30-04-2025      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - बाबा तुम्हाला पुरुषोत्तम बनविण्यासाठी शिकवत आहेत, तुम्ही आता कनिष्ठ पासून उत्तम पुरुष बनता, सर्वात उत्तम आहेत देवता”

प्रश्न:-
तुम्ही मुले इथे कोणती मेहनत करता जी सतयुगामध्ये असणार नाही?

उत्तर:-
इथे देहा सहित देहाच्या सर्व नात्यांना विसरून आत्म-अभिमानी होऊन शरीर सोडण्यामध्ये खूप मेहनत करावी लागते. सतयुगामध्ये विना मेहनत बसल्या-बसल्या शरीर सोडाल. आता हीच मेहनत किंवा अभ्यास करता की, आपण आत्मा आहोत, आपल्याला या जुन्या दुनियेला जुन्या शरीराला सोडायचे आहे, नवीन घ्यायचे आहे. सतयुगामध्ये या अभ्यासाची आवश्यकता नाही.

गीत:-
दूर देश का रहने वाला…..

ओम शांती।
गोड-गोड रुहानी मुले जाणतात की, पुन्हा अर्थात कल्प-कल्पा नंतर. यालाच म्हटले जाते - ‘पुन्हा एकदा दूर देशाला राहणारे आले आहेत परक्या देशामध्ये’. हे केवळ त्या एका साठीचेच गायन आहे, त्यांचीच सर्वजण आठवण करतात, ते आहेत विचित्र. त्यांचे कोणते चित्र नाही. ब्रह्मा, विष्णू, शंकराला देवता म्हटले जाते. शिव भगवानुवाच म्हटले जाते, ते परमधाम मध्ये राहतात. त्यांना सुखधाम मध्ये कधी बोलावत नाहीत, दुःखधामामध्येच बोलावतात. ते येतातच मुळी संगमयुगावर. हे तर मुले जाणतात - सतयुगामध्ये साऱ्या विश्वामध्ये तुम्ही पुरुषोत्तमच असता. मध्यम, कनिष्ठ, तिथे असत नाहीत. उत्तम ते उत्तम पुरुष हे लक्ष्मी-नारायण आहेत ना. यांना असे बनविणारे श्री-श्री शिवबाबांना म्हणता येईल. श्री-श्री त्या शिवबाबांनाच म्हटले जाते. आजकाल तर संन्यासी इत्यादी देखील स्वतःला श्री-श्री म्हणतात. तर बाबाच येऊन या सृष्टीला पुरुषोत्तम बनवितात. सतयुगामध्ये साऱ्या सृष्टीमध्ये उत्तम ते उत्तम पुरुष राहतात. उत्तम ते उत्तम आणि कनिष्ठ ते कनिष्ठ मधील फरक यावेळी तुम्हाला समजतो. कनिष्ठ मनुष्य आपला नीचपणा दाखवतात. आता तुम्ही समजता आपण काय होतो, आता पुन्हा आपण स्वर्गवासी पुरुषोत्तम बनत आहोत. हे आहेच संगमयुग. तुम्हाला खात्री आहे की ही जुनी दुनिया नवीन बनणार आहे. जुनी सो नवीन, नवीन सो जुनी जरूर बनते. नवीन दुनियेला सतयुग, जुन्या दुनियेला कलियुग म्हटले जाते. बाबा आहेतच खरे सोने, खरे सांगणारे. त्यांना ट्रूथ म्हणतात. सर्वकाही सत्य सांगतात. हे जे म्हणतात की, ईश्वर सर्वव्यापी आहे, ते खोटे आहे. आता बाबा म्हणतात - खोटे ऐकू नका. ‘हियर नो इविल, सी नो इविल…’ राज विद्येची गोष्ट वेगळी आहे. ते तर आहेच अल्पकाळ सुखासाठी. दुसरा जन्म घेतला की मग नव्याने शिकावे लागते. ते आहे अल्प काळाचे सुख. हे आहे २१ जन्म, २१ पिढीकरिता. पिढी वृद्धत्वाला म्हटले जाते. तिथे कधी अकाली मृत्यू होत नाही. इथे तर पहा कसे अकाली मृत्यू होत राहतात. ज्ञानामध्ये देखील मरतात. तुम्ही आता काळावर विजय प्राप्त करत आहात. जाणता ते आहे अमरलोक, हा आहे मृत्यूलोक. तिथे तर जेव्हा वृद्ध होतात तेव्हा साक्षात्कार होतो - आपण हे शरीर सोडून जाऊन लहान बाळ बनणार. वृद्ध अवस्था पूर्ण होईल आणि शरीर सोडून द्याल. नवीन शरीर मिळाले तर ते चांगलेच आहे ना. बसल्या-बसल्या आनंदाने शरीर सोडतात. इथे तर त्या अवस्थेमध्ये असताना देखील शरीर सोडण्यासाठी मेहनत करावी लागते. इथली मेहनत तिथे मग कॉमन होते. इथे देहा सहित जे काही आहे सर्वाला विसरायचे आहे. स्वतःला आत्मा समजायचे आहे, या जुन्या दुनियेला सोडायचे आहे. नवीन शरीर घ्यायचे आहे. आत्मा सतोप्रधान होती तर सुंदर शरीर मिळाले. मग काम-चितेवर बसल्याने काळे तमोप्रधान झाले, तर शरीर देखील सावळे मिळते, सुंदर पासून श्याम बनलात. कृष्णाचे नाव तर कृष्णच आहे मग त्याला श्याम-सुंदर का म्हणतात? चित्रांमध्ये देखील कृष्णाचे चित्र सावळे बनवतात परंतु अर्थ समजत नाहीत. आता तुम्ही समजता - सतोप्रधान होतो तेव्हा सुंदर होतो. आता तमोप्रधान, सावळे बनलो आहोत. सतोप्रधान असणाऱ्याला पुरुषोत्तम म्हटले जाते, तमोप्रधान असणाऱ्याला कनिष्ठ म्हटले जाते. बाबा तर एव्हर प्युअर (सदा पावन) आहेत. ते येतातच हसीन (सुंदर) बनविण्यासाठी. प्रवासी आहेत ना. कल्प-कल्प येतात, नाहीतर जुन्या दुनियेला नवीन कोण बनवणार! ही तर पतित छी-छी दुनिया आहे. या गोष्टींना दुनियेमध्ये कोणीही जाणत नाही. आता तुम्ही जाणता बाबा आपल्याला पुरुषोत्तम बनविण्यासाठी शिकवत आहेत. पुन्हा देवता बनण्यासाठी आपण सो ब्राह्मण बनलो आहोत. तुम्ही आहात संगमयुगी ब्राह्मण. दुनिया हे जाणत नाही की आता संगमयुग आहे. शास्त्रांमध्ये कल्पाचा कालावधी लाखो वर्षे लिहिला आहे तर समजतात कलियुग तर अजून लहान बाळ आहे. आता तुम्ही मनातून समजता - आपण इथे आलो आहोत उत्तम ते उत्तम, कलियुगी पतितापासून सतयुगी पावन, मनुष्यापासून देवता बनण्यासाठी. ग्रंथामध्ये देखील महिमा आहे - ‘मूत पलीती कपड़ धोए’. परंतु ग्रंथ वाचणारे देखील अर्थ समजत नाहीत. यावेळी तर बाबा येऊन साऱ्या दुनियेतील मनुष्यमात्राला स्वच्छ करतात. तुम्ही त्या बाबांच्या समोर बसले आहात. बाबाच मुलांना समजावून सांगतात हे रचता आणि रचनेचे नॉलेज इतर कोणी जाणतही नाहीत. बाबा ज्ञानाचा सागर आहेत. ते सत्य आहेत, चैतन्य आहेत, अमर आहेत. पुनर्जन्म रहित आहेत. शांतीचा सागर, सुखाचा सागर, पवित्रतेचा सागर आहेत. त्यांनाच बोलावतात की येऊन हा वारसा द्या. तुम्हाला आता बाबा २१ जन्मांसाठी वारसा देत आहेत. हे आहे अविनाशी शिक्षण. शिकवणारे बाबा देखील अविनाशी आहेत. अर्धा कल्प तुम्ही राज्य प्राप्त करता मग रावण राज्य सुरू होते. अर्धा कल्प आहे राम राज्य, अर्धा कल्प आहे रावण राज्य.

प्राणापेक्षाही प्रिय एक बाबाच आहेत कारण तेच तुम्हा मुलांना सर्व दुःखांपासून सोडवून अपार सुखामध्ये घेऊन जातात. तुम्ही निश्चयाने म्हणता ते आमचे प्राणापेक्षाही प्रिय पारलौकिक पिता आहेत. प्राण आत्म्याला म्हटले जाते. सर्व मनुष्यमात्र त्यांचीच आठवण करतात कारण अर्ध्या कल्पासाठी दुःखातून सोडवून शांती आणि सुख देणारे बाबाच आहेत. तर प्राणापेक्षाही प्रिय झाले ना. तुम्ही जाणता सतयुगामध्ये आपण कायम सुखी असतो. बाकीचे सर्व शांतीधाममध्ये निघून जातील. मग रावण राज्यामध्ये दुःख सुरू होते. दुःख आणि सुखाचा खेळ आहे. मनुष्य समजतात इथेच आता-आता सुख आहे, आता-आता दुःख आहे. परंतु नाही, तुम्ही जाणता स्वर्ग वेगळा आहे, नरक वेगळा आहे. स्वर्गाची स्थापना बाबा, राम करतात, नरकाची स्थापना रावण करतो, ज्याला वर्षानुवर्षे जाळतात. परंतु कशाकरता जाळतात? कारण काय आहे? काहीच जाणत नाहीत. किती खर्च करतात. किती कथा बसून ऐकवतात, रामाची सीता भगवतीला रावण घेऊन गेला. मनुष्य सुद्धा समजतात की, असेच झाले असेल.

आता तुम्ही सर्वांचे ऑक्युपेशन (जीवन चरित्र) जाणता. हे तुमच्या बुद्धीमध्ये नॉलेज आहे. साऱ्या दुनियेच्या इतिहास-भूगोलाला कोणीही मनुष्यमात्र जाणत नसतील. बाबाच जाणतात. त्यांना विश्वाचा रचयिता देखील म्हणणार नाही. दुनिया तर आहेच, बाबा केवळ येऊन नॉलेज देतात की हे चक्र कसे फिरते. भारतामध्ये या लक्ष्मी-नारायणाचे राज्य होते, त्यानंतर मग काय झाले? देवतांनी कोणाशी युद्ध केले का? काहीच नाही. अर्ध्या कल्पानंतर रावण राज्य सुरू झाल्याने देवता वाममार्गामध्ये जातात. बाकी असे नाही की युद्धामध्ये कोणी पराजित केले. लष्कर इत्यादीची काही गोष्टच नाही. ना युद्ध करून राज्य घेतात, ना गमावतात. हे तर योगामध्ये राहून, पवित्र बनून पवित्र राज्य तुम्ही स्थापन करता. बाकी हातामध्ये कोणते हत्यार नाहीये. ही आहे डबल अहिंसा. एक तर पवित्रतेची अहिंसा, दुसरे तुम्ही कोणाला दुःख देत नाहीत. सर्वात कठोर हिंसा आहे काम-कटारीची. हिच आदि-मध्य-अंत दुःख देते. रावणाच्या राज्यामध्येच दुःख सुरू होते. रोग सुरू होतात. किती असंख्य रोग आहेत. अनेक प्रकारची औषधे तयार होत राहतात. रोगी बनले आहेत ना. तुम्ही या योगबलाद्वारे २१ जन्मांसाठी निरोगी बनता. तिथे दुःख किंवा रोगाचे नामो-निशाणही नसते. त्यासाठी तुम्ही शिकत आहात. मुले जाणतात - भगवान आपल्याला शिकवून भगवान-भगवती बनवत आहेत. शिक्षण देखील किती सोपे आहे. अर्ध्या-पाऊण तासामध्ये साऱ्या चक्राचे नॉलेज समजावून सांगतात. ८४ जन्म देखील कोण-कोण घेतात - हे तुम्हीच जाणता.

भगवान आपल्याला शिकवत आहेत, ते आहेतच निराकार. त्यांचे खरे-खरे नाव ‘शिव’ आहे. कल्याणकारी आहेत ना. सर्वांचे कल्याणकारी, सर्वांचे सद्गती दाता आहेत - उच्च ते उच्च बाबा. उच्च ते उच्च मनुष्य बनवतात. बाबा शिकवून हुशार बनवून मग आता म्हणतात जाऊन शिकवा. या ब्रह्माकुमार-ब्रह्माकुमारींना शिकवणारे शिवबाबा आहेत. ब्रह्माद्वारे तुम्हाला ॲडॉप्ट केले आहे. प्रजापिता ब्रह्मा कुठून आला? या गोष्टींमध्येच गोंधळतात. यांना ॲडॉप्ट केले, म्हणतात - ‘अनेक जन्मांच्या अंतामध्ये…’ आता अनेक जन्म कोणी घेतले? या लक्ष्मी-नारायणानेच पूर्ण ८४ जन्म घेतले आहेत म्हणून कृष्णासाठी म्हणतात श्याम-सुंदर. आपण ते सुंदर होतो, नंतर मग दोन कला कमी झाल्या. कला कमी होत-होत आता नो कला झालो आहोत. आता तमोप्रधानापासून पुन्हा सतोप्रधान कसे बनणार? बाबा म्हणतात - माझी आठवण करा तर तुम्ही पावन बनाल. तुम्ही हे देखील जाणता की, हे रुद्र ज्ञान आहे. आता यज्ञामध्ये हवेत ब्राह्मण. तुम्ही खरे ब्राह्मण आहात खरी गीता ऐकविणारे; म्हणून तुम्ही लिहिता देखील - खरी गीता पाठशाळा. त्या (भक्तिमार्गातील) गीतेमध्ये तर नावच बदलून टाकले आहे. हो, ज्यांनी जसा कल्पापूर्वी वारसा घेतला होता तेच येऊन घेतील. आपल्या मनाला विचारा - आपण पूर्ण वारसा घेऊ शकू का? मनुष्य शरीर सोडतात तर रिकाम्या हाताने जातात, ती विनाशी कमाई काही सोबत तर येणार नाही. तुम्ही शरीर सोडाल तरीही हात भरतू असतील कारण २१ जन्मांसाठी तुम्ही आपली कमाई जमा करत आहात. मनुष्यांची तर सारी कमाई मातीमध्ये मिसळून जाईल. यापेक्षा तर आपण का नाही ट्रान्सफर करून बाबांना द्यावे. जे खूप दान करतात ते तर दुसऱ्या जन्मामध्ये श्रीमंत बनतात, ट्रान्सफर करतात ना. आता तुम्ही २१ जन्मांकरिता नवीन दुनियेमध्ये ट्रान्सफर करता. तुम्हाला रिटर्नमध्ये २१ जन्मांसाठी मिळते. ते (दुनियावाले) तर एका जन्मासाठी अल्प काळासाठी ट्रान्सफर करतात. तुम्ही तर ट्रान्सफर करता २१ जन्मांसाठी. बाबा तर आहेतच दाता. हे ड्रामामध्ये नोंदलेले आहे. जे जितके करतात, ते प्राप्त करतात. ते (भक्तिमार्गातील लोक) इनडायरेक्ट दान-पुण्य करतात तर अल्प काळासाठी रिटर्न मिळते. हे आहे डायरेक्ट. आता सर्वकाही नवीन दुनियेमध्ये ट्रान्सफर करायचे आहे. यांना (ब्रह्माला) बघितलेत किती धाडस केले. तुम्ही म्हणता – सर्व काही ईश्वराने दिले आहे. आता बाबा म्हणतात - हे सर्व मला द्या. मी तुम्हाला विश्वाची बादशाही देतो. बाबांनी तर ताबडतोब दिले, जास्त विचार केला नाही. पूर्ण अधिकार दिला. आपल्याला विश्वाची बादशाही मिळत आहे, तो नशा चढला. मुले इत्यादींचा काहीच विचार केला नाही. देणारा ईश्वर आहे तर मग कोणासाठी जबाबदार थोडेच रहायचे. २१ जन्मांसाठी कसे ट्रान्सफर करायचे असते - या बाबांना (ब्रह्मा बाबांना) पहा, फॉलो फादर. प्रजापिता ब्रह्माने केले ना. ईश्वर तर दाता आहेत. त्यांनी यांच्याद्वारे करविले. तुम्ही देखील जाणता आपण आलो आहोत बाबांकडून बादशाही घेण्यासाठी. दिवसेंदिवस वेळ कमी होत जात आहे. संकटे अशी येतील काही विचारू नका. व्यापाऱ्यांचा श्वास तर मुठीतच राहतो. कोणता यमदूत येऊ नये. पोलिसाचे तोंड पाहून मनुष्य बेशुद्ध होतात. पुढे चालून खूप हैराण करतील. सोने इत्यादी काहीच ठेवून देणार नाहीत. बाकी तुमच्याकडे काय राहील! पैसेच राहणार नाहीत ज्याने काही खरेदी करू शकाल. नोट इत्यादी देखील चालू शकणार नाही. राज्य बदलते. शेवटी खूप दुःखी होऊन मरतात. अतोनात दुःखा नंतर मग सुख येईल. हा आहेच खुने नाहेक खेळ (रक्त रंजित खेळ). नैसर्गिक आपत्ती देखील येतील. त्यापूर्वी बाबांकडून पूर्ण वारसा तर घेतला पाहिजे. भले हिंडा-फिरा, फक्त बाबांची आठवण करत रहा तर पावन बनाल. बाकी संकटे खूप येतील. खूप हाय-हाय करत राहतील. तुम्हा मुलांना आता अशी प्रॅक्टिस करायची आहे जेणेकरून अंतामध्ये एका शिवबाबांचीच आठवण रहावी. त्यांच्या आठवणीमध्येच राहून शरीर सोडावे इतर कोणीही मित्र-संबंधी इत्यादीची आठवण येऊ नये. ही प्रॅक्टिस करायची आहे. बाबांचीच आठवण करायची आहे आणि नारायण बनायचे आहे. ही खूप प्रॅक्टिस करावी लागेल. नाही तर खूप पश्चाताप करावा लागेल. इतर कोणाची आठवण आली तर नापास झाला. जे पास होतात तेच विजयी माळेमध्ये ओवले जातील. स्वतःला विचारले पाहिजे - बाबांना किती आठवण करतो? काहीही जवळ हातामध्ये असेल तर त्याचीच अंतिम समयी आठवण येईल. जवळ हातामध्ये काहीही नसेल तर आठवण सुद्धा येणार नाही. बाबा म्हणतात - माझ्याजवळ तर काहीच नाही. ही माझी वस्तू नाही. त्या नॉलेजच्या बदल्यात हे घ्या तर २१ जन्मांसाठी वारसा मिळेल. नाही तर स्वर्गाची बादशाही गमावून बसाल. तुम्ही इथे येताच मुळी बाबांकडून वारसा घेण्यासाठी. पावन तर जरूर बनावे लागेल. नाही तर सजा खाऊन हिशोब चुकता करून जाल. पद काहीच मिळणार नाही. श्रीमतावर चालाल तर कृष्णाला मांडीवर घ्याल. म्हणतात ना - कृष्णासारखा पती मिळावा किंवा मुलगा मिळावा. कोणी तर चांगल्या रीतीने समजतात, कोणी तर मग उलटे-सुलटे बोलतात. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) जसे ब्रह्मा बाबांनी आपले सर्व काही ट्रान्सफर करून पूर्ण अधिकार बाबांना दिला, विचार केला नाही, असे फॉलो फादर करा २१ जन्मांचे प्रारब्ध जमा करायचे आहे.

२) ही प्रॅक्टिस करायची आहे - अंतिम समयी एका बाबांव्यतिरिक्त इतर कोणत्याही वस्तूची आठवण येऊ नये. आपले काहीच नाही, सर्व बाबांचे आहे. अल्फ आणि बे (बाबा आणि बादशाही) याच स्मृतीद्वारे पास होऊन विजय माळेमध्ये यायचे आहे.

वरदान:-
मन्सावर फुल अटेंशन देणारे चढत्या कलेचे अनुभवी विश्व परिवर्तक भव

आता अंतिम समयी मन्साद्वारेच विश्व परिवर्तनाच्या निमित्त बनायचे आहे त्यामुळे आता मन्साचा एक संकल्प देखील व्यर्थ झाला तर खूप काही गमावले, एका संकल्पाला देखील साधारण गोष्ट समजू नका, वर्तमान समयी संकल्पाची खळबळ देखील खूप मोठी अशांती म्हणून गणली जाते कारण आता काळ बदलला आहे, पुरुषार्थाची गती देखील बदलली आहे, तर संकल्पामध्येच फुल स्टॉप पाहिजे. जेव्हा मन्सावर इतके अटेंशन असेल तेव्हाच चढत्या कलेद्वारे विश्व परिवर्तक बनू शकाल.

बोधवाक्य:-
कर्मामध्ये योगाचा अनुभव होणे अर्थात कर्मयोगी बनणे.

अव्यक्त इशारे - “कंबाइंड रुपाच्या स्मृती द्वारे सदा विजयी बना”

“मी आणि बाबा” - या कंबाइंड रुपाचा अनुभव करत, कायम शुभ भावना, श्रेष्ठ कामना, श्रेष्ठ वाणी, श्रेष्ठ दृष्टी, श्रेष्ठ कर्माद्वारे विश्व कल्याणकारी स्वरूपाचा अनुभव करा तर सेकंदामध्ये सर्व समस्यांचे समाधान करू शकाल. नेहमी एक स्लोगन लक्षात ठेवा - “ना समस्या बनणार, ना समस्येला पाहून डगमग होणार, स्वतः देखील समाधान स्वरूप राहणार आणि इतरांना देखील समाधान देणार”. ही स्मृती सफलता स्वरूप बनवेल.