुम्ही जाणता त्यांना अर्धाकल्पाचा पार्ट जरूर बजावायचाच आहे. आपले आता ८४ जन्म पूर्ण होत आहेत. आता परत जायचे आहे आणि मग राजधानीमध्ये येणार. बस घर आणि राजधानीचीच आठवण आहे. इथे बसलेले असताना देखील काहीजणांना आपला कारखाना इत्यादीची आठवण येते. जसे बघा बिर्ला आहे, त्यांचे किती कारखाने इत्यादी आहेत. पूर्ण दिवस त्यांना तेच विचार चालत असतील. त्यांना जर म्हटले बाबांची आठवण करा तर त्यांची किती अडचण होईल. सारखी-सारखी धंद्याची आठवण येत राहील. सर्वात सोपे आहे मातांसाठी, त्यांच्यापेक्षाही जास्त कन्यांसाठी. जिवंतपणी मरायचे आहे, साऱ्या दुनियेला विसरून जायचे आहे. तुम्ही स्वतःला आत्मा समजून शिवबाबांचे बनता, यालाच जिवंतपणी मरणे म्हटले जाते. देहा सहित देहाची सर्व नाती सोडून स्वतःला आत्मा समजून शिवबाबांचे बनायचे आहे. शिवबाबांचीच आठवण करत रहायची आहे कारण डोक्यावर पापांचे ओझे खूप आहे. इच्छा तर सर्वांना होते, आपण जिवंतपणी मरून शिवबाबांचे बनावे. शरीराचे भान राहू नये. आपण अशरीरी आलो होतो परत अशरीरी बनून जायचे आहे. बाबांचे बनलो आहोत तर बाबांशिवाय दुसऱ्या कोणाचीही आठवण येऊ नये. असे लवकर होईल तर युद्ध देखील लवकर लागेल. बाबा किती समजावून सांगतात - आम्ही तर शिवबाबांचे आहोत ना. आपण तिथले रहिवासी आहोत. इथे तर किती दुःख आहे. आता हा अंतिम जन्म आहे. बाबांनी सांगितले आहे तुम्ही सतोप्रधान होता तेव्हा आणखी कोणीही नव्हते. तुम्ही किती श्रीमंत होता. भले यावेळी पैसे कवड्या आहेत परंतु हे तर काहीच नाही. कवड्या आहेत. हे सर्व अल्पकाळाच्या सुखासाठी आहे. बाबांनी समजावून सांगितले आहे - भूतकाळामध्ये दान-पुण्य केले असेल तर पैसे देखील खूप मिळतात. मग दान करतात. परंतु ही आहे एका जन्माची गोष्ट. इथे तर जन्म-जन्मांतरासाठी श्रीमंत बनता. जितकी मोठी व्यक्ती, तितके मोठे दुःख असते. ज्यांच्याकडे खूप धन आहे ते तर खूप अडकलेले आहेत. कधीही इथे थांबू शकणार नाहीत. कोणी साधारण गरीबच सरेंडर होतील. श्रीमंत कधी होणार नाहीत. ते कमावतातच आपल्या मुला-नातवंडांसाठी की, आपले कुळ चालत राहावे. स्वतः त्या घरामध्ये पुनर्जन्म घेऊन येणारे नसतात. मुले-नातवंडे येतील, ज्यांनी चांगली कर्म केली आहेत. जसे, जे भरपूर दान करतात ते राजा बनतात. परंतु एव्हरहेल्दी तर नाहीत. राजाई केली तर काय झाले, अविनाशी सुख नाही आहे. इथे पावलोपावली अनेक प्रकारची दुःख असतात. तिथे ही सर्व दुःख दूर होतात. बाबांना बोलावतातच यासाठी की, आमचे दुःख दूर करा. तुम्ही समजता सर्व दुःख दूर होणार आहेत. फक्त बाबांची आठवण करत रहा. एका बाबांशिवाय इतर कोणाकडूनही वारसा मिळू शकत नाही. बाबा साऱ्या विश्वाचे दुःख दूर करतात. यावेळेस तर पशू इत्यादी देखील किती दुःखी आहेत. हे आहेच दुःखधाम. दुःख वाढत जाते, तमोप्रधान बनत जातात. आता आपण संगमयुगावर बसलो आहोत. ते सर्व कलियुगामध्ये आहेत. हे आहे पुरुषोत्तम संगमयुग. बाबा आपल्याला पुरुषोत्तम बनवत आहेत. एवढे जरी लक्षात राहिले तरी देखील आनंद होईल. भगवान शिकवतात, विश्वाचा मालक बनवतात, हे लक्षात ठेवा. तर त्यांच्या मुलांनी शिक्षणाद्वारे भगवान-भगवती बनले पाहिजे ना. भगवान तर सुख देणारे आहेत मग दुःख कसे मिळते? ते देखील बाबा बसून समजावून सांगतात. भगवंताची मुले मग दुःखामध्ये का आहेत, भगवान दुःखहर्ता, सुखकर्ता आहेत तर जरूर दुःखामध्ये येतात तेव्हाच तर गातात. तुम्ही जाणता बाबा आपल्याला राजयोग शिकवत आहेत. आपण पुरुषार्थ करत आहोत. यामध्ये संशय थोडाच येऊ शकतो. आपण बी. के. राजयोग शिकत आहोत. खोटे थोडेच बोलणार. कोणाला हा संशय आला तर समजावून सांगितले पाहिजे, हे तर शिक्षण आहे. विनाश समोर उभा आहे. आम्ही आहोत संगमयुगी ब्राह्मण शेंडी. प्रजापिता ब्रह्मा आहे तर जरूर ब्राह्मण देखील असले पाहिजेत. तुम्हाला देखील समजावून सांगितले आहे तेव्हाच तर निश्चय झाला आहे. बाकी मुख्य गोष्ट आहे आठवणीची यात्रा, यामध्येच विघ्न येतात. आपला चार्ट बघत रहा - बाबांची कितपत आठवण करतो, कितपत आनंदाचा पारा चढतो? हा आंतरिक आनंद असला पाहिजे की आम्हाला बागवान, पतित-पावन चा हात मिळाला आहे, आम्ही शिवबाबांना ब्रह्माद्वारे शेक हँड करतो. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) आपल्या घराची आणि राजधानीची आठवण करून अपार आनंदामध्ये रहायचे आहे. कायम हे लक्षात रहावे - आता आपली यात्रा पूर्ण झाली, आपण जातो आपल्या घरी आणि मग राजधानीमध्ये येणार.

२) आपण शिवबाबांना ब्रह्माद्वारे हँडशेक करतो, ते बागवान आम्हाला पतितापासून पावन बनवत आहेत. आपण या शिक्षणाने स्वर्गाची पट्टराणी बनतो - याच आंतरिक आनंदामध्ये रहायचे आहे.

वरदान:-
तीन प्रकाराच्या विजयाचे मेडल प्राप्त करणारे सदा विजयी भव

विजयीमाळेमध्ये नंबर प्राप्त करण्यासाठी प्रथम स्व वर विजयी, नंतर सर्वांवर विजयी आणि मग प्रकृतीवर विजयी बना. जेव्हा या तीन प्रकाराच्या विजयाची मेडल प्राप्त होतील तेव्हा विजयीमाळेचा मणी बनू शकाल. स्व वर विजयी बनणे अर्थात आपल्या व्यर्थ भाव, स्वभावाला श्रेष्ठ भाव, शुभ भावनेने परिवर्तन करणे. जे असे स्व वर विजयी बनतात तेच दुसऱ्यांवर देखील विजय प्राप्त करतात. प्रकृतीवर विजय प्राप्त करणे अर्थात वायुमंडळ, व्हायब्रेशन, आणि स्थूल प्रकृतीच्या समस्यांवर विजयी बनणे.

बोधवाक्य:-
स्वत:च्या कर्मेंद्रियांवर संपूर्ण राज्य करणारेच सच्चे राजयोगी आहेत.

अव्यक्त इशारे:- सहजयोगी बनायचे असेल तर परमात्म प्रेमाचे अनुभवी बना.

तुम्हा मुलांना ज्ञानासोबतच खरे रूहानी प्रेम मिळाले आहे. त्या रूहानी प्रेमानेच प्रभुचे बनविले आहे. प्रत्येक मुलाला डबल प्रेम मिळते - एक बाबांचे, दुसरे दैवी परिवाराचे. तर या प्रेमाच्या अनुभवाने परवाना बनविले आहे. प्रेमच चुंबकाचे काम करते. मग ऐकण्यासाठी आणि मरण्यासाठी देखील तयार होतात. संगमावर जे खऱ्या प्रेमामध्ये जिवंतपणी मरतात, तेच स्वर्गामध्ये जातात.