29-09-2026      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो, बेहदचे बाबा या बेहदच्या मैफिलीमध्ये (सभेमध्ये) गरीब मुलांना दत्तक घेण्यासाठी आले आहेत, त्यांना देवतांच्या सभेमध्ये येण्याची आवश्यकता नाही”

प्रश्न:-
मुलांनी कोणता दिवस खूप धुमधडाक्यात साजरा केला पाहिजे?

उत्तर:-
ज्या दिवशी मरजीवा जन्म झाला, बाबांवर निश्चय झाला… तो दिवस खूपच धुमधडाक्यात साजरा केला पाहिजे. तीच तुमच्या करिता जन्माष्टमी आहे. जर आपला मरजीवा जन्म दिवस साजरा कराल तर बुद्धीमध्ये राहील की आपण जुन्या दुनियेपासून किनारा केला आहे (दूर गेलो आहोत). आपण बाबांचे बनलो आहोत अर्थात वारशाचे अधिकारी बनलो आहोत.

गीत:-
महफिल में जल उठी शमा…

ओम शांती।
गाणी-कविता, भजन, वेद-शास्त्र, उपनिषद देवतांची महिमा इत्यादी तुम्ही भारतवासी मुले अनेकदा ऐकत आला आहात. आता तुम्हाला समज मिळाली (ज्ञान मिळाले) आहे की हे सृष्टीचे चक्र कसे फिरते. भूतकाळाला देखील मुलांनी जाणले आहे. दुनियेचा वर्तमानकाळ काय आहे, ते देखील पाहत आहात. ते देखील प्रॅक्टिकलमध्ये अनुभव केले आहे. बाकी जे काही होणार आहे - ते आता प्रॅक्टिकलमध्ये अनुभव केलेले नाहीये. पास्ट मध्ये (भूतकाळामध्ये) जे झाले त्याचा अनुभव केला आहे. बाबांनीच सांगितले आहे, बाबांशिवाय इतर कोणीही समजावून सांगू शकत नाही. असंख्य मनुष्य आहेत परंतु ते काहीच जाणत नाहीत. आदि-मध्य-अंता विषयी काहीच जाणत नाहीत. आता कलियुगाचा अंत आहे, हे देखील मनुष्य जाणत नाहीत. हो पुढे चालून अखेरीला जाणतील. जे मूळ आहे त्याला जाणतील. बाकी संपूर्ण नॉलेज काही जाणणार नाहीत. शिकणारे स्टुडंटच जाणू शकतात. इथे तर मनुष्यापासून राजांचाही राजा बनायचे आहे. ते देखील आसुरी राजे नाहीत परंतु दैवी राजे, ज्यांची आसुरी राजे पूजा करतात. या सर्व गोष्टी तुम्हीच मुले जाणता. विद्वान, आचार्य इत्यादी जरा सुद्धा हे जाणत नाहीत. भगवान ज्यांना ‘शमा’ असे म्हणून बोलावतात त्यांनाच जाणत नाहीत. स्वतः गाणी गाणारे देखील काहीच जाणत नाहीत. फक्त महिमा गात राहतात. भगवान देखील कोणत्यातरी वेळेला या दुनियेच्या सभेमध्ये आले होते. मैफिल अर्थात जिथे अनेक जण एकत्रित येतात. मैफिलीमध्ये खाणे-पिणे, दारू इत्यादी मिळते. आता या मैफिलीमध्ये तुम्हाला बाबांकडून अविनाशी

ज्ञान रत्नांचा खजिना मिळत आहे किंवा असे म्हणता येईल की, आम्हाला बाबांकडून वैकुंठाची बादशाही मिळत आहे. या साऱ्या मैफिलीमध्ये मुलेच बाबांना जाणतात की बाबा आम्हाला सौगात देण्याकरिता आले आहेत. बाबा मैफिलीमध्ये काय देतात आणि मनुष्य मैफिलीमध्ये एक-मेकांना काय देतात, दिवस-रात्री इतका फरक आहे. बाबा जसे हलवा खाऊ घालतात आणि ते स्वतात स्वस्त वस्तू फुटाणे खाऊ घालतात. हलवा आणि फुटाणे या दोन्ही मध्ये किती फरक आहे. एकमेकांना फुटाणे खाऊ घालत राहतात. जेव्हा एखादा कमाई करत नाही तेव्हा त्याला म्हटले जाते - ‘हा तर फुटाणे खात आहे’.

आता तुम्ही मुले जाणता बेहदचे बाबा आपल्याला स्वर्गाच्या राजाईचे वरदान देत आहेत. शिवबाबा या मैफिलीमध्ये येतात ना. शिवजयंती देखील साजरी करतात ना. परंतु ते येऊन काय करतात - हे कोणालाही माहीत नाही. ते पिता आहेत. पिता जरूर काही खाऊ घालतात, देतात. माता-पिता संगोपन तर करतात ना. तुम्ही देखील जाणता - ते माता-पिता येऊन तुमचे जीवन सावरतात. ॲडॉप्ट करतात. मुले स्वतः म्हणतात - ‘बाबा, मी तुमचा १० दिवसांचा मुलगा आहे अर्थात १० दिवसा पासून तुमचा बनलो आहे’. तर समजले पाहिजे की, आम्ही तुमच्याकडून स्वर्गाची बादशाही घेण्यासाठी अधिकारी बनलो आहोत. आपल्याला दत्तक घेण्यात आले आहे. एखाद्याला जेव्हा जिवंतपणी दत्तक घेतले जाते तेव्हा अंधश्रद्धेपोटी तर घेत नाहीत ना. मुलाचे आई-वडील सुद्धा मुलाला दत्तक देतात. समजतात आमचा मुलगा त्यांच्याकडे जास्त सुखात राहील आणि प्रेमाने सांभाळतीलही. तुम्ही देखील लौकिक पित्याची मुले इथे बेहदच्या पित्याकडे दत्तक जाता. बेहदचे बाबा किती आवडीने दत्तक घेतात. मुले देखील लिहितात - ‘बाबा, मी तुमचा झालो आहे. फक्त दुरूनच म्हणत नाहीत. प्रॅक्टिकलमध्ये दत्तक घेतले जाते, तर सेरेमनी देखील केली जाते. जसा जन्मदिवस साजरा करतात ना. तर ही देखील जेव्हा त्यांची मुले बनतात, तर म्हणतात आम्ही तुमचे आहोत तर ६-७ दिवसानंतर नामकरण विधी देखील साजरा केला पाहिजे ना. परंतु कोणीही साजरा करत नाहीत. आपली जन्माष्टमी तर खूप धुमधडाक्यात साजरी केली पाहिजे. परंतु साजरीच करत नाहीत. ज्ञान देखील नाही की आपल्याला जयंती साजरी करायची आहे. १२ महिने होतात तेव्हा साजरी करतात. अरे आधी साजरा केला नाही, तर १२ महिन्यानंतर का साजरा करता. ज्ञानच नाहीये, निश्चय नसेल. एकदा जन्मदिवस साजरा केला ते तर पक्के झाले, आणि जर मग जन्मदिवस साजरा करूनही भागन्ती झाले तर समजले जाईल हा तर मेला. काहीजण तर जन्म देखील खूप धुमधडाक्यात साजरा करतात. कोणी गरीब असेल तर गुळ-शेंगदाणे देखील वाटू शकतात, जास्त काही नाही. मुलांना पूर्ण रीतीने लक्षात येत नाही म्हणून तो आनंद होत नाही. जन्म-दिवस साजरा कराल तर आठवण देखील पक्की राहील. परंतु ती बुद्धी नाही आहे. आज तरीही पुन्हा बाबा समजावून सांगत आहेत - जी-जी नवीन मुले बनली आहेत, त्यांना जर दृढ निश्चय बसत असेल तर जन्मदिवस साजरा करावा. अमक्या दिवशी मला निश्चय झाला, तेव्हा पासून त्याची जन्माष्टमी सुरू होते. तर मुलांनी बाबांची आणि वारशाची चांगल्या रीतीने आठवण केली पाहिजे. मुलगा कधी विसरतो थोडेच की मी अमक्याचा मुलगा आहे. इथे म्हणतात की बाबा, तुमची आम्हाला आठवण राहत नाही. असे अज्ञान काळामध्ये देखील कधी कोणी म्हणणार नाही. आठवण न राहण्याचा प्रश्नच येत नाही. तुम्ही बाबांची आठवण करता, बाबा तर सर्वांची आठवण करतातच. माझी सर्व मुले काम-चितेवर जळून भस्म झाली आहेत. असे इतर कोणता गुरू अथवा महात्मा इत्यादी म्हणणार नाही. हे भगवानुवाचच आहे की, सर्व माझी मुले आहेत. सर्व भगवंताचीच तर संतान आहेत ना. सर्व आत्मे परमात्मा पित्याची मुले आहेत. बाबा देखील जेव्हा शरीरामध्ये येतात तेव्हा म्हणतात - हे सर्व आत्मे माझी मुले आहेत. काम-चितेवर चढून भस्मीभूत, तमोप्रधान झाले आहेत. भारतवासी किती आयरन एज्ड बनले आहेत. काम-चितेवर बसून सर्व काळे बनले आहेत. जो पूज्य नंबर वन गोरा होता, तो आता पुजारी, सावळा बनला आहे. सुंदर तोच श्याम बनला आहे. हे काम-चितेवर चढणे अर्थात सापावर चढणे आहे. वैकुंठामध्ये साप इत्यादी नसतात जे कोणाला डसतील. अशा गोष्टी असू शकत नाहीत.

बाबा म्हणतात - ५ विकारांची प्रवेशता झाल्याने तुम्ही तर जणू जंगली काटे बनला आहात. म्हणतात - बाबा, आम्ही मानतो, हे आहेच काट्यांचे जंगल. एकमेकांना डसून सर्व भस्मीभूत झाले आहेत. भगवानुवाच - मज ज्ञान सागराची मुले, ज्यांना मी कल्पापूर्वी देखील येऊन स्वच्छ बनवले (पावन बनवले) होते ते आता पतित काळे बनले आहेत. मुले जाणतात की आपण गोऱ्याचे सावळे कसे बनतो. पूर्ण ८४ जन्मांचा इतिहास-भूगोल थोडक्यात बुद्धीमध्ये आहे. यावेळी तुम्ही जाणता की, कोणी ५-६ वर्षांपासून नंबरवार बुद्धी अनुसार आपली बायोग्राफी (जीवन कहाणी) जाणतात. प्रत्येक जण आपली भूतकाळातील जीवन कहाणी देखील जाणतात - आपण काय-काय वाईट काम केले. मोठ्या-मोठ्या गोष्टी तर सांगू शकतात की, मी असे-असे केले. मागच्या जन्मातील तर सांगूच शकत नाहीत. जन्म-जन्मांतरीची बायोग्राफी (जीवन कहाणी) कोणीही सांगू शकणार नाही. बाकी ८४ जन्म कसे घेतले आहेत ते बाबा बसून त्यांना समजावून सांगतात, ज्यांनी पूर्ण ८४ जन्म घेतले आहेत, त्यांच्याच लक्षात येईल. घरी जाण्याकरिता मी तुम्हाला मत देतो; म्हणून बाबा म्हणतात - हे नॉलेज सर्व धर्मांकरिता आहे. जर घरी मुक्तिधामला जाऊ इच्छिता तर बाबाच तुम्हाला घेऊन जाऊ शकतात. बाबांशिवाय इतर कोणीही आपल्या घरी नेऊ शकत नाही. कोणाकडेच ही युक्ती नाहीये, जे बाबांची आठवण करतील आणि तिथे पोहोचतील. पुनर्जन्म तर सर्वांना घ्यायचाच आहे. बाबांशिवाय तर कोणीही घेऊन जाऊ शकत नाही. मोक्षाचा विचार तर कधीही करायचा नाही. असे तर होऊच शकत नाही. हा तर अनादि पूर्व-नियोजित ड्रामा आहे, यातून कोणीही बाहेर पडू शकत नाही. सर्वांचे एक बाबाच लिबरेटर, गाईड आहेत. तेच येऊन युक्ती सांगतात की माझी आठवण करा तर तुमची विकर्म विनाश होतील. नाहीतर शिक्षा भोगावी लागेल. पुरुषार्थ करत नाहीत, तर लक्षात येते हा इथला नाही आहे. मुक्ती-जीवनमुक्तीचा मार्ग तुम्ही मुलेच नंबरवार पुरुषार्था अनुसार जाणता. प्रत्येकाची समजावून सांगण्याची गती आपली-आपली आहे. तुम्ही देखील म्हणू शकता - यावेळी पतित दुनिया आहे. किती दंगली इत्यादी होतात. सतयुगामध्ये हे होणार नाही. आता कलियुग आहे. हे तर सर्व मनुष्य मानतील. सतयुग त्रेता… गोल्डन एज्ड, सिल्वर एज्ड… इतर भाषांमध्ये देखील अजून कोणती तरी नावे जरूर असतील. इंग्लिश तर सर्वांनाच माहित आहे. डिक्शनरी देखील असते - इंग्लिश-हिंदीची. इंग्रज लोक बराच काळ राज्य करून गेले आहेत, त्यामुळे त्यांचे इंग्रजी उपयोगाला येते.

मनुष्य यावेळी हे तर मानतात की आमच्यामध्ये कोणताच गुण नाही; बाबा, तुम्ही येऊन दया करा, आम्हाला पुन्हा पवित्र बनवा, आम्ही पतित आहोत. आता तुम्ही मुले समजता की, एकही पतित आत्मा परत घरी जाऊ शकत नाही. सर्वांना सतो, रजो, तमो मध्ये यायचेच आहे. आता बाबा या पतित मैफिलीमध्ये येतात, इतकी मोठी मैफिल आहे. मी कधीही देवतांच्या मैफिलीमध्ये येत नाही. जिथे धन-संपत्ती, ३६ प्रकाराचे भोजन मिळते, तिथे मी येतच नाही. जिथे मुलांना भाकरी सुद्धा मिळत नाही, त्यांच्याकडे येऊन दत्तक घेऊन संतान बनवून वारसा देतो. मी श्रीमंताला दत्तक घेत नाही, ते तर त्यांच्याच नशेमध्ये मश्गुल असतात. स्वतः म्हणतात की, आमच्यासाठी तर इथेच स्वर्ग आहे; आणि मग कोणाचा मृत्यू झाला तर म्हणतात की, स्वर्गवासी झाला. तर जरूर हा नरक झाला ना. तुम्ही हे समजावून का सांगत नाही? अजून वर्तमानपत्रामध्ये देखील कोणीही यावर एखादा तार्किक युक्तिवाद मांडलेला नाही आहे. मुले देखील जाणतात की, ड्रामा आमच्याकडून पुरुषार्थ करवून घेत आहे, आपण जो पुरुषार्थ करत आहोत, तो ड्रामामध्ये नोंदलेला आहे. पुरुषार्थ करणे देखील जरूरी आहे. केवळ ‘ड्रामा’, असे म्हणून गप्प बसून रहायचे नाहीये. प्रत्येक गोष्टीमध्ये पुरुषार्थ जरूर करायचाच आहे. कर्म-योगी, राज-योगी आहात ना. ते आहेत कर्म संन्यासी, हठयोगी. तुम्ही तर सर्व काही करता. घरी राहून, मुला-बाळांना सांभाळता. ते (संन्यासी) तर घरातून पळून जातात, त्यांना घरामध्ये थांबणे आवडत नाही. परंतु ती पवित्रता देखील भारतामध्ये पाहिजे ना, ते देखील चांगले आहे. परंतु आता तर पवित्र सुद्धा राहत नाहीत. असे नाही की ते कोणत्या पवित्र दुनियेमध्ये जाऊ शकतात. बाबां व्यतिरिक्त इतर कोणीही घेऊन जाऊ शकत नाही. आता तुम्ही जाणता - शांतीधाम तर आपले घर आहे. परंतु जायचे कसे? खूप पापे केली आहेत. ईश्वराला सर्वव्यापी म्हणतात. ही कोणाची बदनामी करतात? शिवबाबांची. कुत्रा-मांजर, कणा-कणामध्ये परमात्मा आहे असे म्हणतात. आता तक्रार कोणाकडे करावी! बाबा म्हणतात - मीच एक समर्थ आहे. माझ्या सोबत धर्मराज देखील आहे. ही सर्वांसाठी कयामतची (महाविनाशाची) वेळ आहे. सर्व जण शिक्षा इत्यादी भोगून मगच परत घरी निघून जातील. ड्रामाची बनावटच अशी आहे. शिक्षा जरूर भोगायच्याच आहेत. त्याचा तर साक्षात्कार देखील होतो. गर्भ-जेलमध्ये देखील साक्षात्कार होतो - ‘तू ही-ही कामे केली आहेस’; मग त्याची सजा मिळते, म्हणूनच तर म्हणतात की, ‘आता या जेल मधून बाहेर काढा. मी पुन्हा अशी पापे करणार नाही’. बाबा इथे सन्मुख येऊन या सर्व गोष्टी तुम्हाला समजावून सांगतात. गर्भामध्ये सजा भोगतात. ते देखील जेल आहे, दुःख फील होते. तिथे सतयुगामध्ये दोन्ही जेल नसतात, जिथे सजा भोगावी लागेल.

आता बाबा समजावून सांगत आहेत - ‘मुलांनो, माझी आठवण कराल तर अशुद्धता निघून जाईल’. तुमचे हे बोलणे अनेक जण मानतील. भगवंताचे नाव तर आहे ना, फक्त चूक एवढीच केली आहे की श्रीकृष्णाचे नाव टाकले आहे. आता बाबा देखील मुलांना सांगत आहेत - हे जे ऐकता, ऐकून वर्तमानपत्रांमध्ये छापा. शिवबाबा यावेळी सर्वांना सांगतात - ८४ जन्म उपभोगून आता तमोप्रधान बनला आहात. आता पुन्हा मी सल्ला देतो की, माझी आठवण करा तर विकर्म विनाश होतील आणि मग तुम्ही मुक्ती-जीवनमुक्तीधाममध्ये निघून जाल. बाबांचा हा आदेश आहे - ‘माझी आठवण करा तर अशुद्धता निघून जाईल. अच्छा, मुलांनो, किती सांगू आणि किती नको! अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) प्रत्येक गोष्टी करिता पुरुषार्थ जरूर करायचा आहे. ‘ड्रामा’, असे म्हणून बसून रहायचे नाही. कर्मयोगी, राजयोगी बनायचे आहे; कर्म संन्यासी, हठयोगी बनायचे नाही.

२) शिक्षा न भोगता बाबांसोबत घरी जाण्याकरिता आठवणीमध्ये राहून आत्म्याला सतोप्रधान बनवायचे आहे. सावळ्या पासून गोरे (पतिता पासून पावन) बनायचे आहे.

वरदान:-
सर्व रूपांनी आणि सर्व नात्यांनी आपले सर्व काही बाबांसमोर अर्पण करणारे सच्चे स्नेही भव

ज्याच्यावर अति प्रेम असते, तर त्या प्रेमासाठी सर्वांना दूर सारून सर्व काही त्याच्यासमोर अर्पण करतात. जसे बाबांचे मुलांवर प्रेम आहे, म्हणून आपल्या लाडक्या मुलांना कायम सुखाची प्राप्ती करवून देतात आणि बाकी सर्वांना मुक्तिधाम मध्ये बसवून ठेवतात. अशा मुलांच्या प्रेमाचा प्रत्यक्ष पुरावा आहे - सर्व रूपांनी आणि सर्व नात्यांनी आपले सर्व काही बाबांसमोर अर्पण करणे. जिथे प्रेम आहे तिथे योग आहे, आणि योग आहे तर सहयोग आहे. एकाही खजिन्याला मनमताने व्यर्थ गमावू शकत नाहीत.

बोधवाक्य:-
साकार कर्मामध्ये - ब्रह्मा बाबांना फॉलो करा आणि अशरीरी बनण्यामध्ये - निराकार शिवबाबांना फॉलो करा.

हे अव्यक्त इशारे - आता आपल्या ‘दाता’ स्वरूपाला प्रत्यक्ष करा.

तुम्हा मुलांकडे अनुभूतींचा खजिना संपन्न आहे, तर मग अशा तुम्ही संपन्न मूर्तींनी मास्टर दाता बनून सर्वांना अनुभूती करवत चला. दाता अर्थात सेवाधारी. दाता कधीही दिल्या शिवाय राहू शकत नाही. ते आपल्या दयाळूपणाच्या गुणाने कोणाला हिंमत देतील, तर एखाद्या निर्बल आत्म्याला बळ देतील. ते मास्टर सुखदाता असतील.