29-09-2025
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
“गोड
मुलांनो - बाबा आले आहेत तुम्हाला ज्ञानाचा तिसरा नेत्र देण्यासाठी, ज्याद्वारे
तुम्ही सृष्टीच्या आदि-मध्य-अंताला जाणता”
प्रश्न:-
शेरनी शक्तीच
कोणती गोष्ट हिंमतीने समजावून सांगू शकते?
उत्तर:-
बाकीच्या धर्मातील लोकांना ही गोष्ट समजावून सांगायची आहे की बाबा म्हणतात - तुम्ही
स्वतःला आत्मा समजा, परमात्मा नाही. आत्मा समजून बाबांची आठवण करा तर विकर्म विनाश
होतील आणि तुम्ही मुक्तीधाम मध्ये निघून जाल. परमात्मा समजल्याने तुमची विकर्म
विनाश होऊ शकत नाहीत. ही गोष्ट खूप हिंमतीने शेरनी शक्तीच समजावून सांगू शकते.
समजावून सांगण्याचा देखील अभ्यास पाहिजे.
गीत:-
नयन हीन को
राह दिखाओ…
ओम शांती।
मुले अनुभव करत आहेत - रुहानी आठवणीच्या यात्रेमध्ये अडचण दिसून येत आहे.
भक्तिमार्गामध्ये दारोदार धक्के खावेच लागतात. अनेक प्रकारचे जप-तप-यज्ञ करतात,
शास्त्र इत्यादी वाचतात, ज्यामुळेच ब्रह्माची रात्र म्हटले जाते. अर्धा कल्प रात्र,
अर्धा कल्प दिवस. ब्रह्मा एकटेच तर नसतील ना. प्रजापिता ब्रह्मा आहेत तर जरूर
त्यांची मुले कुमार-कुमारी देखील असतील. परंतु मनुष्य जाणत नाहीत. बाबाच मुलांना
ज्ञानाचा तिसरा नेत्र देतात, ज्यामुळे तुम्हाला सृष्टीच्या आदि-मध्य-अंताचे ज्ञान
मिळाले आहे. तुम्ही कल्पा पूर्वी देखील ब्राह्मण होता आणि देवता बनला होता, जे बनले
होते तेच पुन्हा बनतील. आदि सनातन देवी-देवता धर्माचे तुम्हीच आहात. तुम्हीच पूज्य
आणि पुजारी बनता. इंग्रजीमध्ये पूज्यला वर्शिप वर्दी (Worship Worthy) आणि पुजारीला
वर्शिपर (Worshiper) म्हटले जाते. भारतच अर्धा कल्प पुजारी बनतो. आत्मा मानते आपणच
पूज्य होतो पुन्हा आपणच पुजारी बनलो आहोत. पूज्य पासून पुजारी पुन्हा पूज्य बनतो.
बाबा तर पूज्य-पुजारी बनत नाहीत. तुम्ही म्हणाल - आम्ही पूज्य पावन सो देवी-देवता
होतो मग ८४ जन्मानंतर संपूर्ण पतित पुजारी बनतो. आता भारतवासी जे आदि सनातन
देवी-देवता धर्माचे होते, त्यांना आपल्या धर्माविषयी काहीच माहिती नाही आहे. तुमच्या
या गोष्टी बाकीच्या धर्मातील लोकांना समजणार नाहीत, जे या धर्माचे कुठे दुसऱ्या
धर्मामध्ये कनव्हर्ट झाले असतील, तेच येतील. असे कनव्हर्ट (धर्मांतरित) तर पुष्कळ
झाले आहेत. बाबा म्हणतात - जे शिव आणि देवतांचे पुजारी आहेत त्यांना हे सोपे आहे.
इतर धर्माचे लोक मात्र डोके खपवतील, जे धर्मांतरित झालेले असतील त्यांना टच होईल.
आणि येऊन समजून घेण्याचा प्रयत्न करतील. नाही तर मानणार नाहीत. आर्य समाजातून देखील
खूप आलेले आहेत. शीख लोक देखील आलेले आहेत. आदि सनातन देवी-देवता धर्माचे जे
कनव्हर्ट झाले आहेत, त्यांना आपल्या धर्मामध्ये जरूर यावे लागेल. झाडामध्ये देखील
वेग-वेगळे सेक्शन आहेत. पुन्हा येतील देखील नंबरवार. शाखा-उपशाखा निघत राहतील. ते
पवित्र असल्या कारणाने त्यांचा प्रभाव जास्त चांगला पडतो. यावेळी देवी-देवता धर्माचे
फाउंडेशन राहिलेले नाही आहे जे पुन्हा लावावे लागते. बहीण-भाऊ तर बनवावेच लागेल.
आपण एका पित्याची मुले सर्व आत्मे भाऊ-भाऊ आहोत. नंतर मग भाऊ-बहीणी बनतो. आता जशी
काही नवीन सृष्टीची स्थापना होत आहे, सर्वात पहिले आहेत ब्राह्मण. नवीन सृष्टीच्या
स्थापनेमध्ये प्रजापिता ब्रह्मा तर जरूर पाहिजेत. ब्रह्मा द्वारे ब्राह्मण बनतील.
याला ‘रुद्र ज्ञान यज्ञ’ असे देखील म्हटले जाते, यामध्ये ब्राह्मण जरूर पाहिजेत.
प्रजापिता ब्रह्माची औलाद जरूर पाहिजे. ते आहेत ग्रेट-ग्रेट ग्रँड फादर. ब्राह्मण
आहेत पहिल्या नंबरमध्ये शिखा वाले. आदम-बीबी, एडम-ईव्ह यांना मानतात देखील. यावेळी
तुम्ही पुजारी पासून पूज्य बनत आहात. तुमचे सर्वात सुंदर यादगार मंदिर दिलवाडा
मंदिर आहे. खाली तपस्येमध्ये बसले आहेत, वरती राजाई आणि इथे तुम्ही चैतन्य मध्ये
बसले आहात. ही मंदिरे नष्ट होतील आणि पुन्हा भक्ती मार्गामध्ये बनतील. तुम्ही जाणता
आता आपण राजयोग शिकत आहोत नंतर मग नवीन दुनियेमध्ये जाणार. ते जड मंदिर, तुम्ही
चैतन्यमध्ये बसले आहात. मुख्य हे मंदिर अगदी बरोबर बनलेले आहे. नाही तर स्वर्ग कुठे
दाखवतील, म्हणून छतावर स्वर्ग दाखवला आहे. यावर खूप चांगल्या प्रकारे समजावून सांगू
शकता. बोला, भारतच स्वर्ग होता मग आता भारत नरक आहे. या धर्माचे लगेच समजतील.
हिंदूंमध्ये देखील पहाल तर अनेक प्रकारच्या धर्मांमध्ये गेले आहेत. तिथून बाहेर
काढण्यासाठी तुम्हाला खूप मेहनत करावी लागते. बाबांनी समजावून सांगितले आहे स्वतःला
आत्मा समजून मामेकम् (मज एकाची) आठवण करा, बस्स, अजून दुसरे काहीच बोलता कामा नये.
ज्यांचा अभ्यास नाही, त्यांनी तर बोलू सुद्धा नये. नाहीतर बी. के. चे नाव बदनाम
करतात. जर दुसऱ्या धर्माचे आहेत तर समजावून सांगितले पाहिजे की, जर तुम्ही
मुक्तिधाम मध्ये जाऊ इच्छिता तर स्वतःला आत्मा समजा आणि बाबांची आठवण करा. स्वतःला
परमात्मा समजू नका. स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण कराल तर तुमची
जन्म-जन्मांतरीची पापे नष्ट होतील आणि मुक्तिधाम मध्ये निघून जाल. तुमच्यासाठी हा
‘मनमनाभव’चा मंत्रच पुरेसा आहे. परंतु बोलण्याची हिंमत पाहिजे. शेरनी शक्तीच सेवा
करू शकते. संन्यासी लोक बाहेर देशात जाऊन परदेशी लोकांना घेऊन येतात की, चला
तुम्हाला स्पिरिच्युअल नॉलेज देतो. आता ते काही बाबांना जाणतही नाहीत. ब्रह्माला
भगवान समजून म्हणतात, यांची आठवण करा. बस्स हाच मंत्र देतात, जसे काही चिमणीला
आपल्या पिंजऱ्यामध्ये टाकतात. तर अशा प्रकारे समजावून सांगण्यासाठी देखील वेळ लागतो.
बाबांनी सांगितले होते - प्रत्येक चित्राच्या वरच्या बाजूला लिहिलेले असावे - ‘शिव
भगवानुवाच’.
तुम्ही जाणता या
दुनियेमध्ये धनीविना (मालका शिवाय) सर्व निधनके आहेत. बोलावतात - ‘तुम मात-पिता…’
अच्छा त्याचा अर्थ काय? असेच बोलत राहतात तुम्हारी कृपा से सुख घनेरे. आता बाबा
तुम्हाला स्वर्गाच्या सुखासाठी शिकवत आहेत, ज्याच्यासाठी तुम्ही पुरुषार्थ करत आहात.
जे करतील ते मिळवतील. यावेळी तर सर्व पतित आहेत. पावन दुनिया तर एक स्वर्गच आहे, इथे
कोणीही सतोप्रधान असू शकत नाही. सतयुगामध्ये जे सतोप्रधान होते, तेच तमोप्रधान पतित
बनतात. क्राइस्टच्या मागे जे त्यांच्या धर्माचे येतात, ते तर सुरुवातीला सतोप्रधानच
असतील ना. जेव्हा लाखोच्या अंदाजामध्ये होतात तेव्हा लष्कर तयार होते, युद्ध करून
बादशाही घेण्यासाठी. त्यांना सुख देखील कमी तर दुःख देखील कमी. तुमच्यासारखे सुख तर
कोणालाच मिळू शकणार नाही. तुम्ही आता तयार होत आहात - सुखधाम मध्ये जाण्यासाठी. इतर
सर्व धर्म काही स्वर्गामध्ये थोडेच येतात. भारत जेव्हा स्वर्ग होता तर त्याच्या
सारखा पावन खंड कोणता असतही नाही. जेव्हा बाबा येतात तेव्हाच ईश्वरीय राज्य स्थापन
होते. तिथे युद्ध इत्यादीची गोष्टच नाही. भांडणे-मारामाऱ्या तर खूप नंतर सुरू होतात.
भारतवासी इतके कधी भांडलेले नाहीत. थोडे आपसामध्ये भांडून वेगळे झाले आहेत. द्वापर
मध्ये एकमेकांवर आक्रमण करतात. ही चित्रे इत्यादी बनविण्यासाठी देखील तल्लख-बुद्धी
पाहिजे. हे देखील लिहिले पाहिजे की, भारत जो स्वर्ग होता तो आता नरक समान कसा बनला
आहे, ते येऊन समजून घ्या. भारत सद्गतीमध्ये होता, आता दुर्गतीमध्ये आहे. आता सद्गती
मिळविण्यासाठी बाबाच नॉलेज देतात. लोकांना हे रूहानी नॉलेजच नसते. हे असते परमपिता
परमात्म्यामध्ये. बाबाच हे नॉलेज देतात आत्म्यांना. बाकी तर सर्व मनुष्य,
मनुष्यांनाच देतात. शास्त्र देखील मनुष्यांनीच लिहिली आहेत, मनुष्यांनीच वाचली आहेत.
इथे तर तुम्हाला रुहानी बाबा शिकवतात आणि रूह शिकते. शिकणारी तर आत्माच आहे ना. ते
लिहिणारे आणि वाचणारे मनुष्यच आहेत. परमात्म्याला तर शास्त्र इत्यादी वाचण्याची
गरजच नाही. बाबा म्हणतात - ही शास्त्रे इत्यादीद्वारे कोणाचीही सद्गती होऊ शकत नाही.
मलाच येऊन सर्वांना परत घेऊन जायचे आहे. आता तर दुनियेमध्ये करोडो मनुष्य आहेत.
सतयुगामध्ये जेव्हा या लक्ष्मी-नारायणाचे राज्य होते तेव्हा तिथे ९ लाख असतात. खूप
छोटे झाड असेल. मग विचार करा इतके सर्व आत्मे कुठे गेले? ब्रह्म मध्ये अथवा
पाण्यामध्ये तर लीन झाले नाहीत. ते सर्व मुक्तिधाम मध्ये राहतात. प्रत्येक आत्मा
अविनाशी आहे. त्यामध्ये अविनाशी पार्ट नोंदलेला आहे जो कधीही पुसला जाऊ शकत नाही.
आत्म्याचा विनाश होऊ शकत नाही. आत्मा तर बिंदू आहे. बाकी निर्वाण इत्यादी मध्ये
कोणीही जात नाही, सर्वांना पार्ट बजावायचाच आहे. जेव्हा सर्व आत्मे येतात तेव्हा मी
येऊन सर्वांना घेऊन जातो. सर्वात शेवटी आहेच मुळी बाबांचा पार्ट. नवीन दुनियेची
स्थापना मग जुन्या दुनियेचा विनाश. हे देखील ड्रामामध्ये नोंदलेले आहे. तुम्ही आर्य
समाजातील लोकांच्या झुंडीला समजावून सांगाल तर त्यांच्यामध्ये जो कोणी या देवता
धर्माचा असेल त्याला टच होईल (समजेल). खरोखर ही गोष्ट तर अगदी बरोबर आहे, परमात्मा
सर्वव्यापी कसे असू शकतात. भगवान तर पिता आहेत, त्यांच्याकडून वारसा मिळतो. काही
आर्य समाजी देखील तुमच्याकडे येतात ना. त्यालाच सैंपलिंग (कलम) म्हटले जाते. तुम्ही
समजावून सांगत रहा मग जो तुमच्या कुळातील असेल तो येईल. भगवान बाबाच पावन बनण्याची
युक्ती सांगतात. भगवानुवाच - मामेकम् (मज एकाची) आठवण करा. मी पतित-पावन आहे, माझी
आठवण केल्याने तुमची विकर्म विनाश होतील आणि मुक्तिधाम मध्ये याल. हा संदेश सर्व
धर्मीयांसाठी आहे. बोला, बाबा म्हणतात देहाचे सर्व धर्म सोडून माझी आठवण करा तर
तुम्ही तमोप्रधाना पासून सतोप्रधान बनाल. मी गुजराती आहे, अमका आहे - हे सर्व सोडून
द्या. स्वतःला आत्मा समजा आणि बाबांची आठवण करा. हा आहे योग-अग्नी. जपून पाऊल
उचलायचे आहे. सर्वांनाच काही समजणार नाही. बाबा म्हणतात पतित-पावन मीच आहे. तुम्ही
सर्व आहात पतित, निर्वाणधाम मध्ये देखील पावन बनल्या शिवाय येऊ शकत नाही. रचनेच्या
आदि-मध्य-अंताला देखील समजून घ्यायचे आहे. पूर्णपणे समजल्यानेच उच्च पद प्राप्त
कराल. थोडी भक्ती केली असेल तर थोडेच ज्ञान समजतील. खूप भक्ती केली असेल तर खूप
ज्ञान घेतील. बाबा जे समजावून सांगतात ते धारण करायचे आहे. वानप्रस्थींकरिता आणखीनच
सोपे आहे. गृहस्थ व्यवहारापासून दूर होतात. वानप्रस्थ अवस्था वयाच्या साठी नंतर होते.
गुरु देखील तेव्हाच करतात. आजकाल तर बालपणातच गुरु करतात. नाही तर पहिले पिता, मग
टीचर आणि साठीच्या नंतर गुरु केला जातो. सद्गती दाता तर एकच बाबा आहेत, हे इतर अनेक
गुरु लोकांसारखे थोडेच आहेत. या तर सर्व पैसे कमावण्याच्या युक्त्या आहेत, सद्गुरु
आहेतच एक - सर्वांची सद्गती करणारे. बाबा म्हणतात - मी तुम्हाला सर्व
वेद-शास्त्रांचे सार समजावून सांगतो. ही सर्व आहे भक्तिमार्गाची सामग्री. शिडी
उतरायची आहे. ज्ञान, भक्ती आणि मग भक्तीचे आहे वैराग्य. जेव्हा ज्ञान मिळते तेव्हाच
भक्तीचे वैराग्य येते. या जुन्या दुनिये पासून तुम्हाला वैराग्य येते. बाकी दुनियेला
सोडून कुठे जाल? तुम्ही जाणता ही दुनियाच नष्ट होणार आहे म्हणून आता बेहदच्या
दुनियेचा संन्यास करायचा आहे. पवित्र बनल्या शिवाय घरी जाऊ शकत नाहीत. पवित्र
बनण्यासाठी आठवणीची यात्रा पाहिजे. भारतामध्ये रक्ताच्या नद्या वाहिल्या नंतर मग
दुधाच्या नद्या वाहतील. विष्णूला देखील क्षीरसागरामध्ये दाखवतात. सांगितले जाते -
या लढाई द्वारे मुक्ती-जीवनमुक्तीचे गेट उघडतात. जितकी तुम्ही मुले पुढे जाल तितकाच
आवाज निघत राहील (तुमचा प्रभाव वाढत जाईल). आता युद्ध सुरू झाले की झाले. एकाच
ठिणगीने पहा पूर्वी काय झाले होते. समजतात की युद्ध होईल जरूर. युद्ध चालूच राहते.
एकमेकांचे मदतगार बनत राहतात. तुम्हाला देखील नवीन दुनिया पाहिजे तर जुनी दुनिया
जरूर नष्ट झाली पाहिजे. अच्छा!
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१) ही जुनी
दुनिया आता नष्ट होणार आहे म्हणून या जुन्या दुनियेचा संन्यास करायचा आहे. दुनियेला
सोडून कुठे जायचे नाहीये, परंतु याला बुद्धीने विसरायचे आहे.
२) निर्वाणधाममध्ये
जाण्याकरिता संपूर्ण पावन बनायचे आहे. रचनेच्या आदि-मध्य-अंताला पूर्णतः समजून घेऊन
नवीन दुनियेमध्ये उच्च पद प्राप्त करायचे आहे.
वरदान:-
कोणत्याही
आत्म्याला प्राप्तींची अनुभूती करविणारे यथार्थ सेवाधारी भव यथार्थ सेवाभाव अर्थात
नेहमी प्रत्येक आत्म्याप्रती शुभ भावना, श्रेष्ठ कामनेचा भाव. सेवाभाव अर्थात
प्रत्येक आत्म्याला भावने प्रमाणे फळ देणे. सेवा अर्थात कोणत्याही आत्म्याला
प्राप्तीचा मेवा अनुभव करविणे. अशा सेवेमध्ये तपस्या सोबतच असते. जिथे यथार्थ
सेवाभाव आहे तिथे तपस्येचा वेगळा भाव नसतो. जिथे सेवेमध्ये त्याग, तपस्या नाही ती
आहे नामधारी सेवा, त्यामुळे त्याग, तपस्या आणि सेवेच्या कंबाइंड रुपा द्वारे सच्चे
यथार्थ सेवाधारी बना.
बोधवाक्य:-
नम्रता आणि
धैर्यतेचा गुण धारण करा तर क्रोध-अग्नी देखील शांत होईल.
अव्यक्त इशारे:- आता
लगनच्या (एकाग्रतेच्या) अग्नीला प्रज्वलित करून योगाला ज्वाला रूपी बनवा. आता
निर्भय ज्वालामुखी बनून प्रकृती आणि आत्म्यांमध्ये जो तमोगुण आहे त्याला भस्म करा.
तपस्या अर्थात ज्वाला स्वरूप आठवण, या आठवणी द्वारेच माया किंवा प्रकृतीचे विक्राळ
रूप शितल होईल. तुमचा तिसरा नेत्र, ज्वालामुखी नेत्र मायेला शक्तीहीन करेल.